Home Blog Page 2102

राज्य शासनाच्या वाङ्मय पुरस्कारांची घोषणा:ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांना जीवनगौरव पुरस्कार

0

मुंबई, दि. 2 : राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाच्यावतीने दरवर्षीप्रमाणे साहित्य क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या साहित्यिकांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांना जाहीर करण्यात आला आहे. पाच लाख रु. रोख, मानचिन्ह आणि मानपत्र, असे पुरस्काराचे स्वरुप आहे. मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी या पुरस्कारांची घोषणा केली.

श्री. पु. भागवत पुरस्कार (२०२१) लोकवाङ्मय गृह, मुंबई, या संस्थेला जाहीर करण्यात आला. तीन लाख रुपये रोख आणि मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. डॉ. अशोक केळकर मराठी भाषा अभ्यास पुरस्कार रमेश वरखेडे यांना जाहीर करण्यात आला. दोन लाख रुपये रोख व मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. कविवर्य मंगेश पाडगांवकर, मराठी भाषा संवर्धक पुरस्कार (२०२१, व्यक्तींसाठी) डॉ. चंद्रकांत पाटील यांना जाहीर करण्यात आला. डॉ. अशोक केळकर, मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार २०२१ (संस्थेसाठी) मराठी अभ्यास परिषद पुणे यांना जाहीर करण्यात आला. तर कविवर्य मंगेश पाडगावंकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार २०२१ (संस्थेसाठी) मराठी अभ्यास केंद्र, मुंबई यांना जाहीर करण्यात आला.

यावेळी स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्काराचीही घोषणा करण्यात आली. त्याची यादी खालील प्रमाणे.

1.विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2021

श्री. भारत सासणे

रु. 5 लक्ष रोख, मानचिन्ह व मानपत्र

विविध साहित्य प्रकारात लेखन, राज्यशासनाचे उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचे 7 व इतर 30 पुरस्कार प्राप्त, प्रकाशित ग्रथांची संख्या 35

2.श्री. पु. भागवत पुरस्कार 2021

लोकवाङ्मय गृह, मुंबई

रु. 3 लक्ष रोख, मानचिन्ह व मानपत्र

मराठी विज्ञान परिषद तथा अन्य अनेक पुरस्कार प्राप्त प्रकाशित ग्रथांची संख्या 1374

3.डॉ. अशोक रा. केळकर, मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार 2021 (व्यक्तींसाठी)

डॉ. रमेश वरखेडे

रु. 2 लक्ष रोख, मानचिन्ह व मानपत्र

बाल साहित्य, लोकसाहित्य, समाज भाषा विज्ञान या साहित्य प्रकारात विपुल लेखन, पुणे विद्यापीठात “व्यावहारीक मराठी” चा अभ्यासक्रम

4.कविवर्य मंगेश पाडगांवकर, मराठी भाषा संवर्धक पुरस्कार 2021 (व्यक्तींसाठी)

डॉ. चंद्रकांत पाटील

रु. 2 लक्ष रोख, मानचिन्ह व मानपत्र

साहित्य विषयक राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय 18 पुरस्कार प्राप्त, 5लेख संग्रह, 24 अनुवाद एकुण 54 हून अधिक पुस्तके प्रकाशित

5.डॉ. अशोक रा. केळकर, मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार 2021 (संस्थेसाठी)

मराठी अभ्यास परिषद, पुणे.

रु. 2 लक्ष रोख, मानचिन्ह व मानपत्र

मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी पुरक ठरणाऱ्या कार्यशाळा, परिसंवाद, व्याख्यानांचे अशा उपक्रमाचे आयोजन, भाषा आणि जीवन हे भाषा विषयक त्रैमासिक 1983 पासून नियमितपणे प्रकाशित

6.कविवर्य मंगेश पाडगांवकर, मराठी भाषा संवर्धक पुरस्कार 2021 (संस्थेसाठी)

मराठी अभ्यासकेंद्र, मुंबई

रु. 2 लक्ष रोख, मानचिन्ह व मानपत्र

मराठी भाषेचे संस्कृतीचे जतन संवर्धनासाठी कार्य, मराठी भाषेच्या वेगवेगळया प्रश्नावर संशोधन, मराठी भाषेच्या सर्वांगीन विकासाठी विविध उपक्रम

:- स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार सन – 2020

1)प्रौढ वाङ्मय – काव्य

कवी केशवसुत पुरस्कार

1,00,000/-

हेमंत दिवटे

पॅरानोया

पोएट्रीवाला पेपरवॉल मीडीया अण्ड पब्लिशिंग प्रा.लि., चे इम्प्रिंट, मुंबई

2)प्रथम प्रकाशन – काव्य

बहिणाबाई चौधरी पुरस्कार

50,000/-

राजू देसले

अवघेचि उच्चार

कॉपर कॉइन पब्लिशिंग प्रा.लि.,गाजियाबाद, दिल्ली

3)प्रौढ वाङ्मय –
नाटक/एकांकिका

राम गणेश गडकरी पुरस्कार

1,00,000/-

जयंत पवार

लिअरने जगावं की मरावं ?

पंडित पब्लिकेशन्स, सिंधुदुर्ग

4)प्रथम प्रकाशन –
नाटक/एकांकिका-विजय तेंडूलकर पुरस्कार

50,000/-

शिफारस नाही

5)प्रौढ वाङ्मय – कादंबरी-हरी नारायण आपटे पुरस्कार

1,00,000/-

भीमराव वाघचौरे

किंजाळकाटे

संस्कृती प्रकाशन, पुणे

6) प्रथम प्रकाशन – कादंबरी

श्री.ना.पेंडसे पुरस्कार

50,000/-

अविनाश उषा वसंत

पटेली

ललित पब्लिकेशन, मुंबई

7) प्रौढ वाङ्मय – लघुकथा

दिवाकर कृष्ण पुरस्कार

1,00,000/-

माधव जाधव

चिन्हांकित यादीतली माणसं

सायन पब्लिकेशन्स

प्रा.लि., पुणे

8) प्रथम प्रकाशन – लघुकथा

ग.ल.ठोकळ पुरस्कार

50,000/-

रुस्तम होनाळे

वऱ्हाडातली बिऱ्हाडं

दिलीपराज प्रकाशन प्रा.लि., पुणे

9) प्रौढ वाङ्मय – ललितगद्य

(ललित विज्ञानासह)

अनंत काणेकर पुरस्कार

1,00,000/-

अरुण खोपकर

अनुनाद

मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, मुंबई

10) प्रथम प्रकाशन –

ललितगद्य

ताराबाई शिंदे पुरस्कार

50,000/-

डॅनिअल फ्रान्सिस मस्करणीस

मंच

साधना प्रकाशन, पुणे

11) प्रौढ वाङ्मय – विनोद

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार

1,00,000/-

सॅबी परेरा

टपालकी

ग्रंथाली, मुंबई

12) प्रौढ वाङ्मय – चरित्र

न.चिं.केळकर पुरस्कार

1,00,000/-

डॉ. अक्षयकुमार काळे

गालिब : काळ,

चरित्र आणि व्यक्तिमत्त्व

पद्मगंधा प्रकाशन, पुणे

13) प्रौढ वाङ्मय – आत्मचरित्र

लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार

1,00,000/-

डॉ. शाहू रसाळ

रानफूल, लव्ह बर्डस् आणि…मी

चौथ्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत पोर्तुगालच्या जाओ सौसाचा मानांकित खेळाडूवर सनसनाटी विजय

0

पुणे, 2 फेब्रुवारी 2022: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)यांच्या वतीने आयोजित व टाटा ग्रुप तर्फे प्रायोजित चौथ्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत मुख्य ड्रॉ च्या दुसऱ्या फेरीत पोर्तुगालच्या जाओ सौसाने तिसऱ्या मानांकित इटलीच्या जियानलुका माजेरवर सनसनाटी विजय मिळवत आजचा दिवस गाजवला.
म्हाळुंगे बालेवाडी क्रीडा संकुलातील टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत एकेरीत दुसऱ्या फेरीत जागतिक क्रमवारीत 137व्या स्थानी असलेल्या पोर्तुगालच्या जाओ सौसाने जागतिक क्र.67असलेल्या इटलीच्या जियानलुका माजेरचा टायब्रेकमध्ये 4-6, 6-3, 7-6(7-4) असा संघर्षपूर्ण पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. हा सामना 2तास 13मिनिटे चालला. पहिल्या सेटमध्ये माजेरने सुरेख सुरुवात करत पहिल्याच गेममध्ये जाओची सर्व्हिस रोखली. या सेटमध्ये माजेरने वर्चस्व राखत आपली सर्व्हिस राखत हा सेट 6-4 असा जिंकून आघाडी मिळवली. दुसऱ्या सेटमध्ये पिछाडीवर असलेल्या जाओने आक्रमक खेळ करत सहाव्या गेममध्ये माजेरची सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट 6-3 असा जिंकून बरोबरी साधली. तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी तोडीस तोड खेळ करत आपापल्या सर्व्हिस राखल्या व त्यामुळे हा सेट टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्ये जाओने वरचढ खेळ करत हा सेट 7-6(7-4) असा जिंकून विजय मिळवला.
अन्य लढतीत जागतिक क्रमवारीत 95व्या स्थानी असलेल्या पोलंडच्या कॅमिल माझरेखने जागतिक क्र.141फ्रांसच्या क्विंटिन हिलयासचा टायब्रेकमध्ये 6-3, 7-6(9-7) असा पराभव करून आगेकूच केली. जागतिक क्र.85जर्मनीच्या पाचव्या मानांकित डॅनियल अल्तामेर याने जागतिक क्र.108मॉलदोव्हच्या राडू अलबोटचा 3-6, 6-4, 6-4 असा तीन सेटमध्ये पराभव केला.
दुहेरीत पहिल्या फेरीत ऑस्ट्रियाच्या अलेक्झांडर एरलेरने चेक प्रजासत्ताकच्या जेरी व्हेसलीच्या साथीत फ्रांसच्या हुगो ग्रेनेर व क्विंटिन हिलीयसयांचा 7-6(0), 6-4 असा पराभव करून दुसरया फेरीत धडक मारली.
एकेरी: मुख्य ड्रॉ(दुसरी फेरी):डॅनियल अल्तामेर(जर्मनी)[5]वि.वि.राडू अलबोट(मॉलदोव्ह)3-6, 6-4, 6-4; कॅमिल माझरेख(पोलंड)वि.वि.क्विंटिन हिलयास(फ्रांस) 6-3, 7-6(9-7);जाओ सौसा(पोर्तुगाल)वि.वि.जियानलुका माजेर(इटली)[3] 4-6, 6-3, 7-6(7-4);
दुहेरी गट: पहिली फेरी: 
 अलेक्झांडर एरलेर(ऑस्ट्रिया)/जेरी व्हेसली(चेक प्रजासत्ताक)वि.वि.हुगो ग्रेनेर(फ्रांस)/क्विंटिन हिलीयस(फ्रांस)7-6(0), 6-4.

संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रवीण राऊतांना ईडीकडून अटक

0

मुंबई- गोरेगाव भूखंडाच्या विक्रीत एफएसआयमध्ये गैरव्यवहार केल्याचा  आरोप ठेऊन  उद्योजक प्रवीण राऊत यांना बुधवारी सकाळी अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) अटक करण्यात आली आहे. ,शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय असल्याचे समजते . याप्रकरणी मनी लांड्रिंगचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना ही अटक करण्यात आली आहे.

प्रवीण राऊत हे एचडीआयएलची उपकंपनी असलेल्या गुरुआशिष कन्स्ट्रक्शनचे संचालक आहेत. एचडीआयएलमधील 1 हजार 34 कोटींच्या पत्राचाळ जमीन घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. ईडीच्या पथकाने मंगळवारी प्रवीण राऊतांसंबंधित अनेक ठिकाणी झडती घेतली. यानंतर त्यांना दक्षिण मुंबईतील कार्यालयात चौकशीसाठी नेण्यात आले. अनेक तास त्यांची चौकशी करण्यात आली. मात्र, चौकशीला सहकार्य करण्यास नकार दिल्यानंतर ईडीकडून राऊतांना अटक करण्यात आली.

यापूर्वी डिसेंबर 2020 मध्ये पीएमसी बँक घोटाळा प्रकरणामध्ये प्रवीण राऊतांचे नाव समोर आले होते. प्रवीण राऊतांच्या पत्नीचे नाव देखील यापूर्वी चर्चेत आले आहे. संजय राऊत आणि प्रविण राऊत यांचे जवळचे संबंध आहेत. 

कोण आहेत प्रविण राऊत?
प्रवीण राऊत हे संजय राऊतांचे निकटवर्तीय मानले जातात. तर एचडीआयएल आणि पीएमसी बँक घोटाळाशी संबंधित असलेले वाधवान कुटुंबासोबत देखील त्यांचे संबंध आहेत. प्रवीण राऊत यांनी पीएमसी बँक घोटाळाचे 90 कोटी रुपये हडपले असल्याचे आरोप ईडीने त्यांच्यावर केला आहे. प्रवीण राऊत यांची कंपनी गुरुआशिष कन्स्ट्रक्शन लिमिटेड यांचा व्यवहार एचडीआयएलसोबत होते. या व्यवहारमुळेच प्रवीण राऊतांचे एचडीआयएल कंपनीशी संबंध वाढले. प्रवीण राऊत यांचा एचडीआयएल आणि पीएमसी बँक घोटाळ्यात सहभाग असल्याची खात्री ईडीला आहे.असे सूत्रांकडून समजते .

केरळ सफरनामा…. भाग 4 (लेखिका :पूर्णिमा नार्वेकर)

0

मुन्नार ते आल्लेपी जवळजवळ ५ तासांचा प्रवास होता. त्यात मधेच मुन्नार इथे स्पाईस गार्डनला खरेदी करायची होती. खरंतर आदल्या दिवशी चॉकलेट्स आणि मसाले घेऊन झाले होते पण खरेदी म्हणजे बायकांचा वीक पॉईंट! स्पाईस गार्डनला खरेदी करून निघेपर्यंत आल्लेपीला पोहोचायला उशीरच झाला. संपूर्ण प्रवासात ड्रायव्हर मुस्तफाला ‘किती वाजता पोहोचणार’ असं वारंवार विचारून भंडावून सोडलं होतं. हॉटेल रमाडा – आल्लेपीला पोहोचेपर्यंत संध्याकाळचे ६ वाजले होते. आमचे कोची स्थायिक फॅमिली फ्रेंड रवी ज्यांचा बिझनेस अल्लेप्पीला आहे ते भेटायला आहे होते, त्यामुळे सगळी पुरुष मंडळी (तेजील सोडून) त्यांच्या बरोबर त्यांची ऑरगॅनिक प्रॉडक्टची फॅक्टरी बघण्यासाठी गेले. आम्ही बायका आणि तेजील मस्त हॉटेलचं वातावरण एन्जॉय करत बसलो. आल्लेपी हे ठिकाण बॅकवॉटरसाठी प्रसिद्ध आहे. दुसऱ्या दिवशी थोडा निवांतपणा होता. कारण गेले ४ दिवस सतत आम्ही पहाटे लवकर उठत होतो. रवीने आमच्या पुढील पूर्ण दिवसभराचे प्लानिंग आधीच करून टाकले होते. त्याप्रमाणे आधी स्पेशल केरळ नॉनव्हेज जेवण आणि माझं एकटीचं शाकाहारी ‘सदया’चा बेत मिनी कल्पकवाडी या धाब्यावर केला होता. मिनी कल्पकवाडी इथलं जेवण म्हणजे मांसाहारी लोकांसाठी पुरेपूर मेजवानीच. सगळीकडे मात्र भाषेचा खूप प्रॉब्लेम येत होता. मग आम्ही मुस्तफाला त्यांच्या भाषेत सांगायला सांगायचो, नाहीतर खाणाखुणा करून दाखवायचो. कल्पकवाडीत जेवणाचा आस्वाद घेताना लक्षातच राहिले नाही की ४ वाजताची हाऊसबोट बुक केली आहे. मग काय पळापळ. हाऊसबोट आम्हाला वाटले होते त्या जेट्टीवर आलीच नाही, मग आम्ही त्या बोटमालकाच्या घराकडे गेलो. तिथे तर काय गाड्यांसारख्या ३-४ हाऊसबोटी पार्क केल्या होत्या. गम्मतच वाटली हे सगळं बघून. आमची हाऊसबोट सर्वांत शेवटची होती. एका हाऊसबोटीमधून दुसऱ्या हाऊसबोटीवर जाण्यासाठी मध्ये फळ्या टाकल्या होत्या. त्या सगळ्या पार करत आम्ही आमच्या ‘रिवराईन’ हाऊसबोटीवर पोहोचलो. शेफ कन्नन आणि बोटीचा खलाशी आमची वाटच पाहात होते. ३ बेडरूम असलेली मोठी हाऊसबोट रवीने आमच्यासाठी बुक केली होती. वेलकम ड्रिंकने बोटीवर आमचे स्वागत केले गेले आणि बॅकवॉटरची सफर चालू झाली. आजूबाजूला  किनाऱ्यावर छोटी छोटी तर काही ठिकाणी टुमदार घरे आणि बाहेर बोट पार्क केलेली, हे सगळं बघायला खूप मजा वाटत होती. बोटीच्या वर डेकवर आम्ही सगळे निवांत बसलो होतो. समोर अथांग सागर आणि वर निरभ्र आकाश. असे निवांत क्षण खूप कमी वेळा अनुभवायला मिळतात. भावना मावशीला तर सर्व जुनी गाणी  आठवत होती. मध्येच एका किनाऱ्यावरील गावात आम्ही उतरलो. मासळी बाजार भरला होता. ते छोटे गाव बघायला पण खूप मजा येत होती. दोन्ही बाजूला पाणी आणि मध्येच बेटावर ही छोटी छोटी गावे. पावसाळ्यात पूर परिस्थितीमध्ये या सर्वांना आल्लेपीला येऊन राहावे लागते. नुकसानही बरेच होते. संध्याकाळचे ६ वाजले होते, सूर्य अस्ताला आला होता. ते दृश्य अविस्मरणीय होते. हाऊसबोटचा एक वेगळाच अनुभव आणि खूप दिवसांनी मिळालेला निवांतपणा सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. शेफ कन्ननने संध्याकाळच्या नाश्त्यात चहासोबत मस्त गरमागरम कांद्याची भजी केली होती. आता आमची बोट किनाऱ्याला लागली होती आणि बोटहाऊसच्या मालकीच्या पार्किंग स्लॉटमध्ये बोट पार्क केली होती. कारण संध्याकाळी ६.३० नंतर हाऊसबोटींना पाण्यात लोटण्याची परवानगी नव्हती म्हणून मग त्या एका ठिकाणी उभ्या करून ठेवाव्या लागत होत्या.  रात्रीचे जेवण बोटीवरच होते. आमच्या फर्माईशीप्रमाणे शेफ कन्ननने जेवणाचा बेत केला होता. मांसाहारी प्रमाणेच शाकाहारी जेवणात सुद्धा विविध पदार्थ केले होते. जेवण खूपच चविष्ट होते. कन्नन आग्रह करून वाढत होता. भावना मावशीने त्याला खास दाद दिली. कन्ननच्या मांसाहारी जेवणात सुद्धा सात्विकता होती. उंचपुरी देहयष्टी आणि चेहऱ्यावर शांत भाव असलेल्या कन्ननच्या हातात मात्र जादू होती. जेवणाचा मनमुराद आस्वाद घेऊन आम्ही हाऊसबोटीवरून हॉटेलवर आलो.

पुढचे आणि शेवटचे डेस्टिनेशन होते पूवर आयलँड. त्यासाठी दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी ४ वाजता उठायचे होते. कारण महत्त्वाची तीन मंदिरं करून मग पुढे पूवरला जायचे होते. … (क्रमशः)

पूर्णिमा नार्वेकर, दहिसर

नितेश राणे यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी

0

सिंधुदुर्ग-नितेश राणे यांना सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे राणेंना आजची आणि उद्याची रात्र कणकवली पोलीसांच्या कोठडीतच काढावी लागणार आहे.

दरम्यान, नितेश राणे यांनी आज सकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली दिवाणी न्यायालयात शरण अर्ज दाखल केला. त्यानंतर नितेश राणे यांच्या वकिलांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली. तर सरकारी वकिलांकडून नितेश राणेंच्या पोलीस कोठडीची मागणी केली. या मागणीसाठी पोलिसांना सबळ कारणे दिले. त्यामुळे नितेश राणेंना पोलिस कोठडी सुनावली आहे.

कणकवली दिवाणी न्यायालयात सुनावणी सुरु असल्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. दंगल नियंत्रण पथक न्यायालयाबाहेर तैनात होते.


सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक रणधुमाळीत शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी नितेश राणे आरोपी आहेत.

बांधकाम कामगारांसाठी अर्थसहाय्याच्या तीन नवीन योजनांना मंजुरी – कामगार मंत्री हसन मुश्रीफ

0

मुंबई, दि. 2 : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत बांधकाम कामगारांकरीता तीन नवीन योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात असून या तीन नवीन योजनांमध्ये बांधकाम कामगाराच्या एका मुलीच्या विवाहाकरीता 51 हजार रुपये देण्यात येणार आहे. बांधकाम कामगाराचा अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याचे शव मूळ गावी पाठविण्यासाठी वाहतुकीचा खर्च मंडळ करणार आहे व बांधकाम कामगाराचा अपघात होऊन हात किंवा पाय निकामी झाल्यास कृत्रीम हात किंवा पाय बसविण्यासाठी अर्थसहाय्य देण्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी घोषित केले.

मंडळाकडे नोंदीत बांधकाम कामगारांकरीता शैक्षणिक सहाय्य, सामाजिक व सुरक्षा, आरोग्यविषयक व अर्थसहाय्याच्या एकूण 29 विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. आता या योजनांशिवाय नवीन तीन कल्याणकारी योजना मंजूर करण्यात आलेल्या आहेत.

मंडळाने माहे जुलै 2020 पासून ऑनलाईन पद्धतीने नोंदणी, नुतनीकरण व लाभ वाटपाची प्रक्रिया सुरू केली आहे. राज्यातील बांधकाम कामगारांना मंडळाच्या www.mahabocw.in या संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने नोंदणी, नुतनीकरण व विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

मंडळाकडे जमा होत असलेल्या उपकर निधीमधून मंडळामार्फत बांधकाम कामगारांच्या पाल्याकरीता इयत्ता पहिली पासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत अर्थसहाय्य, अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षणाकरीता विशेष सहाय्य, बांधकाम कामगारांचा नैसर्गिक अथवा अपघाती मृत्यू झाल्यास अर्थसहाय्य, बांधकाम कामगारांच्या घराकरीता अर्थसहाय्य, बांधकाम कामगारांची प्रसूती तसेच गंभीर आजाराकरीता अर्थसहाय्य यासह एकूण 29 कल्याणकारी योजनांचा लाभ थेट बांधकाम कामगारांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे. बांधकाम कामगारांना सुरक्षा संच व अत्यावश्यक संचाचे वाटप करण्यात येत आहे.

मंडळामार्फत कोविड-19 विषाणू प्रादुर्भाव कालावधीत राज्यात मध्यान्ह भोजनासह रात्रीचे भोजन वितरित करण्यात येत आहे. ही योजना कोविड विषाणू कालावधीत फार उपयुक्त ठरल्यामुळे कामगारांमध्ये लोकप्रिय झालेली आहे. सदर योजनेमुळे कोविड-19 विषाणू प्रादुर्भाव कालावधीत स्थलांतर मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. मध्यान्ह भोजन योजना राबविल्याबाबत कामगार व कामगार संघटनांकडून मंडळाचे अभिनंदन होत असल्याचे नमूद करून बांधकाम कामगारांकरिता नव्याने घोषित तीन योजनांची तातडीने अंमलबजावणी करण्याचेही निर्देश मंत्री श्री.मुश्रीफ यांनी मंडळाला दिले आहेत.

नवीन महिला धोरणात महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य – महिला व बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर

0

मुंबई, दि. 2 : सध्या सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. महिलांनी सायबर साक्षर असणे काळाची गरज आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांची सतर्कता महत्त्वाची आहे. महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन नवीन महिला धोरण तयार करण्यात येणार असून महिला धोरणात महिलाविषयक कायदे व त्याची अंमलबजावणी याच्या जनजागृतीवर भर देणार आहे, असे  महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती  ठाकूर यांनी सांगितले.

सुधारित महिला धोरणाबाबत प्रारूप मसुद्यावर चर्चा याबाबत महिला व बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस महासंचालक, सर्व विशेष पोलीस महानिरीक्षक, उपमहानिरीक्षक, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीस महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, सहसचिव श.ल.अहिरे, अवर सचिव महेश वरुडकर उपस्थित होते.

महिला व बालविकास मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या, महिला धोरणाबाबत विभागामध्ये बैठका घेत असून त्याच्या अंमलबजावणी तसेच त्यामध्ये अधिक कोणत्या बाबी समाविष्ट करणे आवश्यक आहे याविषयी विचारविनिमय, चर्चा करीत आहोत. या धोरणाचा प्रारूप मसुदा पाठविण्यात आला असून याबाबत आपले अभिप्राय व सूचना तात्काळ कळवाव्यात.

नकळत, वाट चुकून गुन्ह्यांमध्ये अडकलेल्या बालकांचे संनियंत्रण व त्यांची देखरेख करणे सोपे व्हावे यासाठी ‘ज्युवेनाईल जस्टीस इन्फर्मेशन सिस्टीम’ ही ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीवर सर्वांनी अद्ययावत माहिती द्यावी. त्यामुळे बालकांची काळजी घेण्याऱ्या संस्था, बाल कल्याण समिती, बाल न्याय मंडळ (जेजेबी) यांचे संनियंत्रण आणि प्रत्येक बालकाची नोंद व पाठपुरावा करणे सुलभ होणार आहे, असे ॲड. ठाकूर यांनी सांगितले.

थायलंडला नमवून व्हिएतनामने विश्वचषक प्रवेशाच्या आशा कायम राखल्या

0

नवी मुंबई ०२ फेब्रुवारी २०२२ : एएफसी वुमन्स आशिया कप भारत २०२२ फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी झालेल्या प्ले ऑफ लढतीत व्हिएतनामने थायलंडचे कडवे आव्हान २-० गोलने परतावले. या शानदार विजयासह व्हिएतनामने २०२३ साली ऑस्ट्रेलिया -न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या फिफा विश्वचषक स्पधेर्ची पात्रता मिळवण्याच्या आशा कायम राखल्या आहेत. व्हिएतनामला पात्रता मिळवण्यात यश आले, तर विश्वचषक स्पर्धेत पहिल्यांदाच त्यांचा सहभाग होईल.
डी. वाय. पाटील स्टेडियमच्या मैदानावर झालेल्या सामन्यात व्हिएतनामने नियोजनबद्ध खेळ करत बाजी मारली. रविवारी होणाऱ्या प्ले ऑफ लढतीत व्हिएतनामने चायनिज तैपईला नमवले, तर फिफा विश्वचषक स्पर्धेतील दक्षिण आशियाई देशांचे स्थान स्पष्ट होईल. याआधीच चायना पीआर, जपान, कोरिया रिपब्लिक , फिलिपाईन्स आणि सह-यजमान ऑस्ट्रेलिया यांनी विश्वचषक स्पर्धेतील आपले स्थान निश्चित केले आहे. त्याचवेळी, थायलंडला विश्वचषक स्पर्धेत प्रवेश करण्याच्या आशा कायम राखण्यासाठी शुक्रवारी होणाऱ्या सामन्यात चायनिज तैपईविरुद्ध विजय मिळवणे अनिवार्य असेल. जर थायलंड पराभूत झाले, तर त्यांना इंटर-कॉन्फेडरेशन प्ले ऑफ लढतीत खेळावे लागेल.
थायलंड आणि व्हिएतनाम यांना रविवारी झालेल्या आपापल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे प्ले ऑफ लढतीतून चमकदार कामगिरी करत दोन्ही संघांना सकारात्मकरीत्या घरी परतण्याची संधी होती आणि यामध्ये सध्या व्हिएतनाम संघ वरचढ ठरला. व्हिएतनामने सामन्याच्या पहिल्याच सत्रात दोन गोल करत एकहाती वर्चस्व राखले.

थायलंड संघ अजूनही कोरोना संक्रमणातून सावरला नसल्याचे त्याचा परिणाम संघाच्या कामगिरीवर दिसून आला.व्हिएतनामनेही आक्रमक सुरुवात करताना सामन्याच्या पहिल्या मिनिटापासून आपले नियंत्रण राखले. कर्णधार ह्युन न्हू हिने १९ व्या मिनिटालाच पहिला गोल करत व्हिएतनामला आघाडीवर नेले. गोलजाळ्याच्या बरोबर समोर येऊन तिने गोल करत संघाला शानदार सुरुवात करुन दिली. पाचच मिनिटांनी व्हिएतनामने आपली आघाडी दुप्पट केली. एनग्युयेन थी तुयेट डंगने दिलेल्या क्रॉस पासवर थाइ थी थाओने अप्रतिम गोल केला. व्हिएतनामचा हा धडाका पाहून थायलंडची लय बिघडली. मध्यंतराला २-० गोल अशी आघाडी कायम राखलेल्या व्हिएतनामने दुसºया सत्राच्या तीन मिनिटांनी आपला तिसरा गोल जवळपास केलाच होता. पण थायलंडच्या गोलक्षेत्रात मुसंडी मारलेल्या फाम हाइ येनला गोल करता आला नाही. तसेच दोन मिनिटांनी ह्यून न्हूने चेंडू गोलजाळ्यात ढकललाह, मात्र ‘वार’ नियमामुळे न्ह्यूने केलेली आगेकूच ऑफ साइड ठरल्याने हा गोल यशस्वी ठरला नाही.

सामन्याच्या अखेरच्या क्षणामध्ये रेड कार्डचे नाट्यही रंगले. थायलंडच्या गोलक्षेत्रात जबरदस्त आक्रमण केलेल्या एनग्युयेन थी थान नाह हिला गोल करण्याची सुवर्ण संधी मिळाली होती, मात्र थायलंडच्या कांचनापोर्न साएनखुनने तिला खाली पाडल्याने तिला रेड कार्डला सामोरे जावे लागले. यावेर मिळालेल्या फ्री किकवर व्हिएतनामचा गोल चुकला, परंतु त्याचा सामन्याच्या निर्णयावर काहीच फरक पडला नाही. आता रविवारच्या लढतीत व्हिएतनाम चायनिज तैपईच्या कडव्या आव्हानाला सामोरे जाईल.

गणेशजन्मानिमित्त ‘दगडूशेठ’ ला स्वराभिषेक आणि जन्म सोहळा शुक्रवारी

0



श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्यावतीने आयोजन ; विनायक अवतार – गणेशजन्म सोहळा

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने यंदाचा गणेश जन्म सोहळा माघ शुद्ध चतुर्थी म्हणजेच शुक्रवार, दिनांक ४ फेब्रुवारी रोजी बुधवार पेठेतील दगडूशेठ गणपती मंदिरात आयोजित करण्यात आला आहे. विनायक अवतार असलेला हा गणेशजन्म सोहळा दुपारी १२ वाजता होणार आहे. यंदा स्वराभिषेक, गणेशयाग, श्री गणेश जागर असे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहेत.

शुक्रवारी पहाटे ३ वाजता ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक होणार आहे. त्यानंतर पहाटे ४ ते सकाळी ६ यावेळेत प्रख्यात गायक अवधूत गांधी हे श्रीं चरणी स्वराभिषेकातून गायनसेवा अर्पण करणार आहेत. स्वराभिषेकातून विविध प्रकारची गीते ऐकण्याची संधी भक्तांना यानिमित्ताने मिळणार आहे. तसेच सकाळी ८ ते ११ आणि दुपारी २ ते सायंकाळी ५ यावेळेत गणेश याग होईल.

मुख्य गणेशजन्म सोहळ्याला दुपारी १२ वाजता सुरुवात होणार आहे. यामध्ये पारंपरिक वेशात महिला सहभागी होणार आहेत. जन्माच्या वेळी पुष्पवृष्टी देखील करण्यात येणार आहे. यावेळी गणेशाची मंगलआरती होईल. नगरप्रदक्षिणा सायंकाळी ६.३० वाजता दगडूशेठ गणपती मंदिरापासून कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरापर्यंत जाणार असून तेथे पादुका पूजन होईल. तेथून गणपती मंदिरात नगरप्रदक्षिणेची सांगता होईल. त्यानंतर रात्री ८ वाजता श्रीगणेशाची मंगलआरती होईल. रात्री ११ ते पहाटे ३ वाजेपर्यंत श्री गणेश जागर आयोजित करण्यात आला आहे. मंदिराला आकर्षक सजावट व विद्युतरोषणाई करण्यात येणार असल्याचे ट्रस्टतर्फे कळविण्यात आले.

हिंदी महासागरात सागरी उष्णता कालावधी वाढल्याचा मान्सूनवर परिणाम

0

मुंबई, 2 फेब्रुवारी 2022

हिंद महासागरात सागरी उष्णता कालावधीचे प्रमाण  वाढत असून  त्याचा भारतातील  मान्सूनवर परिणाम होत आहे, असे पुणे स्थित भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेच्या (IITM) रॉक्सी मॅथ्यू कोल यांनी केलेल्या अभ्यासात म्हटले आहे.

‘जेजीआर ओशन्स’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात, संशोधकांनी सागरी उष्णता  घटनांमध्ये लक्षणीय वाढ नोंदवली आहे.  हिंदी महासागराच्या तापमानात  वेगाने झालेली  वाढ आणि प्रबळ अल  निनो यांचा  हा परिणाम आहे. अभ्यासात असे आढळून आले की सुमुद्राचे तापमान वाढण्याच्या घटना या  मध्य भारतीय उपखंडातील पाऊसमान कमी तर दक्षिण द्वीपकल्पातील  पाऊसमान  वाढवतात .

सागरी उष्णता  प्रसंग / कालावधी म्हणजे काय?

सागरी सागरी उष्णता  घटना / प्रसंग हा समुद्रातील अत्यंत उच्च तापमानाचा कालावधी (90 पर्सेन्टाइल पेक्षा अधिक ) असतो.  या घटनांमुळे प्रवाळांच्या रंग बदलतो, सागरी गवत नष्ट होते आणि समुद्रातील शैवालवनांचा नाश झाल्यामुळे  अधिवास उध्वस्त होतो, ज्याचा  मत्स्यपालन  क्षेत्रावर प्रतिकूल परिणाम होतो. पाण्याखाली केलेल्या   सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की मे 2020 मधील सागरी उष्णतेच्या घटनेनंतर तामिळनाडू किनार्‍याजवळील मन्नारच्या आखातातील 85% प्रवाळाचा  रंग बदलला आहे. मात्र  अलीकडील अभ्यासांमधून जागतिक महासागरांमध्ये सागरी उष्णतेच्या वाढत्या घटना  आणि त्याचे परिणाम नोंदवले असले तरी,  उष्णकटिबंधीय हिंदी महासागर प्रदेशात त्या  कमी आढळतात.

अशा प्रकारच्या  उष्णतेच्या घटना उष्णकटिबंधीय हिंदी महासागरात दुर्मिळ होत्या , मात्र आता दरवर्षी आढळून येतात.  पश्चिम हिंदी महासागर प्रदेशात प्रत्येक दशकात सुमारे 1.5 घटना या  दराने सागरी उष्णतेच्या प्रसंगांमध्ये  सर्वाधिक वाढ झाली आहे, त्याखालोखाल  बंगालच्या उत्तरेकडील उपसागरात प्रत्येक  दशकात 0.5  दराने ही वाढ झाली आहे. 1982-2018 दरम्यान, पश्चिम हिंदी महासागरात एकूण 66 तर बंगालच्या उपसागरात 94 वेळा असे घडले आहे.

मान्सूनवर परिणाम

पश्चिम हिंद महासागर आणि बंगालच्या उपसागरातील सागरी उष्णतेच्या घटनांमुळे मध्य भारतीय उपखंडात कोरडेपणा जाणवतो. त्याच वेळी, बंगालच्या उत्तरेकडील  उपसागरातील उष्णतेच्या घटनांमुळे दक्षिण द्वीपकल्पीय भागात पावसाच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. हे बदल उष्णतेच्या प्रसंगाद्वारे बदललेल्या मान्सूनच्या वाऱ्यांचा परिणाम  आहेत. सागरी उष्णतेच्या लाटा आणि वातावरणीय  परिसंचार  आणि पर्जन्यमान यांच्यात जवळचा संबंध असल्याचे  प्रथमच एका अभ्यासाने दाखवले आहे.

भविष्यातील आव्हान

“भविष्यात हिंद महासागरात  आणखी तापमानवाढीची शक्यता हवामान मॉडेलच्या अंदाजात दिली आहे. यामुळे सागरी उष्णतेच्या घटना आणि मान्सूनच्या पावसावर त्यांचा परिणाम होण्याची शक्यता आहे.” असे कोल म्हणाले. “समुद्री उष्णतेच्या प्रसंगांची ची वारंवारता, तीव्रता आणि त्याचे क्षेत्र वाढत असल्यामुळे, या घटनांचे अचूक निरीक्षण करण्यासाठी आपल्याला महासागर निरीक्षण व्याप्ती वाढवणे आवश्यक आहे , तसेच तापमानवाढीबाबत  जगाने मांडलेल्या आव्हानांचा कुशलतेने अंदाज लावण्यासाठी आपली हवामानविषयक  मॉडेल अद्ययावत करणे आवश्यक आहे” असे ते म्हणाले.

कोल यांनी सरन्या जे.एस. (केरळ कृषी विद्यापीठ), पाणिनी दासगुप्ता (आयआयटीएम ), आणि अजय आनंद (कोचीन विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठ) या  शास्त्रज्ञांच्या सहकार्याने हे  संशोधन केले आहे  .

संदर्भ: सरन्या, जे. एस., रॉक्सी, एम. के., दासगुप्ता, पी., आणि आनंद, ए. (2022). उष्णकटिबंधीय हिंदी महासागरावरील सागरी उष्णतेच्या घटनांची उत्पत्ती आणि कल  आणि भारतीय उन्हाळी मान्सूनशी त्यांचा परस्परसंबंध. जर्नल ऑफ जिओफिजिकल रिसर्च: ओशन, 127, e2021JC017427.

मध्यमवर्गीयांना विसरलेला अर्थसंकल्प- मोहन जोशी

0


पुणे : साथीच्या काळात औषधांवरील खर्च, उत्पन्नात झालेली घट, महागाईचा तडाखा बसलेल्या मध्यमवर्गाला केंद्रीय अंदाजपत्रकात कोणताच दिलासा दिलेला नाही, अशी प्रतिक्रिया माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी व्यक्त केली आहे.

मध्यमवर्गाला आयकरात सवलत मिळण्याची अपेक्षा होती, ती अपेक्षा फोल ठरली आहे.कोविडच्या साथीच्या काळात अनेकांचे रोजगार बुडाले, नोकऱ्या गेल्या, काहींना निम्म्या पगारावर काम करण्याची वेळ आली. अनेक सर्वेक्षणांमधून असे दिसून आले आहे की मध्यमवर्ग मोठ्या संख्येने गरिबीच्या खाईत लोटला गेला. त्यातच जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ, साथीच्या काळात औषधांसाठी करावा लागणारा खर्च यामुळे मध्यमवर्ग जर्जर झाला आहे. पुण्यासारख्या शहरात मध्यमवर्गाचे प्रमाण जास्त आहे. या वर्गाला मंत्र्यांचे भाषण नको तर कृती हवी होती. त्याबाबत अंदाजपत्रकाने निराश केले आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरवर्षी २ कोटी रोजगार निर्माण करू असे आश्वासन सत्तेवर येताना दिले होते. प्रत्यक्षात नवीन रोजगारसंधी निर्माण झाल्या नाहीत उलट ३ कोटी नोकऱ्या मोदी यांच्या राजवटीत कमी झाल्या. सरकारी नोकरभरती होत नाही आणि मोदी सरकार ६० लाख रोजगार निर्माण झाल्याची आकडेवारी देऊन जनतेची दिशाभूल करीत आहे.तरुणांचे नोकरीचे स्वप्न धूसर करणारा आणि उद्योगपती ‘ मित्रां ‘वर सवलतींची खैरात करणारा आहे, अशी टीका मोहन जोशी यांनी केली आहे.

नागपूर जिल्ह्यात कोरोनामुळे महिनाभरात १३५ मृत्यू

0

नागपूर, दि. 01 :  कोरोनाचा नवीन विषाणू विध्वंसक नाही. कोरोना गेला. लसीकरण नाही केले तरी चालेल, अशा भ्रमात नागरिकांनी राहू नये. एका महिन्यात कोरोना बाधितांची मृत्यू संख्या 135 झाली आहे. त्यामुळे लसीकरण हाच एकमेव उपाय असून नागरिकांनी दुसरा डोस पूर्ण करावा, अशी आग्रही मागणी आज पत्रकार परिषद घेऊन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केली आहे.

ग्रामीण व शहरी भागात लसीकरणाचा वेग आणखी वाढणे आवश्यक आहे. नागरिकांना दूरध्वनी करून यंत्रणेमार्फत डोस घेण्याबाबत सातत्याने सांगितले जात आहे. विविध प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून नागरिकांना डोस घेण्यासाठी आवाहन केले जात आहे. मात्र अनेक ठिकाणी कोरोना आजाराला अजूनही फारसे गंभीर घेतले जात नाही. ही बाब अतिशय धोकादायक आहे. त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक नागरिकाचे लसीकरण झाले अथवा नाही याची काळजी फक्त आरोग्य यंत्रणेने नव्हे तर प्रत्येक व्यक्तीने घेणे गरजेचे आहे. कोरोनावर एकच उपाय तो म्हणजे लसीकरणाचा आहे. त्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, प्रशासनासोबत आपल्या आजुबाजुच्या प्रत्येक नागरिकाला लसीकरणासाठी प्रवृत्त करावे, असे आवाहन त्यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर हे देखील उपस्थित होते. त्यांनी ग्रामीण भागातील लसीकरणाची माहिती दिली. नागरिकांना कॉल सेन्टरवरुन दूरध्वनी करुन लसीकरणासाठी बोलवले जात असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी थोरात, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी हर्षा मेश्राम उपस्थित  होत्या    .

2 जानेवारीपासून 135 मृत्यूमुखी

कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या जिल्ह्यात वाढली आहे. डिसेंबर महिन्यापर्यंत कोरोनामुळे मृत्युमुखी पडणारी संख्या निरंक होती. 2 जानेवारी पासून मृत्युमुखी पडण्याच्या आकडेवारीत वाढ झाली आहे. २ जानेवारी पर्यंत दुसऱ्या लाटेत मृत्यू संख्या 10 हजार 123 होती. आज 1 फेबुवारीला ही संख्या 10 हजार 258 आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरात ही संख्या अधिक आहे. गेल्या महिन्याभरात  नागपूर महानगर क्षेत्रातील शंभरावर लोकांचा समावेश आहे. ही संख्या दुर्लक्षित करता येणार नाही.

लसीकरणाशिवाय उपाय नाही

भारतात आतापर्यंत आलेल्या साथीमध्ये लसीकरण हेच प्रभावी ठरले आहे. प्लेगची साथ लसीकरणानंतरच नियंत्रणात आली आहे. त्यामुळे लसीकरण न केलेल्या नागरिकांना अनेक रोगांची लागण होत आहे. कोरोनाविषाणू लसीकरण न झालेल्या नागरिकांना धोकादायक ठरत आहे. मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांचे विश्लेषण केले असता ज्यांचे लसीकरण झाले नाही अशांनाच कोरोनाने ग्रासले असल्याचे दिसून आले आहे.

5 लाख लोकांना धोका

नागपूर जिल्ह्यात आजपर्यंत 98.58 टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. 68.31 टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. म्हणजेच जिल्ह्यामध्ये जवळपास पाच लाख नागरिकांनी दुसरा डोस घेतला नाही. ही पाच लाख लोकसंख्या कोरोनासाठी पूरक आहे. त्यामुळे जिल्ह्याचे आरोग्य सांभाळण्यासाठी या सर्वांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. जोपर्यंत 100% लसीकरण होणार नाही. तोपर्यंत अनेक निर्बंध जिल्ह्यात कायम राहणार आहे. प्रशासन आपल्या पद्धतीने या नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे काम करत आहेत.नागरिकांनी देखील आरोग्य यंत्रणेला प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही त्यांनी या पत्रकार परिषदेत केले.

महाराष्ट्र एनसीसी चमूचे यश गौरवास्पद – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुंबई, दि. 1 : नवी दिल्लीत राजपथावर झालेल्या प्रजासत्ताक दिन संचलनात सर्वोत्कृष्टतेचा पंतप्रधान ध्वज (प्राईम मिनीस्टर्स बँनर) महाराष्ट्राच्या राष्ट्रीय छात्रसेनेच्या चमुने पटकावला आहे. तसेच महाराष्ट्र संचालनालयाने सर्वोत्कृष्ट संचालनालयाचे पारितोषिक पटकावले आहे. ही बाब महाराष्ट्रासाठी गौरवास्पद असल्याचे उद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले. महाराष्ट्र राष्ट्रीय छात्रसेनेच्या या यशासाठी आयोजित कौतुक सोहळ्यात मुख्यमंत्री श्री. ठाकरे बोलत होते

या सोहळ्यास उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार, महिला व बालविकास मंत्री अॅड. यशोमती ठाकूर, क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री कु.अदिती तटकरे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, राष्ट्रीय छात्रसेनेच्या महाराष्ट्र संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल वाय. पी. खंडुरी तसेच राष्ट्रीय छात्रसेनेचे वरिष्ठ अधिकारी, प्रजासत्ताक दिन संचलनात सहभागी तसेच विविध पारितोषिक पटकावणारे छात्रसैनिक आदी उपस्थित होते. या सर्वांना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते पंतप्रधान बॅनर सुपूर्द करण्यात आला, तसेच विविध पारितोषिक पटकावणाऱ्या छात्रसैनिकांचा सत्कार करण्यात आला.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, एनसीसीच्या चमूने नवी दिल्ली येथील संचलनात उत्कृष्ट कामगिरी करून पंतप्रधान ध्वज मिळवून महाराष्ट्राची शान वाढवली. महाराष्ट्राचा प्रत्येक युवक हे यश पाहून प्रेरणा घेऊन राष्ट्रकार्यात सहभागी होईल.

महाराष्ट्र राज्य हे प्रगत राज्य आहे. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य आणि पराक्रमाचा वारसा आहे. दिल्ली येथील थंडी आणि पावसाच्या वातावरणातही राज्याच्या या युवकांनी खडतर परिश्रम करुन यश प्राप्त केलेले आहे. भविष्यात यापुढेही असेच यश मिळत राहील, अशी अपेक्षा व्यक्त करून श्री.पवार यांनी एनसीसी चमूचे अभिनंदन केले. एनसीसीला प्रोत्साहन देण्यासाठी शासन सदैव तत्पर राहील. पोलीस भरतीमध्ये एनसीसी विद्यार्थ्यांना अधिकचे गुण देण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात येईल, असे श्री. पवार यांनी सांगितले.

क्रीडा मंत्री सुनील केदार म्हणाले, महाराष्ट्राच्या युवकांनी दिल्लीत मानसन्मान मिळवला ही कौतुकास्पद बाब आहे. युवकांमध्ये एनसीसीच्या माध्यमातून शिस्त निर्माण होते. यामुळे राज्यात जास्तीत जास्त एनसीसी विद्यार्थी घडविण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येतील. पोलीस भरतीमध्ये एनसीसीच्या विद्यार्थ्यांना जास्तीचे गुण देण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्यात आला असल्याचे श्री.केदार यांनी सांगितले.

महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या, देशामध्ये सर्वोत्कृष्ट एनसीसी विद्यार्थ्यांनी जे यश मिळवले, ते यश मिळवणे खडतर आहे. एनसीसी प्रशिक्षण साधारण नाही. एनसीसी झालेले विद्यार्थी आयुष्यामध्ये नक्कीच यशस्वी होतात यात मुळीच शंका नाही. ॲड.ठाकूर यांनी चमूचे अभिनंदन केले आणि भावी यशासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी राणे यांनी केले तर आभार मेजर जनरल वाय. पी. खंडुरी यांनी मानले

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठीचे अर्ज १६ फेब्रुवारी पासून भरता येणार – शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड

0

मुंबई, दि. १ – शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार दि. ०१ फेब्रुवारी २०२२ पासून पालकांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी कळविण्यात आले होते. तथापि काही अपरिहार्य कारणास्तव आरटीई पोर्टलवर सदरचे अर्ज दि. ०१ फेब्रुवारी २०२२ ऐवजी बुधवार दि. १६ फेब्रुवारी २०२२ पासून भरता येतील, संबंधितांनी या बदलाची नोंद घेऊन अर्ज दाखल करावेत, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ कलम १२(१) (सी) नुसार खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुले व मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे.

याबाबत आरटीई पोर्टलवर सविस्तर सूचना यथावकाश देण्यात येतील. पोर्टलवरील वेळोवेळी दिलेल्या सूचनांची सर्व संबंधितांती नोंद घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, असेही शिक्षक संचालक (प्राथमिक) दिनकर टेमकर यांनी याबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

प्रभाग रचनेवर राष्ट्रवादी:भाजपा खुश तर कॉंग्रेस, सेना,मनसे नाखूष ,राष्ट्रवादीची स्वबळाची भाषा

0

पुणे- महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना आज दुपारी जाहीर होताच कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष रमेश बागवे यांनी काही झोपडपट्ट्यां तोडून त्या २ प्रभागात विभागल्यात , कुठेही भौगोलिकदृष्ट्या समता पाळली गेलेली नसल्याचा आरोप करत कॉंग्रेस यावर हरकती नोंदविणार असल्याचे म्हटले आहे तर राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी अत्यंत सुरेख प्रभाग रचना म्हणत आम्ही स्वबळावर १२२ जागा जिंकू शकतो असे वक्तव्य केले तर भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुलीक, आणि गणेश बिडकर यांनी ‘अब कि बार , सौ पार … असा नारा दिला आहे आणि मनसे ने तर आज प्रभाग रचना करताना राष्ट्रवादीचे हित डोळ्यापुढे ठेऊन च प्रभाग रचना केल्याचा आरोप करत यात मोठे गैर प्रकार झाल्याचा ठपका ठेऊन महापालिकेत आंदोलन करत घोषणाबाजी केली. शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे यांनी देखील कुठल्यातरी एका पक्षाचा वरचष्मा राहील अशा पद्धतीने तोडमोड करत भौगोलिक ताळमेळ न ठेवता प्रभाग रचना केल्याचा आरोप केलाय आणि यावर हरकती नोंदविणार असल्याचे म्हटले आहे.

काहीही केले तरी कॉंग्रेसला जनता आता स्वीकारेल आणि महापालिकेत चार पाच पटींनी आमची ताकद वाढेल ,आमचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यापूर्वीच काँग्रेस स्वबळावर लढणार असे सांगितल्याने तीन महिन्यांपासून आमची तयारी सुरू आहे. असे काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी सांगितले.भौगोलिक असमतोल असलेला प्रभागांचा आराखडा असल्याने काँग्रेस हरकती नोंदविणार असे ते म्हणाले. महागाई, बेरोज़गारी ने त्रस्त झालेली जनता, भ्रष्टाचाराचा भाजपने गाठलेला कळस हे जनतेच्या मनातून दूर होऊ शकणार नाही, कोरोना काळात केलेल्या व्यवहाराची श्वेत पत्रिका काढा अशी आमची मागणी कायम आहे, येत्या 5 तारखेला असंख्य कार्यकर्ते प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस मध्ये प्रवेश करतील, एकला चलोरे चा आमचा नारा आहे. त्या दृष्टीने काँग्रेसची तयारी पूर्ण होते आंहे, जनता यावेळी भाजपने स्वप्ने दाखवून केलेल्या विश्वासघाताबद्दल भाजपला निश्चित धड़ा शिकवेल.असेही बागवे म्हणाले .

गेल्या काही महिन्यांपासून आघाडीची भाषा करणाऱ्या राष्ट्रवादीने आता थेट स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट केल्याने महाविकास आघाडीमध्ये पुण्यात तरी ऑल इज वेल नसल्याची प्रचीती आली आहे .महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना राष्ट्रवादी काँग्रेससाठी अनुकूल असल्याचा दावा आज राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला .

प्रभाग रचनेचे स्वागत करताना राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी यंदाच्या निवडणुकीत १२२ नगरसेवक निवडून येतील असा दावाही त्यांनी पत्रकार परिषदेत केला.जगताप म्हणाले, निवडणूक आयोगाने पारदर्शकपणे व नियमानुसार प्रभाग रचना तयार केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला १२२ जागा मिळतील. ही प्रभाग रचना राष्ट्रवादीसाठी पूरक असल्याने ही निवडणूक स्वबळावर लढवावी अशी माझी इच्छा आहे. यासाठी पुढील तीन दिवसात शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल. मात्र, महापालिका निवडणुकीत आघाडी करायची की नाही याचा अंतिम निर्णय पक्षाचे नेते घेतली. आघाडीसाठी शिवसेनेसोबत चर्चा झाली असली तरी ती प्राथमिक आहे, त्यात कोणताही निर्णय झालेला नाही. भविष्यात आघाडी झालीच तर राष्ट्रवादी काँग्रेस १७३ पैकी ११० जागांच्या खाली येणार नाही. भाजपसह इतर पक्षातील १६ नगरसेवक राष्ट्रवादीत येणार आहेत, असेही जगताप यांनी सांगितले.आम्हाला काही फरक पडत नाही – शिवसेनामहापालिका निवडणुकीत आघाडी करण्यासाठी राष्ट्रवादीनेच आम्हाला दोन वेळा बैठकीला बोलविले होते. पण त्यांना आता आघाडी करायची नसले तर आम्हाला काही फरक पडत नाही. सर्व जागा ताकदीने लढण्याची आमची तयारी आहे. नगरपंचायतीच्या निवडणुकीत यश मिळाल्याने प्रशांत जगताप यांची भूमिका बदलली असेल, पण आम्ही आघाडी करताना आम्ही कायम सतर्कच आहोत, असे शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे यांनी सांगितले.