Home Blog Page 2160

ग्रंथालयांचा उत्तुंग वारसा सिटी लायब्ररी जपेल-आ. सिद्धार्थ शिरोळे

0

पुणे : लेखक, प्रकाशक यांच्यासह ग्रंथालयांचा उत्तुंग सांस्कृतिक वारसा महापालिकेची सिटी लायब्ररी जपेल, असा विश्वास आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी व्यक्त केला.

शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या घोले रस्त्यावर पुणे महापालिकेमार्फत राज्यातील पहिली सर्वात मोठी ‘सिटी लायब्ररी’ होणार आहे. या ‘सिटी लायब्ररी’ च्या प्रेझेंटेशनची पाहणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली.

स्वातंत्र्योत्तर काळात स्थापन झालेल्या तत्कालीन पुणे विद्यापीठातील जयकर ग्रंथालयानंतर पुण्याची ग्रंथालय परंपरा पुढे नेण्याचे काम करणारी राज्यातील पहिली ‘सिटी लायब्ररी’ घोले रस्त्यावर साकारत आहे. ५० हजारांहून अधिक ग्रंथसंपदा असणारे हे ग्रंथालय शहरातील मोठ्या सार्वजनिक ग्रंथालयांपैकी एक असेल. स्थानिक नागरिक, अभ्यासक, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी आदींसाठी महापालिकेचे हे सुसज्ज ग्रंथालय उपयुक्त ठरणार आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या घोले रस्त्यावर पुणे महापालिकेचे ‘मुद्रणमहर्षी मामाराव दाते मुद्रणालय’ आणि कोठी आहे. त्याभोवती महापौर निवास, ‘पं. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन’, ‘राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी’, क्षेत्रीय कार्यालय अशा वास्तू आहेत. या जागेचा पूर्ण क्षमतेने वापर होण्यासाठी एकत्रितपणे विकास करण्याचा प्रस्ताव महापालिकेने गेल्या अर्थसंकल्पादरम्यान मांडला होता. त्यातील मोडकळीस आलेल्या ‘मुद्रणमहर्षी मामाराव दाते मुद्रणालया’चा पुनर्विकास करून तेथील सुमारे ३५ हजार चौरस फूट जागेवर ‘सिटी लायब्ररी’ची उभारणी केली जाणार आहे.

नागरी सेवा परीक्षा, बॅंकिंग परीक्षा, लोकसेवा आयोग व अन्य स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी दरवर्षी हजारो विद्यार्थी पुण्यात येत असतात. या विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालयात संदर्भसाहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. तळमजला अधिक तीन मजले अशी रचना असलेल्या या इमारतीमध्ये सुरुवातीला एकाच वेळी किमान ४०० विद्यार्थ्यांना अभ्यास करता येणार आहे. भविष्यात ही संख्या आणखी वाढविण्याची तरतूदही इमारतीच्या आराखड्यात करून ठेवली आहे. येथे एकूण ५० हजार पुस्तके व नियतकालिके उपलब्ध असतील. ४० संगणक असलेली डिजिटल लायब्ररी हे या ‘सिटी लायब्ररी’चे वैशिष्ट्य असणार आहे.
‘मुद्रणमहर्षी मामाराव दाते मुद्रणालयाचे १५ जानेवारी पासून स्थलांतरीत करण्याची प्रक्रिया सुरु होईल व लवकरच या सिटी लायब्ररी चा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे.

”लेखक आणि प्रकाशक यांच्यासह ग्रंथालयांच्या रूपात पुण्याला उत्तुंग सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. अशा या शहराचे आपले स्वतःचे भव्य ग्रंथालय असावे, या हेतूनेच ‘सिटी लायब्ररी’ विकसित होते आहे. हे ग्रंथालय पुण्याच्या शिरपेचातील मानाचा तुरा ठरेल.” असा विश्वास आमदार शिरोळे यांनी व्यक्त केला.

यावेळी नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे, नगरसेविका निलीमा खाडे, सुनील पांडे,रवींद्र साळेगावकर, आनंद छाजेड, जय जोशी तसेच पुणे मनपाचे अधिकारी उपस्थित होते.

कोंढव्यातील क्लाऊड नाईन सोसायटीतील बंगला नं.१६ वर पोलिसांची रेड

0

पुणे- कोंढव्यात एका उच्चभ्रु सोसायटीत चालणाऱ्या एका अवैध क्लबवर अखेर पोलिसांनी रेड मारली आणि येथून पोकर व विदेशी चलनासह विदेशी दारु मोठ्या प्रमाणावर हस्तगत केला आहे. सामाजिक सुरक्षा विभाग, अंमली पदार्थ विरोधी पथक व गुन्हे शाखा यांनी ही कारवाई केली .कोंढव्यात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सर्रास सुरू असल्यामुळे यापुढे देखील हद्दीत मोठ्या कारवाया होणार असल्याबाबत पोलीस सांगत आहेत .

याबाबत अधिक माहिती अशी की, कोंढव्यातील क्लाऊड नाईन सोसायटीतील सैनिक विहार येथील बंगला नं.१६ येथे आरोपी जितेन जगदिप सिंग हा अवैध विदेशी दारु, जुगाराचे साहित्य व परकीय चलने बाळगत असल्याबाबत पुणे पोलिसांना माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारावर सामाजिक सुरक्षा विभाग वरिष्ठ पो.निरीक्षक शिल्पा चव्हाण, पो.नि.विनायक गायकवाड अंमली पदार्थ विरोधी पथक-१ व गुन्हे शाखेकडील अधिकारी यांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता लाखो रुपयांच्या विदेशी दारूच्या बाटल्या, लाखो रुपयांचे पोकर जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जवळपास ४८ लाख रुपये तसेच परकीय चलन ऑस्ट्रेलियन डॉलर व अमेरिकन डॉलर जवळपास ८ लाख रुपये असा एकूण ५८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत कोंढवा पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

‘श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये’ सिरीजच्या दुसऱ्या पर्वात श्रीपादांच्या बाल लीला!

0

‘श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये’  या ‘वेब सिरीज’चे पहिले पर्व २० भागांचे होते, त्यात ‘श्रीपाद श्रीवल्लभ’ यांच्या जन्माचे प्रयोजन आणि बापनाचार्य, सुमती महाराणी, अपलराज शर्मा यांच्या करावी श्री दत्त महाराजांनी त्यांच्याच अवताराची योजना कशी अमलात आणवून घेतली हे पहायला मिळाले. त्याच बरोबरीने तत्कालीन पिठापूर मधील ब्राम्हण सभेचे अध्यक्ष नरसावधानी हे स्वतः दत्त भक्त असून देखील श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या जन्माविषयी संपूर्ण पिठापुरात बापनाचार्य, सुमती महाराणी आणि अपलराज शर्मा यांच्या विरोधात सूर लावून त्यांना पिठापूर मधून कायमचे हद्दपार करण्याची भूमिका घेतली, परंतु श्रीपाद यांचा जन्म ठरल्याप्रमाणे झाला, त्यामुळे नरसावधानी यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्यांच्या करवी अक्षम्य अशा चुका होत गेल्या हे पहायला मिळाले.

या वेब सिरीजच्या दुसऱ्या पर्वात आपल्याला श्रीपाद राजे यांच्या जन्मानंतर दोन वर्षांचे झाल्या नंतर च्या घटना आणि बाल श्रीपादांच्या लीला पहायला मिळणार आहेत. यात स्वतः श्रीपाद राजे यांच्या साठी दुधाची समस्या निर्माण होते आणि त्या समस्ये चे निराकरण करण्यासाठी त्यांचे आप्तेष्ट कोणकोणत्या मार्गांनी टी समस्या सोडवायचा प्रयत्न करतात हे पाहायला मिळेल, त्याच प्रमाणे दुसरीकडे नरसावधानी सोबत श्रीपाद राजेंचा विरोध करीत त्यांचे अस्तित्व अमान्य करीत कोण कोण काय काय व्यूह रचतात ते पहायला मिळेल. आणि सरते शेवटी या सर्व प्रतिकूल परिस्थितीतून सुमती महाराणी आणि बापनाचार्य श्रीपादांच्या नामाने कसे निभावून नेतात ते अनुभवायला मिळेल.

साधारण ७०० वर्षांपूर्वीचा काल दाखविणाऱ्या या संपूर्ण सिरीजचे शुटींग कोकणातील निसर्गरम्य वातावरणात सुरु असून तिथले ग्रामस्थहि या दत्त भक्ती चा आनंद घेत आहेत. या सिरीज चे निर्माते आणि दिग्दर्शक असित रेडीज यांनी कोकणातील अनेक कलाकारांची निवड या सिरीज मधील पात्रांसाठी केली आहें. कोकणातील या कलाकारांचे चेहरे प्रेक्षकांसाठी नवीन असल्यामुळेच या मालिकेतील व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात घर करू लागल्यात.

या मालिकेच्या चित्रीकरणासाठी अडीचशे वर्षांपुर्वीचा वाडा, प्राचीन मंदिरे, नद्या, डोंगर, जंगले अशी खरी खुरी स्थळे निवडली आहेत.

यातील सादरीकरणाच्या खरेपणामुळेच कि काय प्रेक्षक दुसऱ्या पर्वाची अगदी आतुरतेने वाट पहात होते. प्रेक्षकांच्या उंचावलेल्या अपेक्षा आणि वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन या मालिकेचे दुसरे पर्व अल्प विश्रांती नंतर लगेच प्रेक्षकांच्या भेटीला आणले गेले आहें. दुसऱ्या पर्वातील ११ भागांमध्ये श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या बाल रूपातील लीला पहायला मिळतील. तेव्हा पहायला विसरू नका “श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये” …आपल्या “अवधूत चिंतन” या ओटीटी व्यासपीठावर.

मुंबईकरांना दुधखुळे समजणे बंद करावे – मुंबई भाजपचा अदित्य ठाकरे यांना टोला..

0

मेट्रो २ आणि ३ चे काम जलद गतीने सुरु – शिवसेनेचा दावा…

मुंबई- मेट्रो २ आणि ३ चे काम जलद गती ने सुरु असल्याचा दावा सत्ताधारी नेत्यांकडून केला जात आहे. हा दावा किती फोल आहे. हे सांगणारे ट्विट मुंबई भाजपच्या ट्विटर हॅंडल वरून करण्यात आले आहे.

आदित्य ठाकरे यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मेट्रो २ आणि ३ चे काम जलद गतीने सुरु आहे तसेच हे काम २०२३ रोजी पूर्ण होणार असल्याचा दावा त्या मुलाखतीत केला आहे. त्याचा व्हिडीओ शिवसेनेच्या ट्विटर हॅंडल वर टाकण्यात आले आहे. याला मुंबई भाजपने प्रतिउत्तर दिलं असून त्या ट्विट मध्ये मुंबईकर गेली २ वर्ष ज्या मेट्रोच्या प्रतिक्षेत आहेत त्या मेट्रोच्या कामाला केवळ बालहट्ट पुरवण्यासाठी स्थगिती दिली आहे, कामाला जस जसा विलंब होत आहे तसा खर्चही दिवसागणिक वाढत चालला आहे. हे सर्वसामान्य मुंबईकर जाणतो. अदित्य ठाकरे यांनी मुंबईकरांना दुधखुळे समजणे बंद करावे असा टोला मुंबई भाजपाच्या ट्विटमध्ये लगावण्यात आला

वंचित आणि बहुजनांसाठी कै.गोपीनाथराव मुंडे यांचे कार्य अविस्मरणीय – राजेश पांडे

0

गोपीनाथरावांच्या जयंती निमित्त मनपा शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य व नेत्रतपासणी मोहीम – सौ. मंजुश्री खर्डेकर

पुणे-वंचित आणि बहुजनांसाठी कै.गोपीनाथराव मुंडे यांचे कार्य अविस्मरणीय असल्याचे मत भाजपा चे संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांनी व्यक्त केले. गोपीनाथरावांनी भारतीय जनता पक्ष हा सामान्यांपर्यंत नेला आणि आज भाजपा सर्वत्र सत्तेवर आहे, पक्षाला स्वर्णिम दिवस बघायला मिळत आहेत त्यामागे मुंडे साहेबांचा मोठा वाटा असल्याचे ही त्यांनी सांगितले. कै. गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती निमित्ताने शिक्षण समिती अध्यक्ष, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी मोहीम राबविण्याचा निर्धार केला आहे, या उपक्रमाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिक्षण समिती अध्यक्ष, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,भाजप चे शहर सरचिटणीस दीपक पोटे, शहर प्रवक्ता संदीप खर्डेकर, नगरसेवक जयंत भावे, शहर चिटणीस प्रशांत हरसुले,प्रभागातील सरचिटणीस निलेश गरुडकर, ऍड. प्राची बगाटे,महिला मोर्चा अध्यक्ष हर्षदा फरांदे, महिला मोर्चा सरचिटणीस केतकी कुलकर्णी, उपाध्यक्ष पल्लवी गाडगीळ,उपाध्यक्ष जयश्री तलेसरा,सहकार आघाडीचे सरचिटणीस शंतनू खिलारे, महिला मोर्चा आय टी प्रकोष्ठ च्या शहर संयोजिका कल्याणी खर्डेकर, उद्योग आघाडीचे उपाध्यक्ष रामदास गावडे, पंडित दीनदयाळ उपाध्याय शाळेच्या मुख्याध्यापक एलिझाबेथ काकडे,नयनतारा आय क्लिनिक च्या डॉ. मेधा परांजपे,युवा मोर्चा उपाध्यक्ष प्रतीक खर्डेकर,सहाय्य्क ज्योती पवार यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मंजुश्री खर्डेकर यांनी हाती घेतलेला उपक्रम स्तुत्य असून पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याच्या संकल्पाला अनुसरून आहे, असेच सेवा आणि त्यागाची परंपरा गोपीनाथरावांनी जोपासली व आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती चे काम ते करत असत अश्या आठवणी ही राजेश पांडे यांनी जगविल्या व विद्यार्थ्यांच्या आरोग्य व नेत्र तपासणीच्या उपक्रमासाठी सी एस आर मधून निधी उपलब्ध करून देऊ असेही ते म्हणाले. गोपीनाथराव मुंडे यांचे सामान्यांसाठी चे कार्य अफाट होते व ते नेहमीच लोकांपर्यंत जे नाही ते पोहोचावे यासाठी आग्रही असत असे सांगतानाच मंजुश्री खर्डेकर यांनी कोरोना काळात शाळा बंद असल्याचा फटका विद्यार्थ्यांना बसल्याचे सांगितले.ऑनलाईन शाळेमुळे विद्यार्थी स्मार्टफोन चा अतिरेकी वापर करत असून त्याचा परिणाम मुलांच्या डोळ्यावरच नव्हे तर एकूण आरोग्यावर होतं असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात, म्हणून आत्ता सातवी, आठवी नववी च्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व शाळा सुरु झाल्यावर सर्व विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीवर भर देत असल्याचे शिक्षण समिती अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या. कै. मा. ग. आचवल ट्रस्ट, क्रिएटिव्ह फाउंडेशन व नयनतारा आय क्लिनिक च्या वतीने ही शिबीरे आयोजित करत असल्याचे संदीप खर्डेकर म्हणाले. गोपीनाथराव मुंडे साहेबांचा आणि माझा कौटुंबिक स्नेह होता व साहेब हे स्वभावाने अतिशय हळवे होते,ते सतत कार्यमग्न असत व सेवाकार्याला प्राधान्य देत असत म्हणून त्यांच्या प्रत्येक जयंती व पुण्यतिथीला सामान्यांना केंद्रबिंदू मानून विविध उपक्रम आयोजित करतो असे भाजप प्रवक्ता व क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक जयंत भावे व महिला मोर्चा अध्यक्ष हर्षदा फरांदे यांनी देखील मनोगत व्यक्त केले. सौ. मंजुश्री खर्डेकर यांनी प्रास्ताविक केले, संदीप खर्डेकर यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.

गोव्यात पणजी येथे सातव्या भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचे केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांच्या हस्ते उद्घाटन

0

पणजी-केंद्रीय  विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि भूविज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी गोव्यात पणजी येथे सातव्या भारतीय  आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचे (IISF-2021) उद्घाटन करताना युवकांना नाविन्यपूर्ण स्टार्ट-अप्सद्वारे भारताला 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी नेतृत्व करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की येत्या काही वर्षांत विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगती भारताला जगातील आघाडीचा देश बनण्यासाठी चालना देईल.

डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (IISF) मालिका भारतातील शाश्वत विकास आणि नवीन तंत्रज्ञान विषयक नवकल्पनांसाठी वैज्ञानिक रुची विस्तारण्याच्या भारताच्या दीर्घकालीन दृष्टीकोनाचा अविभाज्य भाग आहे. विज्ञान हा केवळ संशोधनाचा विषय राहिला नसून उत्सवाचे रूप धारण केले आहे. तरुणांना विश्लेषणात्मक विचार करण्यासाठी प्रेरित करण्यासाठी  भारतातील प्रत्येक शहरात आणि गावात विज्ञान महोत्सव साजरा करण्याची गरज आहे असे डॉ. सिंह म्हणाले.

डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, या वर्षी भारत स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव म्हणून साजरे करत आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तो साजरा करण्यासाठी पाच स्तंभांची कल्पना मांडली आहे, ज्याचे प्रतिबिंब IISF 2021 मध्ये विविध कार्यक्रमांतून दिसून येईल. भारत स्वातंत्र्याची पंचाहत्तरी साजरी करत असताना पुढील 25 वर्षांसाठी जेव्हा भारत स्वातंत्र्याचा शतक महोत्सव साजरा करेल, त्यासाठी वैज्ञानिक प्रगतीची रूपरेषा आखण्याची ही   वेळ आहे असे सिंह म्हणाले.

भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान चित्रपट महोत्सव

भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान चित्रपट महोत्सव हा विज्ञान महोत्सवाचा भाग म्हणून साजरा केला जातो.महोत्सवादरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेले आणि पुरस्कारप्राप्त विदेशी आणि भारतीय चित्रपट दाखवले जातील. ISFFI मध्ये दोन स्पर्धा विभाग आहेत; (i) ‘प्रत्येकासाठी विज्ञान’, आणि (ii) ‘भारतीय विज्ञान@75’

विज्ञान साहित्य महोत्सव आणि इतर कार्यक्रम

वैज्ञानिक वसाहतवादाच्या विरोधात भारतीयांना जागृत करण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व भारतातील वैज्ञानिक आणि वैज्ञानिक साहित्याच्या भूमिकेवर विज्ञान साहित्य महोत्सव भर देणार आहे.

IISF मधील इतर प्रमुख कार्यक्रम म्हणजे सायन्स व्हिलेज, पारंपारिक हस्तकला आणि कारागीर संमेलन, खेळ आणि खेळणी, ग्लोबल इंडियन सायंटिस्ट आणि टेक्नोक्रॅट्स फेस्ट, इको फेस्ट, आधुनिक तंत्रज्ञान आणि मेगा विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रदर्शन

आयआयएसएफ -IISF चे उद्दिष्ट संपूर्ण भारतातील तरुण विद्यार्थी, शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांना ज्ञान आणि कल्पनांच्या देवाणघेवाणीसाठी एक व्यासपीठ प्रदान करणे तसेच  ‘स्वच्छ भारत अभियान’, ‘स्वस्थ भारत अभियान’, ‘मेक इन इंडिया’, ‘डिजिटल इंडिया’ , स्मार्ट व्हिलेज’, ‘स्मार्ट सिटीज’ ‘नमामि गंगे’, ‘उन्नत भारत अभियान’ या गेल्या सात वर्षांत पंतप्रधानांनी सुरू केलेल्या प्रमुख कार्यक्रमांना उजाळा देणे हे आहे.

भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवचे (IISF) आयोजन  विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, भू विज्ञान मंत्रालय आणि  विज्ञान भारती यांनी केले आहे. भू  विज्ञान मंत्रालयाचे राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्र (NCPOR) ही IISF 2021 चे आयोजन करणारी नोडल एजन्सी आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय आयुष आणि बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन, विज्ञानभारतीचे अध्यक्ष डॉ. विजय भटकर आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि अधिकारी या  उद्घाटन समारंभात सहभागी झाले होते.

८ लाख गाडी मालकांना ई-चलनाच्या नोटिसा दिल्यावर राष्ट्रीय लोक अदालतीत तुडुंब गर्दी

0

प्रकरणे निकाली काढण्यासाठी १२५ पॅनल उपलब्धलोक अदालतीमध्ये  पुणे येथील ५३ हजारापेक्षा जास्त प्रलंबित प्रकरणेई-चलनाद्वारे तडजोडीची व दंडाची रक्कम भरून घेण्याची व्यवस्था

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधीश संजय देशमुख म्हणाले ,तडजोडीने वाद सोडविण्यासाठी लोक अदालत महत्वूपर्ण ठरेल

पुणे,दि.11: प्रलंबित प्रकरण सामंजस्याने व तडजोडीने आपसात मिटविण्यासाठी राष्ट्रीय लोकअदालत महत्वूपर्ण ठरेल, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधीश तथा विधी सेवा प्राधिकरण पुणेचे अध्यक्ष संजय देशमुख यांनी केले.   जिल्हा व सत्र न्यायालयात आज राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या सूचनेनुसार आयोजित राष्ट्रीय लोक  अदालतीच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा न्यायधीश एस.एस.गोसावी, जिल्हा न्यायधीश के.पी.नांदेडकर, विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर प्रताप सावंत, जिल्हा सरकारी वकील एन.डी.पाटील, पुणे वकील बार आसोसियशनचे उपाध्यक्ष योगेश तुपे आदी उपस्थित होते.

            श्री. देशमुख म्हणाले, लोक अदालतीच्या माध्यमातून अधिकाधीक प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात येतात. यापुर्वीही लोक अदालतीच्या माध्ममातून प्रकरणे निकाली काढण्यात पुणे जिल्हा अग्रेसर आहे. मतभेद असले तरी मनभेद नसावेत. त्यामुळे सामंजस्याने वाद मिटविण्यासाठी लोक अदालत अत्यंत महत्त्वाची ठरते, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात  लोक अदालतीच्या माध्यमातून अधिकाधिक प्रकरणे निकाली निघतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

श्री.नांदेडकर म्हणाले, लोक अदालतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रकरणे निकाली कसे निघतील व न्याय कसा पोहचेल यासाठीच प्रयत्न असावेत. लोक अदालतीमध्ये पुणे जिल्हा राज्यात अग्रस्थानी आहे, देशातही अग्रस्थानी कसा राहील, यासाठी सर्व मिळून प्रयत्न करावे.

श्री. सावंत म्हणाले,लोक अदालतीमध्ये  पुणे येथील ५३ हजारापेक्षा जास्त प्रलंबित प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहेत. राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ई-चलनाद्वारे तडजोडीची व दंडाची रक्कम भरून घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. राष्ट्रीय अदालतीसाठी ८ लाख गाडी मालकांना ई-चलनाच्या नोटिसा पाठविण्यात आल्या असून त्यांच्यावर २५ लाखांची अनपेड चलन आहेत. याशिवाय ग्रामपंचायत, बँक, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच्या वादपुर्व कर वसुलीचे एक लाखापेक्षा जास्त प्रकरणे ठेवली आहेत. या लोक अदालतीच्या माध्यमातून प्रकरणे निकाली काढण्यासाठी १२५ पॅनल उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली.

अखेर ‘बॅन लिपस्टिक’चा उलगडा झाला

0


‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर झळकली ‘अनुराधा’

काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘मी लिपस्टिकचे समर्थन करत नाही’ असे म्हणत अभिनेत्री आपली लिपस्टिक पुसत ‘बॅन लिपस्टिक’चा संदेश देत होत्या. हे नक्की काय प्रकरण आहे, याची सर्वत्र चर्चा रंगली होती. अभिनेत्रींच्या या अशा व्हिडीओमुळे लोकांच्या मनात संभ्रम आणि उत्सुकता निर्माण झाली होती. लोकांच्या मनात अनेक प्रश्न होते. अखेर या प्रश्नाचा उलगडा झाला असून त्याचे कारण आपल्या समोर आले आहे. संजय जाधव दिग्दर्शित ‘अनुराधा’ ही ७ भागांची वेबसिरीज ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’, व्हिस्टास मीडिया कॅपिटलवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे आणि त्याच्याच प्रमोशनचा हा एक भाग होता. या वेबसीरिजमध्ये तेजस्विनी पंडित, सोनाली खरे, सुकन्या कुलकर्णी मोने, सचित पाटील, सुशांत शेलार, विद्याधर जोशी, स्नेहलता वसईकर, संजय खापरे, आस्ताद काळे, विजय आंदळकर, चिन्मय शिंत्रे, वृषाली चव्हाण यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आता या सर्व अभिनेत्री लिपस्टिकचे समर्थन का करत नाही, लिपस्टिकचा आणि या वेबसिरीजचा काय संबंध, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या वेबसिरीजमध्ये दडलेली आहेत. नुकताच या वेबसिरीजच्या पोस्टर आणि टिझर प्रदर्शनाचा कार्यक्रम पार पडला. टिझरमध्ये तेजस्विनीचा बोल्ड अंदाज दिसत असून तिच्या वेगवेगळ्या व्यक्तिरेखा दिसत आहेत. हे रहस्य काय आहे, हे लवकरच आपल्या समोर येईल.‘अनुराधा’च्या निमित्ताने संजय जाधव वेबसीरिजच्या विश्वात पदार्पण करत असून हिरालाल दाफडा आणि आकाश दाफडा यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. या वेबसीरिजचे लेखन संजय जाधव, वैभव चिंचळकर यांचे असून पंकज पडघम यांचे संगीत लाभले आहे. तर संकलनाचे काम अपूर्वा मोतीवाले सहाय यांनी पाहिले असून कला दिग्दर्शक सतीश चिपकर आहेत.

आपल्या या पहिल्या प्रोजेक्टबाबत दिग्दर्शक संजय जाधव म्हणतात, ‘’ आजवर अनेक चित्रपट केले आहेत प्रथमच वेबसीरिज करत आहे. त्यामुळे प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा मिळतो, यासाठी उत्सुकही आहे. एकंदरच संमिश्र मनःस्थिती आहे. आनंद या गोष्टीचा आहे की माझ्या आवडत्या टीमसोबत मी नवीन प्रोजेक्ट करतोय. आशा आहे प्रेक्षकांना माझा हा नवा प्रयत्न नक्कीच आवडेल.’’

‘अनुराधा’ वेबसिरीजबाबत ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ” ही वेबसिरीज थोडीशी वेगळी आहे. याचा जॉनर सस्पेंस आणि थ्रिलर असून संजय जाधव सारख्या कसलेल्या दिग्दर्शकाने याचे दिग्दर्शन केले आहे. यातील नाट्यथरार प्रेक्षकांना स्तब्ध करणारा असून अतिशय वेगळ्या पद्धतीने याचे प्रमोशन करण्यात आले आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या वेबसिरीजमध्ये नक्की काय पाहायला मिळणार याची उत्सुकता निर्माण झाली. या वेबसिरीजमध्ये लिपस्टिकची नक्की काय भूमिका आहे, यासाठी प्रेक्षकांना प्लॅनेट मराठी ओटीटीवर ही वेबसिरीज पाहावी लागेल. अशा अनेक नवनवीन आणि उत्तमोत्तम वेबसिरीज आम्ही प्रेक्षकांसाठी आगामी काळात घेऊन येणार आहोत.”

एकाने आरे म्हटले तर दुसऱ्यालाही कारे म्हणता येते …उपमुख्यमंत्री नेमके कोणाला काय म्हणाले पहा व्हिडीओ

0

पुणे- मुंबई च्या महिला महापौरांबद्दल काय वक्तव्य केले गेले ते सर्वांना ठाऊक आहे त्या महिला महापौरांनी तिकडे तक्रार केली तर त्याला राजकारण म्हणायचे, आणि (पुणे) इथे सत्तेवर असलेल्या लोकप्रतिनिधींवर तक्रार झाली तर आमचा काही संबंध नाही, संस्थेचा आहे म्हणायचे.. एकाने आरे म्हटले तर दुसऱ्याला कारे म्हणता येते ..प्रत्येकाने तारतम्य ठेवून बोलावे,कोणताही घटक, समाज दुखावणार नाही याची काळजी घ्यावी… अशी गर्भित सूचना देत दुसरा लसीचा डोस टाळणाऱ्यावर काय कारवाई करायची ते पुढील बैठकीत ठरवणार …असाही इशारा आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे दिला

आज पुण्यात विविध विषयांवर अजित पवार यांनी बैठका घेतल्या दुपारी दरम्यान पत्रकारांशी संवाद साधला तेव्हा ते म्हणाले पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पहिल्या डोसचे 100 टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे.मात्र दुसरा डोस घेण्यास काहीजण टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत आहे. विशेषतः ग्रामीण भागात बारामती ,इंदापूर, दौंड अशा काही ठिकाणी अनेक जण दुसरा डोस घेण्यास उत्सुक असलेले दिसत नाहीत. त्या भागात दुसरा डोस देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत असे आदेश प्रशासनाला दिले आहेत. मोबाईल व्हॅनद्वारे देखील प्रयत्न सुरू आहेत. यावर देखील नागरिकांनी सहकार्य केले नाही तर प्रशासन कठोर निर्णय घेणार आहे, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात बोलताना दिला.पहिला डोस पूर्ण करून दुसरा देण्यासाठी अग्रभागी लसीकरणात एक नंबर ला मुंबई आणि 2 नंबर ला पुणे आहे.दोन्ही डोस प्रथम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे त्यानंतर बूस्टर तिसरा डोस द्यायचे झाले तर सिरम त्याबाबत सहकार्य करू शकेल मात्र तिसरा डोस द्यायचा कि नाही याबाबत केंद्राच्या सूचना घ्याव्या लागतील.

संपूर्ण पत्रकार परिषद

महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रस्तावित शक्ती कायदा प्रभावी ठरेल – विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

0

मुंबई, दि. 10 : अनेक महिलांना आजही विविध संकटांना सामोरे जावे लागते. शिक्षणाचे प्रमाण वाढते आहे. आजही महिलांनी आपल्या अधिकार आणि हक्कांबाबत जागृत रहावे. महिलांचे अत्याचारांपासून संरक्षण करण्यासाठी कायदे आहेत. या कायद्यांबाबत विविध पातळ्यांवर जनजागृतीची गरज आहे, असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.

स्त्री आधार केंद्रातर्फे जागतिक महिला हिंसाचारविरोधी पंधरवड्यानिमित्त “महिला सक्षमीकरण व महिलांची सुरक्षितता” या विषयावर चर्चासत्राचा समारोप झाला. यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या नवीन शक्ती कायद्याबाबत चर्चा करण्यात आली, त्यावेळी डॉ.गोऱ्हे बोलत होत्या.

उपसभापती डॉ.गोऱ्हे म्हणाल्या की, महिलांना उद्भवणाऱ्या कौटुंबिक समस्या व त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायासंदर्भात त्यांना वेळोवेळी समुपदेशन व कायदे विषयक मार्गदर्शनासाठी विविध उपक्रम राबविले जातात. महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये पीडित महिलेचे काय म्हणणे आहे हे ऐकले पाहिजे. महिला जेंव्हा अन्यायाबाबत सांगत असतात तेंव्हा या अन्यायाबाबत कोणत्या  कायद्याद्वारे त्यांना न्याय, आधार मिळू शकतो. याबाबत कोणकोणत्या उपाययोजना करता येतील. यासंदर्भात त्यांना माहिती देणे गरजेचे आहे.

प्रस्तावित शक्ती कायद्यासंदर्भात डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, शक्ती कायद्यात समाज माध्यमांमधुन महिलांना धमकावणे व बदनामी करणे, समाजमाध्यम, इंटरनेट व मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी तपास कार्यात सहकार्य न करणे, हे समाविष्ट करण्यात आले आहे. शिक्षेचा कालावधी वाढविला आहे. गंभीर प्रकरणी मृत्युदंड प्रस्तावित केला आहे. फौजदारी प्रक्रियेमध्ये बदल सुचविले आहे. या कायद्यामुळे महिलांना सुरक्षितपणे जगण्यासाठी न्यायाची शक्ती मिळणार आहे. साक्षिदारांना संरक्षण, मनोधैर्य योजनेची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी या सगळ्या मुद्द्याच्या आधारे शक्ती कायदा हा प्रभावी ठरेल असेही डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.

या चर्चासत्रात स्त्री आधार केंद्राच्या अपर्णा पाठक यांनी केशरी दिवस संस्कृती व कार्यपद्धती याबाबत माहिती दिली. पोलीस अधीक्षक सोलापूर (ग्रामीण) तेजस्वीनी सातपुते यांनीही महिलांविषयी कायदे याबाबत माहिती देतानाच स्त्रियांनी सतर्क राहणे आवश्यक असल्याचे सांगितले. आश्विनी शिंदे, प्रज्वला,गौतमी धावरे यांनी अनुभव कथन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विभावरी कांबळे यांनी केले तर अनिता शिंदे यांनी आभारप्रदर्शन केले.

सोमवारपर्यंत कामावर येणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेणार – परिवहनमंत्री ॲड.अनिल परब

0

मुंबई, दि. १० : विलिनीकरणाच्या मागणीसाठी संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी तातडीने सेवेत रूजू व्हावे. रूजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर पूर्वलक्षीप्रभावाने कोणतीही कारवाई केली जाणार नाही.‍ तथापि, संपकाळात ज्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली आहे, असे आवाहन करीत कर्मचारी सोमवारपर्यंत कर्तव्यावर हजर झाल्यास त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई रद्द करण्यात येईल, असे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी निलंबित कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.

एसटी महामंडळचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. गेल्या एक महिन्यांहून अधिक काळ संप सुरु आहे. यासंदर्भात परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष, ॲड. अनिल परब यांनी  राज्यभरातील आगारातील गाड्यांचा तसेच कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचा आढावा घेतला.

परिवहन मंत्री ॲड. परब म्हणाले, दि. २० डिसेंबर रोजी उच्च न्यायालयात संपाबाबत सुनावणी होणार आहे. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने नेमलेली समिती प्राथमिक अहवाल सादर करणे अपेक्षित आहे. विलिनीकरणासंदर्भातील अंतिम अहवाल १२ आठवड्यापर्यंत म्हणजेच सुमारे २० जानेवारी २२ पर्यंत उच्च न्यायालयाला सादर करण्यात येईल. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेबाबत कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करावा.

संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय बाब म्हणून कारवाई करण्यात आली आहे. तथापि, जे कर्मचारी कामावर येण्यास तयार आहेत त्यांना सकारात्मक वातावरणामध्ये कामावर रूजू करून घेण्यासाठी निलंबनासारखी अप्रिय कारवाई मागे घेण्याबाबत एसटी महामंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

या संधीचा लाभ घेऊन निलंबित कर्मचाऱ्यांनी मुख्य प्रवाहात सामिल व्हावे. जेणेकरून संबंधिताना भविष्यात कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागणार नाही, असेही मंत्री ॲड. परब  यांनी सांगितले.

संपामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आदींना नाहक त्रास होत आहे. त्यांना एसटीची सेवा मिळावी यासाठी आम्ही त्यांना बांधील आहोत. प्रवासी हे आपले ग्राहक आहेत. हा ग्राहक आपल्यापासून तुटू नये यासाठी कर्मचाऱ्यांनी समजूतदारपणा दाखवून संप मागे घ्यावा, असे आवाहन परिवहन मंत्री ॲड. परब यांनी केले आहे.

मध्यवर्ती पेठांतील रस्ते २० जानेवारीपर्यंत होणार पूर्ववत-हेमंत रासने

0

पुणे-मध्यवर्ती पेठांतील महत्त्वाचे रस्ते २० जानेवारीपर्यंत पूर्ववत होतील अशी ग्वाही स्थायी समितीचे अध्यक्ष आणि स्थानिक नगरसेवक हेमंत रासने यांनी दिली.

केळकर रस्ता आणि टिळक रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ आज रासने यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. नगरसेविका गायत्री खडके, माजी नगरसेवक दीलीप काळोखे, कसबा मतदारसंघाचे भाजपचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे, उदय लेले, किरण जगदाळे, दीलीप पवार, निलेश कदम, मनिष जाधव, सौरभ रायकर, अनिल बेलकर, विनायक रासने, संकेत थोपटे, परेश मेहेंदळे, योगिता गोगावले, रीना सपकाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

रासने म्हणाले, मध्यवर्ती पेठांच्या भागात मुख्य बाजारपेठ असल्याने, तेथे दररोज मोठ्या प्रमाणात रहदारी असते. त्यामुळे गेली पंचेचाळीस वर्षे या भागातील पाणीपुरवठा आणि मैलापाण्याचे वहन करणार्या वाहिन्या बदलताना मर्यादा येत होत्या. कोविडमुळे निर्माण झालेल्या टाळेबंदीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच बाजारपेठ बंद होती. त्या काळात समान पाणीपुरवठा, मैलापाणी वहन, एमएनजीएल पुरवठा, इंटरनेट कंपन्या यांच्या वाहिन्या आणि केबल्स टाकण्याची विकासकामे तातडीने पूर्ण करण्यात आली. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात खोदाई करावी लागल्याने रस्त्यांची दुरावस्था झाली होती. या पूर्वी निकृष्ट कामांमुळे रस्त्यांची दुरावस्था होत होती. आता सर्व प्रमुख रस्ते पूर्ववत करण्यासाठी नियोजनबद्ध काम सुरू करण्यात आले आहे.

रासने म्हणाले, गेल्या महिन्यात आयुक्त विक्रम कुमार आणि महापालिका अधिकार्यांसोबत या भागातील विविध विकासकामांची पाहाणी करण्यात आली होती. त्यानुसार विकासकामांचे कालबद्ध नियोजन करण्यात आले आहे. महात्मा फुले मंडईसमोरील मेट्रोचे काम, दक्षिणमुखी मारूती मंदिर चौकातील रस्त्याची कामे, शनिवारवाड्याच्या पिछाडीचा भाग, शुक्रवार पेठ, सुभाष नगर, बाजीराव रस्ता परिसरातील समान पाणीपुरवठा योजनेसंदर्भातील विकासकामे, हिराबाग चौकातील वर्षानुवर्षे पडलेली बेवारस वाहने उचलणे आदी कामे पूर्ण करण्यात आली आहेत. सदाशिव पेठ, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्ता परिसरातील रस्ता डांबरीकरणाची कामे टप्प्‌याटप्प्याने हाती घेण्यात आली असून, ती २० जानेवारीपर्यंत पूर्ण होतील.

सदाशिव पेठ-शनिवार पेठ या प्रभागाला एक एकक मानून विविध प्रकारची विकासकामे खात्यांतर्गत समन्वयातून पूर्ण करण्यात यावीत यासाठी १३ नोव्हेंबर रोजी आयुक्त विक्रम कुमार यांच्या समवेत या भागातील समस्या आणि विकासकामांची माहिती घेण्यासाठी दौरा आयोजित करण्यात आला होता. जशा समस्या या प्रभागात आहेत तशाच त्या अन्य ४१ प्रभागांमध्ये आहेत. या दौर्यातून विकासाचा आराखडा तयार करण्यात आला असून, त्याची नियोजनबद्ध अंमलबजावणी सुरू केली आहे. पुणेकरांना गुणवत्तापूर्ण, दर्जेदार मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी अन्य प्रभागांमध्ये या आराखड्याची अंमलबजावणी करावी असे आदेश प्रशासनाला दिल्या असल्याचे रासने यांनी सांगितले.

आंतरराज्य बनावट औषध खरेदी व विक्री करणाऱ्यांवर कारवाई

0

मुंबई, दि. 10 : अन्न व औषध प्रशासनाने आंतरराज्य बनावट औषध खरेदी व विक्री करणाऱ्या घाऊक औषध विक्रेत्यांवर कारवाई करुन औषधसाठा जप्त केला आहे.  अन्न व औषध प्रशासन यांनी गुप्तवार्ता विभागास व मे. इंटास फार्मासुटीकल प्रा. लि.या उत्पादकाने दिलेल्या तक्रारी अनुषंगाने Gobucel Injection,10% (Intravenous Human Normal Immunoglobulin for Intravenous Use IP 10%) Batch No.97130072, M/s Intas Pharmceuticals, Ahemdabad या औषधासारखे बनावट औषध देशातील काही राज्यात विक्री होत असल्याच्या गोपनीय माहिती आधारे मे. जोगेश्वरी फार्मा, घाटे कॉम्प्लेक्स, चाळीसगाव जिल्हा जळगाव या घाऊक औषध विक्रेत्याकडे गुप्तवार्ता विभाग व जळगाव कार्यालयाच्या पथकाने दि.०४ डिसेंबर २०२१ रोजी चौकशीसाठी छापा टाकला असता या पेढीने संशयित बनावट औषधाचा २२० वायल्स इतका साठा चंडीगड येथून विनाखरेदी बिल प्राप्त केला व  त्याची विक्री औषध विक्रीचा परवाना नसलेल्या पंजाब येथील मे. श्रीक्रिधा इंटरनॅशनल हेल्थकेअर या पेढीस करण्यात आल्याचे आढळून आले.

या प्रकरणी पुढील चौकशीत मे. जोगेश्वरी फार्मा, घाटे कॉम्प्लेक्स,चाळीसगाव या पेढीने मंजूर असलेल्या जागेतून विनापरवाना जागेत स्थलांतरण केले असल्याचे देखील आढळून आले. त्यामुळे कारवाईच्या वेळेस उपलब्ध असलेला अंदाजे रू २.७७ लक्ष किमतीचा इतर औषधसाठा पंचानाम्यांतर्गत जप्त करण्यात आला.

या प्रकरणी मे.जोगेश्वरी फार्मा, घाटे कॉम्प्लेक्स, चाळीसगाव या पेढीने खरेदी बिलाशिवाय संशयित बनावट  Gobucel Injection 10% ची खरेदी करून त्याची विक्री औषध विक्रीचा परवाना नसलेल्या पेढीस केली असल्याने पेढीचे मालक जितेंद्र प्रभाकर खोडके व मे. श्रीक्रिधा इंटरनँशनल हेल्थकेअर चे मालक सुनील ढाल यांचे विरुद्ध भा. द. वि. च्या विविध कलमाखाली चाळीसगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्र. ४४६/२०२१ दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत गुप्तवार्ता विभाग मुख्यालयातील सर्वश्री ग. रा. रोकडे, सहायक आयुक्त, वि. रा. रवी औषध निरीक्षक, सुरेश देशमुख, औषध निरीक्षक नाशिक व जळगाव कार्यालयाचे सहायक आयुक्त श्री तासखेडकर व  औषध निरीक्षक श्री अनिल माणिकराव यांनी सहभाग घेतला. या प्रकरणी पुढील तपास अन्न औषध प्रशासन, जळगाव व चाळीसगाव पोलीस संयुक्तरित्या करत आहेत.

ही कारवाई अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, प्रशासनाचे आयुक्त परिमल सिंह व सहआयुक्त (दक्षता) समाधान पवार यांचे मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली.

केंद्रीय मंत्र्यांनी सुनावले महापालिका आयुक्त विक्रम कुमारांना…. (व्हिडीओ)

0

जायकासाठी दिरंगाईचा कारभार करणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांची चौकशी होईल – खासदार बापट

पुणे-. १० :जायका प्रकरणी दिल्लीत होणाऱ्या बैठकीस ऑन लाइन उपस्थित राहण्याचे आदेश देऊनही महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी या बैठकीला विनापरवानगी दांडी मारण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाल्याने राज्यातील उपमुख्यमंत्र्यांना फोन करून विक्रम कुमारांना बोलावून घेऊन केंद्रीय मंत्र्यांनी झापल्याचे प्रकरण आज समोर आले आहे .आयत्या वेळी विभागीय आयुक्त सौरव राव यांच्या कार्यालयातून विक्रम कुमार या ऑनलाइन बैठकीस हजर झाले तोवर केंद्रीय मंत्री त्यांची प्रतीक्षा करत थांबले होते, विक्रम कुमारांनी दिलगिरी व्यक्त केल्यावर मंत्री महोदयांनी बैठक सुरू केली.

आज दिल्लीतून पुण्यात आल्यावर जायका महापालिका प्रशासनाच्या दिरंगाई मुळे लांबल्याचा आरोप करत वेळेवर अशा अधिकाऱ्यांची चौकशी केली जाईल असे सांगत पुण्याचे खासदार गिरीश बापट म्हणाले कि,’पुण्यातील मुळा-मुठा नदीसुधार प्रकल्पाला विलंब झाला असला, तरी तो लवकरच पूर्ण होणार आहे. त्यासाठी मिळणारा कोणताही निधी परत केंद्राला जाणार नाही, अशी स्पष्टोक्ती बापट यांनी केली आहे

पुण्यातील मुळा-मुठा नदीसुधार प्रकल्पाला विलंब झाला असला, तरी तो लवकरच पूर्ण होणार आहे. त्यासाठी मिळणारा कोणताही निधी परत केंद्राला जाणार नाही, अशी स्पष्टोक्ती पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी केली आहे. खासदार बापट यांची या प्रश्नीे जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्याबरोबर आज बैठक झाली. त्यात अधिकारी ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते. शेखावत यांनी या प्रकल्पाची एक महिन्यात वर्क ऑर्डर काढण्याचा आदेश अधिकाऱ्यांना दिल्याचे बापट यांनी सांगितले.
पुणेकरांसाठी महत्त्वाचा असलेला हा जायका प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दिलेली मुदत पुढील महिन्यात संपत आहे. प्रकल्प ३१ जानेवारी २०२२ पर्यंत महापालिकेने पूर्ण करायला पाहिजे. परंतु महापालिका अद्यापही निविदा प्रक्रियेत अडकली आहे. त्यामुळे नियोजित तारखेस हा प्रकल्प पूर्ण होणे शक्य नाही. हा प्रकल्प पूर्ण व्हावा यासाठी खासदार गिरीश बापट सुरवातीपासून प्रयत्नशील आहेत. त्यांनी यापूर्वी देखील शेखावत यांची वारंवार भेट घेऊन चर्चा केली होती. आजही शेखावत आणि बापट यांच्यात अधिकाऱ्यांसह बैठक झाली.
खासदार बापट यांच्यासह पर्यावरण सचिव आर. पी. गुप्ता, राष्ट्रीय नदीसुधार संचालनालयाचे संचालक आर. आर. मिश्रा, जायकाचे प्रमुख साइतो मित्सुनोरी आणि महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार उपस्थित होते. खासदार गिरीश बापट यांनी याबाबत सांगितले की पुणेकरांसाठी हा प्रकल्प महत्वाचा असून या प्रकल्पासाठी आवश्येक असलेल्या जागा तातडीने ताब्यात घेऊन या प्रकल्पाचे काम लवकरच सुरू करा अशी आग्रहाची विनंती केली. त्यावर या प्रकल्पासाठी आवश्य्क जमीन सात दिवसांत ताब्यात घ्या. तसेच या प्रकल्पाची वर्क ऑर्डर एक महिन्यात काढा, असे शेखावत यांनी संबंधितांना सांगितले आहे. तसेच हा प्रकल्प पूर्ण करण्याची मुदत संपत असली, तरी त्यास मुदतवाढ मिळेल. त्यामुळे या प्रकल्पाचा निधी केंद्राकडून परत घेतला जाणार नाही, अशी ग्वाही शेखावत यांनी दिली आहे.
महापालिकेला या प्रकल्पासाठी जायकाकडून मिळणाऱ्या ८५० कोटी रूपयांच्या निधीवर पाणी सोडावे लागते की काय अशी स्थिती निर्माण झाल्याचे मानले जात होते. परंतु शेखावत आणि बापट यांच्या आजच्या बैठकीमुळे कुठलाही निधी परत न जाता, हा प्रकल्प पूर्ण होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. महिनाभरात या प्रकल्पाच्या कामाला सुरवात होईल, हेही या बैठकीमुळे स्पष्ट झाले आहे. आता महापालिका प्रशासनास वेगाने सर्व सरकारी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
पुणे महापालिका, केंद्र सरकार आणि जायका यांच्यात त्रिपक्षीय करार फेब्रुवारी २०१५ मध्ये करण्यात आला होता. त्यानुसार पुणे शहरात अकरा ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि सांडपाणी वितरण व्यवस्था उभी करण्यासाठी नियोजित ९९० कोटी रुपये खर्चापैकी ८५ टक्के अनुदान म्हणजेच ८४१ कोटी रुपये पुणे महापालिकाला मिळणार आहेत. शहरातील शंभर टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय नदी संवर्धन मंत्रालय (एनआरसीडी) आणि जपान सरकारच्या मदतीने महापालिकेने जायका प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. या प्रकल्पातंर्गत शहरात अकरा ठिकाणी सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभे करण्यात येणार आहेत. पण प्रकल्पासाठी आवश्य्क 11 पैकी पाच जागा महापालिकेच्या ताब्यात आलेल्या नाहीत. त्यात महापालिकेची निविदा प्रक्रिया देखील रखडली आहे.

महापौर साहेब तातडीने कारवाई करा-अन्यथा तुमचाही यात सहभाग आहे असा संशय निर्माण होईल !- आम आदमी पार्टीचा इशारा

0

पुणे- महानगरपालिकेतील बोगस इंजिनियर पदोन्नती घोटाळ्याने संपूर्ण शहराचे लक्ष वेधले आहे. या प्रकरणाचे धागेदोरे महापौर कार्यालयापर्यंत पोहोचल्यामुळे याचं गांभीर्य अजून जास्त वाढले आहे. दरम्यान या प्रकरणावर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी चौकशीची मागणी केली आहे. त्याची आम्ही स्वागत करतो परंतु महापौरांना केवळ एवढी मागणी करून स्वतःची जबाबदारी झटकता येणार नाही कारण संशयाची सुई त्यांच्या कार्यालयाकडे आहे. अद्यापही या प्रकरणातील 18 बोगस इंजिनियरवर बडतर्फीची कारवाई झालेली नाही किंवा ही यादी रद्द केलेली नाही आणि यातील 18 बोगस अभियंत्यांवर महानगरपालिकेने कोणतीही फौजदारी कारवाई केली नाही. चौकशी करण्याचा आभास निर्माण करणे ही अनेक घोटाळ्यांवरची सहज सोपी युक्ती पालिकेतील प्रस्थापित राजकीय नेतृत्व वापरत आहे. सदर प्रकरण अतिशय सुस्पष्ट आहे. यामध्ये चौकशीचा आभास करत हे प्रकरण रेंगाळत ठेवण्याचं कोणतही कारण नाही. महापौर याबाबत स्वच्छ असतील तर त्यांनी आयुक्तांकडे आग्रह धरुन या 18 बोगस अभियंत्यांच्या बडतर्फीचे आदेश तातडीने काढावेत आणि पालिकेच्यावतीने फौजदारी गुन्हा नोंद करावा. विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्याला काळिमा फासणारे हे प्रकरण आहे. याची गंभीरता लक्षात घेऊन महापौरांकडून तात्काळ कृती अपेक्षित आहे. जर महापौरांच्या प्रयत्नानंतर देखील याबाबत कारवाई करण्यास आयुक्त नकार देत असतील तर महापौरांनी आयुक्तांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करावे. आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते देखील त्यात सामील होतील.असे प्रतिपादन आज पुणे महापालिकेतील पत्रकार कक्षात पत्रकार परिषद घेऊन आम आदमी पार्टीचे प्रवक्ते डॉ.डॉ अभिजीत मोरे व सुजीत अगरवाल यांनी केले आहे .

या पत्रकार परिषदेत ते म्हणाले,’ आम आदमी पक्षाच्या वतीने पुणे शहराचे पोलीस कमिशनर अमिताभ गुप्ता यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले आहे तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे देखील आम आदमी पक्षाच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली आहे. आज आम आदमी पक्षाच्या वतीने सदर पदोन्नती प्रक्रिया वर लिखित आक्षेप महानगरपालिकेमध्ये सादर करण्यात आले आहेत. त्यावेळी आम आदमी पक्षाने खालील मागण्या केलेल्या आहेत.

१) या यादीवर आणि प्रक्रियेवर वर व्यक्त केलेल्या आक्षेपांची गंभीर नोंद घेऊन शासकीय लाभ मिळवण्यासाठी AICTE ची मान्यता नसलेल्या जेआरएन राजस्थान विद्यापीठ येथील अभियंता पदविका प्रमाणपत्र सादर करणाऱ्या 18 मनपा कर्मचाऱ्यांना महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी तातडीने बडतर्फ करावे आणि त्यांच्यावर महापालिकेने फसवणूक, संघटीत कटाचे फौजदारी गुन्हे दाखल करावेत.२) या प्रक्रियेत लबाडी, बोगस प्रमाणपत्रांचे सादरीकरण व त्यास मान्यता, प्रचंड घोळ, अपारदर्शकता, मनपाची व नागरिकांची फसवणूक इ. झालेली असल्याने ही संपूर्ण प्रक्रिया व यादी रद्द करावी.३) या सगळ्या रॅकेटची उच्चस्तरीय चौकशी करावी.४) ही यादी तपासून त्याला मान्यता देणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी करुन दोषींना बडतर्फ करावे आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.५) नव्याने पदोन्नती प्रक्रिया सुरु करावी आणि अर्ज मागवावेत. AAICTE ची मान्यता असणाऱ्याच विद्यापीठ/ कॉलेज मधून अभियंता पदवी/ पदविका प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात यावे. छाननी करताना कोणत्या महाविद्यालातून अभियंता पदवी/ पदविका प्रमाणपत्र मिळवले आहे, ते पुण्यात आहे की पुण्याबाहेर, पुण्याबाहेर महाविद्यालय असेल तर अभियंता कोर्स आणि मनपा नोकरी एकाच वेळी केली कशी याची चौकशी व्हावी.६) या अगोदरही अशा पद्धतीने इंजिनीयर पदासाठी अनेक बोगस जणांना प्रमोशन दिले गेले आहेत. पुणे महानगरपालिका विधी विभाग जावक क्रमांक 2702 दिनांक 15 डिसेंबर 2017 नुसार मनपात कार्यरत एकूण 11 कर्मचारी यांनी आसाम युनिव्हर्सिटी, कंस्ट्रक्शन डेव्हलपमेंट कौन्सिल, कर्नाटक स्टेट ओपन यूनिवर्सिटी, आयएमई गांधी विद्यामंदिर सदासागर, राजस्थान यूनिवर्सिटी आणि जनार्दन राय नगर राजस्थान विद्यापीठ यांच्याकडून डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअर, डिप्लोमा इलेक्ट्रिकल इंजिनियर अशा पदविका प्राप्त करून घेतल्यानंतर त्यांना पंचवीस टक्के पदोन्नतीने कनिष्ठ अभियंता पदावर नेमणुका दिल्या. सदर कर्मचाऱ्यांच्या पदविका या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार विधीग्राह्य आहे असे म्हणता येणार नाही असे स्पष्ट मत तत्कालीन विधी अधिकारी निशा चव्हाण यांनी नोंदवले होते. तरीदेखील त्याच्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले आणि कोणत्याही ठोस कायदेशीर पुराव्या अभावी 11 इंजिनिअरच्या बोगस नियुक्त्या करण्यात आल्या. पुणे महानगरपालिका विधी विभाग जावक क्रमांक 2702 दिनांक 15 डिसेंबर 2017 या पत्रात अभिप्रेत असलेल्या 11 मनपा कर्मचाऱ्यांना महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी तातडीने बडतर्फ करावे आणि त्यांच्यावर महापालिकेने फसवणूक, भ्रष्टाचार, संघटीत कटाचे फौजदारी गुन्हे दाखल करावेत.