Home Blog Page 2415

मराठा आरक्षणावरून भाजप नेत्यांनी आगी लावण्याची कामे करू नये : सचिन सावंत

0

पुणे-मराठा आरक्षणासंदर्भात राज्यसरकारची न्यायालयीन लढाई सुरू आहे. परंतु खोट्या माहितीच्या आधारावर मराठा समाजात अफवा पसरविणे आणि अपप्रचार करून माथी भडकाविण्याची, आगी लावण्याची कामे भाजपच्या नेत्यांनी करू नये, अशी टीका काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली.

काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पुणे शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी महापौर कमल व्यवहारे उपस्थित होते.

सावंत म्हणाले,राज्यसरकार मराठा आरक्षणासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या न्यायालयीन लढाईची भाजपला पोटदुखी आहे. अपप्रचार करणे खोट्या माहितीच्या आधारे जनतेची दिशाभूल करून सरकारची प्रतिमा मलीन करण्याचं काम भाजपकडून सुरू आहे. मुळात भाजपमधील मराठा नेत्यांची आरक्षण देण्यासंदर्भात अनुकुलता नाही.

‘चला घेऊ छत्रपतींचा आशिर्वाद’ म्हणणारे सत्तेत आल्यावर छत्रपतींना विसरले. छ. संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणा संदर्भात तीन वेळा पत्र पाठवली, भेटीची वेळ मागितली पण मोदींनी भेट दिली नाही याचा अर्थ केंद्र सरकार मराठा आरक्षण देण्यासाठी अनुकूल नाही.

102 वी घटनादुरूस्ती मधील स्पष्टता केंद्र सरकारने करावी. त्यामुळे आरक्षणाचा खटला घटनापीटाकडे वर्ग झाला. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेशात विलंब होत असला तरी त्यांनी धीर ठेवावा, संयम बाळगावा, ही ऐतिहासीक लढाई आहे. भाजप मराठा आरक्षणावर राजकारण करत आहे. महाविकास आघाडी सरकार संवेदनशीलपणे न्यायालयीन लढाई लढत असल्याचा पुनरुच्चार सावंत यांनी यावेळी केला.

मराठा आरक्षणासंदर्भात तातडीने घटनापीठ स्थापन करा !

0

मुंबई, दि.२८ : मराठा आरक्षणासंदर्भात तातडीने घटनापिठाची स्थापना करून मराठा आरक्षणावरील अंतरिम आदेशाची सुनावणी करावी, अशी दुसरी लेखी विनंती राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना केली आहे.

मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी कालच जालना येथे सर्वोच्च न्यायालयात पुन्हा अर्ज करण्याचे सूतोवाच केले होते. त्यानुसार बुधवारी दुपारी राज्य शासनाचे वकील अॅड. सचिन पाटील यांनी हा अर्ज सादर केला. या अर्जामध्ये ‘एसईबीसी’ आरक्षणासंदर्भातील ९ सप्टेंबर रोजीचा अंतरिम आदेश तातडीने मागे घेण्याची आवश्यकता असल्याचे विषद करण्यात आले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या या अंतरिम आदेशामुळे राज्य शासनाच्या अनेक नोकरी भरती प्रक्रिया व विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया प्रभावित झाल्या असून, हजारो विद्यार्थी व उमेदवारांवर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचे प्रकरण तातडीने घटनापिठासमोर सुनावणीस घेण्यात यावे, असे राज्य शासनाच्या अर्जात नमूद करण्यात आले आहे. यापूर्वी ७ ऑक्टोबर रोजी सुद्धा राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना लेखी विनंती केली होती.

माझगाव भूखंड प्रकरण : गैरव्यवहाराबाबत १५ दिवसात अहवाल द्या – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

0

मुंबई, दि. २८ : माझगाव भूखंड क्र.५९३ या महसूल विभागाच्या शासन मिळकतीच्या भूभागाचा गैरवापर व गैरव्यवहाराबाबत महसूल मंत्री यांच्याकडे पुनर्विलोकनासाठी १५ दिवसाच्या आत अहवाल सादर करण्यात यावा, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.

माझगाव येथील भूखंड क्र. ५९३ या महसूल विभागाच्या शासन मिळकतीच्या भूभागाचा गैरवापर व गैरव्यवहाराबाबत तसेच विकसनकरारामुळे शासनाचे झालेले कोट्यवधी रुपयांचे नुकसान यासंदर्भात विधानभवन येथे बैठक झाली. यासंदर्भात अर्जदार सतिष खांडगे यांनी निवेदन दिले आहे.

यावेळी महसूल मंत्री श्री. बाळासाहेब थोरात, अप्पर मुख्य सचिव महसूल नितीन करीर, नगरविकास विभागाचे प्रधानसचिव भूषण गगराणी, कामगार उपायुक्त बाळासाहेब वाघ, महसूल विभागाचे सहसचिव रमेश चव्हाण, विधी व न्याय विभागाचे सहसचिव नितीन जिवणे तसेच संबंधित विभागातील अधिकारी उपस्थित होते.

विधानसभा अध्यक्ष श्री. पटोले म्हणाले, माझगांव भूखंड क्र. ५९३ या शासकीय मिळकतीचे नूतनीकरण व हस्तांतरण तसेच विकसन करारामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान याबाबत तपास करण्यात यावा. विभागाचे सचिव यांनी याप्रकरणाचा आढावा घ्यावा.

जागा शासन मिळकतीची असून बी.आय.आर.एफ., महसूल व वन विभाग, नगरविकास विभाग, कामगार आयुक्त, जिल्हाधिकारी, मुंबई शहर या सर्वांच्या अनुमतीने अटी व शर्तीनुसार जमिनीवर भाडेकरार व  पुनर्विकास करण्यास परवानगी देण्यात आली होती. सदर भूभागावर १० हजार स्पींडलची सूत गिरणी पुनर्विकासाच्या परवानगीनंतर ६ महिन्यांत सुरु करण्याचे आदेश होते.  याबाबत संबंधिताना परवानगी दिली होती, आजतागायत याठिकाणी मिल सुरु करण्यात आलेली नाही. शासन मालकीच्या या जमिन प्रकरणातील विकसनाचे व्यवहार गुंतागुतीचे असून वित्तीय सहाय्य, तारणाचे व्यवहार, जमिन हस्तांतर करताना ठरविली गेलेली किंमत आदी अनेक बाबींसंदर्भात तपशीलवार मुद्दे यावेळी मांडण्यात आले. यासंदर्भात सर्व बाबी तपासून १५ दिवसाच्या आत महसूल मंत्री यांना अहवाल सादर केला जाईल असे महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव नितिन करीर यांनी सांगितले.

रवी बराटे आणि त्याच्या नातेवाईकांच्या घरांवर छापे

0

पुणे : मोक्कानुसार कारवाई करण्यात आलेला आणि फरार घोषित केलेला आरटीआय कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे तसेच त्याच्या नातेवाइकांच्या घरावर बुधवारी (ता.२८) पोलिसांनी छापे टाकले आहेत. त्याच्यावर दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांत फसवणुकीसाठी आवश्‍यक असलेली विविध कागदपत्रे या कारवाईत पोलिसांच्या हाती आली आहेत.ब-हाटेसह त्याच्या साथीदारांवर शहरातील विविध पोलिस ठाण्यांत अनेक गुन्हे दाखल आहेत. काही दिवसांपूर्वी बऱ्हाटे, पत्रकार देवेंद्र जैन, बडतर्फ पोलिस शैलेश जगताप यांच्यासह 13 जणांच्या टोळीवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे.

हडपसर येथील गुन्ह्यात बऱ्हाटे आणि त्याच्या साथीदारांनी संघटितपणे टोळी करून खंडणी मागणे , जीवे मारण्याची धमकी देणे , बंगला बळकावण्याचा प्रयत्न करणे अशा गुन्ह्यासह त्यांच्याविरुद्ध शहर व ग्रामीण भागामध्ये 14 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. मोक्कानुसार कारवाई करण्यात आलेल्या टोळीतील अनेकांना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र बऱ्हाटे अद्याप फरार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. मात्र अद्याप तो पोलिसांच्या हाती आलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने त्याचा अटक पूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. यानंतर त्याला फरार घोषित करण्यात आले आहे. त्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने तपास करण्यासाठी बुधवारी सकाळी परिमंडळ तीनच्या पोलिस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी तीन पथके तयार केली आणि ब-हाटेच्या घरावर छापे टाकले. धनकवडी, लुल्लानगर आणि बिबवेवाडी परिसरात असणाऱ्या घरावर एकाच वेळी छापे टाकले आहेत. ब-हाटे याच्या धनकवडी येथील घरातून पोलिसांना मोठ्या प्रमाणात कागदपत्रे सापडली असल्याचे गायकवाड यांनी सांगितले आहे.सकाळपासून सुरू असलेल्या कारवाईत पोलिसांनी आत्तापर्यंत हजारो कागदपत्रे आणि साहित्य जप्त केले आहे. त्यात स्टॅम्पपेपर, जमिनींची कागदपत्रे, सात-बारा उतारे, शिक्के यासह अनेक बाबींचा समावेश आहे. एवढ्या मोठ्या मोठ्या प्रमाणात कागदपत्रे जप्त करण्यात आले आहे. दरम्यान पोलिस या गुन्ह्याचा तपास करीत असून कारवाई अद्याप सुरू आहे.

मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु करा, ठाकरे सरकारचं रेल्वेला पत्र

0

 मुंबईमधील लोकल सेवा पुन्हा एकदा सुरु करण्यासाठी राज्य सरकारने तयारी सुरु केली आहे. राज्य सरकारकडून यासंबंधी रेल्वेला पत्र पाठवण्यात आलं आहे. पत्रामध्ये राज्य सरकार करोनासंबंधित नियमांचं पालन करत लोकल सेवा पुन्हा एकदा सुरु करण्याचा विचार करत असल्याचं सांगण्यात आलं. लोकल सेवा कशा पद्धतीने सुरु करायची याचाही उल्लेख पत्रात करण्यात आला आहे.

पत्रामध्ये लोकल सेवा एकाच वेळी सुरु न करता टप्प्याटप्प्याने सुरु कऱण्याचा उल्लेख आहे. तसंच यासाठी ठराविक वेळाही निर्धारित करण्यात आल्या आहेत. यानुसार अधिकृत तिकीट किंवा मासिक पास असणारी व्यक्ती सकाळी पहिल्या ७.३० ची पहिली लोकल, तसंच ११ ते ४.३० आणि रात्री ८ ते शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करु शकते.

अत्यावश्यक सेवेतील प्रवासी ज्यांच्याकडे अधिकृत क्यूआर कोड आहे तसंच  ओळखपत्रासोबत अधिकृत तिकीट किंवा मासिक पास असणारे सकाळी ८ ते १०.३० तसंच संध्याकाळी ५ ते ७.३० च्या दरम्यान प्रवास करु शकतात. याशिवाय प्रत्येक एका तासाने महिला विशेष लोकल धावणार आहे.ठाकरे सरकारने प्रवासाच्या वेळांचा प्रस्ताव मांडताना प्रवाशांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता रेल्वेच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी केली आहे. लवकरात लवकर या प्रस्तावावर उत्तर देण्याची विनंती राज्य सरकारकडून करण्यात आली आहे.

पुणे विभागात आता ॲक्टीव रुग्ण संख्या 23 हजार 190

0

पुणे विभागातील 4 लाख 61 हजार 186 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 4 लाख 98 हजार 245 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव
पुणे,दि.28 :- पुणे विभागातील 4 लाख 61 हजार 186 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 लाख 98 हजार 245 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 23 हजार 190 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 13 हजार 869 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.78 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 92.56 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 20 हजार 661 रुग्णांपैकी 2 लाख 99 हजार 912 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 13 हजार 74 आहेत. कोरोनाबाधित एकूण 7 हजार 675 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.39 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 93.53 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 45 हजार 560 रुग्णांपैकी 40 हजार 217 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 834 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 509 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 39 हजार 561 रुग्णांपैकी 34 हजार 812 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 326 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 423 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 44 हजार 570 रुग्णांपैकी 40 हजार 992 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 952 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 626 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 47 हजार 893 रुग्णांपैकी 45 हजार 253 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 4 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 636 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 103 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 549, सातारा जिल्ह्यात 187, सोलापूर जिल्ह्यात 152, सांगली जिल्ह्यात 154 तर कोल्हापूर जिल्ह्यात 61 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण –
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 2 हजार 331 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 1 हजार 235 ,सातारा जिल्हयामध्ये 525, सोलापूर जिल्हयामध्ये 186, सांगली जिल्हयामध्ये 224 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 161 अशा रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 23 लाख 26 हजार 733 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 4 लाख 98 हजार 245 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 27 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

कोविड संकटकाळात नोकरी गेलेल्यांना रोजगार देण्यासाठी मायग्रंट सपोर्ट सेंटर्स

0

अमरावती, दि. 28 : कोरोना प्रादुर्भावात नोकरी गेलेल्या व्यक्तींना पुन्हा रोजगार मिळवून देण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत मायग्रंट सपोर्ट सेंटर्स उभारण्यात येत आहेत. त्याद्वारे स्थलांतरितांचे प्रश्न सोडविणे व रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर दिली.

कोरोना संकटकाळात लॉकडाऊनमध्ये अनेक उद्योग-व्यवसायांवर मर्यादा आल्या, अनेकांचा रोजगार हिरावल्याने त्यांना गावी परतावे लागले. अशा व्यक्तींना पुन्हा रोजगाराच्या संधी मिळवून देण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत मायग्रंट सपोर्ट सेंटर्स उभारण्यात येणार आहेत.  बेरोजगारांना मार्गदर्शन, समुपदेशन, कौशल्य प्रशिक्षण यासह उद्योगांत उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधी मिळवून देण्यात येणार असून, त्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मचाही वापर केला जाणार आहे. ऑक्टोबर 2020 ते मार्च 2021 असा या उपक्रमाचा कालावधी आहे.

स्थलांतरित झालेल्या गरजू, गरीब लोकांना रोजगार मिळवून देणे, प्राथमिक गरजा पूर्ण होतील एवढे उत्पन्न मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे व उत्पन्नाच्या एकाच स्त्रोतावरील अवलंबन कमी करण्यासाठी आणि पुन्हा स्थलांतराचा धोका कमी करण्यासाठी स्थानिक स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध मार्गांचा शोध घेणे हा या सेंटरचा उद्देश आहे, असे पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.

असे असतील उपक्रम

स्थलांतरित, गरजू नागरिकांची माहिती मिळविण्यासाठी जागरूकता अभियान राबविणे, तसेच विविध संस्थांमध्ये उपलब्ध संधी शोधून नेटवर्किंग करणे, कोविड भीतीचा सामना करण्यासाठी जनजागृती करणे, सरकारचा विविध रोजगारनिर्मिती कार्यक्रमांबाबत जागृती करणे, माविमकडून स्थानिक सरकारी यंत्रणेसोबत समन्वय करून कोविड जनजागृतीचे कार्यक्रम राबविणे, गरजूंना कौशल्य प्रशिक्षण देणे, कौशल्य प्रशिक्षण व प्लेसमेंट देणाऱ्या एजन्सी व कंपन्यांसह नेटवर्किंग करणे व संधींची सुनिश्चितता करणे, शासकीय, निमशासकीय विभागाच्या योजनांचा लाभ मिळवून देणे आदी विविध उपक्रम याद्वारे राबविण्यात येतील. माविम युएनडीपीच्या सहाय्याने सामाजिक संरक्षण योजनेंतर्गत गीत ॲप्लिकेशनचा वापर करण्यात येणार आहे.

मायग्रंट सपोर्ट सेंटरची रचना

महामंडळाकडून मायग्रंट सपोर्ट सेंटर कार्यान्वित करण्यात येत आहे. जिल्ह्यात साधारणत: पाच हजार गरजू नागरिकांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, संस्था व कंपन्यांशी समन्वय साधून विविध संधी व रोजगार मिळवून देण्यात येणार आहे. या केंद्रात केंद्र समन्वयकाचे, तसेच केंद्र सहायकाचे प्रत्येकी एक पद असेल. त्यासोबत समुदाय साधन व्यक्तींची चार पदे असतील.

कोरोना संकटकाळात लॉकडाऊनमुळे अनेकांपुढे रोजगार जाणे, घरी परतावे लागणे, उत्पन्नात घट होणे आदी अनेक अडचणी उभ्या राहिल्या. अशा नागरिकांना पुन्हा रोजगार मिळवून देण्यासाठी व आर्थिक बळ मिळवून देण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल, असा विश्वास पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी व्यक्त केला.

‘त्या ‘ तीन हजार मुलांना शोधणे गरजेचे … आबा बागुल

0


विद्येच्या माहेरघरी दोन वर्षात महानगरपालिकेच्या शाळेतून तीन हजार मुले ड्रॉप आऊट

ड्रॉप आऊट झालेली मुले शोधून त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणावे

पुणे- महानगरपालिकेच्या शाळांमधून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी तीन हजार विद्यार्थी गेल्या दोन वर्षात ड्रॉप आऊट झाले असून या विद्यार्थ्यांनी शिक्षण सोडले एवढेच नव्हे तर दुसऱ्या शाळेत प्रवेश घेताना शाळा सोडलेला दाखल्याची गरज असते तो देखील त्यांनी पूर्वीच्या शाळेतून घेतलेला नाही. हे ड्रॉप आऊट विद्यार्थी आज नक्की कोठे आहेत? काय करीत आहेत? याची कोणतीही माहिती पुणे महानगरपालिकेकडे नाही. ही गंभीर बाब असून यासाठी ड्रॉप आउट विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी व्हावे आणि ही ड्रॉप आऊट झालेली मुले गुन्हेगारीकडे वळू नयेत यासाठी त्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण द्यावे. त्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी ई लर्निंग स्कूल मध्ये अशा ड्रॉप विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण व नाईट स्कूल सुरू करण्याचा संकल्प केला असल्याचे पुणे महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागूल यांनी सांगितले.

ते म्हणाले की शहरातील गरीब पालकांच्या विद्यार्थ्यांना प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मिळावे या हेतूने पुणे महानगरपालिकेच्या सुमारे तीनशे शाळांमधून शिक्षण दिले जात आहे. पूर्वी ह्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या एक लाखापर्यंत होती. ती कमी होत आता 60 ते 70 हजारापर्यंत आली आहे. मात्र इयत्ता सातवी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर हे विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी अन्य शाळांमध्ये जाणे किंवा महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकणे अपेक्षित असताना घेतलेल्या अधिकृत माहितीनुसार गेल्या दोन वर्षात सुमारे तीन हजार विद्यार्थी ड्रॉप आऊट झाले आहेत. विध्येच्या माहेरघरी एवढ्या मोठ्या संख्येने गरिबांची मुले ड्रॉप आऊट होत आहेत. हीअतिशय गंभीर बाब असून या मोठ्या प्रश्‍नाकडे साऱ्या शहराने, शिक्षण तज्ज्ञाने, राजकीय पक्षांनी लक्ष वेधले पाहिजे व ड्रॉप आऊट विद्यार्थी शोधून त्यांना पारंपारिक पद्धतीने शिक्षण देणे किंवा कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणे गरजेचे बनले आहे. हा विषय गंभीर यासाठी आहे की, सातवीनंतर या विद्यार्थ्यांनी शाळा सोडल्यास त्यांचे भवितव्य काय असणार आहे? त्यांना चांगला रोजगार कसा मिळू शकेल? काहीच नाही तर ते गुन्हेगारीकडे वळण्याची भीती आहे. या सर्व बाबींचा विचार करून असे विद्यार्थी ड्रॉप आऊट होणार नाहीत यासाठीच प्रयत्न केले पाहिजेत. इयत्ता दहावी नंतरचे ड्रॉप आऊट विद्यार्थ्यांची वारंवार माहिती मागूनही अधिकृत माहिती मिळत नाही. हे प्रमाण देखील मोठे असेल हे लक्षात घेऊन राजीव गांधी ई लर्निंग स्कूल मध्ये अशा ड्रॉप आऊट विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र किंवा रात्रीच्या वेळेमध्ये ड्रॉप आउट मुलांची शाळा सुरू करण्याचा संकल्प आबा बागुल यांनी केला आहे.

पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमधील सर्व प्रभागांमध्ये अशा प्रकारचे मॉडेल उभे करावे व ड्रॉप आऊट विद्यार्थी शोधून त्यांना चांगला रोजगार मिळेल यादृष्टीने कौशल्य विकास प्रशिक्षण द्यावे असे आवाहन आबा बागुलांनी केले आहे.

पुण्यातील अनेक शिक्षणतज्ज्ञ, महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी, याचबरोबर शिक्षणाबद्दल आस्था असणारे निवृत्त शिक्षक अशा सर्वांची या संदर्भात एक बैठक आयोजित करून याच्यावर कायमस्वरूपी तोडगा कसा काढता येईल याचाही मी विचार केला असून या संदर्भात लवकरात लवकर बैठक आयोजित करण्यात येणार आहे. महानगरपालिकेने विद्यार्थी आले किंवा येत नाहीत याची माहिती घेऊन ड्रॉप आऊट झालेली मुले शोधून,त्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणावे किंवा कौशल्य विकास प्रशिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिल्यास आपण चांगला नागरिक तयार करू भविष्यात हे देखील पुणेकर नागरिक असणार आहेत. त्यांचे भविष्य चांगले करणेसाठी त्यांचा पाया मजबूत करणे ही देखील आपली जबाबदारी आहे हे लक्षात घेऊन याचा तातडीने विचार करून कृती कार्यक्रम आखावा असे आव्हान मी महानगरपालिका आयुक्तांना करत आहे.अन्यथा दिव्याखाली अंधार अशी म्हण विद्येच्या माहेरघरी होईल. गरिबांची दोन-तीन हजार मुले ड्रॉप आऊट होतात. तरी कोणाचे लक्ष नाही. ती मुले काय करतात कोणाला माहित नाही. आणि वर्षानुवर्ष हे पुढे असेच चालू राहणार हे थांबवायचे असेल तर वेळीच सावध होऊन आत्ताच सुरुवात केली पाहिजे यासाठी राजीव गांधी ई लर्निंग स्कूल मध्ये पथदर्शक सुरुवात आम्ही करीत आहोत. ज्यांना ज्यांना अशा ड्रॉप विद्यार्थ्यांची माहिती आहे. त्यांनी, विद्यार्थ्यांच्या पालकांनी पुणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी ई लर्निंग स्कूल मध्ये संपर्क करावा. आपल्या पाल्याचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांना हातभार लावा असे आवाहन आबा बागुलांनी केले.

महापालिकेत भाजपची बैठक

0

आयुक्त, अधिकारी, पदाधिकारी, लोकप्रतिनिधीसह 73 नगरसेवकांची उपस्थिती

पुणे -कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे प्रलंबित विकास प्रकल्प आणि भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांच्या प्रभागातील वॉर्डस्तरीय  विकासकामांना गती देण्याची आग्रही मागणी भारतीय जनता पार्टीचे पुणे शहराचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली.

शहराध्यक्ष मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत यासंदर्भात विस्तृत बैठक संपन्न झाली.

पुण्यनगरीचे महापौर मुरलीधर मोहोळ,आमदार सिद्धार्थ शिरोळे, सुनिल कांबळे, आ बापूसाहेब पठारे,उपमहापौर मा.सरस्वतीताई शेंडगे, स्थायी समितीचे अध्यक्ष मा.हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे,तसेच महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अग्रवाल, शंतनू गोयल, कुणाल खेमनार यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली. सदरील बैठकीला 73 नगरसेवक उपस्थित होते.

शहराध्यक्ष मुळीक यांच्या सूचनेला प्रतिसाद देत शहरातील विकासकामे तातडीने सुरू करण्याचे आदेश आयुक्त कुमार यांनी प्रशासनाला दिले.

भामा आसखेडचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, समान पाणीपुरवठा योजनेला वेग द्यावा, नालेसफाई करावी, प्रस्तावित उड्डाणपूल व रस्त्यांची कामे मार्गी लावावी, शहरातील कचरा व्यवस्थापन सुरळीत करावे, वॉर्डस्तरीय विकासकामांना मंजुरी देऊन ती सुरु करावीत आदी सूचना शहराध्यक्ष मुळीक यांनी केल्या.

नगरसेवकांनी प्रलंबित कामांबाबत सूचना केल्या व त्याच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा केला. बैठकीस सर्व खातेप्रमुख तसेच भारतीय जनता पार्टीचे शहर प्रभारी गणेश बिडकर, सरचिटणीस गणेश घोष, दीपक नागपुरे,संदीप लोणकर,दीपक पोटे, दत्ताभाऊ खाडे या बैठकीस उपस्थित होते.सभागृह नेता धीरज घाटे यांनी प्रस्तावना केली, आयुक्त विक्रम कुमार यांनी या विषयावर खुलासा केला तर मा.महापौर मुरलीधर मोहोळ यांनी बैठकीचा समारोप केला. अशा पद्धतीने ३ बैठका संपन्न होणार आहेत.

पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया यांच्या स्मृतींना उजाळा…

0

पुणे: “शासनाच्या अनेक योजना असून सामान्य नागरिकांना माहिती नसते. आशा विविध शासनाच्या योजनांची माहिती आणि लाभ लाभार्थींना सहजासहजी मिळावे यासाठी शासकीय सेवा योजना  मदत व मार्गदर्शन प्रकल्प’ अंतर्गत काम सुरू आहे. पात्र लभार्थींना योजनेचे स्वरूप त्यासाठी लागणारे महत्वाची कागदपत्रे मिळणार लाभ याबाबत जनजागृती केली जाणार आहे.” अशी माहिती महसुल विभागाचे माजी उप-आयुक्त व दीपस्तंभ संस्थेचे अध्यक्ष के. सी. कारकर यांनी दिली.

पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया यांच्या स्मृती दिनानिमित्त ‘वनराई’ आणि दिपस्तंभ संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शासकीय सेवा योजना  मदत व मार्गदर्शन प्रकल्प’  ओळख कार्यक्रम व गावनिहाय प्रमुख कार्यकर्ते प्रशिक्षण ग्रामीण भागातील गावात देण्यात आले. तसेच संस्थेतर्फे भोर गावातील ग्राम विकास प्रशिक्षण केंद्र येथे भजनांचा कार्यक्रमात आयोजित करून डॉ. मोहन धारिया यांच्या आठवणींना ग्रामस्थांनी उजाळा दिला.

तसेच मार्गदर्शन शिबिर सातारा जिल्ह्यातील खंडाळा गावातील  क्रांतीसिंह नाना पाटील पशुवैद्यकिय महाविद्यालय येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वनराईचे अध्यक्ष रविंद्र धारिया, वनराई मुख्य प्रकल्प संचालक जयवंत देशमुख, महसुल विभागाचे माजी उप-आयुक्त व दीपस्तंभ संस्थेचे अध्यक्ष के.सी.कारकर, सामाजिक कार्यकर्ते सूरज पोळ, शेतकरी नेते प्रमोद जाधव उपस्थित होते. 

वनराईचे अध्यक्ष रविंद्र धारिया म्हणाले,”वनराईतर्फे ग्रामीण भागात काम सुरू असून एकात्मिक ग्राम असं जेव्हा गावाचा विकास करायचं असेल तर शासनाच्या सेवा योजनाची माहिती आणि लाभ गावातील लोकांना मिळावे यासाठी वनराई आणि दिपस्तंभ संस्था एकत्र येऊन ‘शासकीय सेवा योजना  मदत व मार्गदर्शन प्रकल्प’  अंतर्गत ग्रामीण भागात जनजागृती करण्याचे काम करणार आहे.”

12 आमदारांच्या शिफारशीचे मुख्यमंत्र्यांना देणार अधिकार

0

मुंबई-विधान परिषदेवर राज्यपाल निर्देशित १२ आमदारांच्या नियुक्त्यांना मुहूर्त मिळाला आहे. गुरुवारी (ता. २९) होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सदस्यांच्या शिफारशीचे अधिकार मुख्यमंत्र्यांना बहाल करण्यात येणार आहेत. या शिफारस करण्याच्या प्रस्तावामध्ये कुणाच्याही नावाचा उल्लेख असणार नाही. दरम्यान, १२ सदस्यांच्या यादीमध्ये नुकतेच राष्ट्रवादीत दाखल झालेले एकनाथ खडसे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, शिवसेनेच्या वतीने मिलिंद नार्वेकर, आदेश बांदेकर, सचिन अहिर तर काँग्रेसतर्फे अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर, सचिन सावंत यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे.

मंत्रिमंडळाने मुख्यमंत्र्यांना अधिकार बहाल करण्याचा ठराव पारित केल्यावर मुख्यमंत्री १२ किंवा त्यापेक्षा कमी सदस्यांची नावे राज्यपाल महोदयांना कळवतील. त्याच दिवशी किंवा नंतरसुद्धा ते राजभवनला कळवू शकतात, अशी माहिती एका मंत्र्याने दिली. दरम्यान, बुधवारची मंत्रिमंडळ बैठक रद्द करण्यात आली असून ती गुरुवारी ठेवण्यात आली आहे. जून महिन्यापासून विधान परिषदेच्या १२ जागा रिक्त आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदारांच्या नियुक्त्या लांबल्या आहेत. राजभवन व ‘मातोश्री’ यांच्यातील संबंध सध्या ताणलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यपाल शिफारस डावलतात की मंजूर करतात, याची मोठी उत्सुकता आहे. मुंबईचे आणि त्यात तीन मराठा उमेदवार देण्यास काँग्रेसमधून विरोध आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्लीला तक्रारी केल्याचे समजते.

राज्यपाल काेश्यारी बॅकफूटवर

राज्यपाल सध्या बॅकफूटवर आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी एका मुलाखतीत त्यांच्याबाबत नाराजी प्रकट केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपालांची पंतप्रधानांकडे तक्रार केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची चांगलीच धुलाई केली. परिणामी राज्यपाल १२ सदस्यांच्या निवडीची मंत्रिमंडळ शिफारस डावलणार नाहीत, असा आघाडीच्या नेत्यांचा अंदाज आहे.

आमदारकीसाठी चर्चेतील चेहरे

१. शिवसेना : सुनील शिंदे, सचिन अहिर, मिलिंद नार्वेकर, आदेश बांदेकर, शिवाजीराव आढळराव-पाटील

२. काँग्रेस : नसीम खान, सचिन सावंत, मोहन जोशी, ऊर्मिला मातोंडकर, सत्यजित तांबे, आशिष देशमुख, चारुलता टोकस, रजनी पाटील

३. राष्ट्रवादी : एकनाथ खडसे, राजू शेट्टी, आनंद शिंदे, शिवाजी गर्जे, अदिती नलावडे.

असा आहे इतिहास : २०१४ मध्ये आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी १० सदस्यांची नावे मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करून राज्यपालांकडे शिफारस केली होती. त्यानंतर दोन महिन्यांनी दोन सदस्यांच्या नावांची शिफारस करण्याचे अधिकार मंत्रिमंडळाने मुख्यमंत्र्यांना बहाल केले हाेते. तेव्हा दोन नावे मंत्रिमंडळ बैठकीसमोर आली नव्हती.

सुरेश जगताप महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावर..

0

पुणे – महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांतून तिसरे अतिरिक्त आयुक्त नेमण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने अखेर मंगळवारी मंजूर केला असून, महापालिकेतील सहआयुक्त सुरेश जगताप यांना पदोन्नती देत,अतिरिक्त आयुक्त केले आहे. त्याबाबतचा आदेशही राज्य सरकारने काढला आहे. जगताप यांच्या नेमणुकीने पहिल्यांदाच “आयएएस’ऐवजी महापालिकेतील अधिकाऱ्याकडे हे पद आले आहे.

राज्यातील महापालिकांची वर्गवारी करीत, त्यातील अतिरिक्त आयुक्तांची पदे निश्‍चित करण्यात आली आहेत. पुणे महापालिका “अ’वर्गात असल्याने तीन अतिरिक्त आयुक्तपदे आहेत. त्यानुसार पहिले दोन आयुक्त हे राज्य सरकारने तर तिसरे आयुक्त हे सहआयुक्तांमधून निवडण्याची मागणी महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या संघटनेने लावून धरली होती. त्यानंतर महापालिकेतील अधिकाऱ्याची नेमणूक करण्याचा आदेश राज्य सरकारने 2015 मध्ये काढला होता. सरकारच्या निकषानुसार महापालिकेतील शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्यासह सहआयुक्त ज्ञानेश्‍वर मोळक, विलास कानडे आणि जगताप यांच्या नावांची शिफारस तत्कालीन आयुक्त कुणाल कुमार यांनी सरकारकडे केली होती. मात्र, गेल्या तीन-साडेतीन वर्षांपासून त्यावर कोणताही निर्णय झाला नव्हता. त्याचवेळी राजकीय हस्तक्षेपही झाल्याने हा प्रस्ताव रखडल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, गोयल यांची बदली झाल्यानंतर अतिरिक्त आयुक्त म्हणून जगताप यांची नेमणूक करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

महापालिकेत जगताप हे पहिल्यांदा कनिष्ठ अभियंता म्हणून रुजू झाले होते. त्यानंतर क्षेत्रीय अधिकारी, खातेप्रमुख, उपायुक्त आणि त्यानंतर त्यांना सहआयुक्त पदावर पदोन्नती देण्यात आली होती.

व्याघ्र भ्रमंती मार्ग वाचविणे आवश्यक – वनमंत्री संजय राठोड

0

वर्धा, दि 27 :-  वाघाचा अधिवास असणारे जंगल सर्वात समृद्ध आणि परिपूर्ण जंगल समजले जाते. वाघांसाठी गाभा क्षेत्रासोबतच त्यांचे भ्रमण मार्ग टिकवून ठेवणेसुद्धा तेवढेच आवश्यक आहे. परंतु, विकासात्मक  कामे करताना जंगलातील वाघाचे भ्रमंती मार्ग बाधित होतात. वाघांचे भ्रमण मार्ग टिकवून ठेवण्यास बाधा आणणारे विभाग आणि त्यांच्या अधिकाऱ्यांवरसुध्दा यापुढे कारवाई करू असा इशारा वनमंत्री संजय राठोड यांनी  दिला आहे.

बोर अभयारण्यातील  पुनर्वसित नवरगावची पाहणी करून बोर व्याघ्र प्रकल्पात भ्रमंती करून  वनविभागाच्या जुन्या नवरगाव येथील विश्रामगृहात अधिकाऱ्यांची बैठक घेतली, त्यावेळी श्री. राठोड बोलत होते.  वन विभाग, वन्यजीव आणि सामाजिक वनीकरण अशा तीनही विभागाच्या अधिकाऱ्यांशी त्यांनी कामाचे नियोजन, नाविन्यपूर्ण प्रकल्प आणि येणाऱ्या अडचणींसंदर्भात सखोल चर्चा केली.

मानव वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. हा संघर्ष कशा पद्धतीने कमी करता येईल याबाबत त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. बोर व्याघ्र प्रकल्पातील गाभा क्षेत्रात येणारे नवरगाव हे एकमेव गाव असून त्याचे आदर्श पुनर्वसन झाले आहे. मात्र गाभा क्षेत्राला लागून असलेल्या 22 गावांची पुनर्वसनाची मागणी आहे. या गावांचे पुनर्वसन करून प्रश्न सुटणार नाही असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.  मनुष्य आणि वन्यजीव हानी टाळण्यासाठी गावांना आणि शेताला सौर कुंपण देणे हा चांगला पर्याय ठरू शकतो.  यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी हा विषय मंत्रिमंडळासमोर ठेवणार असल्याचे  त्यांनी सांगितले.

बोर प्रकल्प येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे रिसॉर्ट  आणि वापरात नसलेल्या इमारती एफ डी सी एम कडे हस्तांतरित केल्यास त्याची योग्य काळजी घेऊन त्यांचा चांगला वापर करता येईल. यासंदर्भात त्यांनी स्वतः  पर्यटनमंत्र्यांसोबत चर्चा करून हा मुद्दा मार्गी लावू असे सांगितले.

प्रत्येक वनक्षेत्रामध्ये जखमी होणाऱ्या वन्य जीवांसाठी ट्रान्झिट उपचार केंद्र असणे आवश्यक आहे. यामुळे प्राण्यांना तात्काळ उपचार मिळून त्यांचे प्राण वाचविता येऊ शकतात . असे केंद्र सुरू करण्यासाठीसुद्धा धोरणात्मक निर्णय घेऊ असेही श्री. राठोड यांनी यावेळी सांगितले.

बोर व्याघ्र प्रकल्पातील गाभा क्षेत्रात येणारे नवरगावचे पुनर्वसन आदर्श पुनर्वसन झाले असून या खात्याचा मंत्री म्हणून वनविभागाच्या या पुनर्वसनाच्या कामाचे त्यांनी कौतुक करून अशा कामाचा  अभिमान असल्याचे सांगितले. या पुनर्वसनाबाबत गावकऱ्यांशी त्यांनी चर्चा करुन त्यांची सुद्धा मते जाणून घेतली. गावकऱ्यांनी याबाबत  समाधान व्यक्त केले.

यावेळी मुख्य वन संरक्षक तथा पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. रविकिरण गोवेकर, मुख्य वन संरक्षक प्रादेशिक नागपूरचे पी कल्याणकुमार, नागपूरचे सामाजिक वनीकरण वनसंरक्षक श्री मानकर, वर्धा उपवन संरक्षक सुनील शर्मा, वर्धा सामाजिक वनीकरण वनसंरक्षक श्री जोशी, नागपूर वन्यजीव  बोर अभयारण्यचे  विभागीय वनाधिकारी आर बी गवई तसेच वन विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.

चंद्रपुरातील चांदा येथे आरटी-१ वाघ जेरबंद

0

मुंबई, दि. २७ :-  चंद्रपूर जिल्ह्यातील मध्य चांदा भागात दहशत माजविणाऱ्या वाघास आज दुपारी वन विभागाच्या पथकाने जिवंत पकडले. वाघाला शिताफीने पकडून जेरबंद केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वन अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक केले आहे.

गेल्या काही महिन्यांत या आरटी-१ वाघाच्या हल्ल्यात आठ जणांचा मृत्यू झाला होता, तर तिघे जखमी झाले होते. दोनच दिवसांपूर्वी हा वाघ पिंजरा तोडून पळाला होता, पण पुन्हा आज त्याला सापळा लावून पकडण्यात आले.

हा वाघ सुमारे वीस चौरस किलोमीटर परिसरात फिरत होता. त्याला पकडण्यासाठी मुख्य वन्यजीव रक्षक यांनी १४ फेब्रुवारी २०२० रोजी आदेश दिलेले होते. तेंव्हापासून वन विभागाची पथके या वाघाच्या मागावर होती. पण तो हुलकावण्या देत होता. रात्रीच्या अंधारातच त्याचा अधिक वावर होता. या वाघाला जिवंत पकडण्यासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील २५ वनरक्षकांची चार पथके (STPF), १४ गावांतील ३५ स्वयंसेवक यांच्यासह ४ पशुवैद्यकीय अधिकारी व वनाधिकारी प्रयत्न करत होते. वाघाच्या हालचाली टिपण्यासाठी सीसीटिव्ही कॅमेरे, नाईट व्हिजन कॅमेरेही लावण्यात आले होते. दोनच दिवसांपूर्वी हा वाघ सापळ्यात अडकता-अडकता पिंजरा तोडून पळाला होता.

मागावर असलेल्या पथकांनी पुन्हा प्रयत्न सुरु केले. यात चांदा वन विभागातील राजूरा व विरुर वनपरिक्षेत्रात सिंदी गावाजवळ रेल्वेच्या पुलाखाली लावलेल्या सापळ्यात हा वाघ अडकला. या वाघाला पशूवैद्यकीय पथकाच्या मदतीने बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आले. मानवी जिवीतास धोकादायक ठरलेल्या वाघास जिवंत जेरबंद करण्यात आल्याने हे वन विभागाचे मोठे यश मानले जात आहे. या प्रय़त्नांसाठी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी वाघाला जिवंत जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. वाघ जेरबंद झाल्यामुळे परिसरातील गावकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे.

आज राज्यात ५,३६३ नवीन रुग्णांचे निदान

0

मुंबईदि.२७ : राज्यात आज ७,८३६ रुग्ण बरे होऊन घरी, गेले असून  राज्यात आजपर्यंत एकूण १४ लाख ७८ हजार ४९६ कोरोना बाधित बरे होऊन घरी गेले आहेत.  राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८९.३९ टक्के एवढे झाले आहे.

आज राज्यात ५,३६३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.

राज्यात आज ११५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद  झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८७ लाख ३३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६ लाख ५४ हजर ०२८ (१९.०१ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात २५ लाख २८ हजार ९०७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १३ हजार २३७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज रोजी एकूण १ लाख ३१ हजार ५४४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील ॲक्टीव्ह रुग्ण  –

राज्यात आज रोजी एकूण १,३१,५४४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

अ.क्र.जिल्हाबाधित रुग्णबरे झालेले रुग्णमृत्यूइतर कारणामुळे झालेले मृत्यूऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई२५२८८६२२३५८६१०१६५५०२१८६३३
ठाणे२२०२३७१९४८७३५२९२२००७१
पालघर४२५०४३८३७३९४६ ३१८५
रायगड५८९४९५३६५२१३९३३९०२
रत्नागिरी९९२८८२५६३६९ १३०३
सिंधुदुर्ग४९०३४१४५१३२ ६२६
पुणे३३०८०५३००२९२६६२९२३८८२
सातारा४६६५८४०१८७१३९९५०७०
सांगली४६२०१४१६९५१५१७ २९८९
१०कोल्हापूर४६९६६४४०२४१६०३ १३३९
११सोलापूर४३१३४३८२६३१४१७३४५३
१२नाशिक९२७१४८५१८४१५३० ६०००
१३अहमदनगर५५१०५४८२२४८४३ ६०३८
१४जळगाव५३२१७४९८१५१३४२ २०६०
१५नंदूरबार६३०८५६९५१३८ ४७५
१६धुळे१४११३१३३६२३४०४०९
१७औरंगाबाद४१५२८३७३२०९६७ ३२४१
१८जालना१०११४९२१६२७१ ६२७
१९बीड१३५३७११४७३४०७ १६५७
२०लातूर२०५००१७५२२६०६ २३७२
२१परभणी६५४६५४४४२३५ ८६७
२२हिंगोली३६०१३००३७४ ५२४
२३नांदेड१८९८८१६०२८५११ २४४९
२४उस्मानाबाद१५१०३१३४११४९४ ११९८
२५अमरावती१६७९११५३८९३४८ १०५४
२६अकोला८४६९७३३६२७१८६१
२७वाशिम५६७९५१५५१३२३९१
२८बुलढाणा१०२३६८२१५१६५ १८५६
२९यवतमाळ१०६७०९७२३३१२ ६३५
३०नागपूर१००४७६९२६६०२७०२१०५१०४
३१वर्धा६४५९५६७६१९९५८३
३२भंडारा८५६७७२८०१८९ १०९८
३३गोंदिया९५६३८५४४११० ९०९
३४चंद्रपूर१५५५१११०९८२३५ ४२१८
३५गडचिरोली४९१४३९४९३४ ९३१
 इतर राज्ये/ देश२१०८४२८१४६ १५३४
 एकूण१६५४०२८१४७८४९६४३४६३५२५१३१५४४

(टीप – बरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येतेजिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.)

करोनाबाधित रुग्ण –

आज राज्यात ५,३६३ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १६,५४,०२८ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे –

अ.क्रजिल्हा महानगरपालिकाबाधित रुग्णमृत्यू
दैनंदिनएकूणदैनंदिनएकूण
मुंबई महानगरपालिका८०१२५२८८६२३१०१६५
ठाणे९३३४०४४ ८२२
ठाणे मनपा१८८४५८७८ १२०६
नवी मुंबई मनपा१२८४७२६२१०१०
कल्याण डोंबवली मनपा१३२५३३१७ ९३३
उल्हासनगर मनपा३२१०२४२ ३२३
भिवंडी निजामपूर मनपा१६६२०० ३४६
मीरा भाईंदर मनपा६५२३२९४६५२
पालघर४४१५३६७ २९८
१०वसई विरार मनपा७९२७१३७ ६४८
११रायगड७३३४५०७८७३
१२पनवेल मनपा७६२४४४२५२०
 ठाणे मंडळ एकूण१७२७५७४५७६३११७७९६
१३नाशिक५८२४७१९ ५१६
१४नाशिक मनपा३३७६३८९०८६४
१५मालेगाव मनपा४१०५ १५०
१६अहमदनगर२५०३६९९९५१६
१७अहमदनगर मनपा२४१८१०६ ३२७
१८धुळे१९७६६१ १८७
१९धुळे मनपा६४५२ १५३
२०जळगाव७९४१०१२१०५६
२१जळगाव मनपा२५१२२०५२८६
२२नंदूरबार६३०८ १३८
 नाशिक मंडळ एकूण८०४२२१४५७१०४१९३
२३पुणे२२१७६०४३१५५५
२४पुणे मनपा२४२१७०८९८१६३८९०
२५पिंपरी चिंचवड मनपा११४८३८६४ ११८४
२६सोलापूर१५७३२९८२८९७
२७सोलापूर मनपा२९१०१५२५२०
२८सातारा२२०४६६५८१३९९
 पुणे मंडळ एकूण९८३४२०५९७३०९४४५
२९कोल्हापूर५३३३३९८१२११
३०कोल्हापूर मनपा३२१३५६८३९२
३१सांगली१९९२७०७०९५१
३२सांगली मिरज कुपवाड मनपा१८१९१३१ ५६६
३३सिंधुदुर्ग२६४९०३१३२
३४रत्नागिरी३६९९२८ ३६९
 कोल्हापूर मंडळ एकूण३६४१०७९९८३६२१
३५औरंगाबाद२०१४४३० २७७
३६औरंगाबाद मनपा४३२७०९८ ६९०
३७जालना५८१०११४२७१
३८हिंगोली३६०१ ७४
३९परभणी१३३६४३११७
४०परभणी मनपा२९०३ ११८
 औरंगाबाद मंडळ एकूण१४८६१७८९१५४७
४१लातूर३५१२३१६४०४
४२लातूर मनपा४०८१८४२०२
४३उस्मानाबाद३५१५१०३४९४
४४बीड९७१३५३७४०७
४५नांदेड३४१०१४६ २७४
४६नांदेड मनपा३४८८४२ २३७
 लातूर मंडळ एकूण२७५६८१२८१२२०१८
४७अकोला३८१९ १०५
४८अकोला मनपा१०४६५० १६६
४९अमरावती१९६१६८ १४८
५०अमरावती मनपा२६१०६२३ २००
५१यवतमाळ६३१०६७०३१२
५२बुलढाणा१२९१०२३६१६५
५३वाशिम३३५६७९१३२
 अकोला मंडळ एकूण२८१५१८४५१२२८
५४नागपूर१०५२४०६२४९१
५५नागपूर मनपा१७२७६४१४२२११
५६वर्धा३९६४५९१९९
५७भंडारा११३८५६७१८९
५८गोंदिया९६९५६३ ११०
५९चंद्रपूर७७९२१६११०
६०चंद्रपूर मनपा५४६३३५१२५
६१गडचिरोली११६४९१४ ३४
 नागपूर एकूण७७२१४५५३०१७३४६९
 इतर राज्ये /देश२१०८१४६
 एकूण५३६३१६५४०२८११५४३४६३

(टीप–  ही माहिती केंद्र सरकारच्या आयसीएमआर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहेप्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो. )