Home Blog Page 2453

डॉ. अमित कामले यांनी वडिलांप्रती कृतज्ञतापूर्वक लिहीलेल्या ‘मेरे पापा’ या आल्बमचे व ‘जयदीप’ या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन

0

डॉअमित कामले यांनी वडिलांप्रती कृतज्ञतापूर्वक लिहीलेल्या

मेरे पापा’ या आल्बमचे  ‘जयदीप’ या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन

• ‘मेरे पापा’ गाण्याला प्रसिद्ध गायक एसपी बालसुब्रह्मण्यम यांचा स्वर

• जयदीप चरित्रग्रंथाचे ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर यांच्या हस्ते प्रकाशन

पुणे – ख्रिस्त शिकवण भक्तिसंगीत उद्योगातील नामवंत व्यक्तीमत्त्व व संगीतकार तसेच ग्लोरीफाय ख्राईस्टचे संस्थापक व संचालक डॉ. अमित कामले यांच्या ‘मेरे पापा’ या आल्बमचे तसेच त्यांचे वडील डॉ. दीपक कामले यांच्यावरील ‘जयदीप’ या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन आज येथे झाले. डॉ. दीपक कामले यांच्या ६६ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून अमित यांनी स्वतः लिहीलेला व संगीतबद्ध केलेला ‘मेरे पापा’ हा आल्बम गीत वडिलांना अर्पण केला. या गीतांना प्रसिद्ध गायक एसपी बालसुब्रह्मण्यम यांनी स्वर दिला आहे.

यासंदर्भात बोलताना डॉ. अमित म्हणाले, “एसपी बालसुब्रह्मण्यम सरांसारख्या महान गायकाने माझ्या रचना गाणे माझ्यासाठी गौरवास्पद आहे. मी त्यांचा खूप मोठा चाहता आहे. त्यांनी या आल्बममधील गाणी अत्यंत प्रेमाने व भावमधुर गायली आहेत. मेरे पापा हा आल्बम म्हणजे माझे वडील डॉ. दीपक कामले यांच्याप्रती माझ्या कृतज्ञतेचे प्रतिक आहे.”

या गाण्यांचे चित्रण मिरजेच्या वॉनलेस हॉस्पिटलच्या रम्य परिसरात झाले असून त्यानिमित्त डॉ. दीपक व डॉ. अमित हे पिता-पुत्र प्रथमच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. ‘मेरे पापा’ आल्बम हृदयस्पर्शी गीत अत्यंत मधुर संगीताने नटला असून श्रोत्यांच्या मनाला नक्कीच भिडणारा आहे.

वडील डॉ. दीपक कामले यांचा आजचा वाढदिवस अधिक संस्मरणीय करण्यासाठी डॉ. अमित यांनी त्यांना आणखी एक भावपूर्ण भेट दिली आहे. डॉ. दीपक कामले यांच्या जयदीप या चरित्र ग्रंथाचे प्रकाशनही आज प्रसिद्ध ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर यांच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीने झाले. ‘जयदीप’ हे शीर्षक अत्यंत अर्थपूर्ण असून त्यात अमित यांच्या आई जया व वडील दीपक यांच्या नावाचा सुरेख संगम आहे. पुस्तकात डॉ. दीपक यांच्या बालपणातील कहाण्या, त्यांचे शालेय जीवन, वैद्यकीय महाविद्यालयातील शिक्षण व मिरजेतील वॉनलेस हॉस्पिटलचे संचालक बनण्यापर्यंतचा प्रवास वर्णन केला असून त्याद्वारे त्यांच्या सुवर्णमयी व्यक्तीमत्त्वाची ओळख करुन दिली आहे.

डॉ. अमित यांनी यानिमित्त पत्नी पोर्णिमा व कन्या अद्विता यांच्याप्रतीही त्यांनी केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

हा आल्बम व पुस्तक दोन्ही नक्कीच यशस्वी ठरतील. ‘मेरे पापा’ या गाण्यातून श्रोत्यांना वडील व मुलातील भावस्पर्शी नात्याची अनुभूती मिळेल तर पुस्तकातून वाचकांना प्रेरणा मिळेल.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे ऑनलाईन दुसरी राष्ट्रीय माध्यम व पत्रकारिता परिषद दि.21 ते 24 सप्टेंबर 2020 या दरम्यान

0

पुणे, 18 सप्टेंबर: एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे तर्फे सोमवार, दि.21 ते गुरूवार दि. 24 सप्टेंबर 20 या कालावधीत चार दिवसीय ऑनलाईन, “ दुसरी राष्ट्रीय माध्यम व पत्रकारिता परिषद” आयोजित करण्यात आली आहे. जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रसार माध्यमांची भूमिका हा या परिषदेचा मुख्य विषय आहे.
या परिषदेचा उद्घाटन समारंभ सोमवार, दि. 21 सप्टेबर 2020 रोजी सकाळी 11. 00 वा. होणार आहे. या समारंभासाठी द हिंदू पब्लिसिंग ग्रूपचे संचालक आणि ज्येष्ठ पत्रकार पद्मभूषण डॉ. एन.राम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहातील. नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय संबधांचे माजी प्रा. पद्मश्री डॉ. पुष्पेष पंथ, टिव्ही ब्रॉड कास्टरचे संपादक आणि राजकीय विश्लेषक पद्मश्री आलोक मेहता, राजकीय विश्लेषक संजय बारू आणि नई दुनिया चे माजी प्रमुख संपादक श्रवण गर्ग हे सन्मानीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
तसेच, परिषदेचा समारोप संमारंभ गुरूवार दि. 24 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30 वा. होणार आहे. अरूणाचल प्रदेशचे माजी राज्यपाल व सुप्रसिद्ध लेखक श्री.तथागत रॉय हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ज्येष्ठ पत्रकार श्री.आशितोष, लोकसभेचे खासदार भत्रीहरी महताब, विवेकांनद इंटरनेशनल फाउंडेशनचे अध्यक्ष आणि तुघलकचे संपादक स्वामिनाथन गुरूमुर्ती, ले. जनरल अरविंदर सिंग लाम्बा (पीव्हीएसएम, व्हीएसएम) हे सन्माननीय पाहुण म्हणून उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे प्र-कुलगुरू प्रा.डॉ.आर.एम,चिटणीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी स्कूल ऑफ मीडिया अ‍ॅण्ड जर्नालिझमचे प्रमुख डॉ. कंवलजीत सिंग आणि प्रा. अनुराग वर्मा  हे उपस्थित होते.
या चार दिवसीय प्रसारमाध्यम व पत्रकार परिषदेत नऊ सत्र होणार आहेत.
1ः मीडिया आणि मनोरंजन उद्योगः आव्हाने पोस्ट कोविड 19
2ः डिजिटल युगातील प्रसारण माध्यमांचे भविष्य
3ः मानवी हक्कांच्या दृष्टिकोनातून पत्रकारिता
4ः आंतरराष्ट्रीय एक जागतिक शक्ती म्हणून उद्यासः आंतरराष्ट्रीय दृष्टीकोन
5ः फेक न्यूजः सत्यता निराकरणसाठी आधार काय
6ः कम्युनिटी रेडिओ इन इंडियाः काल, आज आणि काल
7ः राष्ट्रीय सुरक्षिततेसाठी माध्यमांची भूमिका
8ः सार्वजनिक कल्याणासाठी माध्यमाच्या संप्रेषणाचे माध्यम म्हणून रेडिओची प्रासंगिकता
9ः मीडिया मालकांपुढील आव्हाने आणि भावी दिशा
या व्यतिरिक्त दोन ‘ मीडिया टू मीडिया कनेक्ट’  व दोन ‘ यूथ टू यूथ’ असे सत्र होणार आहेत. महाराष्ट्रातील व देशाच्या विविध राज्यातील प्रतिष्ठित माध्यम समूहांचे मान्यवर प्रमुख सिध्दहस्त संपादक, ख्यातनाम पत्रकार संस्थांचे प्रमुख पदाधिकारी, विविध माध्यमातील अनुभवी पत्रकार या परिषदेत सहभागी होणार असून मुख्य विषयाच्या अनुषंगाने मार्गदर्शन व विचारविनिमिय करतील.
यामध्ये श्री. पराग करंदीकर, संपादक, महाराष्ट्र टाईम्स, मुंबई, प्रोफेसर अमिताभ श्रीवास्तव, जयपूरच्या मनिपाल युनिव्हर्सिटीचे संचालक आणि मीडिया पर्सन, श्री.असित कुमार मोदी, निर्माता, टीव्ही शो तारक मेहता का उल्टा चष्मा आणि स्वच्छ भारत राजदूत, मुंबई, ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय विद्यापीठाच्या नॅशनल सिक्युरिटी कॉलेजचे प्रमुख, रोरी मेडकॅल्फ, सुशील कुमार शर्मा, ज्येष्ठ पत्रकार आणि शिक्षणतज्ज्ञ, नवी दिल्ली, प्रा.अंग संग नियान, व्याख्याता, कला, डिझाइन आणि मीडिया स्कूल, नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, सिंगापूर, रत्नेश पाठक वरिष्ठ निर्माता, एबीपी न्यूज, दिल्ली, अनुराग पुनेठा, ज्येष्ठ अँकर, लोकसभा टीव्ही, दिल्ली, हितेश शंकर, संपादक, पंचजन्य, दिल्ली, दिनेश गौतम, वरिष्ठ अँकर, टीव्ही 9, दिल्ली, श्री.सुधीर सहस्रनाम, ज्येष्ठ पत्रकार, हैदराबाद, प्रो. लुकास एमएफव्ही जडग्ने, वरिष्ठ व्याख्याता, स्कूल ऑफ आर्ट, डिझाइन आणि मीडिया, नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, सिंगापूर, श्री. गोपाल शर्मा, संपादक, आप की क्रांती, नवी दिल्ली, श्री.रितेश लाखी. मुख्य संपादक, ग्लोबल पंजाब टीव्ही, पंजाब, श्री. हरीश पराशर, सहाय्यक संपादक, राजस्थान पत्रिका, राजस्थान, श्री. शुनाशीर सेन, संपादक, मिड-डे, मुंबई, जयंत माईनकर, ब्युरो चीफ, यूएनआय, मुंबई, प्रा. अविनाश सिंह, दिग्गज पत्रकार, माजी प्रधान प्रतिनिधी, हिंदुस्तान टाईम्स, नवी दिल्ली, सतीश जेकब, माजी भारतीय चीफ ब्यूरो, बीबीसी, नवी दिल्ली, दिनेश कुमार, वरिष्ठ पत्रकार, चंदिगड, जगतरसिंग, ज्येष्ठ पत्रकार व लेखक, चंडीगड, श्रीमती उमा सुधीर, निवासी संपादक, एनडीटीव्ही, हैदराबाद ,प्रोफेसर मे ऑलविन, प्राध्यापक, नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, सिंगापूर, एस. वेंकट नारायण, अध्यक्ष, फॉरेन कॉरेस्पोंडेन्टिव्ह क्लब ऑफ दक्षिण एशिया, दिल्ली, डॉ. ग्लेन फुलर, असोसिएट प्रोफेसर, न्यूज अ‍ॅण्ड मीडिया रिसर्च, ऑस्ट्रेलिया, पीआयओ टीव्ही प्रा. चे अध्यक्ष मुनीष गुप्ता. लि. चेअरमन, पीआयओ सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, अध्यक्ष, मीडियामंत्र, इन्क. सिमरन सोढी, स्तंभलेखक, दिल्ली, डॉ. वायल आववाड, ज्येष्ठ पत्रकार, दिल्ली, व्हिक्टोरिया हमाह, कार्यकारी संचालक, पोवा,  घानामार्गॉक्स सॉलिनास, पत्रकार, फ्रान्स, श्री. श्रध्दानंद सिताल, अध्यक्ष, ग्लोबल ह्यूमन राइट्स डिफेन्स, नेदरलँड्स, यशोधन आगळगावकर, बाल हक्क चळवळ, यूएसए डॉ. पॉल काटूस, एज्युकेशन प्रोफेशनल, युईए, डॉ. मनीष जैसल, चित्रपट समालोचक, लखनऊ, श्री.रणजित कपूर, संचालक, अभिनेता आणि पटकथा लेखक, श्री. अजित राय, चित्रपट समालोचक, श्री. कमल शर्मा, वरिष्ठ उद्घोषक, विविध भारती, ऑल इंडिया रेडिओ, मुंबई, श्री.अनिल चौबे, चित्रपट समालोचक, मध्य प्रदेश, डॉ. कांचन मलिक, प्राध्यापक, संचार अभ्यास विभाग, हैदराबाद विद्यापीठ, हैदराबाद, पूजा मुराडा, अल्फाज-ए-मेवात, हरियाणा, फ्र बिजो थॉमस रेडिओ मटोली – केरळ, सौ. राधा शुक्ला वक्त की आवाज – यूपी सिस्टर कृष्णा,रेडिओ मधुबन – राजस्थान, ओंकारेश्वर पांडे, अनूप के. मुदगल, मेजर जनरल दिलवर सिंग, डॉ. सतिश मिश्रा, कर्नल जयबॉन सिंग, संजय सिंग, नरिसअली, हयुमायून कासेरा, सुजेय ठाकूर, श्वेता, तरूण जोशी, श्याम शेख, श्री. अभिषेक कुलकर्णी, उर्बने लक्झरी वेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड, मुंबईचे संचालक, श्री. विजय दर्डा, लोकमत मीडिया ग्रुप, नवी दिल्ली चे अध्यक्ष, श्री. रॉन रॉय नाग, मुख्य कार्यकारी अधिकारी, द फिल्मी मोनक्स, मुंबई , सुश्री श्वेता पोवार, डायरेक्टर, एरिया कम्युनिकेशन्स यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
या संदर्भात लिबरल आर्ट, फाइन ऑर्ट, मीडिया अ‍ॅण्ड जर्नालिझम स्कूलच्या अधिष्ठाता प्रा.डॉ. अनुराधा पराशर यांनी सांगितले की, देशातील  पत्रकार व पत्रकारितेतील विद्यार्थी या राष्ट्रीय परिषदेत सहभागी होतील. ही राष्ट्रीय परिषद जास्तीत जास्त यशस्वी होण्यासाठी माध्यम व पत्रकारितेतील जाणकार व्यक्तींनी आपला मौलिक सहभाग नोंदवून ह्या राष्ट्रीय परिषदेच्या आयोजनाचा विधायक उद्देश सफल करावा असे आवाहन प्रमुख संयोजकांनी केले आहे.
ही ऑनलाईन परिषद  www.mitwpu-ncmj.com या संकेतस्थळावर होणार आहे.

‘सूर्यदत्ता’ देणार १०० विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

0

पुणे : “सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने उच्च शिक्षणासाठी (पदव्युत्तर अभ्यासक्रम) १०० विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित एमएस्सी (संगणकशास्त्र), एमकॉम, एमबीए, अखिल तंत्रशिक्षण महामंडळ संलग्नित पीजीडीएम आणि मास्टर इन फाईन आर्टस् व पदव्युत्तर डिप्लोमा (अर्धवेळ) या पाच अभ्यासक्रमांना प्रत्येकी २० याप्रमाणे १०० विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळणार आहे, कोरोना संसर्गामुळे ओढवलेल्या आर्थिक संकटात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, त्यांचे वर्ष वाया जाऊ नये, म्हणून सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या एज्यु-सोशियो कनेक्ट & सीएसआर इनिशिएटिव्ह’ अंतर्गत ही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. ३० सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांनी अर्ज करायचा आहे,” अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी ‘सूर्यदत्ता’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. डॉ. शैलेश कासांडे, कार्यकारी संचालक प्रा. सुनील धाडीवाल, प्राचार्य अजित शिंदे, विभागप्रमुख मंदार दिवाने आदी उपस्थित होते.
प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन लागले. त्याचा मोठा आर्थिक फटका सर्वच स्तरातील लोकांना बसला. शिक्षण क्षेत्रावर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. आर्थिक संकट ओढावल्याने अनेकांनी यंदाच्या वर्षाकरिता उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेण्याचे टाळण्याचा विचार करत आहेत. शिकण्याची इच्छा असूनही केवळ आर्थिक परिस्थितीमुळे त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, या विचारातून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून ही शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय आम्ही संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला. एमएस्सी (संगणकशास्त्र), एमकॉम, एमबीए, पीजीडीएम आणि मास्टर इन फाईन आर्टस्, पदव्युत्तर डिप्लोमा (अर्धवेळ) हे सगळे अभ्यासक्रम व्यवसायाभिमुख आणि रोजगाराभिमुख आहेत. त्यामुळे हे अभ्यासक्रम पूर्ण करून विद्यार्थी चांगली नोकरी मिळवू शकतात किंवा स्वतःचा व्यवसाय उभारू शकतात. आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊन विद्यार्थी व पालकामध्ये नैराश्याची भावना येऊ नये, हाही यामागील उद्देश आहे. सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट दर्जेदार, संशोधनात्मक शिक्षण, सर्वांगीण विकास आणि तज्ज्ञ व्यवस्थापन असलेली शिक्षण संस्था म्हणून ओळखली जाते. सोबतच सामाजिक जागरूकता जपत विविध उपक्रम संस्थेत राबवले जातात.”
“या अभ्यासक्रमांचे शुल्क साधारणपणे ३० हजार ते २.५० लाख इतके आहे. १०० विद्यार्थ्यांचे एकत्रित शुल्क साधारणपणे एक ते दीड कोटी इतके असणार आहे. या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम झालेल्या नोकरदारांच्या मुलांसाठी, नोकरी गेलेल्यांच्या मुलांकरिता, हमाल पंचायत, स्वच्छ संस्था, बांधकाम मजूर, अल्प उत्त्पन्न गटातील नागरिकांच्या मुलांना या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल. यासह कोरोनामध्ये फ्रंटलाईनवर काम करणारे सर्व कोरोना वॉरियर्सची मुले, डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस, शहीद जवान यांची मुले, अनाथ मुलांसह आर्थिक मागास वर्गातील कोणत्याही मुलाला या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल. विद्यार्थी सहायक समिती, पुणे विद्यार्थी गृह, पुणे श्रमिक पत्रकार संघ, जनसेवा फाउंडेशन, लीला पुनावाला फाउंडेशन यांसारख्या संस्थांकडून आलेल्या शिफारशींचा विचार शिष्यवृत्तीसाठी केला जाणार आहे. समाजातील विविध संस्थांना अशा गरजू विद्यार्थ्यांना आमच्यापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन करत आहोत.” असेही डॉ. संजय चोरडिया यांनी सांगितले.
प्रा. डॉ. शैलेश कासंडे म्हणाले, “या शिष्यवृत्ती योजनेत अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२० अशी आहे. विविध संस्थांकडून आलेल्या, तसेच ऑनलाईन स्वरूपात आलेल्या अर्जाची तज्ज्ञ समितीकडून छाननी करून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. अधिक माहिती व नमुना अर्ज www.suryadatta.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ८९५६९३२४००/ ९७६३२६६८२९ यावर संपर्क साधावा.”
——————————-पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मुलाचाशैक्षणिक खर्च ‘सूर्यदत्ता’ करणार

पत्रकार पांडुरंग रायकर यांचे कोरोनामुळे नुकतेच दुर्दैवी निधन झाले. त्यांना चार वर्षाचा मुलगा व अडीच वर्षांची मुलगी आहे. त्यांच्या मुलाचा दहावीपर्यंच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने केला जाणार आहे. तो मुलगा जिथे शिकेल, ज्या शाळेत शिकेल तिथला संपूर्ण खर्च सूर्यदत्ता करणार असल्याचे डॉ. संजय चोरडिया म्हणाले. त्याचबरोबर पत्रकारांच्या मुलांना ही शिष्यवृत्ती मिळणार असून, त्यासाठी पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षांची शिफारस घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या78 हजार 690

0

पुणे विभागातील 2 लाख 70 हजार 733 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले,
विभागात कोरोना बाधित 3 लाख 58 हजार 705 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे,दि.18 :- पुणे विभागातील 2 लाख 70 हजार 733 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 3 लाख 58 हजार 705 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या78 हजार 690 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 9 हजार 282 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.59 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 75.48 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 40 हजार 423 रुग्णांपैकी 1 लाख 92 हजार 771 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 42 हजार 312 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 340 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.22 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 80.18 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण27 हजार 363 रुग्णांपैकी 17 हजार 777 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 803 आहे. कोरोनाबाधित एकूण 783 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 27 हजार 21 रुग्णांपैकी 18 हजार 632 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 396 आहे. कोरोनाबाधित एकूण 993 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 26 हजार 681 रुग्णांपैकी 16 हजार 191 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 486 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 37 हजार 217 रुग्णांपैकी 25 हजार 362 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 10 हजार 693 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 162 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 7 हजार 859 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात4 हजार 571, सातारा जिल्ह्यात 915, सोलापूर जिल्ह्यात 631, सांगली जिल्ह्यात 1 हजार 28 तर कोल्हापूर जिल्ह्यात 714 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 15 लाख 73 हजार 157 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 3 लाख 58 हजार 705 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.


( टिप :- दि. 17 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

रुग्णालयांसाठी ऑक्सिजन पुरवठ्याचे काळजीपूर्वक नियोज\

0

कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या विचारात घेत उपाययोजना राबवा –

पुणे,दि. 18 : ‘कोरोना’च्या संकट काळात रुग्णांना उपचारासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजनचा पुरवठा अखंडितपणे सुरू राहावा, त्यात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, याची खबरदारी घेण्याच्या सूचना देत ‘कोरोना’बाधित रुग्णांची वाढती संख्या विचारात घेत उपाययोजना राबविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले. ‘कोरोना’ संसर्ग रोखण्यासाठी तसेच ‘कोरोना’बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठीच्या उपाययोजनांमध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
विधानभवन सभागृहात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरातील कोरोना परिस्थितीचा आणि उपाययोजनांचा आढावा घेतला. बैठकीला राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम वगळून) मृद व जलसंधारण, पदुम, वने, सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, डॉ. सुभाष साळुंखे, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम सुरु केली आहे. ‘कोरोना’ला हरविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, स्वयंसेवी संस्था, शासकीय यंत्रणा आणि नागरिक यांचा या मोहिमेतील सहभाग महत्त्वाचा असून या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट असून मोहिमेच्या अंमलबजावणीमुळे लवकर निदान होऊन रुग्णांना वेळेवर उपचार मिळू शकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘कोरोना’च्या संकट काळात रुग्णांना उपचारासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजनचा पुरवठा अखंडितपणे सुरू राहावा व कुठलीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने अत्यंत काळजीपूर्वक नियोजन करावे, कोरोना उपाययोजनांची प्रत्येक माहिती लोकप्रतिनिधींसह रुग्ण व सर्वसामान्यांना मिळण्यासाठी संगणकीय प्रणालीमध्ये अद्ययावत नोंदी करण्याबरोबरच बेड उपलब्ध करुन देण्याचे नियोजन जबाबदारीपूर्वक करावे, अशा सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या.
महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत रुग्णांसाठी ऑक्सिजन बेड वाढविणे गरजेचे आहे. जम्बो रुग्णालयातही बेड वाढविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियानाचा तपशील व पुढील नियोजन, सामाजिक कृतिशील समूह समिती, ऑक्सीजन पुरवठा नियोजन, बेड उपलब्धता, पुणे जिल्हयाची अनुमानित रुग्णसंख्येचा तपशील, अनुमानित बेड संख्येचा तपशील, आवश्यक असणा-या बेडसाठी प्रस्तावित उपाययोजना, व्हेंटीलेटर उपलब्धता आदी उपाययोजनांची माहिती दिली.
जमाबंदी आयुक्त तथा ससूनचे समन्वय अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी ससून रुग्णांलयातील व्यवस्थापन व उपचार पध्दतीची माहिती दिली.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आयुष प्रसाद तसेच उपस्थित प्रमुख अधिकाऱ्यांनी कोरोना नियंत्रणासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

निकृष्ट दर्जाचे अन्नधान्य वितरित करणाऱ्या दुकानदारांविरुद्ध कडक कारवाई – अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

0

मुंबई, दि. १८ –   मुंबई व ठाणे शिधावाटप यंत्रणेतील अधिकृत शिधावाटप दुकानांतून सर्वसाधारण दर्जाचे अन्नधान्य वितरित करण्याबाबत वारंवार सूचना देण्यात आल्या आहेत. असे असताना सुद्धा काही अधिकृत शिधावाटप दुकानांतून निकृष्ट दर्जाच्या अन्नधान्याचे वितरण करण्यात येत असल्याबाबतच्या तक्रारी काही स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध होत असल्याची दखल अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी घेऊन यासंदर्भात कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

त्या अनुषंगाने दक्षता पथकामार्फत या दुकानाची अन्नधान्याच्या दर्जाबाबतची तसेच इतर बाबींची संपूर्ण तपासणी केली असता आढळून आलेल्या त्रुटीसंदर्भात जीवनावश्यक वस्तु कायदा, 1955 अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे.

अधिकृत शिधावाटप दकान क्र. 42 ग/298 या दुकानाच्या संपूर्ण तपासणीनंतर तपासणीत अनुक्रमे 514 किलो तांदूळ, 2838 किलो गहू, तूरडाळ 116 किलो आणि चणाडाळ 112 किलो या शिधावस्तूंचा साठा जप्त करण्यात आला.  गुन्ह्यामध्ये एकूण रुपये 1,04,287/- इतक्या रकमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून मालवणी पोलिस स्टेशन, मुंबई येथे गुन्हा नोंद क्र. 121/2020 अन्वये दि. 16/9/2020 रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

अधिकृत शिधावाटप दुकान क्र. 34 ई /108 या दुकानाच्या संपूर्ण तपासणी नंतर तपासणीत अनुक्रमे 487 किलो तांदूळ, 09 किलो गहू आणि चणाडाळ 04 किलो या शिधावस्तूंचा साठा जप्त करण्यात आला.  गुन्हृयामध्ये एकूण रुपये 18,672.05/- इतक्या रकमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून घाटकोपर पोलिस स्टेशन, मुंबई येथे गुन्हा नोंद क्र. 75/2020 अन्वये दि. 11/09/2020 रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  तसेच याप्रकरणी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे.

याद्वारे सर्व जनतेस आवाहन करण्यात येते की, कोणीही अधिकृत शिधावाटप दुकानांतून निकृष्ट दर्जाचे अन्न वितरीत करण्याचा प्रयत्न करीत असल्यास कार्यालयाच्या हेल्पलाईन क्र. 022-22852814 तसेच ई-मेल आयडी dycor.ho-mum@gov.in यावर संपर्क साधावा जेणेकरुन अशा अधिकृत शिधावाटप दुकानदारांविरुद्ध कारवाई करणे शक्य होईल. असे नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

“वैभवशाली परंपरा असलेल्या राज्यसभेचे पीठासीन म्हणून कामकाज पाहण्याची संधी मिळणं हे माझे भाग्य” – खासदार वंदना चव्हाण

0

राज्यसभेच्या उपसभापतींच्या पॅनेल मध्ये निवड झाल्यानंतर आज शुक्रवारी देशातील सर्वोच्च सभागृहाचे पीठासीन म्हणून कामकाज करण्याची संधी खासदार वंदना चव्हाण यांना प्रथमच मिळाली. सभापतींच्या खुर्चीत विराजमान होताना सभागृहातील सदस्यांनी बाके वाजवून त्यांचे स्वागत केले. 

राज्यसभेचे कामकाज शुक्रवारी सकाळी नऊ वाजता सुरू झाले. साडेदहाच्या सुमारास चव्हाण पीठासीन अधिकारी म्हणून विराजमान झाल्या, सभागृहात चालू असलेल्या चर्चेदरम्यान त्या येताच सभागृहातील सदस्यांनी बाके वाजवून त्यांचे स्वागत केले. त्यानंतर काही वेळ चव्हाण यांनी सभागृहाचे कामकाज बघितले.

देशाचे उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती मा. श्री. व्यैंकय्या नायडू यांनी जुलै महिन्यात उपसभापती यांच्या पॅनेल मध्ये नविन सहा सदस्यांची निवड केली होती. सर्व सदस्य वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे प्रतिनिधीत्त्व सभागृहात करतात. सभागृहातील कामगिरी, अनुभव आणि ज्येष्ठता या निकषांवर सहा सदस्यांची निवड सभापती करतात आणि यावर्षीच्या पॅनेल मध्ये खासदार वंदना चव्हाण यांचा समावेश यामध्ये करण्यात आला. 

“भारतीय लोकशाही चा गाभारा असलेल्या राज्यसभेच्या सभागृहात अनेक महान नेत्यांनी आपले योगदान दिले आहे. गेली ८ वर्षे देशाच्या या सर्वोच्च सभागृहात सदस्य म्हणून काम करत आहे. मार्गदर्शक व नेते आदरणीय शरद पवार साहेबांनी राज्यसभेवर जाण्याची संधी दिली. 

सभागृहात अनेक महत्वांच्या विधेयकांवरील चर्चांमध्ये सहभागी झाले, यावेळी मी केलेल्या काही सूचनांचा समावेश संबंधित विधेयकांत झाला याचा विशेष आनंद आहे. तर विविध घटकांचे प्रश्न सभागृहात मांडता आले आणि यामुळे काही अंशी का होईना त्यांना न्याय देता आला याचे समाधान आहे. त्याचसोबत संसदीय समितींच्या मार्फत प्रतिनीधीत्व करत असताना नानाविविध विषयांचे आकलन झाले, विधायक निर्णय प्रक्रियेत सहभागी होता आले. या सर्वांची परिणीती म्हणजे सतत सभागृहात कार्यमग्न राहाता आले. 

आता सभागृहात पीठासीन म्हणून अधिकची जबाबदारी यानिमित्ताने मला पार पाडावी लागणार आहे याची कल्पना आहे; “वैभवशाली परंपरा असलेल्या राज्यसभेचे पीठासीन म्हणून कामकाज पाहण्याची संधी मिळणं हे मी माझे भाग्य समजते. सभागृहाच्या या महान परंपरेचे वैभव व गरिमा अबाधित ठेवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल” अशी भावना खासदार वंदना चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली.

वाय-फाय आणि घरून काम यामुळे पुणेकर होत आहेत तणावग्रस्त

0

कोविड-१९ वैश्विक महामारीमुळे फक्त उद्योगधंद्यांनाच खीळ बसली असे नव्हे तर आपल्या सर्वांच्या वस्तू वापराच्या पद्धती आणि आपल्या जगण्याच्या पद्धतीवरही याचा परिणाम झाला आहे.  या विषाणूने आपल्याला घरून काम करायला भाग पाडले आणि ऑनलाईन शिक्षण आता नवी सर्वसामान्य प्रणाली बनले आहे. साहजिकच सगळ्यांचाच स्क्रीनसमोर घालवला जाणारा वेळ लक्षणीय प्रमाणात वाढला आहे, शारीरिक हालचाली कमी झाल्या त्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर प्रचंड परिणाम होऊ लागला आहे.  इतक्या वर्षांचे ठरलेले दिनक्रम पूर्णपणे बदलले आणि आता लोकांना घरून काम व घरातील काम अशी तारेवरची कसरत करावी लागत आहे.  लॉकडाउन सुरु झाल्यापासून एका आठवड्याच्या आत मानसिक आरोग्यासंदर्भात नोंद करण्यात आलेल्या केसेसची संख्या २०% नी वाढली. [1]   

टाटा सॉल्ट लाईटतर्फे करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात असे निदर्शनास आले की पुणेकरांच्या बाबतीत राग आणि तणाव निर्माण होण्यामागील सर्वात पहिल्या कारणांमध्ये कामाशी आणि तंत्रज्ञानाशी संबंधित समस्यांचा समावेश होता.  सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी जवळपास ९४% व्यक्तींनी असे मान्य केले की जर त्यांना त्यांच्या सुट्टीच्या दिवशी काम दिले गेले किंवा शुक्रवारी एखाद्या तातडीच्या कामासाठी उशिरापर्यंत काम करण्यास सांगितले गेले तर त्यांना खूप राग येईल, त्यांच्याकडून कामात चुका होतील किंवा वरिष्ठांसोबत वादावादी देखील होईल.

सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी जवळपास अर्ध्या व्यक्तींनी (५०%) असे सांगितले की त्यांचे वाय-फाय कनेक्शन किंवा इंटरनेट अचानक बंद पडले तर त्यांना राग आणि वैताग येईल तर दर पाचपैकी तीन (६२%) व्यक्तींनी मान्य केले की त्यांचा फोन चार्ज होत असताना कोणी तो अनप्लग केला तर त्यांना खूप राग येईल.

शांत आणि सकारात्मक कसे राहता येईल याबद्दल आरोग्यदायक टिप्स सांगताना टाटा न्यूट्रीकॉर्नरच्या न्युट्रीशन एक्स्पर्ट श्रीमती कविता देवगण यांनी प्रामुख्याने सांगितले, “जेवणाच्या वेळी कुटुंबियांसमवेत जेवणे हे एवढेच एक काम करा आणि आरोग्यदायक आहार घ्या.  तुमच्या दररोजच्या जेवणात सहा धान्यांपासून बनवलेली खिचडी, अनेक कडधान्यांपासून बनवलेले धिरडे किंवा घावन, कमी तेल शोषून घेणारे बेसन, लाल तांदुळाचे पोहे अशा पारंपरिक भारतीय पदार्थांचा समावेश आवर्जून करा.  आपल्या जीवनशैलीमध्ये आरोग्याला लाभदायक ठरतील असे बदल करा.  घरून काम करताना मध्ये-मध्ये जागेवरून उठणे, दर तासाला थोडेफार चालणे हे नक्की करा.  रेस्टोरंट्समधून खाणे मागवण्यापेक्षा घरी बनवलेले भारतीय पारंपरिक खाद्यपदार्थ खा.  घरी करता येईल असा एखादा व्यायाम प्रकार करा आणि दर रात्री सहा ते आठ तास शांत झोपा.”   

आरोग्याला अपायकारक खाणे, तणाव, बैठे काम यामुळे हृदयविकार, काही प्रकारचे कर्करोग आणि मधुमेह यासारखे आहाराशी संबंधित असंसर्गजन्य (नॉन-कम्युनिकेबल) आजार होऊ शकतात.  जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार आरोग्याला अपायकारक आहार आणि अपुरे पोषण या जगभरात असंसर्गजन्य आजारांना कारणीभूत ठरत असलेल्या सर्वात गंभीर बाबी आहेत.

टाटा कन्ज्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (टीसीपीएल)

टाटा समूहाची खाद्य आणि पेय उत्पादने एकाच छत्राखाली आणणारी टाटा कन्ज्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड ही ग्राहकोपयोगी उत्पादनांवर लक्ष केंद्रित करून वाटचाल करत असलेली कंपनी आहे.  या कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये चहा, कॉफी, पाणी, मीठ, कडधान्ये, मसाले आणि रेडी-टू-इट खाद्यपदार्थ आहेत. टाटा कन्ज्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड ही जगातील दुसरी सर्वात मोठी ब्रँडेड टी कंपनी आहे.  त्यांच्या महत्त्वाच्या बेव्हरेजेस ब्रॅंड्समध्ये टाटा टी, टेटले, एट ओ क्लॉक कॉफी, टाटा कॉफी ग्रँड आणि हिमालयन नॅचरल मिनरल वॉटर यांचा समावेश आहे.  त्यांच्या खाद्यपदार्थांच्या उत्पादनांच्या पोर्टफोलिओमध्ये टाटा सॉल्ट आणि टाटा संपन्न यांचा समावेश आहे.  भारतात टाटा कन्ज्युमर प्रॉडक्ट्स २०० मिलियनपेक्षा जास्त कुटुंबांमध्ये पोहोचली असून त्यामुळे ग्राहकोपयोगी उत्पादनांमध्ये टाटा ब्रँडचा लाभ घेण्याची अतुलनीय क्षमता कंपनीला मिळाली आहे.  वार्षिक ~१०,००० कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल असलेल्या या कंपनीमध्ये ब्रँडेड बिझनेसमध्ये २२०० पेक्षा जास्त कर्मचारी आहेत.

ज्युनिअर फ्रेंच ओपन 2020(रोलँगॅरोस)स्पर्धेत पुण्याची वैष्णवी आडकर भारताचे प्रतिनिधित्व करणार

0

पॅरिस येथे रंगणार रोलँगॅरोस वाईल्डकार्ड स्पर्धा
पुणे, 18 सप्टेंबर: ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत खेळणे हे जगातील प्रत्येक टेनिसपटूचे स्वप्न असते. पुण्याच्या वैष्णवी आडकरसाठी येत्या 2ऑक्टोबरपासून पॅरिस येथे रंगणाऱ्या ज्युनिअर फ्रेंच ओपन 2020(रोलँगॅरोस)वाईल्ड कार्ड स्पर्धेत खेळणे ही अशीच एक स्वप्नपूर्ती असेल. ही स्पर्धा पॅरिस येथे येत्या 2 ऑक्टोबर पासून रंगणार आहे
वयाच्या सहाव्या वर्षी टेनिसमध्ये पाऊल ठेवणाऱ्या वैष्णवी आडकर हिने स्थानिक पातळीवर तसेच, राज्य, राष्ट्रीय स्तरावर आपली प्रगती कायम राखली. यंदा होणाऱ्या फ्रेंच ओपन ज्युनिअर वाईल्ड कार्ड स्पर्धेसाठी तिची निवड होणे हा योगायोग नव्हता. दिल्लीत झालेल्या रोलँगॅरोस ज्युनिअर 2020(18 वर्षाखालील) स्पर्धेत विजेतेपद पटकावून तिने हा मान मिळविला. या स्पर्धेतील विजयामुळे फ्रेंच ओपन ज्युनियर मुख्य ड्रॉ स्पर्धेत तिचे स्थान निश्चित होईल. 
कोरोना महामारीमुळे टेनिसच्या संपुर्ण मौसमावरपरिणाम झाला असताना फ्रेंच ओपन स्पर्धेसाठीचे आयोजन आणि त्यासाठी आपली निवड होणे ही केवळ 16 वर्षीय वैष्णवी साठी सुवर्णसंधीच ठरली आहे. वैष्णवी आडकर ही अभिनव विद्यालय इंग्लिश मिडीयम हायस्कूलची विद्यर्थिनी असून बाऊन्स टेनिस अकादमीत पुण्यातील गुणवान प्रशिक्षक केदार शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. 
आज पार पडलेल्या एक विशेष कार्यक्रमात बाऊन्स टेनिस अकादमी आणि अखिल भारतीय टेनिस संघटनेचे नवनिर्वाचित सहसचिव सुंदर अय्यर यांच्या हस्ते वैष्णवी आडकरचा खास गौरव करण्यात आला.   

यावेळी बोलताना 16 वर्षाखालील गटातील भारताची अव्व्ल क्रमांकाची टेनिसपटू आणि आयटीएफ क्रमवारीत सध्या 675स्थानावर असलेल्या वैष्णवी आडकर हिने सांगितले की, रोलँगॅरोस स्पर्धेतील टेनिस कोर्टवर खेळण्यास मी उत्सुक असून आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे माझे बालपणापासून बाळगलेले एक स्वप्न आता पूर्ण होत आहे. तसेच, खेळाबरोबरच तंदरुस्तीकडे खास लक्ष देत असल्याचे सांगून ती म्हणाली की, आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करण्यासाठी तंदरुस्तीला पर्याय नाही.
आपल्या टेनिस खेळात झालेल्या प्रगतीबद्दल वैष्णवी हिने आपले प्रशिक्षक केदार शहा यांचे आभार व्यक्त करताना ती म्हणाली की, माझ्या चुका आणि कच्चे दुवे काढून टाकणे आणि माझ्या बलस्थानांवर लक्ष्य केंद्रित करणे यासाठी केदार शहा सर मला नेहमीच मदत करतात. प्रत्यक्ष सामन्यात विजय मिळविण्यासाठी त्यांचा मला उपयोग होतो.   
माझ्या अभिनव विद्यालय इंग्लिश मिडीयम हायस्कूल या शाळेने सैदव मला प्रोत्साहन व पाठिंबा दिला आहे. यामुळे अभ्यास आणि खेळ यांचा योग्य समन्वय साधण्यास मला फार मदत झाली. तसेच, माझ्या या वाटचालीत माझे कुटुंबीय आणि सर्व प्रशिक्षक यांचा मोलाचा वाटा आहे. प्रशिक्षक केदार शहा, अनिकेत वाकणकर आणि मंदार वाकणकर(पहिले प्रशिक्षक)यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केले आणि एक चांगला खेळाडू होण्यासाठी नेहमीच प्रोत्साहित केले. त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय मी टेनिस खेळूच शकले नसते असे मला वाटते. 

टेनिसमधील वैष्णवीची वाटचाल उत्तम प्रकारे चालू असल्याचे सांगून प्रशिक्षक केदार शहा म्हणाले की, तिचा खेळ पहिल्यापासून आक्रमक आहे. तिचे फटके ओघवते असतात आणि ती चेंडू जोरदार फाटकावते. 12 वर्षापर्यंत तिची वाटचाल अपेक्षित प्रकारे नसली तरी वयाबरोबर ती अधिक प्रगल्भ होत जाईल आणि वरच्या स्तरावर अधिक चांगली कामगिरी करू शकेल. आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांच्या टेनिसमध्ये ताकदवान फटके आणि उत्तम तंदरुसती हे यशासाठी आवश्यक घटक असून उच्च दर्जाची तंदरुस्ती राखता आल्यास वैष्णवीला त्या स्तरावर यश मिळू शकेल. 

फ्रेंच ओपनसाठी तिची तयारी चांगल्या प्रकारे सुरूअसल्याचे सांगून शहा पुढे म्हणाले की, आम्ही तिच्या तंदरुस्तीवर विशेष लक्ष दिले आहे. तसेच, क्ले कोर्टवर अधिक सराव करण्यावर भर दिला आहे. कोविड19 मुळे स्पर्धा होत नसल्याने प्रत्यक्ष सामने खेळण्याची तिची तयारी मात्र पुरेशी झालेली नाही. तरीही अतिशय आक्रमक  शैलीमुळे वैष्णवीला फ्रेंच ओपनमध्ये चांगली संधी आहे. मात्र त्यासाठी तिने दडपणाखाली चंगली कामगिरी करण्याची गरज आहे. 
बाऊन्स टेनिस अकादमी ही केदार शहा या च्या बाऊन्स स्पोर्ट्स अकादमीचाच एक भाग असून या ठिकाणी ज्युनिअर खेळाडूंप्रमाणेच प्रौढ खेळाडूंसाठीही प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला जातो. असे सांगून ते म्हणाले की, या अकादमीत गेल्या सात वर्षात 6 राष्ट्रीय विजेते तयार झाले आहेत. तसेच, असंख्य आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे टेनिसपटूही या अकादमीने दिले आहेत. अनुभवी प्रशिक्षक अनिकेत वाकणकर यांचा बाऊन्स टेनिस अकादमीच्या यशस्वी वाटचालीत आणि प्रशिक्षण कार्यक्रमात नेहमीच मोलाचा वाटा असतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर टेनिसमध्ये उज्वल भवितव्य असणाऱ्या खेळाडूंमध्ये सिद्धांत बांठिया, ईश्वरी माथेरे, सालसा आहेर, अर्जुन गोहड, शिवानी इंगळे, आस्मि आडकर, देवांशी प्रभुदेसाई, कायरा चेतनानी, अमोघ दामले यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.  

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बिबवेवाडी राज्य बीमा निगम रुग्णालय अधिग्रहित-जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

0

पुणे दि.18:- कर्मचारी राज्य बीमा निगम अस्पताल (इएसआयसी), बिबवेवाडी पुणे या ठिकाणचे कोविड केअर सेंटर (सीसीसी) स्थापन केलेले आहे. कोविड -19 च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या रुग्णालयाचे समर्पित कोविड आरोग्य केंद्र (डीसीएचसी) मध्ये रुपांतर करण्याकरीता हे रुग्णालय सर्व मनुष्यबळ व सुविधांसह कोविड-19 चे कालावधीपुरते अधिग्रहण करून जिल्हा परिषद पुणे यांचेकडे वर्ग करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

            आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे व त्यातील पोट कलम 2 (अ) नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हे उक्त प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दिनांक 13 मार्च, 2020 पासून लागु करुन खंड 2, 3,4 मधील तरतुदीची अंमलबजावणीसाठी अधिसूचना निर्गमित केलेली आहे.

            कोविड -19 च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या रुग्णालयाचे समर्पित कोविड आरोग्य केंद्र (डीसीएचसी) मध्ये रुपांतर करण्याकरीता कर्मचारी राज्य बीमा निगम अस्पताल (इसीआयसी), बिबवेवाडी पुणे या ठिकाणचे कोविड केअर सेंटर (सीसीसी) रुग्णालय सर्व मनुष्यबळ व सुविधांसह कोविड-19 चे कालावधीपुरते मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे यांच्याकडे अधिग्रहीत करून वर्ग करण्यात येत आहे.

            अटी व शर्ती पुढीलप्रमाणे : रुग्णालय हे श्रम एवं रोजगार मंत्रालय, भारत सरकार संलग्ण केंद्रिय महामंडळाचे नियंत्रणाखाली असलेला बाह्य रुग्ण विभाग तात्पुरत्या स्वरुपात जिल्हा परिषद पुणे यांच्या नियंत्रणाखाली देण्यात येत आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक संभाजी लांगोरे यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. रुग्णालयामध्ये जिल्हा परिषदेमार्फत कोविड केअर सेंटर (सीसीसी) सुरू करण्यात आलेले आहे. हया रुग्णालयातील उपलब्ध 50 बेडस् पैकी 36 बेडस् करीता ऑक्सिजन पाईपलाईन उपलब्ध आहे. उर्वरित बेडस् करीता ऑक्सिजन सुविधा निर्माण करण्याकरीता ऑक्सिजन सिलींडर्सचा पुरवठा उपलब्ध करून घेण्यात यावा. या ठिकाणी समर्पित कोविड आरोग्य केंद्र (डीसीएचसी) सुरू करण्याकरीता ऑक्सिजन सिलींडर्स, व्यतिरिक्त एक्स-रे मशीन, इसीजी मशीन, अॅम्बुलन्स, टेक्नीशीयन, आवश्यक ते प्रमाणे डॉक्टर (एमडी आणि एमबीबीएस) इत्यादी सुविधा साथरोग संपल्यानंतर माघारी घेण्याच्या अधिन राहून एनएचएम मधून उपलब्ध करून देण्यात याव्यात. या डीसीएचसी मध्ये अनुभवी वैद्यकिय अधिक्षक/वैद्यकिय अधिकारी यांच्या नेमणूका करून कामकाज सुरळीत करावे.

            या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी  तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेश देशमुख यांनी आदेशीत केले आहे.

                                      

मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कर्ज चक्रव्युहामधून महिलांना बाहेर काढण्यासाठी राज्यस्तरिय अभ्यासगट नियुक्त

0

महिलांचे आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासगट उपाययोजना सुचविणार

मुंबई, दि. १८ : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थांच्या (मायक्रो फ़ायनान्स कंपन्यांच्या) कर्ज चक्रव्युहामध्ये अडकलेल्या महिलांना त्यामधून बाहेर काढणे तसेच महिलांचे आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी उपाययोजना सुचविण्याकरिता एक राज्यस्तरिय अभ्यासगट नियुक्त करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. हा अभ्यासगट पुढील तीन महिन्यात अभ्यास करुन किमान अंतरिम अहवाल सादर करेल. यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आल्याचे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, राज्यात ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता गटातील महिलांना बॅकेकडून कर्ज मिळण्यास अडचणी निर्माण होतात. त्यामुळे अनेक महिला सुक्ष्म वित्तपुरवठा करणाऱ्या संस्था (मायक्रो फ़ायनान्स कंपनी) यांच्याकडून कर्ज घेतात असे निदर्शनास आले आहे. वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थांच्या (मायक्रो फ़ायनान्स कंपन्यांच्या) कर्ज चक्रव्युहात या महिला हळहळू अडकत जातात व त्यामुळे त्यांच्या आयुष्यावर परिणाम होता. याबाबत अभ्यास करण्यासाठी तसेच महिलांचे आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी उपाययोजना सूचविण्यासाठी राज्यस्तरीय अभ्यासगट स्थापन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. या अभ्यासगटाच्या अध्यक्षपदी जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भंडारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुनेश्वरी एस., धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वनमती सी., रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखर या सदस्यपदी आहेत. तर लक्ष्य प्रतिष्ठान (अमरावती)च्या अध्यक्ष सुरेखा ठाकरे, राजगुरुनगर सहकारी बँकेच्या अध्यक्ष (राजगुरुनगर, जि. पुणे) विजयाताई शिंदे, लोकप्रतिष्ठान (उस्मानाबाद) च्या सचिव डॉ. स्मिता अभय शहापुरकर, स्वयंसिद्धाच्या (कोल्हापूर) संचालिका श्रीमती कांचन बाळकृष्ण परुळेकर या अशासकीय सदस्य आहेत. तर उमेद अभियानाच्या अतिरिक्त संचालक मानसी बोरकर ह्या या समितीच्या सदस्य सचिव आहेत.

राज्यातील महिलांना सुक्ष्म वित्तपुरवठा करणाऱ्या संस्था (मायक्रो फ़ायनान्स कंपन्या) या जादा व्याजाने  कर्ज देऊन त्यांना आपल्या चक्रव्युहात अडकवत आहेत. त्यामधून महिलांना बाहेर काढण्यासाठी तसेच महिलांचे आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी उपाययोजना सुचविण्याचा या अभ्यासगटाचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत निर्माण झालेल्या स्वयंसहाय्यता गटातील महिला ह्या सुक्ष्म वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थांचे (मायक्रो फ़ायनान्स कंपन्यांचे) कर्ज घेऊन त्यांच्या चक्रव्युहात अडकल्या आहेत किंवा कसे याचा सखोल अभ्यास करणे, सुक्ष्म वित्त पुरवठा करणाऱ्या संस्था (मायक्रो फ़ायनान्स कंपन्या) यांच्याकडून महिलांनी कर्ज घेण्याची कारणे, व्याजाचा दर, कर्ज वितरणाची पध्दती, कर्जाचा वापर, कर्ज वसुली पध्दत, कर्जवसुली वेळेवर न होण्याची कारणे व या सर्व बाबींचा ग्रामीण महिलांच्या आयुष्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणे, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची व्याप्ती, राज्यात अभियान कितपत यशस्वी झाले, अभियानांतर्गत निर्माण करण्यात आलेल्या स्वयंसहाय्यता गटांच्या उत्पादनास बाजारपेठ उपलब्ध होते किंवा कसे, विपणनाची पध्दत याबाबत अभ्यास करणे तसेच अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी काही सुधारणा आवश्यक असल्यास त्या सुचविणे यावरही समिती काम करणार आहे.

राज्यस्तरीय अभ्यासगट अध्यक्ष यांच्या निर्देशानुसार उपगट निर्माण करुन ते उपगट विविध जिल्ह्यांना भेटी देतील. राज्यातील महिलांशी चर्चा करुन त्यांच्या आर्थिक समस्या जाणून घेतील. महिला आर्थिक विकास महामंडळ यांचे अध्यक्ष व महासंचालक यांच्यासोबत चर्चा करुन त्याच्याकडील स्वयंसहाय्यता गटाची कार्यपध्दती, त्यांचे उत्पादने आणि त्यांचे विपणन याबाबत महिती घेतील. सदर अभ्यासगट हा फक्त महिलांच्या आर्थिक अडचणी, त्यावर उपाययोजना यासाठी असून मायक्रोफायनान्सच्या कर्जमाफीसाठी नाही, असे शासन निर्णयात म्हटले आहे.

लोकप्रतिनिधींशी चर्चा करुनच पुणे जिल्ह्यात ‘जमावबंदी आदेश’ लागू करण्याचा निर्णय घ्या -उपमुख्यमंत्री अजित पवार

0

 पुणे दि.18:  पुणे जिल्ह्यात ‘कोरोना’च्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात जमावबंदी आदेश लागू करण्याबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीसह दोन्ही महापौरांशी चर्चा करुन प्रशासनाने निर्णय घ्यावा, अशी सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिली.

      विधानभवन सभागृहात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागातील कोरोना परिस्थितीचा लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत आढावा घेतला. बैठकीला राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम वगळून) राज्यमंत्री दत्तात्रय भरणे,  विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (व्हिसीद्वारे),  पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, आमदार अशोक पवार, आमदार सुनिल शेळके, आमदार राहुल कुल, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतारे यांच्यासह विभागीय आयुक्त सौरभ राव, जमाबंदी आयुक्त तथा ससून रुग्णालयाचे समन्वय अधिकारी एस. चोक्कलिंगम, पुणे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश,  पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपमुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ बुटाला,  वैद्यकीय सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे  तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

           उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, शहरी भागासह ग्रामीण भागातील ‘कोरोना’चा रुग्णदर व मृत्यूदर कमी होणे गरजेचे असून यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात. ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासन पुरेसा निधी उपलब्ध करुन देईल. रुग्णांना वेळेत ऑक्सिजनयुक्त खाटा  व योग्य उपचार मिळवून देण्यासाठी संबंधित प्रशासकीय यंत्रणेने  गांभीर्याने काम करावे. ग्रामीण भागातील रुग्णांना त्याच भागात उपचार मिळवून देण्यासाठी ग्रामीण रुग्णालयांमध्ये पुरेशा आरोग्य सुविधा व वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करुन द्यावीत. येथील ऑक्सिजनयुक्त बेड व अन्य सोयी सुविधांसाठीची अपुरी कामे आरोग्य व सार्वजनिक बांधकाम विभागाने गतीने पूर्ण करुन घ्यावीत, अशी सूचना करुन नवीन बांधकाम पूर्ण झालेल्या नवनिर्मित ग्रामीण रुग्णालयांसाठी विशेष बाब म्हणून तात्काळ पदनिर्मिती करण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही  त्यांनी यावेळी दिली. जिल्ह्यात गृह सर्वेक्षणावर भर देवून ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिम प्रभावीपणे राबवावी. यात लोकप्रतिनिधींसह स्वयंसेवी संस्था व नागरिकांना सहभागी करुन घ्यावे, असेही त्यांनी सांगितले.

      राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले, जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयांमध्ये  कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक त्या सोयी सुविधा व साधन सामग्री उपलब्ध असल्याची खात्री जिल्हा शल्यचिकित्सक यांनी करावी. या भागातील रुग्णांच्या संख्येत वाढ होत असतांना गृह विलगीकरण करण्यात येणाऱ्यांचेही प्रमाण वाढत आहे. गृहविलगिकरण केलेल्या रुग्णांना दुरध्वनीव्दारे संपर्क साधून योग्य ते मार्गदर्शन करुन त्यांची माहिती अद्यावत ठेवावी. याबरोबरच औद्योगिक क्षेत्रातील व खाजगी प्रयोगशाळांमध्ये आढळून येणाऱ्या बाधित रुग्णांची माहिती अद्ययावत ठेवावी. जेणेकरुन संसर्ग रोखणे सोपे होईल.

        राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शहरी भागातील रुग्णालयांवर  ग्रामीण भागातील रुग्णांचा ताण वाढू नये यासाठी ग्रामीण भागातच पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. तसेच ऑक्सीजनयुक्त बेड, व्हेंन्टीलेटर व अन्य उपकरणे सुरळीत सुरु ठेवावीत.

    आशा वर्कर व अंगणवाडी सेविका ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ योजनेचे सर्वेक्षण करत आहेत. त्यांचे संरक्षण व इतर महत्त्वाचे प्रश्न सोडवण्याच्या सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केली.

            यावेळी आमदार अशोक पवार, आमदार सुनिल शेळके व आमदार राहुल कुल यांनी ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांना  वेळेत उपचार व्हावेत यासाठी प्रशासनाने उपाययोजना कराव्यात असे सांगून आवश्यक त्या सूचना केल्या.

      जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी शहरी भागासह ग्रामीण भागातील कोरोना परिस्थितीची माहिती दिली. जिल्ह्यातील  कोरोनाबाधित रुग्ण, अति जोखीम व कमी जोखीम नागरिक, कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांची संख्या तसेच रुग्णदर व मृत्युदराबाबत माहिती देवून ऑक्सिजन पुरवठा नियोजन व बेडची उपलब्धता तसेच उपाययोजनांची माहिती दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी(व्हिडीओ आणि फोटो पहा )

0

पुणे मेट्रोसाठी राज्य शासनाचे सर्वतोपरी सहकार्य
पुणे दि.18: उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुणे मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला. आज पहाटे सहा वाजता त्यांनी संत तुकाराम नगर स्टेशन येथे जावून प्रत्यक्ष कामाची पाहणी केली. मेट्रोच्या कामासाठी राज्य शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. मेट्रोच्या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.


उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे व पिंपरी-चिंचवड मेट्रोचा आढावा घेतला. यावेळी महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्यासह मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संत तुकाराम नगर ते पिंपरी (खराळवाडी) असा मेट्रोने त्यांनी प्रवास केला. पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास फुगेवाडी येथून पाहणी दौ-यांला प्रारंभ केला. यावेळी अजित पवार यांनी मेट्रो चालकाच्या केबिनमधून पाहणी केली व कामकाजाचा आढावा घेतला. ब्रिजेश दीक्षित यांनी सादरीकरणाव्दारे माहिती दिली. सिव्हील कोर्ट,नळस्टॉप,लाकडी पूल व स्वारगेट येथील कामाचीही त्यांनी पाहणी केली तसेच आधुनिक पदधतीने बोगदा खोदकाम करणा-या नवीन मशिनचेही मेट्रोकामासाठी लोकार्पण करण्यात आले. यावेळी मेट्रोचे गौतम बि-हाडे, श्रीमती सरला कुलकर्णी यांनी सुरू असलेल्या कामकाजाबाबत माहिती दिली. यावेळी मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पुण्यात अजितदादांचा पहाटे मेट्रो प्रवास (व्हिडीओ)

0

पुणे-कोरोना आहे म्हणून कामे बंद करून चालणार आहे काय ? शेखर गायकवाड यांनी तेव्हाच सांगितले होते कोरोना समवेत जगायला शिकावं लागेल आणि आता अखेर सारेच कोरोना समवेत कामाला हि लागलेले आहे . एकीकडे कोरोना का वाढतोय म्हणून सातत्याने अधिकाऱ्यांच्या मिटींगा घेणाऱ्या अजित पवारांनी आज चक्क पुण्यात पहाटे 6 वाजता मेट्रो ची भेट आयोजित केली अजित पवारांनी पहाटे पिंपरी-चिंचवड शहरात दाखल झाल्यानंतर मेट्रो संदर्भातील बैठक घेतली. यावेळी मेट्रोचे ब्रिजेश दीक्षित उपस्थित होते. बैठक झाल्यानंतर अजित पवार यांच्या गाड्यांचा ताफा संत तुकाराम नगर मेट्रो स्थानकाकडे वळाला. मेट्रोचे आढावा घेतल्यानंतर मेट्रोचे पहिले तिकीट हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आले. संत तुकाराम नगर ते पिंपरी (खराळवाडी) असा मेट्रोने त्यांनी प्रवास केला. यावेळी अजित पवार हे मेट्रो चालकाच्या केबिनमधून आढावा घेत होते, तर ब्रिजेश दीक्षित त्यांना मेट्रोबद्दल माहिती देत होते. पाहणी दौऱ्यात मोजके पोलीस अधिकारी आणि मेट्रो कर्मचारी उपस्थित होते. मेट्रो संदर्भात अजित पवार यांनी काही सूचना देखील केल्या .मेट्रोच्या रस्त्यातील काही झाडं काढली जाणार आहेत, त्यांचं पुनर्रोपण कसं केलं जाणार याचीही माहिती त्यांनी यावेळी घेतली. याचा एक व्हिडिओसमोर आला आहे.

व्यंकटेशम यांची बदली,अमिताभ गुप्ता पुण्याचे पोलीस आयुक्त

0

पुणे-पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणून अमिताभ गुप्ता यांची नियुक्ती आली आहे. रात्री उशिरा या बदल्यांचे आदेश गृहविभागाने काढले आहेत. डॉ. के. व्यंकटेशम यांची विशेष अभियान महाराष्ट्र राज्याच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पुणे शहराचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी ऑगस्ट २०१८ मध्ये सूत्रे हाती घेतली होती. तेव्हा पासून आजअखेर नागरिकांच्या  हिताच्या दृष्टीने अनेक उपक्रम राबवून, पोलीस आणि नागरिकांमध्ये संवाद वाढविण्याचे काम त्यांच्या या कार्यकाळात केले गेले आहे. तर आता डॉ. के. व्यंकटेशम यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांच्या जागी अमिताभ गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पुणे ग्रामीण अधीक्षक पदी अभिनव देशमुख

पुणे ग्रामीण अधीक्षक संदीप पाटील यांची गडचिरोली मध्ये बदली झाल्यावर त्यांच्या जागी कोण येणार अशी चर्चा सुरू असताना. आज कोल्हापूर पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांची पुणे ग्रामीण अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

 (सध्याचे पद व नव्या नियुक्तीचे ठिकाण)

विशेष पोलिस महानिरीक्षक-ब्रिजेशसिंह- बदली आदेशाधीन- विशेष पोलिस महानिरीक्षक प्रशासन मुंबई

मकरंद रानडे- बदली आदेशाधीन- गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे

मोहितकुमार गर्ग- अतिरिक्त पोलिस अधीक्षक गडचिरोली- पोलिस अधीक्षक रत्नागिरी

विक्रम देशमाने- पोलिस उपायुक्त एटीएस- ठाणे ग्रामीण

राजेंद्र दाभाडे- पोलिस उपायुक्त गुन्हे विभाग मुंबई- पोलिस अधीक्षक सिंधुदर्ग

सचिन पाटील- समादेशक, एसआरपी, गट 11- पोलिस अधीक्षक नाशिक

मनोज पाटील- पोलिस अधीक्षक सोलापूर- पोलिस अधीक्षक नगर

अभिनव देशमुख- पोलिस अधीक्षक कोल्हापूर- पोलिस अधीक्षक पुणे

दीक्षितकुमार गेडाम- पोलिस अधीक्षक सिंधुदर्ग- पोलिस अधीक्षक सांगली

शैलेश बलकवडे- पोलिस अधीक्षक गडचिरोली- पोलिस अधीक्षक कोल्हापूर

विनायक देशमुख- सहायक पोलिस महानिरीक्षक, मुंबई- पोलिस अधीक्षक जालना

राजा रामास्वामी- पोलिस उपायुक्त, गुप्तवार्ता- पोलिस अधीक्षक बीड

प्रमोद शेवाळे- पोलिस उपायुक्त ठाणे- पोलिस अधीक्षक नांदेड

निखील पिंगळे- समादेशक एसआरपी, नागपूर- पोलिस अधीक्षक लातूर

अंकित गोयल- पोलिस उपायुक्त, परिमंडळ 10 मुंबई- पोलिस अधीक्षक गडचिरोली

डी. के. पाटील- पोलिस अधीक्षक बुलढाणा- पोलिस अधीक्षक यवतमाळ

अरविंद चावरिया-एसीबी, औरंगाबाद- पोलिस अधीक्षक बुलढाणा

विश्वा पानसरे – पोलिस अधीक्षक रेल्वे नागपूर- पोलिस अधीक्षक गोंदिया

अरविंद साळवे- पोलिस अधीक्षक भंडारा- पोलिस अधीक्षक चंद्रपूर

वसंत जाधव- पोलिस उपायुक्त शीघ्र कृती गल, मुंबई- पोलिस अधीक्षक भंडारा

राकेश कलासागर- सीआयडी- पोलिस अधीक्षक हिंगोली

जयंत मीना- बदली आदेशाधीन- पोलिस अधीक्षक परभणी