Home Blog Page 2429

सीमा तपासणी नाक्यांवरील असुविधा तातडीने दूर करा

0

मुंबई, दि.  13 :  सीमा तपासणी नाक्यांवरील असुविधा तातडीने दूर होणे तसेच टोलवसुली ठेकेदारांच्या कार्यपद्धतीत सुधारणा होणे आवश्यक आहे.  वाहनचालक आणि मालवाहतुकदार यांच्याकडून यासंदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत आहेत.  सीमा तपासणी ठेकेदारांकडून करारातील तरतुदींची पूर्तता केली जात नसल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.  यासंदर्भात एक महिन्याच्या आत सुधारणा न झाल्यास संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.

सीमा तपासणी नाका ठेकेदारांच्या कामकाजाविषयी व शासनाबरोबरच्या करारातील तरतुदींची अंमलबजावणी होत नसल्याच्या तक्रारींबाबत विधानभवन, मुंबई येथे उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली.  यावेळी परिवहन विभागाचे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, उपायुक्त जितेंद्र पाटील, कार्यकारी अभियंता रस्ते विकास महामंडळ मुक्तेश वाडकर, वस्तू व सेवा कर सह आयुक्त संपदा मेहता, उपसचिव गृह (परिवहन) विभागाचे प्रकाश साबळे, अवर सचिव द.ह.कदम तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

कॅगच्या अहवालानुसार काही वाहनांवर कारवाई करण्यात आली तर काही वाहनांवर कारवाई न करता सोडण्यात आले.  तपासणी नाक्यांवर वाहनांची संख्या कमी दर्शविण्यात आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.  तसेच नाक्यावरील टोल वसुलीत फरक असल्याचे निदर्शनास आले आहे.  ठेकेदार कंपनीने आवश्यक कार्य पूर्ण केले नाही तसेच निविदेनुसार खर्चही केला नाही.  सीमा तपासणी नाक्यावर घेण्यात येणाऱ्या शुल्कावर वस्तु व सेवा कर आकारला जातो.  वाहनांची संख्या कंपनीकडून कमी दाखवण्यात येते.  यात वस्तु व सेवा कर चुकवला जातो, असे निदर्शनास आले आहे. अशी माहिती यावेळी देण्यात आली.

या कंपनीसोबतच्या करारानुसार सीमातपासणी नाका संगणकीकरण व आधुनिकीकरण करण्याचा करार करण्यात आला असून महाराष्ट्र राज्याच्या परिवहन विभागातर्फे राज्यातील 22 तपासणी नाक्यांचे आधुनिकीकरण व संगणकीकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.  यानुसार तपासणी नाक्यावरील बांधकाम करणे, आवश्यक त्या संगणकीय सेवा उभारणे या कामांसाठी महाराष्ट्र बॉर्डर चेकपोस्ट नेटवर्क लि. या संस्थेची सेवापुरवठादार म्हणून निवड करण्यात आली असून परिवहन विभाग व सेवापुरवठादार यांच्यामध्ये करार झाला आहे.  योग्य संख्येत मार्गिकांचे बांधकाम असणे जेणेकरुन वाहनांचा खोळंबा होणार नाही,  इंधनाची नासाडी होणार नाही तसेच स्त्री व पुरुषांसाठी स्वतंत्र सुलभ शौचालय असणे, रुग्णवाहिका, क्रेन, उपहारगृह आदि सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. करारातील या तरतुदींची तातडीने पूर्तता करण्यात यावी, असे निदेश यावेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.

मुंबईतील वीजपुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही- ऊर्जा मंत्री नितीन राऊतांना संशय

0

मुंबईसह उपनगरात वीज पुरवठा काही काळासाठी खंडीत झाला होता. याविषयी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी खळबळजनक विधान केले आहे. मुंबई, नवी मुंबईचा वीजपुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येणार नाही असे ट्वीट ऊर्जा मंत्री नितीन राऊतांनी केले आहे.

मुंबईमध्ये काही ठिकाणी अडीच तर उपनगरांमधील काही भागांमध्ये सहा ते आठ तास वीजपुरवठा खंडित झालेला होता. या प्रकरणी कसून चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते.महापारेषणच्या पडघा उपकेंद्रातील उच्चदाब वीज वाहिनीत बिघाड झाल्यामुळे सोमवारी मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि रायगडमधील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाल्याचे पाहायला मिळाले होते. काही तास ही बत्ती गुल झाल्यामुळे रेल्वे, रस्ते वाहतुकीसह दैनंदिन व्यवहारांना फटका बसल्याचे पाहायला मिळाले होते. यासोबतच मुंबई, ठाणे परिसरात जनजीवनही विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र, वीज पुरवठा खंडित होण्यामागे राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी धक्कादायक ट्विट केल्याने यावर चर्चा होत आहे.

राज्यात दिवसभरात ८ हजार ५२२ नवीन रुग्ण : १५ हजार ३५६ रुग्ण बरे होऊन घरी

0

मुंबई, दि.१३: राज्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १३ लाखांच्या उंबरठ्यावर असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४ टक्क्यांवर पोहोचले आहे.  आजही सलग दुसऱ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पट नोंदवली गेली आहे. दिवसभरात ८ हजार ५२२ नवीन रुग्ण आढळून आले तर त्याच्या दुप्पट १५ हजार ३५६ रुग्ण बरे होऊन घरी  गेले.  रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८४.३ टक्के एवढे झाले आहे. राज्यातील उपचाराखाली असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या देखील कमी होऊन २ लाख ५ हजार ४१५ एवढी कमी झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७७ लाख ६२ हजार ००५ नमुन्यांपैकी १५ लाख ४३ हजार ८३७ नमुने पॉझिटिव्ह (१९.८९ टक्के) आले आहेत. राज्यात  २३ लाख ३७ हजार ८९९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २५ हजार ८५७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज १८७ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे.

शिर्डीतील साधूसंतांना अटक करण्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील – आ.पाटील (व्हिडिओ)

0

मुंबई, १३ ऑक्टोबर २०२०-शिर्डीच्या साईबाबांकडे गाऱ्हाणे मांडण्यास गेलेल्या साधूसंतांना अटक करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने राज्यात मोगलाई अवतरल्याचे दाखवून दिले असून हिंदू भाविकांवर दादागिरी करणाऱ्या या कृतीचा आपण भारतीय जनता पार्टीतर्फे तीव्र निषेध करतो. हिंदुत्वाच्या प्रमाणपत्राची गरज नाही, असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खरे रूप या प्रसंगातून महाराष्ट्राला दिसले आहे, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी मंगळवारी सांगितले.

ते म्हणाले की, मंदिरे तातडीने उघडावीत या मागणीसाठी मंगळवारी भाविकांनी राज्यव्यापी लाक्षणिक उपोषण केले. शिर्डी येथे साईबाबांच्या प्रतिमेचे पूजन करून झालेल्या सत्याग्रहात आपण स्वतः सहभागी झालो होतो. लाक्षणिक उपोषणानंतर साईबाबांचे दर्शन घेऊन त्यांच्याकडे गाऱ्हाणे मांडण्यासाठी साधू संत मंदिरात जाणार होते. त्यासाठी सकाळी दहा वाजताच शिर्डीच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले होते. सायंकाळी पाच वाजेपर्यंत निर्णय झाला नसल्याने वाट पाहून सर्वजण अध्यात्मिक समन्वय आघाडीचे समन्वयक आचार्य तुषार भोसले यांच्यासह मंदिराच्या गेटपर्यंत गेले. तेथे त्यांना पोलिसांनी अडवले. दीडतास चर्चेचा घोळ चालू होता. अखेरीस शिर्डीचे संस्थानचे प्रमुख म्हणून मुख्याधिकारी बाहेर आले व त्यांनी साधू संतांना सांगितले की, आपले शासनाशी बोलणे झाले असून दर्शनाची परवानगी देऊ शकत नाही व हा निर्णय अंतिम आहे. यानंतर पोलिसांनी थेट साधूसंतांना अटक केली. निर्वाणी आखाड्याचे महंत सुधीरदास, वारकरी महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश महाराज जवंजाळ, भाऊमहाराज फुरसुंगीकर, धर्माचार्य विभागप्रमुख, आचार्य जिनेंद्र जैन, सतपंथाचे रितेश पटेल यांच्यासह अन्य साधूसंत व किर्तनकार यांना अटक केली. साईबाबांच्या दर्शनासाठी शांततेने विनंती करणाऱ्या साधूसंतांना सरकारने परवानगी तर दिलीच नाही उलट त्यांना अटक केली. राज्यात मोगलाई अवतरल्याचेच हे लक्षण आहे.

त्यांनी सांगितले की, राज्यातील शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात साधू संतांवर हल्ले होण्याच्या निंदनीय घटना घडल्या आहेत. पालघर जिल्ह्यात पोलिसांच्या साक्षीने जमावाने साधूंना ठेचून मारले. नांदेडमध्ये ब्रह्मचारी शिवाचार्य निर्वाणरुद्र पशुपतीनाथ महाराजांची हत्या करण्यात आली. अयोध्या येथे श्रीरामजन्मस्थानी भव्य मंदिराचे भूमीपूजन झाले म्हणून आनंद व्यक्त करणाऱ्या रामभक्तांवर ठाकरे सरकारने कारवाई केली. आता साईबाबांचे दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या साधूसंतांना अटक करून या सरकारने आपले खरे रंग दाखविले आहेत. भाजपातर्फे आपण राज्य सरकारचा निषेध करतो.

महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ पुनर्जिवीत करण्यासाठी शासन प्रयत्नशील – महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

0

मुंबई, दि. 13 : कोरोना काळात घरगुती काम करणाऱ्या महिलांना बेरोजगारीचा, आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. या असंघटित क्षेत्रातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनाचा भाग असलेले महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ पुनर्जिवीत होणे गरजेचे असून त्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीने तसेच मंडळाचे बळकटीकरण करुन या मंडळाद्वारे नव्या योजना राबविण्यासाठी अधिकाऱ्यांनी कृतीआराखडा तयार करावा, असे निर्देश महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले.

घरगुती कामगारांची कामगार कायद्यान्वये नोंदणी, त्यांच्या मुलांचे शिक्षण, कौशल्य प्रशिक्षण देणे आदींच्या अनुषंगाने ॲड. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी कामगार विभागाच्या सचिव श्रीमती विनिता वेद सिंगल, कौशल्य विकास विभागाच्या सचिव श्रीमती अंशु सिन्हा, आयुक्त दिपेंद्रसिंह कुशवाह, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा श्रीमती सुशीबेन शहा, महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाचे सरचिटणीस उदय भट यांच्यासह नीला लिमये, श्रीमती क्रिस्टिना, महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समिती, कामगार एकता युनियन आदींचे प्रतिनीधी उपस्थित होते.

यावेळी ॲड. ठाकूर म्हणाल्या, घरगुती कामगार, मदतनीस यांची शहरात महत्त्वाची भूमिका असते. एकूण घरगुती कामगारांपैकी 95 टक्के महिला आहेत. कोरोना कालावधीमध्ये असंघटित क्षेत्रातील महिला आणि त्यांचे कुटुंब आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. या महिलांना संघटित करण्यासाठी, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ पुनर्जिवीत करण्यासाठी प्रयत्नशील राहू. या मंडळाच्या माध्यमातून सद्यस्थितीत सुरु असलेल्या योजनांच्या व्यतिरिक्त नव्या कल्याणकारी योजना राबविता येतील. तसेच या महिला कामगारांना इतर कौशल्य विकासाबाबत प्रशिक्षण देण्याकरिता ठोस कार्यक्रम हाती घेण्यासाठी विभागाने प्रयत्नशील रहावे. केंद्र सरकारच्या नव्या कामगार कायद्यात घरेलू कामगारांसाठी स्वतंत्र यंत्रणा नाही; मात्र महाराष्ट्रात घरेलू कामगार मंडळ अस्तित्वात असून या मंडळाची स्वायत्तता राहावी यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या.

सचिव श्रीमती विनिता वेद सिंगल यांनी या कामगार महिलांकरिता निधी उभारण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले. राज्यातील साधारण 3.65 कोटींपैकी 50 लाख कामगार संघटित क्षेत्रात येतात. इतर सर्व कामगारांच्या नोंदणाकरिता जिल्हा स्तरावर लवकरच नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात येणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

श्रीमती सुशीबेन शहा यांनी घरेलू कामगार महिलांकरिता धोरणात्मक योजना राबविण्याची गरज असल्याचे सांगत, कल्याण मंडळाकडून होणारी नोंदणी विनाशुल्क आणि प्रभावीपणे व्हावी यासाठी शासनाने प्रयत्न करावे अशी मागणी केली.

दसरा, दिवाळीत चिनी वस्तूंवर बहिष्कार घाला ;भाजप चिटणीस सुनील माने यांचे व्यापारी महासंघाला आवाहन

0

पुणे :  दसरा, दिवाळी हे सण जवळ येत आहेत, या सणांच्या पार्श्वभूमीवर भारतात चिनी वस्तू स्वस्तात विकून भारतीय बाजारपेठ काबीज करण्याचा चीनचा कुटील डाव आहे. चीनचा हा कुटील डाव उधळून लावून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेला बळ द्या, असे आवाहन भाजप चिटणीस सुनील माने यांनी आज व्यापारी महासंघाला केले. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांना त्याबाबतचे पत्र दिले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपा पुणे व्यापारी आघाडीचे अध्यक्ष महेंद्र व्यास उपस्थित होते.सुनील माने म्हणाले, लोकसंख्येचा विचार करता जगात भारताचा चीननंतर दुसरा क्रमांक लागतो. म्हणूनच व्यापाराच्या दृष्टीने भारत ही एक मोठी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते. सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर भारतात लोक मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात.याचाच फायदा घेऊन चीन आपल्या वस्तूंची भारतात स्वस्तात विक्री करते. तुलनेने चायनीज वस्तू स्वस्त असल्याने ग्राहकांचा या वस्तू खरेदी करण्यावर भर असतो. मात्र अशा वस्तू स्वस्तात विकून चीनचा भारतीय बाजारपेठ काबीज करण्याचा कुटील डाव आहे. सातत्याने भारताविरुद्ध भूमिका घेऊन चीन भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करते, सीमेवर चीन वारंवार भारतीय सैन्याच्या कुरापती काढत आहे. त्याला भारतीय लष्कर चोख प्रत्युत्तर देत आहे. मात्र चीन मधून येणाऱ्या वस्तूंवर बहिष्कार घालून आपण ही आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांनी देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी ‘ आत्मनिर्भर भारत’ हा नारा दिला आहे. याप्रमाणे आपण भारतीय बनावटीच्या वस्तू विकण्यास प्राधान्य दिल्यास, देशातील पैसा देशातच राहील. या पैशाचा वापर आपल्याला देशातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी होईल. म्हणूनच मोदीजींच्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी आपण चिनी बनावटीच्या वस्तू विकण्यावर बहिष्कार घातला पाहिजे. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत. देशहितासाठी चिनी वस्तूंची कमीत कमी विक्री करण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

“राज्यपाल पदावर बसलेल्या व्यक्तीच्या वागण्याचा खेद वाटतो”

0

शरद पवारांनी थेट मोदींना लिहिले पत्र

मंदिरं उघडण्यासंबंधी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शरद पवार यांनी यासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. ट्विटरला त्यांनी हे पत्र शेअर केलं आहे.

यामध्ये त्यांनी राज्यपालांनी एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याला पत्र लिहिल्यासारखं भासत असल्याचं म्हटलं आहे. तसंच राज्यपाल पदावर बसलेल्या व्यक्तीच्या वागण्याचा खेद वाटत असल्याचं सांगितलं आहे.

शरद पवारांनी पत्रात म्हटलं आहे की, “सध्या आपण सर्वजण करोना संकटाशी लढत आहोत. करोनाला रोखण्यासाठी तुम्ही अंतर ठेवण्यासंबंधी घोषणा दिली होती. महाराष्ट्रात मुक्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वाखाली ‘माझं घर माझं कुटुंब’ मोहीम राबवण्यात आली असून लोकांना सोशल डिस्टन्सिंगबद्दल शिक्षण दिलं जात आहे”. शरद पवारांनी यावेळी राज्यपालांनी लिहिलेल्या पत्राचा उल्लेख करताना राज्यात अनेक महत्त्वाची धार्मिकस्थळं असल्याचं म्हटलं आहे. “सिद्धिविनायक, विठ्ठल मंदिर, शिर्डी साईबाबा मंदिर तसंच इतर ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळणं शक्य नसल्याचं,” त्यांनी सांगितलं आहे.

‘सोनिया सेना बाबरच्या सेनेपेक्षा वाईट’; मंदिरे उघडण्याच्या वादात कंगना रनोटची भाजपच्या बाजूने उडी

0

मुंबई -‘सोनिया सेना बाबराच्या सेनेपेक्षा वाईट असल्याचे म्हणत कंगना रनोटने उद्धव ठाकरे आणि सरकारवर टीका केली आहे. कंगनाने ट्विट केले की, माननीय राज्यपालांनी गुंडा सरकारला प्रश्न विचारला, हे ऐकून छान वाटले. या गुंडा सरकारने बार आणि रेस्टॉरंट्स उघडले पण मुद्दामुन मंदिरे बंद ठेवली. सोनिया सेना ही बाबराच्या सेनेपेक्षा वाईट आहे,’ असे ट्वीट कंगनाने केले.

राज्यातील मंदिर खुली करण्याची मागणी भाजपकडून दिवसेंदिवस जोर धरत असतानाच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंदिर खुली करण्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं असून काही सवाल उपस्थित केले. लॉकडाउन शिथिल केला जात असताना आणि एकीकडे बार, रेस्टॉरंट खुली करत असताना देवीदेवतांना मात्र अजूनही कुलूपबंद का ठेवलं जात आहे? असा सवाल राज्यपाल कोश्यारी यांनी केला. त्या पत्रावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्राद्वारेच राज्यपालांना उत्तर दिलं. करोनाचा धोका लक्षात घेता मंदिरं उघडणं अद्याप शक्य होत नसून यावर लवकरच निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन त्यांनी याद्वारे दिलं. या पत्रांमुळे ठाकरे सरकार आणि राज्यपाल कोश्यारी यांच्या वाद पुन्हा एकदा स्पष्ट झाले. पण याचदरम्यान, अभिनेत्री कंगना राणौत हिने या वादात उडी घेतली.

राज्यपाल कोश्यारी यांनी पत्रात उद्धव ठाकरे यांना त्यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेची आठवण करून दिली होती. तर हिंदुत्वासाठी मला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही, असं उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं होतं. यात कंगनानेही एक ट्विट केलं. “हे पाहून आनंद झाला की ‘गुंडा सरकार’ला राज्यपाल प्रश्न विचारत आहेत. राज्यपाल महोदय, गुंडा सरकारने बार आणि रेस्टॉरंट उघडण्याची परवानगी दिली आहे, पण मंदिरं मात्र योजनाबद्ध पद्धतीने बंद करून ठेवली जात आहेत. ही सोनिया सेना तर बाबरसेनेपेक्षाही वाइट वर्तणुक करताना दिसते आहे”, असं ट्विट अभिनेत्री कंगना राणौतने केलं.

राज्यपालांच्या ‘त्या’ पत्राला सीएम ठाकरेंचे ‘तसेच ‘उत्तर

0

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवत हिंदुत्वावावरुन डिवचले होते. आता यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही उत्तर दिले. माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही असे म्हणत त्यांनी खोचक शब्दांमध्ये त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

पत्रात काय म्हणाले होते राज्यपाल?
हिंदुत्वाचे आपण खंदे पुरस्कर्ते आहात. धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय पुढे ढकलण्यासाठी आपल्याला कोणतीही दैवी सूचना मिळतेय की तुम्ही ज्या शब्दाचा तिरस्कार करत होता, ती ‘धर्मनिरपेक्षता’ तुम्ही अंगिकारली? आहे’ असा उपरोधिक सवाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी विचारला होता.

यावर कडाडले उद्धव ठाकरे
‘माझ्या हिंदुत्वाचा आपण जो उल्लेख केला, तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नसल्याचे ठाकरे म्हणाले. पुढे ते म्हणाले की, तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही असे म्हणत त्यांनी राज्यपालांना सुनावले आहे.

हिंदुत्वाविषयी बोलताना ठाकरे म्हणाले की, माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मिर म्हणणाऱ्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही. तसेच हिंदुत्वाविषयी तुम्हाला असा प्रश्न आपल्याला का पडावा? केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्व आणि नउघडणे म्हणजे Secular असे आपणास वाटते का? मग आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत त्या घटनेचा महत्वाचा गाभा ‘Secularism’ आहे तो आपल्याला मान्य नाही का? असा उलट सवालही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यपालांना लिहिलेले पत्र

माननीय राज्यपालमहोदय , महाराष्ट्र राज्य यांसी – जय महाराष्ट्र , महोदय आपले दिनांक १२।१०।२० रोजीचे इंग्रजीमध्ये पाठवलेले प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दलचे पत्र मिळाले. या बद्दल सरकार जरूर विचार करत आहे.जनतेच्या भावना, श्रद्धा जपताना त्यांच्या जीवाची काळजी घेणे हे आमच्या सरकारचे प्रथम कर्तव्य आहे, आणि म्हणूनच करोनाशी लढताना जसा एकदम लॅाकडाऊन करणे चुकीचे तसेच तो एकदम उठवणेही अयोग्यच. करोनासोबत अथवा त्याचा धोका टाळून जगणे हे अंगवळणी पडावे म्हणून सद्ध्या राज्यात ‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी ‘ हि मोहीम राबवली जात आहे. आरोग्यविषयी सुचना देणे , जनजागृती करणे , आरोग्य तपासणी करणे, आवश्यकतेनुसार चाचणी व उपचार करणे हे सर्व आपल्या राज्यातील डॅाक्टर्स आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स , आंगणवाडी सेविका नागरिकांच्या घरोघरी जाऊन करत आहेत. याची आपल्याला कल्पना असेलच. कदाचित असा प्रयत्न करणारे महाराष्ट्र हे एकमेव अथवा पहिले राज्य असेल. महोदय आपण या पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही.माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मिर म्हणणार्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही . Have you suddenly turned ‘Secular’ yourselves, the term you hated? असा प्रश्न आपल्याला का पडावा? केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्व आणि नउघडणे म्हणजे Secular असे आपले म्हणणे आहे का? मग आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत त्या घटनेचा महत्वाचा गाभा ‘Secularism’ आहे तो आपल्याला मान्य नाही का? मला या संकटाशी लढताना काही divine premonition येतात का? असाही प्रश्न आपणांस पडला आहे, आपल्याला अशा गोष्टींचा अनुभव असेल मात्र मी एवढा थोर नाही . इतर राज्यांत, देशात बरे वाईट काय घडते आहे ते बघत माझ्या महाराष्ट्रात चांगले कसे करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतो आहे. आपण म्हणतां गेल्या ३ महिन्यात काही शिष्टमंडळांनी भेटून आपल्याला प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दल विनंती केली, त्यातील ३ पत्रे आपण सोबत जोडली आहेत. हि तिनही पत्रे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि समर्थकांची आहेत. हा योगायोग असू शकतो. असो आपल्या विनंतीचा महाराष्ट्र सरकार गांभिर्याने विचार करत असून सर्व काळजी घेवून लवकरात लवकर याबाबत निर्णय घेतला जाईल हि खात्री मी आपल्याला देतो.

भोजपुरी सिनेअभिनेते सुदीप पांडे आणि दीपा पांडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश…

0

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई प्रदेश कार्यालयात पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार प्रफुल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत भोजपुरी सिनेअभिनेते सुदीप पांडे आणि दीपा पांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

यावेळी प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे उपस्थित होते.

संत, महंत, वारकऱ्यांच्या संयमाची परीक्षा पाहू नका-आ.चंद्रकांतदादा पाटील

0
  • मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी भाजपाच्या राज्यव्यापी आंदोलनाला मोठा प्रतिसाद

संत, महंत, वारकरी मंडळींच्या संयमाची आणखी परीक्षा न पाहता महाआघाडी सरकारने राज्यातील मंदिरे आणि अन्य धर्मियांची प्रार्थना स्थळे उघडण्यास त्वरीत परवानगी द्यावी. संत, महंत, वारकरी संप्रदायातील मंडळींवर मंदिरांत जबरदस्तीने घुसण्याची वेळ आणू नका, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी मंगळवारी दिला.

राज्यात मंदिरे आणि अन्य धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी द्यावी या मागणीसाठी भाजपातर्फे आज राज्यभर आंदोलन करण्यात आले. या मागणीसाठी शिर्डी येथे लाक्षणिक उपोषण करणाऱ्या संत- महंतांची , कार्यकर्त्यांची भेट घेण्यासाठी मा. पाटील शिर्डी येथे आले होते. त्यावेळी ते बोलत होते. राज्यभरात शेकडो ठिकाणी मंदिराबाहेर आंदोलन करण्यात आले. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर , राष्ट्रीय प्रवक्त्या खा. हीना गावीत , प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भारती पवार यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी , लोकप्रतिनिधी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, कोरोना च्या प्रसारामुळे अनेक महिने सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. मात्र हळूहळू सर्व व्यवहार सुरु होत आहेत. वारकरी , संत महंत मंडळी क्षमाशील आहेत. आषाढी यात्रेची हजारो वर्षांची परंपरा यावर्षी खंडीत करण्यासही वारकरी संप्रदायाने परवानगी दिली . मात्र सर्व व्यवहार सुरु होत असताना मंदिरे उघडण्यास परवानगी न देण्याचा आघाडी सरकारचा निर्णय अनाकलनीय आहे.

शिर्डी येथे श्री साईबाबांच्या प्रतिमेचे पूजन व आरती करुन राज्यव्यापी लाक्षणिक उपोषणाला सुरुवात झाली. आध्यात्मिक समन्वय आघाडी चे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांच्या नेतृत्वाखाली निर्वाणी आखाड्याचे महंत सुधिरदास महाराज, वारकरी महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश महाराज जवंजाळ, सुदर्शन महाराज महानुभाव, भाऊ महाराज फुरसुंगीकर, संजयनाना महाराज धोंडगे, आचार्य जिनेंद्र जैन, कैलास महाराज देशमुख, रितेश पटेल, बबनराव मुठे आदिंसह अन्य साधु-संत-वारकरी उपोषणात सहभागी झाले होते .

आचार्य तुषार भोसले म्हणाले की , केंद्र सरकारने मागील महिन्यात लॉकडाऊन शिथील करताना मंदिरे उघडण्यासही परवानगी दिली आहे. मात्र महाआघाडी सरकारने मंदिरे उघडण्यास अजून परवानगी दिली नाही. एकीकडे बार सुरु करण्यास परवानगी दिली जाते आहे . मात्र मंदिरे उघडण्यास परवानगी नाकारली जाते आहे. वारकरी संघटनांचे प्रतिनिधी , संत , महंत मंडळींनी गेल्या महिन्यात राज्यात शेकडो मंदिरांत घंटानाद करून मंदिरे उघडण्याची विनंती केली होती. मात्र मुक्या , बहिऱ्या आणि आंधळ्या सरकारने आमची विनंती ऐकलेली नाही. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगणाऱ्या उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व प्रेम बेगडी आहे , हेच यातून दिसते आहे.

मुंबईत लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सिद्धिविनायक मंदिरासमोर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या 49 हजार 250

0

पुणे विभागातील 4 लाख 13 हजार 88 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 4 लाख 75 हजार 166 रुग्ण-विभागीय आयुक्त सौरभ राव


पुणे,दि.13 :- पुणे विभागातील 4 लाख 13 हजार 88 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 लाख 75 हजार 166 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 49 हजार 250 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 12 हजार 828 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.70 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 86.94 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 7 हजार 852 रुग्णांपैकी 2 लाख 71 हजार 652 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 29 हजार 107 आहेत. कोरोनाबाधित एकूण 7 हजार 93 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.30 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 88.24 टक्के आहे.

सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 41 हजार 834 रुग्णांपैकी 33 हजार 871 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 6 हजार 589 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 374 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 37 हजार 98 रुग्णांपैकी 30 हजार 519 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 305 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 274 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 41 हजार 469 रुग्णांपैकी 35 हजार 892 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 48 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 529 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 46 हजार 913 रुग्णांपैकी 41 हजार 154 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 201 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 558 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ –
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 825 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 988, सातारा जिल्ह्यात 223, सोलापूर जिल्ह्यात 251, सांगली जिल्ह्यात 298 तर कोल्हापूर जिल्ह्यात 65 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण –
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 4 हजार 593 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 3 हजार 126 ,सातारा जिल्हयामध्ये 338, सोलापूर जिल्हयामध्ये 237, सांगली जिल्हयामध्ये 509 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 383 रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 21 लाख 32 हजार 787 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 4 लाख 75 हजार 166 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.


( टिप :- दि. 12 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

जम्बो रुग्णालयातील सर्व तंबू अग्निरोधक

0
  • अग्निशमनाची अद्ययावत सुसज्ज यंत्रणा, दोन फायरब्रिगेडच्या गाड्या

पुणे : जम्बो कोविड रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणा अद्ययावत सुविधांनी सुसज्ज असून, रविवारी रुग्णालयाच्या परिसरात झालेले स्पार्किंग अवघ्या एका मिनीटच्या आत नियंत्रित यश आले, असल्याची माहिती तेथील अग्निशमन यंत्रणांनी दिली. शिवाजीनगर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर कोरोनाबाधीत रुग्णांच्या उपचारांसाठी अद्ययावत सुविधांनी सुसज्ज कोविड रुग्णालय उभारण्यात आले आहे. रुग्णालयाच्या परिसरात प्रशासकीय कार्यालय आहे. कार्यालयाच्या बाहेरील काँम्प्रेसरमधील तापमान वाढले. त्यामुळे त्यातील रबरी आवरण वितळू लागले. त्यातून बाहेर धूर येऊ लागला. याच टप्प्यावर तातडीने जवळच असलेल्या सिलिंडरमधील कार्बनडाय आँक्साइड फवारून ते स्पार्किंग नियंत्रणात आणले.

जम्बो रुग्णालयात अग्निशमन अद्ययावत सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तेथे पुणे महापालिकेची एक अग्निशमनाची गाडी असून, पुणे महानगर प्रादेश विकास प्राधिकरणचीही (पीएमआरडीए) एक गाडी तैनात करण्यात आली आहे. या दोन्ही यंत्रणांचे प्रशिक्षित मनुष्यबळ तेथे उपलब्ध आहे. तसेच, दीपाली डिझाईन एक्सिबिट प्रायव्हेट लिमीटेड कंपनीनेही मनुष्यबळ आणि अग्निशमनाची पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

या बद्दल माहिती देताना दीपाली डिझाईन एक्सिबिट प्रायव्हेट लिमीटेड कंपनीचे अग्निशमन यंत्रणा नियंत्रित करणारे सुनील घेणे म्हणाले, “कोविड रुग्णालयात जागोजागी अग्निशमनाची यंत्रणा बसविण्यात आली आहे. प्रत्येक काँम्प्रेसर, जनरेटर, अतीदक्षता विभाग, आँक्सिजन पाईपलाईन या प्रत्येक ठिकाणी अग्निशमन सिलिंडर ठेवण्यात आला आहे. यांची संख्या 192 आहे. तसेच, 27 ठिकाणी आग विझविण्यासाठी पाण्याची यंत्रणा उभारण्यात आली आहे. तीस फुटांपर्यंत उच्च दाबाने पाणी फवारून अत्यंत कमी वेळेत आग नियंत्रित करण्याची क्षमता येथील अग्निशमन यंत्रणेमध्ये आहे. जम्बो रुग्णालयाच्या परिसरात तीन लाख लिटर पाणी साठविले आहे. त्यातील दोन लाख लिटर पाणी टाक्यामध्ये असून, एक लाख लिटर पाणी अग्निशमन यंत्रणेतील जलवाहिन्यांमध्ये आहे.”

पीएमआरडीएचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे म्हणाले, “अवघ्या एक ते दीड मिनटांमध्ये रविवारी झालेले स्पार्किंग नियंत्रणात आणले. त्यामुळे येथे कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका यांनाही अग्निशमनाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे आपत्कालीन स्थितीत नेमके कोणी काय करायचे याचा समावेश या प्रशिक्षणात आहे.”

पुणे महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे म्हणाले, “रुग्णालयातील सर्व तंबू अग्निरोधक आहेत. त्यामुळे हे तंबू पटकन आग पकडणार नाहीत, अशी व्यवस्था यात करण्यात आली आहे. तसेच, नॅशनल बिल्डिंग कोड आणि महाराष्ट्र फायर प्रिव्हेंशनल अँक्ट याच्या तरतूदींप्रमाणे सर्व यंत्रणा येथे सज्ज करण्यात आल्या आहेत. प्रिंकलर, डेटेक्टर, मॅन्यूल फॉल पाँइंट, हाड्रन्स अशा सुविधा येथे आहेत. एखाद्या इमारतीला ज्या-ज्या व्यवस्था केल्या जातात, त्या सर्व या ठिकाणी केल्या आहेत.”

अपहृत वकिलाच्या शीघ्र तपासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेलचे पोलिस आयुक्तांना निवेदन

0

पुणे :-ॲड उमेश चंद्रशेखर मोरे या अपहृत वकिलाचा तपास शीघ्र गतीने करण्यात यावा या मागणीसाठी  राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेलचे  पुणे शहर अध्यक्ष अँड लक्ष्मण राणे, प्रदेश सरचिटणीस अँड पंडितराव कापरे, प्रदेश चिटणीस अँड समीर शेख आणि जेष्ठ वकील अँड सुभाष गायकवाड यांनी पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता याना  निवेदन दिले.या तपासासाठी पोलिसांची टीम बनवून तातडीने शोध कार्य करण्याचे आदेश अमिताभ गुप्ता यांनी दिले.    
ॲड उमेश चंद्रशेखर मोरे पुणे जिल्हा न्यायालय, पुणे परिसरातून दि १ ऑकटोबर  पासून बेपत्ता झालेले आहेत .अज्ञात व्यक्तींनी त्यांचे अपहरण केलेले असावे, असे त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यांचे बंधू प्रशांत मोरे  यांनी शिवाजी नगर पोलिस स्टेशन येथे तशी तक्रार दाखल केलेली आहे. तथापि बारा दिवस झाले तरी अद्याप ॲड. उमेश  मोरे यांचा थांगपत्ता लागलेला नाही. त्यांची गाडी शिवाजीनगर कोर्ट परिसर मध्ये आढळली  आहे. त्यांची पत्नी, वृद्ध आई- वडील, भाऊ सर्व चिंतेत आहेत.
 भर दिवसा त्यांचे कोर्ट परिसरातून बेपत्ता होणे वकिलांचे दृष्टीने अत्यंत चिंतेची व गंभीर  बाब झालेली आहे. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लिगल सेल, पुणे शहर तर्फे अध्यक्ष अँड लक्ष्मण राणे, प्रदेश सरचिटणीस अँड पंडितराव कापरे, प्रदेश चिटणीस अँड समीर शेख आणि जेष्ठ वकील अँड सुभाष गायकवाड यांनी सोमवारी दुपारी  दुपारी पुणे  पोलीस आयुक्त   यांची  भेट घेऊन ही  बाब त्यांचे निदर्शनास आणली व त्यांना जलद तपासाची  विनंती केली. तसे लेखी निवेदन दिले

कुंभकर्णी निद्रेतील महाविकासआघाडी सरकारला जागे करण्यासाठी भाजपचे अभिनव आंदोलन

0

पुणे, ता. १३ – श्रध्दावंत भाविकांसाठी देवालयाची दारे उघडी करता येत नसतील, तर झोपी गेलेल्या ढोंगी, भ‘ष्टाचारी महाविकास आघाडी सरकारने सत्तेतून पायउतार व्हावे, अशी मागणी पुणे शहर भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली.
कुंभकर्णी निद्रेत असलेल्या महाआघाडी सरकारला जागे करण्यासाठी आज शहर भाजपने शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली ग‘ामदेवता श्री तांबडी जोगेश्‍वरी मंदिरासमोर अभिवन आंदोलन केले. झोपी गेलेल्या कुंभकर्णरूपी सरकारला जाग आणण्यासाठी भजन, घंटानाद, शंखनाद करण्यात आला. या आंदोलनाच्या समारोप प्रसंगी मुळीक बोलत होते.
कोरोनामुळे बंद झालेले व्यवहार आता पूर्ववत सुरू होऊ लागले आहेत. परंतु गेल्या साडेसहा महिन्यांपासून बंद असलेली मंदिराचे दरवाजे उघडायला सरकार तयार नाही. त्यासाठी विविध राजकीय पक्ष, धार्मिक संस्था, भाविक सातत्याने मागणी करीत आहेत. परंतु सरकारला लोकभावना लक्षात येत नाही. त्यामुळे सरकारला जागे करण्यासाठी हे अभिनव आंदोलन केल्याचे मुळीक यांनी सांगितले.
यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार मुक्ताताई टिळक, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, शहर सरचिटणीस राजेश पांडे, दत्ता खाडे, गणेश घोष, राजेश येनपुरे, दीपक पोटे, दीपक नागपुरे, संदीप लोणकर, महिला आघाडीच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील, युवा मोर्चाचे अध्यक्ष राघवेंद्र मानकर यांची प्रमुख उपस्थिती होती.