Home Blog Page 2404

वंचितांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थांचा पुढाकार समाधानकारक-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मानवी आणि नैसर्गिक संकटात भारतभरातील गरजू व वंचित समाजाला मदतीचा हात देण्याचा मुकुल माधव फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम

पुणे : “मानवी आणि नैसर्गिक संकट काळात देशभरातील गरजू व वंचित समाजाला सन्मानाने जगण्यासाठी मदतीचा हात देण्याचा मुकुल माधव फाउंडेशनचा उपक्रम स्तुत्य आहे. गोरगरीब जनतेच्या पाठीशी राज्य सरकार तर आहेच; पण उद्योग आणि सामाजिक संस्था हिरीरीने पुढाकार घेत आहेत, ही समाधानाची बाब आहे,” असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशनच्या पुढाकारातून आयोजित ‘गिव्ह विथ डिग्निटी’ उपक्रमाचा शुभारंभ उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी झाला. मुंबईतील मातोश्री क्लब हाऊस येथे झालेल्या या कार्यक्रमावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, ऍड. गौरी छाब्रिया, हिंदुजा फाउंडेशनचे सीईओ पॉल अब्राहम, फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष बी. आर. मेहता, ऑर्बिटचे संचालक संजय आशेर आदी उपस्थित होते.

कोरोना, नैसर्गिक आपत्तीच्या कठीण स्थितीत गरजू व वंचितांची दिवाळी आनंदमय होण्यासाठी मुकुल माधव फाउंडेशन ‘गिव्ह विथ डिग्निटी’ उपक्रम देशभर राबवत आहे. या उपक्रमाद्वारे भारतातील २४ राज्यांतील ७० हजार कुटुंबातील तीन लाख लोकांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे. चार सदस्यीय कुटुंबाला २१ दिवसांसाठी पुरेल इतके साहित्य देण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘फ्लॅग ऑफ’ झाल्यानंतर महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, अमरावती, बीड, उस्मानाबाद, गडचिरोली, वाशीम, रत्नागिरी, पालघर, बुलढाणा, परभणी, नाशिक, सोलापूर, सांगली, सातारा, अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव आदी जिल्ह्यात २०-२५ हजार कुटुंबाना मदत दिली जाणार आहे. 

समविचारी संस्था, मित्र परिवार आणि फाउंडेशनच्या हितचिंतकांच्या माध्यमातून तसेच जिल्हा प्रशासनाच्या मदतीने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत आहोत. फिनोलेक्स इंडस्ट्रीज, केव्हिनकेअर, मारिको, हिंदुजा फाऊंडेशन, नेसले, इंडोरमा, इंडसइंड बँक, अशोक लिलॅन्ड, गल्फ ऑइल आदींचा समावेश आहे. ही किट्स पूर्ती ग्रुप, माणदेशी फाउंडेशन, स्टार फूड्स यांनी तयार केले आहेत. सेंटर फॉर युथ डेव्हल्पमेंट्स अँड ऍक्टिव्हिटी (सिवायडीए) संस्थेकडून मास्क आणि बारामती येथील सोबती संस्थेकडून सॅनिटरी नॅपकिन्स घेण्यात आले आहेत. 

मुकुल माधव फाऊंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितु प्रकाश छाब्रिया म्हणाल्या, “वैश्विक महामारीचा काळ आव्हानात्मक होता. लोकांच्या आर्थिक, मानसिक, शारीरिक स्वास्थ्यावर, तसेच दैनंदिन जीवनावर नकारात्मक परिणाम झाला. त्यांना आधार देण्यासाठी कंपन्या, समविचारी सहकारी, स्वयंसेवी बचत गट, लघु व माध्यम उद्योग या सर्वांच्या सहकार्यातून हा उपक्रम चालतोय. फिनोलेक्सच्या प्रादेशिक, जिल्हा स्तरावरील टीमकडून मोठे सहकार्य मिळत आहे. या उपक्रमातून अनेक कुटंबांची दिवाळी प्रकाशमान होईल.”

यांच्या विजयाचे भारताच्या दृष्टीने असे आहे महत्त्व

0

बायडेन यांनी मुसंडी मारताच ट्रम्प यांना आता पुन्हा संधी नाही हे निश्चित झाले. त्यांना व्हाइट हाऊस सोडावेच लागेल. २८ वर्षांत प्रथमच यंदा अमेरिकेत विद्यमान राष्ट्राध्यक्षाला दुसऱ्यांदा कार्यकाळ मिळू शकलेला नाही. बायडेनपेक्षा त्यांच्या सहकारी कमला हॅरिस यांनी मोठा विक्रम आपल्या नावे प्रस्थापित केला असून अमेरिकेच्या इतिहासात त्या पहिल्या महिला उपाध्यक्ष असतील. कमला यांची आई मूळ तामिळनाडूची होती. दरम्यान, बायडेन अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष असतील. यापूर्वी २००९ ते २०१७ दरम्यान बराक ओबामा यांच्या काळात ते उपाध्यक्ष होते. तीन दशके त्यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी जीव तोडून प्रयत्न केले होते.

बायडेन यांनी २७ व्या वर्षी सासूला सांगितले होते – एक दिवस राष्ट्राध्यक्ष होईन

२७ वर्षांचे असताना बायडेन यांनी पहिले लग्न १९६६ मध्ये केले होते. काय काम करता, असा प्रश्न मुलीच्या आईने केला. ते उत्तरले, मी एके दिवशी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होईन. ३२ वर्षांत तिसऱ्या प्रयत्नात ते राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकले.

ट्रम्प घुसखोर; टीम बायडेनकडून टीका

डोनाल्ड ट्रम्प अद्याप आपल्या विजयाचे दावे करीत आहेत. यावर बायडेन यांनी कठोर भूमिका घेतली आहे. बायडेन यांच्या प्रचार टीमचे प्रवक्ते अँड्र्यू बेट्स म्हणाले, व्हाइट हाऊसमधून घुसखोराला बाहेर हाकलण्यासाठी अमेरिकी प्रशासन सक्षम आहे. तर ‘देशासाठी काम करणे हे आमचे राजकीय ध्येय आहे. संघर्षाला खतपाणी न घालता नवी सुरुवात करूया,’ असे बायडेन म्हणाले.

कमला हॅरिस यांची पहिली प्रतिक्रिया

ही निवडणूक माझ्या किंवा जो बायडेन यांच्यापेक्षा जास्त महत्त्वाची होती. ती अमेरिकेचा आत्मा व देश एकसंध राखण्यासाठी लढण्याच्या इच्छेच्या बाबतीत आहे. आपल्याला खूप कामे करायची आहेत. चला ती सुरू करूया…

गरिबांच्या तारणहार म्हणून कमला यांची ओळख, स्टार प्रतिमेमुळे प्रकाशझोतात

कमला हॅरिस या लिंगभेद-वर्णद्वेषासारख्या आव्हानांचा मुकाबला करून इथपर्यंत पाेहोचल्या आहेत. त्या सॅनफ्रान्सिस्को जिल्ह्याच्या अॅटर्नी, तर कॅलिफोर्नियाच्या पहिल्या कृष्णवर्णीय अॅटर्नी जनरल राहिल्या. कमला या डेमोक्रॅटिक पार्टीत बायडेन यांच्या कडव्या विरोधक राहिल्या आहेत. मात्र आता त्यांच्या सहकारी आहेत. २०११ मधील बँकिंग क्षेत्रातील मंदीमुळे बेघर झालेल्यांना भरपाई देण्यासाठी कमला यांनी मोहीम राबवली. यानंतर त्या राष्ट्रीय आयकाॅन बनल्या.

प्राधान्यक्रम :

महामारी नियंत्रण व रोजगार राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडेन यांनी प्राधान्यक्रम सांगितला. अाम्ही अंतिम निकालाची वाट पाहत आहोत.परंतु काम सुरू करण्यासाठी वाट पाहणार नाही.पहिल्या दिवसापासूनच कोरोना नियंत्रणासाठी एक योजना लागू करणार आहोत. लाखो लोक रोजी-रोटीकरिता हैराण आहेत. हे डोळ्यासमोर ठेवून आर्थिक योजना तयार केली आहे.

बायडेन यांच्या विजयाचे भारताच्या दृष्टीने महत्त्व

> २००६ मध्ये बायडेन म्हणाले होते, सर्वात दृढ संबंध असणाऱ्या दोन देशांत अमेरिका व भारत असावेत,असे माझे स्वप्न आहे.

> उपराष्ट्राध्यक्षपदी असताना अमेरिकेने युनोत भारताच्या स्थायी सदस्यत्वाच्या दाव्याला अधिकृत पाठिंबा दिला होता. मात्र, पाक-चीनबद्दल भूमिका अस्पष्ट.

> कमला हॅरिस यांनी काश्मीर मुद्द्यावर मतप्रदर्शन केले आहे. त्यामुळे कलम ३७० चा मुद्द्यावर त्यांचे मत भारताच्या दृष्टीने अडचणीचे ठरू शकते.

दोन वर्षे बायडेन यांची कसोटी

विधेयके, करारास सिनेटची मंजुरी लागते. डेमोक्रॅटिकचे ४७ सदस्य आहेत.या स्थितीत रिपब्लिकनचे बहुमत असताना बायडेन यांना विधेयके मंजूर करून घेणे कठीण जाईल. दोन वर्षांनी मध्यवर्ती निवडणूक होईपर्यंत अडचण होऊ शकते.

मुख्यमंत्री आज काय बोलणार ?

0

मुख्यमंत्री आज दुपारी 1.30 वाजता सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधतील.

गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात अनेक घटना घडत आहेत. यामध्ये कंगना राणावत, अर्णब गोस्वामीचे प्रकरण आहेत. यासोबतच गोस्वामीला अटक झाल्यानंतर राज्य सरकारवर विरोधकांकडून सातत्याने टीका केली जात आहे. तसेच आणीबाणीची आठवण करुन दिली जात आहे. याविषयावर मुख्यमंत्री काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यासोबतच मुख्यमंत्री म्हणाले होते की, लवकरच राज्यातील सर्वच बंधने ही शिथिल करण्यात येतील. सध्या राज्यात सिनेमागृह सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. आजच्या भाषणामध्ये मुख्यमंत्री नेमक्या काय घोषणा करतात हे पाहणे महत्त्वाचे आहे. कारण महाराष्ट्रातली मंदिरे कधी उघडणार असा प्रश्न भाजपा आणि मनसेकडून वारंवार उपस्थित केला जात आहे. भाजपकडून यासाठी अनेक आंदोलनेही करण्यात आली आहेत. त्यावरही ते भाष्य करण्याची शक्यता आहे.

केंद्र-राज्याच्या शासकीय कार्यालयांमध्ये मराठी प्रथम भाषा

0

मुंबई – मराठी भाषा शासकीय पातळीवर सहसा वापरली जात नाही, आणि वापरली गेली तरी ती समजायला क्‍लिष्ट असते, अशी तक्रार आता कोणालाही करता येणार नाही. तसेच ‘आमची मातृभाषा मराठी मरते आहे हो…’ असा टाहोही कोणालाही फोडता येणार नाही. राज्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी हा सक्तीचा विषय करण्यात आला आहे. आता मराठी राज्य भाषा विभागाने केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या अंतर्गत येणा-या सर्व उपक्रमांमध्ये मराठी भाषेचा वापर सर्वात अगोदर करण्यात यावा, असा निर्णय घेतला आहे.

मराठी बंधनकारकमराठी भाषा विभागाच्या या निर्णयामुळे मुंबईसह राज्यातील केंद्र सरकारची सर्व कार्यालये, बॅंका, पोस्ट ऑफीस, वीमा, रेल्वे, मेट्रो मोनो, विमानतळ, पेट्रोलियम कंपन्या व केंद्राच्या सार्वजनिक उपक्रमांमध्ये त्यांच्या विविध कार्यक्रमांसाठी तसेच प्रचारासाठी मराठीचा वापर करणे बंधनकारक होणार आहे.यासाठी मराठी भाषा विभागाने शासकीय आदेश अर्थात जीआर काढून आदेश दिले आहेत. या आदेशानुसार केंद्रीय कार्यालयांमधील नावांच्या पाट्या, सूचना फलक, जाहिरात मराठी भाषेत असणे आवश्‍यक आहे. त्यासाठी मराठी, हिंदी व इंग्रजी असा प्राधान्यक्रम असेल असे संबंधित केंद्रीय कार्यालयांना लेखी स्वरुपात द्यावे लागणार आहे. ज्या विभागाकडून दिरंगाई केली जाईल त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदी भारतीय वंशाच्या कमला हॅरीस

0

अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदी भारतीय वंशाच्या कमला हॅरीस यांना संधी मिळणार आहे. कमला हरीस यांची उपराष्ट्राध्यक्षपदासाठी निवड झाली आहे.कमला हॅरीस या डेमोक्रेटीक पक्षाच्या उमेदवार असून राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडन यांनी उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी कमला हॅरीस यांच्या नावाची घोषणा केली होती. आता डेमोक्रेटीक पक्षाने अमेरिकेतील निवडणुकीत वर्चस्व सिद्ध केल्यामुळे कमला हॅरीस यांनाही उपराष्ट्रपती पदाचा सन्मान मिळणार आहे. अमेरिकेतील या महत्त्वाच्या पदासाठी निवडणूक लढवणारी पहिली कृष्णवर्गीय महिला म्हणून कमला हॅरीस मैदानात उतरल्या होत्या. कमला हॅरीस यांचं मूळ भारतीय असून भारताशी त्यांचं जवळचं नातं आहे.

हॅरिस यांची आई शामला गोपालन म्हणजे भारतीय आणि वडील डोनल्ड हॅरिस म्हणजे जमैकन. वडील ख्रिस्ती, आई हिंदू. कमला ब्लॅक बॅप्टिस्ट चर्चमधे जातात. नवरा डग्लस एमहॉफ हा ज्यू आहे. सहा वर्षापूर्वी कमलाचं लग्न झालं. डग्लसच्या दोन मुली आता त्यांच्या मुली आहेत. त्या कमलाला मॉमला म्हणतात. कमला हॅरीस यांचं भारताशी नात असल्यामुळेच तामिळनाडूतील थुलासेंद्रपुरम या गावात उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार म्हणून कमला हरीस यांचे पोस्टर्स झळकले होते. येथील गावकऱ्यांनी बॅनरबाजी करत कमला हॅरीस यांना आपला पाठिंबा दर्शवला होता.

कमला हॅरीस यांचा अल्पपरिचय.
जन्म.२० ऑक्टोबर १९६४ ओकलंड, कॅलिफोर्निया येथे.
या पदासाठी निवडल्या गेलेल्या त्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला आहेत.
कमला हॅरिस यांचे आईवडील दोघेही स्थलांतरित. सुरुवातीला कॅलिफोर्नियामधून खासदार असलेल्या कमला हॅरिस यांनी जो बायडन यांना राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून आव्हान दिलं होतं. मात्र, प्रायमरीमध्ये त्या बायडन आणि सँडर्स यांच्या तुलनेत मागे पडल्या होत्या. राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारी स्पर्धेतून कमला हॅरीस बाहेर पडल्यानंतर उपराष्ट्रपतीपदासाठी त्यांच्याच नावाची चर्चा सुरू होती. कमला हॅरिस यांच्या आईचा जन्म भारतातला आणि वडिलांचा जमैकातला.
कमला हॅरिस यांची आई शामला गोपालन म्हणजे भारतीय आणि वडील डोनल्ड हॅरिस म्हणजे जमैकन. वडील ख्रिस्ती, आई हिंदू. त्यांची आई श्यामला गोपालन श्यामला या कॅन्सर संशोधक आणि नागरी हक्क कार्यकर्त्या होत्या. तर कमला यांचे वडील अर्थतज्ज्ञ आहेत. कमला लहान असतानाच त्यांचे पालक विभक्त झाले आणि आपल्या दोन्ही मुलींना त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीची जाणीव असेल याची काळजी श्यामला यांनी त्यांना वाढवताना घेतली.
२०१४ मध्ये कमला हॅरिस यांनी डग्लस एमहॉफ यांच्याशी लग्न केलं.
हॅरिस यांनी काही काळ कॅनडातही घालवलाय. श्यामला गोपालन हॅरिस यांनी कॅनडातल्या मॅकगिल युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापिकेची नोकरी स्वीकारल्यानंतर माया आणि कमला या दोन्ही बहिणी पाच वर्षं माँट्रियालच्या शाळेत शिकत होत्या. अमेरिकेतल्या हार्वर्ड विद्यापीठात कमला यांनी चार वर्षं शिक्षण घेतलं. हार्वडमधल्या शिक्षणानंतर कमला हॅरिस यांनी युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामधून कायद्याची पदवी घेतली आणि अल्मेडा काऊंटीच्या डिस्ट्रीक्ट अॅटर्नी कार्यालयापासून करिअरला सुरुवात केली.
२००३ साली त्या सॅन फ्रान्सिस्कोच्या डिस्ट्रिक्ट अॅटर्नी झाल्याय. कॅलिफोर्नियाच्या अॅटर्नी जनरल म्हणून निवड होणाऱ्या त्या पहिल्या महिला आणि पहिला कृष्णवर्णीय व्यक्ती होत्या.
२०१७ साली त्यांची निवड कॅलिफोर्नियाच्या ज्युनियर युएस सिनेटर म्हणून झाली. अमेरिकेच्या सिनेटमध्ये त्यांनी महत्त्वाच्या चर्चांदरम्यान त्यांच्या संभाषण कौशल्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. गेल्या वर्षीच्या सुरुवातीला कमला हॅरिस यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या उमेदवाराच्या शर्यतीत आपण असल्याचं जाहीर केलं. सुरुवातीला त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला पण त्या आपल्या मोहीमेला ठोस दिशा देऊ शकल्या नाहीत. शिवाय महत्त्वाच्या आरोग्य विषयक धोरणांबाबतच्या प्रश्नांची त्यांच्याकडे समाधानकारक उत्तरंही नव्हती. उमेदवारीसाठीच्या वादविवाद म्हणजेच डिबेट्सदरम्यान कमलांनी त्यांच्यातली वकिलाची संभाषण कौशल्यं दाखवत अनेकदा जो बायडन यांच्यावरच प्रश्नांची सरबत्ती केली होती. पण आपल्या उमेदवारीच्या या सर्वोच्च शक्तीस्थळांचा फायदा त्यांना करून घेता आला नाही. अखेर २०२० च्या सुरुवातीला त्यांनी अध्यक्षपदासाठीच्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारीच्या शर्यतीतून माघार घेतली आणि माजी उपराष्ट्राध्यक्ष यांना पाठिंबा जाहीर केला.
अमेरिकेमध्ये सध्या वर्ण आणि वंशभेदाच्या विरोधात निदर्शनं सुरू आहेत. ब्लॅक लाईव्हज मॅटरच्या चळवळीने जोर धरलाय. पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या हिंसेच्या विरोधात आवाज उठवला जातोय. आणि यामध्ये हॅरिस यांनी पुढाकार घेतलाय. आफ्रिकन अमेरिकन राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं.
अमेरिकेतल्या पोलिसी प्रथा बदलण्याची गरज त्यांनी टॉक शोमध्ये बोलताना व्यक्त केली. केंटुकी मधील २६ वर्षांच्या आफ्रिकन अमेरिकन तरुणीला, ब्रिओना टेलरला ठार करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी त्यांनी ट्विटरवरून केली होती. यंत्रणांमध्ये असणारा वर्णभेद मोडून काढणं गरजेचं असल्याचं त्यांनी अनेकदा म्हटलंय.
कमला हॅरिस यांच्या भारतीय वंशामुळे अमेरिकेतले भारतीयही त्यांच्याकडे आपल्यापैकीच एक म्हणून पाहतात. म्हणूनच कमला यांना देण्यात आलेल्या या उपराष्ट्राध्यक्ष पदाच्या संधीकडे अमेरिकेतल्या भारतीय आणि दक्षिण आशियायी लोकांना देण्यात आलेलं प्रतिनिधित्वं म्हणूनही पाहिलं जातंय.
आपली ओळख (Identity), आपलं मूळ यामुळे आपण वंचितांचं प्रतिनिधित्वं करण्यासाठी योग्य ठरत असल्याचं कमला हॅरिस यांनी अनेकदा म्हटलंय. आता जो बायडन यांनी त्यांची निवड ‘रनिंग मेट’ म्हणून केलेली आहे. कदाचित आता त्यांना हे सगळं व्हाईट हाऊसमधून करायची संधी मिळेल.
कमला हॅरिस यांनी ‘द ट्रुथ्स वी होल्ड’ (The Thruths We Hold) या नावाने आत्मचरित्र लिहीले आहे.
मोठं होताना कमला यांचा कायमच त्यांच्या भारतीय मुळाशी संपर्क आला. आईसोबत त्या भारतातही येत. पण यासोबतच आईने आपल्याला आणि बहिणीला ओकलंडच्या कृष्णवर्णीय इतिहासाशीही जोडल्याचं कमला सांगतात.
आईच्या हातचा दहीभात, डाळ, इडली खाऊन मोठं झाल्याचं त्या सांगतात. त्यांनी घरी भारतीय बिर्याणी बनवण्याबद्दलही लिहिलेलं आहे.

जो बायडेन यांचा अल्प परिचय

0

जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पराभवाचा धक्का बसला आहेत. जो बायडन यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत जो बायडेन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला.
जो बायडेन यांचा अल्प परिचय.
जन्म. २० नोव्हेंबर १९४२ पेन्सिल्वेनिया च्या स्क्रँटन येथे.
व्हाइट हाऊसमधील राजकारणाचा तब्बल ४६वर्षे अनुभव असलेले आणि दोनदा अमेरिकेचे उपराष्ट्रपती राहिलेले जो बायडन हे अनेक कारणांनी प्रसिद्धही आहेत आणि वादग्रस्तही ठरलेले आहेत. जो बायडन अर्थात जोसेफ रॉबिनेट बायडेन ज्युनिअर यांचा जन्म पेन्सिलवेनिया येथे झाला. लहानपणीच त्यांचे कुटुंबीय डेलवेअरला राह्यला आले होते. त्यांना कौटुंबिक जीवनात अनेक चढ-उतार पाहावे लागले. त्यांची पहिली पत्नी निलीया आणि मुलगी नाओमी यांचा कार अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर वयाच्या ४६ व्या वर्षी मुलगा ब्यू याचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला होता. मात्र, कौटुंबिक संकट आल्यानंतरही अमेरिकन राजकारणात ठामपणे उभा राहिलेला हा योद्धा तसूभरही डगमगला नाही.
जो बायडन हे डेलवेअरमधून सहा वेळा सिनेटर म्हणून निवडून आले आहेत. १९७२ मध्ये निवडून आलेले ते सर्वात तरूण सिनेटर होते. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची त्यांची ही तिसरी निवडणूक आहे. १९८८ मध्ये त्यांनी पहिल्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला उभं राहण्याचा प्रयत्न केला होता. मात्र वाङमय चोरीच्या आरोपमुळे त्यांना माघार घ्यावी लागली होती. दुसऱ्यांदा त्यांनी २००८ मध्ये पुन्हा राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी प्रयत्न केला होता. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून जो बायडन यांना ओळखलं जातं. ओबामांच्या कार्यकाळात ते २००८ आणि २०१६ मध्ये दोनदा उपराष्ट्रपती होते. यंदाच्या निवडणुकीत जो बायडन विजयी व्हावेत म्हणून स्वत: बराक ओबामा यांनी बराच प्रयत्न केला. जो बायडन अनेकदा वादग्रस्त ठरले आहेत. जो बायडन अनेक वादात अडकले असले तरी अभ्यासू नेता म्हणून ते सर्वपरिचित आहेत. वॉशिंग्टन डीसीमधला अनेक वर्षांचा अनुभव असलेले नेते, उत्तम प्रशासक, परराष्ट्र धोरणाचा गाढा अभ्यासक, कुशल वक्ता आणि भावनिक नेता म्हणून त्यांची ख्याती आहे.
जो बायडन यांना भारताचे हितचिंतक म्हणूनही पाहिले जाते. भारताच्या ७४ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय-अमेरिकन जनसमुदायाशी संबोधित करताना राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्यास भारतासमोरील आव्हाने दूर करण्यासाठी भारताला साथ देणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. भारत आणि अमेरिकेदरम्यान असैन्य अण्विक कराराला मंजुरी मिळावी म्हणून गेल्या पंधरा वर्षांपासून आपण प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे जो बायडन यांच्याकडून भारताच्याही खूप अपेक्षा आहेत.

निवडणूक जिंकताच ज्यो बायडन यांचे पहिलं ट्विट

0

जो बायडन यांनी निवडणूक जिंकल्याचं कळताच पहिलं ट्विट करुन त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेच्या जनतेने मला राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडलं हा मी माझा बहुमान समजतो असं जो बायडन यांनी आपल्या निवडणूक जिंकल्यानंतरच्या पहिल्यावहिल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन यांच्यात झालेली ही निवडणूक आणि त्याचा लागणारा निकाल याकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलं होतं. अखेर डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करत जो बायडन यांनी ही निवडणूक जिंकली आहे. व्हाइट हाऊसमध्ये येत्या काही दिवसातच जो बायडन यांचा शपथविधी होईल.

https://twitter.com/JoeBiden/status/1325118992785223682?s=19

अमेरिकेने मला राष्ट्राध्यक्ष केलं हा मी माझा बहुमान समजतो. आपल्या देशाचं नेतृत्व करण्याची संधी मला ज्यांच्यामुळे मिळाली त्या सगळ्यांचे मी आभार मानतो. अमेरिकेपुढे जी आव्हानं आहेत त्यांना समर्थपणे तुमच्या साथीने सामोरं जाईन. तुम्ही मला मत दिलं असो वा नसो मी सगळ्या नागरिकांसाठीच माझं कार्य करेन. तुम्ही मला ज्या विश्वासाने या ठिकाणी बसवलं आहे तो विश्वास सार्थ ठरवेन या आशयाचं ट्विट जो बायडन यांनी केलं आहे.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक पार पडल्यानंतर मतमोजणी आणि निकाल येणं ही प्रकिया काहीशी लांबली. सुरुवातीला अटीतटीची वाटणाऱ्या निवडणूक निकालाचं चित्र नंतर बऱ्यापैकी स्पष्ट झालं. जो बायडन यांना २६४ इलेक्ट्रोल मतं मिळाली आणि त्यानंतर आणखी २० मतं मिळाल्यानं त्यांच्या इलेक्ट्रोल मतांची संख्या २८४ झाली. विजयासाठी २७० इलेक्ट्रोल मतांची आवश्यकता असते मात्र बायडन यांना एकूण २८४ इलेक्ट्रोल मतं मिळाली आणि त्यांचा विजय निश्चित झाला .

अखेर ज्यो बायडेन अमेरिकेच्या अध्यक्ष पदी विजयी, 46 वे अध्यक्ष …

0

वॉशिंग्टन – .

अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. रिपब्लिक पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेटिक पक्षाचे ज्यो बायडेन यांच्यामध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीमध्ये बायडेन यांनी बाजी मारली आहे. बायडेन यांच्याकडे सध्या 284 इलक्टोरल मते असून ट्रम्प अद्याप 250 मतांवरच आहेत. मतमोजणी सुरु झाल्यापासूनच बायडेन आघाडीवर होते. अखेर त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाला आहे. 2020 ची अमेरिकीतील अध्यक्षीय निवडणूक सर्वार्थाने वेगळी ठरली.

मतमोजणीच्या अखेरच्या टप्प्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. यामध्ये मतमोजणीवर आक्षेप घेत ट्र्म्प न्यायालयात पोहोचले होते. मात्र तिथे त्यांनाही धक्का बसला.

जो बायडन यांच्या विजयाची खात्री होताच त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. अध्यक्षीय निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पिछाडीवर पडल्याचे चित्र होते.मात्र, आता या निवडणुकीचा निकाल लागला आहे. जो बायडन यांनी 270 चा मॅजिक फिगर पार केला आहे. दरम्यान, अमेरिकेच्या इतिहासात आतापर्यंत झालेल्या निवडणुकींमध्ये (US Election) यंदाची निवडणूक ही वेगळी ठरली. कोरोनाच्या संकटकाळात झालेला प्रचार, प्रतिस्पर्धी उमेदवारांनी एकमेकांवर केलेले आरोप, सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी मतमोजणीवरून केलेले आरोप आणि न्यायालयात घेतलेली धाव, मतमोजणीला झालेला विलंब यामुळे निवडणूक चांगलीच गाजली.

सिटीझन हेल्पलाईन आमदार शिरोळे यांचा उपक्रम

0

पुणे: लोकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सिटीझन हेल्पलाईन हा उपक्रम चालू केला आहे.महापालिका, सरकारी कार्यालये, विमा कंपन्या या संबंधित लोकांची कामे अथिक असतात. अनेकांना या खात्यांची कामकाजाची नेमकी माहिती नसते, दफ्तर दिरंगाई होते आणि त्यातून कामे खोळंबातात असा अनुभव येतो. अशावेळी लोकप्रतिनिधींकडे नागरीक अपेक्षेने धाव घेतात. हे लक्षात घेऊन वेगवेगळ्या खात्यांच्या जबाबदाऱ्या आमदार शिरोळे यांनी वाटून दिल्या आहेत. शिवाय जबाबदार व्यक्तींची नांवे आणि मोबाईल नंबर सोशल मिडीयाद्वारे नागरिकांना कळविले आहेत. सिटीझन हेल्पलाईन असे उपक्रमाला नांव दिले आहे.

माझा नेहमीच विश्वास आहे की, नागरी समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी नागरिकांना त्यांच्या लोकप्रतिनिधींकडे थेट आणि सुलभ प्रवेश असणे आवश्यक आहे. हा विचार मनात ठेवून माझ्या जनसंपर्क कार्यालयामार्फत नागरिकांसाठी हेल्पलाईन चालू करीत आहे. नागरिकांनी समस्या सोडवून घेण्यासाठी माझ्या हेल्पलाईन टीमशी संपर्क करावा असे आवाहन आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केले आहे.

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेमुळे संसर्गाचा वेग रोखण्यात यश

0

मुंबई दि. ७ : कोरोना वाढीचा दर तसेच मृत्यू दर कमी होताना दिसत असले तरी गाफील न राहता युरोपप्रमाणे दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्याची तयारी राहू द्या. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेमुळे आपण संसर्ग रोखण्यात काही प्रमाणात यशस्वी झालो असून डिसेंबरमध्येही ही मोहीम परिणामकारकपणे राबविण्याचे नियोजन करा अशा सूचना प्रशासनास दिल्या. दिवाळीनंतर पुढचे १५ दिवस जागरुकतेचे आहे, त्यादृष्टीने सावधानता बाळगा आणि मास्क लावणे, सुरक्षित अंतर राखणे, हात वारंवार धुणे या नियमांचे पालन नागरिक करतील हे काटेकोरपणे पाहा, असेही ते म्हणाले.

आज मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत संवाद साधला आणि कोविडसंदर्भात उपाययोजनांची माहिती करून घेतली. आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, टास्क फोर्सचे डॉक्टर्स सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, हे वर्ल्ड वॉर आहे असे मी मार्च महिन्यात म्हणालो होतो, इतक्या महिन्यांमध्ये आपण हत्यार नसतानासुद्धा विषाणूवर काबू  मिळविण्यासाठी लढलो आणि आपल्याला यश येत आहे असे दिसते. या विषाणूचा जेव्हा चंचूप्रवेश झाला तेव्हा आपण लॉकडाऊन केले आणि आता हळूहळू सर्व खुले करू लागलो आहे. त्यामुळे सुरुवातीला शहरात असलेला संसर्ग आता राज्यभर सर्वत्र पसरलाय. सुरुवातीच्या काळात विषाणूचा प्रसार मर्यादित ठिकाणी होता, मात्र आता ग्रामीण भागातसुद्धा रुग्ण सापडत आहेत. या सर्व कालावधीत उन्हाळा आणि पावसाळ्यात मोसमी आजार आढळले नाहीत, कारण आपण आरोग्यविषयक खबरदारी घेतली. मात्र आता थंडी आली आहे. या काळात कोविड व्यतिरिक्त इतर आजारही उफाळून येतात. विशेषत: ह्रदयविकार, न्यूमोनिया, अस्थमा, फ्ल्यू यासारख्या रुग्णांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. फ्ल्यू आणि कोरोनातील फरकही कळला पाहिजे.

सुपर स्प्रेडर्सच्या चाचण्या आवश्यक

सर्व काही खुले केल्याने विशेषत: शासकीय कार्यालयात गर्दी वाढू लागली आहे. ती कमी करणे, त्यासाठी काही कल्पक उपक्रम राबविणे गरजेचे आहे. जनतेच्या खूप जास्त संपर्कात येणारे लोक, बस चालक-वाहक, सार्वजनिक व्यवस्थेतील कर्मचारी हे सुपर स्प्रेडर्स असू शकतील. त्यामुळे त्यांच्या चाचण्या लगेच करून घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

कोविड सुविधा काढून टाकू नका

महाराष्ट्राचा आरोग्य नकाशा या मोहिमेच्या निमित्ताने तयार झाला आहे. मोहिमेत सापडलेल्या  सहव्याधी नागरिकांच्या संपर्कात राहणे गरजेचे आहे. त्यांची सातत्याने  चौकशी करा. त्यामुळे दुसरी लाट आली तरी मोठी आपत्ती टाळू शकू, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, सध्या फिल्ड हॉस्पिटल किंवा कोविड केअर केंद्राच्या उभारण्यात आलेल्या सुविधा काढून टाकू नका. आपल्याला थोडा वेळ मिळाला आहे. त्यामुळे काही उणीवा असतील त्या दूर करण्याचा प्रयत्न करा, वैद्यकीय यंत्रणेला प्रशिक्षित करा, विभागवार डॉक्टर्सचा आढावा घ्या. कर्मचारी कमी करू नका. थोडी विश्रांती द्या पण तात्पुरत्या सुविधा कायमस्वरूपी होतील का हे पहा असेही ते म्हणाले.

काटेकोर कारवाई करा

शहरी आणि ग्रामीण भागात स्वॅब (घशातील द्राव)  संकलन केंद्रे वाढवा, चाचण्या कमी करू नका. दुसऱ्या लाटेची तयारी करा, कर्मचारी व सुविधा यांची तयारी करून ठेवा. लस डिसेंबरअखेर किंवा एप्रिलमध्ये येईल असा अंदाज आहे. मात्र तोपर्यंत मास्क, हात धुवा, सुरक्षित अंतर हे नियम पाळले गेलेच पाहिजेत. मास्क न वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, प्रार्थनास्थळांना उघडण्याच्या बाबतीतही दिवाळीनंतर निर्णय घेऊ. मंदिरांमध्ये ज्येष्ठ नागरिक नियमितपणे जातात. हा विषाणू ज्येष्ठ आणि सहव्याधी रुग्णांना अधिक धोकादायक असल्याने याबात अधिक काळजी घेऊन निर्णय घ्यावा लागत आहे, असेही ते म्हणाले.

प्रशिक्षित आयसीयू कर्मचारी असणे गरजेचे

डॉ. राजेश टोपे म्हणाले, माझे कुटुंब मोहिमेधील डेटा हा दुसरी लाट आली तर उपयुक्त ठरेल. कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरविणाऱ्या समाजातील व्यक्तींच्या चाचण्या मोठ्या प्रमाणावर करून घ्याव्या लागतील. आज आपल्याकडे ५०० प्रयोगाशाळा असताना चाचण्यादेखील वाढल्या पाहिजेत. काही जिल्ह्यांत एंटीजेनच्याऐवजी आरटीपीसीआर चाचण्यांवर अधिक भर द्यावा लागेल. गृह विलगीकरणमध्ये असलेल्या रुग्णांकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. काही जिल्ह्यात अजून मृत्यू दर जास्त आहे. त्यामुळे प्रशिक्षित आयसीयू कर्मचारी असणे गरजेचे आहे. या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाचा कार्यक्रम तयार करून जिल्हाधिकारी यांनी ते करून घ्यावे. मास्क, औषधी, चाचण्यांचे दर यावर शासनाने नियंत्रण आणले आहे. जिथे हे पाळले जात नसेल तिथे काटेकोर कारवाई करणे गरजेचे आहे.

मोहिमेमुळे ५० हजार कोविड रुग्ण आढळले

आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.  प्रदीप व्यास यांनी माहिती देताना सांगितले की, माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेमुळे राज्यात ५० हजारपेक्षा जास्त कोविड रुग्ण आढळले आहेत. शिवाय सह व्याधी रोग्यांची माहिती पण शासनाकडे आहे. त्यावर अधिक लक्ष केंद्रित करून कोरोना संसर्ग त्यांना होऊ नये म्हणून विशेष काळजी घेण्यात येईल. नंदुरबारसारख्या दूरच्या जिल्ह्यातदेखील मोबाईल ॲपचा चांगला वापर करून माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम राबविण्यात आली. दुसरी लाट आली तर ४० टक्के रुग्ण विलगीकरणात तर ४५ टक्के कोविड केंद्रात असतील तर १५ टक्के रुग्णांना आयसीयूची गरज असेल अशी अपेक्षा आहे. आजमितीस केवळ १ लाख सक्रिय रुग्ण असून दररोज २४ हजार रुग्ण असायचे तिथे आता ५ ते ६ हजार रुग्ण आढळत आहेत. रिकव्हरी रेट ९१ टक्के इतका आहे अशी माहितीही त्यांनी दिली.

मुख्य सचिव संजय कुमार म्हणाले, माझे कुटुंब, माझी जबाबदारी यामध्ये आपल्याकडे डेटा जमा झाला आहे, त्याचा वैद्यकीय कारणांसाठी चांगला उपयोग करून घेता येईल.

खाद्य विक्रेते , उपहारगृहे यांनी नियम पाळणे गरजेचे

मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता म्हणाले, शासकीय कार्यालयांत गर्दी मोठ्या प्रमाणावर दिसत असून अशी ठिकाणी सुपर स्प्रेडर ठरू शकतात. त्यामुळे याठिकाणी नाविन्यपूर्ण कल्पना राबवून गर्दी होऊ देऊ नका. शहरांत रस्त्यावर खाद्य विक्रेते, उपहारगृहे यांत गर्दी वाढू लागली आहे तिथेही नियम पाळण्याची गरज आहे.

मुख्यमंत्र्यांचे सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, गडचिरोलीत रुग्ण संख्या सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये दुप्पट झाली आहे . नंदुरबार आणि धुळे येथे अधिक चाचण्या वाढणे गरजेचे आहे. दिल्लीत कोविडची परिस्थिती हवेच्या प्रदूषणामुळे वाढली आहे त्यामुळे संसर्ग वाढला आहे.

यावेळी बोलताना अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे म्हणाले, साधारण ९ महिने झाले कोविडशी लढाई सुरु आहे. अनेक निकषांवर चांगली कामगिरी होत आहे पण आता अधिक आव्हाने आहेत. युरोपात दुसऱ्या लाटेची सुरुवात झाली असून दिल्ली व इतर काही राज्यातदेखील दुसऱ्या लाटेची भीती वाटते आहे. अशा परिस्थितीत आपण पुढील काळातले नियोजन केले पाहिजे.

गृह विलगीकरणासाठी खासगी रुग्णालयांची मदत घ्यावी

टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी म्हणाले, दुसरी लाट कधी येईल याविषयी चर्चा सुरु आहे. हिवाळ्यात जिथे जिथे तापमान कमी झाले तिथे, तसेच औद्योगिक भागात कोरोना वाढू शकतो. चाचण्या अधिक वाढविणे तसेच रुग्णांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे गरजेचे आहे.

२५ डिसेंबर ते २६ जानेवारी या काळात हृदयविकार, न्यूमोनियाचे प्रमाण एरव्ही देखील जास्त असते त्यामुळे डॉक्टर्स आणि रुग्णांचे देखील यासंदर्भात योग्य ते लोकशिक्षण व्हावे. खासगी रुग्णालयांची मदत घेऊन गृह विलगीकरण नियोजन करावे. डॉ. राहुल पंडित म्हणाले, दुसरी लाट आली तर अतिदक्षता विभागातील डॉक्टर्स आणि कर्मचारी यांच्यावर ताण येऊ शकतो. त्यादृष्टीने नियोजन करावे. प्रशासनाने मास्क घालण्यासंदर्भात अधिक काटेकोर निर्बंध घालावेत. कोरोना काळात कोविड केंद्र आपण बंद करीत असलो, तरी सरसकट बंद न करता कुठली बंद करावीत कुठली करू नये याचे व्यवस्थित नियोजन करावे.

योग्य ती खबरदारी घेऊन दिवाळीनंतर शाळा सुरू करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुंबई , दि. ७; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन दिवाळीनंतर राज्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री श्री. ठाकरे बोलत होते. या वेळी शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू, अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, जागतिक परिस्थिती पाहता कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दिवाळीनंतर पुढचे काही दिवस अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.

ज्या शाळांमध्ये क्वारंटाईन सेंटर्स तयार करण्यात आले होते, ते सेंटर्स बंद करता येणार नाहीत. अशा ठिकाणच्या शाळा पर्यायी जागेत सुरू करता येतील का, याबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा.

शाळांचे सॅनिटायजेशन, शिक्षकांची कोरोना तपासणी यासारख्या सर्व बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे. ज्या घरातील व्यक्ती किंवा मुले आजारी आहेत अशा पाल्यांना पालकांनी शाळेत पाठवू नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले आहे.

शिक्षकांची तपासणी करणार : प्रा. वर्षा गायकवाड

शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी दि. १७ ते २२ नोव्हेंबरदरम्यान स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून करून घेतली जाईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी यावेळी दिली. दि.२३ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या शाळांमधे विद्यार्थ्यांचे थर्मल चेकिंग करण्यात येईल.

एका विद्यार्थ्यांला एका बेंचवर बसविण्यात येईल, एक दिवसाआड वर्ग भरतील, विद्यार्थ्यांनी घरून जेवण करून यावे, स्वत:ची पाण्याची बाटली सोबत आणावी. चार तासांची शाळा राहील त्यात केवळ विज्ञान, गणित आणि इंग्रजी असे कठीण विषय शिकवले जातील. या विषयांसह बाकी विषयांसाठी ऑनलाईन वर्गांची सुविधा असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शाळा सुरू करताना टप्प्याटप्प्याने शाळा सुरू कराव्या; तसेच शाळा व्यवस्थित सुरू राहाव्या यासाठी स्थानिक प्रशासनाला योग्य त्या सूचना देण्याची विनंती राज्यमंत्री श्री. कडू यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना केली.

शाळा सुरू करण्यासंदर्भातील सविस्तर एसओपी तयार करण्यात आली असून स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यात येतील, असे अप्पर मुख्य सचिव श्रीमती कृष्णा यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात कलम 144 लागू

0

पुणे, : विधानपरिषद शिक्षक व पदवीधर मतदार संघ द्वैवार्षिक पोट निवडणूक 2020 चा कार्यक्रम जाहिर झालेला आहे. निवडणूक प्रक्रिया संपेपर्यत आचारसंहिता राहणार आहे. १ डिसेंबर २०२० रोजी मतदान होणार असून 3 डिसेंबर 2020 रोजी मतमोजणी होणार आहे. आचारसंहिता सुरु झाल्यापासून मतमोजणी पुर्ण होईपर्यंत विधानपरिषद शिक्षक व पदवीधर मतदारसंघ पोटनिवडणूक सुरळीत, शांततेत व निर्भय आणि न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत निवडणूक होणाऱ्या कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये निर्बंध घालण्याची आवश्यकता आहे. फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार निवडणुक होणाऱ्या ५ डिसेंबर २०२० चे १२ वाजेपर्यंत आदेश लागू राहणार असल्याचे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी कळविले आहे.


विधानपरिषद शिक्षक व पदवीधर मतदार संघ द्वैवार्षिक पोटनिवडणूक 2020 ची संपुर्ण प्रक्रिया शांततेत , निर्भय व न्याय वातावारणात पार पाडणाच्या दृष्टीकोनातून शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक मालमत्तेची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरुपात विरुपता करण्यास निर्बंध घालण्यात येत आहेत. निवडणूक कालावधीत सार्वजनिक ठिकाणी संबंधित पक्षांची चित्रे, चिन्हांचे कापडी फलके, सार्वजनिक ठिकाणी भाषण देणे यावर निर्बंध घालण्यात येत आहेत. निवडणूक कालवधीत जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व उपविभागीय आधिकारी कार्यालय, सर्व तहसिल कार्यालये, सर्व शासकीय कार्यालये, व विश्रामगृहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या मिरवणूका काढणे, मोर्चा काढणे, सभा घेणे उपोषण करणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे वाद्य वाजविणे व गाणी म्हणणे इत्यादी, कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करणे यांना बंदी घालण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.


निवडणूक कालावधीत प्रचारादरम्यान कोणत्याही वाहनांच्या ताफ्यामध्ये 5 पेक्षा जास्त मोटारगाडया अथवा वाहने वापरण्यास निर्बंध घालण्यात येत आहे. (सदरचा आदेश संरक्षण वाहनांच्या ताफ्यासह केंद्र किंवा राज्य शासनाचे मंत्री किंवा उच्च पदस्थ व्यक्ती घेवून जात असेल तेव्हा त्यांच्या सुरक्षिततेविषयी लागू असलेल्या आदेशात अधिन राहून अंमलात राहिल व शासकीय कामावर असलेल्या वाहनांच्या संदर्भात लागू राहणार नाही.


निवडणूक कालावधीत कोणतीही व्यक्ती संस्था, पक्ष कार्यकर्ते यांना ध्वनीक्षेपकाचा (लाउड स्पीकरचा ) वापर सक्षम पोलीस अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय करता येणार नाही. तसेच फिरते वाहन रस्त्यावरुन धावत असताना ध्वनीक्षेपकाचा वापर करु नये. ध्वनीक्षेपकाचा वापर कोणत्याही प्रकारे सकाळी 6 वाजता पुर्वी व रात्री १० वाजल्यानंतर करता येणार नाही. निवडणूक कालावधीत सर्व धार्मिक स्थळे रुग्णालये किंवा शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणीच्या जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापित करता येणार नाहीत. सदर आदेशाचे उल्लघंन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान कायदा कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र राहील. असे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी कळविले आहे.


पिंपरी चिंचवड महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 36 प्रमाणे आदेश
विधानपरिषद शिक्षक व पदवीधर मतदार संघ द्वैवार्षिक पोट निवडणूक प्रक्रिया संपेपर्यत आचारसंहिता अस्तित्वात राहील. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील निवडणूक होणाऱ्या कार्यक्षेत्रात विधानपरिषद शिक्षक व पदवीधर मतदार संघ द्वैवार्षिक पोटनिपवडणूक सुरळीत, शांततेत व निर्भय आणि न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी कायदा व सुव्यवस्था राखणे आवश्यकता आहे.


पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 36 प्रमाणे मिळालेल्या अधिकारानुसार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील निवडणूक होणाऱ्या कार्यक्षेत्रातील सर्व पोलीस स्टेशन स्वाधीन अधिकारी यांना खालील केलेप्रमाणे अगर तोंडी आदेश अधिकार प्रदान करीत आहे.


रस्त्यावरुन जाणाऱ्या जमावाचे अगर मिरवणूकीचे व्यक्तीचे वागणे अगर कृत्याबाबत आदेश देणे, ज्या मार्गाने मिरवणूक किंवा जमाव जाईल अगर जाणार नही ती वेळ व मार्ग निश्चित करणे, सार्वजनिक ठिकाणी अगर सार्वजनिक करमणूकीच्या वेळी वापरण्यात येणाऱ्या लाऊड स्पीकरच्या ध्वनीची तीव्रता निश्चित करून दिलेली वेळ यावर नियंत्रण करणे, मिरवणूकीचे प्रचाराच्या निमित्ताने जाहीर सभा घेण्याचे ठिकाणी दिनांक व वेळ याबाबत नियंत्रण करणे.

हा आदेश पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील निवडणूक होणाऱ्या कार्यक्षेत्रात ५ डिसेंबर २०२० चे रात्री १२ वाजेपर्यत लागू राहील. सदर आदेशाचे भंग करणारी व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 134 नुसार शिक्षेस पात्र राहील. असे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आदेशात म्हटले आहे.

पुणे पदवीधर मतदार संघातून मनसेकडून रुपाली पाटील-ठोंबरे यांना उमेदवारी जाहीर

0


पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघातून मनसेकडून ऍड. रुपाली पाटील-ठोंबरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राजकीय पक्षाकडून जाहीर झालेली ही पहिलीच उमेदवारी आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांनी ही उमेदवारी जाहीर केली आहे.
रुपाली पाटील या पक्ष स्थापनेपासून (14 वर्षांपासून) मनसेमध्ये कार्यरत आहेत. महापालिकेत नगरसेविका म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. सध्या त्या पुणे शहर महिला आघाडी अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. मनसेच्या आक्रमक नेत्या म्हणून त्या ओळखल्या जातात. महिला, युवक-युवतींच्या प्रश्नांवर त्यांचे विशेष काम आहे. स्थानिक विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरील आंदोलनात त्यांचा सहभाग राहिला आहे, त्यामध्ये त्यांनी तुरुंगवास ही भोगला आहे.

त्या उच्चशिक्षित असून त्यांचे शिक्षण बी.कॉम LLB झाले आहे. त्या व्हॉलीबॉल आणि शुटिंग व्हॉलीबॉल राष्ट्रीय खेळाडू राहिल्या आहेत.

पदवीधर, युवक-युवतींचे रोजगाराचे तीव्र झालेले प्रश्न सोडविण्यावर भर देणार असल्याचे रुपाली पाटील यांनी उमेदवारी जाहीर झाल्यावर बोलताना सांगितले.

मंत्रालयातील अधिकारी वर्गाची रिक्त पदे पदोन्नतीने भरण्याच्या कार्यवाहीस गती द्यावी – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

0

मुंबई : मंत्रालयातील अधिकारी संवर्गातील रिक्त पदे न्यायालयाच्या निर्देशानुसार व विहित कार्यपद्धतीने भरण्याच्या कार्यवाहीस गती द्यावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. कक्ष अधिकारी संवर्गाची ज्येष्ठता सुची जारी करुन या कामासाठी विशेष सेल तयार करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.

विधानभवनात मंत्रालयातील कक्ष अधिकारी पदावरील अधिकाऱ्यांच्या पदोन्नती प्रलंबित असल्याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले.

या बैठकीस मुख्य सचिव संजय कुमार, सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव सु.मो.महाडिक, विधी व न्याय विभागाचे बु. झ.सय्यद, शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव राजेंद्र पवार, गृहनिर्माण विभागाचे उपसचिव रा.को. धनावडे, उपसचिव टि.वा.करपते, वन विभागाचे अवर सचिव अ.म. शेट्ये, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कक्ष अधिकारी विष्णू पाटील आदीसह संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले म्हणाले, तातडीने प्रशासनातील दोन्ही बाजू मांडून सेवा ज्येष्ठता यादी करून पुढील कार्यवाही करण्यास गती द्यावी. कक्ष अधिकारी पदाच्या 1986 पासूनच्या ज्येष्ठता सुधारित करण्याच्या कार्यवाहीस प्रदीर्घ कालावधी लागणार असून, या कामासाठी स्वतंत्र सेल तयार करण्यासंदर्भातील कार्यवाहीही करण्यात यावी, असेही श्री. पटोले यांनी सांगितले.

यावेळी मुख्य सचिव श्री. संजय कुमार यांनी विहित नियमांनुसार कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.

डॉ. मदन हर्डीकर, इंजि.अनिल पाटील यांना’डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंत पुरस्कार’

0

पुणे : राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि बंधुता प्रतिष्ठान, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंत पुरस्कार’ यंदा प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. मदन हर्डीकर आणि पाणीतज्ज्ञ इंजि. अनिल पाटील यांना जाहीर झाला आहे. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे. चिखली येथे ६ डिसेंबर २०२० रोजी आयोजित सातव्या विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलनात संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
प्राचार्य प्रदीप कदम यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी चिंचवड शहरातील चिखली येथील महाराष्ट्र विद्यार्थी केंद्र संचलित कॉंनक्वेस्ट महाविद्यालयात हे संमेलन होणार आहे. आतापर्यंत डॉ. निर्मलकुमार फडकुले, डॉ. प्र. चि. शेजवलकर, सय्यदभाई, डॉ. रामचंद्र देखणे आदी मान्यवरांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंत पुरस्कार’ प्रदान करण्यात आलेला आहे, अशी माहिती राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश रोकडे यांनी दिली.