Home Blog Page 2396

मतदानासाठी आधार कार्ड,पॅन कार्ड ग्राह्य धरणार

0

पुणे,दि.17:- विधानपरिषदेची द्विवार्षिक पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी मतदान केंद्रावर मतदारांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करू न शकणा-या मतदारांचे आधार कार्ड, वाहनचालक परवाना, पॅन कार्ड तसेच पारपत्र आदी नऊ कागदपत्रे मतदानासाठी ग्राह्य धरण्यात येतील, असे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
या कागदपत्रांबरोबरच केंद्र/राज्य शासन/सार्वजनिक उपक्रम/स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खाजगी औद्योगिक घराणे यांनी वितरीत केलेले सेवा ओळखपत्र, खासदार/आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र, संबंधित पदवीधर/शिक्षण मतदार संघातील शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या पदवीधर/शिक्षक मतदारांना वितरीत केलेले सेवा ओळखपत्र, विश्वविद्यालयाद्वारे वितरीत पदवी/पदविका मूळ प्रमाणपत्र तसेच सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरीत केलेले अपंगत्वाचे मूळ प्रमाणपत्र ही कागदपत्रे मतदानासाठी ग्राह्य धरण्यात येतील.
छायाचित्रासह मतदार ओळखपत्रान्वये मतदाराची ओळख पटत असेल तर मतदार ओळखपत्रातील किरकोळ विसंगती दुर्लक्षित कराव्यात. तसेच, छायाचित्रासह मतदार ओळखपत्रावरील विसंगत छायाचित्रामुळे मतदाराची ओळख पटणे अथवा पटविणे शक्य नसल्यास मतदारास वरील पर्यायी कागदपत्रांपैकी एक ओळख कागदपत्र सादर करणे आवश्यक राहील, याची सर्व संबंधित अधिकारी व मतदान केंद्राध्यक्ष यांनी नोंद घ्यावी, असे उप जिल्हा निवडणूक अधिकारी, मृणालिनी सावंत यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
00000

जागतिक स्वास्थ्यासाठी प्रार्थनासभा आयोजित करून हिंदुजांतर्फे दिवाळी साजरी

0

लंडन : हिंदुजा कुटुंबाने 80 च्या दशकाच्या सुरुवातीस लंडन शहराला दिवाळीची ओळख करून दिली होती. त्यांचा वार्षिक दिवाळी उत्सव हा आता लंडनच्या उच्चभ्रू सामाजिक कार्यक्रमांतील एक महत्त्वाचा भाग झाला आहे. लंडनमध्ये दिवाळीचे स्वरुप सध्या इतके व्यापक झाले आहे, की टाइम्स स्क्वेयरलाही दरवर्षी दिवाळीची रोषणाई केली जाते.

मात्रयंदा आधी आर्थिक मंदीमुळे व त्यानंतर संपूर्ण जगाला पडलेल्या कोविड-19च्या विळख्यामुळे आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली आणि दिवाळीचा उत्सव नेहमीप्रमाणे साजरा करणे योग्य होणार नाहीअसे हिंदुजा समूहाला वाटले. सुरक्षित अंतर व टाळेबंदीच्या काळात प्रत्यक्ष कार्यक्रम घेणे शक्य नसलेतरी दिवाळीचा आनंद कायम ठेवण्यासाठी हिंदुजा कुटुंबाने या उत्सवाला एक वेगळा आयाम द्यायचा ठरवले. त्यानुसार, दिवाळी उत्सवऐवजी जागतिक स्वास्थ्यासाठी आभासी प्रार्थनासभेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सदिच्छा व शुभेच्छा देण्यासाठी आर्चबिशप कँटरबरी यांच्यासह विविध धर्मांतील प्रमुख सहभागी झाले. या वेगवेगळ्या आध्यात्मिक विचारसरणीच्या गुरुंनी सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देण्यासाठी उपस्थितांना मार्गदर्शन केले. उत्सवाची रंगत वाढवण्यासाठी भारतीय संगीत क्षेत्रातील कैलाश खेरसोनु निगमराहत फतेह अली खानअनुप जलोटा, शंकर महादेवनशान आणि अनुराधा पौडवाल यांच्यासारखे दिग्गज जगातील वेगवेगळ्या ठिकाणांहून यात सहभागी झाले होते. कैलाश खेरसोनू निगम आणि राहत फतेह अली खान यांनी सकारात्मक संदेशासह खास तयार केलेली प्रार्थनात्मक गीते सादर करत सर्वांच्या चित्तवृत्ती उंचावल्या.

इंग्लंडचे राजपुत्र प्रिन्स चार्ल्स यांनी खास दिवाळीची पणती प्रज्वलित करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. प्रिन्स एडवर्ड यांनी सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सनगृह सचिव प्रीती पटेलपरराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री लॉर्ड तारीक अहमद, सामाजिक मंत्री लॉर्ड ग्रीनहाल्गलंडनचे महापौर सादिक खान यांनीही शुभेच्छा दिल्या. भारताचे उपराष्ट्रपतीमहाराष्ट्राचे राज्यपाल आणि इंग्लंडमधील भारतीय उच्चायुक्त यांनीही हिंदुजा कुटुंबासाठी खास संदेश पाठवले होते.

याप्रसंगी हिंदुजा समहाचे सह-अध्यक्ष जी. पी. हिंदुजा म्हणाले, ‘‘दिवाळी या भारतातील दीपोत्सवाला सखोल आध्यात्मिक अर्थ लाभला आहे. सध्याच्या आव्हानात्मक काळाचा प्रत्येकजण सामना करीत असताना आणि जगभरातील विविध देश, वर्ण, संप्रदाय, लिंग यांतील लाखो लोकांना कोविडमुळे संकटांना तोंड द्यावे लागत असताना, एरवीप्रमाणे हा सण साजरा करणे योग्य नाही, असा आम्ही एक कुटुंब म्हणून विचार केला. आपण ज्या समाजात राहतो आणि काम करतो, त्याच्या हिताचा विचार करून कोणतेही काम करावे किंवा आनंद घ्यावा, अशी शिकवण माझ्या दिवंगत वडिलांनी कायमच मला दिली आहे. मला वेगळ्या पद्धतींनी गोष्टी करायला आवडतात आणि कोविडच्या मर्यादांमुळे मी स्वतःवर बंधने घालून घेणार नव्हतो; म्हणून दिवाळीची परंपरा कायम राखत सर्वांच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करायचे आम्ही ठरवले. अमेरिका आणि अतिपूर्वेकडील हजारो लोकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे व आमच्या प्रयत्नांचे कौतुक केल्यामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. त्याचप्रमाणे आम्हाला आवर्जून शुभेच्छा पाठवणाऱ्या मान्यवरांचेही आम्ही आभार मानतो.’’

हिंदुजा समाविषयी :

हिंदुजा समूह हा भारतातील विविध क्षेत्रांत व्यवसाय असणारा, अग्रगण्य असा आंतरराष्ट्रीय उद्योगसमूह आहे. तब्बल दीड लाख कर्मचाऱ्यांसह हा समूह 38 देशांत कार्यरत असून अब्जावधी डॉलर्सची त्याची उलाढाल आहे. या समुहाची स्थापना शंभर वर्षांपूर्वी पी. डी. हिंदुजा यांनी केली. ‘’काम करीत राहणे हेच माझे कर्तव्य, त्यातूनच मी काही देऊ शकेन,’’ हे त्यांचे बोधवाक्य होते.

वाहन उत्पादन, माहिती तंत्रज्ञान, प्रसार माध्यमे, करमणूक व दळणवळण, बँकिंग व वित्त सेवा, पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांचा विकास, सायबर सुरक्षा, तेल व विशेष रसायने, ऊर्जा, स्थावर मालमत्ता, व्यापार व आरोग्यसेवा अशा व्यवसायांत हा समूह कार्यरत आहे. ‘हिंदुजा फाउंडेशन’च्या माध्यमातून हा समूह जगभरातील सेवाभावी आणि परोपकारी कार्यांशी जोडलेला आहे.

दररोज दोन हजार भाविकांना मिळणार विठ्ठलाचे दर्शन

0

पंढरपूर, दि. १७ : पाडव्याच्या मुहूर्तावर श्री विठ्ठल रक्मिणी मंदिर भाविकांसाठी खूले करण्यात आले आहे. भाविकांची वाढती गर्दी व मागणी लक्षात घेता मंदिर समितीच्या वतीने बुधवारपासून दोन हजार भाविकांना दर्शनाला सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शासनाने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर घालून दिलेल्या नियम व अटींची अंमलबजावणी करतच दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यातील मंदिरे, धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे राज्य शासनाने उघडण्यास परवानगी दिली आहे. श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी दररोज एक हजार भाविकांना दर्शनाकरिता सोडण्यात येत होते, आता दर्शनाकरिता दोन हजार भाविकांना सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या आठ महिन्यांपासून मंदिरे बंद होती. मात्र नित्योपचार दैनंदिन सुरु राहिले. दिवाळीत पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरे भक्तांना दर्शनाकरीता खूली करण्यात आली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मंदिर समितीच्यावतीने श्री विठ्ठल रुक्मिणी गाभारा, श्री विठ्ठल सभामंड, रुक्मिणी सभामंडप, नामदेव पायरी, दर्शन रांग आदींची कर्मचाऱ्यांकडून वेळोवेळी स्वच्छता करण्यात येत आहे.  मंदिरात व नामदेव पायरी ते दर्शन रांगेत स्वच्छतेबरोबरच सॅनिटायझर फवारण्यात येत आहे. दर्शन रांगेत दोन भाविकांमध्ये सोशल डिस्टन्स राखला जाईल, याची खबरदारी घेण्यात येत आहे, त्याचबरोबर मंदिरात येणाऱ्या भाविकांकरीता सॅनिटायझरची सोय, थर्मल स्क्रिनिंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्याचबरोबर शासनाच्या निर्देशानुसार मंदिरात दर्शनाकरीता येणाऱ्या भाविक, भक्तांनी मास्क वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने नेहमीप्रमाणे सकाळी सहा वाजता पासून भाविकांना दर्शनाकरीता सोडण्यात येत आहे.

ऑनलाईन नोंदणी केलेल्या पास धारकांनाच दर्शनासाठी सोडण्यात येत असल्याने भाविकांनी  http://www.vitthalrukminimandir.org/home.html  या संकेत स्थळावर नोंदणी करावी, असे आवाहनहीं मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी  यांनी केले आहे

भाविकांसाठी नियमावली

* सकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत 2000 भाविकांना मुख दर्शन घेता येणार

* प्रति तास 200 भाविकांना दर्शनाकरीता सोडणार

* दर्शनासाठी ऑनलाईन नोंदणी करावी.

* भाविकांनी 24 तास अगोदर ऑनलाईन बुकींग करावे, बुकींग 8 दिवसापर्यंत करता येणार

* मुख दर्शनाकरीता कासार घाट येथे पास तपासणी करुन दर्शनाला सोडणार

* कोरोनाची लक्षणे आढळणाऱ्यांना दर्शन प्रवेश बंद

* मंदिराच्या पूर्व गेट मधून भाविक दर्शनाला आत जातील तर व्हीआयपी गेटमधून बाहेर पडतील.

* दर्शन रांगेत फिजिकल डिस्टन्स (दोन भाविकात 6 फुट अंतर) ठेवण्यासाठी जागोजागी मार्किंग करण्यात आले आहे.

* अन्नक्षेत्र व प्रसाद व्यवस्था बंद राहील

* सध्या 65 वर्षावरील नागरिक, 10 वर्षाखालील बालक, गर्भवती महिला, आजारी व्यक्ती यांनी दर्शनास येणे टाळावे.

पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूक:मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांची प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

0

पुणे,दि.17: पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूक प्रक्रियेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवडणूकीचे काम निःपक्षपातीपणे आणि आत्मविश्वासाने पार पाडावे, असे आवाहन विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ राव यांनी केले.

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघातून महाराष्ट्र विधानपरिषदेसाठी निवडणूक-2020 च्या अनुषंगाने पुणे विभागातील मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांच्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली, यावेळी ते बोलत होते. यावेळी निवडणूक निरीक्षक निलिमा केरकेटा, निवडणूक निरीक्षक श्रीकांत देशपांडे, जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. राजेश देशमुख उपस्थित होते.

विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले, पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूक प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करावी. मतदान व मतमोजणी प्रक्रिया वेळेत पार पाडण्यासाठी योग्य नियोजन करा. कोविड-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी. सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर आदी दक्षता बाळगावी. मतदान केंद्रावर गर्दी होवू नये यासाठी रांग लावणे, मतदारांना माहिती देणे यादृष्टीने मतदान केंद्र व्यवस्थापनासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करुन त्यांना जबाबदारी नेमून द्या. मतदान केंद्राच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी पोलीस कर्मचाऱ्यांची मदत घ्या. मतदारांना माहिती देण्यासाठी मतदार सहाय्यता कक्ष स्थापन करा, असे सांगून निवडणूक कामकाजातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संघभावनेने काम करुन आपापल्या जबाबदाऱ्या पूर्ण करावी, असेही श्री. राव यांनी सांगितले.

अपर जिल्हाधिकारी वर्षा लढ्ढा यांनी सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली. त्या म्हणाल्या, मतदान अधिकाऱ्यांनी निवडणूक साहित्य ताब्यात घेताना तपासून घ्यावे, मतदानाच्या आदल्या दिवशी मतदान केंद्रावरील पूर्वतयारी करावी. कोविड-19 प्रादुर्भावामध्ये मतदान केंद्रावर खबरदारी घ्यावी. मतदानास सुरुवात होण्यापूर्वीची कामे वेळेत पार पाडावीत,असे सांगून मतदान केंद्राध्यक्षांची कर्तव्ये, फोटो ओळखपत्र नसणाऱ्या मतदाराची ओळख पटवण्यासाठी आवश्यक इतर पुरावे, मतदान प्रक्रियेमध्ये उद्भवणाऱ्या परिस्थिती, मतदान गुप्त राहण्यासाठी घ्यावयाची काळजी, दिव्यांग मतदारांसाठी मतदान, टपाली मतदान, मतदान झाल्यानंतरची कामे आदी बाबींची माहिती श्रीमती लढ्ढा यांनी दिली.

कार्यशाळेत उपस्थित मतदान अधिकाऱ्यांच्या शंकांचे विभागीय आयुक्त सौरभ राव व अपर जिल्हाधिकारी वर्षा लढ्ढा यांनी निरसन केले.

प्रस्ताविक उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी तर सूत्रसंचालन तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांनी केले. आभार उप जिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांनी मानले.

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या 15 हजार 7 .कालच्या तुलनेत रुग्णसंख्येत 523 ने वाढ .

0

पुणे विभागातील 4 लाख 89 हजार 128 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 5 लाख 18 हजार 757 रुग्ण-कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 523 ने वाढ
-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे,दि.17 :- पुणे विभागातील 4 लाख 89 हजार 128 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 18 हजार 757 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 15 हजार 7 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 14 हजार 622 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.82 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.29 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 523 ने वाढ झाली आहे.

पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 31 हजार 777 रुग्णांपैकी 3 लाख 14 हजार 447 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 9 हजार 242 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 88 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.44 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.78 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 48 हजार 892 रुग्णांपैकी 44 हजार 743 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 506 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 643 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 43 हजार 238 रुग्णांपैकी 39 हजार 441 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 255 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 542 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 46 हजार 121 रुग्णांपैकी 44 हजार 42 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 397 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 682 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 48 हजार 729 रुग्णांपैकी 46 हजार 455 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 607 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 667 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 523 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 359 , सातारा जिल्ह्यात 42, सोलापूर जिल्ह्यात 83, सांगली जिल्ह्यात 28 तर कोल्हापूर जिल्ह्यात 11 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण –
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 636 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 375, सातारा जिल्हयामध्ये 57, सोलापूर जिल्हयामध्ये 126, सांगली जिल्हयामध्ये 64 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 14 रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 25 लाख 98 हजार 703 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 18 हजार 757 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि. 16 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देत शिवसेनेला टोला

0

विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. दरम्यान त्यांनी आठवणींना उजाळात देत असताना शिवसेनेला अप्रत्यक्षरित्या टोलाही लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या भाषणातील वक्तव्यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला टोला लगावला आहे. फडणवीसांनी या व्हिडीओतून सेनेला बदललेल्या भूमिकेची आठवणही करुन देण्यात आली आहे. तसेच बाळासोबत ठाकरेंच्या भाषणासोबत देवेंद्र फडणवीसांच्या भाषणाचा अंशही यात आहे. तसेच ते यामध्ये बाळासाहेबांविषयी बोलत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी ‘विचारांवर श्रद्धा आणि विधानांवर ठाम! : हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे’ असे म्हणत व्हिडिओ ट्विट केला आहे.

या व्हिडिओमध्ये फडणवीस बोलत आहेत की, ‘बाळासाहेब ठाकरे हे आमच्या सर्वांसाठी प्रेरणेचा आणि ऊर्जेचा स्त्रोत होते. बाळासाहेबांचे भाषण हे नेहमी सल्ला होते. आपल्याला जे बोलायचे ते खणखणीत मांडायचे, लोकांना पटणार असे बोलायचे. त्यांच्या मनात असेल ते बाळासाहेब बोलत असत. त्यांना कोणी बोलावू शकत नव्हते’ असे फडणवीस म्हणाले आहेत.

यासोबतच बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषाणाची क्लिप यामध्ये शेअर करण्यात आली आहे. यामध्ये बाळासाहेब म्हणत आहेत की, ‘दुसऱ्यांच्या विचाराने स्वत: चे विचार बिघडवू नका, प्रामाणिक राहा, फसवेगिरी आली की सर्व संपले. प्रामाणिकपणा हा तुमच्या रक्तात असायला हवा. त्याच बरोबर हिंदुत्व विसरू नका, भारताला वाचवण्यासाठी तुम्हीच पुढे आले पाहिजे’ हे विधान या व्हिडिओमधून शेअर करत फडणीसांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.

विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केले शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतींना वंदन

0

मुंबई – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज शिवाजी पार्क येथील शिवसेनाप्रमृखांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन त्यांच्या स्मृतींनी वंदन केले. माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनाची सुरुवात शिवसेना, भारतीय विद्यार्थी सेनेपासून झाली. त्यामुळे वंदनीय श्री. बाळासाहेबांच्या विचारांचा आणि संस्कारांचा पगडा आजही आपल्यावर आहे. राज्याचा विरोधी पक्ष नेता म्हणून काम करत असताना निश्चितच त्यांच्या त्या जडणघडणीचा मला उपयोग होत आहे. वरून कठोर दिसणारे वंदनीय बाळासाहेब मृदू आणि प्रेमळ स्वभावाचे होते. आज त्यांच्या स्मृतीस्थळावर त्यांना नमन करताना जुन्या स्मृती व अनेक प्रसंग डोळ्यासमोरून गेले अशी प्रतिक्रिया यावेळी प्रविण दरेकर यांनी दिली.
वंदनीय बाळासाहेबांप्रती कृतज्ञता व्यक्त करण हे आपले परम कर्तव्य आहे. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असणारे सामाजिक बांधिलकीचे काम आणि बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा दिलेला विचार बळकट व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांनी काम करावे अशी अपेक्षाही प्रविण दरेकर यांनी यावेळी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

‘त्या’ कोरोनायोद्ध्यांच्या घरी दिवाळी फराळ वाटप.

0
  • वंदेमातरम संघटनेचा अनोखा उपक्रम.

पुणे- गेल्या सात आठ महिन्यात कोरोनापासून बचावासाठी जे कोरोनायोध्दे ऑनफिल्ड लढत होते त्यातल्या काहींना मरण प्राप्त झाले. याच हुतात्म्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वंदेमातरम् संघटना कृत युवा वाद्य पथक आणि युवा फिनिक्स सोसायटी यांच्या वतीने कृतज्ञता दिपावलीचे आयोजन करण्यात आले होते. त्या आरोग्य सेवकांच्या त्यागा बद्दल कृतज्ञता व्यक्त करुन दिवाळीची भेट म्हणून पुणेकरांनी सुपूर्द केलेला फराळ या कुटुंबियांना देण्याच्या उपक्रमाला आज पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली.

रुग्णांना सेवा देत असतांना कोरोना पॉझिटिव्ह झालेले व त्यात वीरमरण पत्करलेले पुणे महानगरपालिकेचे आरोग्य कर्मचारी हुतात्मा संतोष आदमाने यांच्या घरी भेट देण्यात आली. स्वत: संतोष आदमाने यांना ऑनड्युटी असतानाच ९ जुलै रोजी वीरमरण आले पण दुर्दैवाने साधारण एक महिना आगोदरच त्यांच्या मातोश्रींचे देखील कोरोनानेच निधन झाले होते. एकाच घरातील दोन व्यक्ती एका महिन्यात कोरोनाने गेल्या. त्यांच्या घरातील त्यांचा चिमुकला आणि कुटुंबियांचे अश्रू पाहून संपूर्ण वातावरण स्तब्ध झाले होते.

ज्यांच्या अकाली जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला, हजारो युवक युवतींना पोरके झाल्याची भावना निर्माण झाली असे पुणे शहरातील व्यक्तिमत्त्व हुतात्मा ज्ञानेश पुरंदरे यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांची कृतज्ञता भेट घेण्यात आली. या वेळी उपस्थित प्रत्येकाच्याच मनात कै.ज्ञानेश पुरंदरेंच्या असंख्य आठवणी दाटून आल्या होत्या.
यावेळी ज्ञानेश पुरंदरे यांचे लहानभाऊ महेश पुरंदरे , लता पुरंदरे आणि कुटुंबिय उपस्थित होते. पुणेकरांच्या वतीने कै.पुरंदरेंच्या नावाच्या दीपस्तंभाच्या तसबीरीपुढे कृतज्ञता दिप लाऊन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आदरांजली वाहिली.

पोलीस ठाण्यात भाऊबीज साजरी

0

पुणे-दर प्रमाणे यावर्षी सुध्दा स्वराज्य प्रतिष्ठान तर्फे सहकारनगर पोलीस स्टेशन येथेे भाऊबीज च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .जे पोलीस आपले सणवार विसरून या कोरोना च्या महामारी मध्ये सुध्दा आपले कर्तव्य बजावत होते अशा पोलीस बांधवांसाठी भाऊबीज आयोजन करण्यात आले होते
यावेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम आणि पोलीस अधिकारी यांना औक्षण करण्यात आले
यावेळी औक्षण करणाऱ्या भगिनी संगीता चौरे, ज्योती कानेगावकर, उषा अवघडे, संगीता मोरे, मनीषा थनवाल, वनिता कदम,ज्योती भोंडे, अवंती धेडे, सुजाता लागू ,सारिका गायकवाड ,सारिका ठाकर, सुनीता भोसले, कविता साळुंखे, मंजिरी निवांगुणे, प्रगती शिंदे, पुष्पां शिंदे, प्रज्ञा उतेकर, दीपा शिताप यांचा समावेश होता. यावेळी कैलास मोरे अनील जाधव हे उपस्थित होते
प्रस्तावना शेखर कोरडे व भानुदास ढोबळे तसेच आभार हरिष परदेशी यांनी मानले .
यावेळी श्रीमती स्वात्ती दिवाण यांनी पोलीस कर्मचारी व सफाई कामगार यांच्या साठी कविता त्यांनी लिहिलेली कविता तेथे वाचून दाखविली.कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक महेश वाबळे आणि प्रतिष्ठानचे कार्यध्यक्ष मनीषा वाबळे यांनी केले होते

भाविकांसाठी मंदिरे झाली खुली ..

0

पुणे- आज पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर राज्य शासनाने राज्यातील सर्व प्रार्थनास्थळ मंदिरे खुली करण्याचे करण्यास मान्यता दिली. या पार्श्वभूमीवर आठ महिन्यांनी पुणे आणि राज्यभर विविध मंदिरे भाविकांसाठी खुली झाली .

आज (दि.१६) सकाळी सहा वाजल्यापासून तीर्थक्षेत्र आळंदीतील माऊलींचे समाधी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. दरम्यान, तमाम भाविकांना माऊलींच्या दर्शनाची ओढ लागलेली आहे. त्यातच मंदिर उघडण्यावेळी दिवाळीपाडवा मुहूर्त असल्याने भाविकांची उसळणारी गर्दी लक्षात घेता मंदिरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

कोविडच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार मागील आठ महिन्यांपासून मंदिर बंद होते. मात्र यादरम्यान देवाचे उपचार नैमित्तिक परंपरा अखंड सुरु होते. सोशल मीडियावर दैनंदिन माउलींचे समाधी दर्शन सुरू होते. मात्र राज्य सरकारने सोमवारपासून धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी दिली आहे. यापार्श्वभूमीवर माऊलींचे समाधी मंदिर सकाळी सहापासून ते रात्री आठ वाजेपर्यंत भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे. दरम्यान पहाटे प्रमुख विश्वस्त अभय टिळक यांच्या हस्ते माऊलींची विधिवत महापूजा होईल.

भाजप आणि साधू संतांच्या संघर्षाला यश येउन धार्मिक स्थळ उघडण्याच्या निर्णय झाल्याचा दावा करत भाजपच्या प्रवक्त्यांनी पुण्यातील उपलक्ष कर्वेनगर येथील विठ्ठल मंदिरात गणरायाच्या,पांडूरंगरखमाईच्या च्या,गुरुदेव दत्ताच्या,शनीदेवाच्या आणि पालवबाबा समाधीचे दर्शन घेतले .यावेळी आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या वतीने नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या हस्ते मंदिरास भाविकांच्या सुरक्षेसाठी हॅंडस् फ्री सॅनिटायझर यंत्र भेट देण्यात आले .

भाजपचे नगरसेवक आदित्य माळवे म्हणाले राज्य सरकारने सोमवारपासून मंदिर उघडे करण्याचा अध्यदेश काढला यानिमित्त मॉडेल कॉलनीतील केदारनाथ मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुले करण्यात आले यानिमित्त केदारनाथची आरती माझ्या हस्ते करण्याचा बहुमान विश्वस्तांनी दिला . हा माझा भाविकांनी केलेला सन्मान आहे.

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांची सजावट आकर्षक रांगोळीच्या मांडणीसह सोमवारी सकाळी नऊ वाजता सर्व भाविकांसाठी खुले झाले. अंबाबाई दर्शनाचा पहिला मान कोव्हिड योध्यांना देण्यात आला. यावेळी पश्र्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव व पदाधिकाऱ्यांनी दर्शनासाठी आलेल्यांचे स्वागत केले. तसेच आठवडाभरात अंबाबाईचे दर्शन देखील ऑनलाईन बुकींग द्वारे करण्यात येणार असल्याचे सांगितले.

मंदिर खुले झाले असले तरी भाविकांना केवळ सहा तासात दर्शन घेता येणार आहे. देवस्थान समितीने दर्शनासाठी सकाळी ९ ते दुपारी १२ व दुपारी 4 ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत दर्शन वेळ निश्चित केली आहे. सध्या भाविकांना मंदिरात पूर्व दरवाजातून प्रवेश करता येणार आहे. तसेच गाभाऱ्यात थेट प्रवेश न देता कासव चौकातून दर्शन घेऊन दक्षिण दरवाजामधून बाहेर पडण्याची सोय केली आहे. कोरनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात प्रवेश करताना भक्तांना ऑटोमॅटिक सॅनिटायझर दिले जाते तसेच तापमान तपासणी ,आवारात मास्क नसल्यास प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अख्त्यारीतील प्रमुख अंबाबाई मंदिर, जोतिबा मंदिर यासह सिंधुदुर्ग , सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील 3042 मंदिरे आज खुली झाली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर पहाटे पाच वाजल्यापासून खुलं करण्यात आलं. दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग पाहायला मिळत आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळून दर्शन घेतलं जात आहे. तसेच सोशल डिस्टन्स ठेवत सारसबागेतीळ मंदिरामध्ये भाविकांना दर्शन देण्यात येत आहे.

सकाळपासून सिद्धिविनायक मंदिर चार वाजल्यापासून मंदिर खुले करण्यात आले. क्यूआर कोडच्या असलेल्या भाविकांनाच मंदिरात प्रवेश दिला जात आहे. कोरोनाचे नियम पालन करुनच भाविकांना प्रवेश दिला जात आहे. सिद्धिविनायक मंदिरात प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन बुकिंग करणे गरजेचे असल्याचे सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी सांगितले आहे.

आजपासून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार जेजुरीगड भाविकांसाठी देव दर्शनासाठी खुले करण्यात आला आहे. शासनाने घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन करीतच भाविकांना देव दर्शन घ्यावे लागणार असल्याचे मुख्य विश्वस्त प्रसाद शिंदे यांनी सांगितले. पहाटे साडे पाच वाजता पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या हस्ते सपत्नीक कुलदैवत खंडोबाची महापूजा करून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे.

शिर्डीचे साई मंदिर आजपासून पुन्हा उघडण्यात आले आहे. काकड आरतीनंतर साई दर्शनाला सुरुवात झाली. आठ महिन्यांनंतर मंदिंर खुले झाले आहे. मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून आकर्षक रांगोळी सुद्धा काढण्यात आली आहे. पहाटेपासून भाविकांची दर्शनाला गर्दी होत असून पहिलाच दिवस असल्याने आलेल्या भक्तांना आयडी कार्ड पाहून दर्शनाला सोडत आहे. प्रवेश क्रमांक दोनवर मोठी रांग बाहेर लागली आहे.

कोरोनामुळे मागच्या आठ महिन्यापासून बंद असलेले मंदिरे आज पाडव्याच्या मुहूर्तावर उघडले. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले बीडमधील परळीचे प्रभू वैद्यनाथाचे मंदिर सकाळी पाच वाजताच उघडले. नेहमीप्रमाणे पहाटेपासूनच भाविक दर्शनासाठी गर्दी करायचे. आज पुन्हा आठ महिन्यानंतर पहिल्यांदा दर्शन घेण्यासाठी भाविक पहाटेच पोहोचले होते. शासनाने घालून दिलेल्या नियम अटी पाळून या वेळी भाविकांना मंदिर खुले करण्यात आले. आज थेट गाभाऱ्यात भाविकांना प्रवेश देण्यात आला नाही मात्र मुखदर्शन खुले करण्यात आले आहे.

आज दिवाळी पाडव्यानिमित्त आज मंदिर विठ्ठल मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असून भाविकांच्या स्वागतासाठी मंदिर सज्ज झाले आहे. आठ महिन्यांनी विठुराया आणि भाविकांची भेट झाली आहे. पहिल्या भाविकाने सकाळी सहा वाजता दर्शन घेतलं. तापमान तपासून भाविकांना आत सोडलं जात आहे. तर तीन वेळा सॅनिटाईज केलं जात आहे.

कायम मागच्या दाराने लोकप्रतिनिधी होणाऱ्या नीलमताईंनी चंद्रकांतदादांना आव्हान देणे हास्यास्पद – संदीप खर्डेकर (व्हिडीओ)

0

पुणे- सातत्याने मागच्या दाराने विधानपरिषदेत प्रवेश करणाऱ्या शिवसेनेच्या नीलमताई गोऱ्हे यांनी आ. चंद्रकांत दादां वर टीका करताना किमान आपली पूर्वपीठिका तपासून पाहणे गरजेचे वाटते.विधानपरिषदेच्या पदवीधर निवडणुकीत ५ जिल्ह्यातील मतदार मतदान करत असतात,
पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा ,कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे अश्या ५ जिल्ह्यातून पदवीधर ची निवडणूक लढवून दोन वेळा विजयी झालेले चंद्रकांतदादा पाटील हे पश्चिम महाराष्ट्रातील आणि राज्यातील सर्वमान्य नेते आहेत .असे प्रती आव्हान भाजप च्या वतीने पुणे शहर मुख्य प्रवक्ता संदीप खर्डेकर यांनी दिले आहे.


ते म्हणाले,’मी नीलमताईंच्या निदर्शनास आणून देउ इच्छितो की चंद्रकांतदादा पाटील हे कोथरूड मधून मनसे आणि महाविकास आघाडीच्या संयुक्त शक्तीला (?) तोंड देउन बहुमताने निवडून आले आहेत.त्यांच्या पराभवासाठी जाणत्या राजां सह राज्यातील अनेक नेते जीवाचे रान करत होते – तरीही चंद्रकांतदादा पाटील आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी लक्षणीय विजय नोंदविला. त्यामुळे चंद्रकांतदादां ना कोथरूड मधून पुन्हा निवडून येउन दाखवा असे आव्हान देताना नीलमताई स्वतः जनतेतून कधी निवडणूक लढविणार हे त्यांनी स्पष्ट करावे आणि मग सलग तीन वेळा जनतेतून निवडून आलेल्या चंद्रकांतदादां ना आव्हान द्यावे असे प्रती आव्हान भाजप च्या वतीने खर्डेकर यांनी दिले आहे.
नीलमताईं नी दरबारी राजकारण सोडावे आणि चंद्रकांतदादा पाटील यांनी अभाविप च्या प्रचारक पदापासून आजपर्यंत जो कार्यकर्त्यांचा मोहोळ उभा केला आहे त्याचा आदर्श घ्यावा आणि जनतेत काम करावे – नपेक्षा महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिलां वरील अत्याचारात झालेली वाढ याबाबतीत आत्मपरीक्षण करावे आणि या सरकारच्या काळात महिलांना जाळण्यापर्यंत मजल गेलेल्या नराधमांना कायद्याची भीती राहिलेली नाही याबाबतीत आंदोलन उभारावे असेही संदीप खर्डेकर म्हणाले.

राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.४९ टक्क्यांवर

0

मुंबई, दि. १६ : राज्यात आज ३,००१ रुग्ण बरे होऊन घरी परतले. आजपर्यंत एकूण १६,१८,३८० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate९२.९ % एवढे झाले आहे. २,५३५ नवीन रुग्णांचे निदान झाले तर ६० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ % एवढा आहेसध्या राज्यात ७,४८,२२६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ५,३९५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

ाज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण  –

राज्यात आज रोजी एकूण ८४,३८६ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

अ.क्र.जिल्हाबाधित रुग्णबरे झालेले रुग्णमृत्यूइतर कारणामुळे झालेले मृत्यूऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई२७०११९२४५७३४१०५८५७६७१३०३३
ठाणे२३१५६९२१२३६८५३९४४६१३७६१
पालघर४४०७६४२००१९२९११११३५
रायगड६१३०९५६८१९१४३९३०४५
रत्नागिरी१००८१९१३४३७७ ५७०
सिंधुदुर्ग५२१४४८१०१३७२६६
पुणे३४२२५५३१८६५७७१६५३३१६४००
सातारा५०२७१४४७३६१५६०३९६६
सांगली४७९०२४४८७७१७०५१३१८
१०कोल्हापूर४८२०१४६१९६१६६२३४०
११सोलापूर४६८३८४३३०३१५६४१९६६
१२नाशिक१००४४९९५८०९१६४७२९९२
१३अहमदनगर५९३१४५४०५५९१९४३३९
१४जळगाव५४२१४५१८४९१३७०९८७
१५नंदूरबार६६९१६०९६१४६४४८
१६धुळे१४५२४१४०३१३३८१५३
१७औरंगाबाद४३५३८४१२९७१०३४१३११९४
१८जालना११२८२१०६११३०१३६९
१९बीड१५२१४१३६२४४५८११२७
२०लातूर२१४१०१९८४७६४१९१९
२१परभणी६९१३६०७३२४८११५८१
२२हिंगोली३८०३३२२३७६ ५०४
२३नांदेड१९६६०१७५२३५९७१५३५
२४उस्मानाबाद१५८५६१४३३२५१३१०१०
२५अमरावती१७६५७१६२५१३५११०५३
२६अकोला८८९२८३३३२९१२६३
२७वाशिम५९५४५६७९१४६१२७
२८बुलढाणा११३२५१०२३७१८६८९८
२९यवतमाळ११५५४१०७६४३३२४५४
३०नागपूर१०८८२३१०३१५२२८८०१५२७७६
३१वर्धा७३२५६६१७२१८४८८
३२भंडारा९९६७८७८८२१२ ९६७
३३गोंदिया१०९४९९९४०११९८८४
३४चंद्रपूर१८२७५१५२५८२८६ २७३१
३५गडचिरोली६४७१५९२८५१४९१
 इतर राज्ये/ देश१८८२४२८१५७१२९६
 एकूण१७४९७७७१६१८३८०४६०३४९७७८४३८६

(टीप – बरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.)

करोना बाधित रुग्ण –

आज राज्यात २,५३५ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १७,४९,७७७ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे

अ.क्रजिल्हा महानगरपालिकाबाधित रुग्णमृत्यू
दैनंदिनएकूणदैनंदिनएकूण
मुंबई महानगरपालिका४०९२७०११९१२१०५८५
ठाणे३३०२३१५६९५३९४
ठाणे मनपा
नवी मुंबई मनपा
कल्याण डोंबवली मनपा
उल्हासनगर मनपा
भिवंडी निजामपूर मनपा
मीरा भाईंदर मनपा
पालघर१३४४०७६९२९
१०वसईविरार मनपा
११रायगड३९६१३०९१४३९
१२पनवेल मनपा
 ठाणे मंडळ एकूण७९१६०७०७३१८१८३४७
१३नाशिक३३२१००४४९१६४७
१४नाशिक मनपा
१५मालेगाव मनपा
१६अहमदनगर१३०५९३१४९१९
१७अहमदनगर मनपा
१८धुळे१४५२४३३८
१९धुळे मनपा
२०जळगाव२६५४२१४१३७०
२१जळगाव मनपा
२२नंदूरबार१९६६९११४६
 नाशिक मंडळ एकूण५०९२३५१९२४४२०
२३पुणे३७८३४२२५५७१६५
२४पुणे मनपा
२५पिंपरी चिंचवड मनपा
२६सोलापूर१३७४६८३८१५६४
२७सोलापूर मनपा
२८सातारा४५५०२७११५६०
 पुणे मंडळ एकूण५६०४३९३६४१३१०२८९
२९कोल्हापूर२४४८२०११६६२
३०कोल्हापूर मनपा
३१सांगली२९४७९०२१७०५
३२सांगली मिरज कुपवाड मनपा
३३सिंधुदुर्ग५२१४१३७
३४रत्नागिरी१००८१३७७
 कोल्हापूर मंडळ एकूण६३१११३९८३८८१
३५औरंगाबाद३३४३५३८१०३४
३६औरंगाबाद मनपा
३७जालना३२११२८२३०१
३८हिंगोली३८०३७६
३९परभणी१२६९१३२४८
४०परभणी मनपा
 औरंगाबाद मंडळ एकूण७७६५५३६१६५९
४१लातूर३२२१४१०६४१
४२लातूर मनपा
४३उस्मानाबाद३६१५८५६५१३
४४बीड८११५२१४४५८
४५नांदेड१११९६६०५९७
४६नांदेड मनपा
 लातूर मंडळ एकूण१६०७२१४०१४२२०९
४७अकोला८८९२२९१
४८अकोला मनपा
४९अमरावती१०१७६५७३५१
५०अमरावती मनपा
५१यवतमाळ२३११५५४३३२
५२बुलढाणा१९११३२५१८६
५३वाशिम२८५९५४१४६
 अकोला मंडळ एकूण८६५५३८२१३०६
५४नागपूर९०१०८८२३२८८०
५५नागपूर मनपा
५६वर्धा३१७३२५२१८
५७भंडारा४३९९६७२१२
५८गोंदिया२६१०९४९११९
५९चंद्रपूर४८१८२७५२८६
६०चंद्रपूर मनपा
६१गडचिरोली४९६४७१५१
 नागपूर एकूण२८७१६१८१०३७६६
 इतर राज्ये /देश१८८२१५७
 एकूण२५३५१७४९७७७६०४६०३४

(टीप- आज नोंद झालेल्या एकूण ६० मृत्यूंपैकी २७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २९ मृत्यू हे एक आठवडयापूर्वीच्या कालावधीतील आहेत. हे २९ मृत्यू हे पुणे -९,नांदेड -८, नाशिक -६, गोंदिया -३, कोल्हापूर – १,  रायगड- १ आणि  बुलढाणा- १ असे आहेत.)

शहीद जवान भूषण सतई अनंतात विलीन

0

नागपूर, :जम्मू काश्मीरमध्ये शहीद झालेले काटोलचे सुपुत्र शहीद नायक भूषण सतई यांच्या पार्थिवावर शासकीय इमामात मंत्रोपचाराने अंत्यविधी  पार पडला. यावेळी साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला. शहीद वीरपुत्राचे वडील रमेश सतई यांनी भडाग्नी दिला.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुष्पचक्र अपर्ण करुन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली, तसेच कुटुंबियाचे सांत्वन केले, संपूर्ण शासकिय इतमामात अंत्यसंस्काराचा विधी पार पडला.

शहिद भूषण सतई यांना ब्रिगेड ऑफ गार्ड रेजिमेंटच्या गरुडा परेड ग्राऊंडवरुन काटोल येथे आणण्यात आले. अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव घरी ठेवण्यात आले. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांचे वडील रमेश सतई, आई मीराबाई सतई तसेच आप्तजनांचे सांत्वन केले.

शहिद नायक भूषण सतई यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शनासाठी संपूर्ण काटोल शहरातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी काटोलकरांनी त्यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप दिला. शहिद भूषण सतई यांच्या पार्थिवावर येथील ग्रामीण रुग्णालयाजवळील मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी खासदार अनिल महात्मे, खासदार कृपाल तुमाने, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार, जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे, नगराध्यक्षा वैशाली ठाकूर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुभेजवार, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) राकेश ओला, अप्पर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. शिल्पा खरपकर, उपविभागीय अधिकारी उंबरकर,   तहसिलदार अजय चरडे, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, चरणसिंग ठाकूर, तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, पदाधिकारी, सेनादलाचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी, शहीद सुपुत्राचे निकटवर्तिय उपस्थित होते. यावेळी लाखोच्या संख्येने काटोलकर व परिसरातील जनता उपस्थित होती. ‘भारत माता की जय’ च्या घोषणेत परिसर निनादून गेला होता.

शहीद भूषण सतई हे मुळचे काटोलचे असून खोऱ्यातील गुरेज सेक्टरमध्ये मागील शुक्रवारी पाकिस्तानने केलेल्या हल्यात भारतीय लष्काराचे चार जवान शहीद झाले होते. यामध्ये काटोल येथील भूषण रमेश सतई यांना वीरमरण आले.

शहीद जवान ऋषीकेश जोंधळे यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात बहिरेवाडी येथे अंत्यसंस्कार

0

कोल्हापूर, शहीद जवान ऋषीकेश रामचंद्र जोंधळे यांच्या पार्थिवावर आज बहिरेवाडी येथे पोलिसाच्या चार जवानांच्या आणि लष्कराच्या आठ जवानांच्या तुकडीने बंदुकीच्या हवेत ३ फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पालकमंत्री तथा माजी सैनिक कल्याण राज्यमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलीक, आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली.

शहीद जवान ऋषीकेश जोंधळे यांचे पार्थिव आज सकाळी 7 वा. बहिरेवाडी येथील निवासस्थानी आली. या ठिकाणी काही काळ अंतिम दर्शनासाठी त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले. वडील रामचंद्र जोंधळे, आई कविता, बहीण कल्याणी आणि नातेवाईकांनी दर्शन घेतले. यानंतर या ठिकाणाहून अंत्ययात्रेला सुरुवात झाली. रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढण्यात आली होती. चौकाचौकात फलक लावून आदरांजली वाहिली होती. ग्रामस्थ, विद्यार्थी – विद्यार्थिनी पुष्पहार आणि फुले वाहून आदरांजली वाहत होते. “अमर रहे अमर रहे ऋषीकेश जोंधळे अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम” अशा घोषणा देत ही अंत्ययात्रा श्री भैरवनाथ हायस्कूल येथे पोहचली.      ही अंत्ययात्रा अंतिम संस्काराच्या ठिकाणी आल्यानंतर पालकमंत्री तथा माजी सैनिक कल्याण राज्यमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलीक, आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली.

सुभेदार सखाराम पवार, माजी आमदार संजय घाटगे, समरजितसिंह घाडगे, जि. प. उमेश आपटे, सरपंच अनिल चव्हाण, उपसरपंच उमेश खोत, कर्नल कुलदिप कुमार कर्नल आर. आर. जाधव, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रदीप ढोले, कर्नल शिवाजी बाबर आणि आजी माजी सैनिक संघटच्यावतीनेही पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहण्यात आली.

खासदार श्री. मंडलीक आपल्या शोकसंदेशात म्हणाले, ऊन, वारा, वादळ, कोरोना अशा संकटावर मात करत चीन- पाकिस्तान सारख्या शत्रुपासून देशाचे संरक्षण आपले जवान करत आहे. म्हणून आपण सुरक्षित आहोत.  शहीद जवान ऋषीकेश यांच्या सारखा जवान आपल्या मातीत जन्माला आला त्या मातीला मी सलाम करतो आणि श्रद्धांजली वाहतो.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, देशासाठी प्राणपणे लढत सर्वस्वपणाला लावणारा तरुणांचा अभिमान आज आपल्यात नाही. भारतमातेच्या रक्षणासाठी शहीद जवान ऋषीकेश यांनी दिलेले बलिदान देश कधिच विसरु शकणार नाही. जोंधळे कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, जोंधळे कुटुंबियांच्या पाठीशी आम्ही सर्वजण राहू. शहीद जवान ऋषीकेश यांनी दिलेले बलिदान वाया जाणार नाही.

पोलीस आणि लष्कराच्या जवानांच्या तुकडीने हवेमध्ये बंदुकीच्या 3 फैरी झाडून आणि अंतिम बिगुल वाजवून मानवंदना दिली. यानंतर शहीद जवान ऋषीकेश यांचे चुलत बंधू पुंडलिक यांच्या हस्ते अग्नी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अधिकारी, पदाधिकारी त्याचबरोबर लष्कराचे विविध आजी, माजी अधिकारी आणि हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने जवानांना अभिवादन

0


पुणे:१५:भारतीय जनता युवा मोर्चा कसबा मतदारसंघाच्या वतीने सीमेवर लढत आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांना पणत्या लावून अभिवादन करण्यात आले
महात्मा फुले वाड्यामध्ये आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला पुणे महानगरपालिकेचे स्थायी समिती चे अध्यक्ष हेमंत रासने ,पुणे शहर सरचिटणीस राजेश येनपुरे ,युवा मोर्चा शहराध्यक्ष राघवेंद्र मानकर ,कसबा अध्यक्ष प्रमोद कोंढरे, सरचिटणीस छगन बुलाखे ,राजेंद्र काकडे ,युवा मोर्चा अध्यक्ष अमित कंक ,महिला अध्यक्ष अश्विनी पांडे यांच्या सह नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
या वेळी बोलताना हेमंत रासने म्हणाले ‘सीमेवर कुठल्याही परिस्थिती चा विचार न करता वीर जवान आपल्या जीवाची बाजी लावतात त्यांच्यामुळे आपण देशात सुरक्षित असतो त्यांना कुठलाही सण साजरा करता येत नाही परंतु त्याची खंत मनात न बाळगता आपले कर्तव्य बजावतात त्यामुळे त्यांना मानवंदना ही दिलीच पाहिजे’
या कार्यक्रमाचे आयोजन कसबा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱयांनी केले