Home Blog Page 2363

ऐकावंं ते नवलच :समोरून चोर आले ,अन पोलिसच पळून गेले …

0

पुणे : पुणे तिथे काय उणे म्हणतात खरे .. पण कधी कधी ऐकाव ते नवलच जणू ..वाटावं अशी बातमी आज सकाळ पासून फिरतेय , ती म्हणजे .. समोरून आले चोर: अन पोलीसंनीच ठोकली धूम … .. पोलिसांना बघून चोराने पळून जाणं काहीस सामान्य असताना पुण्यात मात्र चक्क चोर बघून पोलिसच पळून गेल्याची घटना घडलेली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून त्यात चोरांना बघून धूम ठोकणारे पोलीस कर्मचारी कैद झाले आहेत.पुणे पोलिसांच्या इभ्रतीला धक्का पोहोचविणारी हि घटना आहे. त्यामुळे याबाबत तातडीने पोलीस आयुक्तांनी चौकशी करून खरे काय ते जाहीर करायला हवे .

पुण्यातल्या औंध भागामध्ये सिद्धार्थ नगर भागातील शैलेश टॉवर सोसायटीमध्ये ही घटना घडली. सोसायटीमध्ये काल रात्री तीनच्या सुमारास चोर शिरले. त्यांनी बंद केलेल्या चार फ्लॅटचे कुलूप तोडले आणि पाचव्या फ्लॅटमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न सुरू असताना नागरिकांनी तातडीने पोलिसांना फोन करून घटनास्थळी येण्याची विनंती केली. यावेळी काही मिनिटात पोलीस सोसायटी बाहेर दाखल झाले. मात्र समोरून चोर आल्याचे बघून पोलीसच पळून गेले आहेत.विशेष म्हणजे चोरांच्या हातातील हत्यार बघून दुचाकी चालवणारा पोलीस आपल्या साथीदार पोलिसालाही तिथेच सोडून पळाला आहे. पोलिसांची ही हालचाल सीसीटीव्हीमध्ये कैद झाली दुसरीकडे चोरांनाही सोसायटीत राहणाऱ्या लोकांचा आरडाओरडा ऐकू आल्याने त्यांनी पळ काढला. मात्र चोरांच्या आधी ज्या प्रवेशद्वारातून पोलीस निघून गेले किंवा पळाली. त्यात प्रवेशद्वारातून यांच्या नंतर कळाले त्यामुळे पकडण्याची संधी असूनही पोलिसांनी घटनेकडे दुर्लक्ष केले की अजुन काही कारण होते हे समजले नाही.

दरम्यान, यातले चार फ्लॅट बंद असल्याने मोठा ऐवज चोरीला गेला नाही. पण एका फ्लॅटमधील एलईडी टीव्ही नेण्यास चोर यशस्वी झाले. संकटाच्यावेळी तारणहार असलेले पोलीस जर पळून जात असतील तर नागरिकांनी कोणावर विश्वास ठेवायचा असा प्रश्न आता स्थानिक विचारत आहेत.या घटनेची दखल आता चतुःशृंगी पोलिसांनी घेतली असून संबंधित पोलिसांचा अहवाल आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे.

पुणे जिल्‍हा कोविड लसीकरण व्‍यवस्‍थापन

0

कोरोनाची  (कोविड-19) संभाव्‍य दुसरी लाट येण्‍याच्‍या पार्श्‍वभूमीवर पुणे जिल्‍ह्यात आवश्‍यक ती सर्व खबरदारी व पूर्वतयारी करण्‍यात आली आहे. उपमुख्‍यमंत्री तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनीही याबाबत आढावा घेवून योग्‍य त्‍या सूचना दिल्‍या आहेत.  रुग्‍णोपचार व्‍यवस्‍थापन, प्रयोगशाळा तपासणी, कोविड सुविधा केंद्र आणि इतर महत्‍त्‍वाच्‍या बाबींवर लक्ष देवून पुणे जिल्‍हा कोरोनाच्‍या संभाव्‍य दुसऱ्या लाटेच्‍या मुकाबल्‍यासाठी सज्‍ज झाला आहे.

कोविड १९ लसीकरणाकरिता जिल्‍हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्‍या अध्‍यक्षतेखाली जिल्हास्तरीय कृती दल समिती स्‍थापन करण्‍यात आली असून त्‍यांच्‍या अध्यक्षतेखाली पहिली बैठक 7 डिसेंबर 2020 आणि दुसरी बैठक 23 डिसेंबर रोजी घेण्‍यात आली. या बैठकीत कोविड १९ च्या लसीकरण  पूर्वतयारीबाबत आढावा व चर्चा करण्यात आली. या मोहिमेत पहिल्या टप्प्यात सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना (शासकीय आरोग्य संस्था, वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्‍य केंद्र व उपकेंद्र तसेच खाजगी आरोग्य संस्था) यांना लसीकरण करण्यात येईल. शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार दुसऱ्या टप्प्यामध्ये इतर संलग्‍न आजार असलेले रुग्ण व वयोवृद्ध यांचा समावेश करण्यात येईल व तिसऱ्या टप्प्यामध्ये सर्वांचा समावेश करण्यात येईल.

कोविड १९ लसीकरणासाठी पुणे जिल्‍ह्याकरिता २ हजार ५४६ लस टोचक नेमण्यात येणार आहेत. लसीकरणामध्ये प्रत्येकी २ डोस २८ दिवसांच्या अंतराने देण्यात येणार आहे. लसीच्या साठवणीसाठी १८५ आय.एल.आर. व १५७ डीफ्रीजर आहेत.

‘कोविन’ या कोविड १९ करिता तयार करण्यात आलेल्या पोर्टलबाबत तालुका आरोग्य अधिकारी तसेच तालुकास्तरीय आरोग्य विस्तार अधिकारी, आरोग्य सेवक आणि सर्व वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांचे प्रशिक्षण व्हिडीओ कॉन्‍फरंसिंगद्वारे घेण्यात आलेले आहे.

पुणे जिल्‍ह्यात शासकीय आरोग्‍य संस्‍था 253 व खाजगी आरोग्‍य संस्‍था 8 हजार 89 अशा एकूण 3 हजार 842 आहेत. शासकीय आरोग्‍य कर्मचारी 24 हजार 739 व खाजगी आरोग्‍य कर्मचारी 85 हजार 695 असे एकूण 1 लक्ष 10 हजार 434 आहेत. या सर्व शासकीय व खाजगी संस्‍था तसेच त्‍या अंतर्गत येणाऱ्या आरोग्‍य कर्मचाऱ्यांची  माहिती ‘कोविन’ या पोर्टलवर भरण्‍यात येत आहे.

सध्‍या दैनंदिन 12 हजार ते 13 हजार टेस्‍ट करण्‍याचे उद्दिष्‍ट ठेवण्‍यात येत आहे. तपासणी प्रमाण वाढवण्‍याकरिता नियमित रुग्‍ण सर्वेक्षण, संपर्क व्‍यक्‍ती शोध व अधिक लोकसंपर्क असणाऱ्या व्‍यक्‍तींचे विशेष सर्वेक्षण चालू आहे. सध्‍या पुणे जिल्‍ह्यातील एकूण नमुना तपासणी  18 लक्ष 16 हजार 358 असून बाधित रुग्‍ण दर 19.7 टक्‍के आहे. नोव्‍हेंबर 2020 पासून हा दर 10 टक्‍के प्रतिदिन प्रमाणे कमी झाला आहे. ऑक्‍टोबर महिन्‍याच्‍या पहिल्‍या आठवड्यापासून कोविड 19 रुग्‍णांची संख्‍या कमी होताना दिसत आहे. परंतु, जागतिक स्‍तरावरील अवलोकन केले असता युरोपमधील अनेक देशांमध्‍ये कोविड 19 आजाराची दुसरी लाट दिसून येत आहे. या पार्श्‍वभूमीवर पुणे जिल्‍ह्यामध्‍ये पूर्वतयारी करण्‍यात आली आहे.

बिल व्‍यवस्‍थापन- पुणे जिल्‍ह्यात रुग्‍णांच्‍या देयकातून 7 कोटी 86 लक्ष 97 हजार 944 रुपये लेखा परीक्षणांती कमी करण्‍यात आलेले आहे. त्‍यामध्‍ये पुणे मनपा 2 कोटी 58 लक्ष 43 हजार 262, पिंपरी-चिंचवड मनपा 4 कोटी 20 लक्ष 95 हजार 706 तर पुणे ग्रामीण 1 कोटी 86 लक्ष 97 हजार 944 अशी रक्‍कम आहे. पुणे जिल्‍ह्यात लेखा परीक्षण केलेल्‍या देयकांची संख्‍या 4 हजार 709 इतकी आहे. त्‍यामध्‍ये पुणे मनपा 974, पिंपरी-चिंचवड मनपा 2 हजार 743, पुणे ग्रामीण 992 अशी संख्‍या आहे.

अत्‍यंत प्रतिकूल परिस्थितीत आज अखेरच्‍या सर्वाधिक क्रियाशील रुग्‍णसंख्‍येच्‍या अंदाजावरुन 48 हजार 205 पर्यंत रुग्‍णसंख्‍या वाढू शकते. त्‍या परिस्थितीत पुणे जिल्‍ह्यात पुरेसे मनुष्‍यबळ, औषध साठा, इंजेक्‍शन रेमडेसेवीर, बेड संख्‍या, ऑक्सिजन, अतिदक्षता बेड्स,  व व्‍हेंटीलेटर्स उपलब्‍ध आहेत.

(लेखक -राजेंद्र सरग,जिल्‍हा माहिती अधिकारी,पुणे)

शालेय तरुणांची साहित्यकृती कौतुकास्पद -दत्तात्रय जगताप यांचे मत

0

पुणे : “शालेय वयातील मुले कादंबरीसारखा साहित्य प्रकार लिहिताहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. एवढ्या कमी वयात सर्जनशीलतेचे, प्रगल्भतेचे दर्शन आपल्या लेखनातून तन्वीसारखे युवा लेखक घडवतात, तेव्हा त्यांच्यातील आत्मविश्वास पाहून हुरूप येतो. तन्वीने आपल्या अंतर्मनातील विचारांना सुंदर पद्धतीने शब्दबद्ध केले आहे. तिचे लेखन कौतुकास्पद आणि नव्या पिढीला लिहिण्यास उद्युक्त करणारे आहे,” असे प्रतिपादन राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचे संचालक दत्तात्रय जगताप यांनी केले.
तन्वी निमजे लिखित अभिषेक टाईपसेटर्स अँड पब्लिशर्स प्रकाशित ‘ऍस्ट्रो ऑफ अवर्स’ पुस्तकाच्या प्रकाशनावेळी जगताप बोलत होते. मंगळवारी नवी पेठेतील पत्रकारभवन येथे झालेल्या या कार्यक्रमाला इंडियन बँकेचे विभागीय व्यवस्थापक मनीष कुमार, उपविभागीय व्यवस्थापक राजीव रंजन, सह-महाव्यवस्थापक रणजित सिंग, वरिष्ठ व्यवस्थापक वजाहत अली व तन्वीचे वडील सह-महाव्यवस्थापक प्रकाश निमजे, आई ज्योती निमजे, प्रकाशक मंगेश वाडेकर आदी उपस्थित होते.

दत्तात्रय जगताप म्हणाले, “दहावी-बारावीच्या दडपणात अनेकदा मुले गुंतून जातात. मात्र, तन्वीने त्यातून स्वतःला वेळ देत ‘ऍस्ट्रो ऑफ अवर्स’ कादंबरी लिहून पूर्ण केली. तिच्यातील लेखन प्रतिभा अचंबित करणारी आहे. काव्य, भावभावना अतिशय ओघवत्या शैलीत तिने उतरवल्या आहेत. इतर मुलांनीही यातून प्रेरणा घेत साहित्यकृती निर्माण कराव्यात.”
मनीष कुमार म्हणाले, “तन्वीला लहानपानापासून पाहत आहे. तिच्यातील बुद्धिमत्ता आणि क्रयशीलता, सतत काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याची तिची उर्मी वाखाणण्याजोगी आहे. अवघ्या १८ व्या वर्षी तिची कादंबरी प्रकाशित होत आहे, ही तिच्यासाठी मोठी गोष्ट आहे.” तन्वी निमसे म्हणाले, “लहानपणापासूनच वाचन करत होते. त्यातून लिखाणाची आवड जडली. दहावीनंतर सर्व पुस्तक लिहून काढले. पहिले पुस्तक प्रकाशित होताना आनंद वाटतो आहे.”
मंगेश वाडेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. सतीश गेजगे यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश निमसे यांनी आभार मानले.

रजनीकांत यांचा प्रकृतीच्या कारणास्तव निवडणुकीच्या रिंगणात न उतरण्याचा निर्णय

0

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी आपल्या बिघडलेल्या तब्येतीमुळे निवडणुकीच्या राजकारणात न उतरण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीला उभे न राहता बाहेरून लोकांची सेवा करू, असे त्यांनी मंगळवारी तमिळमध्ये लिहिलेल्या एका पत्रात सांगितले. याबद्दल त्यांनी चाहत्यांची माफी देखील मागितली आहे.

डॉक्टरांनी रजनीला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला

रजनीकांत यांना रक्तदाबातील चढउतार आणि थकवा जाणवल्यामुळे 25 डिसेंबर रोजी हैदराबादच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांनंतर त्यांना सुटी देण्यात आली. यावेळी डॉक्टरांनी रजनी यांना एक आठवड्यापर्यंत बेड रेस्ट, किमान शारीरिक क्रियाकलाप आणि कोरोनापासून वाचण्याचा सल्ला दिला होता.

31 डिसेंबर रोजी नवीन पक्षाची घोषणा करणार होते

रजनीकांत यांनी पक्ष स्थापन करण्याचा आणि 2021 विधानसभा निवडणूक लढणार असल्याची 3 डिसेंबर रोजी घोषणा केली होती. तसेच 31 डिसेंबर रोजी नवीन पक्षाची घोषणा करणार असल्याचेही ते म्हणाले होते.

वर्षभरापूर्वी कमल हासनशी युती करण्याबाबत सांगितले होते

राजकारणात अभिनेता कमल हसनसोबत युती करणार असल्याचे रजनीकांत यांनी गेल्यावर्षी सांगितले होते. रजनीकांत यांनी त्यावेळी म्हटले होते की, जर कमल हासन यांच्याशी युती करण्याची स्थिती झाली तर राज्यातील लोकांचे हित लक्षात घेऊन ते निश्चितपणे एकत्र येऊ.

रजनीकांत जर निवडणुकीत उतरले असते तर ते राजकारणात येणारे दाक्षिणात्य चित्रपटांमधील 8 वे दिग्गज ठरले असते. अशा मोठ्या नावांमध्ये डॉ. एमजी रामचंद्रन, एम करुणानिधी, जे जयललिता, कमल हसन, विजयकांत, सरत कुमार आणि करुनास यांचा समावेश आहे.

राऊतांच्या कुटुंबाची ‘मनी ट्रेल, कॅश ट्रेल’ची चौकशी करा, पीएमसी बँकेचा पैसा एचडीआयएल मार्गे कुठून कसा गेला? किरीट सोमय्यांचा सवाल

0

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आता राऊत कुटुंबाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. राऊत कुटुंबातील काही सदस्यांच्या एचडीआयएलशी झालेल्या आर्थिक व्यवहाराची ‘मनी ट्रेल, कॅश ट्रेल’ चौकशी करायला हवी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.

किरीट सोमय्या यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही मागणी केली आहे. ‘राऊत परिवार माधुरी प्रवीण राऊत, वर्षा संजय राऊत, प्रवीण राऊत यांचे एचडीआयएलशी झालेल्या आर्थिक व्यवहाराची ‘ मनी ट्रेल, कॅश ट्रेल’ चौकशी झालीच पाहिजे. एचडीआयएल आणि ग्रुप कंपन्यांकडून त्यांना किती रक्कम मिळाली? एचडीआयएलने पीएमसी बँकेचे 5400 कोटी रुपये चोरले आहे. पीएमसीसाठी हे महत्वाचे आहे’ असे सोमय्या म्हणाले आहेत.

शिवसेना खासदार संजय राऊतांच्या पत्नी वर्षा आजही अंमलबजावणी संचालनालय (ED) समोर हजर होणार नाहीत. त्यांना तिसऱ्यांचा समन्स पाठवण्यात आलेला होता. यापूर्वी दोन वेळाही त्या ईडीसमोर हजर झालेल्या नव्हत्या. पीएमसी बँक घोटाळ्यामध्ये मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची ईडीकडून चौकशी केली जात आहे. ईडीला वर्षा यांना त्यांच्या खात्यात जमा झालेल्या 55 लाख रुपयांच्या ट्रांजेक्शनविषयी विचारायचे आहे.

काय आहे प्रकरण
संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली होती. वर्षा राऊत यांच्या बँक खात्यात प्रवीणच्या खात्यातून मोठी रक्कम आली होती. संजय राऊत यांनी राज्यसभा निवडणुकीत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात वर्षा यांच्या खात्यात कर्जासाठी काही रक्कम घेतल्याचे नमूद केेले आहे. हा व्यवहार ईडीला जाणून घ्यायचा आहे.

नगरसेवक महेश लडकत यांचे दुखःद निधन

0

पुणे- येथील नगरसेवक महेश लडकत यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते 53 वर्षे वयाचे होते. पतित पावन सारख्या संघटनेतुन सामाजिक कार्याला सुरुवात करणाऱ्या लडकत यांची भाजपा मधील एक शांत,मनमिळाऊ व्यक्तिमत्व अशीच ओळख होती.त्यांच्या मागे पत्नी, मुलगी, 2 भाऊ ,1 बहिण असा परिवार आहे.

गेली काही दिवसांपासुन ते आजारी होते, रुग्णालयात उपचार सुरु असताना आज त्यांची प्राणज्योत अखेर मालवली .महापालिका शिक्षण मंडळ , तसेच शहर सुधारणा समितिवर अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले होते . उद्दम सहकारी बैंकेचे ते विद्यमान अध्यक्ष होते. नवी पेठ येथे राहणाऱ्या लड़कतांना माननारा वर्ग सर्व पक्षात आहे. त्यांच्या अशा अकाली निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

नवी पेठ ,लोकमान्य नगर दत्तवाडी, भागातील नगरसेवक महेश लडकत यांचा 37 वर्षांचा सामाजिक आणि राजकीय जीवन प्रवासाचा त्यांचा आलेख वाखणण्याजोगा आहे. .

विमलताई गरवारे शाळेत शिक्षण आणि गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स मधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेत असताना १९८३ सालापासून पतितपावन संघटनेच्या माध्यमातून कामाचा त्यांचा आलेख सतत लक्षवेधी राहिला..पुणे विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून काम करण्याची मिळालेली संधी पतितपावन संघटनेचा शहर युवक प्रमुख आणि त्यातून सार्वजनिक जीवनात जीवनातल्या प्रश्नांना सोडवण्याचे आलेली जाण. 90 च्या दशकात देशात निर्माण झालेल्या अभूतपूर्व वातावरणात देशात सत्ताबदल झाला पाहिजे हा विचार प्रवाह जोरात वाहत असताना देशाला अटल बिहारी वाजपेयी सारख्या पंतप्रधानची गरज आहे हे पाहून संघ परिवाराचे अनेक कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात काम करू लागले आणि त्याच प्रवाहात महेश लडकत सामाजिक चळवळीच्या मुशीतून तयार होऊन भारतीय जनता पार्टीमध्ये आपकी बार अटलबिहारी असे म्हणत पुणे शहर भारतीय जनता युवा मोर्चाचे सरचिटणीस झाले होते .
युवा मोर्चाच्या माध्यमातून केलेली विविध आंदोलने असो किंवा आयोजित क्रीडा स्पर्धा, आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर,कामे केली. त्यामुळे भारतीय जनता युवा मोर्चा खऱ्या अर्थाने पक्षाची ताकद बनली याच कामाची दखल घेत लडकत यांना महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाचे उपाध्यक्ष पद बहाल करण्यात आले. या काळात विद्यमान मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धंनजय मुंडे देखील प्रदेश युवा मोर्चाचे उपाध्यक्ष होते .
पक्ष संघटनेतील आणि एकूण सामाजिक कामाच्या आधारावर पक्षाने 2007 ते 2009 या काळात पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदाच्या काळात भाजपचा पहिला शिक्षण मंडळ अध्यक्ष म्हणून कौतुकास्पदकाम केलं त्यांच्या काळात सुरू झालेल्या क्रीडा प्रबोधिनीतून तयार झालेले अनेक विद्यार्थी आज क्रीडाक्षेत्रात यशस्वी होत आहेत . 2017 मध्ये पहिल्यांदा नगरसेवक पदी निवडून आल्यानंतर शहर सुधारणा समितीचे अध्यक्षपद दिले व या माध्यमातून त्यांनी आणि येवलेवाडी विकास आराखडा, एसटी एमटीआर *प्रकल्पास चालना, विकास आराखडयात ओढ्या लगत असलेल्या बांधकामावर असलेले निर्बंध उठविण्यास मंजुरी या सारखी कामे करून घेत त्यांनी आपल्या कार्यकुशलतेची ओळख पटवून दिली. जनतेच्या समस्या सोडविणारा कर्तव्य दक्ष पक्षातील सहकाऱ्यांचा विश्वासू असे महेश लडकत खासदार गिरीश बापट यांचे विश्वासू म्हणून त्यांना ओळखले जात .

संजय काकडे आहेत तरी नेमके कुठे ?

0

खा. बापट आणि आ.चंद्रकांत पाटील या दोहों ची भूमिका पहा.

पुणे-
राज्यसभेचे माजी खासदार, भाजपचे सहयोगी संजय काकडे सध्या भाजपच्या कार्यक्रमात दिसत नाहीत. पोस्टर वर त्यांचे फ़ोटो झळकतात. पण शहरातील पक्षान्तर्गत त्यांचे अस्तित्व आता जाणवेनासे झाले आहे.ते सक्रीय दिसत नाहीत. या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत दादा पाटील यांना आणि खासदार गिरीश बापट या दोन्ही नेत्यांना पत्रकार परिषदेत प्रश्नांना सामोरे जावे लागले . तेव्हा या दोन्ही नेत्यांनी दिलेली उत्तरे ऐका …

संजय काकडे कुठे आहेत? प्रश्नाला खा. बापटांनी दिली बगल (व्हिडिओ)

0

पुणे : भाजपचे सर्व नगरसेवक चांगले काम करत आहेत. राज्यात भाजपची सत्ता असताना पुण्यात मोठ्याप्रमाणावर निधी दिला. केंद्र सरकारच्या माध्यमातूनही शहरात मोठे प्रकल्प सुरू आहेत. भाजपने पुणेकरांना दिलेला शब्द पाळला असल्याने, आगामी निवडणुकीमध्ये भाजपचे शंभरहून अधिक नगरसेवक महापालिकेत असतील. असे सांगून खासदार गिरीश बापट यांनी माजी खासदार संजय काकडे भाजपच्या कार्यक्रमात दिसत नाहीत, ते आहेत कुठे? या प्रश्नाला मात्र उडवून लावित बगल दिली.

शहर भाजपच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या भाजप नगरसेवकांसोबतच्या बैठकांमध्ये नगरसेवकांनी केलेली विकास आणि सामाजिक कामे, उभारलेले प्रकल्प, अर्धवट प्रकल्पांच्या पुर्णत्वासाठी आवश्यक निधी आदींबाबत चर्चा करण्यात आली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत खासदार बापट यांच्यासह शहराध्यक्ष जगदिश मुळीक यांनी माहिती दिली. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृहनेते गणेश बिडकर, भाजपचे सरचिटणीस राजेश पांडे याप्रसंगी उपस्थित होते.

बापट म्हणाले, केंद्र सरकारच्या अनेक योजना पुण्यात सुरू आहेत. मागील राज्य शासनाने महापालिकेला मोठा निधी दिला आहे. परंतु महाविकास आघाडी सरकारने अद्याप काहीच निधी दिला नाही. तरीही या काळात नगरसेवकांनी विशेषतः सामाजिक काम खूप केले आहे. कोरोनाचे संकट यशस्वीपणे हाताळले.

प्रभागातील छोटी छोटी कामे व्हावीत अशी नागरिकांची मागणी असते. स्मार्ट सिटीची कामे सुरू आहेत. कराच्या दंडात सवलत देऊन महापालिकेला उत्पन्न मिळवून द्यायचा प्रयत्न केला. स्थायी समिती अध्यक्ष व पदाधिकार्‍यांनी यासाठी सकारात्मक भुमिका पार पाडली. चोवीस तास पाणी पुरवठा योजनेला गती देण्यात आली आहे. भामा आसखेड प्रकल्पातील शेतकर्‍यांचे पुनर्वसन केले. यासाठी महापालिकेने सुमारे २०० कोटी रुपये निधी दिला. विमानतळ, नदी सुधार योजना, मेट्रो प्रकल्पाची कामे पुढे नेली. पुणेकरांना दिलेला शब्द आम्ही पाळणार. परंतु यावेळी पेक्षा अधिक नगरसेवक निवडून आणू असा मला विश्वास आहे. असे ते म्हणाले.

खेळाडूंना ऑलिम्पिक पूर्व तयारीसाठी प्रत्येकी 50 लाख आर्थिक सहाय्य

0

ऑलिम्पिक पात्र खेळाडू राज्याचे वैभव -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. 28 : टोकियो येथील 2021 ऑलिम्पिक स्पर्धेसाठी 5 खेळाडू वीरांची निवड झाली आहे. हे खेळाडू म्हणजे राज्याचे वैभव आहे. ते वाढविण्याची जबाबदारी सरकारची आहे. खेळाडूंचे पालकत्व सरकारने घेतले आहे. आपले सरकार नेहमी खेळाडूंच्या पाठीशी राहील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
टोकियो ऑलिम्पिक 2021 मध्ये महाराष्ट्रातील खेळाडूंना पूर्वतयारीसाठी प्रोत्साहन म्हणून प्रत्येकी 50 लाख रुपये असे 2.50 कोटी रुपये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वर्षा येथील समिती कक्षात झालेल्या कार्यक्रमात देण्यात आले. यावेळी क्रीडा राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे, खासदार संजय राऊत, मुख्य सचिव संजय कुमार, क्रीडा विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, मुख्यमंत्र्याचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव विकास खारगे, क्रीडा विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांची उपस्थिती होती.

यावेळी शुटींग 10 मीटर एअर रायफल स्टँडींग कॅटेगरी – एस एच 1 चे खेळाडू स्वरुप उन्हाळकर (पॅरा ऑलिंपिक), शुटींग 25 मीटर स्पोर्टस पिस्टल च्या खेळाडू राही सरनोबत, शुटींग 50 मीटर रायफल थ्री पोझिशन च्या खेळाडू तेजस्विनी सावंत, आर्चरी रिकर्व्हर सांघिकचे खेळाडू प्रविण जाधव, ॲथलेटिक्स 3000 मीटर स्टिपलचे खेळाडू अविनाश साबळे यांना प्रत्येकी 50 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य वितरीत करण्यात आले.

मुख्यमंत्री म्हणाले की, ऑलिम्पिकमध्ये पदके मिळत नाहीत तर मिळवावी लागतात. खेळाडूंना परिश्रमाबरोबरच एकाग्रताही महत्वाची असते. हे राज्याचे वीर ऑलिंपिकमध्ये नेत्रदीपक यश संपादन करतील आणि राज्यासह देशाचा मान वाढवतील. निवडण्यात आलेल्या पात्र खेळाडूंनी विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक पदके मिळविली आहेत. त्यामुळे त्यांनी यशाची कमान अशीच चढती ठेवावी आणि राज्याला अभिमान वाटेल अशी कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त करुन मुख्यमंत्र्यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, निवडण्यात आलेल्या खेळाडूंना अर्थसहाय्य वितरणाचा कार्यक्रम भव्य स्वरुपात करण्याचा सरकारचा विचार होता. परंतू कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छोटेखानी पद्धतीने करावा लागत आहे. हे खेळाडू ऑलिंपिकमध्ये पदक जिंकून आल्यानंतर राज्यासह देशाला अभिमान वाटेल अशा स्वरुपाचा समारंभ आयोजित करण्यात येईल. खेळाडूंसाठी सरकार नेहमी सकारात्मक भूमिका घेत आहे. शासकीय सेवेत आरक्षण, तालुका, जिल्हा, विभागीय स्तरावर क्रीडा संकूले बांधण्यात येत आहेत. लोकसंख्येच्या प्रमाणात खेळाडू पुढे आणण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. भविष्यातही क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासराठी सरकार नेहमी प्रयत्नशील राहणार आहे. खेळाडूंच्या उज्जवल भविष्यासाठी सरकार कुठेही कमी पडणार नाही, असे श्री.पवार यांनी सांगितले.

क्रीडा राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे म्हणाल्या, महिला व मुलींना खेळामध्ये प्रोत्साहन देण्याकरिता ‘गो-गर्ल -गो’ ही योजना सुरु करण्यात आली आहे. तसेच सर्व क्षेत्रातील खेळांडूना प्रोत्साहन देण्याकरिता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यामुळे आता राज्यात जागतिक स्तरावरील प्रशिक्षक निर्माण होतील. भविष्यात सुवर्ण पदकांची लयलूट करणारे खेळाडू निर्माण होतील. राज्यात स्वतंत्र क्रीडा विभाग स्थापण्यासाठीही त्यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली, यावर मुख्यमंत्र्यांनी नक्कीच यावर विचार करण्यात येईल, असे सांगितले.

यावेळी शुटींग-25 मीटरच्या खेळाडू राही सरनोबत यांनी मनोगतात सांगितले की, आम्ही सर्व खेळाडू पदके जिंकण्यासाठी परिश्रम घेत आहोत. सरकारही पाठीशी असल्याने आम्ही कठोर परिश्रम घेऊन पदके जिंकून राज्याचा नावलौकिक वाढविण्याचा प्रयत्न करु.

यावेळी राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांनीही मनोगत व्यक्त केले. क्रीडा विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी उपस्थितांचे आभार मानले

४ वर्षात १०० कोटीची उधळण केल्यावर बीआरटी पाहणीचे नाट्य कशाला ? -नितीन कदम

0

पुणे- चार वर्षात १०० कोटीची उधळण करूनही बीआरटी पाहणीचे नाटक बंद करा ; स्वारगेट- कात्रज बीआरटी मार्ग त्वरित चालू करा, अन्यथा मार्ग काढून टाका’, अशी मागणी करीत सोमवारी (दि.२८) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पर्वती मतदार संघाच्या वतीने महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या बीआरटी पाहणी दौऱ्याच्या वेळी तीव्र निदर्शने करण्यात आली.यावेळेस दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन दत्तवाडी पोलीस स्टेशन येथे स्थानबद्ध केले.त्यानंतर तातडीने महापौरांनी 1 जानेवारी पासून स्वारगेट ते कात्रज या सातारा रस्त्यावरील बीआरटी सुरु करत असल्याचे प्रसिद्धीपत्रक माध्यमांना पाठविले.

आज सोमवारी सकाळी महापौर मुरलीधर मोहोळ, पुणे मनपा आयुक्त विक्रमकुमार तसेच पीएमपीएल व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांच्या उपस्थितीमध्ये बीआरटी वर पाहणी दौरा आयोजित केला होता. या दौऱ्याच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पर्वती मतदार संघाचे अध्यक्ष नितीन कदम, दिलीप आरूंदेकर यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हातात फलक घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी ‘बीआरटी चालू करा, भ्रष्टाचाराशी चौकशी करा’ अशी घोषणाबाजी करण्यात आली. अचानक केलेल्या या निदर्शनांमुळे प्रशासनाची एकच धावपळ उडाली.

चार वर्षांमध्ये शंभर कोटी खर्च करून अद्यापिही स्वारगेट कात्रज बीआरटी सुरू झाली नाही. पुणे मनपा आयुक्त आणि पीएमपीएलचे महाव्यवस्थापक यांच्याकडे याबाबतची वारंवार मागणी करण्यात येत होती. एवढा खर्च करून बीआरटी डेडिकेटेड लेनमध्ये धावत नसेल तर बीआरटी मार्ग काढून टाका अशी भूमिका घेण्यात आली. मात्र प्रशासनाकडून काहीही पाऊल उचलण्यात आले नाही. अखेर आज आंदोलन करून राष्ट्रवादीने आपला निषेध व्यक्त केला.

ए. आर. रेहमान यांच्या आई करीमा बेगम काळाच्या पडद्याआड

0

चेन्नई-प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान यांच्या मातोश्री करीमा बेगम यांचे निधन झाले आहे. मागील काही दिवसांपासून त्या आजारी होत्या सोमवारी चेन्नईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रेहमान यांनी आपल्या आईचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला. करीमा यांचे खरे नाव कस्तुरी होते. रेहमान यांनी आपले दिलीप कुमार हे नाव बदलून जेव्हा रेहमान केले होते, त्यावेळी करीमा यांनीही आपले नाव बदलले होते.करीमा गेल्या वर्षभरापासून आजारी होत्या. 28 डिसेंबर रोजी चेन्नई येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. करीमा बेगम यांच्यावर सोमवारी अंत्यसंस्कार होतील. रेहमान आपल्या आईच्या खूप जवळ होते. राजगोपाला कुलशेखरन यांच्यासोबत करीमा यांचे लग्न झाले होते. ते एक संगीतकार होते. रेहमान नऊ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. शेखरन यांच्या निधनानंतर आई करीमा यांनीच रेहमान यांचं संगोपन केले होते.

पुणे विभागातील ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 396

0

पुणे विभागातील 5 लाख 35 हजार 744 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 5 लाख 60 हजार 717 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे,दि.28 :- पुणे विभागातील 5 लाख 35 हजार 744 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 60 हजार 717 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 396 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 577 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.78 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.55 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 60 हजार 758 रुग्णांपैकी 3 लाख 44 हजार 912 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 7 हजार 161 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 685 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.41 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.61 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 54 हजार 100 रुग्णांपैकी 51 हजार 524 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 820 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 756 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 48 हजार 874 रुग्णांपैकी 45 हजार 13 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 153 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 708 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 47 हजार 505 रुग्णांपैकी 45 हजार 588 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 189 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 728 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 49 हजार 480 रुग्णांपैकी 47 हजार 707 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 73 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 700 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 771 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 564 , सातारा जिल्ह्यात ९६, सोलापूर जिल्ह्यात 78, सांगली जिल्ह्यात 17 तर कोल्हापूर जिल्ह्यात 16 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण –
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 807 आहे. पुणे जिल्हयामध्ये 705, सातारा जिल्हयामध्ये 0, सोलापूर जिल्हयामध्ये 68, सांगली जिल्हयामध्ये 20 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 14 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 32 लाख 60 हजार 972 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 60 हजार 717 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि. 27 डिसेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

स्वारगेट-कात्रज बीआरटी १ जानेवारीपासून : महापौर मोहोळ

0

पुणे (प्रतिनिधी)स्वारगेट ते कात्रज चौकापर्यंतच्या गेल्या काही महिन्यांपासून रखडलेल्या बीआरटी मार्गातील बहुतांशी त्रुटी दूर झाल्या असून उरलेल्या बाबी येत्या तीन दिवसांत पूर्ण करणार आहोत. त्यामुळे स्वारगेट-कात्रज हा बीआरटी मार्ग येत्या १ जानेवारीपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात येत आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

स्वारगेट ते कात्रज यादरम्यानच्या बीआरटी मार्गाची पाहणी महापौर मोहोळ यांनी महापालिका पदाधिकारी, अधिकारी यांच्या समवेत करुन या मार्गाचा ठिकठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन सविस्तर आढावा घेतला. कामाच्या पाहणीनंतर महापौरांनी बीआरटी सुरु करण्याची घोषणा केली.

पाहणीवेळी आयुक्त विक्रम कुमार, काँग्रेसचे गटनेते आबा बागुल, पीएमपीएमएलचे अध्यक्ष राजेंद्र जगताप, नगरसेवक श्रीनाथ भिमाले, प्रवीण चोरबेले, गोपाळ चिंतल, महेश वाबळे, नगरसेविका वर्षा तापकीर, स्मिता वसते, मानसी देशपांडे, मनीषा कदम, राणी भोसले, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार, वाहतूक उपयुक्त राहुल श्रीरामे, पथ विभाग प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी, विद्युतचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदुल, परिमंडळ १ च्या वाहतूकच्या वैशाली शिंदे आदी उपस्थित होते.

स्वारगेट-कात्रज बीआरटीच्या कामाची निविदा २०१६ साली काढण्यात आली होती. मात्र तांत्रिक अडचणी आल्याने २०१८ साली नव्याने ही प्रक्रिया राबवण्यात आली होती. मात्र आचारसंहिता आणि या रस्त्यावररील प्रमुख दोन उड्डाणपुलांची कामे, यामुळे बीआरटीच्या कामाला विलंब झाला. आता यातील बहुतांश त्रुटी दूर झाल्या असून उरलेली काही कामे ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येत आहेत. त्यामुळे हा मार्ग खुला करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आढावा घेतल्यानंतर महापौर मोहोळ म्हणाले, ‘तांत्रिक प्रक्रिया आणि विविध बाबींमुळे हे काम लांबले असले तरी आता त्यातील त्रुटी दूर केल्या आहेत. काम योग्यरित्या पूर्ण झाले असून १ जानेवारीपासून हा मार्ग खुला करण्यात येत आहे. या मार्गाचा फायदा या भागातील नागरिकांना उत्तमरीत्या होणार असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून प्रवास करणाऱ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे’.

31 डिसेंबर व नववर्षासंदर्भात नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना

0

मुंबई- मदत व पुनर्वसन विभागाने एका आदेशान्वये राज्यात दि. 22 डिसेंबर,2020 ते 5 जानेवारी, 2021 या कालावधीत रात्री 11.00 ते सकाळी 6.00 वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. कोविड -19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता त्याचप्रमाणे वरील आदेशान्वये दिलेल्या सूचना विचारात घेता 31 डिसेंबर 2020 व नूतन वर्षाचे स्वागत अत्यंत साधेपणाने करणे अपेक्षित आहे. त्या दृष्टीने खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत.   
1. कोरोनाच्या अनुषंगाने दि.31 डिसेंबर 2020 रोजी दिवसभर संचारबंदी नसली तरी देखील सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व दि. 1 जानेवारी 2021 रोजी नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने साजरे करावे.

            2. 31 डिसेंबरच्या दिवशी नागरिकांनी समुद्र किनारी, बागेत, रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन गर्दी न करता सोशल डिस्टन्सींग (सामाजिक अंतर) राहील तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.

            3. विशेषत: मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, मरीन लाईन्स, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटीसह राज्यातील मोठ्या शहरांमध्ये देखील अनेक ठिकाणी नागरिकांची गर्दी होत असते त्या दृष्टीने कोरोनाचा प्रादूर्भाव पाहता नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे.

            4. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 60 वर्षावरील नागरिकांनी व दहा वर्षाखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे.

            5. नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक/सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करु नये तसेच मिरवणुका काढण्यात येऊ नयेत.

            6. नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात. अशावेळी त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे. तसेच संबंधितांनी आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात.

            7. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनीप्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे.

            8. कोविड-19 या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पूनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे.

            9. तसेच या परिपत्रकानंतर 31 डिसेंबर 2020 व नूतन वर्ष सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे. अशा सूचना गृह विभागामार्फत निर्गमित करण्यात आल्या असून नागरिकांनी यांचे पालन करावे, असे आवाहन गृह विभागामार्फत करण्यात आले आहे.

प्रश्नांवर चर्चा करण्यात केंद्र सरकारला रस नाही :खा.वंदना चव्हाण

0

पुणे :’भारतातील इतर पुढारलेल्या धर्मांच्या तुलनेत मुस्लीम धर्मात साक्षरतेचे प्रमाण कमी असून समाजातील वंचित,मागास,अल्पसंख्य समुदायाला शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचे डॉ पी ए इनामदार यांचे कार्य हे अतुलनीय आहे’,असे उद्गार खासदार वंदना चव्हाण यांनी काढले.

महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी आणि ‘प्रबोधन माध्यम’ यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारे ‘डॉ. पी. ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान २०२०’ सोमवार २८ डिसेंबर रोजी सकाळी आझम कॅम्पस येथे झालेल्या कार्यक्रमात खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.या प्रसंगी खा.चव्हाण बोलत होत्या.संस्थेचे सचिव डॉ लतीफ मगदूम अध्यक्ष स्थानी होते.

माजी पोलिस अधिकारी सुरेश खोपडे, बीव्हीजी इंडिया लिमिटेड चे संस्थापक हणमंत गायकवाड , सामाजिक कार्यकर्ते जे के सराफ, अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव, घटस्फोट रोखण्यासाठी समुपदेशनाचे काम करणारे अॅड. समीर शेख यांना ‘डॉ. पी. ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान’ प्रदान करून गौरविण्यात आले.सन्मान सोहळ्याचे हे बारावे वर्ष होते. हणमंत गायकवाड यांच्या वतीने रवी घाटे यांनी सन्मान स्वीकारला.

डॉ पी ए इनामदार यांच्यावरील पोस्टाच्या तिकिटाचे अनावरण यावेळी खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी ,आझम कॅम्पस परिवारातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘डॉ. पी. ए. इनामदार कार्यक्षमता व गुणवत्ता सन्मान’ साठी प्रा.रणजित घोगले,डॉ. जालिस अहमद यांना गौरविण्यात आले. रोख रक्कम,सन्मानचिन्ह,शाल,पुष्पगुच्छ असे या सन्मानाचे स्वरूप आहे.

संयोजन समितीचे अध्यक्ष दीपक बीडकर यांनी प्रास्ताविक केले.नूरजहान शेख यांनी आभार मानले.

खासदार एड वंदना चव्हाण म्हणाल्या,’राज्यकर्त्यांना,धोरणकर्त्यांना निर्णय घेण्यासाठी साक्षरतेचे प्रमाण हा निकष महत्वाचा असतो.भारतातील साक्षरतेचा अभ्यास केला तर इतर धर्मात साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे. मुस्लीम धर्मात साक्षरतेचे प्रमाण कमी आहे.त्यामुळे वंचित,मागास आणि अल्पसंख्य समुदायाचे शिक्षण हे महत्वाचे काम असून डॉ पी ए इनामदार यांनी महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून या समुदायाच्या शिक्षणाचे केलेले कार्य हे अतुलनीय आहे.या कॅम्पस मध्ये मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतला जातो. विद्यार्थिनींची वाढती संख्या पाहून समाधान वाटते.

‘मागे पडलेले समुदाय प्रगतीकडे नेण्यासाठी,देशासमोरील प्रश्न सोडविण्यासाठी देशात पोषक वातावरण आणि संसदीय चर्चा आवश्यक असून केंद्र सरकार अधिवेशने रद्द करून ही चर्चाच टाळत आहे. या सरकारला प्रश्न विचारलेले आवडत नाहीत. जर कोणी प्रश्न विचारले तर त्याला देशद्रोही ठरवले जाते’,असेही त्या म्हणाल्या.

माजी पोलीस अधिकारी सुरेश खोपडे म्हणाले,’सद्य परिस्थितीत बोलत राहणे आणि प्रश्न विचारात राहणे आवश्यक आहे.चेहरे बदलण्यापेक्षा व्यवस्था बदलण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. शिक्षणपद्धती कालबाह्य झाली असून तिला पर्याय देणे हे आव्हानात्मक काम असून ‘कुडाची शाळा’ या प्रकल्पातून आम्ही पर्याय देण्याचे काम करीत आहोत’.

नंदिनी जाधव म्हणाल्या,’अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम ग्रामीण भागातच नव्हे तर शहरी भागातही करावे लागत आहे. शहरी भागातही बुवाबाजी,जात पंचायत आणि कौमार्य चाचणी सारख्या गोष्टी घडत आहे,हे अतिशय चिंताजनक आहे.

जे के सराफ,एड समीर शेख,रवी घाटे यांनीही मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाला अन्वर राजन,श्रीपाद ललवाणी,संदीप बर्वे,मंदार नामजोशी,डॉ मुश्ताक मुकादम,एस ए इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते.

‘महाराष्ट्र कॉस्मापॉलिटन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी हे सन्मान दिले जातात. यावर्षी डॉ.पी. ए. इनामदार यांचा ७६ वा वाढदिवस असून, सन्मानाचे बारावे वर्ष होते .

पुरस्कारार्थी  

१. सुरेश खोपडे (निवृत्त आय पी एस अधिकारी )-लोकशाही अधिकारांसाठी संघर्ष करण्याबद्दल —

२. हनमंत गायकवाड –बी व्ही जी इंडिया लिमिटेड -१०८ रुग्णवाहिका सेवेद्वारे कोविड काळात राज्यात  वैद्यकीय सेवा दिल्याबद्दल …..  

३. नंदिनी जाधव (अंधश्रद्धा निर्मुलन समिती -१८८ महिलांच्या जटानिर्मुलनाबद्दल )….

४. जे के सराफ –प्लास्टिक असोसिएशन ,मराठा चेंबर,आणि ४ ट्रस्ट च्या माध्यामतून सामाजिक कार्य …….

५. एड समीर शेख –१००० घटस्फोट समुपदेशनातून रोखल्याबद्दल ….