Home Blog Page 2441

राहुल गांधींना धक्काबुक्की; काँग्रेसची निदर्शने

0

मुंबई: कॉंग्रेस नेते खा राहुल गांधी यांना धक्काबुक्कीचे महाराष्ट्रातही तीव्र पडसाद उमटले आहेत. या धक्काबुक्कीच्या निषेधार्थ काँग्रेसने मुंबईसह राज्यात जोरदार निदर्शने केली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी या घटनेवर संताप व्यक्त करत ठिकठिकाणी टायर जाळून जाळत यूपी सरकारचा निषेध नोंदवला आहे.

राहुल गांधी यांना धक्काबुक्की झाल्याचं कळताच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने मंत्रालयाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याखाली निदर्शने केली. यावेळी केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, माजी मंत्री नसीम खान, मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, आमदार झिशान सिद्दीकी आदीं सहभागी झाले होते.

यावेळी बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकार बरखास्त करून उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. हाथरस येथील घटनेला योगी सरकारच जबाबदार आहे. त्यामुळे हे सरकार बरखास्त केलं पाहिजे, असं सांगतानाच अत्याचार पीडित मुलीचा अंत्यविधी झाला नाही, तर उत्तर प्रदेश सरकारने त्या मुलीला जाळले आहे, असा संताप बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. तर, उत्तर प्रदेशात जंगल राज सुरू असून हे गेल्या काही दिवसांपासूनच्या घटनांवरून सिद्ध होत आहे. त्यामुळे योगी सरकार विनाविलंब बरखास्त केलं पाहिजे, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. राहुल गांधी यांनी कोणत्याही कायद्याचं उल्लंघन केलेलं नसताना त्यांना धक्काबुक्की होणं ही अत्यंत दुर्देवी घटना असल्याचंही चव्हाण यांनी म्हटलं आहे.

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या 71 हजार 513

0

पुणे विभागातील 3 लाख 53 हजार 197 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले,
विभागात कोरोना बाधित 4 लाख 36 हजार 219 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव


पुणे, दि.1 :- पुणे विभागातील 3 लाख 53 हजार 197 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 लाख 36 हजार 219 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 71 हजार 513 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 11 हजार 509 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.64 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 80.97 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 84 हजार 21 रुग्णांपैकी 2 लाख 38 हजार 412 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 39 हजार 191 आहे. कोरोनाबाधित एकूण 6 हजार 418 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.26 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 83.94 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 37 हजार 300 रुग्णांपैकी 27 हजार 458 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 702 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 140 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 33 हजार 489 रुग्णांपैकी 25 हजार 166 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 167 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 156 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 36 हजार 814 रुग्णांपैकी 28 हजार 97 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 363 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 354 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 44 हजार 595 रुग्णांपैकी 34 हजार 64 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 90 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 441 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 5 हजार 626 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 3 हजार 298, सातारा जिल्ह्यात 683, सोलापूर जिल्ह्यात 405, सांगली जिल्ह्यात 988 तर कोल्हापूर जिल्ह्यात 252 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
पुणे विभागामध्ये ब-या होणा-या रुग्णांमध्ये एकूण 5 हजार 713 रुग्णांचा समावेश आहे. यात पुणे जिल्हा 3 हजार 28, सातारा 385, सोलापूर 511, सांगली 1 हजार 22 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 767 अशा रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 19 लाख 14 हजार 122 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 4 लाख 36 हजार 219 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.


( टिप :- दि. 30 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

सिनेमागृहे, नाट्यगृहे सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

0

मुंबई दि. 1 : जवळपास सहा महिन्यांपासून राज्यातील सिनेमागृहे व नाट्यगृहे बंद आहेत. येणाऱ्या काळात सिनेमागृहे व नाट्यगृहे सुरु करताना नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल.  लॉकडाऊननंतर सिनेमागृहे उघडताना सिनेमागृहात प्रेक्षक येण्यासाठी हा काळ महत्त्वाचा आहे. राज्यातील सिनेमागृहे आणि नाट्यगृहे सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक असून याबाबत आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी थिएटर्स ओनर्सना चर्चेदरम्यान सांगितले.

सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मल्टिप्लेक्स स्क्रिन ओनर्स आणि सिंगल स्क्रीन ओनर्स, थिएटर ओनर्स, फिल्म स्टुडिओ ओनर्स असोसिएशनसमवेत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालिका मनिषा वर्मा, सह व्यवस्थापकीय संचालिका आंचल गोयल, सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात यांच्यासह मल्टिप्लेक्स, सिंगल स्क्रीन, थिएटर आणि फिल्म स्टुडिओचे ओनर्स उपस्थित होते.

सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. देशमुख म्हणाले, कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत राज्य शासनाने राज्यातील सिनेमागृहे (सिंगल स्क्रीन, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे, फिल्म स्टुडिओ) बंद करण्याचा निर्णय घेतला. सध्या राज्यात अनलॉक-5 चा टप्पा सुरु आहे. राज्य शासनाने जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक तत्वानुसार हॉटेल, रेस्टॉरंट, बार सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र सिनेमागृहे व नाट्यगृहे मात्र बंद राहणार आहेत. दसरा, दिवाळी, नाताळ या काळात अनेक सिनेमे प्रदर्शित होत असतात त्यामुळे याच काळात सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांची गर्दी होत असते. सिनेमागृहांमध्ये येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत सिनेमागृहे सुरु कशी करता येतील याबाबत आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा करणार आहोत, असेही श्री. देशमुख यांनी सांगितले.

थिएटर्स मालकांना वेगवेगळया समस्या, अडचणींना सामोरे जावे लागते. गेल्या सहा महिन्यांपासून थिएटर्स बंद असल्याने थिएटर्स मालकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे येणाऱ्या सहा महिन्यांच्या कालावधीत त्यांना येत असलेल्या समस्यांचे निराकरण करण्यावर भर देण्यात येईल. थिएटर्स सुरु राहण्याबाबतचे लायसन्स, वेगवेगळया परवानग्या यासारखे विषय प्राधान्याने सोडविण्यावर भर देण्यात येईल असे सांगून सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. देशमुख यांनी  थिएटर्स ओनर्स यांना आश्वस्त केले.

थिएटर्स ओनर्स यांनी यावेळी बंद पडत असलेले सिंगल स्क्रिन थिएटर्स, सिंगल स्क्रिन थिएटर्स चालविताना येत असलेल्या अडचणी, थिएटर्स सुरु राहण्याबाबत देण्यात येणारे लायसेन्स, वीज बिल, मालमत्ता कर, विविध परवाने याबाबत येत असलेल्या समस्या मांडल्या.

बैठकीला सिंगल स्क्रिन ओनर्सपैकी उदय टॉकीजचे नितीन दातार, सेंट्रल सिनेमाचे शरद जोशी, कस्तुरबा सिनेमाचे निमिश सोमय्या, न्यू शिरीनचे विराफ वच्छा, आशा सिनेमाचे तेजस करंदीकर तर मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाचे दिपक अशेर, मल्टिप्लेक्स स्क्रिन ओनर्सचे आयनॉक्सचे अलोक टंडन, पीव्हीआरचे कमल ग्वानचंदानी, सिनेपॉलिसचे देवांद संपत, कार्निव्हलचे कुणाल सोहनी, सिटी प्राईडचे प्रकाश चाफलकर, युएफओचे कपिल अग्रवाल, राहुल हसकर, राम निधानी आदी उपस्थित होते.

‘पोषण माह’ अभियानात महाराष्ट्र देशात प्रथम

0

नवी दिल्ली, : राष्ट्रीय पोषण अभियानाअंतर्गत तृतीय ‘पोषण माह’ या विशेष मोहिमेच्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र देशात अव्वल ठरले आहे.

केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाने मंगळवारी तृतीय ‘पोषण माह’ या विशेष मोहीम कार्यक्रमाच्या समारोपाचे आयोजन दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केले. या कार्यक्रमात केंद्रीय महिला व बाल विकास राज्यमंत्री देबश्री चौधरी, केंद्रीय महिला व बाल विकास सचिव राम मोहन मिश्रा, विविध राज्यातील महिला व बालविकास मंत्री, वरिष्ठ अधिकारी तसेच अभियान राबविणाऱ्या विविध अशासकीय संस्था उपस्थित होत्या.

महाराष्ट्रातून महिला व बालविकास विभागाच्या सचिव आय.ए. कुंदन आणि एकात्मिक बालविकास सेवा आयुक्त इंदरा मालो उपस्थित होत्या.

7 ते 30 सप्टेंबर दरम्यान तृतीय ‘पोषण माह’ विशेष मोहीम देशभर राबविण्यात आली. या अंतर्गत अतितीव्र कुपोषित बालकांचा शोध घेणे, त्यांना योग्य पोषण मिळेल याचे नियोजन करणे, स्तनदा मातांमध्ये स्तनपानाविषयी जनजागृती करणे, जन्मापासून ते 1000 दिवसांपर्यंत अधिक पोषक आहाराबद्दल सांगणे, तसेच महिला आणि बालकांमधील एनिमीया कमी करण्याच्या उपायांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले होते.

पोषण माह अंतर्गत सर्वाधिक उपक्रम राबविणारे महाराष्ट्र हे देशात प्रथम क्रमांकाचे राज्य ठरले. कोविड-19 च्या विपरीत परिस्थितीमध्येही सर्व दिशानिर्देशांचे पालन करून राज्य शासनाने तृतीय पोषण माह मोहीम उत्कृष्टपणे राबविली आहे.

महाराष्ट्राने अशा केल्या उपाययोजना

या विशेष मोहिमेमध्ये राज्य शासनाने अतितीव्र कुपोषित बालकांची छाननी केली. त्यांना सुक्ष्म 45 पोषण आहार प्रदान करण्यात आले. अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेल्या मोबाईलच्या माध्यमातून बालकांचे वजन, उंची नोंदविण्यात आली. घरोघरी जाऊन योग्य प्रकारे काळजी घेण्याबाबत पालकांना जागरूक करण्यात आले. यासह गरोदर तसेच स्तनदा मातांचा आहार, त्यांचे लसीकरण  आरोग्य विभागाच्या सहायाने करण्यात आले. महिलांमध्ये आंतर बाह्य स्वच्छतेबाबत माहिती देण्यात आली, त्यांना काही समस्या असल्यास त्यांचे

समुपदेशन करण्यात आले. न्यट्री किचन गार्डन ही परिकल्पना महाराष्ट्राने दोन वर्षापूर्वीच सुरू केली असून यातंर्गत आतापर्यंत 10 हजार न्यट्री किचन गार्डन महाराष्ट्रात असल्याची माहितीही दूरदृश्यप्रणालीद्वारे आयोजित कार्यक्रमात श्रीमती कुंदन यांनी दिली.

केंद्र शासनाच्या डॅशबोर्डमध्ये सर्वाधिक कार्यक्रमांच्या नोंदी महाराष्ट्राने केल्या आहेत. या डॅशबोर्डमध्ये राज्याने 5 कोटी 38 लाख 12 हजार 326 नोंदी केल्या असून देशात महाराष्ट्र प्रथम ठरले आहे. तर उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे. पोषण माह दरम्यान सर्वाधिक सहभागी तामिळनाडू मधून सहभागी झाले तर या गटात महाराष्ट्राला दुसरा क्रमांक मिळाला आहे. महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर आणि मंत्री मंडळातील इतर सदस्यांचे मार्गदर्शन यासह काटेकोर नियोजन, अंमलबजावणी, लोकांचा तसेच अंगणवाडी सेविका, शासनाचे इतर विभाग यांचा सक्रीय सहभाग यामुळे हे यश प्राप्त करता आले अशी भावना महिला व बालविकास खात्याच्या सचिव आय.ए. कुंदन तसेच एकात्मिक बालविकास सेवा आयुक्त इंदरा मालो यांनी वेबीनार

मध्ये व्यक्त केल्या.

सर्वसामान्य नागरिकांची कामे मार्गी लागण्यासाठी ‘माझे संकलन, माझी जबाबदारी’ मोहिम महत्त्वपूर्ण -जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

0
  • जिल्हाधिकारी कार्यालयात ‘माझे संकलन, माझी जबाबदारी’ मोहिमे अंतर्गत प्रशिक्षणाचे आयोजन


पुणे,: कोरोना आपत्ती निवारणाच्या कामासोबतच प्रलंबित तसेच दैनदिन कामकाज गतीने होण्यासाठी माझे संकलन, माझी जबाबदारी मोहिम राबविण्यात येत आहे, कोरोना विषयक कामकाजासोबतच इतर विकासकामे व सर्वसामान्य नागरिकांची कामे मार्गी लागण्यासाठी ‘माझे संकलन, माझी जबाबदारी’ मोहिम महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आज व्यक्त केला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात माझे संकलन, माझी जबाबदारी मोहिमे अंतर्गत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, कोरोना संसर्ग कालावधीत संपूर्ण प्रशासन कार्यरत आहे, त्यामुळे नागरिकांचे दैनदिन कामकाज प्रलंबित राहण्याची शक्यता विचारात घेत ‘माझे संकलन, माझी जबाबदारी’ मोहिम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, माझे संकलन, माझी जबाबदारी मोहिमे अंतर्गत प्रलंबित कामे गतीने मार्गी लावा, तसेच कार्यालयातीन कामकाजात सकारात्मकता ठेवून गुणवत्तापूर्ण काम करण्यासाठी प्रत्येकाचा प्रयत्न महत्त्वाचा ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
झिरो पेंडन्सी अभियानाच्या माध्यमातून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने सातत्याने राज्यात आदर्श निर्माण केला असल्याचे सांगून जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, प्रत्येकाने आपल्या कार्यालयात येणा-या प्रत्येकाच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कार्यालयीन कामकाज सांभाळताना प्रशिक्षणाचा निश्चितच उपयोग होणार आहे. शासनाने आपल्यावर सोपविलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी टिम म्हणून काम करा, कोरोनासोबतच सर्वसामान्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी आपण सर्व मिळून काम करूया, यामध्ये प्रत्येकाचे योगदान गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख म्हणाले, दैनदिन प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी ‘माझे संकलन, माझी जबाबदारी’ मोहिम उपयुकत् ठरणार आहे. प्रशिक्षण व क्षमता बांधणी, अभिलेख कक्षाचे अद्ययावतीकरण व कालबाहय अभिलेख, प्रलंबित टपाल कार्यविवरणाला नोंदवणे, प्रलंबित प्रकरणांचा निपटारा आढावा, सहा गठठा पदधती, टपालावरील प्रक्रिया, टिपणी सादर करण्याची पदधती यासोबतच ‘माझे संकलन, माझी जबाबदारी’ मोहिमे बाबत मार्गदर्शन केले. आभार निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे यांनी मानले.यावेळी जिल्हयातील जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय प्रांत अधिकारी कार्यालय तसेच तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

पर्यावरण आणि वन्यजीव रक्षणाची ‘जाग’ आयुष्यभरासाठी जपूया- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुंबई : वन्यजीव सप्ताहाच्या माध्यमातून वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनाप्रति येणारी सजगता, जाग ही केवळ सप्ताह साजरा करण्यापुरती मर्यादित न ठेवता ती आयुष्यभरासाठी जपूया असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

राज्यात १ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर या काळात वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला, वन्यजीव प्रेमींना शुभेच्छा दिल्या आहेत.

पर्यावरण रक्षणासाठी कटिबद्धता

वन्यजीव म्हणजे केवळ वाघ नाही तर वाघ केवळ एक प्रतीक असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, ज्या जंगलात वाघ असतो ते जंगल पूर्ण असते. जंगल पूर्ण असणे हे जीवसृष्टीचे एक मोठे जीवनचक्र आहे. त्याचे रक्षण करणे, त्याबद्दल जाग आणण्यासाठी या सप्ताहाचे महत्त्व अधिक आहे. वन्यजीव आणि पर्यावरण रक्षणाची हीच जाग जपत या शासनाने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. मुंबईत जवळपास ८०० चौ.कि.मी चे आरेचे जंगल आरक्षित करण्याचा प्रस्ताव त्याच उद्देशाने आणल्याचे व हे जंगल आरक्षित करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

महाराष्ट्राला संपन्न जैवविविधता

राष्ट्रीय उद्याने अनेक ठिकाणी आहेत परंतु  मुंबई महानगरात शहराच्या मधोमध वसलेले संजय गांधी राष्ट्रीय उद्यान असे जंगल आहे जिथे निसर्गत: वन्यजीव, पशुपक्षी, कीडे, फुलपाखरं आणि असंख्य जीवजंतू आहेत. जीवसृष्टीचे चक्र पूर्ण करणारे  हे  जंगल  आहे, शासन त्याचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्राला विपुल जैवविविधता लाभल्याचे सांगताना त्यांनी  ७२० कि.मी च्या समुद्र किनारी भागातील  जीवसृष्टी जपायलाही शासनाचे प्राधान्य असल्याचे  स्पष्ट केले.

केवळ औपचारिकता नको

असे सप्ताह किंवा दिन साजरे करताना त्यातील औपचारिकता काढून टाकून ते मनापासून साजरे झाले तर आयुष्याला ए‍क वेगळी कलाटणी आणि दिशा मिळेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, वन्यप्राण्यांसोबत असलेले आपले सहजीवन, त्यांचे आपल्या आयुष्यातील अस्तित्व आपण मनापासून स्वीकारणे आवश्यक आहे.

लॉकडाऊन काळात अनेक गोष्टी आपल्याला दिसून आल्या… गाड्या, यंत्रांच्या खडखडाटात कधीही ऐकू न येणारी पक्षांची किलबिल आपल्याला ऐकू येऊ लागली, कधीही न दिसणाऱ्या चिमण्या दिसून येऊ लागल्या. आपण आपल्या घराच्या गच्चीत किंवा गॅलरीत गेलो तर आपली नजर दूरपर्यंत जाऊ लागली, कारण मधले प्रदूषण नाहीसे झाले, अशी अनेक उदाहरणेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलतांना दिली.

सहजीवन गरजेचे

माझे कुटुंब- माझी जबाबदारी हे अभियान राज्यभर राबविण्यास सुरुवात केल्याचे सांगताना मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी म्हटले की, कुटुंब सुरक्षित तर आपला समाज सुरक्षित राहणार आहे. याच पद्धतीने आपल्या कुटुंबाचा एक भाग असलेल्या परंतु वनात राहात असलेल्या, जीवसृष्टीत राहात असलेल्या आपल्या या जीवनसाथींचे संरक्षण करणे अत्यावश्यक आहे. संपन्न पर्यावरणासाठी ते महत्त्वाचे आहे. त्यामुळे वन्यजीव आणि पर्यावरण रक्षणाप्रति या सप्ताहाच्या निमित्ताने येणारी जाग केवळ एका सप्ताहापुरती मर्यादित न ठेवता आयुष्यभरासाठी जपूया, सजग राहून सहजीवनातून आपल्या आयुष्यातील आनंद वाढविण्यासाठी कटिबद्ध होऊया असेही ते म्हणाले.

विवेकच्या आत्महत्येनंतर मनात जी ज्योत पेटली आहे ती संपूर्ण व्यवस्थेला भस्मसात करु शकते; सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका करणार दाखल

0

पुणे-सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थिगिती आणली यानंतर मराठा बांधवांमध्ये संतापाचे वातावरण आहे. यासोबतच महाविकास आघाडी सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. तर राज्य सरकार यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. असे असताना राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवारांचे नातू पार्थ पवार यांनी पुन्हा एकदा सरकारच्या विरोधात आवाज उठवला आहे.

पार्थ पवारांनी मराठा आरक्षणावरुन सुप्रीम कोर्टात जाण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नाही असे म्हटले आहे. बीडमधील तरुणाने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली. यानंतर पार्थ पवारांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसत आहे. पार्थ पवार यांनी ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली.

बीडमधील तरुणाच्या आत्महत्येविषयी पार्थ पवार म्हणाले की, ‘मराठा आरक्षणासाठी विवेकने आत्महत्या केली. ही बातमी ऐकून धक्का बसला आहे. अशा दुर्दैवी घटनांची मालिका सुरु होण्यापूर्वी मराठा नेत्यांनी जागे होऊन लढायला हवे. महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी जागे व्हावे ही विनंती’ असे ते म्हणाले. तसेच या ट्विटसोबत त्यांनी आत्महत्या करणाऱ्या विवेकचा फोटो शेअर केला आहे. तसेच त्याच्या सुसाइड नोटचाही फोटो शेअर केला आहे.

सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा…
विवेकच्या आत्महत्येविषयीच्या ट्विटला रिट्विट करत पार्थ पवारांनी आणखी एक ट्विट केले. ते म्हणाले की, ‘विवेकच्या आत्महत्येमुळे आमच्या मनात जी ज्योत पेटली आहे ती संपूर्ण व्यवस्थेला भस्मसात करु शकते. संपूर्ण पिढीचे भविष्य धोक्यात आहे. सुप्रीम कोर्टात जाऊन हस्तक्षेप याचिका दाखल करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय माझ्याकडे उरला नाही’ असेही ते म्हणाले आहेत.

तसेच ‘मराठा आंदोलनाची धगधगती मशाल ह्रदयात पेटलेली ठेवून मी विवेक आणि इतर अनेक लाखो तरुणांसाठी न्यायाची मागणी करण्यास मी तयार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र’ असे ट्विट पार्थ पवारांनी केले आहे.

पवारसाहेब ,मराठा आरक्षणाबाबत राजकारण संपवा ,प्रश्न सोडवणुकीसाठी प्रयत्न करा – आ. चंद्रकांतदादा पाटील (व्हिडीओ)

पुणे -आज पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी नेमके काय म्हटले आहे ते ऐका त्यांच्याच शब्दात

पार्थ पवार यांनी गेल्या काही दिवसात घेतलेल्या भूमिका पाहता ते आतल्या आवाजाला महत्त्व देत आहेत. पार्थ पवार यांची वाटचाल सत्यमेव जयतेच्या दिशेनं सुरू आहे असं मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे.

बीडमधील विवेक रहाडे या युवकानं मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर आत्महत्या केली. त्यावर उद्विग्न होऊन पार्थ पवार यांनी ट्विट केलं आहे. मराठा नेत्यांनी वेळीच जागं होऊन आरक्षण मिळवण्यासाठी संघर्ष केला पाहिजे. राज्य सरकारनं हा गुंता सोडवण्यासाठी तातडीनं पावलं उचलावीत अशी मागणी पार्थ पवार यांनी केली आहे.

विवेक यांनी आमच्या मनात पेटवलेली ज्योत व्यवस्थेला पेटवेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

याबद्दल विचारणा केली असता चंद्रकांत पाटील यांनी पार्थ पवार सत्यमेव जयतेच्या मार्गावर आहेत असं मत व्यक्त केलं. पार्थ पवार यांनी यापूर्वीही सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केली होती. त्यामुळं ते आतल्या आवाजाला अधिक महत्त्व देतात अशी टिप्पणीही त्यांनी केली आहे.

राज्यात करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यावर उपाय योजना करण्याच्या दृष्टीने आजवर तब्बल शंभरवेळा पत्रव्यवहार केला आहे. मात्र त्या पत्रांची दखल ठाकरे सरकारने घेतली नाही असा आरोप भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केला. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, “करोना प्रकरणी सरकारला दिसत नाही ऐकू येत नाही या सरकारची संवेदनशीलता संपली असल्याची टीका सरकारवर त्यांनी केली.

तसेच ते पुढे म्हणाले की, रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठी रुग्णांचे नातेवाईक अनेक मेडिकलमध्ये जातात. मात्र त्या ठिकाणी जादा दर आकारले जात आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर काळाबाजार सुरू आहे.त्यावर सरकारचे लक्ष नाही. यामुळे रुग्णांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्या दृष्टीने राज्य सरकारने विशेष पथके नेमून काळा बाजार करणार्‍यावर धाडी घातल्या पाहिजे. मात्र हे होताना दिसत नसल्याची खंत यावेळी त्यांनी बोलवून दाखवली.

राहुल गांधीना अटक : पोलिसांच्या धक्काबुक्कीने गांधी जमीनीवर कोसळले:देशभरात संतापाची लाट

0

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी जात असताना पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली . कलम १८८ अंतर्गत पोलिसांकडून अटकेची कारवाई करण्यात आली. काँग्रेसकडून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. दरम्यान राहुल गांधी यांना पोलिसांनी चक्क धक्काबुक्की करत खाली पाडले आणि अटक केल्याच्या वृत्ताने देशभरात युपी पोलिसांच्या कृत्याबाबत संतापाची लाट पसरली असून देशभर आंदोलने करत कॉंग्रेसजन रस्त्यावर उतरत असल्याचे वृत्त हाथी आले आहे. ज्या गांधी घराण्याने देशासाठी बलिदानाची परंपरा कायम ठेवली ,देश हिताला वाहून घेतले ,त्या घराण्यातील राहुल गांधींना जर युपी चे पोलीस अशी वागणूक देत असतील तर सामान्य नागरिकांचे तिथे काय होत असेल ? असा प्रश्न यानिमित्ताने देशभर उपस्थित होत होता

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हाथरसमधील बलात्कार पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी जात असताना पोलिसांनी रोखल्यानंतर राहुल गांधी चालत निघाले होते. यावेळी पोलिसांनी त्यांना अडवलं. पोलिसांनी लाठीचार्ज करुन आपल्याला खाली पाडलं असं राहुल गांधींनी सांगितलं.

मला पीडित कुटुंबाला भेटायचे आहे- राहुल गांधी

पोलिसांनी मला धमकी देत खाली पाडल्याचे राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले. मला एकट्याला हाथरसला जाऊ द्या असा मी पोलिसांकडे आग्रह धरला, मात्र पोलिसांनी आपला हा आग्रह मान्य केला नाही. एकट्या व्यक्तीवर कलम १४४ लागू होत नाही असे आपण म्हटले. मात्र पोलिस ऐकायला तयार नव्हते. आपल्याला पीडित कुटुंबाला भेटायचे आहे, असे राहुल म्हणाले.

गावाला छावनीचे स्वरुप, मेन रोडवर बॅरिकेड लावले

पीडितेच्या गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. कोणत्याच बाहेरच्या व्यक्तीला पीडितेच्या घरापर्यंत जाता येऊ नये, यासाठी गावाबाहेर बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. मीडियालाही गावात जाण्याची परवानगी नाही. गावाच्या एंट्री पॉइंटवर एडीएम लेव्हलचे अधिकारी तैनात आहेत.

बलात्काराची पुष्टी नाही- पोलिस

हाथरसचे एसपी विक्रांत वीरने सांगितले की, अलीगड हॉस्पीटलच्या मेडिकल रिपोर्टमध्ये पीडितेच्या शरीरावर जखमांचे निशान असल्याचे सांगितले आहे. पण, बलात्कार झाल्याची पुष्टी नाही. डॉक्टरांचे म्हणने आहे की, फोरेंसिक रिपोर्ट आल्यानंतरच बलात्काराची पुष्टी होईल.

नाट्यपरिषदेच्या खोटारडेपणावर ज्येष्ठअभिनेत्री भडकल्या..

0

राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाने पाठपुरावा करून मार्गी लावलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा केविलवाना प्रयत्न,

काय आहे प्रकरण ?

५९ व्या महाराष्ट्र हौशी राज्यनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक, आणि अंतिम स्पर्धेत सहभागी झालेल्या ४४५ नाट्य संस्थांना शासनाकडून अनुदान, निवास,प्रवास भत्ता, बक्षिसाची रक्कम, नाट्यगृह भाडे, तांत्रिक साहित्य भाडे आदी रक्कम शासनाकडून देण्यास विलंब झाल्यामुळे राष्ट्रवादी चित्रपट साहित्य सांस्कृतिक विभागाने सतत पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावण्यासाठी जीवाचे रान केले असून आता तो प्रश्न मार्गी लागतोय हे कळताच श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न नाट्यपरिषदेच्या कडून होतांना दिसत आहे हे प्रकार त्यांनी ताबडतोब थांबवावे अशी समज राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबासाहेब पाटील
राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाच्या प्रदेश सरचिटणीस तथा नाट्यपरिषदेच्या उपाध्यक्ष ज्येष्ठ सिनेअभिनेत्री यांनी सविता मालपेकर यांनी घरचा आहेर च दिला आहे.

राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभाग या प्रश्नांचा गेल्या ६ महिन्यापासून पाठपुरावा करत असून विभागाचे मराठवाडा अध्यक्ष डॉ. सुधीर निकम या प्रश्नाचा मंत्रालय पातळीवर आगदी रोज पाठपुरावा करत आहेत. हे मंत्रालयातील सांस्कृतिक विभागातील तथा वित्त विभागातील अधिकारी सुद्धा सांगतील.
९ सप्टेबर रोजी राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने प्रदेशकार्याध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य समन्वयक संतोष साखरे, मराठवाडा अध्यक्ष डॉ. सुधीर निकम, प्रदेश सरचिटणीस सविता मालपेकर, उपाध्यक्ष विजय पाटकर, सिनेअभिनेते सिद्धेश्वर झाडबुके,कौस्तुभ सावरकर, गिरीश परदेशी, बाळकृष्ण शिंदे, प्रियदर्शन जाधव माया जाधव, शाम राऊत आदीच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेवून या विषयी त्यांना निवेदन देवून हौशी कलावंतांची हि अडचण विषद केली होती.

त्यावर अजित पवार यांच्या वतीने तत्काळ सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि शासकीय पातळीवर या प्रश्नाला वेग आला. शिष्टमंडळाच्या वतीने डॉ. सुधीर निकम, संतोष साखरे यांच्याकडे या प्रश्नाचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी देण्यात आली. त्या प्रमाणे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख, त्यांचे स्वीय सहाय्यक जावळे, राज्यनाट्य स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी असणारे सांस्कृतिक संचालक चौरे, इतकेच नाही तर वित्त विभागाचे सचिव बाजीराव पाटील यांच्या सर्वांशी वेळोवेळी भ्रमणध्वनीवर पाठपुरावा सुरु केला.

संतोष साखरे यांनी पुण्यात अजित पवार यांची भेट घेवून पुन्हा या प्रश्नासाठी मागणीचे स्मरणपत्र दिले सांस्कृतिक विभागातून वित्त खात्यात सदर फाईल आल्याचे समजताच अजित पवार यांनी तातडीने ती फाईल मागवून घेण्याचे आदेश दिले.आता काही दिवसात महाराष्ट्राच्या हौशी नाट्य संस्थांना त्यांच्या खात्यात त्यांची अनुदान रक्कम शासनाच्या वतीने दिली जाणार हे नक्की. मात्र नाट्यपरिषदेने हे श्रेय स्वतःच्या नावे लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न चालवला असल्याचे उघड झाले आहे. काय तर म्हणे ४४५ नाट्य संस्थाच्या खात्यात ६ हजार रुपये प्रमाणे रक्कम टाकणार..!

नाट्यपरिषदेकडे मदत करायला रक्कम नाही हे तेच सगळ्या जगाला सांगत होते.होती तर पडद्यामागील कलावंतांना का मदत केली नाही. कोविड काळात कलावंतांना जी मदत केली होती त्यातील बहुतांशी रक्कम सुद्धा राष्ट्रवादी पक्षाच्या वेल्फेअर फंडातून दिली गेली होती हे न कळण्याइतके कलावंत खुळे राहिलेले नाहीत. एक कोटी २० लाख रुपयाच्या निधीतून कोणाला मदत केली नाट्यपरिषद त्यांच्याच संचालकांना सांगायला तयार नाहीत. मग खिश्यात नाही दाणा अन बाजीराव म्हणा सारखी गत असतांना चक्क ४४५ संस्थांना हे कशी काय मदत करणार असा प्रश्न कलावंतांच्या वतीने विचारण्यात येत आहे. नाट्यसंस्थांच्या खात्यात काही दिवसात सांस्कृतिक संचालनालयाचे जमा होणारे पैसे आम्ही दिलेले आहेत असा अपप्रचार उद्या कलावंतांच्यात करण्याचा केविलवाणा प्रयत्न नाट्यपरिषद करत आहे. हे त्यांनी तत्काळ थांबवावे असा इशारा राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.

५ ऑक्टोबरपासून राज्यातील रेस्टॉरंट व बार सुरू

0

मुंबई –येत्या 5 ऑक्टोबरपासून राज्यातील रेस्टॉरंट व बार पुन्हा सुरू होणार आहेत. त्याचबरोबर राज्यातील प्रवासी वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी राज्यांतर्गत

रेल्वे सुरू करण्याचा निर्णयही सरकारनं घेतला आहे. मुंबईतील डबेवाल्यांनाही राज्य सरकारनं दिलासा दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात करोनाचा प्रार्दुभाव वाढत असल्यानं राज्य सरकारनं काही निर्बंध कायम ठेवले होते. मात्र, ऑक्टोबरपासून अनेक गोष्टींवरील निर्बंध उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारनं यासंदर्भातील आदेश जारी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून रेस्टॉरंट सुरू करण्याची मागणी होत होती. त्यासंदर्भात राज्य सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 5 ऑक्टोबरपासून राज्यातील रेस्टॉरंट व बार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, एकूण क्षमतेच्या 50 टक्के ग्राहकांनाच प्रवेश देण्याचं बंधन सरकारन घातलं आहे.

मुंबई महानगर प्रदेशाअंतर्गत येणार्‍या अनावश्यक वस्तूंचं उत्पादन करणार्‍या उद्योगांना उत्पादन सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्य सरकारनं राज्यांतर्गत रेल्वे प्रवासी वाहतूक सुरू करण्यास परवानगी दिली आहे. राज्य व केंद्र सरकारनं दिलेल्या करोनाविषयक मार्गदर्शक सूचनांचं पालन करून ही रेल्वे सेवा तात्काळ सुरू करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत.

प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन व कोविड मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊन मुंबई महानगर प्रदेशातील लोकल रेल्वे गाड्यांच्या फेर्‍या वाढवण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे राज्य सरकारनं मुंबईतील डबेवाल्यांना लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी दिली आहे. मुंबई महानगर प्रदेशात अर्थात एमएमआर विभागात डबेवाल्यांना रेल्वेतून प्रवास करण्यात येणार असून, त्यासाठी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाकडून क्यूआर कोड देण्यात येणार आहे.

शाळा बंदच – दरम्यान, राज्यात शाळा आणि कॉलेजेस 31 ऑक्टोबरपर्यंत बंद राहणार असून ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण सुरू राहणार आहे.

भाजपा महिला अध्यक्षा अर्चना पाटील तर युवा मोर्चा अध्यक्षपदी बाप्पू मानकर 

0

पुणे- भारतीय जनता पार्टी च्या पुणे शहर विभागातील विविध आघाड्यांच्या पदाधिकार्यांची निवड आज घोषित करण्यात आली या मध्ये भाजपच्या पुणे शहर महिला अध्यक्षा म्हणून अर्चना तुषार पाटील या माजी खासदार संजय काकडे यांच्या कट्टर समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगरसेविकेची निवड करण्यात आली तर युवा मोर्चाच्या अध्यक्षपदावर बाप्पू उर्फ राघवेंद्र मानकर यांची निवड करण्यात आली. मानकर हे खासदार गिरीश बापट यांचे कट्टर समर्थक आहेत .ओबीसी आघाडी अध्यक्षपदावर योगेश पिंगळे या माळी समाजातील कोरेगाव पार्क परिसरातील युवा कार्यकर्त्याला संधी देण्यात आली आहे .आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाने महत्वपूर्ण हालचालींना प्रारंभ केल्याचे या निवडीच्या नावावरून मानले जाते आहे.

शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी आज या नियुक्त्या घोषित केल्या आहेत . युवती आघाडी च्या अध्यक्षपदी निवेदिता एकबोटे यांची निवड तर अल्पसंख्याक आघाडीच्या अध्यक्षपदावर अन्वर पठान यांची निवड करण्यात आली आहे. व्यापारी आघाडी अध्यक्षपदावर महेंद्र व्यास ,तर वकील आघाडी अध्यक्ष पदावर इशानी जोशी ,विद्यार्थी आघाडी अध्यक्षपदावर अंकित तिवारी ,झोपडपट्टी आघाडी अध्यक्षपदी विशाल पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आली दारूवाला यांची अल्पसंख्यांक आघाडीच्या प्रभारी पदावर निवड करण्यात आली आहे. या शिवाय उपाध्यक्ष, चिटणीस ,सरचिटणीस यांच्या नियुक्त्याही आज करण्यात आल्या आहेत .

काकडे आणि बापट हेच हुकमाचे एक्के

जरी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड चे आमदार चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे शहराचे नेतृत्व असले तरी प्रत्येक वेळी विविध पदांवर होणाऱ्या निवडी मध्ये यावेळी माजी खासदार संजय काकडे आणि खासदार गिरीश बापट या दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांना आता संधी मिळू लागली आहे. बापट -काकडे अशी रस्सीखेच होऊ न देता होणाऱ्या पदांची वाटपे पहाता ,चंद्रकांत दादा पाटील हे ‘काकडे व बापट हेच येथील हुकुमाचे एक्के आहेत हे जाणून मोठ्या संयमान समतोल राखीतकार्यकर्त्यांच्या फौजा सांभाळीत असल्याचे मत समीक्षकांकडून व्यक्त होते आहे . मात्र तरीही जुनी कार्यकर्ती मंडळी मात्र अजूनही पक्षाने सामावून न घेतल्याच्या बाबीकडे देखील लक्ष वेधण्यात येते आहे.

आज दिवसभरात १८ हजार ३१७ नविन रुग्णांची नोंद तर १९ हजार १६३ रुग्णांना डिस्चार्ज

0

मुंबई, दि. ३० : राज्यात दररोज बरे कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांच्या पुढे असून सलग तिसऱ्यांदा नवीन रुग्ण कमी संख्येने नोंदविले गेले आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस राज्यात उपचाराखाली असलेल्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या कमीकमी होत आहे. आज दिवसभरात १८ हजार ३१७ नविन रुग्णांची नोंद झाली असून १९ हजार १६३ रुग्णांना घरी सोडण्यात आले. राज्याच्या रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ होत असून आज ७८.६१ टक्के नोंद झाली आहे. आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६७ लाख ८५ हजार २०५ नमुन्यांपैकी १३ लाख ८४ हजार ४४६ नमुने पॉझिटिव्ह (२०.४० टक्के) आले आहेत. राज्यात  २१ लाख  ६१ हजार ४४८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २९ हजार १७८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ४८१ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६५ टक्के एवढा आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  सांगितले

आज निदान झालेले १४,९७६ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ४३० मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-२६५४ (४६), ठाणे- ३२० (८), ठाणे मनपा-४७३ (३६), नवी  मुंबई मनपा-४५२ (४), कल्याण डोंबिवली मनपा-५२७ (११), उल्हासनगर मनपा-४० (१), भिवंडी निजामपूर मनपा-३१ (४), मीरा भाईंदर मनपा-२३९ (९), पालघर-१७१ (१२), वसई-विरार मनपा-२४२ (३०), रायगड-३३६ (७), पनवेल मनपा-२५८ (१), नाशिक-४६५ (६), नाशिक मनपा-८९३ (१५), मालेगाव मनपा-३३ (१), अहमदनगर-६३९ (७), अहमदनगर मनपा-१२५ (५), धुळे-६१, धुळे मनपा-६६, जळगाव-२५३ (१), जळगाव मनपा-१०६, नंदूरबार-४० (१), पुणे- ११७९ (२१), पुणे मनपा-१३७० (२८), पिंपरी चिंचवड मनपा-७१२ (३१), सोलापूर-३६८ (५), सोलापूर मनपा-६४, सातारा-६०१ (२९), कोल्हापूर-३३९ (१५), कोल्हापूर मनपा-९१ (५), सांगली-४११ (१८), सांगली  मिरज कुपवाड मनपा-१४९ (५), सिंधुदूर्ग-५४ (२), रत्नागिरी-११७ (१३), औरंगाबाद-१२७ (७),औरंगाबाद मनपा-१९६ (१), जालना-१३४, हिंगोली-२८, परभणी-६२ (७), परभणी मनपा-२६ (१), लातूर-११६ (७), लातूर मनपा-९३ (१), उस्मानाबाद-२५६ (११), बीड-२१४ (३), नांदेड-१३६ (७), नांदेड मनपा-७१ (१), अकोला-२२ (५), अकोला मनपा-५२ (३), अमरावती-८३ (१), अमरावती मनपा-९७, यवतमाळ-१६२ (३), बुलढाणा-२४३ (९), वाशिम-१५० (९), नागपूर-३१३ (९), नागपूर मनपा-१०३८ (१४), वर्धा-१२७, भंडारा-१५५ (१), गोंदिया-१७७ (२), चंद्रपूर-२२५ (१), चंद्रपूर मनपा-१४३, गडचिरोली-६९, इतर राज्य-२३ (१).

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील                         

मुंबई: बाधित रुग्ण- (२,०५,२६८) बरे झालेले रुग्ण- (१,६९,२६८), मृत्यू- (८९२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(४०८), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६,६६३)

ठाणे: बाधित रुग्ण- (१,८७,३७९), बरे झालेले रुग्ण- (१,५२,९८४), मृत्यू (४८९६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९,४९८)

पालघर: बाधित रुग्ण- (३७,०६९), बरे झालेले रुग्ण- (२९,५४१), मृत्यू- (८७१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६६५७)

रायगड: बाधित रुग्ण- (५१,३८७), बरे झालेले रुग्ण-(४२,८८८), मृत्यू- (११५५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (७३४२)

रत्नागिरी: बाधित रुग्ण- (८४३६), बरे झालेले रुग्ण- (६०५७), मृत्यू- (२७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१०१)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (३९०२), बरे झालेले रुग्ण- (२५१४), मृत्यू- (८४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३०४)

पुणे: बाधित रुग्ण- (२,९३,०६४), बरे झालेले रुग्ण- (२,२९,९५२), मृत्यू- (५८१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (५७,२९८)

सातारा: बाधित रुग्ण- (३६,८१६), बरे झालेले रुग्ण- (२७,४५८), मृत्यू- (९३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (८४१९)

सांगली: बाधित रुग्ण- (३८,१७५), बरे झालेले रुग्ण- (२८,९४८), मृत्यू- (११७६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८०५१)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (४३,३६२), बरे झालेले रुग्ण- (३४,३००), मृत्यू- (१३४०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७७२२)

सोलापूर: बाधित रुग्ण- (३६,२१२), बरे झालेले रुग्ण- (२८,०४१), मृत्यू- (११४३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (७०२७)

नाशिक: बाधित रुग्ण- (७६,१२४), बरे झालेले रुग्ण- (५९,६५४), मृत्यू- (१३००), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५,१७०)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (४२,१८३), बरे झालेले रुग्ण- (३३,७६०), मृत्यू- (६८४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण-(७७३९)

जळगाव: बाधित रुग्ण- (४७,६६१), बरे झालेले रुग्ण- (३९,९३०), मृत्यू- (१२४५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६४८६)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (५३२८), बरे झालेले रुग्ण- (४४१०), मृत्यू- (१२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७९८)

धुळे: बाधित रुग्ण- (१२,४४०), बरे झालेले रुग्ण- (११,३०९), मृत्यू- (३२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (८००)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (३६,०४६), बरे झालेले रुग्ण- (२५,४३६), मृत्यू- (८८९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९७२१)

जालना: बाधित रुग्ण-(७७६९), बरे झालेले रुग्ण- (५३७२), मृत्यू- (१८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२११)

बीड: बाधित रुग्ण- (१०,३९०), बरे झालेले रुग्ण- (७२६२), मृत्यू- (२७६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (२८५२)

लातूर: बाधित रुग्ण- (१७,३८२), बरे झालेले रुग्ण- (१३,१७३), मृत्यू- (४८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३७२३)

परभणी: बाधित रुग्ण- (५४३९), बरे झालेले रुग्ण- (३९७५), मृत्यू- (१९५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२६९)

हिंगोली: बाधित रुग्ण- (३०४९), बरे झालेले रुग्ण- (२३८०), मृत्यू- (५७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६१२)

नांदेड: बाधित रुग्ण- (१५,९४०), बरे झालेले रुग्ण (९१४५), मृत्यू- (४००), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६३९५)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (१२,५१६), बरे झालेले रुग्ण- (८८९७), मृत्यू- (३६२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२५७)

अमरावती: बाधित रुग्ण- (१३,५४६), बरे झालेले रुग्ण- (१०,९९७), मृत्यू- (२७३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२७६)

अकोला: बाधित रुग्ण- (७२२९), बरे झालेले रुग्ण- (४९१४), मृत्यू- (२३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०८४)

वाशिम: बाधित रुग्ण- (४३००), बरे झालेले रुग्ण- (३४५६), मृत्यू- (९२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (७५१)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (७७५७), बरे झालेले रुग्ण- (५२१२), मृत्यू- (१२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४२३)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (८७९९), बरे झालेले रुग्ण- (६३५०), मृत्यू- (२१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२३०)

नागपूर: बाधित रुग्ण- (७७,९९९), बरे झालेले रुग्ण- (६१,९६०), मृत्यू- (२०३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(९), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३,९९५)

वर्धा: बाधित रुग्ण- (४२७६), बरे झालेले रुग्ण- (२७९२), मृत्यू- (६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४१४)

भंडारा: बाधित रुग्ण- (५७२३), बरे झालेले रुग्ण- (३९१०), मृत्यू- (१००), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७१३)

गोंदिया: बाधित रुग्ण- (७१८१), बरे झालेले रुग्ण- (४५७२), मृत्यू- (७२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५३७)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (१०,३९५), बरे झालेले रुग्ण- (५४९४), मृत्यू- (१४४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४७५७)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (२३१७), बरे झालेले रुग्ण- (१५८३), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७१८)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (१५८७), बरे झालेले रुग्ण- (४२८), मृत्यू- (१३९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०२०)

एकूण: बाधित रुग्ण-(१३,८४,४४६) बरे झालेले रुग्ण-(१०,८८,३२२),मृत्यू- (३६,६६२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(४२९),ॲक्टिव्ह रुग्ण-(२,५९,०३३)

(टीप: आज नोंद झालेल्या एकूण ४८१ मृत्यूंपैकी २३७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ११५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १२९ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १२९ मृत्यू  ठाणे -३७, पुणे -३५, नागपूर -८, नाशिक -७, कोल्हापूर -६, पालघर -६, सातारा -५, नांदेड -४, अकोला -३, बुलढाणा -३, परभणी -३, यवतमाळ -३, रत्नागिरी -२, सांगली -२, अहमदनगर -१, औरंगाबाद -१, रायगड -१ वाशिम – १ आणि मध्य प्रदेश -१ असे आहेत.  पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

मुख्यमंत्री भाडे भरा आंदोलन 3 ऑक्टोबर पासून राबविणार..-विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर

0

मुंबई दि. 30 सप्टेंबर- मुंबईत जुन्या इमारतींच्या आणि चाळींच्या गृहनिर्माणाच्या पुनर्विकासाचा प्रश्न सध्या ऐरणीवर असून सध्या हजारो लोक बेघर झाले आहेत. विकासकांकडून योग्य वेळी भाडे न मिळाल्यामुळे रहिवासी हवालदिल झाले आहेत. अश्या वेळी या बेघर लोकांच्या मागे सरकारने खंबीर पणे उभे राहणे अपेक्षित होते. मात्र सरकारने या प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज केली. तसेच मुंबईतील चाळीच्या किंवा म्हाडा वसाहतीतील गृहनिर्माण पुनर्वसन प्रकल्पातील बेघर झालेल्या आणि भाडया पासून वंचित असलेल्या रहिवाश्यांच्या पाठीशी भाजपा ठामपणे उभी राहणार असल्याचे दरेकर यांनी स्पष्ट केले.

भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दरेकर बोलत होते. यावेळी भाजपाचे मुंबई अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा व खासदार गोपाळ शेट्टी उपस्थित होते.
भाजपच्यावतीने मुंबईत मुख्यमंत्री भाडे भरा हे हस्ताक्षर आंदोलन मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात येणार आहे. हे आंदोलन 3 ते 10 ऑक्टोंबर पर्यंत संपूर्ण मुंबईत केलं जाईल. रखडलेले पुनर्विकास प्रकल्प व संक्रमण शिबिरात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे हस्ताक्षर घेऊन मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात येईल. तसेच म्हाडा वसाहतीत किंवा संक्रमण शिबिरातील रहिवाश्यांना भाड्यांमध्ये 50 टक्के सवलत द्यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येणार असल्याची माहिती दरेकर यांनी दिली.

मुंबईतील असंख्य म्हाडा गृहनिर्माण संस्थांचे पुनर्विकास प्रकल्प विकासकांनी स्वार्थी हेतूने किंवा अन्य कारणांनी रखडविले असून रहिवाश्यांची भाडीही बंद केली आहेत. त्यामुळे रहिवासी रस्त्यावर आले आहेत. त्यामुळे भाजपाच्यावतीने अत्यंत गरीब, अडचणीत असलेल्या झोपडपट्टी बांधवांच्या हक्कासाठी, सर्वसामान्य लोकांना दिलासा मिळवून देण्यासाठी तसेच सरकारचे डोळे उघडण्यासाठी आणि त्यांचे लक्ष आमच्या गरीब बांधवांच्या समस्यांकडे वेधण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.
दरेकर यांनी तीन चाकाचे हे सरकार ढिम्म असल्याची टीका करताना स्पष्ट केले की, पुनर्विकास प्रकल्पात आपल्याला घर मिळेल, म्हणून अनेकांनी आपले घर विकासकांकडे, म्हाडाकडे किंवा झोपडपट्टी प्राधिकरणाकडे दिली आहेत. बिल्डरकडून पर्यायी घराचे भाडे मिळेल, या आशेवर लोक होते. पण अद्यापही सुमारे 90 टक्के लोकांना बिल्डरकडून मिळणारे भाडे थांबलेले आहे. अश्या लोकांनी कोणाकडे बघावं. त्यांनी काय करायचे? यामध्ये काही सेवानिवृत्त लोक आहेत, हातावर पोट असणारे हे लोक आहेत, त्यांनी भाडे कुठून भरायचे ? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
यावेळी दरेकर म्हणाले की, हे सरकार पूर्णपणे झोपलेले आहे. ठाकरे सरकारच्या भोंगळ कारभारामुळे जनता त्रस्त आहे. आज पुनर्वसनाचे शेकडो प्रकल्प प्रलंबित आहेत. संक्रमण शिबिरात राहणारे हजारो लोक स्वतःच घर मिळावं याची वाट बघत आहेत. भाडे न मिळाल्यामुळे त्यांची आर्थिक स्थितीही हलाखीची झाली आहे. त्यामुळे या पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाश्यांना बिल्डरला भाडे देण्यासाठी सरकारने बंधनकारक करावे नाहीतर एसआरए किंवा म्हाडाने रहिवाश्यांना भाडे द्यावे. या मुद्द्यावर भाजपा सर्वेक्षण अभियानचे आयोजन करणार आहे. प्रत्येक लोकांच्या दरवाजावर आम्ही जाऊ, माहिती घेऊ, आणि ती सरकारसमोर मांडू, असेही त्यांनी यावेळी सांगितले..
कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात लाखो रहिवाश्यांना म्हाडाला घरभाडे भरणे शक्य नाही. म्हणून म्हाडा वसाहतीत किंवा संक्रमण शिबिरात राहणाऱ्या सर्वांना भाड्यामध्ये 50 टक्के सवलत द्यावी, अशीही आमची सरकारकडे मागणी आहे. काही पुनर्विकास प्रकल्प मुंबई किंवा मुंबई उपनगरात सुरू झाले, ते आज बंद आहेत. यात रहिवाश्यांची काही चूक नाही, पण ते बेघर आहेत. प्रकल्प पूर्ण होत नाहीत, त्यांना घर मिळत नाहीत, त्यांच्या बाबतीत सरकार काय निर्णय घेणार आहे ? त्या बिल्डर विरुद्ध सरकार फौजदारी कारवाई करणार का ? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुंबईमध्ये किंवा मुंबईच्या जवळ परवडणाऱ्या घरांच्या प्रकल्पांना परवानगी दिली पाहिजे, 1 मे च्या आत महाराष्ट्र 61 वर्षात पदार्पण करण्याच्या आत 30 हजार घर मुंबईमध्ये पुढील 2 वर्षात उपलब्ध होतील, अशा प्रकल्पाची आम्ही सुरुवात करतो आहोत व 24 तासात मंजुरी देण्यात येईल अशी घोषणा केली होती. पण आता 24 तास जाऊ द्या 8 महिन्यात सरकारने किती प्रकल्पांना मंजुरी दिली हे सरकार ने सांगावे असा टोलाही दरेकर यांनी मारला.
विरोधक शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत
शेती विधेयकाबाबत बोलताना दरेकर यांनी विरोधक शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला. या विधेयकामुळे विरोधकांचे राजकीय अड्डे उध्वस्त होतील अशी त्यांना भीती आहे, त्यामुळे या शेतकरी विधेयकाच्या विरोधात विरोधक दुटप्पी भूमिका घेत आहेत. या विधेयकामुळे एपीएमसीवर कसलाही परिणाम होणार नाही. उलट शेतकऱ्यांना मुक्त बाजारपेठ उपलब्ध होईल. यामध्ये ग्राहक व शेतकरी दोघांचाही फायदा आहे. दोन ऑक्टोंबर रोजी मुंबईत गांधीजींच्या 150 व्या जयंती निमित्त आत्मनिर्भर किसान बाजार 150 ठिकाणी सुरु करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले

महापालिकेच्या शहर सुधारणा समिती अध्यक्षपदी प्रसन्न जगताप

0

पुणे- महापालिकेच्या शहर सुधारणा समिती अध्यक्षपदी प्रसन्न जगताप, उपाध्यक्षपदी शीतल सावंत, क्रीडा समिती अध्यक्षपदी विरसेन जगताप, उपाध्यक्षपदी छाया मारणे, महिला बालकल्याण समिती अध्यक्षपदी माधुरी सहस्त्रबुद्धे, उपाध्यक्षपदी वृषाली चौधरी, विधी समिती अध्यक्षपदी मनीषा लडकत, उपाध्यक्षपदी मनीषा कदम यांची निवड झाली आहे.

या चारही समित्यांवर भाजपचे स्पष्ट बहुमत आहे. भाजपच्या चारही उमेदवारांना प्रत्येकी 8 तर, महाविकास आघाडीच्या उमेदवारांना प्रत्येकी 5 मते मिळाली. या समित्यात भाजपचे 8, राष्ट्रवादी 3, काँग्रेस आणि शिवसेना प्रत्येकी 1-1 सदस्य आहेत.

भाजपच्या विजयी उमेदवारांचा महापौर मुरलीधर मोहोळ, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले,उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे, , नगरसेवक प्रविण चोरबेले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या निवडणुकीसाठी समाजकल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे पीठासीन अधिकारी म्हणून तसेच प्रभारी नगरसचिव शिवाजी दौंडकर उपस्थित होते.