Home Blog Page 2484

भेसळयुक्त इंधन पुरवठ्याची तात्काळ चौकशी करा – विधानसभाध्यक्ष नाना पटोले

0

दि. १४ : महाराष्ट्र राज्यामध्ये बायोडिझलच्या नावाने भेसळयुक्त डिझेल व इंधनाचा पुरवठा करणाऱ्यांवर चौकशी करुन शासकीय निकषानुसार सदर पंप सुरु आहे अथवा नाही याबाबत तात्काळ तपासणी करुन अहवाल सादर करावा, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाचे उपायुक्त यांना दिले. या संदर्भातील निवेदन फेडरेशन ऑफ महाराष्ट्र पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे सचिव अमित गुप्ता यांनी विधानसभा अध्यक्षांना दिले होते.

शासन परिपत्रकाचा गैर फायदा घेऊन अनेक भेसळयुक्त इंधनाचा पुरवठा करणारे माफिया  सक्रीय झाले असून अधिकृत असल्याचे दाखवून छोट्या टॅंकर मध्ये पंप बसवून जागोजागी वाहनामध्ये त्याची विक्री सुरु आहे. पेट्रोल पंप सुरु करण्यासाठी आवश्यक सर्व परवाने बायोडिझेल विक्रीसाठी घेणे बंधनकारक आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.

देशात कोणत्याही पेट्रोलियम पदार्थाची विक्री करताना भारतीय मानक ब्युरोने दिलेल्या दिशानिर्देशाचे पालन करणे आवश्यक  आहे. बायोडिझेल या निर्देशासुनसार बी -१०० डिझेलची घनता ०.८६० ते ०.९०० या दरम्यान असणे आवश्यक आहे. परंतु घनतेच्या इंधनावर वाहन चालविणे शक्य नाही म्हणून या इंधनामध्ये इंपोर्टेड  डिझेल, फ्युएल ऑईल एमटीओ व केरोसिनची भेसळ केल्या जात आहे. सध्या बाजारात विक्री केल्या जाणाऱ्या बायोडिझेलची घनता ०.८२५ ते ०.८३० च्या जवळपास आहे. भारतीय मानक प्रमाणे ती २० टक्के आहे. राज्य शासनाला डिझेल विक्रीमुळे २१ टक्के टॅक्स अधिक ३ रुपये सेस मिळतो. अशा भेसळयुक्त डिझेल विक्रीमध्ये कर चोरी होत असल्यामुळे राज्यशासनाला महसुली उत्पन्नाचे नुकसान होत आहे.

नागपूर जिल्ह्यामध्ये नेक्सस बायोडिझेल कंपनीने कोणताही परवाना न घेता शासनाने अधिग्रहित केलेल्या जागेवर पंप सुरु केलेला आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये लोकांना मिनी पेट्रोल पंप लावून देण्याचे आमिष दाखवून लोकांकडून पैसे जमा करणे सुरु आहे. शासनाच्या दिशानिर्देशानुसार छोट्या टँकर मधून ट्रक, बस व इतर भेसळयुक्त इंधन विक्री करणाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्याचे निवेदनात म्हटले आहे.

या निवेदनाची योग्य चौकशी करून शासकीय निकषानुसार सदर पंप सुरू आहे अथवा नाही याबाबत तात्काळ मौका तपासणी करून व आवश्यक कागदपत्रे तपासून अहवाल सादर करण्याचे निर्देश नाना पटोले यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाला दिले.

राज्यात दीड लाख ॲक्टिव्ह रुग्ण – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

0

राज्यात 4 लाखाहून अधिकरुग्ण बरे

मुंबई, दि.१४ : राज्यात १० हजार ४८४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यभरात कोरोनाचे एकूण ४ लाख ०१ हजार ४४२ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.०९ टक्के  एवढे आहे. आज १२ हजार ६०८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ५१ हजार ५५५ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.

आज निदान झालेले १२,६०८ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ३६४ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-९७९ (४७), ठाणे- १९८ (५), ठाणे मनपा-२२३ (१९),नवी मुंबई मनपा-३९३ (१३), कल्याण डोंबिवली मनपा-२९४(४),उल्हासनगर मनपा-२६ (३), भिवंडी निजामपूर मनपा-१३ (४), मीरा भाईंदर मनपा-८८ (२), पालघर-१५० (५), वसई-विरार मनपा-१९६ (७), रायगड-३२८ (८), पनवेल मनपा-१३७ (१), नाशिक-१८५ (७), नाशिक मनपा-६८८ (११), मालेगाव मनपा-६८ (१),अहमदनगर-३८१ (१),अहमदनगर मनपा-२१० (४), धुळे-१६४ (१), धुळे मनपा-१४५ , जळगाव-४५० (६), जळगाव मनपा-१३० (६), नंदूरबार-१५, पुणे- ५२३ (३१), पुणे मनपा-११९२ (५६), पिंपरी चिंचवड मनपा-९०६ (१३), सोलापूर-३४६ (३), सोलापूर मनपा-११३ (२), सातारा-२४१ (७), कोल्हापूर-४१९ (८), कोल्हापूर मनपा-३१३ (६), सांगली-११७ (३), सांगली मिरज कुपवाड मनपा-२०६ (१६), सिंधुदूर्ग-३०, रत्नागिरी-१६२ (४), औरंगाबाद-१४५ (५),औरंगाबाद मनपा-२४७ (४), जालना-९७ (१), हिंगोली-४४ (१), परभणी-८ (१), परभणी मनपा-३३, लातूर-११७ (२), लातूर मनपा-५६ (२), उस्मानाबाद-१९१ (४), बीड-७४ (९), नांदेड-७१ (४), नांदेड मनपा-७६ (१), अकोला-४१ (१), अकोला मनपा-१३, अमरावती-६३ (१), अमरावती मनपा-९९ (१), यवतमाळ-११५, बुलढाणा-१०२ (२), वाशिम-७५(१), नागपूर-१५१ (२), नागपूर मनपा-६१५ (१६), वर्धा-२७, भंडारा-२४, गोंदिया-२१ (१), चंद्रपूर-२३ (१), चंद्रपूर मनपा-१७, गडचिरोली-१०, इतर राज्य २४.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३० लाख ४५ हजार ०८५ नमुन्यांपैकी ५ लाख ७२ हजार ७३४ नमुने पॉझिटिव्ह (१८.८ टक्के) आले आहेत. राज्यात १० लाख ३२ हजार १०५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार ३८६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३६४ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३९ टक्के एवढा आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील                         

मुंबई: बाधित रुग्ण- (१,२८,५३५) बरे झालेले रुग्ण- (१,०१,८६०), मृत्यू- (७०३८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३००), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९,३३७)

ठाणे: बाधित रुग्ण- (१,१०,९३८), बरे झालेले रुग्ण- (८८,६३८), मृत्यू (३२४०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९,०५९)

पालघर: बाधित रुग्ण- (२०,२४३), बरे झालेले रुग्ण- (१३,९८१), मृत्यू- (४७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५७८४)

रायगड: बाधित रुग्ण- (२२,२७८), बरे झालेले रुग्ण-(१७,२५४), मृत्यू- (५६३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४४५९)

रत्नागिरी: बाधित रुग्ण- (२६११), बरे झालेले रुग्ण- (१५७३), मृत्यू- (९६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९४२)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (५६६), बरे झालेले रुग्ण- (३९२), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६४)

पुणे: बाधित रुग्ण- (१,२४,६४१), बरे झालेले रुग्ण- (८१,६२८), मृत्यू- (३०५७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३९,९५६)

सातारा: बाधित रुग्ण- (६७९३), बरे झालेले रुग्ण- (४२३७), मृत्यू- (२१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३४२)

सांगली: बाधित रुग्ण- (५७४४), बरे झालेले रुग्ण- (३३५५), मृत्यू- (१८८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२०१)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (१२,७४५), बरे झालेले रुग्ण- (६१५९), मृत्यू- (३२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६२६०)

सोलापूर: बाधित रुग्ण- (१३,६१४), बरे झालेले रुग्ण- (७९८३), मृत्यू- (६१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (५०१४)

नाशिक: बाधित रुग्ण- (२४,४४४), बरे झालेले रुग्ण- (१५,७९१), मृत्यू- (६५०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८००३)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (१२,५१२), बरे झालेले रुग्ण- (८४०२), मृत्यू- (१२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६२२)

जळगाव: बाधित रुग्ण- (१६,८५८), बरे झालेले रुग्ण- (११,२७९), मृत्यू- (६६६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४९१३)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (११०३), बरे झालेले रुग्ण- (७२४), मृत्यू- (५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२८)

धुळे: बाधित रुग्ण- (४७७०), बरे झालेले रुग्ण- (३१२७), मृत्यू- (१३९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५०२)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (१७,९२३), बरे झालेले रुग्ण- (११,८८२), मृत्यू- (५६६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५४७५)

जालना: बाधित रुग्ण-(२९५०), बरे झालेले रुग्ण- (१७५५), मृत्यू- (१०३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०९२)

बीड: बाधित रुग्ण- (२४२७), बरे झालेले रुग्ण- (७४२), मृत्यू- (५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (१६३२)

लातूर: बाधित रुग्ण- (४८०१), बरे झालेले रुग्ण- (२१६४), मृत्यू- (१८४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४५३)

परभणी: बाधित रुग्ण- (१३३१), बरे झालेले रुग्ण- (५२८), मृत्यू- (५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७५२)

हिंगोली: बाधित रुग्ण- (९३९), बरे झालेले रुग्ण- (६३९), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७८)

नांदेड: बाधित रुग्ण- (३६९२), बरे झालेले रुग्ण (१६२५), मृत्यू- (१३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९३३)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (३२५६), बरे झालेले रुग्ण- (१५६३), मृत्यू- (८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६०७)

अमरावती: बाधित रुग्ण- (३३६३), बरे झालेले रुग्ण- (२१९८), मृत्यू- (९४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०७१)

अकोला: बाधित रुग्ण- (३१९०), बरे झालेले रुग्ण- (२५६६), मृत्यू- (१३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८८)

वाशिम: बाधित रुग्ण- (११२२), बरे झालेले रुग्ण- (७१६), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८५)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (२२१२), बरे झालेले रुग्ण- (१३१५), मृत्यू- (५९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८३८)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (१९४८), बरे झालेले रुग्ण- (१२११), मृत्यू- (४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६८९)

नागपूर: बाधित रुग्ण- (११,९१७), बरे झालेले रुग्ण- (४३२८), मृत्यू- (३२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (७२६३)

वर्धा: बाधित रुग्ण- (३४५), बरे झालेले रुग्ण- (२०८), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२६)

भंडारा: बाधित रुग्ण- (४६७), बरे झालेले रुग्ण- (२९४), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७०)

गोंदिया: बाधित रुग्ण- (७३४), बरे झालेले रुग्ण- (४३३), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९३)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (९७२), बरे झालेले रुग्ण- (५१३), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४५४)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (५००), बरे झालेले रुग्ण- (३७९), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११९)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (६१०), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (५८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५५२)

एकूण: बाधित रुग्ण-(५,७२,७३४) बरे झालेले रुग्ण-(४,०१,४४२),मृत्यू- (१९,४२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३१०),ॲक्टिव्ह रुग्ण-(१,५१,५५५)

 (टीप: आज नोंद झालेल्या एकूण ३६४ मृत्यूंपैकी २७७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ४६ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ४१ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ४१ मृत्यू ठाणे जिल्हा –१६, सांगली -७,  पुणे -६,  रायगड -३, बीड -२, कोल्हापूर -१, नागपूर -१, रत्नागिरी -१ सोलापूर – १, जळगाव -१, लातूर -१ आणि नाशिक -१असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

कोरोनासारख्या संकटातही जनतेसोबत…!

0

स्वातंत्र्य दिनाचा ७३ वा वर्धापन दिन साजरा करताना मागे वळून पाहताना हेच लक्षात येते की विद्यमान महाविकास आघाडी शासन काळातील मोठा कालावधी हा केवळ कोरोना या जागतिक संकटाचा मुकाबला करण्यात गेला. पण या आपत्तीच्या काळातही शासन म्हणून जनतेच्या सेवेत आपण कोठे कमी पडलो? आपण आणखी काय करावयास हवे होते? याचे सिंहावलोकन होणे आवश्यक आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दोन महत्त्वाकांक्षी योजना होत्या. त्या म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमुक्ती व गोरगरिबांना अन्न देणारी शिवभोजन योजना. आपल्या जिल्ह्यात आपण लगेचच या योजनांवर काम करणे सुरु केले होते. ३१ मे पर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देणे आवश्यक होते. आतापर्यंत जिल्ह्यात एक लाख दोन हजार ७०९ पात्र शेतकरी सभासद असून त्यात आधार प्रमाणिकरण व अन्य प्रक्रिया पूर्ण करुन आतापर्यंत ८८ हजार ३६५ शेतकऱ्यांना ५६३ कोटी १५ लाख रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. मात्र त्या दरम्यानच मार्च महिन्याच्या मध्यात कोरोनाचे संकट देशावर घोंघावू लागले. या जागतिक संकटाचा मोठ्या धीराने आणि संयमाने उपयोग करणे आवश्यक होते. त्या दिशेने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सबंध शासन आणि शासनाची यंत्रणा उभी टाकली. यात आरोग्य यंत्रणा, पोलीस यंत्रणा यांचे विशेषत्वाने कौतूक केले पाहिजे. त्यासाठीच त्यांना ‘फ्रंट लाईन कोरोना वॉरियर’ असे संबोधण्यात आले.

कोरोनाच्या संकटाचा पहिला टप्पा हा लॉकडाऊनचा होता. त्यामुळे अनेक स्थलांतरित मजूरांचा प्रश्न निर्माण झाला. या मजूरांना आपापल्या गावी पोहोचविण्यात जिल्हा प्रशासनाने मोठी मोलाची भूमिका बजावली. आपल्या जिल्ह्यातून तब्बल ४७३३ मजूरांना त्यांच्या गावी सुखरुप पाठविण्यात आले. जिल्ह्यात २६ जानेवारी २०२० पासूनच शिवभोजन थाळी केंद्र सुरु झाले होते. कोरोनाच्या लॉकडाऊन काळात गोरगरिबांची उदरभरणाची व्यवस्था व्हावी यासाठी ही केंद्र संख्या दोन वरुन १३ पर्यंत वाढविण्यात आली. त्यातून आपण या संपूर्ण लॉकडाऊन कालावधीत या सर्व केंद्रांवरुन दररोज १५०० या प्रमाणे आतापर्यंत तीन लाख ६८ हजार थाळींचे वाटप केले आहे.

कोरोनाचे संकट आले तेव्हा आपल्या जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांची सज्जता करण्यावर आपण भर दिला. त्यातूनच जिल्ह्यात कोरोना चाचणी प्रयोगशाळा सुरु करण्यात आली. त्यात आपल्या जिल्ह्यात आतापर्यंत २२ हजाराहून अधिक जणांचे नमुने आपण तपासले. आजतागायत तीन हजारांहून अधिक लोक पॉझिटिव्ह आले. त्यातील २५०० हून अधिक लोक बरे होऊन घरी गेले. सद्यस्थितीत ५०० हून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत, तर १२७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या आपत्तीने आपल्याला खूप काही शिकवले. अगदी डोळ्यानेही न दिसणारा हा विषाणू आपले जीवनमान बदलविणारा ठरला. या आजारावर लवकरात लवकर औषध सापडावे हीच आजच्या दिवशी मी प्रार्थना करतो.

या काळात अनेक सेवाभावी संस्थांनी अन्नदानासारख्या उपक्रमाचे आयोजन करुन आपल्या समाजातील गोरगरिबांना मदत केली. शासनानेही स्वस्तधान्य दुकानांमार्फत अन्नधान्याचे वितरण केले, त्यासाठी रेशन कार्ड असणे ही अटही काढून टाकण्यात आली. लॉक डाऊनच्या या कालावधीतही आपला शेतकरी हा सज्ज होता. आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कष्ट करुन तब्बल पाच हजार ७१० मेट्रीक टन शेतमालाचे उत्पादन करुन तो विक्री केला. त्यातून १० कोटी ८४ लक्ष रुपयांचे उत्पादन घेतले. यामुळे आपल्या जिल्ह्यात व शेजारील जिल्ह्यात तसेच परराज्यातही अन्नधान्याची उपलब्धता या आपत्तीच्या काळात झाली. हे उत्पादन करण्यात आणि ते विक्री करण्यात जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे ३६० गट सक्रिय होते.

याच कालावधीत कृषी विभागाने घरपोच कृषी निविष्ठा या उपक्रमात जिल्ह्यात ८०८ शेतकरी गटांच्या माध्यमातून तब्बल १० हजार ६०१ मेट्रीक टन खते, ३० हजार ९५ क्विंटल बियाणे थेट शेतकऱ्यांना घरपोच देण्यात आले. या उपक्रमाचा लाभ ४५ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना झाला. आगामी हंगामात करावयाच्या शेती संदर्भात तांत्रिक मार्गदर्शनासाठी जिल्ह्यात कृषी संजिवनी सप्ताह राबवून २५ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले.

जिल्ह्यात ६२ हजार ९९३ शेतकऱ्यांकडून १८ लाख ४४ हजार ३४१ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. विशेष म्हणजे त्यातील २६ हजार ९९० शेतकऱ्यांकडून सात लाख ४९ हजार ७०० क्विंटल कापूस कोरोना मुळे कराव्या लागलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत करण्यात आला. जिल्ह्यात शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ पोहोचविण्यासाठीही प्रशासनाने प्रयत्न केले आहेत. ३१ जुलै पर्यंत खरीप हंगाम २०२० साठी जिल्ह्यातील दोन लाख चार हजार ५८२ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. त्यात एक लाख ९२ हजार ७१५ बिगर कर्जदार शेतकरी असून ११ हजार ८६७ कर्जदार शेतकरी आहेत. एकंदर जिल्ह्यात एक लाख ६९ हजार ९२१ हेक्टर क्षेत्राचा पीक विमा काढण्यात आला असून त्यात १३ कोटी ९८ लाख ८० हजार ७७७ रुपयांचा वाटा हा शेतकऱ्यांचा आहे, तर राज्य व केंद्र शासनाचा प्रत्येकी ४७ कोटी तीन लाख १७ हजार ५१३ रुपयांचा वाटा आहे.

कोरोनाचा मुकाबला करताना जिल्ह्यात दाखल झालेल्या रुग्णाला उत्तम उपचारासोबत उच्च पोषणमूल्य असलेला आहार देण्यावरही भर देण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तसेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या निसर्गरम्य परिसरात उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर मध्ये रुग्णांना सुका मेवा, अंडी, तसेच चौरस आहार देऊन त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्याच सोबत रुग्णाच्या निकट संपर्कातील व्यक्तींचे अलगीकरण, त्यांना निरीक्षणात ठेवणे, त्यांचेवर वेळीच प्रतिबंधात्मक उपचार करणे, आवश्यकता भासल्यास चाचणी करुन उपचार करणे. सध्या तर आपल्या जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजेन टेस्टचा वापर केला जात आहे. त्यामुळे संक्रमणाच्या सुरुवातीच्या अवस्थेतच आणि अगदी कमी कालावधीत रुग्ण ओळखता येतो व उपचार करता येतात. त्यामुळे नजिकच्या काळात कोरोना फैलावाला आपण आळा घालू शकू, असा ठाम विश्वास मला आहे.

पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, अकोला

‘स्टॅण्ड अप अगेन्स्ट व्हायलेंस’ ॲपचे अनावरण

0

सुरक्षिततेचे साधन आता महिलांच्या हाती; अत्याचारांच्या घटना रोखण्यासाठी होईल मदत – ॲड.यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला विश्वास

मुंबई, दि. १४ : बदलत्या परिस्थितीत महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी तंत्रज्ञानाचा अधिकाअधिक वापर झाला पाहिजे. स्मार्ट फोनचा वापर मोठ्या प्रमाणावर महिला करत आहेत तेव्हा ‘स्टॅण्ड अप अगेन्स्ट व्हायलेंस’ हे वेब ॲप म्हणजे महिलांची सुरक्षा त्यांच्या हातात उपलब्ध करुन देण्याचा स्तुत्य उपक्रम असून अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी आणि मदत मिळवून देण्यासाठी हे ॲप उपयुक्त ठरेल, असा विश्वास महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला.

महिला व बाल विकास आयुक्तालय, अक्षरा संस्था आणि टाटा सामाजिक संस्था संचलित महिला विशेष कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या ‘स्टॅण्ड अप अगेन्स्ट व्हायलेंस’ या वेबॲपचे अनावरण ॲड.ठाकूर यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे केले. यावेळी महिला व बाल विकास विभागाच्या सचिव आय. ए. कुंदन, महिला व बाल विकास उपायुक्त दिलीप हिवराळे, ‘अक्षरा’ संस्थेच्या सहसंचालिका नंदिता गांधी, नंदिता शाह, टाटा सामाजिक संस्था महिला विशेष कक्षाच्या तृप्ती झवेरी- पांचाळ, राज्यातील संरक्षण अधिकारी, महिला विशेष कक्षांचे अधिकारी, समुपदेशक उपस्थित होते.

यावेळी मंत्री ॲड.ठाकूर म्हणाल्या, लॉकडाऊनमधे जनजीवन ठप्प असताना संपूर्ण जगात महिलांवरचे अत्याचार, हिंसाचाराच्या घटना वाढल्या ही वस्तुस्थिती आहे. आपल्या राज्यात महिलांना सुरक्षा मिळवून देणे, त्यांच्यापर्यंत पोहोचणे ही आपली प्राथमिकता होती. शासनाची यंत्रणा, हेल्पलाईल क्रमांक महिलांना मदत करत आहेतच, यासोबत ॲप सारख्या माध्यमातून महिलेच्या घरात, हातात जर सुरक्षेचे साधन देता आले तर नक्कीच अनेक घटनांना आळा बसेल असा विचार समोर आला. यादृष्टीने या ॲपचा चांगला उपयोग होऊ शकेल. आपल्या राज्यातला असा पहिलाच प्रयत्न असल्याचे सांगत ‘अक्षरा’ संस्थेचे तसेच महिला व बाल विकास विभागाच्या उपक्रमांना सहकार्य करणाऱ्या टाटा सामाजिक संस्थेचे त्यांनी आभार मानले. महिलांनी व्यक्त व्हावे, अन्यायाला वाचा फोडावी असे आवाहन करत एकत्रित प्रयत्नांनी हिंसाचाराच्या घटना रोखता येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

‘स्टॅण्ड अप अगेन्स्ट व्हायलेंस’ हे वेबॲप असून https://standupagainstviolence.org/maharashtraApp/index.html या वेबपत्त्यावर क्लिक करून मोबाईलच्या होमस्क्रीनला जतन करता येईल. या ॲपमधे जिल्हावार माहिती संकलित करण्यात आली असून वापरकर्त्या महिलेने आपला जिल्हा निवडल्यानंतर त्यांना तात्काळ मदत करु शकणारे समाजसेवक, संरक्षण अधिकारी, समुपदेशक, वन स्टॉप सेंटर, निवारागृह, महिला विशेष कक्ष यांचे संपर्क क्रमांक मिळणार असून ॲपद्वारेच त्यांना दूरध्वनी करता येईल. यात मदत मिळाली नाही, संपर्क होऊ शकला नाही तर तसा अभिप्रायही नोंदवता येईल. अभिप्राय नोंद केल्यास त्याची तातडीने दखल घेतली जाईल. सध्या इंग्रजीमधे असलेले ॲप लवकरच मराठी भाषेतही उपलब्ध असेल.

महिला व बाल विकास सचिव आय. ए. कुंदन यांनी कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रश्नावर काम करत असताना या वेबॲपची मोठ्या प्रमाणावर मदत होईल असे सांगत याबाबत जनजागृती करावी असे आवाहन केले.

यावेळी उपायुक्त श्री.हिवराळे यांनी, संकटग्रस्त महिलांना मदत नक्की कशी मिळेल, कोण करेल याची बरेचदा माहिती नसते, आणि या माहितीच्या अभावामुळेही त्या होणाऱ्या त्रासाविरोधात दाद मागत नाहीत. तेव्हा आपण महिलांपर्यंत पोहोचावे या हेतूने ॲपची निर्मिती करण्यात आल्याचे सांगितले. संरक्षण अधिकाऱ्यांनी अधिकाधिक महिलांपर्यंत याबाबत माहिती पोहोचवावी असे आवाहन त्यांनी केले.

‘अक्षरा’च्या सहसंचालिका नंदिता गांधी यांनी महिलांना नव्या संकटांचा सामना करावा लागत असल्याने त्याच्या निवारणासाठी आपल्यालाही आपल्या उपाययोजनांमध्ये बदल करणे क्रमप्राप्त असल्याचे सांगितले. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने महिलांसोबत जायला हवे असे सांगत ॲप निर्मिती मागची पार्श्वभूमी सांगितली. श्रीमती तृप्ती झवेरी यांनी लॉकडाऊन काळात संस्थेकडून करण्यात आलेल्या मदतकार्याचा गोषवारा सादर केला.  महिलांसाठीच्या विशेष कक्ष हेल्पलाईनला गेल्या पाच महिन्यात तब्बल वीस हजार फोन आल्याचे त्यांनी सांगितले. अत्याचार, हिंसाचारासह इतर अडचणी, समुपदेशन यासाठी हे दूरध्वनी असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन श्रीमती नंदिता शाह यांनी केले.

राज्यातील पहिल्या टेलीआयसीयु प्रकल्पाचा भिवंडीत शुभारंभ

0

मृत्यूदर नियंत्रणासाठी टेलीआयसीयु सुविधा फायदेशीर ठरेल; अकोला, जळगाव, सोलापूर, जालना औरंगाबाद येथेही लवकरच होणार कार्यान्वित -आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई, दि. १४ : भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला भिवंडी येथील उपजिल्हा रुग्णालयात राज्यातील पहिल्या टेलीआयसीयु प्रकल्पाचा ऑनलाईन शुभारंभ आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आला. अतिदक्षता विभागात (आयसीयु) दाखल असलेल्या कोरोनाच्या गंभीर रुग्णांसाठी विशेषज्ञांचे मार्गदर्शन आणि उपचाराची सेवा या तंत्रज्ञानाच्या मदतीने घेण्यात येणार आहे. राज्यात अकोला, जळगाव, सोलापूर, जालना आणि औरंगाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये ही सुविधा लवकरच कार्यान्वित होणार आहे. कोरोनामुळे होणारा मृत्यूदर नियंत्रणासाठी टेलीआयसीयु सुविधा फायदेशीर ठरेल, असा विश्वास आरोग्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

मेडीस्केप इंडिया फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक उत्तर दायित्व निधीच्या (सीएसआर) माध्यमातून प्रायोगिक तत्वावर ही सुविधा काही महिने देण्यात येणार आहे. भिवंडी येथील आयजीएम उपजिल्हा रुग्णालयातील आयसीयुमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून दिल्ली येथील विशेषज्ञांकडून गंभीर रुग्णांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जाते आणि त्यांना कुठले उपचार द्यायचे याचे मार्गदर्शन केले जाते.

दिवसातून पाच वेळा या विशेषज्ञांकडून रुग्णांची विचारपूस केली जाते. राज्यात अन्य ठिकाणी करण्यात येणारी ही सुविधा वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालयात आहे मात्र भिवंडी त्याला अपवाद ठरले असून ही सुविधा असणारे ते राज्यातील पहिले उपजिल्हा रुग्णालय ठरले आहे. येथील टेलीआयसीयु कक्ष आरोग्यमंत्री यांच्या दिवंगत मातोश्री शारदाताई यांना समर्पित करण्यात आल्याचे मेडीस्केप फाऊंडेशनतर्फे सांगण्यात आले.

यावेळी आरोग्यमंत्री म्हणाले, आरोग्य सुविधेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज आहे. राज्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर ही चिंतेची बाब असून मृत्यूदर एक टक्क्यांपेक्षाही कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात विशेषज्ञांची जाणवणारी कमतरता टेलीआयसीयु तंत्रज्ञानामुळे काहीशी भरून निघणार असून कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर विशेषज्ञांच्या मार्गदर्शनातून उपचार झाले तर मृत्यूदर कमी होण्यासाठी त्याचा लाभ होईल. जालना, सोलापूर, औरंगाबाद येथील रुग्णालयात ही सुविधा पुढील आठवड्यात कार्यान्वित होऊ शकते, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी मेडीस्केप इंडिया फाऊंडेशनच्या डॉ.सुनिता दुबे, डॉ. संदीप दिवाण यांनी या तंत्रज्ञानाबाबत माहिती दिली. भिवंडी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.अनिल थोरात यांनी प्रास्ताविक केले. यावेळी आरोग्यमंत्र्यांनी आयसीयुमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांशी संवाद साधत त्यांची विचारपूस केली. बरे वाटते का.. दादा कसे आहात काळजी घ्या.. असे सांगताना त्यांनी आयसीयुमधील डॉक्टरांशी संवाद साधला.

‘आम्हाला तुमचा अभिमान’- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन

राष्ट्रपती पदक, शौर्य, प्रशंसनीय सेवा पदक जाहीर

मुंबई, दि. १४ : ‘महाराष्ट्र पोलीस आम्हाला तुमचा अभिमान आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील राष्ट्रपती पोलीस पदक, शौर्य पोलीस पदक आणि पोलीस पदक जाहीर झालेल्या पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून महाराष्ट्रातील ५८ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक, शौर्य पोलीस पदक आणि पोलीस पदक जाहीर करण्यात आली आहेत. यात उत्कृष्ट सेवेकरिता ५ ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, १४ पोलीस शौर्य पदक आणि प्रशंसनीय सेवेकरिता ३९ ‘पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत.

या सर्वांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी महाराष्ट्र पोलीस आम्हाला तुमचा अभिमान आहे, असे नमूद केले आहे. या सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी महाराष्ट्र पोलिसांचे “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” ब्रीद उंचावणारी कामगिरी केली आहे. या कामगिरीसाठी सर्वांना सलाम, आणि जाहीर पुरस्कारासाठी या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, असेही त्यांनी म्हटले आहे.

राष्ट्रध्वजाच्या योग्य वापरासाठी मार्गदर्शक सूचना

0

मुंबई, दि. 14 : महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामार्फत 1 जानेवारी 2015 रोजीच्या आदेशानुसार प्लास्टिक आणि कागदी राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती करण्याकरिता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा व तालुका पातळीवर समित्या स्थापन कराव्यात असे सुचित करण्यात आले आहे. त्यानुसार मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी जिल्हा स्तरावर अंधेरी, बोरीवली तसेच कंर्ला (मुलुंड) या तीन तालुक्यांसाठी समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.

15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे व इतर राष्ट्रीय कार्यक्रम, महत्त्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा सामन्यांच्यावेळी कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले मैदानात/रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी पडलेले राष्ट्रध्वज गोळा करून ते तालुका स्तरावर तहसिल कार्यालयात आणि जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपुर्द करण्याचे अधिकार अशासकीय  संस्था तसेच इतर संघटनाना सुपुर्द करण्यात यावेत, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या 43 हजार 525

0

पुणे विभागातील 1 लाख 7 हजार 153 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले;
विभागात कोरोना बाधित 1 लाख 54 हजार 677 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव


पुणे, दि. 14 :- पुणे विभागातील 1 लाख 7 हजार 153 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 54 हजार 677 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 43 हजार 525 इतकी आहे. कोरोना बाधीत एकुण 3 हजार 999 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.59 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 69.28 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 17 हजार 516 रुग्णांपैकी 88 हजार 590 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 26 हजार 237 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 689 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.29 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 75.39 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 6 हजार 504 रुग्णांपैकी 3 हजार 101 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 197 आहे. कोरोनाबाधित एकूण 206 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 12 हजार 322 रुग्णांपैकी 8 हजार 83 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 659 आहे. कोरोनाबाधित एकूण 580 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 5 हजार 379 रुग्णांपैकी 2 हजार 213 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 995 आहे. कोरोनाबाधित एकूण 171 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 12 हजार 956 रुग्णांपैकी 5 हजार 166 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 437 आहे. कोरोनाबाधित एकूण 353 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 3 हजार 932 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 388, सातारा जिल्ह्यात 279, सोलापूर जिल्ह्यात 271, सांगली जिल्ह्यात 296 तर कोल्हापूर जिल्ह्यात 698 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 7 लाख 59 हजार 995 नमून्याचा तपासाणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 54 हजार 677 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.


(टिप :- दि. 13 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)


नोंदीत बांधकाम कामगारांना आणखी ३ हजार रुपयांचे अर्थसहाय्य; दुसरा हप्ता कामगारांच्या खात्यात जमा होणार- कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील

0

मुंबई, : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदीत सक्रिय (जिवित) बांधकाम कामगारांना आणखी ३ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. बांधकाम कामगारांच्या खात्यात दुसरा हप्ता मंजूर करण्याबाबत कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फायदा राज्यातील १० लाख बांधकाम कामगारांना मिळणार असून या अर्थसहाय्य वाटपावर मंडळामार्फत ३०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

कोविड -१९ या विषाणूच्या प्रादूर्भाव कालावधीत २ हजार रुपयांच्या अर्थसहाय्याचा पहिला हप्ता एप्रिल २०२० मध्ये मंजूर करण्यात आला होता. या निर्णयानुसार जुलै २०२० पर्यंत राज्यातील ९ लाख १४ हजार ७४८ बांधकाम कामगारांच्या बँक खात्यात अर्थसहाय्याची रक्कम जमा करण्यात आली. यासाठी मंडळाने १८३ कोटी रुपये खर्च केले.

सध्या राज्यात लॉकडाऊन कालावधीला टप्प्याटप्प्याने शिथिलता देण्यात येत आहे. तथापि, इमारत व इतर बांधकाम अद्यापही पूर्ववत सुरू झालेली नाही. त्यामुळे बांधकाम कामगांराना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ही बाब विचारात घेऊन नोंदित बांधकाम कामगारांना ३ हजार रुपयाचा अर्थसहाय्याचा दुसरा हप्ता मंजूर करण्याचा निर्णय कामगार विभागाने घेतला. या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी सुरू होणार असून याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळास देण्यात आल्याची माहिती कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.

कोरोनाबाधित रुग्णांना वेळेवर उपचार मिळतील याबाबत दक्षता घ्या-उपमुख्यमंत्री अजित पवार

0

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरातील ‘कोरोना’ प्रतिबंधासाठीच्या उपाययोजनांचा आढावा

पुणे, : पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील ‘कोरोना’ बाधित रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणाबाबत समाधान व्यक्त करतानाच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काटेकोर नियोजन करणे, मृत्यू दर कमी ठेवणे, चाचण्यांची संख्या वाढवून रुग्णांवर वेळीच उपचार करणे तसेच इतर आजार असणाऱ्या व्यक्तींना वेळीच ओळखून त्यांच्यावर उपचार आणि विशेष लक्ष देणे गरजेचे असल्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज प्रशासनाला दिल्या. गंभीर रुग्णांना बरे करण्यासाठी प्लाझ्मा (रक्तद्रव) थेरपी उपयुक्त ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील ‘कोरोना’बाबतच्या उपाययोजनाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, प्रभारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे मनपाच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शांतनु गोयल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, आरोग्य उपसंचालक संजय देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापुकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, डॉ. दिलीप कदम यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणे व पिंपरी चिंचवड शहरात ‘कोरोना’ रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढते आहे, ही समाधानाची बाब आहे. मात्र कोरोनाचा संसर्ग रोखण्यासोबतच्या उपाययोजनाबरोबरच कोरोनाबाधित रुग्णाला वेळेवर उपचार मिळतील याबाबत दक्षता घ्यावी. तसेच कोरोना विषाणूची भिती घालविण्यासाठी तसेच याविषयी जनसामान्यांमध्ये सतर्कता व प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती होण्यासाठी छोट्या-छोट्या व्हीडिओच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागात व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या.
कोरोना संसर्गातून गंभीर रुग्णांना बरे करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा उपयोग होत आहे. शासनाने ही सर्वात मोठी सुविधा सुरू केली आहे. प्लाझ्मा दान करण्याबाबत जनजागृती करण्याचे निर्देश त्यांनी दिले. ‘कोरोना’च्या संकटाशी आपण सर्व मिळून विविध माध्यमातून लढत आहोत. आपण ही लढाई नक्की जिंकू, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
प्रारंभी विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी क्षेत्रनिहाय कोरोना बाधित रुग्ण, नमुना तपासणी प्रयोगशाळा, आठवडानिहाय कोरोना बाधित रुग्ण व मृत्यूचा तपशील, कोरोना मुक्त झालेले रुग्ण, संपर्क व्यक्ती शोधणे,क्षेत्रनिहाय प्रतिबंधित क्षेत्र, अनुमानित कोरोना रुग्ण व नियोजित बेड उपलब्धता, रुग्णवाहिका उपलब्धता याबाबतची सविस्तर माहिती दिली. तसेच जम्बो रुग्णालय उभारणीचे काम गतीने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
पुणे मनपा आयुक्त विक्रमकुमार व पिंपरी चिंचवड आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महापालिकाक्षेत्रात कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनाबाबत माहिती दिली. यावेळी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

विस्थापित मजूर व विनाशिधापत्रिकाधारकांना मोफत तांदूळ व अख्खा चना वाटप करण्यास मुदतवाढ

0

नियंत्रक शिधावाटप व संचालक कैलास पगारे यांची माहिती

मुंबई : आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत विस्थापित मजूर व विनाशिधापत्रिकाधारकांना मे व जून महिन्याकरीता पाच किलो मोफत तांदूळ व एक किलो अख्खा चना वाटप करण्यास 31 ऑगस्ट 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबईचे कैलास पगारे यांनी दिली.

या योजनेच्या निकषात बसणाऱ्या लाभार्थ्यांच्या याद्या महानगरपालिका व कामगार विभागाच्या मदतीने तयार करून घेण्यात आलेल्या आहेत.

मुंबई/ठाणे शिधावाटप यंत्रणेतील उपरोक्त निकषात बसणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना संबंधित विभागाच्या शिधावाटप अधिकारी यांचे कार्यालयामार्फत निश्चित करण्यात आलेल्या केंद्रामधून माहे मे 2020 करिता प्रतिव्यक्ती 5 किलो मोफत तांदळाचे वितरण दिनांक 29 मे 2020 रोजी पासून सुरू करण्यात आले आहे. तसेच माहे जून 2020 करीता सुद्धा या योजनेअंतर्गत मोफत तांदळाचे वितरण सुरू आहे. आतापर्यंत  1337 मे.टन मोफत तांदळाचे वितरण करण्यात आलेले आहे. तसेच या  योजने अंतर्गत माहे मे आणि जून या महिन्याकरीता प्रतिकुटुंब प्रतिमाह 1 किलो मोफत अख्खा चण्याचे आतापर्यंत 31 मे.टन वाटप करण्यात आले आहे.  या योजनेतील लाभार्थ्यांना मे व जून या दोन महिन्याच्या मोफत तांदळाचे व मोफत अख्खा चण्याचे वितरण करण्यास दिनांक 31 ऑगस्ट 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

अन्नधान्याचा मुबलक साठा उपलब्ध असून याबाबत सर्व संबंधितांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. निकषात बसणाऱ्या पात्र लाभार्थ्यांनी निश्चित करण्यात आलेल्या आपल्या विभागातील संबंधित अधिकृत शिधावाटप दुकानातून कोणतीही गर्दी न करता योजनेतील धान्य फिजिकल डिस्टन्सिंगचा वापर करून तसेच मास्कचा वापर करून लवकरात लवकर प्राप्त करून घ्यावे, असे आवाहनही श्री.पगारे यांनी केले आहे

कर्तव्य बजावताना कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ग्रामविकास अधिकाऱ्याच्या वारसास ५० लाख रुपयांची मदत

0

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

प्रस्तावास तातडीने एका दिवसात मंजुरी

मुंबई, : कर्तव्य बजावताना कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झालेल्या परभणी जिल्ह्यातील ग्रामविकास अधिकाऱ्याच्या वारसास ५० लाख रुपयांची विमा कवच रक्कम अदा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

सुपा (ता. गंगाखेड, जि. परभणी) या ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी रामदास आम्ले हे ग्रामस्थांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी कर्तव्य बजावत असताना त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. ३ ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला. याअनुषंगाने संबंधित मृताच्या वारसास विमा कवच रक्कम मिळण्याबाबत परभणी जिल्हा परिषदेने राज्य शासनास १२ ऑगस्ट रोजी प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावास तातडीने एका दिवसात मंजुरी देऊन मृत ग्रामविकास अधिकारी यांच्या वारसास ५० लाख रुपयांची विमा कवच रक्कम अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मंत्री श्री.मुश्रीफ यांनी सांगितले.  

मंत्री श्री.मुश्रीफ म्हणाले की, कोरोना संकटकाळात ग्रामीण भागातील कर्मचारी जीवावर उदार होऊन आपले कर्तव्य बजावत आहेत. ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला आहे. हा प्रसार रोखण्यासाठी गावपातळीवरील कर्मचारी कोरोना योद्धा बनून काम करीत आहेत. या पार्श्वभूमीवर गावपातळीवर काम करणारे सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा कार्यकर्ती, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, संगणक परिचालक, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यरत कंत्राटी पद्धतीवरील कर्मचारी, कामगार यांना ३० सप्टेंबर २०२० पर्यंत ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. त्यानुषंगाने कर्तव्य बजावताना कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झालेल्या परभणी जिल्ह्यातील संबंधित ग्रामविकास अधिकारी यांच्या वारसांना तातडीने विमा कवच रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेकडून प्राप्त प्रस्तावानुसार मृत ग्रामविकास अधिकारी यांचे वारस, त्यांची पत्नी श्रीमती रंजना आम्ले यांना विमा कवच रक्कम तातडीने म्हणजे उद्या स्वातंत्र्यदिनी परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.

पद्म पुरस्कार शिफारस समितीची पहिली बैठक संपन्न

0

मुंबई, दि. १३ : पद्म पुरस्कार शिफारस समितीची पहिली बैठक आज सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे समितीचे अध्यक्ष राजशिष्टाचार मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीस समितीचे सदस्य उद्योग, खनिकर्म आणि मराठी भाषा मंत्री श्री. सुभाष देसाई, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास आणि क्रिडा व युवक कल्याण मंत्री श्री. सुनिल केदार, सामाजिक न्याय मंत्री श्री. धनंजय मुंडे, राजशिष्टाचार राज्यमंत्री श्रीमती आदिती तटकरे, राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव व मुख्य राजशिष्टाचार अधिकारी श्रीमती मनिषा म्हैसकर उपस्थित होते. समिती सदस्य राज्यमंत्री श्री. दत्तात्रय भरणे हे व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सहभागी झाले.

२६ जानेवारी २०२१ रोजी घोषीत होणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी राज्यातील मान्यवरांच्या नावाची केंद्र शासनाकडे शिफारस करण्यासाठी ही समिती गठीत करण्यात आली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात अत्युत्कृष्ट कामगिरी करुन योगदान देणाऱ्या मान्यवरांची पद्म पुरस्कारांसाठी शिफारस केली जाते. बैठकीत या अनुषंगाने चर्चा झाली. राज्यातून मागील काही वर्षांमध्ये केंद्राकडे शिफारस करण्यात आलेले प्रस्ताव आणि त्यापैकी प्रत्यक्ष पुरस्कार किती मिळाले याची माहिती घेऊन त्याअनुषंगाने विश्लेषण करण्यात यावे, अशा सूचना यावेळी विभागातील अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. महाराष्ट्र हे देशातील प्रगत, सुधारणावादी राज्य आहे. राज्यात विविध क्षेत्रात कार्य करुन समाजाच्या आणि राज्याच्या सर्वांगिण विकासासाठी अनेक मान्यवरांनी योगदान दिले आहे. अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांची समितीमार्फत पद्म पुरस्कारांसाठी शिफारस करण्यात येईल, जेणेकरुन केंद्र शासनाकडूनही त्यांच्या कामाची देखल घेतली जाईल, अशी चर्चा यावेळी झाली.  

समितीच्या निवडीचा शासन निर्णय दोन दिवसांपुर्वी निर्गमित करण्यात आला. पण या विषयाचे महत्व लक्षात घेता समितीने लगेच दोन दिवसात पहिली बैठक घेऊन चर्चा केली. राज्याच्या आणि समाजाच्या विकासासाठी भरीव योगदान देणाऱ्या मान्यवरांची या पुरस्कारांसाठी शिफारस करुन त्यांच्या कार्यास उचीत सन्मान देण्यासाठी समिती काम करेल, असे यावेळी समितीचे अध्यक्ष राजशिष्टाचार मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

००००

खड़कवासला भरले ,नदीला पाणी सोडलेय पण… (व्हिडिओ)

0
https://www.facebook.com/1501539223422053/posts/2689493491293281/

पुणे : खडकवासला धरण (Khadakwasla Dam) साखळीतील पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस होत असून, बुधवारच्या तुलनेत गुरुवारी (ता.13) चार धरणांमधील पाणीसाठ्यात सुमारे दीड अब्ज घनफूट (टीएमसी) ने वाढ झाली. टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांत सध्या 20.04 टीएमसी (66.58 टक्के) इतका पाणीसाठा आहे. खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा (टीएमसीमध्ये) कंसात टक्केवारी :
टेमघर 1.84 (49.50)
वरसगाव 8.07 (62.97)
पानशेत 8.15 (76.58)
खडकवासला 1.97 (100)

प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.पुणे जिल्ह्यातील खडकवासला (1.97 टीएमसी), कळमोडी (1.51 टीएमसी) आणि वीर ही तीन धरणे (9.34 टीएमसी) पूर्ण क्षमतेने भरली आहेत. खडकवासला धरणातून गुरुवारी सायंकाळी मुठा नदीतून 11 हजार 705 क्युसेकने विसर्ग वाढविण्यात आला आहे. खडकवासला धरण साखळीतील चार धरणांमध्ये गुरुवारी सायंकाळी एकूण 20.04 टीएमसी पाणीसाठा झाला असून, हे प्रमाण 68.73 टक्के इतके आहे. टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सकाळी आठ ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत 60 मिलिमीटर, वरसगाव 81, पानशेत धरणाच्या क्षेत्रात प्रत्येकी 82 मिलिमीटर आणि खडकवासला धरण क्षेत्रात सकाळपर्यंत 29 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. खडकवासला प्रकल्पात गतवर्षी 13 ऑगस्टअखेर 29.15 टीएमसी (100 टक्के) पाणीसाठा होता. तो आज अखेर मात्र 65 टक्के आहे.

कोरोनामुळे मृत्यु पावलेल्या दोन पत्रकारांच्या कुटुंबियांना सरकारने मदत करावी

0

मंत्री धनंजय मुंडे यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पत्र

मुंबई :- कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या मराठवाड्यातील दोन पत्रकारांच्या कुटुंबियांना सरकारने घोषणा केल्याप्रमाणे पन्नास लाख रुपये विमा संरक्षण अंतर्गत मदत करावी, अशी मागणी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

मंत्री धनंजय मुंडे यांनी मयत पत्रकारांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याबाबत पत्रकार संघाच्या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल राज्यभरातील पत्रकारांमधून समाधान व्यक्त होत आहे.

बीड जिल्ह्यातील गेवराई येथील पत्रकार संतोष भोसले (वय 48) यांचा 28 जुलै रोजी जिल्हा रुग्णालयातील कोविड कक्षात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर लातूर येथील ज्येष्ठ पत्रकार गंगाधर सोमवंशी (वय 61) यांचाही कोरोनाची बाधा झाल्याने सरकारी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोन्ही पत्रकारांची कौटुंबिक परिस्थिती जेमतेम असून महाविकास आघाडी सरकारने घोषणा केल्याप्रमाणे कोरोना काळात कर्तव्यावर असताना पत्रकाराचा कोरोनाबाधित होऊन मृत्यू झाला तर कुटुंबियांना विमा संरक्षण अंतर्गत पन्नास लक्ष रुपयांची मदत देण्याची घोषणा केली होती. दोन्ही पत्रकारांचा मृत्यू कोरोना कक्षात उपचार सुरू असताना झाल्यामुळे सरकारने घोषणेनुसार त्यांना मदत करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी एका निवेदनाद्वारे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली होती.

याची तात्काळ दखल घेऊन मंत्री श्री. मुंडे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना सरकारने घोषणा केल्यानुसार मयत पत्रकारांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी असे पत्र दिले आहे. मंत्री धनंजय मुंडे यांनी पत्रकारांच्या मागणीवर सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल राज्यभरातील पत्रकारांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.