Home Blog Page 2386

1202 मतदान केंद्रावर व्हिडीओग्राफी व लाइव वेबकास्टिंग

0

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूक
1202 मतदान केंद्रावर व्हिडीओग्राफी व लाइव वेबकास्टिंग
विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी घेतला आढावा

पुणे, दि. ३०- भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार पुणे विभागातील पदवीधर व शिक्षक निवडणूक मतदान प्रक्रिया निर्भय, निपक्ष व पारदर्शी वातावरणात पार पडण्याच्या दृष्टिने निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाने पुणे विभागातील पुणे, सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर या पाचही जिल्ह्यातील सर्वच 1202 मतदान केंद्रावर व्हिडीओग्राफी व लाइव्ह वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात त्यादृष्टिने वेबकास्टिंग कक्ष उभारण्यात आला असून या कक्षामध्ये मतदान केंद्रावरील कामकाज पाहता येणार आहे. विभागीय आयुक्त कार्यालयासोबतच पाचही जिल्ह्यातील जिल्हा मुख्यालयातही वेबकास्टिंग कक्ष उभारण्यात आला असून या कक्षातून पाचही जिल्ह्याचे जिल्हाधिकारीही मतदान केंद्रावरील कामकाज पाहू शकणार आहेत.


पुणे पदवीधर व शिक्षक निवडणुकीसाठी दिनांक 1 डिसेंबर 2020 रोजी मतदान होत आहेत. सकाळी 8 ते सायंकाळी पाच या वेळेत होणाऱ्या मतदान प्रक्रियेचे संपूर्ण लाइव्ह वेबकास्टिंग, सीसीटीव्ही चित्रीकरण तसेच व्हिडीओग्राफी करण्यात येणार आहे. 1202 मतदान केंद्रावर सुक्ष्म निरीक्षकांचीही नेमणूक करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी आज या कक्षास भेट देत पाहणी करून पाचही जिल्ह्यातील मतदान केंद्रावरील तयारीचा आढावा घेतला. विभागीय आयुक्त कार्यालयात उभारण्यात आलेल्या या वेबकास्टिंग कक्षाचे समन्वय अधिकारी म्हणून उपायुक्त त्रिगुण कुलकर्णी कामकाज पाहत आहेत. तसेच विभागीय गोदाम निरीक्षक संतोष सर्डे या कक्षासाठी कार्यरत आहेत. शिक्षक मतदार संघासाठी 367 व पदवीधर मतदार संघासाठी 835 मतदान केंद्र आहेत, या सर्वच मतदान केंद्रावर लाइव्ह वेबकास्टिंग करण्यात येणार आहे.

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या 15 हजार 609 इतकी

0

पुणे विभागातील 5 लाख 4 हजार 316 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 5 लाख 34 हजार 907 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे,दि.30 :- पुणे विभागातील 5 लाख 4 हजार 316 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 34 हजार 907 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 15 हजार 609 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 14 हजार 982 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.80 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.28 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 42 हजार 370 रुग्णांपैकी 3 लाख 22 हजार 477 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 11 हजार 595 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 298 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.42 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.19 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 51 हजार 59 रुग्णांपैकी 48 हजार 380 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 966 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 713 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 45 हजार 690 रुग्णांपैकी 41 हजार 938 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 155 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 597 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 46 हजार 748 रुग्णांपैकी 44 हजार 593 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 459आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 696 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 49 हजार 40 रुग्णांपैकी 46 हजार 928 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 434 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 678 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 1 हजार 125 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 830 , सातारा जिल्ह्यात 135, सोलापूर जिल्ह्यात 118, सांगली जिल्ह्यात 23 तर कोल्हापूर जिल्ह्यात 19 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण –
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 930 समावेश आहे. पुणे जिल्हयामध्ये 622, सातारा जिल्हयामध्ये 88, सोलापूर जिल्हयामध्ये 172, सांगली जिल्हयामध्ये 31 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 17 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 28 लाख 55 हजार 725 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 34 हजार 907 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि. 29 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

महापालिकेत पदांची होणार मोठी उलथापालथ …

पुणे – डिसेंबर महिना म्हणजे महापालिकेतील आखरी संग्रामाचा वर्षकाळ मानला जातोय ,या महिन्यात कॉंग्रेस वगळता महापालिकेतील विविध पक्षांच्या नेत्यांत मोठे फेरबदल होण्या बरोबर शहरातील काही पदाधिकारी देखील काही पक्ष बदलतील असे चिन्ह आहे. २०२२ मध्ये महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. यावेळी भाजपा आणि शिवसेना वेगवेगळे आहेत .महाविकास आघाडी व्होवो अथवा न होवो पण प्रत्येक पक्षाला कंबर कसायची आहे. त्यामुळे अन्य पक्षांशी गॅटमेट करणारे,नेते आता अखेरच्या वर्षात कार्यकर्त्यांच्या रडारवर असल्याने ते आधी बदला आणि नंतर महापालिका निवडणुकीला सामोरे जा अशी मागणी जोर धरते आहे. सेने ला दाबण्याचे सर्वाधिक प्रयत्न आजवर झाले असून यापुढे असे प्रयत्न होणार नाहीत उलट सेना उसळी मारून वर्षात आपले बहुमोल अस्तित्व दाखवून देईल अशा नेत्यांच्या हाथी सेनेला सूत्रे सोपवावी लागणार आहेत . तर राष्ट्रवादीला , केवळ स्वतः मोठे होणारे नेते वगळून पक्षाला मोठे करणारे नेते शोधावे लागणार आहेत.महापालिकेतील महापौरांच्या अ ँटीचेंबर मधील खाजगी बैठकांतून राजकारण ठरविणारे सर्वच गटनेत्यांविषयी कार्यकर्त्यांत प्रचंड रोष आहे.अशा स्थितीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड चे आमदार शहरात चांगले सक्रीय असल्याने त्यांनी भाजपच्या शहर पातळीवर बदल केलेत पण आता महापालिकेतही ते काही उलथापालथ करणार काय ? याकडे कार्यकर्त्यांचे आणि तोंड दाबून ४ वर्षे काढलेल्या नगरसेवकांचे लक्ष लागून आहे.

दरम्यान महापालिकेतील महापौर आणि उपमहापौर यांच्या कारकिर्दीला एक वर्ष पूर्ण झाले आहे . त्यांची निवड करताना तत्कालीन खासदार संजय काकडे आणि तत्कालीन भाजपा अध्यक्ष आ. माधुरी मिसाळ यांना महापालिकेत पाठवून १८ नोव्हेम्बर  ला या महापौर,उपमहापौर यांच्या  नावांची घोषणा करण्यात आली होती . आणि याच वेळी हे दोन्ही पदाधिकारी 1 वर्षासाठी असतील याचे स्पष्टीकरण देखील या दोन्ही नेत्यांनी दिले होते. त्यानंतर  2 आठवड्यात सभागृह नेते  बदलण्यात आले.  यापैकी काहींचे समर्थक जे नगरसेवक नाहीत असे यांची कालमर्यादा वाढवा असे सांगत आहेत तर यांना बदलून आता सर्वसमावेशक ,भाजपच्या सर्व लोकप्रतिनिधी आणि ,पदाधिकारी यांना बरोबर घेऊन जाणारे नवे चेहरे नेत्यांनी दिले पाहिजेत असा आग्रह देखील भाजपच्या गोटातून मिडिया प्रतिनिधींकडे खाजगीत मांडला जातोय .दरम्यान यावर भाजपचे पुणे शहर मुख्य प्रवक्ता संदीप खर्डेकर यांना छेडले असता , हे सर्वाधिकार प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादापाटील आणि नेते ,माजी मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांनाच असल्याचे त्यांनी सांगितले , तुम्ही म्हणताय तसे काही असेल तर हेच नेते या दोन्ही पदाधिकाऱ्यांचे मूल्यमापन करतीलच . आणि जर वर्षाची मुदत ठरलेली असेल तर ती पाळण्याचा अगर मुदतवाढ देण्याचा अधिकार हि याच दोन्ही नेत्यांकडे आहे.  असे त्यांनी स्पष्ट केले .यासंदर्भात विचारणा करायचा प्रयत्न केला असता ,माजी खासदार संजय काकडे किंवा आमदार माधुरी मिसाळ या दोहोंशी संपर्क होऊ शकलेला नाही .मात्र महापालिकेतील भाजपच्या नगरसेवकांमध्ये मोठी अस्वस्थता आहे.पण उघडपणे कोणी बोलून दाखवायला ते तयार नाहीत . लॉबी आणि एककेन्द्री कारभार   एक पदाधिकारी  करतात आणि दुसरे मात्र  विशेष मनावर घेत नाहीत . त्यांच्या वर्तनातून ते हतबल असल्याचे वाटते  असा  आरोप खाजगीतून केला जातोय.  दरम्यान महापौर पदी मुरलीधर मोहोळ २२ नोव्हेंबर ला तर ६ डिसेंबर ला सभागृहनेते पदी विराजमान झालेले धीरज घाटे यांच्याकडून पक्षाला खूप मोठी अपेक्षा होती . त्याला कारणही तसेच होते . घाटे आक्रमक हिंदुत्ववादी म्हणून प्रख्यात आहेत , नगरसेवक  घाटे आणि पोटे तसेच बालवडकर ,मेंगडे महापालिकेच्या सभागृहात आक्रमक  म्हणून प्रख्यात होते. मात्र तेव्हा सभागृहनेता म्हणून श्रीनाथ भिमाले होते . आणि महापौर पदी मुक्ता टिळक होत्या. मोहोळ महापौर झाल्यावर सभागृहातला भाजपचा आक्रमक पणा नाहीसा झाल्याचे आणि गटनेत्यांच्या बैठका महापौरांच्या दालनात मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत. वास्तविक पाहता मोहोळ यांच्यावर  शिक्षण मंडळ ,पीएमपीएमएल,पीएमआरडीए, 2 वेळा स्थायी समिती अध्यक्ष पदाच्या मानाने महापालिका अंदाजपत्रक सादर करण्याची संधी आणि आता महापौर पद अशी मोठी उधळण पक्षाने केली आहे.  त्यामानाने त्यांनी आता प्रत्येक नवीन आणि जुन्या नगरसेवकांत आपले स्थान कार्याच्याअनुषंगाने  घट्ट करणे अपेक्षित होते . पण तसे काही दिसून आले नाही ,मिळालेल्या संधीचा त्यांनी व्यापक फायदा घेण्याऐवजी कंपू शाहीला महत्व दिल्याचे बोलले जाते. या शिवाय पालिकेतील गटनेत्यांची मोट बांधून सर्वांचीच नाराजी ओढवून घेतल्याचा आरोप होतो आहे. या पार्श्वभूमीवर आता त्यांच्या पदाला 1 वर्ष पूर्ण झाले असताना पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकांची आचारसंहिता संपताच त्यांना बदलले जाईल असे अनेक नगरसेवकांना वाटते आहे. मात्र निर्णय केवळ फडणवीस आणि चंद्रकांतदादा यांच्या हाथी असल्याचे सांगण्यात येते आहे.

केंद्रीय राखीव पोलीस दलातील असिस्टंट कमांडन्ट नितीन भालेराव अनंतात विलीन

0

नाशिक दि. २९ – भारतीय निमलष्कराच्या केंद्रीय राखीव पोलीस दलात कार्यरत असलेले असिस्टंट कमांडन्ट नितीन भालेराव यांचे छत्तीसगड येथील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना निधन झाले.

असिस्टंट कमांडन्ट नितीन भालेराव यांच्यावर सायंकाळी नाशिक शहरातील अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

अंत्यसंस्कारस्थळी अन्न व नागरी पुरवठा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळआमदार सीमा हिरेजिल्हाधिकारी सूरज मांढरेनाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकरकेंद्रीय राखीव पोलीस दलाचे महानिरीक्षक संजय लाटकरपोलीस आयुक्त दीपक पांडेयछत्तीसगड सेक्टर उपमहानिरीक्षक राज कुमारपुणे सेक्टर उपमहानिरीक्षक बी.के.टोपो,  पोलीस अधिक्षक सचिन पाटीलजिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांचेसह नागरिक उपस्थित होते.

अंत्यसंस्कार स्थळी पार्थिव येताच राज्य शासनाच्या वतीने अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळनिमलष्करी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वतीने महानिरीक्षक संजय लाटकरनाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे पोलीस आयुक्त दीपक पांडेयनाशिक पोलीस परिक्षेत्राच्या वतीने परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकरजिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी सूरज मांढरेग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील आदींनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यानंतर केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या तुकडीने बंदुकीच्या फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून असिस्टंट कमांडन्ट नितीन भालेराव यांना अखेरची मानवंदना दिली.

पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी शहीद नितीन भालेराव यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.

शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास छत्तीसगड येथील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी ताडमेटला परिसरातल्या बुरकाल येथून ६ किलोमीटर अंतरावर स्फोट घडवून आणला होता. या स्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या २०६ कोब्रा बटालियनचे सहायक कमांडन्ट नितीन भालेराव यांना वीरमरण आले होते.

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील देवपूर या गावचे मूळ असलेले शहीद नितीन भालेराव हे नाशिक शहरातील राजीवनगर येथे वास्तव्याला होते. त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण नाशिकच्या गोखले एज्युकेशन येथे पूर्ण करून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून केंद्रीय राखीव दलात दाखल झाले होते. २०१० साली केंद्रीय राखीव पोलीस दलात भरती झालेले जवान नितीन भालेराव यांनी सर्वप्रथम जम्मू काश्मीर येथील कुलगाम येथे सेवा बजावली होती त्यानंतर पंतप्रधान कार्यालयाच्या विशेष संरक्षण टीम मध्ये त्यांनी सेवा दिली होती. त्यानंतर राजस्थानमधील माउंटअबू स्थित अंतर्गत सुरक्षा अकादमी‘ येथे त्यांनी काम केले होते. जून महिन्यापासून ते २०६ कोब्रा बटालियन मध्ये सहाय्यक कमांडन्ट म्हणून कार्यरत होते.

दरम्याननक्षलवादी विरोधी कारवाया रोखण्यासाठी त्यांचे विशेष योगदान होतं. देशांतर्गत झालेल्या विविध लढाऊ स्पर्धेत शहीद नितीन भालेराव यांनी उत्तम कामगिरी केली होती.

शहीद नितीन भालेराव यांच्या पश्चात आई भारतीपत्नी रश्मीमुलगी अन्वीतर दोन भाऊ अमोल व सुयोग असा परिवार आहे.

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ५१ हजार दिव्यांच्या प्रकाशाने उजळले ‘दगडूशेठ’ गणपती मंदिर( व्हिडीओ)

0

पुणे : श्री गणेशाला फळ-भाज्यांसह मिठाई, फराळाच्या तिखट-गोड निवडक पदार्थांचा अन्नकोट आणि सभामंडपात व मंदिर परिसरात लावण्यात आलेल्या शेकडो दिव्यांच्या प्रकाशाने दगडूशेठ गणपती मंदिर उजळून निघाले. दरवर्षी मोठया प्रमाणात होणारा अन्नकोट यावर्षी साध्या पद्धतीने ठेवण्यात आला. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंदिराच्या प्रवेशद्वारापासून ते कळसापर्यंत ५१ हजार दिव्यांची केलेली सजावट लक्षवेधी ठरली. 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने ट्रस्टच्या १२८ व्या वर्षी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये दीपोत्सव आणि साध्या पद्धतीने अन्नकोट आयोजित करण्यात आला होता. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त, कार्यकर्ते उपस्थित होते. मंदिराच्या कळसासह संपूर्ण गाभा-यात लावलेल्या पणत्यांनी मंदिराचा परिसर उजळून निघाला होता. याशिवाय तोरण आणि फुले, रांगोळ्यांनी देखील मंदिराचा परिसर सजविण्यात आला. कार्यक्रमाचे यंदा २२ वे वर्ष आहे. 

ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे म्हणाले, त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दरवर्षी मोठया प्रमाणात अन्नकोटाचे आयोजन केले जाते. भाविकांना केलेल्या आवाहनाद्वारे दरवर्षी तब्बल ५०० हून अधिक पदार्थ गोळा होतात. यंदा भाविकांना कोणतेही आवाहन न करता अत्यंत साध्यापद्धतीने ट्रस्टने दीपोत्सव व अन्नकोट साजरा केला आहे. आरोग्यसंपन्न जगाकरीता गणरायाला आम्ही साकडे घातले आहे. लवकरात लवकर कोरोनाचे संकट दूर होऊन जनजीवन सुरळीत व प्रकाशमान व्हावे, अशी प्रार्थना आम्ही करीत आहोत.

नवले पुल परिसर जीवघेणा : आज 2 ठार,लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांना कधी येणार जाग ..?

0

पुणे- कात्रज देहूरोड मार्गावरील नवले पूल आणि परिसरात आजवर मोजता येणार नाही असे असंख्य विचित्र अपघात झाले असून सातत्याने सुरु असलेल्या अपघातांची मालिका थांबविण्यासाठी काही करावे असे मात्र कोणत्याही पोलीस, महापालिका वा राज्य शासनाच्या अधिकाऱ्याला अगर लोकप्रतिनिधी असलेल्या नगरसेवक, आमदार वा खासदाराला वाटेना ..त्यांना जाग येईना असे चित्र असताना आज पुन्हा अनेक गाड्या एकमेकंवर धडकून जीवघेणा अपघात झाल्याने पुन्हा भय इथले संपेना असे स्पष्ट झाले आहे.

मागील काही दिवसांपासून नवले पुलाजवळ होणाऱ्या अपघातांचे सत्र काही केल्या थांबता थांबेना. ब्रेक निकामी झालेल्या भरधाव ट्रकने तब्बल आठ वाहनांना उडवीत झालेल्या भीषण अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर आठजण जखमी असून चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना पुणे-बंगळुरू बाह्यवळणावरील नऱ्हे येथील नवले पुलाजवळ रविवारी सायंकाळी सव्वा सहा वाजता घडली. अपघातानंतर ट्रकने पेट घेतल्याने अग्निशामक दलाच्या जवानांनी ट्रकला लागलेली आग विझविली.प्रशांत गोरे (वय 32, रा. उस्मानाबाद) व राजेंद्र मुरलीधर गाढवे (वय 65, रा. आंबेगाव खुर्द) असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर अपघातात आठजण जखमी असून त्यापैकी चौघेजण गंभीर जखमी आहेत. प्रेमराज राणाराम बिष्णोई (वय 25, खेडजडगी, जोधपूर, राजस्थान) असे अटक केलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे.बिष्णोई हा त्याच्या ताब्यातील 22 चाकी ट्रकमध्ये (आरजे.19, जीएस 4673) बंगळुरू येथून तब्बल 41 टन इतक्‍या वजनाचे लोखंड भरुन ते गुजरातमधील अहमदाबादला घेऊन जात होता. हा ट्रक रविवारी सायंकाळी सव्वा सहा वाजता कात्रज येथील नवीन बोगद्याजवळ आला, तेथून स्वामी नारायण मंदिराजवळ पोचल्यानंतर ट्रकचा ब्रेक निकामी झाला. त्यातच तीव्र उतार लागल्याने ट्रकने समोरुन जात असलेल्या पाच कार, एक रिक्षा व दोन दुचाकींना उडविले. हा अपघात इतका भीषण होता, की त्यामध्ये तीन कार व रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला.

प्रवाशांना घेऊन जाणारा रिक्षाला ट्रकने धडक दिल्याने रिक्षाचे नुकसान झाले. त्यामध्ये रिक्षाचालक राजेंद्र गाढवे यांच्यासह रिक्षातील प्रवासी जखमी झाले. तर दुचाकी ट्रकच्या चाकाखाली आल्याने दुचाकीस्वार प्रशांत गोरे हे देखील गंभीर जखमी झाले होते. तर अन्य आठ नागरिक या अपघातात जखमी झाले. सात ते आठ वाहनांना जोरदार धडक दिल्यानंतर ट्रकच्या डिझेलच्या टाकीने पेट घेतला. त्यानंतर काही अंतरावर पुलावरच ट्रक थांबला. या घटनेची माहिती मिळताच सिंहगड पोलिस ठाणे, वाहतूक शाखेचे पोलिस व स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना अपघातग्रस्त वाहनांमधून बाहेर काढत उपचारांसाठी रुग्णालयात पाठवून दिले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर प्रशांत गोरे, राजेंद्र गाढवे यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले.

महाविकास आघाडी सरकार वर्षभरात सपशेल अपयशी-विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर

0

नांदेड, दि. २९ नोव्हेंबर- महाविकास आघाडी सरकारचे हे एक वर्ष खोटे बोलण्याचे, कंत्राटदार जगविण्याचे, कोविड काळातही भ्रष्टाचार करण्याचे शेतकऱ्यांना फसविण्याचे, फक्त केंद्रावर जबाबदारी ढकलण्याचे, जनतेच्या मूळ विषयापासून लक्ष विचलित करण्यामध्येच महाविकास आघाडी सरकारचे एक वर्षे गेले. त्यामुळे ना वर्षभराच्या कुठल्या ठोस योजना व प्रकल्प, ना पुढील काळाचा कुठलाही कृती आराखडा देऊ शकलेले हे महाविकास आघाडीचे सरकार गेल्या एक वर्षांत आघाडयांवर अपयशी ठरल्याची जोरदार टिका विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज नांदेड येथे केली.
महाविकास आघाडी सरकारला एक वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या वर्षभरात अपयशी ठरल्याच्या या सरकाराच्या कामाचा पंचनामा करण्यासाठी व सरकारची पोलखोल करण्याकरिता विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांची आज नांदेड येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी बोलताना दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारमधील विसंवाद, गोंधळ, निष्काळजीपणा उघड केला.
दरेकर यांनी सांगितले की, महाविकास आघाडीचा एक वर्षाचा कालावधीचा कारभार पूर्णपणे निष्क्रिय होता. कारण गेल्या ५ वर्षांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याने विकास पाहिला. मग शेतकऱ्यांच्या संबंधित असेल, वेगवेगळे मोठे प्रकल्प असतील, समाजातील विविध घटकांना आणि महाराष्ट्राला विकास करण्याचं काम देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली झाले आणि त्याकामावर विश्वास ठेवून राज्यातील जनतेने खरा कौल शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी ला दिला होता. परंतु अनैसर्गिकरित्या काँग्रेस राष्ट्रवादी सोबत हात मिळवणी करत शिवसेनेचे महाविकास आघाडीचे सरकार आले. विभिन्न विचारधारेची लोक राज्यात सत्तेवर आली तरीही हे सरकार राज्याच्या जनतेला काहीतरी देतील अशी अपेक्षा होती, कारण या सरकारने निवडणुकीत मोठमोठी वचने दिली होती. पण त्या सर्व अपेक्षा या सरकारने फोल ठरविल्या असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.
शेतक-यांच्या बांधावर जाऊन सध्याचे मुख्यमंत्री व त्यावेळेचे शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी २५००० रुपये प्रति हेक्टर हे कोरडवाहू साठी तर ५०,००० रुपये प्रति हेक्टर बागायतीसाठी देण्याचे वचन त्यांनी दिले होते पण सत्तेवर आल्यावर त्या वचनाचा विसर त्यांना पडल्याची टिका करताना दरेकर म्हणाले की, विदर्भ मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झाली, पूर्णपणे शेती आणि शेतकरी उध्वस्त झालाय , हताश झाला. आज कपाशीचे पीक उध्दवस्त झाले. सोयाबीन सारखी पीकेही अतिवृष्टीमुळे पूर्णपणे उध्वस्त झाली. त्यावेळी सरकारने काही मदत केली नाही. पण भाजपाने याप्रकरणी आंदोलने केली तेव्हा सरकारने १० हजार कोटीचे पॅकेज जाहीर केलं त्यामधून फक्त २ हजार कोटी रुपये दिल्याचे सरकारचे म्हणणे आहे. परंतु शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये एक रुपयाही जमा झालेला नाही असेही दरेकर यांनी निर्दशनास आणून दिले.
कोकणामध्ये निसर्ग चक्रिवादळात कोकणाचे प्रचंड नुकसान झाले, त्यावेळी सरकारने १०० कोटी रायगडला , २५ कोटी सिंधुदुर्गला , २५ कोटी रत्नागिरीला या जिल्ह्यांसाठी जाहीर केले पण आजही ५० टक्के पेक्षा जास्त भागात तेथील शेतकरी व नुकसानग्रस्तांच्या अकाउंट मध्ये पैसे गेले नाहीत. येथील सर्व सरकारच्या मदतीची वाट पाहात आहेत असे सांगतानाच दरेकर यांनी म्हणाले की, कोरोना सारखं संकट हाताळण्यात हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले. आज देशभरात
अन्य राज्ये कोरोना नियंत्रित आणण्यात यशस्वी झाले परंतु महाविकास आघाडीचे सरकार कोरोनाच्या बाबतीत अजूनही चाचपडत आहे. केवळ केंद्रांकडे बोटं दाखवायची आणि आपले अपयश झाकायचे असा प्रकार महाराष्ट्रात सुरु आहे. कोरोनाच्या काळात प्रत्येक राज्याने आपआपली पॅकेजेस उभी केली आणि राज्यातील जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला पण महाराष्ट्रात या सरकारने काहीच केले नाही.
राज्यांमध्ये महिलांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत , महिला , तरुणीवर बलात्कार होतात आणि विनयभंगाचे प्रकार होत आहेत . हाथरसच्या नावाने बोंबा मारणा-यांना रोज महाराष्ट्रात हाथरस घडत आहे ते दिसत नाही का असा सवालही दरेकर यांनी उपस्थित केला.
मराठा आरक्षण या विषयावर जाणीवपूर्वक सरकारने दुर्लक्ष केले. मोठ्या प्रमाणात आंदोलने झाली. राज्य सरकारने या विषयात निष्कळजीपण दाखविला आहे. सुप्रीम कोर्टात सरकारचा वकील अनुपस्थित असणे, हजर राहिल्यास कागदपत्रे नाहीत अश्या पद्धतीने सरकारचा निष्काळजीपणा दिसून येतो. मराठा आरक्षणाच्या मार्फत ज्या अन्य योजना सुरु होत्या त्या सुरु ठेवण्याची व मराठा समाजाला ताकद देण्याची आमची मागणी होती. परंतु मराठा समाजाच्या आरक्षणासाठी प्रयत्न केले नाही. ओबीसी समाजाला झुंजवत ठेऊन समाजा समाजामध्ये वाद वाढवण्याच्या प्रयत्न या सरकारचा सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मराठवाडा वॉटर ग्रीडच्या उपक्रमातून मराठवाड्यात पाण्याची व्यवस्था होणार होती. देवेंद्रजी फडणवीस यांनी हा प्रकल्प मंजूर केला होता. पण आमच्या सरकारने ज्या प्रकल्पाला मान्यता दिली तो प्रकल्प गुंडाळण्याचे काम या सरकारने केले. वैनगंगा हा जो १६३ टीएमसी पाणी उचलून विदर्भ आणि मराठवाडा ला जोडणारा एक उत्तम प्रकल्प होता त्यालाही बासनात गुंडाळण्याचं काम या सरकरने केलं. अशा प्रकारे आम्ही सुरु केलेल्या प्रत्येक विकासकामाला स्थगिती देण्याचं काम या सरकार ने केल्याची टिकाही दरेकर यांनी केली.
जीएसटीच्या बाबतीतही सातत्याने आमचा जीएसटी बाकी अशी ओरड महाविकास आघाडी सरकार करीत आहे. काही मंत्री म्हणतात ३८ हजार कोटी शिल्लक आहेत, तर काही जण म्हणतात ६० हजार कोटी शिल्लक आहे. मग केंद्राकडून नेमके किती येणे बाकी आहे. यावर एकमत करा असा टोलाही त्यांनी मारला.

तुमच्या धमक्यांना अजिबात भिक घालीत नाही, काय करायचे ते करा- आ.चंद्रकांत पाटलांचे जाहीर चॅलेंज

0

पुणे : “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे “विरोधकांना बघून घेऊ’ही भाषा वापरत आहेत. ही आपली राजकीय संस्कृती नाही. त्यांच्या धमक्‍यांना आजिबात भीक घालत नाही, तुम्हाला काय करायचं ते करा,’ अशा शब्दात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला चॅलेंज दिले. राज्यात ऍक्‍शन-रिऍक्‍शनचा खेळ सुरू असून त्याबाबत सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र बसून आचारसंहिता ठरविण्याची गरज आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

तेरा महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर नको ती लोकं एकत्र आली. सर्वात जास्त आमदार निवडून येऊनही भाजप विरोधी पक्षात राहिली. त्या सरकारला आता एक वर्ष पूर्ण झाली. या एक वर्षात सामान्य माणूस पूर्णपणे भरडला गेला आहे. महिला अत्याचार, मराठा आरक्षण गोंधळ असा सर्व प्रकार या सरकारच्या काळात पहायला मिळाला.” अशी टिका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील महाविकास सरकारच्या कारभारवर केली. आघाडीच्या सरकाराची काल वर्षपुर्ती झाली.त्यानिमित्त आज पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते .यावेळी खासदार गिरीष बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते धीरज घाटे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, शहराध्यक्ष जगदिश मुळीक आदी उपस्थित होते.पाटील म्हणाले,” चंपा काय, टरबुज्या काय ही काय भाषा आहे.ही आपली राजकीय संस्कृतीच नाही. आम्ही उद्धव ठाकरेंना ‘उठा’, अजित पवारांना ‘अपा’ शरद पवारांना “शपा’ आणि जयंत पाटील यांना “जपा’ म्हटले तर चालेल. ऍक्‍शन रिक्‍शनच्या खेळात सर्वसामान्य जनता भरडली जात आहे.”

हे अनैसर्गिक, अकृत्रिम सरकार स्थापन झाल आहे. परंतु मी स्वत: किंवा देवेंद्र फडणवीस यांनी कधीही हे सरकार येत्या तीन महिन्यात पडेल असा दावा केलेला नाही. ऊलट गेली वर्षभर खुर्चीसाठी धडपडणारे, अपमान गिळून खुर्चीला चिकटणारे सरकार बनले. गेले वर्षभर सत्ता टिकविण्याची धडपड करण्यातचं गेले. सरकार पडण्यापेक्षा त्यांनी सरकार टिकवून चालवून दाखवावं, आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करत राहू, असे ही ते म्हणाले. कोरोनाच्या काळात मोठ्या प्रमाणावर भष्ट्राचार झाला असून अधिवेशनात या भष्ट्राचाराचे वागाडे काढले जातील, म्हणून सरकारमध्ये अधिवेशनाला सामोरे जाण्याची हिंमत नाही, हे पूर्णपणे अपयशवी सरकार आहे, असेही ते एका प्रश्‍नाला उत्तर देताना म्हणाले..

कोरोना रोखण्यात महाविकास आघाडी सरकार अपयश

जगातले पाच देश सोडले तर सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात आहे. अशी गंभीर परिस्थिती कोरोनाच्या काळात महाराष्ट्रात होती. या काळात आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली होती.” अशी माहिती यावेळी बोलताना दिली”कोरोनाच्या काळात सरकार अपयशी ठरले आहे”असे सांगत पाटील म्हणाले, टटया सरकारच्या काळात सर्वाधिक नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे. अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाई मिळाली नाही. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही. अनेक शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले नाही. शिक्षण क्षेत्राचा बट्ट्याबोळ झाला आहे. कोणी म्हणत आज शाळा सुरू होईल, कोणी म्हणत होणार नाही. तोच गोंधळ आता दहावीच्या परिक्षेवरून सुरू आहे. शिक्षण क्षेत्राची अवस्था वाईट झाली आहे.”

संजय राऊत हे खूप मोठे व्यक्तिमत्त्व
यावेळी संजय राऊत यांच्याबद्द्ल विचारले असता ते म्हणाले, संजय राऊत खूप मोठे व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्याबद्दल मी अलीकडे बोलणे बंद केले आहे. ”सरकार येतील आणि जातील पण, महाराष्ट्र संतांनी सामाजिक एकतेची जी विन विणली होती त्याला धक्का लावण्याचे काम मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू आहे”, असेही ते म्हणाले.

सरकारने मराठा आरक्षणाचे मातेरे केले
महाविकास आघाडीसरकारने मराठा आरक्षणाचे मातेरे करून टाकले. देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय कष्टाने आरक्षण मिळवून दिले होते, पण या सरकारला हे आरक्षण टिकवता आली नाही. शिक्षणातील आरक्षण यांनी आता रद्द केले. सरकार येतील आणि जातील पण, महाराष्ट्र संतांनी सामाजिक एकतेची जी विन विणली होती त्याला धक्का लावण्याचे काम मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू आहे.

पुणे विभागातील ॲक्टीव रुग्ण संख्या 15 हजार 432,कालच्या तुलनेत रुग्ण संख्या 1 हजार 460 ने वाढली .

0

पुणे विभागातील 5 लाख 3 हजार 386 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

विभागात कोरोना बाधित 5 लाख 33 हजार 782 रुग्ण

विभागीय आयुक्त सौरभ राव

       पुणे,दि.29 :- पुणे विभागातील 5 लाख 3 हजार 386 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 33 हजार 782 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 15  हजार 432 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 14 हजार 964 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.80 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.31 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा

            पुणे जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 3 लाख 41 हजार 540 रुग्णांपैकी 3  लाख 21 हजार 855 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 11  हजार 397 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 288  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण  2.43 टक्के इतके आहे तर बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण  94.24 टक्के आहे.

सातारा जिल्हा

              सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 50 हजार 924 रुग्णांपैकी 48 हजार 292 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  922 आहे. कोरोनाबाधित एकूण 1  हजार 710 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा

              सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 45 हजार 572 रुग्णांपैकी 41 हजार 766 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2  हजार 212 आहे. कोरोनाबाधित एकूण 1  हजार 594  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

  सांगली जिल्हा

               सांगली  जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 46  हजार 725 रुग्णांपैकी 44 हजार 562 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 467 आहे.  कोरोनाबाधित एकूण 1  हजार 696 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कोल्हापूर जिल्हा

            कोल्हापूर जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 49 हजार 21 रुग्णांपैकी 46  हजार 911 रुग्ण  बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  434 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार  676  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 1 हजार 460  ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 80 , सातारा जिल्ह्यात 169, सोलापूर जिल्ह्यात 171, सांगली जिल्ह्यात 21 तर कोल्हापूर जिल्ह्यात 19 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणाया रुग्णांचे प्रमाण – 

पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 1 हजार 164 आहे. पुणे जिल्हयामध्ये 763, सातारा जिल्हयामध्ये 120, सोलापूर जिल्हयामध्ये 211, सांगली जिल्हयामध्ये 35 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 35 रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण

आजपर्यत विभागामध्ये एकुण 28 लाख 38 हजार 538 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी  5 लाख  33 हजार 782  नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि.  28 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

मराठा आरक्षण – तुम्हाला करता येत नसेल तर … फडणवीसांकडे सत्ता द्या : उदयनराजे भोसले

0

भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका मांडत ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. मराठा आरक्षणाचा प्रश्न तुम्हाला सोडवता येत नसेल तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सत्ता द्या, मी जबाबदारी घेतो,’ अशा शब्दात उदयनराजे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीकास्र डागले .

फडणवीसांनी करून दाखवले आता तुम्ही करून दाखवा

देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या काळात करुन दाखवले होते, पण आज त्यांना नावे ठेवली जातात. आज तुम्ही सत्तेत आहात तर करुन दाखवा,’ असे थेट आव्हानच उदयनराजे यांनी राज्य सरकारला दिले.

मराठा समाजावर ज्यांनी अन्याय केला तेच आता सत्तेत बसले आहेत,

शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे, सर्वधर्मसमभावाचा विचार सांगायचा आणि एखाद्या समाजाला दाबण्याचे कामच आजपर्यंत झाले अशी टीकाही उदयनराजे यांनी सरकारवर केली आहे. राजकारणापोटी मराठा समाजाची अनेक प्रश्न प्रलंबित ठेवली आहेत. फक्त राजकारणासाठी मराठा आरक्षणाचा वापर केला जात आहे. मराठा समाजावर ज्यांनी अन्याय केला तेच आता सत्तेत बसले आहेत, अशी घणाघाती टीका उदयनराजे यांनी ठाकरे सरकारवर केली. मंडल आयोगाच्या वेळी मराठा समाजाला आरक्षण का नाही दिले? असा सवाल देखील उदयनराजे यांनी विचारला आहे.

इतर समाजाच्या लोकांनी गैरसमज करुन घेऊ नये

जे बोलतो ते स्पष्ट बोलतो. इतर समाजावर अन्याय झाला तरी त्यांचीही बाजू मांडत आलेलो आहे. इतर समाजाच्या लोकांनी गैरसमज करुन घेऊ नये. त्यांच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. मात्र, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणी उदयनराजे यांनी केली आहे.

मराठा समाजाने काय पाप केले आहे?

लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषदेत जेवढे मराठा आणि अन्य समाजाचे खासदार-आमदार आहेत, त्या सर्वांची मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची नैतिक जबाबदारी असल्याचं आवाहनही उदयनराजे यांनी केले आहे. सर्वाना न्याय मग आमच्यावर अन्याय का? मराठा समाजाने काय पाप केले आहे? असे सवाल करत आणखी किती दिवस वाट पाहणार? असेही उदयनराजे यांनी म्हणले आहे. जातीमध्ये तेढ निर्माण केल्याचा आरोप देखील यावेळी त्यांनी केला.

खासदार उदयनराजे यांनी पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे

> जातीचे राजकारण करणाऱ्यांनी राजीनामे द्यावे.

> मराठा समाजाला किरकोळीत घेऊ नका, उदयनराजेंचा इशारा

> मराठा समाजाला आरक्षण का मिळाले नाही याचा त्या-त्या वेळच्या सत्तेतील नेत्यांना प्रश्न विचारा.

> इतर समाजातील नागरिकांनी गैर समज करून घेऊ नये. मात्र मराठा समाजावर अन्याय होतोय तो दूर व्हावा.

> इतर कोणत्या ही समाजाचे आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या.

> मराठा समाजाला आरक्षण न देणाऱ्या सर्वांना माझा सवाल आहे

> आंदोलने करणाऱ्या आंदोलकांवर दबाव आणला जातो आणि त्यांना तुरुंगात टाकले जाते.

> मराठा समाजाचा केवळ मतासाठीच वापर केला गेला.

> स्वतःचे बघा मग देवेंद्र फडणवीसांवर आरोप करा

> फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्री बनवा, ते आरक्षण देतील याची मी जबाबदारी घेतो

शेतकऱ्यांना न्याय आणि महिलांना शिक्षण या दोन्ही गोष्टी अजूनही अपुऱ्या -आ.चंद्रकांतदादा पाटील

0

पुणे- काल महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या दोन्ही महान व्यक्तिमत्वांनी जे मिशन सुरू केलं होतं, ते अद्यापही पूर्ण झालेलं नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. मात्र ते मिशन आगामी काळात आपण पूर्ण करू, अशी हमी त्यांनी दिली. महात्मा फुले यांनी दाखवलेली दिशा पूर्ण करण्याचा आपण संकल्प करू, हिच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

महात्मा फुले हे सदैव शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि महिलांना शिक्षण देण्यासाठी झटले. मात्र स्वातंत्र्यानंतरही या दोन्ही विषयांबाबत आजही चांगली स्थिती नाही. त्यामुळे हे दोन्ही मिशन पूर्ण करण्याचा संकल्प भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी करावा, असे त्यांनी आवाहन केले. शेतकरी सुखी झाल्याशिवाय देश सुखी होणार नाही, हे महात्मा फुले यांचे धोरण होते आणि हेच धोरण कायम ठेवून आम्ही कार्य करू, असे चंद्रकांत पाटील यांनी नमूद केले.

यावेळी आमदार मुक्तताई टिळक, माधुरी ताई मिसाळ, ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, पुणे शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे, पुणे प्रभारी गणेश बिडकर, भाजपा पुणे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर यांच्या सह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात महाराष्ट्राचा कोब्रा अधिकारी शहीद ;९ जवान जखमी

0

शनिवारी रात्रीच्या सुमारास झाला स्फोट

सेंकड इन कमांड दिनेश सिंह यांच्यासह 9 जवान जखमी झाले. यापैकी 7 जणांना उपचारासाठी रायपुरच्या रामकृष्ण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 4 जवानांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. तर 2 जवानांवर सुकमा येथील कँपमध्ये उपचार सुरू आहेत. चिंतागुफा परिसरात ही घटना घडली.घटनेनंतर सर्व जखमींना चिंतलनार येथील रुग्णालयात दाखल केले. रात्री उशिरा त्यांना रायपुरला हलवण्यात आले. यानंतर उपचारादरम्यान नितीन भालेराव यांची प्राणज्योत मालवली. नितीश महाराष्ट्रच्या नाशिक जिल्ह्यातील रहिवासी होते.

चिंतलनार, बुरकापाल आणि चिंतागुफा कँपपासून COBRA, STF आणि DRGचे जवान अँटी नक्षल मोहिमेसाठी चिंतागुफा येथे पोहोचले होते. रात्री सुमारे 8.30 वाजता अरबराज मेट्टा डोंगराजवळ IEDचा स्फोट झाला. या स्फोटात COBRA 206 व्या बटालियनचे सेकंट इन कमांड दिनेश सिंह आणि सहायक कमांडंट नितीश भालेराव यांच्यासह 10 जवान जखमी झाले.

प्रत्युत्तरात नक्षलवादी पळून गेले

नक्षलवाद्यांनी IED स्फोटसह लपून बसले होते. IEDच्या स्फोटानंतर त्यांनी गोळीबारही केला. यानंतर जवानांनी प्रत्युत्तर दिले. काही वेळ चकमक झाल्यानंतर नक्षलवाद्यांनी तेथून पळ काढला. जवानांनी घटनास्थळाची पाहणी केली. जखमी साथीदारांना घेऊन कँपकडे परतले.

10 हजार कमांडाेंमधून केवळ एक घडताे वज्रासम मार्काेस

0

विना ऑक्सीजन समुद्र तळाशी 15 मिनिटे लढाई करण्याची क्षमता

भारतीय नाैदलाने पूर्व लडाखमध्ये पँगाँग तलावाच्या परिसरात सर्वात खतरनाक मार्काेस कमांडाे तैनात केले आहेत.

क्षेत्रीय तणाव निवळावा यासाठी चीनसाेबत भारत चर्चाही करत आहे. परंतु चीनची चालबाजी लक्षात घेऊन ताकद वाढवली जात आहे. मार्काेस जगातील सर्वात खतरनाक कमांडाे मानले जातात. दहा हजार सैनिकांतून केवळ एकाला मार्काेस बनण्याची संधी मिळते. यावरून त्यांच्या क्षमतेचा अंदाज येऊ शकताे. अमेरिकी सैन्यात नेव्ही सील आहे. त्याचप्रमाणे भारताचे मार्काेस आहेत. दहशतवाद्यांपासून समुद्रातील विविध माेहिमांना फत्ते करण्यात सक्षम ठरतात. ते विनाआॅक्सिजनचे समुद्रात ५५ मीटर खाली किमान १५ मिनिटे लढू शकतात. मार्काेसला दाढीवाले सैन्य असेही संबाेधले जाते. चाकूपासून स्नायपर, रायफल चालवण्याचे प्रशिक्षण असते. ८ किमी उंचीवरून उडी मारणे, १० ते १५ सेकंदात पॅराशूट सुरू करू शकतात.

26/11 हल्ल्यावेळी दाखवली खरी ताकद

मार्काेस नावाच्या मरीन कमांडाे फाेर्सची स्थापना १९८७ मध्ये झाली. सागरी शत्रूंना घुसखाेरीपासून राेखणे आणि दहशतवाद्यांचा बीमाेड करण्यासाठी मरीन कमांडाे मार्काेस असतात. ते जगभरातील विशेष दलासाेबत अनेक संयुक्त सराव करतात. २०११ मध्ये पाकिस्तानच्या अबाेटाबादमध्ये लादेनचा खात्मा करणाऱ्या माेहिमेत यूएस नेव्ही सील्स सहभागी हाेती. २६/११ च्या हल्ल्यानंतर मार्काेसने ऑपरेशन ब्लॅक टाॅर्नेडाे राबवून दहशतवाद्यांचा खात्मा केला हाेता. त्यांचे बहुतांश प्रशिक्षण आयएनएस अभिमन्यू येथे हाेते. सागरी माेहिमांत ते तरबेज असतात.

हातपाय बांधले तरी पाेहू शकतात

मार्काेससाठी विशेष सैनिकांची निवड केली जाते. त्यात बहुतेक २० वर्षीय सैनिक असतात. मार्काेससाठी निवड झाली तरी अडीच ते तीन वर्षांच्या कठाेर प्रशिक्षणाच्या कसाेटीला पार करावे लागते. या कठीण प्रशिक्षणामध्ये डेथ क्राॅल नावाचाही एक भाग असताे. त्यात सैनिकांना मांड्यांपर्यंत असलेल्या चिखलातून वेगाने पळायचे असते. पाठीवर २५ किलाे वजन व शस्त्रे असतात. त्याशिवाय ते हातपाय बांधले तरी पाेहू शकतात.

९० टक्के प्रशिक्षण पूर्ण करत नाहीत

प्राथमिक प्रशिक्षण सहा महिन्यांचे असते. पहिल्या दाेन महिन्यांत याेग्य कमांडाेजची निवड हाेते. त्यानंतर एक महिना कठाेर शारीरिक चाचणी हाेते. त्यानंतर ९ महिने विविध प्रकारची शस्त्रे चालवणे, विशेष युद्धकुशलता, जगभरातील गाेपनीय माहिती गाेळा करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्यात युद्ध, दहशतवाद्यांशी चकमक, ओलिसांची सुटका इत्यादी. हे प्रशिक्षण ९० टक्के पूर्ण करू शकत नाहीत.

लिट्टेविराेधी माेहीमही मार्काेसमुळे फत्ते

ऑपरेशन पवन श्रीलंका : १९८७ मध्ये लिटेच्या विराेधातील माेहिमेदरम्यान मार्काेसने भारतीय शांती सेनेच्या रूपात श्रीलंकेला मदत केली हाेती. त्यांच्या मदतीने श्रीलंकेच्या सैन्याने जाफना, त्रिनकाेमाली बेटावर ताबा मिळवला हाेता. यादरम्यान मार्काेसने १२ किमी पाेहून टार्गेट उद्ध्वस्त केले हाेते. यादरम्यान जाेरदार गाेळीबार झाला आणि बाॅम्बस्फाेटही झाले हाेते. परंतु मार्काेस माेहिमेत यशस्वी झाले हाेते.

ऑपरेशन कॅक्टस, मालदीव : १९८८ मध्ये मार्काेसने राष्ट्रपती माैमून अब्दुल गय्युम सरकारच्या तख्तपालटाचे षड‌्यंत्र उलथवून टाकले हाेते. दाेन्ही देशांतील करारानुसार ही कारवाई झाली हाेती. त्याशिवाय श्रीलंकेतील अपहरण प्रकरणात प्रवाशांची दाेन दिवसांत सुटका करण्यात आली हाेती. या दरम्यान ४७ अपहरणकर्त्यांना शरण यावे लागले हाेते.

फेसबुकवर पाक महिला हेराशी संपर्क; अहमदनगरचा रहिवासी आहे आरोपी जवान

0

अमृतसर-पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या बीएसएफ जवानाला स्टेट ऑपरेशन सेलने शनिवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची कोठडी सुनावली. त्याला आता ३० नोव्हेंबरला न्यायालयात पुन्हा हजर केले जाईल.

महाराष्ट्रातील अहमदनगरमधील सासेवाडी गावाचा प्रकाश काळे हा ऑगस्ट २०१९ मध्ये येथे तैनात झाला होता. तो पाकमधील महिलेच्या संपर्कात होता. ती महिला पाकिस्तानच्या इंटेलिजन्स ऑपरेटरची हेर होती. ती संस्था इतर गुप्तचर संस्थांना माहिती पुरवते. सध्या बीएसएफ जवानाची चौकशी सुरू असून त्याच्याकडून अनेक गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे.

गस्तीबाबतची माहिती ग्रुपवर टाकली जायची

बीएसएफ जवान प्रकाश काळे फेसबुकच्या माध्यमातून महिलेच्या संपर्कात आला होता. ऑगस्ट २०२०पासूच महिलेला त्याने बीएसएफच्या हालचालींची माहिती देणे सुरू केले. त्याने बीएसएफ जवानांचा एक ग्रुपही बनवला होता. तो स्वत: त्याचा अॅडमिन होता. जवानांची ड्यूटी किंवा गस्तीबाबत जी माहिती ग्रुपवर टाकली जायची ती महिलेपर्यंत आपोआप जायची. महिला भारतीय सिमचा वापर करत होती आणि ती त्याच ग्रुपमध्ये सामीलही होती. या संस्थेचा मुख्य हेतू बीएसएफच्या प्रत्येक हालचालीची माहिती घेणे हा होता.

जवानाविरोधात घरिंडा पोलिस ठाण्यात दाखल होता गुन्हा

पाकच्या संस्थेला माहिती पाठवणाऱ्या बीएसएफ जवानाला शुक्रवारीच पकडण्यात आले होते. त्याविरोधात घरिंडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. नंतर स्टेट स्पेशल ऑपरेशन सेलने त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली जात असून अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे.

स्वास्थ आणि सौंदर्य जपण्याचा महाराष्ट्राच्या सौभाग्यवतींनी केला ‘संकल्प’

0
मेधा जोशी या महाराष्ट्राच्या सौभाग्यवतीच्या विजेत्या ; अनामिका ओव्हाळ द्वितीय तर गौरी पांडे तृतिय क्रमांक विजेत्या.

पुणे: आपले आरोग्य ही फक्त आपली संपत्तीच नसुन आरोग्यातच सौंदर्य ही दडलेले आहे ! म्हणुनच आपल्या स्वास्थ्यावर लक्ष देण्याची गरज आहे. कोरोनाच्या या संकटात “स्वास्थ्य” किती महत्त्वाचे आहे याची जाणीव प्रत्येक कुटुंबाला झालेली आहे. स्वास्थ आणि सौंदर्य जपण्याचा महाराष्ट्राच्या सौभाग्यवतींनी ‘संकल्प’ केला आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गृहिणीला तिची आवड जोपासण्यासाठी हक्काचं व्यासपीठ मिळावं, तसेच लॉकडाउन काळात पडद्यामागील अनेक तंत्रज्ञ आणि कलाकार यांच्या जगण्याला नवीन उमेद देण्यासाठी “महाराष्ट्राची सौभाग्यवती” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पुण्याच्या मेधा जोशी प्रथम आल्या तर अनामिका ओव्हाळ द्वितीय आणि गौरी पांडे तृतिय क्रमांकाच्या विजेत्या झाल्या.

‘संकल्प’ मानवसंसाधन विकास संस्था प्रायोजित सह कुसमवत्सल्य फांउडेशनतर्फे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत संपुर्ण महाराष्ट्रातील महिलांनी सहभाग घेतला होता. सुमारे २८ महिलांनी अंतिम फेरी पर्यंत धडक मारली. स्पर्धेची अंतिम फेरी महाबळेश्वर येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी महिला सक्षमीकरणासाठी अव्याहतपणे कार्यरत असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या भारती चंगेडिया कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या होत्या, ‘संकल्प’ मानवसंसाधन विकास संस्थेच्या संचालिका डॉ. अपूर्वा अहिरराव, संशोधन आणि विकास प्रमुख शर्वरी डोंबे, कुसमवत्सल्य फांउडेशनच्या वैशाली पाटील, सहारा प्रोडक्शनचे डॉ. राजेंद्र भवाळकर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या भारती चंगेडिया म्हणाल्या कि, डॉ. पी. एन. कदम यांच्या 30 वर्षांच्या सखोल संशोधन आणि प्रयोगाद्वारे “आहार आणि आरोग्य” या क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविणाऱ्या ‘संकल्प™’ने लॉकडाऊनच्या 3 महिन्यात आपल्या संशोधनाचा वापर करुन “आरोग्य आणि आहार” क्षेत्रात मोलाची कामगिरी केली आहे. लॉकडाउन दरम्यान प्रत्येक घरातील स्त्रीला मोठ्या प्रमाणात जबाबदारी पार पाडावी लागली. या सर्व जबाबदारीतून थोडा विरंगुळा मिळण्याबरोबर स्वत:चे स्वास्थ आणि सौंदर्य जोपासण्याची गोडी लागली पाहिजे. या उद्देशाने संकल्पतर्फे नैसर्गिक संसाधनांचा वापर करुन स्त्रियांच्या स्वास्थ आणि सौंदर्य अबाधीत ठेवण्यासाठी तज्ञ डॉक्टर्सकडून रिसर्च करुन याबाबतील सौंदर्य प्रसाधने उपलब्ध केली आहेत. विशेषत: महिलावर्गाला कमीत कमी गुंतवणुकीत जास्तीत जास्त लाभ मिळवून देणारी आणि ज्यांची ज्ञान घेण्याची, कष्ट करण्याची तयारी आहे अशा प्रत्येकासाठी संकल्पने एक सक्षम योजना तयार केली आहे. त्यामुळे गृहिणींना आपल्या स्थास्थ, सौंदर्यांबरोबरच व्यवसायकरुन एक परिपुर्ण आत्मनिर्भर स्त्री बनण्याची संधी ‘संकल्प’च्या वतीने देण्यात आली आहे.

 ‘संकल्प’च्या सौंदर्य प्रसाधनांचे अनावरण

स्त्रियांचे स्वास्थ आणि सौंदर्य अबाधित राहण्याकरिता ‘संकल्प’तर्फे तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली नैसर्गिक घटकांचा वापर करून सौंदर्य प्रसाधने तयार करण्यात आली आहे. रसायन विरहीत, त्वचेसाठी आवश्यक अशा सर्व नैसर्गिक घटकांचा वापर या प्रसाधनांमध्ये करण्यात आला आहे. यामध्ये फेशिअल किट, फेस वॉश, शॅम्पू, ग्लिसरिन सोप, मॉइश्यूचरायझर, ऑल पर्पज क्रिम यांचा समावेश आहे. याच प्रसाधनांचे अनावरण यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.