Home Blog Page 2465

राज्य विधानमंडळाचे तिसरे अधिवेशन : प्रस्तावित विधेयकांची यादी

0

पटलावरमांडण्यात येणारे अध्यादेश 

  1. महाराष्ट्र महानगरपालिकांच्या (राज्यामध्ये कोरोना कोव्हिड विषाणूच्या सार्वत्रिक महामारीच्या साथीचा प्रसार झाल्यामुळे काही महानगरपालिकांच्या महापौरांच्या व उप महापौरांच्या) निवडणुका तात्पुरत्या स्वरुपात पुढे ढकलणे अध्यादेश, 2020, (नगर विकास विभाग).
  2. महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) अध्यादेश, 2020, (वित्त विभाग), (वस्तू व सेवा कर परिषदेच्या शिफारशीवरुन, दैवी आपत्तीमुळे ज्या कारवाया पूर्ण केल्या जाऊ  शकत नाही किंवा त्यांचे अनुपालन केले जाऊ  शकत नाही अशा करवायांच्या संबंधातील मुदत मर्यादा परिषदेच्या शिफारशींवरून, अधिसूचनेद्वारे वाढविता येईल शासनास अधिकार, अशी तरतुद करणे)
  3. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) अध्यादेश, २०२०, (उच्च व तंत्र शिक्षण विभाग) (नवीन महाविद्यालय तसेच नवीन अभ्यास पाठ्यक्रम इत्यादी सुरू करण्यासाठी मान्यता देण्याकरिता नियत करण्यात आलेला दिनांक, सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी वाढवून देणे).
  4. महाराष्ट्र ग्राम पंचायत (सुधारणा) अध्यादेश, २०२०, (ग्राम विकास विभाग) (पंचायतीच्या निवडणुका घेणे शक्य नसेल त्या ठीकाणी प्रशासकाची नियुक्ती करण्यासंदर्भातील तरतूद करणे)
  5. महाराष्ट्र वस्तू व सेवा कर ( दुसरी सुधारणा) अध्यादेश, 2020, (वित्त विभाग) (केंद्रीय वस्तु व सेवा कर अधिनियम 2017 मध्ये करण्यात आलेल्या सुधारणांच्या अनुषंगाने,  राज्य अधिनियमामध्ये व केंद्रीय अधिनियम यांमध्ये एकरूपता व प्रयोज्यता राखण्याकरिता सुधारणा करणे).
  6. महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा) अध्यादेश, २०२०, (सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग) (राज्यामध्ये कोरोना कोव्हिड विषाणूच्या सार्वत्रिक महामारीच्या साथीचा प्रसार झाल्यामुळे काही, ठराविक कालावधीत सहकारी संस्थांच्या समित्यांच्या निवडणुका घेणे शक्य नसल्याने, समित्या यथोचितरित्या घटित होईपर्यंत, सहकारी संस्थांच्या समित्यांच्या विद्यमान सदस्यांना नियमितपणे पदावर राहणे शक्य होण्याच्या आणि अशा समित्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्याच्या दृष्टीने, कलमे ७३अअअ (३) व ७३कब यांमध्ये सुयोग्य सुधारणा करणे)
  7. महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजिविका व नोक-या यांवरील कर (सुधारणा) आध्यादेश, २०२० (वित्त विभाग) (कंपनी अधिनियम 2013 खाली नविन नोंदणी करतांना व्यवसाय करासाठी नोंणी करण्याबाबत तरतूदी)
  1. महाराष्ट्र आकस्मिकता निधी (दुसरी सुधारणा) अध्यादेश, २०२० (आकस्मीता निधिची मर्यादा तात्पुरती वाढवणे)
  2. महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना (सुधारणा ) अध्यादेश, 2020 (नगर विकास विभाग) (महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 चे कलम 26 (1) मधील तिसऱ्या परंतुकातील (ii) च्या तरतूदींमध्ये विकास योजनेचा मसुदा तयार करण्याचा कालावधी महानगरपालिकांबरोबरच इतर नियेाजन प्राधिकरणे यांच्या बाबतीत देखील वाढण्याकरिता सुधारणा करण्यास तसेच कलम 148-अे मधील तरतुदीनुसारच्या विहित कालावधीतून, कोवीड-19 विषाणुच्या संदर्भातील केंद्र शासन तसेच राज्य शासनाने घोषित केलेला टाळेबंदीचा कालावधी वजा करणेबाबत).

प्रस्तावित विधेयके

  1. महाराष्ट्र महानगरपालिकांच्या (राज्यामध्ये कोरोना कोव्हिड विषाणूच्या सार्वत्रिक महामारीच्या साथीचा प्रसार झाल्यामुळे काही महानगरपालिकांच्या महापौरांच्या व उप महापौरांच्या) निवडणुका तात्पुरत्या स्वरुपात पुढे ढकलणे विधेयक, 2020, (नगर विकास विभाग) (सन २०२० चा महा. अध्या. क्र. 7 ).
  2. महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) विधेयक, 2020, (वित्त विभाग), (वस्तू व सेवा कर परिषदेच्या शिफारशीवरुन, दैवी आपत्तीमुळे ज्या कारवाया पूर्ण केल्या जाऊ शकत नाही किंवा त्यांचे अनुपालन केले जाऊ  शकत नाही अशा करवायांच्या संबंधातील मुदत मर्यादा परिषदेच्या शिफारशींवरून, अधिसूचनेद्वारे वाढविता येईल शासनास अधिकार, अशी तरतुद करणे) (सन २०२० चा महा. अध्या. क्र. 8 ).
  3. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, २०२०, (उच्च व तंत्र शिक्षण विभाग) (नवीन महाविद्यालय तसेच नवीन अभ्यास पाठ्यक्रम इत्यादी सुरू करण्यासाठी मान्यता देण्याकरिता नियत करण्यात आलेला दिनांक, सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी वाढवून देणे) (सन २०२० चा महा. अध्या. क्र. 9 ).
  4. महाराष्ट्र ग्राम पंचायत (दुसरी सुधारणा) विधेयक, २०२०, (ग्राम विकास विभाग) (पंचायतीच्या निवडणुका घेणे शक्य नसेल त्या ठीकाणी प्रशासकाची नियुक्ती करण्यासंदर्भातील तरतूद करणे) (सन २०२० चा महा. अध्या. क्र. 10 )
  5. महाराष्ट्र वस्तू व सेवा कर ( दुसरी सुधारणा) विधेयक, 2020, (वित्त विभाग) (केंद्रीय वस्तु व सेवा कर अधिनियम 2017 मध्ये करण्यात आलेल्या सुधारणांच्या अनुषंगाने,  राज्य अधिनियमामध्ये व केंद्रीय अधिनियम यांमध्ये एकरूपता व प्रयोज्यता राखण्याकरिता सुधारणा करणे) (सन २०२० चा महा. अध्या. क्र. 11 )
  6. महाराष्ट्र सहकारी संस्था (दुसरी सुधारणा) विधेयक, २०२०, (सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग) (राज्यामध्ये कोरोना कोव्हिड विषाणूच्या सार्वत्रिक महामारीच्या साथीचा प्रसार झाल्यामुळे काही, ठराविक कालावधीत सहकारी संस्थांच्या समित्यांच्या निवडणुका घेणे शक्य नसल्याने, समित्या यथोचितरित्या घटित होईपर्यंत, सहकारी संस्थांच्या समित्यांच्या विद्यमान सदस्यांना नियमितपणे पदावर राहणे शक्य होण्याच्या आणि अशा समित्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्याच्या दृष्टीने, कलमे ७३अअअ (३) व ७३कब यांमध्ये सुयोग्य सुधारणा करणे) (सन २०२० चा महा. अध्या. क्र. 12 ).
  7. महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजिविका व नोकऱ्या यांवरील कर (सुधारणा) विधेयक, 2020, (वित्त विभाग), (सन २०२० चा महा. अध्या. क्र. 13 ) (कंपनी अधिनियम 2013 खाली नविन नोंदणी करतांना व्यवसाय करासाठी नोंणी करण्याबाबत तरतूदी).
  8. महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना (सुधारणा ) विधेयक, 2020(नगर विकास विभाग) (सन २०२० चा महा. अध्या. क्र. 15 ) (महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 चे कलम 26 (1) मधील तिसऱ्या परंतुकातील (ii) च्या तरतूदींमध्ये विकास योजनेचा मसुदा तयार करण्याचा कालावधी महानगरपालिकांबरोबरच इतर नियेाजन प्राधिकरणे यांच्या बाबतीत देखील वाढण्याकरिता सुधारणा करण्यास तसेच कलम 148-अे मधील तरतुदीनुसारच्या विहित कालावधीतून, कोवीड-19 विषाणुच्या संदर्भातील केंद्र शासन तसेच राज्य शासनाने घोषित केलेला टाळेबंदीचा कालावधी वजा करणेबाबत).
  9. भूमिसंपादन, पुनर्वसाहत करताना उचित भरपाईचा आणि पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2020 (औद्योगीक विकासासाठी भूसंपादन करण्यासाठी सुलभता यावी याकरिता तरतूद) (वन विभाग)
  10. महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था (सुधारणा) विधेयक, 2020 (विधि व न्याय विभाग) (धर्मादाय आयुक्त कार्यालयातील पूरक संवर्गातील अधीक्षक, जनसंपर्क अधिकारी किंवा विधि सहायक यांच्या पदोन्नतीच्या संधी उपलब्ध करण्याकरिता आवश्यक त्या सुधारणा करणेबाबत विधेयक).
  11. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास (सुधारणा) विधेयक, 2020 (गृह निर्माण विभाग) (मुंबईतील उपकर प्राप्त इमारतींच्या पुनर्विकासासंदर्भातील तरतूदींबाबत) .
  12. महाराष्ट्र वेश्म मालकी (सुधारणा) विधेयक, 2020, (गृहनिर्माण विभाग) (वेश्म मालकांच्या बहुमताच्या संमतीने प्रतिज्ञापनाच्या किंवा वेश्म विलेखाच्या तपशिलांमध्ये सुधारणा करण्यासंदर्भातील तरतुदींचा अंतर्भाव करणे तसेच तक्रार निवारण यंत्रणेबाबत तरतूदी करणे)
  13. महाराष्ट्र सहकारी संस्था (तिसरी सुधारणा) विधेयक, २०२०, (सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग) , (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 च्या कलम 73कअ चे पोट-कलम (3अ) मध्ये महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा) अधिनियम, 2016 नुसार केलेल्या सुधारणेतील “महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा) अधिनियम, 2016 याच्या प्रारंभाच्या दिनांकापूर्वी 10 वर्षाच्या कालावधीच्या आत कोणत्याही वेळी किंवा अशा प्रारंभानंतर कोणत्याही” हा मजकूर वगळणेबाबतची सुधारणा).
  14. महाराष्ट्र (द्वितीय पुरवणी) विनियोजन विधेयक, 2020 (वित्त विभाग).

प्रस्तावित अध्यादेश

  1. महाराष्ट्र महानगरपालिकांच्या (राज्यामध्ये कोरोना कोव्हिड विषाणूच्या सार्वत्रिक महामारीच्या साथीचा प्रसार झाल्यामुळे काही महानगरपालिकांच्या महापौरांच्या व उप महापौरांच्या) निवडणुका तात्पुरत्या स्वरुपात पुढे ढकलणे (सुधारणा) अध्यादेश, 2020, (नगर विकास विभाग)

स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये कॉन्स्टेबल पदाची भरती

0

पदाचे नाव : कॉन्स्टेबल (एक्स.) – पुरुष : 3433 जागा

पदाचे नाव : कॉन्स्टेबल (एक्स.) – पुरुष (माजी सैनिक (इतर) : 226

पदाचे नाव : कॉन्स्टेबल (एक्स.) – पुरुष (माजी सैनिक) : 243

पदाचे नाव : कॉन्स्टेबल (एक्स) – महिला : 1944

शैक्षणिक अर्हता : 12 वी पास, वैध वाहन परवाना आणि इतर

वयोमर्यादा : 1 जुलै 2020 रोजी वय वर्षे 18 ते 25 च्या दरम्यान असावे

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 7 सप्टेंबर 2020 रात्री 11.30 पर्यंत

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2GjZHPm

अर्ज करण्यासाठी : https://bit.ly/3lLg6wz

सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील तांदळाचा गैरवापरासंबंधी आरोपी रेशन दुकानदारांना तात्काळ अटक

0

अलिबाग :- जिल्ह्यातील पनवेल तहसिलदार व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पनवेल शहर पोलीस ठाणे, नवी मुंबई यांच्या संयुक्त पथकाने दि.३१ जुलै २०२० रोजी टेक केअर- लॉजिस्टीक, पळस्पे, ता.पनवेल येथील पलक रेशन गोडावून येथे छापा टाकून सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील ११० मे.टन तांदूळ जप्त केला आहे. त्यानुषंगाने संबंधितांविरुध्द दि.०१ ऑगस्ट २०२० रोजी पनवेल शहर पोलीस ठाणे, पनवेल, नवी मुंबई येथे गुन्हा नोंद क्र. ०२७४/२०२०, जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३ व ७ तसेच भा.द.वि.१२० (ब), ४२०, ४६५, ४६८,४७०,४७१, ३४ व सार्वजनिक वितरण प्रणाली (नियंत्रण) आदेश २०१५ चे कलम १३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ६अ अन्वये जप्त मुद्देमालाची विल्हेवाट लावण्यासंदर्भात रायगड जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्याकडे दि.१४ ऑगस्ट व ०४ सप्टेंबर २०२० रोजी सुनावणी घेण्यात आली होती. याबाबत पुढील अंतिम सुनावणी दि.१४ सप्टेंबर २०२० रोजी होणार आहे.

नवी मुंबई पोलिसांकडून प्राप्त अहवालानुसार प्रस्तुत गुन्ह्यात जप्त करण्यात आलेला तांदूळ भारतीय खाद्य निगमच्या OPEN MARKET SALES SCHEME ( DOMESTIC ) (OMSS) (खुला बाजार विक्री योजना) (देशांतर्गत) मधील ई-लिलावाद्वारे घेतलेला असून निर्यातीवर बंदी असतानाही  विविध आफ्रिकन देशात हा तांदूळ निर्यात करण्यात आला आहे. भारतीय खाद्य निगमच्या OPEN MARKET SALES SCHEME ( DOMESTIC ) (OMSS) या योजनेतील तांदळाचा वापर फक्त देशांतर्गत करण्यासच परवानगी असून या तांदळाच्याही निर्यातीस बंदी आहे. या गुन्ह्यातील आरोपींनी हा तांदूळ सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील धनलक्ष्मी ट्रेडिंग कंपनी यांच्याकडून खरेदी केल्याच्या पावत्या सादर केल्या होत्या. मात्र ही कंपनी अस्तित्वात नसून सादर केलेल्या पावत्याही बनावट, बोगस असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. .

कर्नाटक राज्यातील इंडी, विजापूर, जि.विजापूर तसेच हल्लूर, ता.मुदलगी, जि.बेळगाव इत्यादी ठिकाणावरुन सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील हा तांदूळ निर्यातीसाठी आणला असल्याचे निष्पन्न झाले असून आरोपींच्या कंपन्यांमार्फत दि.१ जानेवारी २०२० पासून आजपर्यंत ३२ हजार ८२७ मे.टन तांदूळ परदेशात निर्यात केल्याचे स्पष्ट झाले आहे.

या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिस आयुक्त, नवी मुंबई यांनी पनवेल शहर पोलिस ठाणे व नवी मुंबई गुन्हे शाखेकडील पोलिस अधिकाऱ्यांचे ‘विशेष तपास पथक’ नियुक्त करण्यात आले होते. या  पथकाने कर्नाटक राज्यात जाऊन तेथील रेशन दुकानदारांना अटक केली आहे. गुन्हयाच्या तपासात आजपर्यंत एकूण १८ आरोपी निश्चित करण्यात आले असून त्यापैकी १) नवनाथ लोकू राठोड, वय-२५ वर्षे, रा.ठि.इंडी, विजापूर, कर्नाटक, २) सत्तार चांदसाहब सय्यद, वय-२५ वर्षे, रा.ठि. इंडिया, विजापूर, कर्नाटक, ३) कृष्णा दामो पवार, वय-४५ वर्षे, रा.ठि.जगदंबा मंदिराजवळ, हिरेबेनूर तांडा, ता.इंडी, जिल्हा-विजापूर, कर्नाटक या ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

या कारवाई अंतर्गत टेक केअर लॉजिस्टीक, पळस्पे, येथील पलक रेशन गोडावून, ता.पनवेल, येथून रु.३३ लाख किंमतीच्या रेशनच्या तांदळाच्या प्रत्येकी  ५० कि.लो. वजनाच्या २ हजार २२० गोण्या (११० मे.टन) यामध्ये एशियन राईस लोगो असलेल्या ६५२ पिवळ्या रंगाच्या व सफेद  रंगाच्या २९५ गोण्या त्याचप्रमाणे उर्वरित १ हजार २७३- फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ पंजाब, गव्हर्नमेंट ऑफ हरयाणा असे शिक्के असलेले बारदाना पोती व दोन वजन काटे, 2)झेनिथ इंम्पेक्स कंपनी खालापूर, ता.खालापूर, जि.रायगड येथून फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ पंजाब, गव्हर्नमेंट ऑफ हरयाणा असे शिक्के असलेल्या बारदानाच्या रिकाम्या ८०८ गोण्या, 3)जय फूड प्रोडक्शन कंपनी, सावरोली, ता.खालापूर, जि.रायगड. या ठिकाणी गव्हर्नमेंट ऑफ पंजाब, गव्हर्नमेंट ऑफ हरयाणा असे शिक्के असलेल्या बारदानाच्या रिकाम्या ८ गोण्या तर 4) जय आनंद फूड कंपनी, मिरांडे इंडस्ट्रीज, भादाणे गाव, पो.पडे, ता.भिवंडी, जि.ठाणे येथून रु.९९ लक्ष १२ हजार ०४६/- रूपये किंमतीच्या तांदळाची ५ हजार ४०४ व गव्हाची ८६० पोती अशी एकूण ६ हजार २६४ पोती जप्त करण्यात आली आहेत.

या गुन्ह्याच्या अनुषंगाने नवी मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकामार्फत पुढील अधिक तपास सुरु आहे. राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून विशेष तपास पथकाला तपास जलद गतीने पूर्ण करुन गुन्ह्यात सहभाग असलेल्या आरोपींवर कठोर कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

राष्ट्र उभारणीचे काम शिक्षक करतात : डॉ . माशेलकर

0

पुणे :
‘राष्ट्र उभारणीचे काम शिक्षक करतात त्यामुळे शिक्षक दिन हा भारत उभारणी दिन म्हणून साजरा केला पाहिजे ‘,असे प्रतिपादन डॉ रघुनाथ माशेलकर यांनी केले. नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ , इंद्रायणी विद्या मंदिर संस्था ,प्रतिभा कॉलेज आणि  शैक्षणिक संस्थांतर्फे शिक्षक दिन  ऑन लाईन  साजरा करण्यात आला. त्यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर यांनी मार्गदर्शन केले.
  संयोजक शैलेश शहा यांनी स्वागत केले. संस्थेचे अध्यक्ष कृष्णराव भेगडे ,दीपक शहा यांच्यासह शिक्षक वर्ग ,विद्यार्थी ,अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हंणून  पुण्यभूषण फौंडेशन चे अध्यक्ष डॉ सतीश देसाई ,लायन्स क्लब चे माजी प्रांतपाल राज मुछाल उपस्थित होते . रामदास काकडे यांनी प्रास्ताविक केले. 
डॉ माशेलकर म्हणाले ,’आयुष्यात चांगले मार्गदर्शन शिक्षणातून ,शिक्षकांकडून मिळते. मार्गदर्शन मिळाले तरी चांगली संधी मिळाली पाहिजे. माणूस घडविणारे शिक्षण हेच योग्य शिक्षण आहे . ज्ञान ,व्यक्ती ,विचार ,क्षमता ,नेतृत्व ,मूल्य संवर्धन करण्याचे काम शिक्षणाने  केल्याने विज्ञार्थी घडत असतो . ‘घोका आणि ओका ‘ पद्धतीने जाता कामा नये. 
जटील प्रश्न सोडविण्याची  तयारी ,चिकित्सक बुद्धी ,नवसर्जन शिलता ,सांघिक कामाची तयारी ही कौशल्ये जीवनात असली पाहिजे .कोविड साथी  मुळे वेगाने बदल झाले आहेत . डिजिटायझेशन ,टेली मेडिसिन ,ई -कॉमर्स जे १० वर्षात झाले नाहीत ,ते एका वर्षात झाले. मात्र ,गरीब व्यक्ती अति गरीब झाल्या ,आव्हाने वाढली. सायबर स्पेस मध्ये शिक्षण देणे हे मोठे आव्हान झाले आहे.त्याचे प्रशिक्षण झाले पाहिजे . डिजिटल लर्निंग  खेड्या पाड्यात पोचले पाहिजे.अन्नदान इतके डिजिटल दान देणे महत्वाचे झाले पाहिजे . सोशल डिस्टनसिंग मुळे सोशल बॉण्डिंग कमी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे,असेही डॉ माशेलकर यांनी सांगितले . 
डॉ माशेलकर पुढे म्हणाले ,’आत्मनिर्भर भारत घडविताना आत्म विश्वास वाढविण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे. सत्या नडेला ,सुंदर पिचाई देखील  भारतीय शिक्षण पद्धतीतून घडले पाहिजेत,असेही डॉ माशेलकर यांनी सांगितले. सर्व चांगली कामे करताना घरच्यानाही वेळ द्यायचा असेल तर वेळेचे उत्तम व्यवस्थापन करता आले पाहिजे. 
विद्यार्थी आणि शिक्षकांच्या प्रश्नांनाही डॉ रघुनाथ माशेलकर यांनी  समर्पक उत्तरे दिली.१००० शिक्षकांनी ऑन लाईन उपस्थित राहून हा शिक्षक दिन साजरा केला . 

आज राज्यात १९ हजार २१८ नवीन रुग्णांचे निदान: सध्या २ लाख २० हजार ६६१ रुग्णांवर उपचार सुरू

0

मुंबई, दि.५: राज्यात आतापर्यंत एकूण ६ लाख ३६ हजार ५७४ रुग्ण बरे झाले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.१ टक्के आहे. आज १० हजार ८०१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून १९ हजार २१८ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यभरात आतापर्यंत सध्या २ लाख २०  हजार ६६१ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.

आज निदान झालेले २०,४८९ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ३१२ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-१७३७ (३३), ठाणे- २८६ (९), ठाणे मनपा-३३५ (२), नवी  मुंबई मनपा-४१३ (४), कल्याण डोंबिवली मनपा-४३५ (१), उल्हासनगर मनपा-३३, भिवंडी निजामपूर मनपा-५ (२), मीरा भाईंदर मनपा-२६२ (४), पालघर-२४२ (२), वसई-विरार मनपा-२०३ (२), रायगड-६४९ (५), पनवेल मनपा-२६३ (४), नाशिक-२५७ (१०), नाशिक मनपा-५६६ (५), मालेगाव मनपा-५४ (१), अहमदनगर-५०८ (८),अहमदनगर मनपा-२७९ (७), धुळे-१३१ (४), धुळे मनपा-५४ (१), जळगाव- ४३६ (६), जळगाव मनपा-६८ (१), नंदूरबार-१०८ (१), पुणे- १३४५ (५), पुणे मनपा-२३६६ (३२), पिंपरी चिंचवड मनपा-९५३ (७), सोलापूर-६१९ (७), सोलापूर मनपा-८४ (१), सातारा-९३९ (१३), कोल्हापूर-४८४ (१५), कोल्हापूर मनपा-२३० (३), सांगली-४६२ (५), सांगली  मिरज कुपवाड मनपा-४२६ (६), सिंधुदूर्ग-९५, रत्नागिरी-१९१ (२), औरंगाबाद-१६७,औरंगाबाद मनपा-२३१ (९), जालना-१३४ (३), हिंगोली-६९, परभणी-७२ (२), परभणी मनपा-४४ (१), लातूर-२४० (६), लातूर मनपा-१९१ (१), उस्मानाबाद-२४० (६), बीड-२०६ (४), नांदेड-१९६ (७), नांदेड मनपा-१५८ (८), अकोला-७६ (२), अकोला मनपा-४५(१), अमरावती- १९, अमरावती मनपा-६५, यवतमाळ-१४० (७), बुलढाणा-६९ (२), वाशिम-७८, नागपूर-३८८ (४), नागपूर मनपा-१३४२ (२७), वर्धा-१०९ (४), भंडारा-१८५ (४), गोंदिया-१४५, चंद्रपूर-१८६ (३), चंद्रपूर मनपा-१३७ (१), गडचिरोली-१४, इतर राज्य- २५ (२).

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४५ लाख ५६ हजार ७०७ नमुन्यांपैकी ८ लाख ८३ हजार ८६२ नमुने पॉझिटिव्ह (१९.३ टक्के) आले आहेत. राज्यात १४ लाख ८१ हजार ९०९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार १९६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३१२ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.९७ टक्के एवढा आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई: बाधित रुग्ण- (१,५३,७१२) बरे झालेले रुग्ण- (१,२२,५६६), मृत्यू- (७८३२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३३६), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२,९७८)

ठाणे: बाधित रुग्ण- (१,४०,९९१), बरे झालेले रुग्ण- (१,१३,७८५), मृत्यू (३९३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३,२७०)

पालघर: बाधित रुग्ण- (२७,६४७), बरे झालेले रुग्ण- (२१,३१४), मृत्यू- (६३२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५७०१)

रायगड: बाधित रुग्ण- (३४,०४२), बरे झालेले रुग्ण-(२५,७४२), मृत्यू- (८२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (७४७३)

रत्नागिरी: बाधित रुग्ण- (४८२९), बरे झालेले रुग्ण- (२६०५), मृत्यू- (१६२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०६२)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (१६५५), बरे झालेले रुग्ण- (७५१), मृत्यू- (२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८८०)

पुणे: बाधित रुग्ण- (१,९४,५५९), बरे झालेले रुग्ण- (१,३२,४११), मृत्यू- (४३७७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५७,७७१)

सातारा: बाधित रुग्ण- (१७,७३१), बरे झालेले रुग्ण- (१०,४७१), मृत्यू- (४१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (६८४५)

सांगली: बाधित रुग्ण- (१७,६३६), बरे झालेले रुग्ण- (९५४१), मृत्यू- (५१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७५७६)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (२५,२४८), बरे झालेले रुग्ण- (१७,८७०), मृत्यू- (७७०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६६०८)

सोलापूर: बाधित रुग्ण- (२२,१७८), बरे झालेले रुग्ण- (१५,६०१), मृत्यू- (८२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (५७५०)

नाशिक: बाधित रुग्ण- (४४,१८४), बरे झालेले रुग्ण- (३३,९५६), मृत्यू- (९५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९२७५)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (२४,०११), बरे झालेले रुग्ण- (१८,१४३), मृत्यू- (३४६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण-(५५२२)

जळगाव: बाधित रुग्ण- (३०,७३०), बरे झालेले रुग्ण- (२२,११०), मृत्यू- (९१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७७०५)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (३१६९), बरे झालेले रुग्ण- (१८०१), मृत्यू- (८३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२८५)

धुळे: बाधित रुग्ण- (९१८२), बरे झालेले रुग्ण- (६६९४), मृत्यू- (२२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२५७)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (२४,६०६), बरे झालेले रुग्ण- (१८,५००), मृत्यू- (६९२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५४१४)

जालना: बाधित रुग्ण-(४९२३), बरे झालेले रुग्ण- (३२७७), मृत्यू- (१४७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४९९)

बीड: बाधित रुग्ण- (५४२९), बरे झालेले रुग्ण- (३८६३), मृत्यू- (१४१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (१४२५)

लातूर: बाधित रुग्ण- (९६८२), बरे झालेले रुग्ण- (५८५४), मृत्यू- (३०४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५२४)

परभणी: बाधित रुग्ण- (३२०२), बरे झालेले रुग्ण- (१८३६), मृत्यू- (९६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२७०)

हिंगोली: बाधित रुग्ण- (१७११), बरे झालेले रुग्ण- (१३७४), मृत्यू- (४१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९६)

नांदेड: बाधित रुग्ण- (८८९९), बरे झालेले रुग्ण (४२७८), मृत्यू- (२५०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३७१)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (७०९०), बरे झालेले रुग्ण- (४५०९), मृत्यू- (१९८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३८३)

अमरावती: बाधित रुग्ण- (५७४६), बरे झालेले रुग्ण- (४३९७), मृत्यू- (१४०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२०९)

अकोला: बाधित रुग्ण- (४३२४), बरे झालेले रुग्ण- (३१९४), मृत्यू- (१६४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (९६५)

वाशिम: बाधित रुग्ण- (२०७७), बरे झालेले रुग्ण- (१४९०), मृत्यू- (३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (५५३)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (३९६१), बरे झालेले रुग्ण- (२६५१), मृत्यू- (८४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२२६)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (४००५), बरे झालेले रुग्ण- (२३७८), मृत्यू- (९२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५३५)

नागपूर: बाधित रुग्ण- (३६,२४३), बरे झालेले रुग्ण- (१८,८०४), मृत्यू- (८७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(४), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६,५५७)

वर्धा: बाधित रुग्ण- (१४३०), बरे झालेले रुग्ण- (७५५), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (६५२)

भंडारा: बाधित रुग्ण- (१५५४), बरे झालेले रुग्ण- (७९२), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७३५)

गोंदिया: बाधित रुग्ण- (२१३३), बरे झालेले रुग्ण- (१०९८), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०१३)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (३५८३), बरे झालेले रुग्ण- (१४९१), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०६९)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (९१९), बरे झालेले रुग्ण- (६७२), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४६)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (८४१), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (८०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७६१)

एकूण: बाधित रुग्ण-(८,८३,८६२) बरे झालेले रुग्ण-(६,३६,५७४),मृत्यू- (२६,२७६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३५१),ॲक्टिव्ह रुग्ण-(२,२०,६६१)

(टीप: आज नोंद झालेल्या एकूण ३१२ मृत्यूंपैकी १९० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ९० मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३२ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३२ मृत्यू  औरंगाबाद -५, कोल्हापूर -५, पुणे -५, ठाणे -४, चंद्रपूर -२, रायगड -२, जालना -२, अहमदनगर -१, जळगाव -१, मुंबई -१, नाशिक -१, परभणी -१, रत्नागिरी -१ आणि पालघर -१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात  आली आहे. आज जिल्हा आणि मनपा निहाय २७ ऑगस्ट  २०२० पर्यंतचे कोविड बाधित रुग्णांचे रिकॉन्सिलिएशन पूर्ण करण्यात आले आहे. रुग्णांची दुहेरी नोंद वगळणे, रुग्णांच्या रहिवाशी पत्त्यानुसार झालेला बदल यामुळे आज एकूण बाधित रुग्णसंख्येत ३११ रुग्णांची वाढ झाली आहे.ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

इंडस्ट्रियलला ऑक्सिजन दिल्यामुळे आरोग्यसेवा व्हेंटिलेटरवर -आबा बागुल

0

पुणे -अपुरा ऑक्सिजन पुरवठा यामुळे शहरातील कोरोना रुग्णांसाठी अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे. हे लक्षात घेऊन इंडस्ट्रियल ऑक्सिजनचा पुरवठा तात्काळ बंद करून तो ऑक्सिजन हॉस्पिटल्सला पुरवणे ही काळाची गरज बनली आहे. त्यासाठी किमान एक महिना अथवा आवश्यकता असेल तर अधिक काळ पुणे व परिसरात दिला जाणारा इंडस्ट्रियल ऑक्सिजनचा पुरवठा थांबवून तो संपूर्ण ऑक्सिजनचा पुरवठा कोरोना रुग्णांच्यासाठी वापरणे बंधनकारक करावे. तसेच पुणे शहरात इनॉक्स कंपनी शहरातील हॉस्पिटला ऑक्सिजनचा पुरवठा करत असून त्यासोबत  इंडस्ट्रियलला ही  मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा करते. त्यांनी शहरात निर्माण होणारा ऑक्सिजन शहरासाठीच उपलब्ध करून द्यावा. क्षमता असतानाही  सध्या एक शिफ्ट मध्ये सुरु असलेले काम शिफ्ट वाढवून करण्यात यावे याबाबत एफडीआयशी संपर्क करून त्यांना सूचना देण्यात याव्यात त्यामुळे शहरातील हॉस्पिटला ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही.  अशी मागणी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या पात्रात  काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांनी केली आहे.  

या संदर्भात बागुल यांनी म्हटले आहे कि ,’ शहरात कोविड -१९ कोरोना विषाणूची लागण मोठ्याप्रमाणात वाढलेली असून गेल्या काही काळात पुणे देशातील सगळ्यात मोठे हॉट स्पॉट सिटी बनलेले आहे. ही काळजीची बाब आहे. शासन व महानगरपालिका माध्यमातून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक उपाय केले जात असतानाही त्यास अपेक्षित यश येताना दिसत नाही. तसेच मृत्यूचे थैमानही कमी होताना दिसत नाही. या परिस्थितीत ऑक्सिजन पुरवठा करणे, शहरात डॉक्टरची फिरती पथके तयार करणे , कोरोनाची सौम्य लक्षणे आलेल्या रुग्णांवर घरीच उपचार करणे  व बाहेरून येणाऱ्या रुग्णांची व नातेवाईकांची शहराच्या नऊ कॉरिडॉर मधून  प्रवेश करताना आरोग्य तपासणी करून तेथील जवळच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे यामुळे कोरोना रुग्णांना चांगले उपचार मिळतील व कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी होईल  

ते म्हणाले की , पुणे शहरात विविध हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या कोरोना रुग्णांना त्यांची तब्येत ढासळत असताना ऑक्सिजन देण्याची नितांत गरज असते. तसेच व्हेंटिलेरसाठीही ऑक्सिजन  महत्वाचे आहे.मात्र कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि अपुरा ऑक्सिजन पुरवठा यामुळे अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे. हे लक्षात घेऊन इंडस्ट्रियल ऑक्सिजनचा पुरवठा तात्काळ बंद करून तो ऑक्सिजन हॉस्पिटल्सला पुरवणे ही काळाची गरज बनली आहे. 
शहरामध्ये अनेक हॉस्पिटलमध्ये  रुग्णांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून रुग्णालयात पुरेशी व्यवस्था नाही म्हणून डिस्चार्ज केले जाते,पैसे नाही म्हणून काढले जाते. या-ना त्या कारणाने रुग्णांना उपचारास प्रतिबंध करण्यात येतो  व आपली जबाबदारी झटकून व्यवस्थापन मोकळे होते.   त्यामुळे नागरिकांची धावपळ होऊन रुग्णांचा  हकनाक बळी जात आहे. त्यासाठी शहरामध्ये अनुभवी डॉक्टरांची फिरकी पथके करून शहरातील हॉस्पिटलवर करडी नजर ठेवण्याची आवश्यकता आहे . हॉस्पिटलवर  अचानक धाड मारून रुग्णांना मिळत असलेल्या उपचाराची पाहणी करून हॉस्पिटलमध्ये किती बेड शिल्लक आहेत,ऑक्सिजनची सुविधा कशी आहे, रुग्णांवर योग्य उपचार केले जातात का ?  यासर्वांची पाहणी करण्यासाठी शहरातील सहा मतदार संघांत डॉक्टरांचे सहा  फिरते पथके  तयार करून त्यांचे सोबत महानगरपालिकेचे अधिकारी नेमावेत. अश्या प्रकारे डॉक्टरांचे फिरते पथक शहरात  असल्यावर हॉस्पिटलवर त्याचा चांगला  परिणाम होईल व शहरात मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.   

कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना घरीच उपचार देण्यासाठी शहरात अनेक डॉक्टर ६००० रुपयांमध्ये  कंसल्ट करत असून त्यांचे नंबर महानगरपालिकेकडे उपलब्ध आहेत. ते महानगरपालिका आयुक्तांनी  प्रसिद्ध करून कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या नागरिकांनी घरीच उपचार घ्यावे असे आवाहन करण्यास सांगावे. कोरोनावर उपचार करण्यासाठी सगळीकडे औषधे सारखीच आहेत. ही औषधे देऊन डॉक्टर रुग्णांना फोनवर १० दिवस कंसल्ट करतील व अतिशय गंभीर असलेल्या रुग्णांना म्हणजेच ऑक्सिजन कमी झालेल्या रुग्णांना, श्वास घेण्यास त्रास होणाऱ्या रुग्णांनाच हॉस्पिटलमध्ये दाखल करावे त्यामुळे शहरातील आरोग्य यंत्रणेवरचा ताण कमी होईल व नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळेल. ८० टक्के नागरिकांना कोरोनाची सौम्य लक्षणे असताना ते घरीच उपचार घेतील त्यामुळे देखील शहरात  कोरोना आटोक्यात येण्यास मोठी मदत होईल.   
पुणे शहरात ग्रामीण भागाच्या तुलनेत मोठ्याप्रमाणात आरोग्य सुविधा आहेत. त्या मुळातच कोरोनाग्रस्त  पुणेकरांना कमी पडत आहेत. मात्र लोणावळा,खंडाळा,सातारा,सांगली,कोल्हापूर,नगर अश्या विविध भागातील कोरोना रुग्ण पुण्यात उपचारासाठी येताना दिसतात. त्यांच्या सोबत त्यांचे नातेवाईक व मित्र परिवारही असतात. दुदैवाने हे कोरोना बाधित रुग्ण हॉस्पिटलमध्ये प्रवेश घेण्यासाठी पुण्यात येताना यांची कोणतीही चाचणी पुण्याच्या हद्दीपाशी केली जात नाही. त्यांची पुण्याच्या हद्दीपाशी तपासणी करून जवळच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे.  पुण्यात प्रवेश करण्यासाठी एकूण नऊ रस्ते असून त्यातून मोठ्याप्रमाणात बाहेर गावाहून कोरोना रुग्ण येतात. ते शहरातील हॉस्पिटलमध्ये प्रवेश घेतात. त्यांच्या बरोबरचे नातेवाईक पुण्यातच राहतात . त्यामुळे पुणेकरांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. हे लक्षात घेऊन पुण्यात येण्यासाठी असलेले नऊ कॉरिडॉर मधून प्रवेश केला जातो. अश्या नऊ ठिकाणी राज्य शासन व महानगरपालिकेने तातडीने चाचणी केंद्रे उभी व  डॅशबोर्ड उभारून कोणत्या हॉस्पिटलमध्ये जागा आहे. याचे मार्गदर्शन देखील तेथेच केले जावे. त्या प्रत्येकाची चाचणी केल्यानंतर  कोरोना रुग्ण तेथील जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करावा. त्यामुळे रुग्णांची धावपळ होणार नाही व रुग्णांचा हकनाक मृत्यू होणार नाही. तसेच रुग्णाबरोबर  बरोबर असलेल्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे की नाही याची तपासणी करावी. व असल्यास कोरोनटाईन शिक्के मारावेत. ज्यांना तपासणी अंती कोरोनाची लागण नाही त्यांना मुक्तपणे प्रवेश देण्यास हरकत नसावी. 
या  बाबतीत आपण अतिशय गांभीर्याने लक्ष घालावे. व ऑक्सिजन पुरवठा रुग्णांना  सुरळीतपणे चालू राहील. याची खात्री करावी, शहरात डॉक्टरची फिरती पथके तयार करावीत , कोरोनाची सौम्य लक्षणे आलेल्या रुग्णांवर घरीच उपचार करण्याचे आवाहन करावे  तसेच बाहेर गावाहून पुण्यात येणाऱ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करावे म्हणजे कोरोनाचा  प्रभाव, प्रसार आणि प्रादुर्भाव रोखण्यास मोठी मदत होईल त्याबद्दल त्वरित कृती कराल तेवढ्या लवकर पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल. यावर गांभीर्याने  विचार करून निर्णय घ्यावा असे आबा बागुल शेवटी म्हणाले. 

ठाकरेंचे निवासस्थान ‘मातोश्री’उडवण्याची दुबईवरुन धमकी

0

मुंबई -राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे खासगी निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’ला उडवण्याची धमकी मिळाली आहे. दुबईहून मोस्ट वॉन्टेंड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तकाने फोन करुम धमकी दिल्याची माहिती आहे. यानंतर मातोश्रीची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुबईहून मातोश्रीवर तीन ते चार फोन आले आणि मातोश्री उडवून देण्याची धमकी देण्यात आली. या घटनेनंतर एखच खळबळ उडाली आहे. दरम्यान, मातोश्री निवासस्थानाबाहेर पोलिस सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. याप्रकरणी आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी अधिकाऱ्यांना पुढील सूचना दिल्या आहेत.

दरम्यान, दाऊद इब्राहिमवर मुंबईतील 1993 मध्ये झालेल्या दहशतवादी बॉम्बहल्ल्याचा कट रचल्याचा आरोप आहे. मुंबईतील या दहशतवादी हल्ल्यात जवळपास 350 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. तसेच 1200 हून अधिक लोक जखमी झाले होते. भारत सरकारने 2003 मध्ये अमेरिकेसोबत मिळून दाऊद इब्राहिमला जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत टाकले होते.

देशाच्या लेकी तुम्हाला माफ करणार नाहीत संजयजी; मी तुमची निंदा करते, भेटू 9 सप्टेंबरला – कंगना रनोट

0

संजय राऊत तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे – कंगना रनोट

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोट आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यातील वाद कमी होताना दिसत नाहीये. अभिनेत्री कंगना रनोटने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केली आणि हा वाद सुरू झाला. यानंतर राऊत कंगनाविरोधात पेटून उठले. आता कंगनाही त्यांना सडेतोडपणे उत्तर देत आहे. कंगनाने नुकताच एक व्हिडिओ पोस्ट करत संजय राऊतांना सुनावले आहे.

कंगना रानावतने यावेळी संजय राऊतांवर विखारी शब्दांमध्ये टीका केली आहे. कंगना म्हणते की, ‘संजय जी तुम्ही मला हरामखोर मुली म्हणालात… तुम्ही एक मंत्री आहात आणि हे तुम्हाला माहितच असेल की या देशात तासाला अनेक महिलांवर बलात्कार होताय, त्यांच्यावर अत्याचार होत आहेत अॅसिड हल्ला केला जातोय. तुम्हाला माहिती आहे ,याला जबाबदार कोण आहे? तुम्ही माझ्याप्रती अपशब्द वापरून जी मानसिकता दाखवली, हीच त्याला जबाबदार आहे. या देशातील लेकी तुम्हाला कधीच माफ करणार नाही,’ असं कंगनाने व्हिडिओ पोस्ट करत म्हटले आहे.

संजय राऊत तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
कंगना पुढे बोलताना म्हणाली की, मी तुमच्यावर टीका केली. पण, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. मी 9 सप्टेंबरला मुंबईत येतेय.. तुमचे लोक जबडा फोडू, मारुन टाकू अशा धमक्या देत आहेत. मी सांगते तुम्ही माराच… या देशातील मातीचं कर्ज रक्त सांडूनच निभावता येईल. 9 सप्टेंबरला भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र असं आव्हानचं कंगनाने राऊतांना दिलं आहे.

आमिर खान, नसरुद्दीन शाह यांना कोणी काही म्हणालं नाही
तसेच पुढे ती म्हणाली की, आमिर खान म्हणाले होते की, मला या देशात असुरक्षित वाटतं तेव्हा तुम्ही त्यांना काही बोलले नाही. त्यावेळी कुणीच असे अपशब्द वापरले नाहीत. नसरुद्दीन शाह यांनाही कुणीच प्रत्युत्तर दिलं नाही. अन् मी नेहमीच मुंबई पोलिसांच कौतुक करत कधीच थकत नाही. पण यावेळी सुशांत प्रकरणावरुन बोलले आणि हे माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे.

काय म्हणाले होते राऊत ?

नुकत्याच एका मुलाखतीमध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अभिनेत्री कंगना रणौतवर ‘हरामखोर मुलगी’ म्हणत टीका केली होती. त्यांच्या या टीकेवर अनेकांकडून आक्षेप नोंदवण्यात आला. राऊतांनी कंगनाची माफी मागावी अशी अनेकांकडून मागणी होत आहे.

काय म्हणाली होती कंगना ?
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्याला मुंबईत न येण्याची धमकी दिली असून मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे अशी टीका कंगनाने ट्विटरवरुन केली होती. तिने ट्विट करत लिहिले होते की, ‘ आधी झळकलेले आझादीचे फलक आणि आता मिळत असलेल्या उघड धमक्या यामुळे मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे?’

https://twitter.com/KanganaTeam/status/1302542975721848839?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1302542975721848839%7Ctwgr%5Eshare_3&ref_url=https%3A%2F%2Fdivyamarathi.bhaskar.com%2F

आयपीएल 2020 चे वेळापत्रक जाहीर-सविस्तर पहा

0

पहिला सामना डिफेंडिंग चॅम्पियन मुंबई आणि चेन्नईदरम्यान होईल, पहिल्यांदाच फायनल रविवारीऐवजी मंगळवारी

बीसीसीआयने रविवारी आयपीएल सीजन-13 चे वेळापत्रक जाहीर केले आहे. कोरोनादरम्यान आयपीएल प्रेक्षकांशिवाय यूएईत 19 सप्टेंबरपासून सुरू होईल. पहिला सामना डिफेंडिंग चॅम्पियन मुंबई इंडियंस आणि चेन्नई सुपर किंग्सदरम्यान होईल. तसेच, फायनल 10 नोव्हेंबर म्हणजेच मंगळवारी असेल. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदा फायनल रविवारऐवजी मंगळवारी होत आहे.

१९ सप्टेंबर – मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज – (शनिवार)

२० सप्टेंबर – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब – (रविवार)

२१ सप्टेंबर – सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु – (सोमवार)

२२ सप्टेंबर – राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज – (मंगळवार)

२३ सप्टेंबर – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स – (बुधवार)

२४ सप्टेंबर – किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु – (गुरुवार)

२५ सप्टेंबर – चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – (शुक्रवार)

२६ सप्टेंबर – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्द सनराईजर्स हैदराबाद – (शनिवार)

२७ सप्टेंबर – राजस्थान रॉयल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब – (रविवार)

२८ सप्टेंबर – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध मुंबई इंडियन्स – (सोमवार)

२९ सप्टेंबर – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद – (मंगळवार)

३० सप्टेंबर – राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स – (बुधवार)

१ ऑक्टोबर – किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध मुंबई इंडियन्स – (गुरुवार)

२ ऑक्टोबर – चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद – (शुक्रवार)

३ ऑक्टोबर – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध राजस्थान रॉयल्स – (शनिवार)
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स

४ ऑक्टोबर – मुंबई इंडियन्स विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद – (रविवार)
किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज

५ ऑक्टोबर – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – (सोमवार)

६ ऑक्टोबर – मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स – (मंगळवार)

७ ऑक्टोबर – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज – (बुधवार)

८ ऑक्टोबर – सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब – (गुरुवार)

९ ऑक्टोबर – राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – (शुक्रवार)

१० ऑक्टोबर – किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स – (शनिवार)
चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु

११ ऑक्टोबर – सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स – (रविवार)
मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
१२ ऑक्टोबर – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स – (सोमवारी)

१३ ऑक्टोबर – सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज – (मंगळवार)

१४ ऑक्टोबर – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स – (बुधवार)

१५ ऑक्टोबर – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्द किंग्ज इलेव्हन पंजाब – (गुरुवार)

१६ ऑक्टोबर – मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स – (शुक्रवार)

१७ ऑक्टोबर – राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु – (शनिवार)
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज

१८ ऑक्टोबर – सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स – (रविवार)
मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब

१९ ऑक्टोबर – चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स – (सोमवार)

२० ऑक्टोबर – किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – (मंगळवार)

२१ ऑक्टोबर – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु – (बुधवार)

२२ ऑक्टोबर – राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद – (गुरुवार)

२३ ऑक्टोबर – चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स – (शुक्रवार)

२४ ऑक्टोबर – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – (शनिवार)
किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद

२५ ऑक्टोबर – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज – (रविवार)
राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स

२६ ऑक्टोबर – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब – (सोमवार)

२७ ऑक्टोबर – सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – (मंगळवार)

२८ ऑक्टोबर – मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु – (बुधवार)

२९ ऑक्टोबर – चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स – (गुरुवार)

३० ऑक्टोबर – किंग्ज इलेव्हन पंजाब विरूद्ध राजस्थान रॉयल्स – (शुक्रवार)

३१ ऑक्टोबर – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स – (शनिवार)
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद

१ नोव्हेंबर – चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब – (रविवार)
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स

२ नोव्हेंबर – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु

३ नोव्हेंबर – सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स

Saturday 19th September 2020

v

MUMBAI INDIANS

CHENNAI SUPER KINGS19:30 IST (14:00 GMT), 18:00 LOCALMatch 1, Sheikh Zayed Stadium, Abu Dhabi

Sunday 20th September 2020

v

DELHI CAPITALS

KINGS XI PUNJAB19:30 IST (14:00 GMT), 18:00 LOCALMatch 2, Dubai International Cricket Stadium, Dubai

Monday 21st September 2020

v

SUNRISERS HYDERABAD

ROYAL CHALLENGERS BANGALORE19:30 IST (14:00 GMT), 18:00 LOCALMatch 3, Dubai International Cricket Stadium, Dubai

Tuesday 22nd September 2020

v

RAJASTHAN ROYALS

CHENNAI SUPER KINGS19:30 IST (14:00 GMT), 18:00 LOCALMatch 4, Sharjah Cricket Stadium, Sharjah

Wednesday 23rd September 2020

v

KOLKATA KNIGHT RIDERS

MUMBAI INDIANS19:30 IST (14:00 GMT), 18:00 LOCALMatch 5, Sheikh Zayed Stadium, Abu Dhabi

Thursday 24th September 2020

v

KINGS XI PUNJAB

ROYAL CHALLENGERS BANGALORE19:30 IST (14:00 GMT), 18:00 LOCALMatch 6, Dubai International Cricket Stadium, Dubai

Friday 25th September 2020

v

CHENNAI SUPER KINGS

DELHI CAPITALS19:30 IST (14:00 GMT), 18:00 LOCALMatch 7, Dubai International Cricket Stadium, Dubai

Saturday 26th September 2020

v

KOLKATA KNIGHT RIDERS

SUNRISERS HYDERABAD19:30 IST (14:00 GMT), 18:00 LOCALMatch 8, Sheikh Zayed Stadium, Abu Dhabi

Sunday 27th September 2020

v

RAJASTHAN ROYALS

KINGS XI PUNJAB19:30 IST (14:00 GMT), 18:00 LOCALMatch 9, Sharjah Cricket Stadium, Sharjah

Monday 28th September 2020

v

ROYAL CHALLENGERS BANGALORE

MUMBAI INDIANS19:30 IST (14:00 GMT), 18:00 LOCALMatch 10, Dubai International Cricket Stadium, Dubai

Tuesday 29th September 2020

v

DELHI CAPITALS

SUNRISERS HYDERABAD19:30 IST (14:00 GMT), 18:00 LOCALMatch 11, Sheikh Zayed Stadium, Abu Dhabi

Wednesday 30th September 2020

v

RAJASTHAN ROYALS

KOLKATA KNIGHT RIDERS19:30 IST (14:00 GMT), 18:00 LOCALMatch 12, Dubai International Cricket Stadium, Dubai

Thursday 1st October 2020

v

KINGS XI PUNJAB

MUMBAI INDIANS19:30 IST (14:00 GMT), 18:00 LOCALMatch 13, Sheikh Zayed Stadium, Abu Dhabi

Friday 2nd October 2020

v

CHENNAI SUPER KINGS

SUNRISERS HYDERABAD19:30 IST (14:00 GMT), 18:00 LOCALMatch 14, Dubai International Cricket Stadium, Dubai

Saturday 3rd October 2020

v

ROYAL CHALLENGERS BANGALORE

RAJASTHAN ROYALS15:30 IST (10:00 GMT), 14:00 LOCALMatch 15, Sheikh Zayed Stadium, Abu Dhabiv

DELHI CAPITALS

KOLKATA KNIGHT RIDERS19:30 IST (14:00 GMT), 18:00 LOCALMatch 16, Sharjah Cricket Stadium, Sharjah

Sunday 4th October 2020

v

MUMBAI INDIANS

SUNRISERS HYDERABAD15:30 IST (10:00 GMT), 14:00 LOCALMatch 17, Sharjah Cricket Stadium, Sharjahv

KINGS XI PUNJAB

CHENNAI SUPER KINGS19:30 IST (14:00 GMT), 18:00 LOCALMatch 18, Dubai International Cricket Stadium, Dubai

Monday 5th October 2020

v

ROYAL CHALLENGERS BANGALORE

DELHI CAPITALS19:30 IST (14:00 GMT), 18:00 LOCALMatch 19, Dubai International Cricket Stadium, Dubai

Tuesday 6th October 2020

v

MUMBAI INDIANS

RAJASTHAN ROYALS19:30 IST (14:00 GMT), 18:00 LOCALMatch 20, Sheikh Zayed Stadium, Abu Dhabi

Wednesday 7th October 2020

v

KOLKATA KNIGHT RIDERS

CHENNAI SUPER KINGS19:30 IST (14:00 GMT), 18:00 LOCALMatch 21, Sheikh Zayed Stadium, Abu Dhabi

Thursday 8th October 2020

v

SUNRISERS HYDERABAD

KINGS XI PUNJAB19:30 IST (14:00 GMT), 18:00 LOCALMatch 22, Dubai International Cricket Stadium, Dubai

Friday 9th October 2020

v

RAJASTHAN ROYALS

DELHI CAPITALS19:30 IST (14:00 GMT), 18:00 LOCALMatch 23, Sharjah Cricket Stadium, Sharjah

Saturday 10th October 2020

v

KINGS XI PUNJAB

KOLKATA KNIGHT RIDERS15:30 IST (10:00 GMT), 14:00 LOCALMatch 24, Sheikh Zayed Stadium, Abu Dhabiv

CHENNAI SUPER KINGS

ROYAL CHALLENGERS BANGALORE19:30 IST (14:00 GMT), 18:00 LOCALMatch 25, Dubai International Cricket Stadium, Dubai

Sunday 11th October 2020

v

SUNRISERS HYDERABAD

RAJASTHAN ROYALS15:30 IST (10:00 GMT), 14:00 LOCALMatch 26, Dubai International Cricket Stadium, Dubaiv

MUMBAI INDIANS

DELHI CAPITALS19:30 IST (14:00 GMT), 18:00 LOCALMatch 27, Sheikh Zayed Stadium, Abu Dhabi

Monday 12th October 2020

v

ROYAL CHALLENGERS BANGALORE

KOLKATA KNIGHT RIDERS19:30 IST (14:00 GMT), 18:00 LOCALMatch 28, Sharjah Cricket Stadium, Sharjah

Tuesday 13th October 2020

v

SUNRISERS HYDERABAD

CHENNAI SUPER KINGS19:30 IST (14:00 GMT), 18:00 LOCALMatch 29, Dubai International Cricket Stadium, Dubai

Wednesday 14th October 2020

v

DELHI CAPITALS

RAJASTHAN ROYALS19:30 IST (14:00 GMT), 18:00 LOCALMatch 30, Dubai International Cricket Stadium, Dubai

Thursday 15th October 2020

v

ROYAL CHALLENGERS BANGALORE

KINGS XI PUNJAB19:30 IST (14:00 GMT), 18:00 LOCALMatch 31, Sharjah Cricket Stadium, Sharjah

Friday 16th October 2020

v

MUMBAI INDIANS

KOLKATA KNIGHT RIDERS19:30 IST (14:00 GMT), 18:00 LOCALMatch 32, Sheikh Zayed Stadium, Abu Dhabi

Saturday 17th October 2020

v

RAJASTHAN ROYALS

ROYAL CHALLENGERS BANGALORE15:30 IST (10:00 GMT), 14:00 LOCALMatch 33, Dubai International Cricket Stadium, Dubaiv

DELHI CAPITALS

CHENNAI SUPER KINGS19:30 IST (14:00 GMT), 18:00 LOCALMatch 34, Sharjah Cricket Stadium, Sharjah

Sunday 18th October 2020

v

SUNRISERS HYDERABAD

KOLKATA KNIGHT RIDERS15:30 IST (10:00 GMT), 14:00 LOCALMatch 35, Sheikh Zayed Stadium, Abu Dhabiv

MUMBAI INDIANS

KINGS XI PUNJAB19:30 IST (14:00 GMT), 18:00 LOCALMatch 36, Dubai International Cricket Stadium, Dubai

Monday 19th October 2020

v

CHENNAI SUPER KINGS

RAJASTHAN ROYALS19:30 IST (14:00 GMT), 18:00 LOCALMatch 37, Sheikh Zayed Stadium, Abu Dhabi

Tuesday 20th October 2020

v

KINGS XI PUNJAB

DELHI CAPITALS19:30 IST (14:00 GMT), 18:00 LOCALMatch 38, Dubai International Cricket Stadium, Dubai

Wednesday 21st October 2020

v

KOLKATA KNIGHT RIDERS

ROYAL CHALLENGERS BANGALORE19:30 IST (14:00 GMT), 18:00 LOCALMatch 39, Sheikh Zayed Stadium, Abu Dhabi

Thursday 22nd October 2020

v

RAJASTHAN ROYALS

SUNRISERS HYDERABAD19:30 IST (14:00 GMT), 18:00 LOCALMatch 40, Dubai International Cricket Stadium, Dubai

Friday 23rd October 2020

v

CHENNAI SUPER KINGS

MUMBAI INDIANS19:30 IST (14:00 GMT), 18:00 LOCALMatch 41, Sharjah Cricket Stadium, Sharjah

Saturday 24th October 2020

v

KOLKATA KNIGHT RIDERS

DELHI CAPITALS15:30 IST (10:00 GMT), 14:00 LOCALMatch 42, Sheikh Zayed Stadium, Abu Dhabiv

KINGS XI PUNJAB

SUNRISERS HYDERABAD19:30 IST (14:00 GMT), 18:00 LOCALMatch 43, Dubai International Cricket Stadium, Dubai

Sunday 25th October 2020

v

ROYAL CHALLENGERS BANGALORE

CHENNAI SUPER KINGS15:30 IST (10:00 GMT), 14:00 LOCALMatch 44, Dubai International Cricket Stadium, Dubaiv

RAJASTHAN ROYALS

MUMBAI INDIANS19:30 IST (14:00 GMT), 18:00 LOCALMatch 45, Sheikh Zayed Stadium, Abu Dhabi

Monday 26th October 2020

v

KOLKATA KNIGHT RIDERS

KINGS XI PUNJAB19:30 IST (14:00 GMT), 18:00 LOCALMatch 46, Sharjah Cricket Stadium, Sharjah

Tuesday 27th October 2020

v

SUNRISERS HYDERABAD

DELHI CAPITALS19:30 IST (14:00 GMT), 18:00 LOCALMatch 47, Dubai International Cricket Stadium, Dubai

Wednesday 28th October 2020

v

MUMBAI INDIANS

ROYAL CHALLENGERS BANGALORE19:30 IST (14:00 GMT), 18:00 LOCALMatch 48, Sheikh Zayed Stadium, Abu Dhabi

Thursday 29th October 2020

v

CHENNAI SUPER KINGS

KOLKATA KNIGHT RIDERS19:30 IST (14:00 GMT), 18:00 LOCALMatch 49, Dubai International Cricket Stadium, Dubai

Friday 30th October 2020

v

KINGS XI PUNJAB

RAJASTHAN ROYALS19:30 IST (14:00 GMT), 18:00 LOCALMatch 50, Sheikh Zayed Stadium, Abu Dhabi

Saturday 31st October 2020

v

DELHI CAPITALS

MUMBAI INDIANS15:30 IST (10:00 GMT), 14:00 LOCALMatch 51, Dubai International Cricket Stadium, Dubaiv

ROYAL CHALLENGERS BANGALORE

SUNRISERS HYDERABAD19:30 IST (14:00 GMT), 18:00 LOCALMatch 52, Sharjah Cricket Stadium, Sharjah

Sunday 1st November 2020

v

CHENNAI SUPER KINGS

KINGS XI PUNJAB15:30 IST (10:00 GMT), 14:00 LOCALMatch 53, Sheikh Zayed Stadium, Abu Dhabiv

KOLKATA KNIGHT RIDERS

RAJASTHAN ROYALS19:30 IST (14:00 GMT), 18:00 LOCALMatch 54, Dubai International Cricket Stadium, Dubai

Monday 2nd November 2020

v

DELHI CAPITALS

ROYAL CHALLENGERS BANGALORE19:30 IST (14:00 GMT), 18:00 LOCALMatch 55, Sheikh Zayed Stadium, Abu Dhabi

Tuesday 3rd November 2020

v

SUNRISERS HYDERABAD

MUMBAI INDIANS19:30 IST (14:00 GMT), 18:00 LOCALMatch 56, Sharjah Cricket Stadium, Sharjah

टूर्नामेंटमध्ये 10 डबल हेडर म्हणजेच एका दिवसात 2-2 मॅच होतील. संध्याकाळी होणारे सामने जुन्या शेड्यूलच्या अर्ध्या तासापूर्वी म्हणजेच, 7.30 पासून आणि दुपारचे सामना 3.30 वाजेपासून सुरू होतील.

प्रत्येक संघासोबत फक्त 24 खेळाडू असतील

आयपीएल गव्हर्निंग काउंसिलने कोरोनामुल् प्रत्येक टीमला फक्त 24 खेळाडू सोबत नेण्याची परवानगी दिली आहे. याआधी फ्रेंचाइजीला 25 खेळाडू ठेवण्याची परवानगी होती. टूर्नामेंटमध्ये अनलिमिटेड कोरोना सब्सटिट्यूटला मंजूरी देण्यात आली आहे. म्हणजेच, टूर्नामेंटमध्ये एखादा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास, टीम त्याजागी दुसरा खेळाडू मैदानात उतरवू शकते.

सर्व 60 सामने तीन स्टेडियममध्ये होतील

आयपीएल मधील सर्व 60 सामने दुबई, अबुधाबी आणि शारजाहमध्ये खेळवले जातील. भारतात आयपीएलचे सामने 8 ठिकाणी व्हायचे. फक्त तीन ठिकाणी सामने होत असल्यामुळे यावर्षी भ्रष्टाचार आणि मॅच फिक्सींगवर नजर ठेवणे सोपे जाईल. ही गोष्ट काही दिवसांपूर्वी बीसीसीआयच्या अँटी करप्शन युनिट (एसीयू)चे हेड अजीत सिंहने म्हटली होती.

यावेळेस नवीन काय असेल ?

  • कोरोनामुळे सामने प्रेक्षकांशिवाय म्हणजेच बायो-सिक्योर वातावरणात होतील.
  • आयपीएलच्या दर पाचव्या दिवशी खेळाडू आणि स्टाफची कोरोना चाचणी होईल.
  • टूर्नामेंटमध्ये सर्व फ्रेंचाइजी अनलिमिटेड कोरोना सब्सटिट्यूट घेऊ शकतील.
  • यावर्षी सामना आधीच्या शेड्यूलच्या अर्धा तास आधी सुरू होतील.
  • आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदा फायनल रविवार ऐवजी मंगळवारी होईल.
  • कॉमेंटेटर घर बसल्या लाइव्ह कॉमेंट्री करतील.

भोसरीतील रोहित्राच्या स्फोटाची चौकशी सुरु,मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाखांची मदत

0

पुणे, दि. 06 सप्टेंबर 2020 : भोसरी येथील इंद्रायणीनगरमध्ये विद्युत रोहित्राच्या स्फोटप्रकरणी राज्य शासनाच्या जिल्हा विद्युत निरीक्षकांकडून चौकशी सुरु करण्यात आली आहे. त्यांच्या निरीक्षण अहवालाप्रमाणे महावितरणचे दोषी अधिकारी व कर्मचारी तसेच संबंधीत रोहित्र पुरवठादार एजंसीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, या दुर्दैवी घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या दोन्ही मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे.

      भोसरी येथील इंद्रायणीनगरमध्ये राजवाडा बिल्डींग 2 जवळ विद्युत रोहित्राचा शनिवारी (दि. 4) दुपारी दीड वाजताच्या सुमारास स्फोट झाला. या दुर्दैवी घटनेत शारदा दिलीप कोतवाल व त्यांची 5 महिन्यांची नात यांचा मृत्यू झाला. या मृतांच्या कुटुंबियांना महावितरणकडून प्रत्येकी चार लाखांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. तसेच जखमी हर्षदा सचिन काकडे यांच्या कुटुबियांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे.

राज्य शासनाच्या विद्युत निरीक्षकांकडून या विद्युत रोहित्राच्या स्फोटाची चौकशी सुरु करण्यात आली आहे. त्यांच्या चौकशी अहवालानुसार महावितरणच्या संबंधीत दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे. यासोबतच महावितरणकडून देखील तीन सदस्यीय समिती या स्फोटाची अंतर्गत चौकशी करीत आहे.तसेच महावितरणकडून संबंधीत अधिकाऱ्यांना स्फोटप्रकरणी तात्काळ कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. स्फोट झालेले विद्युत रोहित्र काही तासांपूर्वीच बसविण्यात आले होते. हे रोहित्र पुरवठा करणाऱ्या एजंसीला देखील कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

पर्यटनाला चालना देण्यासाठी एमटीडीसीमार्फत अनोख्या मोटोहोम कॅम्परवॅनचा शुभारंभ

0

मुंबई, दि. ६ : कोरोना संकटामुळे परिणाम झालेल्या पर्यटन क्षेत्राला लवकरात लवकर पुनुरुज्जीवीत करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) पुढाकार घेतला आहे. राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आज एमटीडीसीमार्फत अनोख्या अशा मोटोहोम कॅम्परवॅनचा शुभारंभ करण्यात आला.  पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री आदिती तटकरे, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर – सिंह, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील यांच्या उपस्थितीत आज हा कार्यक्रम संपन्न झाला.

एमटीडीसीने सुरू केलेल्या या अनोख्या उपक्रमामुळे पर्यटकांना आपल्या आरोग्याची काळजी घेत अतुलनीय महाराष्ट्रातील सौंदर्य पाहता येणार आहे. लॉकडाऊन दरम्यान आणि त्यानंतर प्रवासाच्या योजनांसाठी कॅम्परवॅन हा एक प्रभावी उपाय आहे. पर्यटक कॅम्परव्हॅन भाड्याने घेऊ शकतात किंवा एकामध्ये गुंतवणूक करू शकतात आणि हॉटेल्स बुक न करता प्रवास करू शकतात, किंवा रेस्टॉरंट ब्रेकसाठी ठेवण्याची गरज नाही. या व्हॅनमध्ये स्वयंपाकघर, एक मिनी बेडरूम, लिव्हिंग रूम, मूलभूत सुविधा आणि टेरेससारख्या सुसज्ज सुविधा आहेत, ज्यामुळे पर्यटकांना घरापासून दूर एक सर्वसोयीयुक्त घराची सुविधा उपलब्ध होते.

मोटोहोम वाहनांमध्ये कचरा व्यवस्थापनाची व्यवस्था आहे. त्यामुळे सुरक्षा, आरोग्य आणि स्वच्छता सुनिश्चित केली जाते. कोविड-१९ महामारीविरुद्ध संपूर्ण जग लढत असताना महाराष्ट्रात हा उपक्रम सुरू करून पर्यटन क्षेत्राला पुनरुज्जीवित करण्यासाठी एमटीडीसी ठोस आणि सकारात्मक पाऊल उचलत आहे.

मंत्री श्री. आदित्य ठाकरे म्हणाले की, ज्यांना स्वतंत्रपणे फिरायचे आहे आणि महाराष्ट्रातील विविध पर्यटनस्थळांना भेट देऊन महाराष्ट्राचे सौंदर्य पाहायचे आहे, त्यांना उत्कृष्ट प्रवासाची सोय व पर्यटनस्थळी चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एमटीडीसी प्रयत्नशील आहे. महाविकास आघाडीचे सरकार व पर्यटन विभाग महाराष्ट्रातील पर्यटनाला जागतिक नकाशावर आणून जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे, असे ते म्हणाले.

कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी टेलिआयसीयू उपयुक्त -आरोग्यमंत्री राजेश टोपे

0

मुंबई, दि. ६: टेलिआयसीयू प्रकल्पाच्या मदतीने कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी प्रयत्न केले जात असून या सेवेचा राज्यभरात विस्तार करण्यासाठी मुख्यमंत्री, उमुख्यमंत्र्यांशी चर्चा करू. जेणेकरून अतिदक्षता विभागातील रुग्णांना तंत्रज्ञानाच्या मदतीने वेळीच उपचार व मार्गदर्शन मिळू शकेल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले.

औरंगाबाद, जालना आणि सोलापूर येथील रुग्णालयांमध्ये या सेवेचा शुभारंभ आज आरोग्यमंत्री श्री. टोपे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, आयुक्त. एन. रामास्वामी, आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, तिनही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता आदी उपस्थित होते.

यावेळी आरोग्यमंत्री म्हणाले, आरोग्य सुविधेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज आहे. राज्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर ही चिंतेची बाब असून मृत्यूदर एक टक्क्यांपेक्षाही कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात विशेषज्ञांची जाणवणारी कमतरता टेलिआयसीयू तंत्रज्ञानामुळे काहीशी भरून निघणार असून कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर विशेषज्ञांच्या मार्गदर्शनातून उपचार झाले तर मृत्यूदर कमी होण्यासाठी त्याचा लाभ होईल.

राज्याचा मृत्यूदर काल तीन टक्क्यांपेक्षा कमी नोंदविला गेला असून तो अजून कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ही सुविधा राज्यात अन्यत्रदेखील सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करू. जेणेकरून दुर्गम भागातील रुग्णांनादेखील विशेषज्ञांच्या उपचाराचा लाभ मिळू शकेल.

प्रधान सचिव डॉ. व्यास म्हणाले, कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. राज्याचा मृत्यूदरात काहीशी घट होत असून तो अजून कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

यापूर्वी दि.१४ ऑगस्ट रोजी भिवंडी येथे राज्यातील पहिल्या प्रकल्पाचे उद्घाटन आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते झाले होते. या तंत्रज्ञानाच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल असलेल्या कोरोनाच्या गंभीर रुग्णांसाठी विशेषज्ञांचे मार्गदर्शन आणि उपचाराची सेवा या तंत्रज्ञानाच्या मदतीने घेण्यात येत आहे. मेडिस्केप इंडिया फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक उत्तर दायित्व निधीच्या (सीएसआर) माध्यमातून ही सुविधा देण्यात येत आहे. यावेळी मेडिस्केप इंडिया फाउंडेशनच्या डॉ. सुनिता दुबे, डॉ. संदीप दिवाण यांनी या तंत्रज्ञानाबाबत माहिती दिली.

पुणे विभागातील ॲक्टीव रुग्ण संख्या 59 हजार 930;एकुण 7 हजार 146 रुग्णांचा मृत्यू

0

पुणे विभागातील 2 लाख 70 हजार 296 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले, विभागात कोरोना बाधित 2 लाख 03 हजार 220 रुग्ण-विभागीय आयुक्त सौरभ राव
पुणे,दि.6 :- पुणे विभागातील 2 लाख 70 हजार 296 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 2 लाख 03 हजार 220 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 59 हजार 930 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 7 हजार 146 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.64 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 75.18 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 88 हजार 566 रुग्णांपैकी 1 लाख 51 हजार 117 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 33 हजार 65 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 384 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.32 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 80.14 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 17 हजार 663 रुग्णांपैकी 10 हजार 471 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 6 हजार 719 आहे. कोरोनाबाधित एकूण 473 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 20 हजार 170 रुग्णांपैकी 14 हजार 990 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 372 आहे. कोरोनाबाधित एकूण 808 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 16 हजार 262 रुग्णांपैकी 8 हजार 702 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 6 हजार 927 आहे. कोरोनाबाधित एकूण 633 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 27 हजार 635 रुग्णांपैकी 17 हजार 940 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्णसंख्या 8 हजार 847 आहे. कोरोनाबाधित एकूण 848 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 6 हजार 593 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 4 हजार 50 सातारा जिल्ह्यात 875, सोलापूर जिल्ह्यात 435, सांगली जिल्ह्यात 612 तर कोल्हापूर जिल्ह्यात 621 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 12 लाख 71 हजार 803 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 2 लाख 70 हजार 296 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 5 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

रावेत पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा सुरळीत

0

विस्कळीत पाणीपुरवठ्यासाठी महावितरण जबाबदार नाही

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रावेत अशुद्ध जलउपसा केंद्राचा वीजपुरवठा महावितरणकडून सुरळीत आहे. मात्र, महापालिकेकडून या केंद्रातील अंतर्गत विद्युत विषयक दुरुस्ती कामासाठी गुरुवारी (दि. 3) सुमारे आठ तास वीजपुरवठा बंद ठेवण्यात आल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यासाठी महावितरण जबाबदार नाही.

      रावेत जलउपसा केंद्राचा वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे शनिवारी व रविवारी (दि. 4 व 5) पाणीपुरवठा विस्कळीत राहणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून समाजमाध्यमांद्वारे प्रसारित होत आहे. वस्तुस्थिती अशी आहे की, रावेत जलउपसा केंद्राचा वाढीव वीजभाराचे काम करण्यासाठी महानगरपालिकेकडून गुरुवारी (दि. 3) सकाळी 10 वाजता विद्युत विषयक काम सुरु करण्यात आले व सायंकाळी 6.30 वाजता हे काम पूर्ण झाले. या कालावधीत महानगरपालिकेच्या मागणीनुसार महावितरणकडून जलउपसा केंद्राचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला होता व या कालावधीत पंपींग बंद होते. त्यानंतर शुक्रवारी (दि. 4) रात्री 11 वाजता रावेत जलउपसा केंद्राचा वीजपुरवठा तांत्रिक बिघाडामुळे खंडित झाला होता. मात्र महावितरणने लगेचच तांत्रिक उपाययोजना करून 50 मिनिटांनी पर्यायी व्यवस्थेद्वारे या केंद्राचा वीजपुरवठा सुरळीत केला आहे. हा 50 मिनिटांचा अपवाद वगळता महावितरणकडून रावेत जलउपसा केंद्राचा वीजपुरवठा सुरळीत असल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होण्यासाठी जबाबदार नसल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे.

देशाच्या विकासात सहकार चळवळ महत्वपूर्ण-राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम

0

पुणे : “ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेली सहकार चळवळ देशाच्या विकासात अत्यंत महत्वपूर्ण आहे. साखर उद्योग, दूध, बँकिंग, गृहरचना आदीमध्ये सहकार क्षेत्र विस्तारले आहे. राज्य आणि केंद्र सरकारही सहकार क्षेत्राला प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे या सहकार क्षेत्राला नव्या धोरणांना अवलंबून उभारी देण्यासाठी, तसेच त्यात सुसूत्रता आणण्यासाठी सनदी लेखापाल आणि सीए इन्स्टिट्यूटने पुढाकार घ्यावा,” असे मत राज्याचे सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी व्यक्त केले. 
दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) पुणे शाखा आणि प्रोफेशनल डेव्हलपमेंट कमिटीच्या (पीडीसी) संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय ‘सहकार संवाद’ कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. कदम यांच्या हस्ते झाले. प्रसंगी ‘आयसीएआय’चे राष्ट्रीय अध्यक्ष सीए अतुलकुमार गुप्ता, उपाध्यक्ष सीए निहार जांबूसारिया, ‘आयसीएआय पीडीसी’चे चेअरमन सीए श्रीनिवास जोशी, केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, माजी सदस्य सीए डॉ. एस. बी. झावरे, पुणे आयसीएआयचे अध्यक्ष सीए अभिषेक धामणे, डब्ल्यूआयआरसीचे चेअरमन सीए ललित बजाज, सहकार समितीचे चेअरमन सीए यशवंत कासार यांच्यासह सहकार क्षेत्रातील इतर मान्यवर उपस्थित होते.
डॉ. विश्वजित कदम म्हणाले, “सहकार क्षेत्रात शेतकऱ्यांना मालकी किंवा त्यांची भागीदारी मिळते. महाराष्ट्र सहकार चळवळीचे केंद्र आहे. देशाच्या इतर राज्यातंही सहकार चळवळ वाढलेली आहे. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या या चळवळीला आपण सर्वानी अबाधित ठेवले पाहिजे. सहकार क्षेत्रात अनेक नियंत्रण संस्था आहेत. सरकारने सहकारी बँकांसंबंधी केलेल्या नवीन दुरुस्त्यांमध्ये सहकार क्षेत्राला चांगले काम करण्यासाठी सनदी लेखापालांनी मार्गदर्शन करावे.”
सीए अतुलकुमार गुप्ता म्हणाले, “सहकार क्षेत्राने ग्रामीण भागात उद्योजकतेला आणि स्वावलंबनाला प्रोत्साहन दिले. बचत गटांच्या माध्यमातून अनेक महिलाना रोजगार मिळाला. सहकार क्षेत्राला गती देण्यासाठी सीए इन्स्टिट्यूट रचनात्मक काम करत आहे. सहकार क्षेत्र देशाच्या विकासाचे इंजिन आहे.” सीए डॉ. एस. बी. झावरे, सीए चंद्रशेखर चितळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
सीए अभिषेक धामणे यांनी स्वागत-प्रास्ताविकात कार्यक्रमाच्या आयोजनाविषयी सांगितले. सीए श्रीनिवास जोशी यांनी सूत्रसंचालन केले. सहकारी बँकांचे ऑडिट, करप्रणाली, सहकार चळवळ आणि अर्थव्यवस्था, सहकार क्षेत्रात माहिती तंत्रज्ञानाचे योगदान, सहकार क्षेत्रात सीएची भूमिका, सहकार क्षेत्र आणि जीएसटी आदी विषयांवर या दोन दिवसीय सत्रात चर्चा होत आहे.