Home Blog Page 2424

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अतिवृष्टीमुळे मृत पावलेल्यांच्या वारसांना धनादेशाचे वाटप

0

सोलापूर, दि. 19 : सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले.

नियोजन भवन येथे झालेल्या कार्यक्रमात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, कृषिमंत्री दादाजी भुसे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार विनायक राऊत, आमदार प्रणिती शिंदे, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव आषिशकुमार सिंह, विभागीय आयुक्त सौरभ राव,अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख उपस्थित होते.

यावेळी पंढरपूर येथे भिंत पडून मयत झालेले मंगेश गोपाळ अभंगराव यांच्या पत्नी अश्विनी मंगेश अभंगराव, गोपाळ अभंगराव यांच्या मुलगी लता कोळी, राधा गोपाळ अभंगराव यांच्या मुलगी रतन शिरसाट, संग्राम जगताप (रा. भंडीशेगाव) यांच्या आई शोभा जगताप, दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथील सखाराम गायकवाड यांच्या पत्नी धनाबाई गायकवाड, माढा तालुक्यातील शिवाजी यादव यांच्या पत्नी वर्षा यादव, उद्धव खरात यांच्या पत्नी सोजरबाई खरात, कलावती विठ्ठल करळे यांचा मुलगा लाला करळे, शंकर देवकर (सावळेश्वर, ता. मोहोळ) यांच्या पत्नी रेणुका देवकर आणि शंकर चवतमाळ (श्रीपत पिंपरी, ता. बार्शी) यांचे वडील बाळासाहेब चवतमाळ यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले.

मिठी नदी विकास प्रकल्पासह विविध कामांचा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा

0

मुंबई, दि. 19 : मिठी नदी विकास प्रकल्प, माहिम कॉजवे जोड रस्ता, सेनापती बापट रोड ते पश्चिम द्रुतगती महामार्ग जोडरस्ता यांसह इतर विविध विकासकामांसंदर्भात आज मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी एमएमआरडीए, मुंबई महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करुन आढावा घेतला.

एमएमआरडीए कार्यालयात झालेल्या बैठकीस एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव, अतिरिक्त महानगर आयुक्त डॉ. के. एच. गोविंदराज, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू, संजीव जयस्वाल, मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मिठी नदीचे पुनरुज्जीवन करणे तसेच नदीचा शाश्वत विकास करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. नदीच्या सभोवताली वॉकवे तयार करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. याची सुसाध्यता (feasibility) बघून माहिती सादर करावी, अशा सूचना पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी दिल्या. याबरोबरच सेनापती बापट रोड ते पश्चिम द्रुतगती महामार्ग दरम्यानच्या लिंकरोडच्या कामासंदर्भातही यावेळी चर्चा करण्यात आली. माहिम कॉजवे जोड रस्त्याच्या कामाचाही पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. शहरातील कांदळवनांचे चांगल्या पद्धतीने जतन – संवर्धन व्हावे यासाठी त्यांचे वन विभागाला हस्तांतरण करण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. ‘एमएमआरडीए’मार्फत राबविण्यात येत असलेल्या इतर प्रकल्पांचीही यावेळी माहिती घेण्यात आली. लवकरच पुन्हा बैठक घेऊन सर्व कामांना गती देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. एमएमआरडीए, महापालिका आदी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करुन प्रलंबित कामे गतिमान करावीत, अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

अतिवृष्टीग्रस्तांना लवकरात लवकर मदत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

0

सोलापूर, दि. 19:- हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. संभाव्य संकटात एकही जीव गमावता कामा नये, काळजी करु नका, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई लवकरात लवकर दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अक्कलकोट तालुक्यातील सांगवी खुर्द येथील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागास भेट देऊन ग्रामस्थांसोबत संवाद साधला. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर बोरी नदी व परिसरातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली.

यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, कृषिमंत्री दादाजी भुसे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार विनायक राऊत, खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार सचिन कल्याणशेट्टी, प्रणिती शिंदे, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, विभागीय आयुक्त सौरभ राव, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते सांगवी खुर्द येथील  शेतकरी काशिनाथ शेरीकर यांना रु.95 हजार 100 रुपयांचा मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला.

गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा खात्मा करणाऱ्या पोलीस यंत्रणेला गृह राज्यमंत्री शंभूराज देसाईंनी दिली शाबासकीची थाप

0

मुंबई  दि. 19 : गडचिरोली जिल्ह्यातील आनोरा उपविभागातील कोसमी किसनेली जंगल परिसरात रविवार दि.18 ऑक्टोबर रोजी पाच नक्षलवाद्यांचा पोलिसांनी खात्मा केला. याबद्दल त्या विभागातील वरिष्ठ पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाईंनी स्वत: दूरध्वनी करुन शाबासकी देत त्यांचे अभिनंदन करुन त्यांचे कौतुक केले आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील आनोरा उपविभागातील कोसमी किसनेली जंगल परिसरात रविवारी सायं. 4.30 वाजता या विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक मनिष कलवानीया यांच्या नेतृत्वाखाली सी-60 चे कमांडो नक्षलविरोधी अभियान राबवित असताना नक्षलवाद्यांनी या अभियानातील पोलिसांवर हल्ला केला. प्रत्युत्तरादाखल सी- 60 चे जवानांनी नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला आणि या गोळीबारात पाच नक्षलवादी ठार झाले.

महाराष्ट्र पोलिस यंत्रणेतील गडचिरोली विभागातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या या धाडसी व उल्लेखनीय कामगिरीबद्दल गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी गडचिरोली विभागातील पोलिस यंत्रणेची ही बातमी समजताच गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील,गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल तसेच या धाडसी कारवाईत सहभागी झालेले अप्पर पोलीस अधीक्षक मनिष कलवानीया यांना स्वत: फोन केला व त्यांचे विशेष अभिनंदन करुन या कारवाईत सहभागी झालेले सर्व पोलिस कर्मचारी यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छाही दिल्या.

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंचा एक फोन पोलिस यंत्रणेचे मनोबल वाढविणारापाच नक्षलवाद्याचा गडचिरोलीत खात्मा करण्यात आला हे समजताच गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाईंनी आम्हाला तसेच येथील नक्षलग्रस्त भागात जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना फोन करुन केलेले कौतुक हे पोलिस यंत्रणेचे मनोबल वाढविणारे आहे अशी प्रतिक्रिया गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे.

सणासुदीच्या काळात अन्नधान्याचा तुटवडा भासू देणार नाही – अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

0

मुंबई, दि.19 : पंजाबमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे त्यामुळे महाराष्ट्रात पंजाबमधून येणारा अन्नधान्याचा पुरवठा थांबलेला आहे. असे असले तरी येणाऱ्या काळात सणासुदीच्या वेळी अन्नधान्याचा तुटवडा भासू देणार नाही अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

श्री. भुजबळ म्हणाले, पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी रेल्वे मार्गावर आंदोलन सुरू केले आणि त्यामुळे महाराष्ट्राला आणि अन्य राज्यांना पंजाबमधून होणारा अन्नधान्याचा पुरवठा थांबलेला आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाने तातडीने उपाययोजना करून भारतीय अन्न महामंडळाकडे (FCI) अतिरिक्त साठ्यातून मदत मागितली आहे त्याप्रमाणे भारतीय अन्न महामंडळाकडून देखील पुरवठा केला जाणार आहे.

भारतीय अन्न महामंडळाने स्वतःकडे १०.९४ लाख मेट्रिक टन गहू आणि ४.८९ लाख मेट्रिक टन तांदूळ याचा अतिरिक्त साठा करून ठेवला आहे. भारतीय अन्न महामंडळाने आंध्र प्रदेशकडून तांदूळ आणि मध्य प्रदेशकडून गहू याची अतिरिक्त उचल सुरू केली आहे त्यामुळे महाराष्ट्राला यातूनच पुरवठा होणार आहे.येणाऱ्या काळात असलेली दिवाळी आणि दसरा या सणांमध्ये कोणत्याही शिधापत्रिका धारकांना अन्नधान्याचा तुटवडा भासणार नाही, असेही श्री. भुजबळ यांनी सांगितले.

भाजपमध्ये कोणी एकटा नेता सुपर पॉवर वगैरे नाही -मी ही महापालिकेत लक्ष घालणार – खा. बापट (व्हिडीओ )

पुणे-काल कॉंग्रेसची बैठक महापालिकेत झाली अन आज भाजपच्या खासदार गिरीश बापटांनी देखील महापालिकेत अधिकारी पदाधिकारी ,नगरसेवक यांची बैठक घेतली अन याची माहिती देताना पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना महत्वपूर्ण विधान केले . ते म्हणाले ,’ भाजपमध्ये कोणी सुपेरीअर, एकटा दुकटा सुपर पॉवर नेता नाही . चंद्रकांत दादा शहराच्या प्रश्नांत लक्ष घालतात मी आता महापालिकेत २४ बाय ७ पाणीपुरवठा योजना असेल अन्य योजना असतील त्यात लक्ष घालून दिलेली आश्वासने पूर्ण करणार आहे असे खासदार गिरीश बापट यांनी सांगितले. महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेते धीरज घाटे, भाजपचे सरचिटणीस नगरसेवक गणेश बिडकर यांच्यासह आमदार व नगरसेवक उपस्थित होते. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बापट यांनी माहिती दिली.

एकट्या दुकट्याने कामे होत नाहीत, सर्वांना सोबत घेऊन कामे पुढे न्यावी लागतात. यापुढे मी महापालिकेच्या कामात लक्ष देणार असून भाजपने जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने वेळेत पूर्ण करणार आहोत. चोवीस तास पाणी पुरवठा योजनेचे काम वेळेत पूर्ण केले जाईल, या कामात अडथळे आणणाऱ्या कोणाची गय केली जाणार नाही, असा इशारा देत खासदार गिरीष बापट यांनी सूचक इशारा दिला आहे.

बापट म्हणाले, की महापालिका विविध विकास कामे करत आहे. काही सुरू काहींची गती कमी. कोरोना मुळे परिणाम झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत चालला आहे, त्यामुळे कामांना गती मिळेल. यासाठी आज बैठक घेतली.यापुढील काळात शहरातील 4 – 5 प्रकल्पात मी अधिक लक्ष घालायचे ठरवले आहे. कचरा प्रश्न, स्मार्ट सिटी, नदिसुधार योजना या योजनांत प्रामुख्याने लक्ष देणार आहे. आज 24 तास पाणी पुरवठा योजनेचा आढावा घेतला. पुढील वर्षभरात सर्व आश्वासन किंबहुना जाहीरनामा पूर्ण करू. यासाठी केंद्राकडे आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करू.

चोवीस तास पाणी पुरवठा योजनेवरील चर्चे दरम्यान टाक्या, केबल डकट, पाईप लाईनची कामे अशी चर्चा झाली. 82 ते 84 टाक्या पूर्ण करायच्या आहेत. वनखाते, खासगी जागा, व कायदेशीर अडचणीमुळे कामे रखडली आहेत. आतापर्यंत टाक्यांचे 36 टक्के काम पूर्ण झाले आहे. पाईप लाईनचे 750 किमीचे काम होणे अपेक्षित होते. पण 300 की. मी. चेच काम झाले आहे. अरुंद रस्ते, व तांत्रिक अडचणीमुळे केवळ 17 टक्के काम होऊ शकले आहे. पाण्याचा कमीत कमी वापर व्हावा. मीटर साठी प्रबोधन करणे गरजेचे आहे. दिरंगाई झाली तर अपव्यय वाचवू शकणार नाही. 8 टक्के काम झाले आहे. ही योजना लवकरात लवकर कार्यान्वित होण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत.

तर कोणाची गय केली जाणार नाही

‘पुणेकरांना दिलेली आश्वासने पुढील काही वर्षात पूर्ण करू. कोरोनामुळे ठप्प झालेल्या समान पाणीपुरवठा योजनेला गती देण्यात येणार आहे. या योजनेतून 82 साठवण टाक्या बांधणार आहेत. 1 हजार 670 किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. त्यापैकी 700 किलोमीटरचे काम अपेक्षित होते. परंतु 300 किलोमीटरचे कामच आत्तापर्यंत पूर्ण झाले आहे.

पाण्याचे मीटरही बसविण्यात येत असून, सध्या फक्त 8 टक्के मीटरचे काम झाले आहे. परंतु या कामांमध्ये विविध पक्षांच्या नगरसेवकांकडून संबंधित कंपन्याच्या ठेकेदारांना धमकाविणे, पैसे मागून अडथळे आणले जात असल्याच्या तक्रारी मिळत आहेत. परंतु यामध्ये कोणीचीही गय केली जाणार नाही, मग तो लोकप्रतिनिधी कोणत्याही पक्षाचा असो,’ असा सज्जड दम खा. बापट यावेळी भरला.


नाल्यात पावसाळी लाईनचे पाणी सोडल्याने नाल्यांना पूर- आबा बागुल

0

पुणे- पुणे मनपा हद्दीत नाल्यात पावसाळी लाईनचे पाणी सोडल्याने नाल्यांना पूर येऊन नागरिकांच्या घरात पाणी शिरले .कितीही उंच सीमाभिंत बांधली तरी हे पाणी नागरिकाच्या घरात शिरणारच त्यामुळे प्रशासनाने नाल्यात पावसाळी लाईनचे पाणी सोडू नये अशी सूचना काँग्रेसचे महापालिकेतील गटनेते आबा बागुल यांनी आयुतकांना पत्राद्वारे केली आहे.

याविषयी आज अतिरिक आयुक्त विशेष यांच्या दालनात पाणीपुरवठा, पथ, मलनिःसारण विभागाचे अधिकारी, पुणे महापालिकेचे ३ उप आयुक्त व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख यांचे समवेत आबा बागुल यांनी बैठक घेतली. पुणे शहरात झालेल्या पावसाने नाल्याच्या कडेने असलेल्या घरात पाणी शिरून नागरिकांचे अतोनात हाल होऊन प्रचंड नुकसान झालेले आहे. याबाबत आम्ही माहिती घेतली असता कात्रज पासून आलेल्या नाल्यात शहरातील पावसाळी लाइन्सचे पाणी नाल्यात सोडले आहे. शास्त्रीय दृष्टीकोनातून सदर बाब अत्यंत चुकीची आहे. नाले हे पावसाचे पाणी वाहून जाण्यास निसर्गाने निर्माण केलेले स्त्रोत आहेत. नाल्याची क्षमता बघून त्यावरील पुलांची उंची याप्रमाणे त्यात पाणी सोडणे अपेक्षित असताना क्षमतेपेक्षा जास्त पाणी सोडल्यास कितीही उंच सीमाभिंत बांधल्यास पाणी हे नाल्याचे कडेने असलेल्या वसाहतीमध्ये शिरनारच आहे. मुळात ड्रेनेज व पावसाळी लाइन्स या नाल्यात सोडणे हे अत्यंत चुकीचे असून ड्रेनेज लाईन्स या मैलापाणी शुद्धीकरण केंद्राला जोडणे आवश्यक आहे. पावसाळी लाईन्स या नदीपर्यत आणून पावसाचे पाणी नदीमध्ये सोडले पाहिजे.
पूर्ण शहरातील पावसाळी लाईन्सचा डीपीआर करणे गरजेचे आहे. यामुळे कोणती पावसाळी लाईन्स कुठे आहे, याचा आढावा घेऊन सर्व पावसाळी लाईन्स नाल्याच्या कडेने नदीपात्रात आणल्यास नाल्याला पूर येणार नाही. तसेच हे पाणी नाल्यात सोडल्याने मैलापाणी शुद्धीकरण केंद्रावर विनाकारण खर्च वाढला जातोय. यावर प्रदीर्घ चर्चा होऊन अतिरिक आयुक्त विशेष यांनी क्षेत्रीय उप आयुक्त यांना मागील ५ वर्षात क्षेत्रीय स्तरावरून टाकण्यात आलेल्या ड्रेनेज लाईन्स व पावसाळी लाईन्सचा आराखडा तयार करणेचे आदेश दिले. त्यांनी केलेली कामांची एम.बी.बिले आणि सर्व रेकॉर्ड क्षेत्रीय स्तरावर उपलब्ध आहेच. तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे सर्वप्रथम आपत्तीची माहिती प्राप्त होऊन त्यांनी सर्व विभागांना कळविणे अपेक्षित आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे काम करणेस स्टाफ देखील नाही अशी माहिती मिळते. अश्या आशयाचे पत्र आबा बागुल यांनी आयुक्तांना दिले आहे.

अंक नाद ‘ चे इंग्रजी ऍपचे पुण्यात लोकार्पण

0

पुणे : ‘अंक नाद ‘  ऍप द्वारे गणिताची गोडी आता इंग्रजी मधूनही उपलब्ध झाली आहे. मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रा लि निर्मित ‘अंक नाद ‘ ऍप च्या इंग्रजी आवृत्तीचे  लोकार्पण सोमवारी पुण्यात ऑन लाईन पद्धतीने झाले . भारतीय गणित आणि  लोप पावत असलेले मराठी पावकी -निमकी सारखे पाढे या भारतीय गोष्टींचे कालानुरूप   पुनरुज्जीवन करून सर्व देशात आणि परदेशात प्रसार करण्यासाठी हा उपक्रम कार्यरत आहे . 
‘अंकनाद ‘ अॅपचे निर्माते मंदार नामजोशी यांनी उपक्रमांची माहिती दिली.’अंकनाद’ हे गणिताकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोन देणारं  अॅप   आहे. रोजच्या जगण्यात गणिताला पर्याय नाही . गणित विषय रंजक करुन सांगण्याचे विविध उपक्रम ‘ अंकनाद ‘ तर्फे केले जातात,गणिताची आवड निर्माण केली जाते ,असे त्यांनी सांगितले. ‘अंक नाद’चे संचालक पराग गाडगीळ यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील मान्यवर या उपक्रमात सहभागी आहेत . 
या  ऍप च्या मार्गदर्शक समितीमध्ये  ज्येष्ठ शास्त्रज्ञ  डॉ रघुनाथ माशेलकर ,डॉ अनिल सहस्त्रबुद्धे ,(अध्यक्ष ,अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद ),तालयोगी सुरेश तळवलकर ,संगीतकार अशोक पत्की , प्राजक्ती गोखले (बालभारती च्या अभ्यास मंडळाच्या सदस्य ),प्रसाद मणेरीकर (संस्थापक ,अनुभूती नॉलेज सेंटर ),प्राची साठे ,प्रा .अनघा ताम्हणकर ,साक्षी हिसवणकर,चारुदत्त आफळे ,शोभा नेने (अध्यक्ष ,बृहन्मुंबई गणित अध्यापक मंडळ ),मंदार नामजोशी ,निर्मिती नामजोशी ,समीर बापट  हे सन्माननीय सदस्य आहेत .
अंकनाद अॅपविषयी
दोन ते तीसचे पाढे घोकून पाठ करणं हे विद्यार्थ्यांना करावं लागतंच. पण या नव्या पिढीला पावकी, निमकी, पाऊणकी हे शब्दच माहीत नाहीत.  ही कोष्टकं म्हणजेच अपूर्णांकांचे पाढे पाठ केले, तर गणिताचा पाया पक्का होऊन जातो. ‘अंकनाद’ मध्ये पाढ्यांबरोबरच ही कोष्टकंसुद्धा साध्या सोप्या पद्धतीने शिकवली जातात.
गणित या विषयाची मुलांना एका नव्या, आकर्षक रुपात ओळख करून द्यावी आणि अवघड वाटणाऱ्या या विषयाशी सहजसोप्या रीतीने मैत्री व्हावी या उद्देशाने ‘अंकनाद’ ऍपची निर्मिती झाली. अल्पावधीतच मुलं आणि त्यांचे पालक यांनी या ऍपला भरघोस प्रतिसाद दिला. 
  विविध उपक्रम आणि कार्यशाळा यांच्या मार्फत  विद्यार्थी, शिक्षक, पालकांसाठी सतत काही नवीन देता यावे हाच अंकनादचा प्रयत्न आहे.

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या 35 हजार 128

0

पुणे विभागातील 4 लाख 37 हजार 984 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 4 लाख 86 हजार 388 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे,दि.19 :- पुणे विभागातील 4 लाख 37 हजार 984 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 लाख 86 हजार 388 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 35 हजार 128 इतकी आहे. कोरोनाबाधित एकुण 13 हजार 276 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.73 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 90.05 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा-
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 14 हजार 462 रुग्णांपैकी 2 लाख 86 हजार 737 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 20 हजार 387 आहेत. कोरोनाबाधित एकूण 7 हजार 338 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.33 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 91.18 टक्के आहे.
सातारा जिल्हा-
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 43 हजार 511 रुग्णांपैकी 36 हजार 582 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 499 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 430 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा-
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 38 हजार 181 रुग्णांपैकी 32 हजार 492 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 353 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 336 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा-
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 42 हजार 858 रुग्णांपैकी 38 हजार 545 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 737 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 576 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कोल्हापूर जिल्हा-
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 47 हजार 376 रुग्णांपैकी 43 हजार 628 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 152 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 596 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 461 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 817, सातारा जिल्ह्यात 278, सोलापूर जिल्ह्यात 154, सांगली जिल्ह्यात 126 तर कोल्हापूर जिल्ह्यात 86 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण –
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 3 हजार 46 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 1 हजार 830, सातारा जिल्हयामध्ये 185, सोलापूर जिल्हयामध्ये 283, सांगली जिल्हयामध्ये 429 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 319 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 22 लाख 19 हजार 967 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 4 लाख 86 हजार 388 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.


( टिप :- दि. 18 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

जम्बोतील आरोग्यसेवकांना वेळेवर योग्य वेतन द्या अन्यथा …मनसे चा इशारा

0

पुणे- जम्बो कोविड सेंटर मधील आरोग्य सेवकांचा पगार योग्य आणि वेळेवर होत नसल्याचा आरोप करून मनसेच्या पुणे शहर अध्यक्षांनी याबाबत महापालिका प्रशासनाला ..खबरदार … असा इशारा दिला आहे. मनसे ला आपली पावले उचलण्यास भाग पाडू नका .. असे सांगण्यात आले आहे.

या संदर्भात मनसे शहर अध्यक्ष अजय शिंदे यांनी सांगितले कि , कोट्यवधी रुपये खर्च करून मोठा गाजावाजा करून सुरू केलेले जम्बो कोविड सेंटर चा गोंधळ अजूनही संपायचे नाव घेत नाही. पीएम आर डी ए आणि मनपा त्याच वेळेला राज्यसरकार आणि मनपा हा सुरवातीच्या काळातला गोंधळ आणि भोंगळ कारभार व त्यांच्या मुळे निष्कारण बळी गेलेले रुग्ण त्यातले पांडुरंग रायकर हे दुर्देवी उदाहरण त्यामुळेच निर्माण झालेला रोष कमी करण्यासाठी सदर जम्बो कोविड सेंटर संचालन करणारी लाईफ लाईन ही कंपनी काढून टाकण्यात आली मात्र हे कदाचित अर्धसत्य होते की काय अशी शंका यावी अशी परिस्थिती दिसत आहे कारण लाईफ लाईन बदलली हे कागदपत्रांच्या वर दाखवण्यात आले वास्तवात त्यावेळी कार्यरत असणारीच मंडळी आत्ता ही जम्बो कोविड सेंटर संचलित करत आहे त्या वेळेस असणारे सर्व स्तरावरील वैद्यकीय कर्मचारी व तंत्रज्ञ व डॉक्टर व काही प्रमाणात नव्याने भरती केलेले कर्मचारी यांच्या माध्यमातूनच जम्बो कोविड सेंटर चालवले जाते या ठिकाणी काम करणाऱ्या बहुतांश कर्मचाऱ्यांना आज पर्यन्त पगार मिळाला नाही या संदर्भात या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी मनसे कडे काल दुपारी लेखी तक्रार केली व प्रश्न सोडवण्याची मागणी केली असता मनसे कडून संबंधित अधिकाऱ्यांना सम्पर्क केला असता नव्याने असलेला गोंधळ समोर आला सुरवाती पासून करोना म्हणजे आपल्याला मिळालेल कुरण आहे या मानसिकतेतून सत्ताधारी आणि अधिकारी काम करत आहेत हे प्रत्येक ठिकाणी दिसून येते
लाईफ लाईन ला दिलेले काम काढून नवीन कंपनीला देते वेळी या नवीन कंपन्यांची पात्रता
तपासणे किंवा बंधने घालणे जुने व्यवहार पूर्ण करणे या गोष्टीची पूर्तता करण्यात आली नाही कारण लाईफ लाईन मध्ये कार्यरत असणारे कामगारांच आजही तिथेच काम करीत आहेत नाव बदलून तीच कंपनी कार्यरत करण्यात यावी अशीच परिस्थिती या ठिकाणी आहे कर्मचारी ही तेच आहेत ज्याचे पगार ऑगस्ट पासून थकवले गेले आहेत आणिसिक्युअरटी ,आणि जे हाऊसकिपीगच काम बघते.मेलबारो जे टेनिशीयन फार्मसिस्ट व डॉक्टर पुरवण्या संदर्भातील काम बघते त्या कंपन्या नी देखील नव्याने कामाला आलेल्या कर्मचाऱ्यांचे पगार थकवले आहेत मनसे ने या विरोधात आवाज उठवताच काही अत्यंत थोडक्या मंडळींना काल पगार दिले तर काही कर्मचारी मंडळींना दमदाटी करण्यात आली हा सगळा प्रकार अत्यंत गंभीर असल्याने मनसे चे पदाधिकारी जम्बो कोविड सेंटरला गेले होते व कर्मचार्यांना दमदाटी न करण्याची सूचना देऊन आले व थकीत पगार त्वरित करण्याच्या बाबत योग्य त्या समजतील आशा सूचना सबधितांना दिल्याउदया महानगरपालिका प्रशास ना बरोबर चर्चा करून वरील प्रश्न त्वरित सोडवण्यात साठी योग्य प्रयत्न करण्यात येतील
आज रणजित शिरोळे, प्रल्हाद गवळी,सचिन काटकर,उदय गडकरी, आकाश धोत्रे सहित अनेक महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते

पंचनाम्यांची नाटके बंद करा, शेतकऱ्यांच्या हातात तातडीने पैसे द्या-विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांची मागणी

0

पोलादपूर, माणगाव,पेण तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या भागांची केली पाहणी
रायगड, दि, १८ ऑक्टोबर- राज्य सरकारने आता शेतीचे नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनाम्यांची नाटके बंद करा व घोषणाही बंद करा. कोणतेही कारण न सांगता शेतकऱ्यांच्या हातात तातडीने पैसे जाऊ द्या अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज केली.
विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज रायगड जिल्हयातील पोलादपूर, माणगाव,पेण तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या भागांची पाहणी केली.सोबत आमदार रविशेठ पाटील, रायगडचे भाजपचे जिल्हाध्यक्ष अँड.महेश मोहिते उपस्थित होते. माणगाव तालुक्यातील उसरघर आणि रातवड या गावी पेण मधील वडखळ विभागातील बोरवे, मसद शिर्की, बोरी या भागातील नुकसानग्रस्त शेतीचा पाहणी केली.
शेतकरी हताश झालेला आहे. या सरकारच्या काळात शेतकऱ्यांची दुरवस्था झाली आहे. मागील पंचनाम्यांचे पैसे अजून दिले मिळाले नाही. पीक कर्जही मिळत नाही , कर्जमाफी पण होत नाही. फक्त घोषणा मोठ्या मोठ्या केल्या जातात पण प्रत्यक्षात कृती मात्र शून्य अशी या सरकारची अवस्था असल्याची टीकाही दरेकर यांनी केली.
नुकसानग्रस्त झालेल्या शेतक-यांना किमार निदान २५ हजार हेक्टरी रुपये द्यावेत कारण जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार होते तेव्हा स्वतंत्र जीआर काढून शेतक-याला १८ हजार हेक्टरी पैसे दिले. पंचनामे न करता शेतकऱ्यांना पैसे दिले. राज्यकर्त्यांनी कायद्याच्या चौकटीत न बसवित शेतकऱ्यांना तातडीने दिलासा द्यावा असे स्पष्ट करतानाच दरेकर म्हणाले की,. सरकारमधील त्यांचे जलसंधारण मंत्री मात्र उस्मानाबाद मध्ये जाऊन सांगत आहेत की, सरकारकडे पैसे नाहीत. राज्याचे उपुख्यमंत्री म्हणतात आम्ही कर्ज काढून राज्य चालवत आहोत अशी टीकाही त्यांनी केली.
कोकणातला शेतकरी धीट आहे, तो लगेच हिम्मत हारत नाही. पण घरात कोणी कमविता नाही. शेती उध्वस्त झाली आहे, त्यामुळे सरकारने पत्रव्यवहारचे सोपस्कार न करता शेतकऱ्यांना थेट मदत करावी. ज्यांची शेते खराब झाली आहे त्यांच्या शेताचे फोटो काढून वास्तुस्थितीदर्शक पध्दतीप्रमाणे मदत करावी अशी मागणीही दरेकर यांनी केली.
सरकारने शेतकऱ्यांना वा-यावर सोडले आहे. मी अतिवृष्टीची पाहणी करत असताना निर्देशनास आले की निसर्ग वादळामुळे शेतीचे जे नुकसान झाले त्याचेच अद्याप पंचनामे करण्यात आले नाही असे स्पष्ट करतानाच दरेकर म्हणाले की, नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे नाहीत, पैसे दिले नाहीत, फक्त कोट्यवधीच्या घोषणा केल्यात पण प्रत्यक्षात मदत नाही. मराठवाड्यात चार चार महिने झालेत पंचनामे नाही असा आरोपही त्यांनी केला.
केंद्र सरकारकडे बोट दाखविण्यापेक्षा राज्य सरकार म्हणून तुमच्या जबाबदारी आधी पूर्ण करा. आज हतबल हताश झालेल्या शेतकऱ्याला पैसे द्या अशी मागणीही दरेकर यांनी केली.

रविवारी महापालिकेत झाली कॉंग्रेसची गोपनीय बैठक : अरविंद शिंदे ,अजित दरेकर अनुपस्थित (व्हिडीओ )

0

आता मतभेद नाहीत,सर्वांना विश्वासात घेऊन काम करण्याचा निर्धार
:आबा बागुलांचा पुढाकार

पुणे – महापालिकेत  सत्ताधारी भाजपचा नाकर्तेपणा पुणेकरांपुढे मांडून त्याविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्णय पुणे महापालिका काँग्रेसच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीच्या निमित्ताने शहर विकासासाठी काँग्रेस पक्षाची एकजूट दाखविण्यात आली.पुणे शहराचा विकास, प्रलंबित प्रकल्प आणि महापालिकेच्या कामकाजात भाजपला आलेले अपयश यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी ही  बैठक बोलावली होती. महापालिकेच्या सभेपुढील कार्यपत्रिकेवर चर्चा करण्याची परंपरा काँग्रेस पक्षात होती. ही खंडित झालेली परंपरा आबा बागुल पुन्हा यांनी सुरू केली आहे.

या बैठकीस कॉंग्रेसचे शहराध्यक्ष माजी मंत्री रमेश बागवे, पुणे शहर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी, मोहन जोशी, ज्येष्ठ नेते उल्हास पवार , माजी आमदार, दिप्ती चवधरी, माजी स्थायी समिती अध्यक्ष श्रीकांत शिरोळे, ज्येष्ठ नगरसेवक व माजी उपमहापौर डॉ.सतीश देसाई, नीता रजपूत, शिवा मंत्री, विरेंद्र किराड, कमल व्यवहारे, रजनी त्रिभुवन खडकी कॅन्टोन्मेंटचे सभासद मनीष आनंद व गोपाळ तिवारी, विदयमान नगरसेवक अविनाश बागवे, रफिक शेख, सुजाता शेटटी, लता राजगुरू, रविंद्र धंगेकर,माजी नगरसेवक संजय बालगुडे, शिक्षण मंडळ माजी उपाध्यक्ष नरेंद्र व्यवहारे पीएमटीचे चेअरमन भीमराव पाटोळे काँग्रेस युवक अध्यक्ष विशाल मलके, महिला अध्यक्ष सोनाली मारणे, एनएसयुआय चे अध्यक्ष भूषण रानभरे, आदी .पदाधिकारी हे उपस्थित होते.
अविनाश बागवे यांनी आभार प्रदर्शन केले.

सर्वांना विश्वासात घेऊन काम करण्यासाठी खंडित परंपरा पुन्हा सुरु करण्याच्या निर्धाराबाबत आबा बागुलांचे नेत्यांकडून कौतुक

पुणे शहर  काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी शहरातील अनेक महत्वाचे प्रलंबित प्रश्न, विकासकामे व सत्ताधारी पक्षाकडून शहराकडे होणारे दुर्लक्ष याबाबत साधकबाधक चर्चा करून सन २०२२ मध्ये पुणे महापालिकेत काँग्रेस पक्षाची सत्ता आणून पुणेकरांना नियोजित विकास काँग्रेसच देऊ शकते यासाठी अशाच एकीने काँग्रेस काम करेल , या साठी गटनेते म्हणून आबा बागुल यांनी दरमहा कामकाजाच्या पद्धतीवर बैठक घेण्याची परंपरा पुन्हा सुरु केल्याबाबत त्यांनी त्यांचे स्वागत केले.
माजी आमदार उल्हासदादा पवार यांनी बैठकीचे कौतुक केले व काँग्रेस मध्ये कोणतेही मतभेद नाहीत यावरून सिद्ध होते.अश्या एकजुटीने शहरातील विकासाची कामे मार्गी लावा असेही ते म्हणाले. याबैठकीत पुण्याच्या वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली.2022 ला येणारी निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला अधीक जागा कश्या मिळतील यावर प्रत्येकाने आपले मत मांडले.त्यावर बोलताना पुण्यातील काही महत्वाचे निर्णयावर चर्चा झाली. त्यामध्ये कोरोना आता आटोक्यात असला तरी येणाऱ्या काळात मोठ्याप्रमाणात वाढण्याची शक्यता असताना काय केले पाहिजे, पुणे शहरातील वाहतुकीचे नियोजन करत असताना एचसीएमटीआर रखडलेला रस्ता लवकरात लवकर मार्गी लावणे,पावसाळ्यात वारंवार शहरात येणाऱ्या पुरावर सत्ताधारी भाजप गप्प का आहे. सीमाभिंत बांधण्यासाठी टेंडर काढले असून काम सुरू का होत नाही भाजपच्या अंतर्गत भांडणामुळे पुणेकरांना वेठीस का धरण्यात येत आहे.सीमाभिंत प्रश्न लवकर सुरू करण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घ्यावा,शहराच्या प्रश्नावर काँग्रेस पक्ष आक्रमक भूमिका घेऊन पुणेकरांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही.असे अनेक मुद्यांवर खेळीमेळीच्या वातावरणात बैठक पार पडली.
काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल म्हणाले की, शहरामध्ये आत्तापर्यंत दिसत असलेला विकास हा काँग्रेच्या कार्यकाळातच झाला आहे.त्याची घडी भाजपच्या नाकर्तेपणामुळे मोडली आहे.महापालिकेत काँग्रेस आल्यावरच पुणेकरांना अपेक्षित असलेला विकास पुन्हा दिसू लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.माजी आमदार व आजी माजी पदाधिकारी यांनी काँग्रेस पक्षाची पार्टी मिटिंग बोलाविण्याची अनेक वर्षांची खंडित झालेली परंपरा आबा बागूल यांनी चालू केली याबाबत आबा बागूलांचे मनपासून कौतुक केले व ही परंपरा अशीच चालू ठेवा, मतभेद नाहितच काँग्रेस वाढवा अशी सूचना केली. 

पोलीस आयुक्तालयातील फाईलींचा प्रवास होणार सुपरफास्ट,पोलीस आयुक्तांनी तयार केली एस ओ पी

0

पुणे- पुणे पोलीस आयुक्तालयातंर्गत दाखल झालेल्या फायलींचा लवकर निपटारा करण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ‘एसओपी’ (स्टँडर्ड ऑफ फॉरमॅट) तयार केली असून,. त्यानुसार फाईल इतरत्र कोठेही न फिरवता थेट संबंधित अधिकाऱ्य़ांच्या टेबलावर ठेवली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या विविध कार्यक्रमांच्या परवानग्यासह, पोलीस कर्मचाऱ्य़ांच्या फायलींचा तीन ते चार आठवड्यांचा लागणारा कालावधी संपणार आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या सूचनेनुसार फायलींचा वेग आता सुपरफास्ट होणार आहे.

शहरातील नागरिकांकडून विविध कार्यक्रमांसह वाहतूकीच्या संदर्भातील वेगवेगळ्या परवानगीसाठीच्या अर्ज आणि फाईल पोलीस आयुक्तालयात जमा करण्यात येतात. मात्र, विविध कारणास्तव फाईल संबंधित नसलेल्या अधिकाऱ्य़ांकडे पाठविण्यात येत होती. त्यामुळे किरकोळ परवानगीसाठी अनेकांना महिन्याभराची वाट पाहावी लागत होती. फायलींचा विनाकारण प्रवास वाढल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत होता. आता मात्र, पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार फाईल क्लेअर करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्य़ांकडे थेट पाठविली जाणार आहे. त्यामुळे वेळ वाचण्यास मदत होणार असून नागरिकांचे हेलफाटे वाचणार आहेत. विशेषतः गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळी, विविध मिरवणूका, राजकीय सभांच्या परवानगीसाठी पोलीस आयुक्तालयात दाखल केलेल्या फाईलींचा प्रवास कासवगतीने होत होता. मात्र, आता फायलींचा प्रवास थांबणार आहे. त्याशिवाय पोलीस कर्मचाऱ्य़ांच्या भविष्य निर्वाह निधी, मेडीक्लेम, सेवानिवृत्ती फंड संदर्भातील सर्व फायलींना तातडीने क्लेअर करण्यासाठी अधिकाऱ्य़ांना सूचित करण्यात आले आहे.

तीन दिवसांचा फायलींचा होणार निपटारा पोलीस आयुक्तालयात दाखल करण्यात येणारे अर्ज आणि फाईलींची तपासणी करुन तीन ते चार दिवसांत पुर्णत्वात नेली जाणार आहे. त्यासाठी फाईल थेट संबंधित अधिकाऱ्य़ांच्या टेबलवर ठेवली जाणार असून सही झाल्यानंतर तातडीने नागरिकांना माहिती दिली जाणार आहे. विविध कामकाजासंदर्भातील फायलींचा प्रवास कमी होणार असल्यामुळे नागरिकांसह पोलीस कर्मचाऱ्य़ांनी समाधान व्यक्त केले आहे.

फायलींचा निपटारा करण्यासाठी तीन ते चार दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार संबंधित अधिकाऱ्य़ांकडे फाईल पाठविली जाणार असून तातडीने कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे आता विविध परवानग्या सोपस्कररित्या पुर्ण होणार आहेत.

अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री सोमवारी सोलापूर दौऱ्यावर

0

मुंबई दि 17 : राज्यातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा बसला असून पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी, ग्रामस्थयांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोमवार 19 रोजी सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत

सकाळी 09:00 वा.सोलापूर विमानतळ येथे आगमन व मोटारने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण
सकाळी 09:30 वा.सोलापूर येथून मोटारने सांगवी खूर्द ता. अक्कलकोट, जि. सोलापूरकडे प्रयाण (अक्कलकोट मार्गे) , सकाळी 10:45 वा. सांगवी खूर्द येथे आगमन व नैसर्गिक आपत्तीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी व ग्रामस्थांशी चर्चा
सकाळी 11:00 वा. सांगवी पूलाकडे प्रयाण व बोरी नदीची व पूरग्रस्त भागाची पाहणी, सकाळी 11:15 वा. अक्कलकोट शहरकडे प्रयाण, सकाळी 11:30 वा. अक्कलकोट शहर येथे आगमन व हत्ती तलावाची पाहणी, सकाळी 11:45वा. अक्कलकोट येथून रामपूकडे प्रयाण,
दुपारी 12:00 वा.रामपूर येथे आगमन व अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची व शेतीपीकांच्या नुकसानीची पाहणी
दुपारी 12:15 वा.रामपूर येथून बोरी उमरगे ता. अक्कलकोटकडे प्रयाण,
दुपारी 12:30 वा.बोरी उमरगे येथे आगमन आपत्तीग्रस्त घरांची व शेतीपीकांच्या नुकसानीची पाहणी,
दुपारी 12:45 वा.बोरी उमरगे ता. अक्कलकोट येथून सोलापूरकडे प्रयाण,
दुपारी 03:00 वा. पूरपरिस्थितीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा, व अभ्यागताच्या भेटी व नंतर सोलापूर विमानतळ येथे आगमन व मुंबईकडे प्रयाण

येत्या 20,21,22, ऑक्टोबरला पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता -पुणे वेधशाळेचा अंदाज

0

पुणे- परतीचा पाउस अद्याप थांबण्याची चिन्हे दिसत नाही. पुढील आठवड्यात २०,२१,२२ ऑक्टोबरला मुसळधार पाउस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.पश्चिम बंगाल च्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून त्यामुळे राज्याच्या अनेक भागात पुन्हा एकदा अतिवृष्टीचे सावट निर्माण झाले आहे . परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी सोलापूर दौऱ्यावर असून शरद पवार यांच्या सह अनेक मंत्री राज्यभरात पाहणी दौऱ्यावर गेले आहेत.१७ तारखे पर्यंत राज्यभरात परतीच्या पावसाची अतिवृष्टी होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली होती हा अंदाज अचूक ठरला त्या मुळे पुणे वेधशाळेच्या अंदाजाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

राज्यात या जिल्ह्यात पावसाची शक्यता
सोमवार- ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद.

मंगळवार- ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, संपूर्ण विदर्भ.

बुधवार- ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी,लातूर, उस्मानाबाद, संपूर्ण विदर्भ