Home Blog Page 1952

ताउलू प्रकारात पुण्याला सर्वसाधारण विजेतेपद; १९वी राज्यस्तरीय सब-ज्युनियर (मुले-मुली) अजिंक्यपद वुशू स्पर्धा

पुणे : ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशन तर्फे आयोजित  १९ व्या राज्यस्तरीय सब-ज्युनियर मुले -मुलींच्या गटाच्या अजिंक्यपद वुशू स्पर्धेत ताउलू प्रकारात पुणे संघाने सांघिकमध्ये सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. कोल्हापूर संघ दुसऱ्या, तर मुंबई शहर संघ तिसऱ्या क्रमांकावर राहिला.

पानशेत रोड, पुणे येथे  ही स्पर्धा झाली. स्पर्धेचे उद्घाटन आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते झाले. यावेळी ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशनचे महासचिव सोपान कटके, संदीप बेलदरे, किरकिटवाडीचे उपसरपंच किरण हगवणे, बाजीराव पारगे, थोपटेवाडीचे उपसरपंच तानाजी थोपटे, अजित म्हात्रे, संदीप शेलार, दीपक भिसेन, महेश इंदापुरे, राहुल बर्वे, राम कोटप  उपस्थित होते.

स्पर्धेत पुण्याच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. सोन्सूमध्ये मुंबई शहर संघाने प्रथम क्रमांक पटकावला. धुळे संघ दुसऱ्या, तर नागपूर व औरंगाबाद संघ तिसऱ्या क्रमांकावर राहिला.

ताउलू – ग्रुप सी – चंनक्वॉन – मुले – (प्रथम तीन क्रमांक) अनिरुद्ध कुलकर्णी (पुणे), दर्श कोंद्रे (पुणे), शंभुराजे नवले (पुणे). दाउशू – दर्श कोद्रे (पुणे). गुनशू – दर्श कोंद्रे (पुणे), नोमान सिद्दीकी (औरंगाबाद), चैतन्य दांदडे (नागपूर). चंनक्वॉन – मुली – समृद्धी शिंदे (पुणे), इच्छा भिसे (पुणे), आराध्या शिंदे (पुणे). दाउशू – महेश्वरी सुतार (कोल्हापूर), निसर्गा कारंडे (कोल्हापूर), सिमरण शेलार (पुणे). गूनशू – इच्छा भिसे (पुणे), अस्मी सावंत (मुंबई शहर), निसर्गा कारंडे (कोल्हापूर).

ताउलू – ग्रुप बी – चंनक्वॉन – मुले – (प्रथम तीन क्रमांक) राघवेंद्र कुलकर्णी (पुणे), आलोक गिरी (पुणे), आर्यन रेवणकर (मुंबई शहर). दाउशू – बलराम पारेक (कोल्हापूर).  ननक्वॉन – मुली – अनुष्का जैन (औरंगाबाद), संस्कृती कोंद्रे (पुणे), आयुषी चौधरी (वर्धा).

सान्सू – मुले – सात ते बारा वर्षे -२१ किलो – (प्रथम तीन क्रमांक) देशू परदेशी (धुळे), राजदीप हेमाडे (धुळे), अबुसाट पठाण (औरंगाबाद), शेख हम्मद (औरंगाबाद). २४ किलो – जिवेश भंडारी (पुणे), सिद्धार्थ बनसोडे (बीड), जित हाके (सांगली). २७ किलो – सत्यजित बोराडे (मुंबई शहर), स्वयंम पाटील (सांगली), भार्गव गुरव (सातारा), वैभव डबडे (बीड). ३० किलो – अर्जुन सोनी (धुळे), वृत्तेश शेवाळे (मुंबई शहर), उत्कर्ष खोड (बीड), आयुष कदम (बीड). ३३ किलो – विरा परदेशी (धुळे), निरेक रावत (पालघर), अब्दुल रेहमान (ठाणे). ३६ किलो – ऋषित शेट्टी (मुंबई शहर), प्रद्युम्न बारपाक्षे (नागपूर), सर्वेश लांडगे (सांगली), सुश्रयान अलीमुल्ला (सांगली).

१३ ते १४ वर्ष – ३९ किलो – (प्रथम तीन क्रमांक) सक्षम मोहोळ (नागपूर), वेदांत खोट (सांगली), शुभम तांबे (मुंबई शहर), सम्राट शेख (मुंबई उपनगर). ४२ किलो – मुस्तफा शेख (मुंबई शहर), चैतन्य देवतळे (वर्धा), ओम औटे (सांगली), आदित्य हजारे (ठाणे). ४८ किलो – विश्वजित नवले (औरंगाबाद), दक्ष शहा (ठाणे), अरमान खान (मुंबई शहर), समाधान साळवे (बीड). ५६ किलो – पार्थ मिराशे (नागपूर), अरहम शेख (औरंगाबाद), चैतन्य जोगदंड (बीड). ६० किलो – गौरव सोनावणे (धुळे), जितसिंग बरार (पालघर), यश भगत (ठाणे).

सान्सू – १२ वर्षे – मुली – २१ किलो – (प्रथम तीन क्रमांक) युगंधरा बावणे (नागपूर), सय्यज जैनाम (औरंगाबाद), सिमरा मोमिन (औरंगाबाद), अम्रिता मिल्ला (धुळे). २४ किलो – गौरी लोखंडे (धुळे), सृष्टी लांडे (धुळे), विनया यादव (सांगली), किशोरी बेंडे (वर्धा), २७ किलो – तनिष्का पाटील (ठाणे), कल्याणी घुगे (बीड), परी सोनी (धुळे), विहाना परमार (पालघर). ३० किलो – योगेश्वरी खैरनार (धुळे), नायला मित्तल (ठाणे), खुशी तालमले (नागपूर), अल्फिया पठाण (औरंगाबाद). ३३ किलो – अंतरा कांबळे (मुंबई शहर), फैका पठाण (रायगड), विश्वा अंगाणे (मुंबई उपनगर). ३६ किलो – आर्या डुंबरे (ठाणे), आरिका जोशी (मुंबई उपनगर), ध्रुवी खाडे (रायगड), स्वरा कंकलवार (गडचिरोली).

१३ ते १४ वर्षे मुली -(प्रथम तीन क्रमांक) आयुषी घेवारे (औरंगाबाद), वृत्तिका शेवाळे (मुंबई शहर), सब्बा शेख (नागपूर), स्नेहा दुधमळ (नांदेड). ४२ किलो – कुमिदिनी बिसेन (नागपूर), श्रेया शिंदे (सांगली), सिद्धी मोहिते (सांगली), गुणिका आंबवले (ठाणे). ४५ किलो – स्विटी मिशराम (नागपूर), सृष्टी सिसाळ (सांगली), चिन्मयी भोईर (मुंबई शहर), सरस्वती रोंगे (औरंगाबाद). ४८ किलो – सेजल तायडे (औरंगाबाद), प्रगती पांडये (मुंबई शहर), अमीषा सिंग (पालघर), तनिषा प्रधान (नागपूर). ५२ किलो – आर्या कोळी (रायगड), दानिया काजी (पालघर), किमया केदारे (मुंबई शहर), सई तोडकर (सांगली). ५६ किलो – मृदुला पाटील (सांगली), देवश्री विरकर (पालघर), भूमी शेळके (बीड), भूमिका साहू (नागपूर).

ताउलू मिक्स ग्रुप – (प्रथम तीन क्रमांक) अथर्व चव्हाण (पुणे), अस्मी सावंत (मुंबई शहर), मानसी कुलकर्णी (परभणी). सृष्टी कुमकर, कनिष्का अमृतवार, नेत्रा मंत्री. समर्थ गुळुंजकर, वैष्णवी नाईक, संस्कृती शिरसाट, क्षीतिज भोसले, श्रीनिती धावडे, समृद्धी नेवल. यश कोंद्रे, शौर्य आल्मे, प्रणया काकडे. ग्रंथाली प्रधान, आर्यन रेवणकर, श्रीरगा दिगरसकट. श्रावर्णा जाधव, संस्कृती मुराडी. अपूर्वा भगत, प्रणय मगर. दर्श कोंद्रे, अथर्व चव्हाण. श्रद्धा दिवेकर, सोहम मगर. संस्कृती कोंद्रे, शिवम मगर, मिरेल डिसूजा, गोविंद घात.

​जावा- येझदी मोटरसायकल्सने लडाखच्या वाटेवर त्यांच्या कम्युनिटी सदस्यांसाठी केली ‘सर्व्हिस इज ऑन अस’ उपक्रमाची घोषणा

पुणे: लडाखच्या आव्हानात्मक आणि नयनरम्य केंद्रशासित प्रदेशात जाणाऱ्या राइडिंग सीझनच्या आगमनाच्या वेळी जावा येझदी मोटरसायकलने देशभरातून या प्रदेशात जाण्याची योजना आखत असलेल्या कम्युनिटी सदस्यांसाठी नुकताच एक सेवा उपक्रम सुरू केला आहे. ‘सर्व्हिस इज ऑन अस’ हा उपक्रम देशाच्या प्रमुख भागांतून लडाखच्या प्रदेशात येणाऱ्या प्रमुख मार्गांवर मोटरसायकल स्वारांना मोफत सेवा सहाय्य देईल.

या उपक्रमांतर्गत मार्गालगत असलेल्या प्रमुख शहरांमध्ये असलेली सेवा केंद्रे रायडर्सना आवश्यक सेवा सहाय्य पुरवतील. ठराविक कालावधीसाठीचे कामगार शुल्क आणि चालू दुरुस्तीसाठी कामगार शुल्क पूरक आणि विनामुल्य असेल.  रायडर्स लेह सर्व्हिस स्टेशनवर पूरक २६ पॉइंट जनरल चेक-अप देखील करून  घेऊ शकतात. कंपनी आवश्यक साधने आणि सुटेभाग यांसह  सुसज्ज असलेले तज्ञ तंत्रज्ञ लेह येथे देखील तैनात करेल. आरएसए धोरण मार्गदर्शक तत्त्वांनुसार आरएसए पॉलिसीधारक मार्गातील ब्रेकडाउन सहाय्यासाठी पात्र असतील तर गैर- आरएसए पॉलिसी धारक सशुल्क आधारावर असे करण्यास सक्षम असतील.

जावा आणि येझदी समुदायाच्या रायडर्सना हा सेवा उपक्रम समर्पित करताना क्लासिक लिजेंड्स मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष सिंग जोशी म्हणाले, “एखाद्याच्या स्वप्नातील गंतव्यस्थानापर्यंत जाण्यासाठी खूप नियोजन करावे लागते आणि या ‘सर्व्हिस इज ऑन अस’ उपक्रमाच्या साथीने आमच्या रायडर्सना एका गोष्टीची कमी काळजी करावी लागेल आणि ती म्हणजे संपूर्ण मार्गात मिळणारे सेवा पाठबळ. जावा आणि येझदी रायडर्सच्या मुक्त उत्साहीपणाला आणि शोध घेण्याच्या त्यांच्या ऊर्मीला हा उपक्रम समर्पित आहे. आणि ते या प्रवासात असताना सेवा सहाय्य पुरविण्याच्या बाबतीत त्यांना संपूर्ण मन:शांती मिळवून देणे हे आमचे ध्येय आहे.”   

लडाखला जाण्यासाठी दोन सर्वात लोकप्रिय मार्गांनी NCR मध्ये विलीन होणाऱ्या देशाच्या जवळजवळ प्रत्येक कानाकोपऱ्यातून निघालेल्या रायडर्सना सर्वसमावेशक सेवा कवच देण्याचे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.  एक चंदीगड आणि मनाली मार्गे आणि दुसरा जम्मू, श्रीनगर आणि कारगिल मार्गे. पश्चिम बंगाल, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र आणि दिल्ली या राज्यांमधूनप्रवासाला सुरुवात करणारे जावा-येझदी कम्युनिटीचे सदस्य खाली नमूद केलेल्या तपशिलानुसार या सेवेचा लाभ घेऊ शकतात.

दिल्लीहून रायडर्स नोएडा, गाझियाबाद आणि गुडगाव येथील सेवा केंद्रांचा वापर हरियाणा-फरीदाबाद, अंबाला आणि कर्नाल, चंदीगड, हिमाचल प्रदेश-मंडी, पंजाब – होशियारपूर आणि पठाणकोट, जम्मू-काश्मीर-जम्मू आणि श्रीनगर येथे जाण्यासाठी करू शकतात.

कोलकाता, पश्चिम बंगालपासून सुरू होणारा हा मार्ग झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली/एनसीआर, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि जम्मू आणि काश्मीर या राज्यांमधून जातो. दिल्लीच्या पुढे वर उल्लेख केलेला मार्ग घेताना या मार्गावर धोरणात्मकरित्या निवडलेली प्रमुख सेवा स्थाने झारखंड धनबाद, बिहार – आराह आणि पटना, उत्तर प्रदेश – लखनौ आणि आग्रा असतील.

बंगळुरू, कर्नाटक येथून येणाऱ्या रायडर्ससाठी पसंतीचा मार्ग तेलंगणा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली/एनसीआर, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि जम्मू आणि काश्मीर या राज्यांमधून जातो. या मार्गावरील सेवा स्थाने तेलंगणा – हैदराबाद, महाराष्ट्र – नागपूर, मध्य प्रदेश – ग्वाल्हेर आणि भोपाळ, उत्तर प्रदेश – झाशी आणि आग्रा असतील.

मुंबईहून लडाखला जाताना गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, दिल्ली/NCR, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि जम्मू आणि काश्मीर या राज्यांतून जाणाऱ्या मार्गावर गुजरात- सुरत, भरूच, वडोदरा आणि अहमदाबाद , राजस्थान – उदयपूर, अजमेर आणि जयपूर येथे सेवा स्थाने असतील.

रायडर्स जावा आणि येझदीच्या अधिकृत वेबसाइटवरील डीलर लोकेटर विभागात त्यांच्या मार्गात येणाऱ्या डीलरशिप आणि सेवा केंद्रांची सर्वसमावेशक यादी देखील तपासू शकतात.

आता क्रेडिट कार्डवरुन देखील करता येणार युपीआय पेमेंट, रुपे कार्डपासून होणार सुरवात

0

ई-मॅनडेट व्यवहारांची मर्यादा 15,000 रुपयांपर्यंत शिथिल करण्याचा निर्णय

मुंबई|  जून 8, 2022

प्रमुख दर -भारतीय रिझर्व बँकेने आज 2022-23 या आर्थिक वर्षातील आपला दुसरा पतधोरण आढावा आज जारी केला. सहा ते आठ जून 2022 या काळात, आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली, पतधोरण आढावा समिती-एमपीसीची बैठक झाली. या बैठकीत, रेपो दरात अर्ध्या टक्क्याची वाढ करत तो 4.90 % करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. महागाईवर नियंत्रण ठेवण्याच्या हेतूने सलग दुसऱ्यांदा रिझर्व बँकेने रेपो दरात वाढ केली आहे. 
त्यानुसार, स्थायी ठेव सुविधा दर देखील आता  4.65% इतके झाले आहेत तर सीमान्त स्थायी  सुविधा दर आणि बँक दर  5.15% एवढे असतील. 

पुढे वाटचाल करतांना एकीकडे विकासाला पाठबळ देत, महागाई दर निश्चित लक्ष्याच्या आत ठेवण्याच्या दृष्टीने, एमपीसीने हस्तक्षेप कमी करण्यावर (withdrawal of accommodation)वर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. 

महागाई: 

2022 या वर्षात मोसमी पाऊस सरासरीच्या सामान्य असेल, तसेच भारतात, कच्च्या तेलाच्या किमती प्रती पिंप 105 डॉलर्स असतील, असे गृहीत धरत, 2022-23 या वर्षासाठी महागाई दर 6.7% टक्के असेल असा अंदाज या आढाव्यात वर्तवण्यात आला आहे. 
पहिली तिमाही  – 7.5% 
दुसरी तिमाही  – 7.4% 
तिसरी तिमाही  – 6.2% 
चौथी तिमाही – 5.8%

वृद्धीचा अंदाज 

जागतिक अर्थव्यवस्थेत, महागाई दर अद्याप अत्यंत चढा आहे, तसेच वृद्धीदर मंदावला आहे हे एमपीसी ने लक्षात घेतले आहे. त्याशिवाय, भूराजकीय तणाव आणि त्यामुळे असलेले निर्बंधही कायम असल्याने कच्चे तेल तसेच अनेक वस्तूंच्या किमती वाढलेल्या आहे. त्याशिवाय कोविड-19 चा प्रभाव अद्यापही कायम असल्याने, पुरवठा साखळीत देखील अडथळे येत आहेत. 


एप्रिल -मे महिन्यातील आर्थिक निर्देशांकांनुसार, भारतात, आर्थिक घडामोडी सुधारण्याची व्याप्ती वाढत असल्याचे दिसले आहे. शहरी भागात मागणीत वाढ होते त्याचवेळी ग्रामीण भागातही थोडी सुधारणा होते आहे. मे महिन्यात व्यापारी निर्यातीत दुहेरी अंकांची वाढ झाली, गेले सलग 15 महीने, निर्यात क्षेत्रांत उत्तम वाढ होते आहे. तेल आणि सोने वगळता इतर वस्तूंची निर्यात वाढत असल्याने, देशांतर्गत मागणी आता वाढल्याचे सूचित होत आहे. 
वर्ष 2022-23 साठी वास्तविक जीडीपी दर 7.2% राहण्याचा अंदाज 


पहिली तिमाही  – 16.2% 
दुसरी तिमाही  – 6.2% 
तिसरी तिमाही  – 4.1% 
चौथी तिमाही -4.0%

एनएसओच्या 31 मे रोजी जारी झालेल्या प्राथमिक अंदाजानुसार, 2021-22 मध्ये भारताचा सकल राष्ट्रीय उत्पादनाचा विकासदर 8.7% असेल असं अंदाज वर्तवण्यात आला होता. हा कोविडपूर्व स्थितीपेक्षा अधिक आहे. 


सहकारी बँकांना लाभ मिळवून देण्यासाठीच्या उपाययोजना.

गेल्यावेळी मर्यादा शिथिल केल्यापासून घरांच्या वाढलेल्या किमती आणि ग्राहकांच्या गरजा लक्षात घेता, सहकारी बँकांची वैयक्तिक गृहकर्ज मर्यादा वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार टियर I/II शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मर्यादा अनुक्रमे ₹30 लाख/₹70 लाख ते ₹60 लाख/₹ 140 लाख. निव्वळ मूल्यांकन ₹100 कोटींपेक्षा कमी असणाऱ्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी ही मर्यादा ₹20 लाखांहून वाढवून ₹50 लाख करण्यात आली आहे, आणि इतर ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी ही मर्यादा ₹30 लाखांहून वाढवून ₹75 लाख करण्यात आली आहे.


नागरी सहकारी बँका आता ग्राहकांना घरपोच बँकिंग सेवा पुरवू शकतील. यामुळे या बँकांना ग्राहकांच्या गरजा अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण करता येतील, विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग ग्राहकांना त्याचा लाभ मिळेल.

ग्रामीण सहकारी बँका आता सध्याच्या एकूण मालमत्तेच्या 5% गृह कर्ज मर्यादेत राहून व्यावसायिक बांधकामांना कर्ज देऊ शकतील (रहिवासी गृह संकुल प्रकल्पांना कर्ज)

ई- मँडेट व्यवहारांवर असलेली मर्यादा शिथिल करणे. 


अधिक मूल्याचे सदस्यत्व, विमा हप्ते आणि शैक्षणिक शुल्क पेमेंटसाठी ग्राहकांना सुविधा व्हावी म्हणून ई- मँडेट व्यवहारांवर असलेली प्रती व्यवहार मर्यादा शिथिल करत ₹ 5,000 ती ₹15,000 करण्यात आली आहे.

यू पी आय पेमेंट व्यवस्थेची व्याप्ती वाढविणे. 

आता क्रेडिट कार्ड देखील यू पी आय प्लॅटफॉर्मशी जोडले जाऊ शकेल, याची सुरुवात रूपे कार्ड पासून होईल. यामुळे वापरकर्त्यांना अधिक सुलभता मिळेल आणि डिजिटल व्यवहारांची व्याप्ती वाढेल. भारतात यू पी आय हे पेमेंट करण्याचे सर्वसमावेशक माध्यम बनले आहे. सध्या 26 कोटी पेक्षा जास्त वापरकर्ते आणि 5 कोटीपेक्षा जास्त व्यापारी यू पी आय प्लॅटफॉर्मचा वापर करत आहेत.

गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्यासह पतधोरण आढावा समितीत डॉ शशांक भिडे, डॉ अशीमा गोयल, प्राध्यापक जयंत आर वर्मा, डॉ राजीव रंजन आणि डॉ मायकेल देबब्रत पात्रा यांचा समावेश होता.
पतधोरण आढावा समितीची पुढील बैठक 2-4, 2022ऑगस्ट दरम्यान होणार आहे.

पंकजा मुंडेंचा पत्ता कट – भाजपा कडून प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, राम शिंदे यांना उमेदवारी

मुंबई- भाजपकडून विधान परिषदेसाठी 5 उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राम शिंदे, भाजपचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय यांची नावावर भाजपने शिक्कामोर्तब केले आहे. केंद्राने या नावांना मंजुरी दिल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

विधान परिषदेसाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे, चित्रा वाघ, सदाभाऊ खोत यांना पक्षाकडून संधी मिळेल अशी चर्चा होती. मात्र, या तिन्ही नेत्यांना भाजपने संधी नाकारली आहे. भाजपने उमा खापरे आणि श्रीकांत भारतीय या नवख्या उमेदवारांना संधी दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.राज्यसभेच्या सहा जागांसाठी सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात जोराची रस्सीखेच लागली आहे. त्यात आता विधान परिषदेच्या १० जागांची भर पडली आहे. या दहा जागा विधानसभेतील सदस्यांकडून निवडून द्यावयाच्या आहेत. २० जून रोजी होत असलेल्या परिषदेच्या निवडणुकीसाठी गुरुवार (९ जून) उमेदवारी दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे.

शिवसेनेकडून दोन जागांसाठी माजी मंत्री सचिन अहिर आणि नंदुरबारचे जिल्हाप्रमुख आमशा पाडवी यांच्या नावाची चर्चा आहे. राष्ट्रवादीकडून माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे नाव निश्चित आहे. दुसऱ्या जागेसाठी सभापती रामराजे निंबाळकर, अमरसिंह पंडित यांच्या नावावर विचार चालू आहे. काँग्रेसमधून भाई जगताप, नसीम खान, सचिन सावंत, बसवराज पाटील, चंद्रकांत हंडोरे यांची नावे दिल्लीला पाठवल्याचे सूत्रांनी सांगितले.

महाराष्ट्रातल्या नोकऱ्या काबीज करण्यासाठी यूपीमधील शाळांत मराठी शिकवा, कृपाशंकर यांची थेट योगी आदित्यनाथ यांच्याकडे मागणी

मुंबई -भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांनी उत्तर प्रदेशमध्ये माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी मराठीचा पर्यायी भाषा म्हणून समावेश करण्याची विनंती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून केली आहे.कृपाशंकर सिंह यांनी उत्तर प्रदेशमधील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालेय शिक्षण अभ्यासक्रमात मराठीचा पर्यायी भाषा म्हणून समावेश करावा अशी विनंती करणारे पत्र उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लिहलं आहे. “अनेक उत्तर भारतीय लोक नोकरीसाठी महाराष्ट्रात येतात. मात्र मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान नसल्यामुळे त्यांना नोकरी मिळण्यात अडचणी येतात , महाराष्ट्रात अशा अनेक नोकऱ्या आहेत, ज्यामध्ये मराठी भाषेचे ज्ञान गरजेचे असते. मात्र उत्तर प्रदेशमधील लोकांना ही भाषा अवगत नसल्यामुळे त्यांना नोकरी मिळू शकत नाहीत. याच कारणामुळे उत्तर प्रदेशमध्ये माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमात मराठी या भाषेचा पर्यायी भाषा म्हणून समावेश केला तर उत्तर प्रदेशमधील तरुणांना येथे नोकरी मिळणे सोपे जाईल,” असे कृपाशंकर सिंह यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटले आहे.

बारावीचा निकाल जाहीर: 94.22 टक्के विद्यार्थी पास

0

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा यंदाचा निकाल 94.22 टक्के लागला. निकालात यंदाही मुलींनीच बाजी मारली असून मुलींचा निकाल मुलांच्या निकालापेक्षा 2.06 टक्क्यांनी अधिक आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 97.21 टक्के लागला आहे.

कोणत्या विभागाचा किती टक्के निकाल?

पुणे: ९३.६१%

नागपुर: ९६.५२%

औरंगाबाद: ९४.९७%

मुंबई: ९०.९१%

कोल्हापूर: ९६.०७%

अमरावती: ९६.३४ %

नाशिक: ९५.०३%

लातूर: ९५.२५%

कोकण: ९७.२१%

95.35 विद्यार्थिनी पास

राज्य बोर्डाची परीक्षा यंदा ऑफलाईन स्वरूपात घेण्यात आली. त्यामध्ये 8 लाख 17 हजार 611 विद्यार्थी तर, 6 लाख, 68 हजार, 88 विद्यार्थिनींचा समावेश होता. यापैकी 95.35 विद्यार्थिनी पास झाल्या तर मुलांचे पास होण्याचे प्रमाण 93.29 टक्के आहे. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पुण्यात मंडळाच्या मुख्यालयातील पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला.

असा पाहा निकाल

मंडळाच्या www.mahahscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर निकाल जाहीर झाला आहे. संकेतस्थळावर गेल्यावर होम पेजवर इयत्ता 12 वी निकाल 2022 ही लिंक पहावी. क्लिक केल्यावर नवे पेज उघडेल. तुमचा नोंदणी क्रमांक आणि जन्मदिनांक टाकून सबमिट केल्यावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल. या वर्षी 14 लाख 85,826 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती.

गृहकर्जे, वाहनकर्जे महागणार; आरबीआयची व्याजदरांत वाढ

 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. रेपो रेटमध्ये ५० बेसिस पॉइंटची (०.५० टक्के) वाढ करण्यात आली आहे. यासोबत रेपो रेट ४.९ टक्क्यांवर पोहोचला आहे. एक महिन्याच्या अंतराने रेपो रेटमध्ये करण्यात आलेली ही दुसरी वाढ आहे.याआधी एमपीसीने मे महिन्याच्या सुरुवातीला तातडीने आयोजित केलेल्या बैठकीतून रेपो रेटमध्ये ४० बेसिस पॉइंटची वाढ केली होती. ऑगस्ट महिन्यात पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये वाढ केली जाईल असा अंदाज आहे. यानंतर हा रेट ५.५० टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरण निर्धारण समितीच्या (एमपीसी) बैठकीनंतर रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आल्याची माहिती दिली. एमपीसीची सोमवारपासून सुरु असलेली तीन दिवसीय बैठक आज संपली. या आर्थिक वर्षातील एमपीसीची ही तिसरी बैठक होती. शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत समितीच्या पाच सदस्यांनी महागाई आणि आर्थिक विकासावर चर्चा केली. अनियंत्रित महागाई लक्षात घेता रेपो रेट वाढवण्याशिवाय पर्याय नाही यावर सर्व सदस्यांचं एकमत झालं.

सरकारी आकडेवारीनुसार, एप्रिल २०२२ मध्ये किरकोळ महागाई दर ७.८ टक्के होता, जो मे २०१४ नंतर सर्वाधिक आहे. जानेवारी २०२२ पासून हा दर सहा टक्क्यांच्या पुढे आहे. याचप्रकारे एप्रिल २०२२ मध्ये घाऊक महागाई वाढून १५.८ टक्क्यांवर पोहोचला होता. डिसेंबर १९९८ नंतर हा दर सर्वाधिक होता.

धान्याच्या महागाईबद्दल बोलायचं गेल्यास मार्च महिन्यात ७.६८ टक्क्यांवरुन ८.३८ टक्क्यांवर पोहोचला होता. मे महिन्यातील आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान महागाई दर वाढत राहील असा अंदाज आहे. दुसरीकडे सरकराने महागाई नियंत्रणात आणण्यासाठी पेट्रोल आणि डिझेवरील कर, विमान इंधनाचे दर कमी करण्यासोबतच अनेक पावलं उचलली आहेत.

रेपो दर म्हणजे काय आणि त्यात वाढ केली गेल्याने काय होणार?

देशाच्या बँकिंग व्यवस्थेची नियंत्रक असलेल्या रिझर्व्ह बँक ही अर्थव्यवस्थेतील पैशाच्या प्र‌‌‌वाहावर लगाम राखते. कायद्याने स्वीकृत जबाबदारीप्रमाणे महागाईचा दर देखील चार टक्के (कमी/अधिक दोन टक्के) या घरात राखण्याचे उद्दिष्ट आणि दायीत्वही रिझर्व्ह बँकेवर आहे. ही भूमिका पार पाडण्यासाठी – रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट आणि रोख राखीव प्रमाण (सीआरआर) ही रिझर्व्ह बँकेकडे उपलब्ध असणारी प्रभावी साधने आहेत. वाणिज्य बँकांना त्यांच्या व्यवसायाची गरज पूर्ण करण्यासाठी लागणारा निधी रिझर्व्ह बँक त्यांना अल्प मुदतीचे कर्ज देत असते, हे कर्ज ज्या व्याज दराने दिले जाते, त्याला ‘रेपो रेट’ म्हणतात. रेपो रेट वाढविला गेल्याने, बँकांना वाढीव दराने निधी मिळेल, ज्यातून बँकांकडून उद्योजक-व्यावसायिक व सामान्य कर्जदारांना दिले जाणारे कर्जही मग स्वाभाविकपणे महागणार आहेत.

RBI वर दर वाढवण्यासाठी दबाव

मध्यवर्ती बँकेने या वर्षी 4 मे रोजी रेपो दरात शेवटची वाढ केली होती आणि तेव्हापासून देशात आणि जगात 4 मोठे बदल झाले आहेत:

  • चीनमध्‍ये लॉकडाऊन उघडल्‍याने जगभरात कच्‍चे तेल, पोलाद यांसारख्या कमोडिटीजची मागणी वाढली.
  • आंतरराष्ट्रीय बाजारात, बेंचमार्क क्रूड ब्रेंट प्रति बॅरल 120 डॉलरच्या वर गेला.
  • बाँडचे उत्पन्न 2019 नंतर प्रथमच 7.5% पर्यंत पोहोचले, 8% पर्यंत जाण्याची भीती.
  • ब्रिटन आणि युरोझोनमधील महागाई 8% च्या 40 वर्षांच्या विक्रमी पातळीच्या वर पोहोचली आहे, अशा परिस्थितीत जागतिक चलनवाढ वाढण्याची भीती आहे.

रेपो दर आणि तुमच्या ईएमआयचा संबंध

रेपो रेट म्हणजे ज्या दारावर बँकांना RBI कडून कर्ज मिळते, तर रिव्हर्स रेपो दर हा दर आहे ज्यावर RBI बँकांना पैसे ठेवण्यावर व्याज देते. जेव्हा RBI रेपो दर कमी करते, तेव्हा बँका देखील बहुतेक वेळा व्याजदर कमी करतात. म्हणजेच ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या कर्जाचे व्याजदर कमी होतात, त्याचप्रमाणे ईएमआयही कमी होतो. त्याचप्रमाणे, जेव्हा रेपो दरात वाढ होते, तेव्हा व्याजदरात वाढ झाल्यामुळे ग्राहकांसाठी कर्ज महाग होते. कारण व्यापारी बँकांना सेंट्रल बँकेकडून जास्त दराने पैसे मिळतात, ज्यामुळे त्यांना दर वाढवावे लागतात.

पुर्वांकराची युवाशक्तीमध्ये गुंतवणूक; पुण्यामध्ये ‘विद्यासारथी’मार्फत सुरु केली शिष्यवृत्ती योजना

पुणे: प्रगत भविष्याच्या संधी सर्वांना एकसमान उपलब्ध व्हाव्यात यासाठी पुर्वांकरा लिमिटेडने प्रोटियन इजीओव्ही टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा (आधीची एनएसडीएल ई-गव्हर्नन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड) ऑनलाईन शिष्यवृत्ती प्लॅटफॉर्म विद्यासारथीसोबत भागीदारी केली आहे. महाराष्ट्रातील पुण्यामधील ९ अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील २४ विद्यार्थ्यांना पुर्वांकरा शिष्यवृत्ती देण्यात आली आहे.  या उपक्रमाच्या माध्यमातून उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना साहाय्य पुरवण्याचे पुर्वांकराचे उद्दिष्ट आहे.

शैक्षणिक कामगिरीबरोबरीनेच पात्रता निकषांमध्ये कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या विद्यार्थ्यांचा देखील समावेश करण्यात आला आहे.  एकच पालक असलेल्या किंवा ज्यांचे कुटुंब कोविड-१९ ने प्रभावित झाले आहे अशा विद्यार्थ्यांना विशेष प्राधान्य देण्यात आले.  एकूण १० लाख रुपयांच्या शिष्यवृत्ती रकमेचे वाटप करण्यात आले असून, असे वाटप दरवर्षी केले जाईल.

शिष्यवृत्ती योजनेबद्दल पुर्वांकरा ग्रुपच्या कार्यकारी संचालिका श्रीमती अमांडा पुर्वांकरा म्हणाल्या, “सर्वांना शिक्षण मिळावे, खासकरून आर्थिकदृष्ट्या वंचित पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करवून दिल्या जाव्यात यासाठी आम्ही दीर्घ काळापासून वचनबद्ध आहोत.  आमचे असे ठाम मत आहे की, पुर्वांकरा शिष्यवृत्तीमार्फत आम्ही या विद्यार्थ्यांची रोजगार सक्षमता वाढवत आहोत आणि त्यांचे भवितव्य सुरक्षित करत आहोत.  प्रोटियन ईजीओव्ही टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या सहयोगाने हा शिष्यवृत्ती उपक्रम राबवून शिक्षणाच्या सार्थक संधी निर्माण करणे आणि विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व गणित (एसटीईएम) शिक्षणाला प्रोत्साहन देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.”  

त्यांनी पुढे सांगितले की, सर्वसामावेशी भवितव्य निर्माण करण्याचे आमचे स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्यासाठी अशाप्रकारच्या प्रतिष्ठित संघटनांसोबत काम करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.  लवकरच ही योजना आम्ही चेन्नईमध्ये देखील उपलब्ध करवून देऊ.” 

भारतातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठीचे अर्थसहाय्य अधिक सहजपणे, विनाअडथळा उपलब्ध व्हावे यासाठी प्रोटियन ईजीओव्ही टेक्नॉलॉजीज लिमिटेडने विद्यासारथी हा तंत्रज्ञान-चालित प्लॅटफॉर्म निर्माण केला आहे. संपूर्ण शिष्यवृत्ती योजनेचे व्यवस्थापन यामध्ये केले जाते, यामध्ये अर्ज प्रमाणित करणे, शिष्यवृत्ती प्रदान करणे आणि फंड्सचे वाटप करणे यांचा समावेश असतो.

प्रोटियन ईजीओव्ही टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे चीफ बिझनेस ऑफिसर श्रीगोपा कुमार टी एन म्हणाले, पुर्वांकरा लिमिटेडसोबत भागीदारी करून आम्हाला अतिशय आनंद होत आहेभारतभरातील महत्त्वाकांक्षी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अर्थसहाय्य सहज उपलब्ध करवून द्यावे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्यासाठी  ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मेहनत करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे हे आमचे उद्दिष्ट आहेपुर्वांकरासोबत आमच्या भागीदारीमुळे या पात्र विद्यार्थ्यांना एक महान भवितव्य प्रत्यक्षात निर्माण करता येईल.”

२०२० साली प्रोविडेंट हाऊसिंग या पुर्वांकराच्या संपूर्ण मालकीच्या उपकंपनीने प्रोटियन ईजीओव्ही टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या सहयोगाने गोव्यामध्ये प्रोविडेंट हाऊसिंग शिष्यवृत्ती सुरु केली होती आणि गेल्या दोन वर्षात ६४ विद्यार्थ्यांना त्या शिष्यवृत्तीचे लाभ मिळाले आहेत.

महापालिकेचे सभागृह गाजविणारे अरविंद शिंदे कॉंग्रेसच्या पुणे शहराध्यक्षपदी ..

पुणे : महापालिकेचे सभागृह गाजविणारे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि माजी गटनेता अरविंद शिंदे यांची काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिंदे यांची प्रभारी शहराध्यक्षपदी नियुक्ती झाली असून पक्षाची संघटनात्मक निवडणूक प्रक्रिया सुरू असून ती पूर्ण झाल्यानंतर ते शहराध्यक्ष म्हणून सूत्रे स्वीकारतील.आगामी महापालिका निवडणूक शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढविली जाईल.माजी गृहराज्यमंत्री आणि माजी शहराध्यक्ष रमेश बागवे यांचे अत्यंत जवळचे खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे .अरविंद शिंदे हे पक्षाचे अनुभवी नगरसेवक आहेत.त्यांच्या महापालिकेतील अभ्यासू आणि आक्रमक कामाचा परिचय सर्वांना आहे. महापालिकेतील अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे ,अनेक गैरबाबी चव्हाट्यावर मांडून त्यांनी सभागृहात सत्ताधाऱ्यांच्या तोंडाला फेस आणलेला सर्वांनी पाहिलेले आहे.

काँग्रेसच्या शिर्डी येथील नवसंकल्प शिबिरातील ठरावानुसार पाच वर्षांपासून जास्त काळ शहराध्यक्षपदावर कार्यरत असलेले शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे शहराध्यक्षपद रिक्त झाले होते.बागवे यांच्याकडे राज्याचे उपाध्यक्ष पद देखील आहे. त्यामुळे शहराध्यक्षपदावर नियुक्ती होण्यासाठी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची मोर्चेबांधणी सुरू झाली होती. पक्षाची संघटनात्मक निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे सध्या प्रभारी शहराध्यक्ष म्हणून बागवे काम पहातील, अशी शक्यताही पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली होती. मात्र प्रदेश काँग्रेसकडून अरविंद शिंदे यांच्या नावाची घोषणा मंगळवारी करण्यात आली. सध्या ते प्रभारी शहराध्यक्ष असले तरी संघटनात्मक निवडणुकीनंतर ते पूर्णवेळ शहराध्यक्ष होतील, असे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

शेतकरी आंदोलकांवरील गुन्हे मागे,नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ५० हजार रुपये अनुदानाचे १ जुलै या कृषीदिनापासून वाटप

0

कृषीमूल्य आयोगाच्या अध्यक्षांची नेमणूक लवकरच करणार

पुणतांबा येथील शेतकरी आंदोलनासंदर्भात बैठकीत निर्णय

मुंबई, दि. 7 :- सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि जिवितहानीसारखे गंभीर गुन्हे वगळता शेतकरी आंदोलनांतील शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ५० हजार रुपये अनुदानाचे वाटप १ जुलै या कृषीदिनापासून करण्यात येणार आहे. कृषीमूल्य आयोगाच्या अध्यक्षांची नेमणूकही लवकरच करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगितले.

पुणतांबा येथील शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला खासदार सदाशिवराव लोखंडे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, कृषीमंत्री दादाजी भुसे, दुग्धव्यवसाय विकासमंत्री सुनील केदार, सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये,महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, रोहयोचे अपर मुख्य सचिव नंद कुमार, सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव अनूप कुमार, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, प्रधान सचिव दिनेश वाघमारे, जे. पी गुप्ता, किसान क्रांती संघटनेचे प्रतिनिधी सरपंच डॉ. धनंजय धनवटे, सुभाषराव कुलकर्णी, सुहासराव वहाडणे, सुभाष वहाडणे, संगीता भोरकडे, ॲड. विजय सदाफळ, अॅड. चांगदेव धनवटे, धनंजय जाधव, बाळासाहेब चव्हाण, नामदेव धनवटे, विठ्ठलराव जाधव, ॲड मुरलीधर थोरात, अनिल नळे, योगेश रायते, अमोल सराळकर, दत्तात्रय धनवटे, बाळासाहेब भोरकडे, निकिता जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. साखर आयुक्त शेखर गायकवाड,च अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले हे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, शेतकरी जगला तर राज्य जगेल हे लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय राज्यशासनाने घेतले आहेत. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा मोठा निर्णय घेण्यात आला. शेतकरी समाधानी होण्यासाठी, शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. गळीत हंगाम 2021-2022 मधील अतिरिक्त ऊसाचे गाळप करण्यासाठी वाहतूक अनुदान व साखर घट उतारा अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऊस उत्पादक शेतक-यांना ईथेनॉल निर्मितीसाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. यंदा राज्यात ऊसाचे विक्रमी उत्पादन व गाळप झाले असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक राहू नये यासाठी शासनाने सर्वतोपरी उपाययोजना केल्या आहेत. यंदाच्या गाळप हंगामात ऊस शिल्लक राहणार नाही. याउपरही जर ऊस शिल्लक राहिला तर शिल्लक ऊसाला भरपाई देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल.

दुग्धविकास विभागामार्फत दूध उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. कोरोना संकटाच्या काळातही दूध व्यवसायाला मदत करण्यात आली. दूध उत्पादन वाढीसाठी देशी गाईंच्या जातींवर विशेषत्वाने लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. दुधाला एफआरपी देण्यासंदर्भातील प्रस्ताव संबंधीत समितीसमोर ठेऊन अभ्यासाअंती त्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल. कांदाचाळी आणि कोल्ड स्टोअरेजच्या माध्यमातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सुविधा देण्यात येत आहेत. कांदा निर्यातीवरील बंदीसंदर्भात ठराव करून तो केंद्रसरकारकडे सादर करण्यात येईल. शेतकऱ्यांना सौरऊर्जा पंपाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजनांबरोबरच संशोधनाला चालना देऊन कृषिविकास साधण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

बैठकीत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषीमंत्री दादाजी भुसे, दुग्धव्यवसाय विकासमंत्री सुनील केदार, सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनीही संबंधीत विभागामार्फत शेतकऱ्यांच्या हितासाठी घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली.

तासिका तत्वावरील प्राध्यापकांचे मानधन ‘युजीसी’च्या निकषानुसार वाढविण्याचा निर्णय

0

आकृतिबंध पूर्ण झालेल्या विद्यापीठांतील
नॅक मानांकन असणाऱ्याच महाविद्यालयांना ५० टक्के पद भरतीला परवानगी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीतील निर्णय

मुंबई, दि. ७ : राज्यातील महाविद्यालयातून तासिका (सीएचबी) तत्वावर शिकविणाऱ्या प्राध्यापकांचे मानधन विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) निकषानुसार वाढविण्याचा महत्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत आज घेण्यात आला. त्याचबरोबर विद्यापीठांचे आकृतिबंध तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देत ‘नॅक’ (राष्ट्रीय मूल्यांकन तथा प्रत्यायन परिषद) मानांकन असणाऱ्या महाविद्यालयांना ५० टक्के पद भरतीला परवानगी दिली जावी, गुणवत्तापूर्ण शिक्षणात कोणतीही तडजोड करु नये, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांची भरती प्रक्रीया व तासिका तत्वावर (सीएचबी) कार्यरत प्राध्यापकांच्या दरमहा मानधनाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ‘व्हीसी’च्या माध्यमातून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार सुधीर तांबे, आमदार सतिश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार किरण सरनाईक, आजी आमदार अमरसिंह पंडीत, संजय खोडके, सामान्य प्रशासन विभागाचे (सेवा) अप्पर मुख्य सचिव नितीन गद्रे, वित्त विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास रस्तोगी, उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक धनराज माने, महाराष्ट्र अंडर प्रिव्हिलेज्ड टिचर्स असोसिएशनचे (मुप्टा) सुनिल मगरे आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्यातील महाविद्यालयातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी, तसेच महाविद्यालयातून गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी विशेष प्रयत्न करावेत, अशा सूचना देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील तासिका तत्वावर (सीएचबी) शिकविणाऱ्या प्राध्यापकांच्या मानधनात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) निकषानुसार वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. या निर्णयाचा फायदा राज्यातील हजारो ‘सीएचबी’ तत्वावर शिकविणाऱ्या प्राध्यापकांना होणार आहे. तसेच राज्यातील विद्यापीठांचे आकृतीबंध तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देताना आकृतिबंध पूर्ण झालेल्या मात्र ‘नॅक’ (राष्ट्रीय मूल्यांकन तथा प्रत्यायन परिषद) मानांकन मिळविणाऱ्या महाविद्यायालयातचं ५० टक्के पद भरतीला मान्यता देण्यात येणार आहे. राज्यातील महाविद्यालयीन शिक्षणाच्या दर्जात कोणत्याही परिस्थितीत तडजोड करता कामा नये अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिल्या.


हाफकिनने कोविड चाचणी प्रमाणीकरण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून करुन घ्यावे – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

0

मुंबई, दि. 7 : हाफकिन प्रशिक्षण, संशोधन संस्था आणि रिसॉल्व्ह डायन्गोस्टिक कंपनीने कोविड चाचणी करता येईल असे ‘सलाईव्हा सॉल्व्ह किट’ तयार केले आहे. या किटच्या माध्यमातून कोविड चाचणी करता येणार असून हाफकिनने कोविड चाचणी प्रमाणीकरण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून करुन घ्यावे, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

हाफकिन प्रशिक्षण, संशोधन संस्थेने तयार केलेल्या कोविड किटबाबतचे सादरीकरण आज मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. देशमुख यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी संस्थेच्या संचालक सीमा व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंह, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्यासह हाफकिन संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

श्री. देशमुख म्हणाले, कोविड चाचणी किट कसे असावे याबाबत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने काही नियम ठरविले आहेत. यानुसार हे किट काम करते का हे तपासून घेणे आवश्यक आहे तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये हे किट वापरताना काही अडचणी येतात का याचा अभ्यास होणे आवश्यक आहे.

राज्यात कोविड टास्क फोर्स स्थापन करण्यात आला असून या फोर्सकडेही हे किट किती उपयुक्त आहे याबाबतचा अहवाल घेण्यात यावा. येणाऱ्या काळात हे किट मुंबईतल्या सेंट जॉर्ज, कस्तुरबा हॉस्पीटल येथे पाठविण्यात यावे. तसेच हे किट कसे आहे, हॉस्पीटलमध्ये उपलब्ध केल्यावर डॉक्टरांना या किटद्वारे रुग्णांची कोविड तपासणी करता येऊ शकेल का हे सर्व तपासून घेण्यात यावे असे निर्देशही श्री.देशमुख यांनी दिले.

अधिक दराने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाईचा ईशारा

पुणे, दि. 7: रासायनिक खतांच्या अंतिम खत विक्री दरामध्ये 1 एप्रिल 2022 पासून सुधारणा करण्यात आलेली असून निश्चित दरापेक्षा अधिक दराने विक्री करत असल्याचे आढळल्यास संबंधित विक्रेत्यावर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा परवाना अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांनी कळवले आहे.

युरिया खताची किंमत प्रतिबॅग 266.50 रुपये निश्चित असून डिएपी खताची प्रतिबॅग किंमत इफको, जीएसएफसी, आरसीएफ, कृभको, आयपीएल, झुआरी पीपीएल/एमसीएफएल, कारोमंडल, स्पीक, चंबळ या नाममुद्रेची 1 हजार 350 रुपये तर एनएफएल कंपनीच्या खताची किंमत प्रतिबॅग 1 हजार 200 रुपये निश्चित करण्यात आलेली आहे.

एमओपी खताची किंमत जीएसफसी, आरसीएफ, आयपीएल, चंबळ या कंपनीच्या प्रतिबॅगची विक्री किंमत 1 हजार 700, एनएफएल 1 हजार 100 तर कोरोमंडलची 1 हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे.  दीपक फर्टिलायझर्सच्या 24:24:00 खताची किंमत 1 हजार 900 रुपये, कोरोमंडलच्या 24:24:0:85 खताची किंमत 1 हजार 900 रुपये निश्चित करण्यात आली आहे.

20:20:0:13 या खताची इफको कंपनीच्या खताची प्रतिबॅग किंमत 1 हजार 400, दीपक फर्टिलायझर्स, कोरोमंडल- 1 हजार 450 रुपये, जीएसएफसी- 1 हजार 325 रुपये, आरसीएफ 1 हजार 150 रुपये, कृभको- 1 हजार 300 रुपये, आयपीएल- 1 हजार 320, झुआरी पीपीएल/ एमसीएफएल, चंबळ, एनएफएल- 1 हजार 470 रुपये, स्पीक-1 हजार 475 रुपये यापेक्षा अधिक दराने एका बॅगेची विक्री करता येणार नाही.

झुआरी पीपीएल/ एमसीएफएल कंपनीच्या 19:19:19 या खताची प्रतिबॅग किंमत 1 हजार 575 रुपये, 10:26:26 या खताची इफको, दिपक फर्टिलायझर्स, कृभको, झुआरी पीपीएल/ एमसीएफएल, कोरोमंडल, चंबळ आणि एनएफएल कंपनीच्या खतांची किंमत प्रतिबॅग 1 हजार 470 रुपये तर जीएसएफसी- 1 हजार 440 रुपये प्रतिबॅग, 12:32:16 या रासायनिक खताची जीएसएफसी कंपनीच्या खताची 1 हजार 450 रुपये तर इफको, दीपक, कृभको, झुआरी पीपीएल/ एमसीएफएल, कोरोमंडल, चंबळ आणि एनएफएल- 1 हजार 470 रुपये, 14:35:14 या कोरोमंडल कंपनीच्या खताची किंमत प्रतिबॅग 1 हजार 900 रुपये निश्चित करण्यात आली आहे.

14:28:00 या दीपक फर्टिलायझर्सच्या खताची किंमत 1495 रुपये, 15:15:15 या आरसीएफच्या खताची किंमत 1 हजार 500 रुपये, 16:20:00:13 या खताची जीएसएफसी कंपनीच्या बॅगची किंमत 1 हजार 125, आयपीएल-1 हजार 250 रुपये, आणि कोरोमंडल 1 हजार 400 रुपये,  आयपीएल कंपनीच्या 16:16:16 खताची किंमत 1 हजार 475 रुपये, 28:28:00 या खताची झुआरी पीपीएल/ एमसीएफएल कंपनीच्या बॅगची किंमत 1 हजार 700, कोरोमंडल कंपनीच्या बॅगची किंमत 1 हजार 900 रुपये अशी निश्चित करण्यात आलेली आहे.

जीएसएफसी कंपनीच्या अमोनिअम सल्फेट खताची किंमत 1 हजार 100 रुपये, 15:15:15:09 या खताची आयपीएल कंपनीची बॅग- 1 हजार 450, कोरोमंडल- 1 हजार 375 रुपये, कोरोमंडलच्या 17:17:17 खताची किंमत 1 हजार 210 रुपये, दीपक फर्टिलायझर्सच्या 08:21:21 या 40 कि. ग्रॅ. च्या बॅगची किंमत 1 हजार 850 रुपये तर 09:24:24 या खताच्या 40 कि. ग्रॅ.च्या बॅगची किंमत 1 हजार 900 रुपये निश्चित करण्यात आलेली आहे.

कोणी विक्रेता जादा दराने खत विक्री करताना आढळल्यास जिल्हा स्तरावरील सनियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्र. 020-25537718,25538310  भ्रमणध्वनी क्र. 9158479306, 9423874067, इमेल आयडी dsaopune@gmail.comadozppune@gmail.com वर संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. बोटे (भ्र. क्र. 9422384384) यांनी केले आहे.

महिनाभरात लसीकरण पूर्ण करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश 

पुणे, दि.7: कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कोविड तपासणी, लसीकरण, सर्वेक्षण यावर विशेष भर देणे आवश्यक असून कोविड प्रतिबंधक लशीची दुसरी मात्रा डोस घेणे बाकी असलेल्या सर्व नागरिकांचे येत्या महिनाभरात लसीकरण पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.

पुणे ग्रामीण कोविड व्यवस्थापनाबाबत जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्यप्रणालीद्वारे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, शिरुरचे प्रांताधिकारी संतोष देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांच्यासह जिल्ह्यातील तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

कोविड रुग्णांच्या संख्येत ५ जूनअखेर संपलेल्या आठवड्यात आधीच्या आठवड्याच्या तुलनेत  ५० टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाने राज्याच्या आरोग्य विभागाच्या सूचनांची गतीने अंमलबजावणी सुरू केली आहे. कोरोना तपासणी, लसीकरणाचे तालुक्यांनी केलेल्या नियोजनुसार प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात यावी. कोविड प्रतिबंधासाठी ‘हर घर दस्तक’ मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी.

 कोविड लसीकरणाला गती देणे आवश्यक आहे. लसीची दुसरी मात्रा घेणे प्रलंबित असलेल्या साडेसहा लाख लाभार्थ्यांचे येत्या महिनाभरात संपूर्ण लसीकरण करण्यात यावे. १२ ते १४ वयोगट तसेच १५ ते १७ वयोगटातील सर्व मुलांचे लसीकरण पूर्ण करण्यात यावे. ६० वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना वर्धक मात्रा (प्रिकॉशन डोस) देण्याचे काम पूर्ण करण्यात यावे. त्यासाठी लसीकरण प्रलंबित असलेल्या नागरिकांच्या यादीनुसार घरोघरी भेट देऊन लसीकरण करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.

आगामी वारीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी होण्याची शक्यता लक्षात घेऊन वारीमार्गावर लसीकरणाची व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

कोविड रुग्णांच्या संख्येवर लक्ष ठेवण्यासाठी तपासणीवर अधिक भर देणे आवश्यक असून त्यासाठी नमुन्यांची संख्या वाढवणे; चाचणी सकारात्मक आलेल्या रुग्णांचे कॉन्टक्ट ट्रेसिंग करुन तपासण्या करणे; इन्फ्लुएंझा सदृश्य आजार (आयएलआय) तसेच अतीतीव्र श्वसनमार्ग आजार संसर्ग (सारी) याबाबतचे सर्वेक्षणाची व्यवस्था बळकट करणे याकडे आरोग्य विभागाने लक्ष द्यावे.

प्रत्येक तालुक्यात किमान एक कोविड काळजी केंद्र (सीसीसी) उभे करण्याचे नियोजन करण्यात यावे. ऑक्सिजन पुरवठ्याचे नियोजन चांगले  असून भविष्यातही तो पुरेसा राहील याकडे लक्ष द्यावे, असेही जिल्हाधिकारी यांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी सर्व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडून तालुक्यातील लसीकरण, कोरोना तपासण्या, ऑक्सिजन पुरवठा आदींबाबत आढावा घेण्यात आला.

डॉ. पवार यांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना लसीकरण, तपासण्या वाढवण्यावर भर देण्याच्या सूचना दिल्या. सर्व तालुक्यात किमान एक कोविड केअर सेंटरचे नियोजन करावे असेही निर्देश बैठकीत देण्यात आले.

शांताबाई – एक शब्द लेणे’ तून रसिकांनी अनुभविल्या समग्र शांताबाई

पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचच्यावीतने कवयित्री शांताबाई शेळके यांच्या स्मृतीदिनानिमित्त सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन
पुणेः मागे उभा मंगेश… हे शाम सुंदरा… तोच चंद्रमा नभात… अशा प्रेम गीतांपासून ते विरहगीतांपर्यंत आणि लावणीपासून ते परमेश्वराच्या आराधनेत निखळ आनंद देणाऱ्या व रसिकांच्या मनात रुणझुणत ठेवणाऱ्या चौफेर गीतांचा आस्वाद पुणेकरांनी घेतला. यावेळी सुरेश राऊत यांनी शांताबाईंच्या गीतांप्रमाणेच त्यांचे सुंदर शिल्प साकारले.

पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचच्यावतीने कवयित्री शांताबाई शेळके यांच्या स्मृती दिनानिमित्त ‘शांताबाई – एक शब्द लेणे’ या सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन लक्ष्मी रस्त्यावरील पूना गेस्ट हाऊस येथे करण्यात आले. यावेळी जयंत भीमसेन जोशी, उर्मिला कराड, मीरा शिंदे, राजन लाखे, डॉ.न.म.जोशी आनंद सराफ, अनुराधा मराठे, गीतांजली हट्टंगणी, नितीन दलाल, दिपक कुलकर्णी, गोपाळ शिंर्गे, उल्हास कुलकर्णी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन पूना गेस्ट हाऊसचे किशोर सरपोतदार व समन्वयक अजित कुमठेकर यांनी केले. यावेळी सुरेश राऊत यांनी शांताबाई शेळके आणि लता मंगेशकर यांचे लाईव्ह शिल्प साकारले.  
कार्यक्रमाची सुरूवात मागे उभा मंगेश या अभंगाने झाली. त्यानंतर तोच चंद्रमा नभात… मीही अशी भोळी कशी ग…या प्रेम गीतांनी रसिकांना पुन्हा भुरळ पाडली. तर घण रानी… माझ्या सारंग राजा सारंग, माजे रानी माजे मोगा अशा विविध गीतांनी रसिकांची मने जिंकली. यावेळी स्वाती पेंडसे, रेवती सुपेकर व अभिजित वाडेकर यांनी गायन केले. पराग पांडव (तबला), अदिती गराडे (हार्मोनियम), सुहास गाडगीळ (बासरी व व्हायोलिन) यांनी साथसंगत केली. प्राजक्ता वैद्य यांनी निवेदन केले. 
उर्मिला कराड म्हणाल्या, इतक्या प्रतिभावंत व्यक्तीचा सहवास मला लाभला हे मी माझे भाग्य समजते. त्यांच्या सहवासातील साधेपणा खूप काही शिकवणारा होता. शांताबाईंच्या सहज सुंदर व्यक्तीमत्वाप्रमाणे त्यांच्या निर्मळ गीतांनी प्रत्येकाच्या मनातील गाभारा आजही तेवत ठेवला आहे, असेही त्यांनी सांगितले.