Home Blog Page 2371

“भाजप सोडून परत या, तुम्हाला पुन्हा निवडून आणू”; अजित पवारांनी केलं आवाहन

0

मुंबई-=
काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘घरवापसी’ची साद घातली आहे. “पूर्वाश्रमीचे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील जे सहकारी आहेत त्यांच्या मनात आता वेगळी भावना आहे. त्यामुळे आता जे कुणी भाजपचा राजीनामा देऊन महाविकास आघाडीत येतील त्यांच्या विरोधात भाजप तगडा उमेदवार देईलच. पण आम्ही तिनही पक्ष मिळून त्यांना निवडून आणू”, असं गणित मांडून अजित पवार यांनी भाजपच्या आमदारांना गळ घालण्याचा प्रयत्न केला आहे.

हातकणंगले मतदार संघातील जनसुराज्य पक्षाचे नेते, माजी आमदार राजीव आवळे यांना आज उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

“ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, जयसिंगराव गायकवाड आणि आता राजीव आवळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जे कुणी राजीनामा देऊन महाविकास आघाडीत प्रवेश करतील त्यांच्याविरोधात भाजप सहाजिकच उमेदवार देईल. पण आम्ही तीनही पक्ष आपल्या उमेदवाराला निवडून आणण्याचा प्रयत्न करु”, असं अजित पवार म्हणाले. आघाडीचे सरकार येणार नाही, असे समजूनही अनेक जण तिकडे गेले. पण आता त्यांनाही आघाडी सोडून का गेलो? असं वाटायला लागलंय, अशी सद्यस्थिती असल्याचंही पवार म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ‘मोठी भरती’
“विविध पक्ष, प्रांत आणि समाजातील नेते राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. विरोधकांनी निवडणुकीवेळी अनेक आश्वासनं आणि प्रलोभनं देऊन त्यांना पक्षात घेतलं होतं. पण आता येत्या काळात अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील”, असं अजित पवार म्हणाले.

खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धांसाठी राज्य संघांची निवड चाचणी व प्रशिक्षण शिबीर 24 जानेवारी पासून

0

पुणे: लवकरच आगामी होणाऱ्या दुसऱ्या खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा आणि वरिष्ठ व कुमार गटासाठीच्या स्की अँड स्नोबोर्ड अजिंक्यपद स्पर्धा यासाठी निवड चाचणी व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन स्की अँड स्नोबोर्ड संघटना(महाराष्ट्र) यांच्या वतीने 24 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2021 या कालावधीत करण्यात येणार आहे. तसेच, यासाठीची पात्रता स्पर्धा व पहिली राज्य स्तरीय अजिंक्यपद स्पर्धा 1 फेब्रुवारी 2021 पासून आयोजित करण्यात आली आहे. 
स्की अँड स्नोबोर्ड संघटनेचे अध्यक्ष आनंद लाहोटी आणि सचिव साबीर शेख यांनी सांगितले की, वरिष्ठ गटाच्या स्पर्धेसाठी अल्पाइन स्लॅलोम व जायंट स्लॅलोम(पुरुष व महिला), स्नोबोर्डिंग स्लॅलोम व जायंट स्लॅलोम(पुरुष व महिला), क्रॉसकंट्री पुरुष 15किमी व महिला 10 किमी, स्प्रिंट 1.5किमी(पुरुष व महिला) या गटांचा तर, कुमार गटाच्या स्पर्धेसाठी अल्पाइन स्लॅलोम व जायंट स्लॅलोम(14,16,18 आणि 21वर्षांखालील मुले व मुली), स्नोबोर्डिंग स्लॅलोम व जायंट स्लॅलोम (18, 21वर्षांखालील मुले व मुली) या गटांचा समावेश आहे., वरीष्ठ गटात प्रत्येक संघात 5 पुरुष  5 महिलाचा समावेश , तर कुमार गटात 3 मुले व 3 मुलींचा समावेश असतो. 

या निवड चाचणी व स्पर्धेत भाग घेण्यासाठी खेळाडूंना नावनोंदणी करणे आवश्यक असून जम्मू काश्मीर मधील गुलमर्ग येथे होणाऱ्या या निवड चाचणी शिबिरासाठी नावनोंदणी व शुल्क भरण्याची अंतिम तारीख 28 डिसेंबर 2020 अशी आहे. नावनोंदणीसाठी 9822034902/9890949333 या क्रमांकावर अथवा skiandsnowboardmh@gmail.com या वेबसाईटवर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. 

विद्यार्थ्यांमध्ये ‘स्टार्टअप’ संस्कृती रुजण्याची गरज

0

संजय इनामदार यांचे मत; ‘एआयटी’मध्ये ‘नॅशनल इनोव्हेशन स्टार्टअप पॉलिसी’वर चर्चासत्र

पुणे : “विद्यार्थ्यांमधील नावीन्यतेला प्रोत्साहन देण्यासाठी शासकीय स्तरावर अनेक उपक्रम हाती घेतले जात असून, इनोव्हेशन-स्टार्टअप पॉलिसी बनवली आहे. विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, आवश्यक संसाधनांअभावी त्यांना पुरेशी संधी मिळत नाही. त्यामुळे महाविद्यालय स्तरावरच त्यांना आवश्यक त्या पायाभूत सुविधा आणि संसाधने उपलब्ध करून देण्याची गरज आहे. विद्यापीठात आणि महाविद्यालयानी विद्यार्थ्यांमध्ये इनोव्हेशन, आंत्रप्रेन्युअरशीप, ‘स्टार्टअप’ संस्कृती रुजविण्यासाठी पुढाकार घ्यावा,” असे मत भाऊ इन्स्टिट्यूटचे सहसंस्थापक आणि ‘नॅशनल इनोव्हेशन स्टार्टअप पॉलिसी’चे प्रमुख संजय इनामदार यांनी व्यक्त केले.
दिघी येथील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (एआयटी) इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिलतर्फे आयोजित ‘नॅशनल इनोव्हेशन स्टार्टअप पॉलिसी’वरील चर्चासत्रात संजय इनामदार बोलत होते. प्रसंगी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेलचे सहायक संचालक दीपन साहू, भाऊ इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय तळेले, आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालक ब्रिगेडियर (निवृत्त) अभय भट, प्राचार्य डॉ. बी. पी. पाटील, आयआयसी समन्वयक डॉ. सीमा तिवारी, विभागप्रमुख डॉ. संगीता जाधव आदी उपस्थित होते.
संजय इनामदार म्हणाले, ” संसाधने आणि दृष्टीकोन असे दोन आव्हाने आज आहेत. ग्रामीण भागात संसाधनांचा, तर शहरी भागात दृष्टीकोनाचे आव्हान आहे. चाकोरीबाहेर जाऊन काम करण्याचा दृष्टीकोन विकसित व्हायला हवा. भारताच्या विकासात माझे योगदान असावे, या भावनेतून विद्यार्थी आणि शिक्षकांनी काम केले पाहिजे. आज त्यापद्धतीने काम करणाऱ्या विद्यार्थ्यांची, शिक्षकांची संख्या वाढत आहे. ग्रामीण भागात इनोव्हेशन आणि आंत्रप्रेन्युअरशीप विकसित होत आहे. मुलांमध्ये कौशल्य विकसित होण्याला, नवकल्पनांना प्रोत्साहन देत आहोत. बौद्धिक संपदा, स्वामित्व हक्क, रेव्हेन्यू मॉडेल यावरही काम सुरु आहे.”
दीपन साहू म्हणाले, “इनोव्हेशन, आंत्रप्रेन्युअरशीप विकसित होण्याला चालना देण्यासाठी कौन्सिल प्रयत्न करत आहे. नव्या भारताचे, तसेच फाईव्ह ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न गाठायचे असेल, तर आपल्याला स्टार्टअप, इनोव्हेशन आणि रोजगारनिर्मितीवर भर देण्याची गरज आहे. तसेच बौद्धिक संपदा, पेटंटचे नोंदणी करण्याला प्राधान्य दिले पाहिजे. हे धोरण प्रभावीपणे राबवले गेले तर येत्या काळात आपण इस्राईल, अमेरिका सारख्या देशांची बरोबरी करू शकतॊ. त्यासाठी बजेटमध्ये इनोव्हेशनसाठी किमान १ टक्के तरतूद केली पाहिजे.” 
ब्रिगेडियर अभय भट म्हणाले, “आर्मी इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थ्यांना इनोव्हेशन, संशोधन करण्यासाठी सतत प्रेरित केले जाते. आज अनेक विद्यार्थी उपयोजित संशोधन करताहेत. स्वतःचे स्टार्टअप सुरु करताहेत. स्मार्ट हाकेथॉनसारख्या स्पर्धांमध्ये आर्मी इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. यापुढेही संस्थेत विद्यार्थ्यांना, प्राध्यापकांना संशोधन, इनोव्हेशन आणि आंत्रप्रेन्युअरशीपसाठी आम्ही प्रोत्साहन देणार आहोत.”
डॉ. संगीता जाधव यांनी सूत्रसंचालन केले. अभय भट यांनी आभार मानले.

पुण्यातील सराफ व्यवसायिकाची दुकानातच छातीत गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न

0

पुणे -पुण्यातील सराफ व्यवसायिक मराठे ज्वेलर्सचे मालक मिलिंद उर्फ बळवंत (वय 60) यांनी छातीत गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.आर्थिक अडचण आणि नुकसान या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती असल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिक तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत.

\पोलिसांनी याप्रकरणी सांगितले कि, , मिलिंद मराठे हे प्रसिद्ध सराफ व्यवसायिक आहेत. लक्ष्मी रस्त्यावर त्यांचे मराठे ज्वेलर्सचे दुकान आहे. दरम्यान त्यांनी आज साडे सात वाजण्याच्या सुमारास दुकानातच पिस्तुलमधून छातीत गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दुकानातील कामगारांनी त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस देखील रुग्णालयात रात्री उशिरापर्यंत होते.

संजय गांधी, श्रावण बाळ योजनेतील लाभार्थींना उत्पन्नाचा दाखला सादर करण्यास सूट – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

0

मुंबई, दि. 16 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थींना दरवर्षी उत्पन्नाचा दाखला सादर करण्याची आवश्यकता असते, परंतु कोविड-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेत मार्च 2021 पर्यंत उत्पन्नाचा दाखला संबंधित तहसील कार्यालयात दाखल करण्यास सूट देण्याचा निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी घोषित केला आहे.

या निर्णयाबाबतचे शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. संजय गांधी निराधार, श्रावण बाळ सेवानिवृत्ती वेतन यांसारख्या अनेक योजना विशेष सहाय्य विभागांतर्गत राबविण्यात येतात. या प्रकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थींना प्रत्येक वर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत आपल्या वार्षिक उत्पन्नाचा दाखला संबंधित तहसील कार्यालयात सादर करण्याचा नियम आहे.

या योजनांचा लाभ घेणाऱ्यांमध्ये एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक, रोगग्रस्त, वयोवृद्ध व्यक्तींना कोविड-19 चा धोका अधिक आहे, याचा विचार करून श्री.मुंडे यांच्या निर्देशानुसार विशेष सहाय्य विभागाने विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना सन 2019-20 या आर्थिक वर्षातील उत्पन्नाचा दाखला मार्च – 2021 पर्यंत तहसील कार्यालयात सादर करण्यास सूट देणारे परिपत्रक जारी केले आहे.

आता ७०० रुपयांत होणार कोरोना चाचणी

0

मुंबई : कोरोना चाचण्यांच्या दरामध्ये राज्य शासनाने सहाव्यांदा कपात करत 980 रुपयांऐवजी 700 रु. हा दर निश्चित केल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेत केली.

विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना आरोग्यमंत्री श्री.टोपे बोलत होते. श्री.टोपे म्हणाले, राज्यात कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला नसला तरी नवीन रुग्णांची संख्या कमी होत आहे, ही दिलासादायक बाब आहे. मात्र, अजूनही नागरिकांनी खबरदारी बाळगणे आवश्यक आहे. राज्याचा रुग्णवाढीचा दर हा 0.21 इतका असून. केंद्र शासनाच्या पोर्टलवर रुग्णवाढीचा दर जास्त असलेल्या 14 राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश नसल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यात कोरोना चाचण्यांचे दर सातत्याने कमी केले जात असून केंद्र शासनाने निश्चित केलेल्या 4500 रुपयांवरुन आता 700 रुपयांमध्ये खासगी प्रयोगशाळेत कोरोना चाचण्या होणार आहेत. राज्य शासनाने कोरोना उपाययोजनांसंदर्भात निर्णय घेताना सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून निर्णय घेतले. चाचण्यांचे दर कमी करतानाच खासगी रुग्णालयातील 80 टक्के खाटा राखीव ठेवल्या. ‘एचआरसीटी’ चाचण्यांचे दर निश्चित केले. प्लाझ्मा बॅगचे दरदेखील निश्चित करण्यात आले. मास्कच्या किमतीवरही नियंत्रण आणले गेले. या सर्व उपाययोजना करतानाच नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाययोजनांकरिता ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ सारख्या मोहिमेद्वारे आरोग्य तपासणीसोबतच जाणीव जागृतीदेखील करण्यात आली.

राज्यात कोरोना काळात सर्व नागरिकांसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू केली. त्या माध्यमातून कोरोना रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले. राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात रुग्णांना मोफत रक्त देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आल्याचे आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी सांगितले.

राज्यात कोरोना लसीकरणाची तयारी सुरू असून केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे. मतदानाच्या प्रक्रियेप्रमाणे बूथ करुन लसीकरण करण्यात येणार आहे.

राज्यात आरोग्य विभागातील रिक्त पदांच्या भरतीला चालना मिळाली असून त्याची प्रक्रिया लवकरच सुरू होत असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

वैयक्तीक सदवर्तनाशिवाय परिवर्तन अशक्य – उल्हास पवार

0

पुणे – सध्या भाषणात क्रांती, परिवर्तन असे शब्द वापरल्याशिवाय कोणाचंही भाषणचे पूर्ण होत नाही. यातील परिवर्तन या शब्दात वर्तन जे सांगितले असून ते कोणीच लक्षात घेत नाही. भगवान महावीरांनीच सत्तावीसशे वर्षापूर्वीच वैयक्तीक आचारणाचे महत्व सांगून ठेवले आहे. त्यामुळे वैयक्तीक सदवर्तनाशिवाय व्यक्तीत किवा समाजात परिवर्तन होणे किंवा घडणे अशक्य आहे. वैयक्तीत सदवर्तनाची आज समाजाला खरी गरज आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत उल्हास पवार यांनी आज केले.

सोलापूर येथे पुढील वर्षी होणा-या २५ व्या अखिल भारतीय मराठी जैन साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सोलापूरचे ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक डॉ. रावसाहेब पाटील यांचा पुणेरी पगडी, स्मृतीचिन्हं शाल, व पुष्पगुच्छ देऊन सत्कार ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत उल्हास पवार यांच्याहस्ते महाराष्ट्र जैन सांस्कृतिक मंडळ टिळक रोड येथे करण्यात आला. या सत्कार सोहळ्याचे आयोजन जैन सहयोग आणि मराठी भाषा संवर्धन प्रतिष्ठानने केले होते. त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. मराठी साहित्य परिषदेच्यावतीने स्मृतीचिन्हं देऊन परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी डॉ. पाटील यांचा सत्कार केला.

कलागौरव प्रतिष्ठानचे ऍड अध्यक्ष अभय छाजेड, सरहद्द संस्थेचे अध्यक्ष संजय नहार, संवाद पुणेचे सुनील महाजन, पुणे वृत्तदर्शन चॅनेलचे संपादक डॉ. शैलेश गुजर, अरूण खोरो व सुनील महाजन जैन सहयोगचे मिलिंद फडे आणि मराठी भाषा संवर्धन प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण वाळिंबे आदी मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाल जितेंद्र शहा, अजित पाटील, कैलास ठोले, सुदीन खोत, राजेंद्र सुराणा, सुरेंद्र गांधी, विनित पारनाईक, नंदन देऊळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात तन्मयी मेहेंदळे यांनी ईशस्तवनाने केली.

उल्हास पवार म्हणाले, भगवान महावीरांनी सत्य, अहिंसा, न्याय, कर्म आचारण याची शिकवण दिली. त्यांनी जात ही आचरणातून येते असा सिद्धांत मांडून आचरणाचे महत्व सांगितले आहे. हाच सदआचरणाचा विचार पुढे भागवत संप्रदायाने पुढे नेल्याच बघायला मिळते.  भगवान महावीरांचीच सत्य, अहिंसा, सदआचरणाची शिकवण महात्मा गांधी यांनी दिली आहे. आपल्या तोंडात गेल्याने न दिसणा-या जीवतंतूंनाही आपल्यापासून अपाय होऊ नये म्हणून भगवान महावीरांनी त्यावेळी तोंडाला पट्टी लावणे सुरू केले. जीवजंतूनाही अपाय होऊ न देण्याचा मोठा विचार त्यांनी आपल्या आचरणातून, वर्तनातून सांगितला आहे. तो आज करोनामुळे आपण आचणात आणत आहोत.

प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, ही दार्शनिकांची भूमी आहे. जैन दर्शन म्हणजे विश्व हे नैसर्गिक असल्याचे सांगते. तिथे जीव अजीव, सचेतन – अचेतन असे दोनच घटक असून यातूनच विकृती निर्माण होतात. या विकृती दूर करणे महत्वाचे असून त्यासाठी जैन सत्पुरूषांनी आचरणाला महत्व दिले आहे. सध्या सुरू असलेल्या शाब्दीक हिंसाचारामुळे मनाला जखमा होत आहेत. त्यातून समाजमन दुभंगत आहे. हे दुभंगणारे समाजमन कसं सांधायचे याचे चिंतन मराठी जैन साहित्य संमेलानात व्हावे. धर्मकारण, अर्थकारण, राजकारण अशी सर्वच क्षेत्रे गढूळ होत असून चिखल कालवण्याचे षडयंत्र सुरू असल्याने समाज विवेकाला आवाहन करणारे चिंतन या संमेलानात होईल कारण या संमेलनाला समाजमनस्क अध्यक्ष डॉ. पाटील यांच्या रूपाने लाभले आहेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सत्काराला उत्तर देताना डॉ. रावसाहेब पाटील म्हणाले, आज पुण्यात आणि त्यातही कुसुमाग्रज, स्वामी विद्यानंद महाराज यांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या वास्तूत आपला पहिला सत्कार होत असल्याने अंत:करण भरून आलेले आहे. जैन धर्म आणि मराठी भाषा यांचा अगदी जवळचा संबंध कसा आहे हे सांगून ते म्हणाले, मराठी भाषेचा जन्म, तिचं पालन पोषण जैन साधूसंताना आपल्या अंगाखांद्यावर केले आहे. समाजातील स्थित्यंतरे, भाषा, संस्कृती यांचे अवलोकन करण्यासाठी संमेलने आवश्यक आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या स्थापनेनंतर १०६ वर्षांनी करवीर येथे जैन साहित्य परिषदेची विदोहातून किंवा असंतोषातून झालेली नसून मराठी भाषा, संस्कृतीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी झालेली आहे असे सांगुन सर्वांनी साहित्य संमेलनाला यावे असे आग्राहाचे निमंत्रण त्यांनी दिले. देशातील सध्याच्या वातावरणाबद्दल त्यांनी चिंता व्यक्त करून लोकशाही व सर्वधर्मसमभाव ही उदात्त मूल्ये अधिक रूजवली गेली पाहिजेत असे सांगितले.

महात्मा गांधी यांच्या पुण्यातिथीच्या दिवशी म्हणजे 30 जानेवारी 2021 या दिवशी ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत उल्हास पवार यांचे महात्मा गांधी आणि जग हे पुस्तक प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच जागतिक मराठी दिनाच्या दिवशी (27 फेब्रुवारी 2021) जैन धर्मातील तीर्थ क्षेत्रांच्या महितीचे सचित्र कॅलेंडर, कॉफी टेबल बुक तसेच यापूर्वी झालेल्या 24 मराठी जैन साहित्य संमेलनाचा आढावा घेणा-या  स्मरणिकेचे विमाचन जैन सहयोग व मराठी भाषा संवरधन प्रतिष्ठानच्यातीने करण्यात येणार आहे. रौप्यमहोत्सवी सोलापूरच्या अखिल भारतीय मराठी जैन साहित्य संमेलानाला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय ज्ञानपीठचे अध्यक्ष साहू अखिलेश जैन उपस्थित रहाणार असल्याचे मिलिंद फडे यांनी जाहीर केले.

यावेळी अरूण खोरे, ऍड अभय छाजेड, सुनील महाजन, संजय नहार, डॉ. शैलेश गुजर यांनीही मनोगत व्यक्त करून डॉ. पाटील यांना शुभेच्छा दिल्या. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत व प्रास्तिविक प्रवीण प्र. वाळिंबे यांनी केले. डॉ. रावसाहेब पाटील यांचा परिचय मिलिंद फडे यांनी करून दिला. आभार प्रदर्शन सुजाता शहा यांनी केले.

कोकण रेल्वेची माहिती मराठीतून द्या!मुंबई मराठी पत्रकार संघाची मागणी

0

मुंबई : कोकण रेल्वेवरील गाड्यांची माहिती, प्रसिद्धीपत्रके आदी केवळ इंग्रजी भाषेतूनच प्रसिद्ध होत आहे. हे अयोग्य आणि निषेधार्ह असून कोकण रेल्वेची माहिती मराठीतूनच द्यावी, अशी मागणी आज मुंबई मराठी पत्रकार संघाने कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे कार्यकारी संचालक श्री. संजय गुप्ता यांच्याकडे पत्राद्वारे केली.

संघाचे अध्यक्ष श्री. नरेंद्र वि. वाबळे आणि कार्यवाह श्री. विष्णू सोनवणे यांनी श्री. गुप्ता यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्यातील केंद्र सरकारच्या कार्यालयात इंग्रजी व हिंदी भाषेबरोबरच मराठीचा वापर करण्याचा नियम आहे. असे असतानाही कोकण रेल्वे आपल्या दैनंदिन वापरात मराठी भाषेला स्थान देत नसल्याचे दिसून येत आहे.
कोकण रेल्वेचा मार्ग राज्यातील तीन जिल्ह्यांमधून जातो. महाराष्ट्राने या प्रकल्पासाठी 22 टक्के इतका आर्थिक भार उचलला आहे. यामुळे महाराष्ट्रातून धावणाऱ्या प्रत्येक गाडीची माहिती ही मराठीतूनच असायला हवी, अशी मागणी मुंबई मराठी पत्रकार संघाने या पत्राद्वारे केली आहे.

‘ओबीसी’ आरक्षणाला धक्का न लावता ‘मराठा’ आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील – उपमुख्यमंत्री अजित पवार

0

मुंबई, दि. 15 : ‘चांद्या’पासून ‘बांद्या’पर्यंत महाराष्ट्र एकच आहे, त्यामुळे निधीवाटपात कोणत्याही प्रदेशावर अन्याय होण्याचा प्रश्न येत नाही. राज्यातील जनतेला समान न्याय देण्याची महाविकास आघाडी सरकारची भूमिका आहे. राज्यातील ‘कोराना’ संकटाचा सामना करण्यात राज्य सरकार कमी पडलेले नाही. सरकारच्या सर्व यंत्रणा व जनता सर्वशक्तीनिशी कोरोनाशी एकजुटीने लढत आहे. हा लढा पुढेही सुरु राहील. ‘कोरोना’ लढ्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. राज्यातील ‘ओबीसी’ समाजाच्या आरक्षणाला जराही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यावर राज्य सरकार ठाम आहे. त्यासाठी सर्वशक्तिनिशी प्रयत्न सुरु असल्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना स्पष्ट केले.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात, विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्यावर आलेले ‘कोरोना’चे संकट अभूतपूर्व आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारच्या प्रत्येक घटकाने या संकटाचा खंबीरपणे सामना केला आहे. डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, पोलीस, स्वच्छता कर्मचारी यांच्यासह शासनाच्या सर्व विभागांनी या लढ्यात मोलाची कामगिरी बजावली आहे. राज्यातल्या नागरिकांनीही सरकारला चांगली साथ दिली आहे. केंद्रीय पथकाने दिलेल्या ‘कोरोना’च्या संभाव्य रुग्णवाढीच्या इशाऱ्यानुसार आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांनुसारच राज्यात जम्बो कोविड रुग्णालये उभारली होती. घेतलेल्या आवश्यक खबरदारीमुळे ‘कोरोना’ची साथ नियंत्रणात आली आहे. परिणामी रुग्ण संख्या घटल्याने काही कोरोना सेंटरमध्ये पूर्ण क्षमतेने रुग्ण दाखल झाले नाहीत. मात्र राज्यातील नागरिकांच्या जीवाचा विचार करुनच ही सर्व यंत्रणा उभारण्यात आली होती. कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये सासाठी राज्यात तयार होणारा ८० टक्के ऑक्सिजन रुग्णालयांना तर उर्वरित २० टक्के ऑक्सिजन उद्योगांना देण्याचा निर्णय घेतला. आरोग्य विभागाला आवश्यक असणारा निधी वेळोवळी देण्यात आला. तसेच आमदारांच्या स्थानिक विकास निधीत २ कोटीवरुन ३ कोटी रुपये वाढ करण्यात आली. डोंगरी विकास निधीसह कोणत्याही महत्वाच्या विभागाच्या निधीत कपात करण्यात आलेली नाही.

आरोग्य विभागातील रिक्तपदांच्या भरतीलाही मान्यता देण्यात आलेली आहे, यापुढेही आरोग्य विभागासाठीच्या निधीसंदर्भात तडजोड केली जाणार नाही, आवश्यक निधी दिला जाईल. ‘कोरोना’ काळातील कामात कोणतीही आर्थिक अनियमितता झालेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘कोरोना’मुळे राज्याच्या अर्थचक्राची गती कमी झाल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, अर्थचक्राला गती देण्यासाठीच घर खरेदीवरील मुद्रांक शुल्कात सवलत देण्याचा निर्णय सरकारने  घेतला. त्यामुळे घर खरेदी-विक्रीत वाढ होऊन आर्थिक उलाढाल वाढली. सामान्य जनतेला कमी किंमतीत घरे उपलब्ध झाली. या माध्यमातून बांधकाम व्यवसायाला उर्जितावस्था मिळाली असून या क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्यांना हजारो कुटुंबांना रोजगार मिळाला. ‘कोरोना’मुळे राज्याच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली असून केंद्राकडून राज्याला मिळणारे सुमारे ३० हजार कोटी रुपयांचा निधीही अजून मिळालेला नाही, हा निधी मिळविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. ‘कोरोना’ संकटाच्या काळात अन्नधान्य वितरणाबरोबरच राज्यातील निराधार जनतेसाठी राज्य सरकारने आवश्यक निधी वेळोवेळी उपलब्धता करुन दिला आहे.

कोरोना संकटाबरोबरच राज्यावर चक्रीवादळ, अतिवृष्टी, पूरस्थिती अशी अनेक नैसर्गिक संकटे आली. या संकटातील बाधितांसाठी केंद्राच्या निकषापेक्षा अधिकची मदत राज्य सरकारने केलेली आहे. मदत करताना सर्वांना समान मदत केली आहे. कोणत्याही प्रकारचा प्रादेशिक अन्याय होणार नाही याची काळजी घेण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार कटिबध्द आहे. कोरोना संकटाच्या काळातही आपण कर्जमुक्तीचे काम सुरु ठेवले आहे. नियमीत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तसेच दोन लाखांच्यावरील कर्ज एकरकमी फेडणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर मदत करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. कोरोनाचे संकट गेल्यानंतर याविषयी निर्णय घेण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी राज्यातील सामान्य जनतेची मुले शिकावी या उदात्त हेतूने रयत शिक्षण संस्था स्थापन केली. या संस्थेत आज सामान्य जनतेची पाच लाखांहून अधिक मुले शिकत आहेत. त्यामुळे या संस्थेच्या शताब्दीसाठी १० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. शासनाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आलेल्या पोशाख नियमावलीचा पुनर्विचार करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी ९० कोटींचा निधी खर्च झाल्यासंदर्भातील वृत्त वस्तुस्थितीला धरुन नाही, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. सरकारकडून दिल्या जाणाऱ्या निधीतून मंत्र्यांच्या बंगल्यांबरोबरच मंत्रालय, विधीमंडळ, न्यायालये, इतर शासकीय इमारती, शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांची निवासस्थानांच्या देखभाल दुरुस्ती केली जात असल्याने, केवळ मंत्र्यांच्या बंगल्यावर खर्च झाला  असल्याचे म्हणणे, योग्य नाही, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

राज्य पाणी व स्वच्छता मिशनमध्ये सेवा तत्त्वावर विविध पदांची भरती

0

१. पदाचे नाव :- समन्वयक- मनुष्यबळ विकास (जागा – १)

शैक्षणिक पात्रता – शासनमान्य विद्यापीठातून एम.बी.ए (एचआर) किंवा एम.बी.ए. (पर्सनल मॅनेजमेंट) किंवा मानव संसाधन व्यवस्थापन किंवा सामाजिक शास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणीत उत्त्तीर्ण.

अनुभव – संबंधित क्षेत्रातील ५ वर्षांचा अनुभव

२. पदाचे नाव :- समन्वयक – माहिती, शिक्षण व संवाद (जागा – १)

शैक्षणिक पात्रता – शासनमान्य विद्यापीठातून मास कम्युनिकेशन / जर्नालिझम / एमबीए मधील पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणीत उत्त्तीर्ण.

अनुभव – संबंधित क्षेत्रातील ५ वर्षांचा अनुभव

३. पदाचे नाव :- संनियंत्रण व मूल्यमापन समन्वयक  (जागा – १)

शैक्षणिक पात्रता –  सामाजिक शास्त्र, अर्थशास्त्र या सारख्या  विकास क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणीत उत्त्तीर्ण.

अनुभव – संबंधित क्षेत्रातील ५ वर्षांचा अनुभव

४. सहायक मनुष्यबळ आस्थापना सल्लागार (जागा – १)

शैक्षणिक पात्रता – शासनमान्य विद्यापीठातील मानव संसाधन व्यवस्थापन किंवा सामाजिक शास्त्र विषयातील पदवी.

अनुभव – संबंधित क्षेत्रातील ३ वर्षांचा अनुभव

५. सहायक स्वच्छता व आरोग्य सल्लागार (जागा – १)

शैक्षणिक पात्रता – शासनमान्य विद्यापीठातील बी.एस्सी  (झूलॉजी/ मायक्रो बायोलॉजी / हेल्थ स्टडीज)

अनुभव – संबंधित क्षेत्रातील ३ वर्षांचा अनुभव

६. व्यवस्थापन माहिती प्रणाली तज्ञ  (जागा – १)

शैक्षणिक पात्रता – शासनमान्य विद्यापीठातील एम.सी.ए. किंवा एम.एस्सी (कॉम्प्युटर सायन्स) किंवा सांख्यिकी मधील पदव्युत्तर पदवी.

अनुभव – संबंधित क्षेत्रातील ५ वर्षांचा अनुभव

७. समन्वयक – पाणी गुणवत्ता (जागा – १)

शैक्षणिक पात्रता – शासनमान्य विद्यापीठातील बी.टेक./बी.ई. (केमीकल इंजिनीअरींग) किंवा एन्वायरलमेंटल इंजिनीअरींग / एम.एस्सी. (केमिस्ट्री/ एन्वायरलमेंटल सायन्स/मायक्रोबायोलॉजी).

अनुभव – संबंधित क्षेत्रातील ५ वर्षांचा अनुभव

८. माहिती विश्लेषक – पाणी गुणवत्ता (जागा – १)

शैक्षणिक पात्रता – एम.एस्सी (स्टॅटीस्टीक्स / केमिस्ट्री /एन्वायरलमेंटल/मायक्रोबायोलॉजी)

अनुभव – संबंधित क्षेत्रातील ३ वर्षांचा अनुभव

९. विभागीय समन्वयक (जागा – ३)

शैक्षणिक पात्रता – पदव्युत्तर पदवी (ग्रामीण व्यवस्थापन) / एमएसडब्ल्यू / एमए (सामाजिक विज्ञान – समाजशास्त्र, मास कम्युनिकेशन डेव्हलपमेंट कम्युनिकेशन किंवा समकक्ष)

अनुभव – संबंधित क्षेत्रातील ५ वर्षांचा अनुभव

वयोमर्यादा  – दि. १ डिसेंबर, २०२० रोजी किमान २१ वर्षे व कमाल ५५ वर्षे

अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख – २१ डिसेंबर २०२० दुपारी १२.०० वाजेपर्यंत

प्राचीन मंदिरांचे संवर्धन करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुंबई, दि. 15 : प्राचीन मंदिरे हा राज्याचा सांस्कृतिक वारसा असून हे वैभव जपण्याच्या दृष्टीने या मंदिरांच्या संवर्धनासाठी  राज्य शासनाकडून स्वतंत्र निधी देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केली.

पुरवणी मागण्यांच्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री श्री.ठाकरे बोलत होते. श्री.ठाकरे म्हणाले, मंदिरांचे पावित्र्य, स्वच्छता यासोबतच येणाऱ्या भाविकांसाठी सोयी-सुविधा निर्माण करण्यासाठी राज्य शासनाकडून निधी देण्यात येईल. टप्प्या-टप्प्याने प्राचीन मंदिरांचा विकास करण्यात येणार असून त्यात कोणत्या मंदिरांचा समावेश करायचा याबाबत सभागृहाच्या सदस्यांनी सूचना कराव्यात, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात असून सर्वोच्च्‍ा न्यायालयातील लढा सर्वांच्या सहकार्यातून निश्चितच जिंकू असा विश्वास व्यक्त करत श्री. ठाकरे म्हणाले, मराठा आरक्षणाच्या बाबतीत राज्य शासनाच्या भूमिकेत अजिबात बदल झालेला नसून पूर्वीचे वकीलही बदलण्यात आलेले नाहीत. मराठा संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा सुरु आहे. मराठा समाजाला न्याय मिळवून देताना  ओबीसी आरक्षणाला अजिबात धक्का लागणार नाही हा आपला शब्द असल्याचेही त्यांनी ठामपणे स्पष्ट केले.

कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही असे सांगून श्री.ठाकरे म्हणाले की, कोरोनाचे संकट संपूर्ण जगालाच नवीन असताना राज्य शासनाने अतिशय उत्कृष्टरित्या यासंदर्भातील काम हाताळले. त्याची दखल जगाने घेतली. कोरोना प्रतिबंधासाठी राबवलेल्या ‘धारावी मॉडेल’चे कौतुक जागतिक आरोग्य संघटनेने केले.

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अशी मोहीम राबविणारे आपले राज्य संपूर्ण देशात पहिले किंवा एकमेव राज्य आहे. यामध्ये आरोग्य सेविका, अंगणवाडीसेविका, आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, पोलीस शासकीय यंत्रणा या सर्वांनी अतिशय चांगले काम केले. या मोहिमेमुळे महाराष्ट्राचा आरोग्य नकाशा तयार झाला. सहव्याधी असलेल्या नागरिकांची माहिती कळल्यामुळे त्यांच्याकडे आपण व्यवस्थित लक्ष देऊ शकलो. लोकांची ऑक्सीजन पातळी समजल्यामुळे काहीजणांचे प्राण वाचवू शकलो, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, राज्याने देशात पहिल्यांदा कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा टास्क फोर्स तयार केला. विक्रमी वेळेत कोविड रुग्णालयांची उभारणी केली. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची आकडेवारी लपवली नाही. संपूर्ण महाराष्ट्र एक कुटुंब म्हणून कोरोनाविरुद्धच्या लढाईत उतरला. त्यातून या आजारावर आपण नियंत्रण मिळवू शकलो. तथापि, अद्याप लस आली नसल्याने पाश्चिमात्य देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसारखी परिस्थिती आपल्याकडे येऊ नये यासाठी यापुढील काळातही अजून दक्षता घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

पर्यावरणाचे संरक्षण करतच राज्य शासनाचे विकासाला प्राधान्य राहील असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, शहरांच्या विकासासाठी जंगले नाहीशी होत असताना शहरातील जंगल जपण्याचा प्रयत्न आरेच्या निर्णयातून झाला. जिथे वाईल्ड लाईफ अर्थात वन्यजीव आहेत त्या जंगलांना संरक्षित करत आहोत, तेथील जंगलाचे संवर्धन करण्याचा प्रयत्न असल्याचेही श्री.ठाकरे यांनी सांगितले.

कोळी महासंघाचा आझाद मैदानात भव्य इशारा मोर्चा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस,प्रविण दरेकर यांची उपस्थिती

0

मुंबई दि. १५ डिसेंबर- निसर्ग चक्रीवादळामध्ये बाधित झालेल्या कोकणातील मच्छिमार बांधवांचे पंचनामे होऊन सुद्धा आज पर्यंत त्यांना आर्थिक मदत न मिळाल्यामुळे त्यांना ती नुकसान भरपाई त्वरित मिळावी, तसेच मुंबईतील ४२ कोळीवाड्याचे सीमांकनाचे काम हे मागच्या सरकारने सुरू केले असून त्यातील फक्त काही कोळीवाड्याचे सीमांकनाचे काम हे या नव्या सरकारच्या काळात थांबवले असून ते तातडीने सुरु करण्याच्या मागणीसाठी कोळी महासंघ आयोजित आदिवासी कोळी जमात बांधवांचा इशारा मोर्चा आज कोळी महासंघाचे अध्यक्ष आमदार रमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला होता. माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर, आमदार आशिष शेलार, आमदार विनायक मेटे आदी याप्रसंगी उपस्थित होते.

कोळी महासंघाचे अध्यक्ष आमदार रमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान येथे मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चेतन पाटील यांच्यासह मोठ्या प्रमाणात कोळी बांधव उपस्थित होते. कोळी समाजाच्या मुख्य मागण्या सरकारने तातडीने पूर्ण कराव्या अशी मागणी कोळी समाजाने केली आहे. महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीतील बांधवाना जातीचा दाखला व वैधता हि सुलभरीत्या मिळण्याकरिता पी.वि. हरदास समिती नेमण्यात आली होती व सदरच्या समितीने अहवाल महाराष्ट्राने शासनाकडे सुपूर्द केला असून तो त्वरित लागू करावा अशी महासंघाची मागणी आहे.


वाशी ते मानखुर्द हा चौथा नवीन वाहतूक पूल होत असून तेथील मासेमारी करणाऱ्या आगरी – कोळी बांधवाना शिवडी – न्हावाशेवा पुलाच्या धर्तीवरच नवी मुंबईतील बाधीत होणाऱ्या मच्छिमारांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी महासंघाची मागणी आहे. मुंबईतील मासे विक्रेत्या महिलांच्या मच्छिमार्केटला संरक्षण देण्याची मागणीही महासंघाने सरकारकडे केली आहे.

शहरात पहेली अत्याधुनिक कार्डियाक रुग्णवाहिके च्या खरेदीला मान्यता -हेमंत रासणे

0

पुणे- कोरोना च्या पाश्वभूमी वर पुणे शहराला पहिली कार्डियाक रुग्णवाहिका खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. हा निर्णय आज स्थायी समिती च्या सभेत मध्ये घेण्यात आला. अशी माहिती स्थायी समिति चे अध्यक्ष हेमंत रासणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रासणे पुढे म्हणाले की, हा निर्णय प्रायोगिकतत्वा वर घेण्यात येनार असून प्रत्येक झोन ला एक अशा प्रकारे मागणी चा विचार करून ही एंब्युलंस देण्यात येनार आहे. त्याचप्रमाणे मनपा च्या डॉ. दिलीप वळसे पाटील दवाखान्याला नेत्र संबंधित उपकरण खरेदी ला ही मान्यता देण्यात आली आहे.

पुण्यातील नागरी सुविधा केंद्रा साठी 100 कर्मचारी भर्ती ला मान्यता देण्याचा ही निर्णय घेण्यात आला आहे.पुण्यात एकुन 15 नागरी सुविधा केंद्र आहेत. त्याच प्रमाणे पुणे मनपा महाराष्ट्रा तील कर भरणारी नंबर वन महापालिका ठरली आहे. कोरोना काळात ही पुणे मनपा द्वारे एकुण 1200कोटी कर गोळा केला गेला आहे. महापालिका मध्ये मुंबई महापालिका सर्वात मोठी पालीका असून ही मुंबई द्वारा फक्त 500कोटी चा महसूल गोळा केला गेला आहे. त्यामुळे मी पुणेकर नागरिकांचा आभारी आहे. असे ही रासणे यावेळी म्हणाले.

शेतकऱ्यांच्या खांद्यावरून बंदूक चालवणारे पराभूत होतील-पंतप्रधान नरेंद्र मोदी

0

नवी दिल्ली- शेतकऱ्यांच्या खांद्यावरून बंदूक चालवणाऱ्या पराभव होईल अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी एक दिवसीय गुजरात दौऱ्यावर आले. येथे त्यांनी कच्छमध्ये समुद्राच्या पाण्यापासून पिण्याचे पाणी बनवणाऱ्या (डिसॅलिनेशन) प्लांट, देशातील सर्वात मोठा सौर प्रकल्प आणि स्वयंचलित दूध प्रक्रिया युनिटची पायाभरणी केली. पंतप्रधानांनी येथे पुन्हा एकदा आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना सल्ला दिला. तसेच
पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर निशाणा, म्हणाले – शेतकरी हितासाठी 24 तास सज्ज

अनेक वर्षांपासून कृषी सुधारणांची मागणी केली जात होती. अनेक शेतकरी संघटना देशातील कोठेही धान्य विकण्याचा पर्याय द्यावा अशी मागणी करत होते. सरकारमध्ये असताना विरोधी पक्षात बसलेल्या लोकांना हे पाऊल उचलता आले नाही. जेव्हा आमच्या सरकारने ऐतिहासिक पाऊल उचलले तेव्हा विरोधकांनी शेतकऱ्यांना भडकावण्यास सुरुवात केली. आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी 24 तास सज्ज आहोत. शेतीवरील खर्च कमी व्हावा, शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढावे, अडचणी कमी व्हाव्यात, त्यासाठी सतत काम केले. मला देशाच्या कानाकोपऱ्यातील शेतकऱ्यांचे आशीर्वाद मिळाले केले. मला विश्वास आहे की शेतकर्‍यांच्या आशीर्वादाची शक्ती भ्रमनिरास्यांना, या मुद्द्याचे राजकारण करणाऱ्यांना आणि जे शेतकर्‍यांच्या खांद्यावर बंदूक करतात त्यांना पराभूत करेल.

कच्छच्या मांडवी येथे डिसॅलिनेशन प्लांट बनवला जाणार

कच्छच्या मांडवी येथे डिसॅलिनेशन प्लांट उभारण्यात येणार आहे. याद्वारे दररोज 10 कोटी (100M ) लिटर समुद्राचे पाणी पिण्याच्या पाण्यात बदलले जाणार आहे. गुजरातमधील पाणीटंचाई दूर करण्यासाठी हा प्लांट महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. त्याद्वारे परिसरातील सुमारे 8 लाख लोकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करता येईल. गुजरातमधील पाच डिसॅलिनेशन प्लांटपैकी हा एक प्रकल्प आहे. असेच प्रकल्प दाहेज, द्वारका, घोघा भावनगर आणि गिर सोमनाथ येथे उभारण्यात येत आहेत.

121 कोटीच्या खर्चाने उभारणार दुध प्रक्रिया प्रकल्प

कच्छमध्ये स्वयंचलित दूध प्रक्रिया व पॅकेजिंग प्लांट बांधले जाणार आहे. 121 कोटी रुपये खर्चून याची उभारणी केली जाईल. यामध्ये दररोज 2 लाख लिटर दुधावर प्रक्रिया केली जाणार आहे.

30 गीगावॅटपर्यंत विजेची निर्मिती

कच्च्या विघकोट गावात हे हायब्रीड नूतनीकरणायोग्य उर्जा पार्क तयार केले जात आहे. 72 हजार 600 हेक्टर क्षेत्रामध्ये पसरलेल्या या एनर्जी पार्कमुळे 30 गीगावॅट वीज निर्मिती करता येणार आहे. येथे पवन व सौर ऊर्जेच्या साठवणुकीसाठी स्वतंत्र विभाग असेल.

राजा उदार झाला अन हाती भोपळा आला-विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांचे सरकारवर टीकास्त्र

0

मुंबई- महाविकास आघाडी सरकार आल्यापासून शेतकऱ्यांच्या हाती काहीच आले नाही. पूरग्रस्तांना फक्त तीन हजार रुपयांचा धनादेश देणाऱ्या या सरकारची अवस्था राजा उदार झाला अन् हाती भोपळा आला, अशी झाली आहे,’ अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

विधानसभेत बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘केंद्राच्या कृषी कायद्याचे बारकाईने विवेचन करताना हा कायदा शेतकरी हिताचाच आहे. तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी दिलेल्या सूचनांचाच या कृषी कायद्यात समावेश करण्यात आला आहे’, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

फडणवीस पुढे म्हणाले की, ‘फक्त महाराष्ट्रातच खासगी एपीएमसी आहे. खासगी एपीएमसीच्या माध्यमातूनच राज्यातील शेतकऱ्यांना बाजारभाव मिळत आहे. तरीही केंद्राच्या कृषी कायद्याला विरोध केला जातोय. 2013 मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग आणि तत्कालीन कृषी मंत्री शरद पवार यांनी एक समिती स्थापन केली होती. त्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील होते. या समितीचा अहवाल स्वीकारण्यात आला. त्यात कृषी मार्केटिंगमध्ये बदल करण्याची आणि शेतकऱ्यांना पर्यायी स्पर्धात्मक बाजारपेठ हवी अशी सूचना करण्यात आली आहे आणि आज तेच लोक केंद्राच्या कृषी कायद्याला विरोध करत आहेत. हा कायद्याला विरोध नसून, राजकीय विरोध आहे’, असेही ते यावेळी म्हणाले.

‘ओबीसी आरक्षणाला धक्का लावला तर रस्त्यावर उतरू’

मराठा आरक्षणाबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘आझाद मैदानात मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे. आमच्या काळात सर्वोच्च न्यायालयात दोन हिअरिंग झाल्या. मात्र स्टे आला नाही. मात्र आता स्टे आला आहे. आमच्या काळात अनेक आंदोलन झाली मात्र कोणाला अटक नाही झाली. आता तर अनेक मराठा तरुणांना घरीच थांबवले जात आहे. त्यांना मुंबईत येऊ दिलं जात नाही. सरकार मधील मंत्री सरकार विरोधात मोर्चा कसे काढू शकतात. त्यांनी शपथ घेतली आहे. त्या शपथेचा भंग होत आहे. ओबीसींच्या आरक्षणात कोणाला वाटेकरी होता येणार नाही असा ठराव मंत्रीमंडळ बैठकीत घ्या. समाजात तेढ निर्माण करण्याचे काम सत्तारूढ पक्ष करत असेल तर ते योग्य नाही, असेही ते म्हणाले.