Home Blog Page 192

रेव्ह पार्टी: पोलीसच आरोपीच्या पिंजऱ्यात अडकणार ? असीम सरोदे काय म्हणाले…

पुणे :खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांच्यासह ७ जणांना पुणे पोलिसांनी रेव्ह पार्टी प्रकरणी अटक केलीय. त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय. दरम्यान, या प्रकरणी खडसे कुटुंबियांनी खेवलकर यांना अडकवण्याचं षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे.आता या प्रकरणावर वकील असीम सरोदे यांनी म्हटलं की, पोलिसांनी खेवलकर यांच्या खासगी जीवन जगण्याच्या अधिकाराचं उल्लंघन केलंय.

पुणे पोलिसांनी कोकेन, गांजाचे पुरावे प्लांट केले. पार्टी करणाऱ्या लोकांना समाजापुढे आरोपी असल्याचं दाखवण्यासाठी चित्र उभा केलं. त्यांचा व्हिडीओसुद्धा व्हायरल केला. यामुळे हे प्रकरण उच्च न्यायालयात जाण्याची शक्यता असून पुणे पोलिसांच्या अडचणी वाढू शकतात असा दावाही सरोदे यांनी केलाय.

खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह पुणे पोलिसांनी सात जणांना अटक केलीय. या प्रकरणात पोलिसांनी राजकीय उद्देश ठेवून दृश्यम चित्रपटासारखं खोटं चित्र रंगवलंय. घरात दारू पिणं गुन्हा नाही. पण पोलिसांनी या प्रकरणाला रेव्ह पार्टीचं स्वरुप दिलं असल्याचंही सरोदे यांनी म्हटलं.

रेव्ह पार्टी वेगळी असते. तिथं मोठ्या आाजात संगीत, मोठ्या प्रमाणावर लोक, तोकडे कपडे, अफू, गांजा, नशिले पदार्थ यांचा समावेश असतो. पुणे पोलिसांनी कारवाई केली ते प्रकरण वेगळं आहे. एका ठिकाणी ते दारू, बिअर पित होते असं असीम सरोदे म्हणाले.

खेवलकर आणि इतरांना गुन्हेगार ठरवण्यासाठी पुरावे पेरण्यात आले आहेत. पुणे पोलिसांनीच हे कटकारस्थान रचलंय. पोलिसांनी दोन ग्रॅम कोकेन सापडल्याचा दावा केला. पण ७ मिलीग्रॅम कोकेन जास्त भरलं पाहिजे अशी व्यवस्था करत बेल न मिळण्यासाठी स्थिती निर्माण केली. पोलिसांनी एक चित्र निर्माण केलं. न्यायालयात जाण्याआधीच एक व्हिडीओ व्हायरल केला. पोलिसांना ही चूक भोवणार आहे असाही दावा असिम सरोदे यांनी केला.

खडसेंच्या घरात घुसले पोलिस,घराबाहेरही पाळत …एकनाथ खडसेंनी पोलिसांना केले आरोपीच्या पिंजऱ्यात उभे..?

रेव्ह पार्टी…? पोलिसांनी बदनामी आणि राजकीय दबाव टाकण्यासाठी केलेली कृती आहे

पुणे:पोलिसांनी केलेल्या या कारवाईवर एकनाथ खडसे यांनी आक्षेप घेतला आहे. यावर त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली व पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न व संशय उपस्थित केले आहे.एकनाथ खडसे म्हणाले, एकनाथ खडसे यांचे जावई यांना अटक करण्यात आली असल्याचे आपल्याला माहीत आहे. मुळात पोलिसांच्या विषयी माझ्या मनात काही प्रश्न आहेत, ते तुमच्या माध्यमातून विचारतो. पहिली गोष्ट तर अशी आहे की 7 जणांची मिळून ज्या ठिकाणी संगीत नाही, ज्या ठिकाणी गोंधळ नाही, डान्स नाही काही नाही. एका घरात 7 जण बसले आहेत आणि त्यांची पार्टी चालली आहे. तर रेव्ह पार्टीची व्याख्या काय आहे नेमकी? याला जर रेव्ह पार्टी म्हणत असाल तर महाराष्ट्रात, देशात कोणत्याही घरात असे 5-7 जण बसले तर त्याला रेव्ह पार्टीच म्हणावी लागेल. त्यामुळे पोलिसांना मला हे विचारायचे आहे की रेव्ह पार्टीची व्याख्या काय आहे? असा सवाल खडसे यांनी उपस्थित केला.प्रांजल खेवलकर यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नसताना, गुन्हा दाखल असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्यावर आयुष्यात आत्तापर्यंत एकही गुन्हा नाही, ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे नाही. वैद्यकीय क्षेत्रातील नावाजलेले नाव आहे. पोलिसांनी खोटे दाखवणे की यांच्यावर गुन्हे दाखल आहेत आणि त्यांना पहिल्या क्रमांकावर दाखवणे हे चुकीचे आहे. वास्तविक पोलिसांनी सांगितले की अमली पदार्थ सापडला 2.7 ग्राम काहीतरी, तो जो सापडला तो एका महिलेच्या पर्समध्ये सापडला, हे आपल्याला त्यांच्याच चित्रीकरणातून दिसत आहे. तर मग ज्या महिलेकडे अमली पदार्थ सापडला, तिला पहिल्या क्रमांकाचे आरोपी करायचे असते. तसे न करता एकनाथ खडसे यांच्या जावईला तसेच कुटुंबाला बदनाम करण्यासाठी पोलिसांनी केलेले हे कृत्य असल्याचा आरोप खडसे यांनी केला.एकनाथ खडसे म्हणाले, कालच अल्कोहोलचा रीपोर्ट आला, मग ड्रग्सचा का नाही आला अजून? मला इथे संशय घ्यायला जागा आहे की ड्रग्सच्या संदर्भात छेडखानी करण्याचा प्रयत्न केला जात असावा. कारण पोऱ्शे कारचे प्रकरण ताजे आहे, त्या ठिकाणी संपूर्ण ब्लड सॅम्पल बदलण्याचा प्रकार घडला होता. अजूनही डॉक्टर जेलमध्ये आहेत. माझ्या जावयाने मला सांगितले की मी आयुष्यात कधीही ड्रग्स घेतले नाहीत. आताही नाही घेतले. मेडिकल रीपोर्ट येईल तेव्हा ते समजेलच आपल्याला. मला या ठिकाणी संशय घ्यायला जागा आहे.


पुढे बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, दूसरा भाग असा आहे की पोलिसांनी ज्या ठिकाणी कारवाई केली, त्या कारवाईचे व्हिडिओ मीडियाच्या माध्यमातून जगासमोर आणले. पोलिसांना असा कोणता अधिकार आहे की खासगी आयुष्यातील हे व्हिडिओ सगळ्या समोर दाखवावे? पोलिसांनी हे केवळ बदनामीसाठी केलेले कृत्य आहे. पोलिसांना असा कोणताच अधिकार नाही, महिलांचे देखील चेहरे दाखवण्याचा अधिकार तर मुळीच नाही. यात केवळ बदनामीचे सूत्र पोलिसांनी ठेवले होते, असा आरोप खडसे यांनी केला आहे. तसेच या सगळ्यात डॉ. खेवलकरांना पहिल्या नंबरचे आरोपी करण्याचे कारण काय? असा सवालही खडसे यांनी उपस्थित केला.
प्रांजल खेवलकर यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नसताना, गुन्हा दाखल असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्यावर आयुष्यात आत्तापर्यंत एकही गुन्हा नाही, ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे नाही. वैद्यकीय क्षेत्रातील नावाजलेले नाव आहे. पोलिसांनी खोटे दाखवणे की यांच्यावर गुन्हे दाखल आहेत आणि त्यांना पहिल्या क्रमांकावर दाखवणे हे चुकीचे आहे. वास्तविक पोलिसांनी सांगितले की अमली पदार्थ सापडला 2.7 ग्राम काहीतरी, तो जो सापडला तो एका महिलेच्या पर्समध्ये सापडला, हे आपल्याला त्यांच्याच चित्रीकरणातून दिसत आहे. तर मग ज्या महिलेकडे अमली पदार्थ सापडला, तिला पहिल्या क्रमांकाचे आरोपी करायचे असते. तसे न करता एकनाथ खडसे यांच्या जावईला तसेच कुटुंबाला बदनाम करण्यासाठी पोलिसांनी केलेले हे कृत्य असल्याचा आरोप खडसे यांनी केला.

एकनाथ खडसे म्हणाले, कालच अल्कोहोलचा रीपोर्ट आला, मग ड्रग्सचा का नाही आला अजून? मला इथे संशय घ्यायला जागा आहे की ड्रग्सच्या संदर्भात छेडखानी करण्याचा प्रयत्न केला जात असावा. कारण पोऱ्शे कारचे प्रकरण ताजे आहे, त्या ठिकाणी संपूर्ण ब्लड सॅम्पल बदलण्याचा प्रकार घडला होता. अजूनही डॉक्टर जेलमध्ये आहेत. माझ्या जावयाने मला सांगितले की मी आयुष्यात कधीही ड्रग्स घेतले नाहीत. आताही नाही घेतले. मेडिकल रीपोर्ट येईल तेव्हा ते समजेलच आपल्याला. मला या ठिकाणी संशय घ्यायला जागा आहे.

महत्त्वाची गोष्ट अशी आहे की माझ्या जावयाने मला सांगितले की माझ्यावर पाळत ठेवण्यात आली. ज्या ज्या ठिकाणी जात होतो, त्या-त्या ठिकाणी पाळत ठेवण्यात आली. सिविल ड्रेसमधील पोलिस पाळत ठेवत होते. त्याचे व्हिडिओ पण आहेत. पोलिसांना पाळत ठेवण्याचे काय कारण आहे. ज्या हॉटेलमध्ये हे गेले होते, पोलिस रात्री तिथे आले. हॉटेलच्या पार्किंगमध्ये सीसीटीव्ही आहेत. जे पोलिस तिकडे होते तेच पोलिस इथे दिसले. एवढी तत्परता पोलिसांनी प्रफुल लोढा जो हनीट्रॅपमध्ये अडकला आहे, बलात्कारमध्ये अडकला आहे, ज्यांनी गिरीश महाजन यांच्यावर आरोप केले आहेत, या संदर्भात पोलिस यंत्रणा किंवा सरकार पुढे येऊन माहिती का देत नाही? असा सवाल एकनाथ खडसे यांनी केला आहे.एकनाथ खडसे बदनाम झाला पाहिजे हे यांचे प्लॅन असल्याचे दिसते. वारंवार खडसेंचे जावई म्हणत बदनामी करत आहेत. ते दोषी असतील तर नक्कीच कारवाई करावी. पोलिसांनी व्हिडिओ काढले लगेच मीडियावर आले. फोटो काढले लगेच मीडियाकडे आले. लॅपटॉप जप्त केला, मोबाइल जप्त केले. त्यातले आमचे कौटुंबिक फोटो बाहेर कसे काय जातात? कोणी अधिकार दिला खासगी आयुष्यात डोकावण्याचा? पोलिसांच्या मागे कोणीतरी आहे. पोलिसांच्या मागे सूत्रधार कोण? असा प्रश्न खडसे यांनी विचारला आहे. याचा सखोल तपास केला जायला पाहिजे, अशी मागणी खडसे यांनी केली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून टिळक कुटुंबियांचे सांत्वन

पुणे : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुण्यात येऊन नुकतेच निधन झालेले ज्येष्ठ नेते आणि पत्रकार दीपक टिळक यांचा मुलगा रोहित टिळक, मुलगी गीताली टिळक अन्य कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. दीपक टिळक यांच्या निधनामुळे टिळक कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सहभाग नोंदवला.यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार विजय शिवतारे, शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, नाना भानगिरेआणि शहर संघटक आनंद गोयल, वैभव वाघ यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या सर्व नेत्यांनी टिळक कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना धीर दिला.दीपक टिळक हे ‘केसरी’ वृत्तपत्राचे संपादक होते आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या घराण्याचे वंशज होते. त्यांचे निधन हे महाराष्ट्राच्या राजकीय आणि पत्रकारिता क्षेत्रासाठी एक मोठी हानी मानली जात आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या या भेटीमुळे टिळक कुटुंबियांना मोठा आधार मिळाल्याचे बोलले जात आहे.

पुणे शहरातील पाणीगळतीच्या अनुषंगाने उपाययोजना सुचविण्यासाठी कृतीदल स्थापन करा- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

पुणे, दि. २८: पुणे शहराला पाणीपुरवठ्यासाठी मिळणाऱ्या पाण्याची गळती, नदीमध्ये सोडण्याच्या येणाऱ्या सांडपाण्यावरील प्रक्रिया, प्रक्रिया न करता सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे होणारे प्रदुषण आदींच्या अनुषंगाने उपाययोजना सुचविण्याच्या अनुषंगाने पुणे महानगरपालिका आयुक्त आणि महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांचे एकत्रित कृतीदल स्थापन करण्यात यावे, असे निर्देश जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

पुणे महानगरपालिकेद्वारे प्रक्रिया करून पुनर्वापरासाठी उपलब्ध करण्यात येत असलेल्या पाण्याच्या नियोजनाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. महानगरपालिका सभागृहात आयोजित या बैठकीस नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार विजय शिवतारे, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, बापूसाहेब पठारे, हेमंत रासने, शंकर मांडेकर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (दूरदृष्यप्रणालीद्वारे), महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त एमजे प्रदीप चंद्रन, पृथ्वीराज बी पी, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता हणमंत गुणाले, हेमंत धुमाळ आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. विखे पाटील पुढे म्हणाले, पुणे महानगरपालिकेला पाणीपुरवठ्यासाठी पाणीवाटपापेक्षा अतिरिक्त पाणी महानगरपालिका उचलत असल्याने दौंड, इंदापूर, पुरंदरचे सिंचनाचे क्षेत्र प्रभावित झाले आहे. पुणे शहराची लोकसंख्या विचारात घेता प्रतिमाणसी पाणीवापर इतर मोठ्या शहरांच्या तुलनेत जास्त दिसून येत आहे. वितरणात जवळपास ४० टक्के पाणीगळती असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्याचा शोध घेऊन गळती रोखल्यास सिंचनाला योग्य प्रमाणात पाणी देणे शक्य होईल.

महानगरपालिकेने आपल्या हद्दीत तयार होणाऱ्यापैकी ८० टक्के सांडपाणी व मैलापाण्यावर प्रक्रिया करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने महानगरपालिकेने पावले उचलावीत. प्रक्रिया केलेले पाणी उद्याने तसेच अन्य बाबींसाठी वापरण्याच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात. नदीमध्ये सोडण्यात येणारे पाणी मानकांप्रमाणे प्रक्रिया केलेले असावे, अशा सूचना त्यांनी केल्या.

एखादी त्रयस्थ यंत्रणा नेमूण नदीकाठावरील प्रदुषणाची ठिकाणे, अतिक्रमणे आदींच्या अनुषंगाने संपूर्ण नदीकाठाचे सर्वेक्षण करावे, असेही निर्देश त्यांनी दिले.

यावेळी राज्यमंत्री श्रीमती मिसाळ म्हणाल्या, पाणीपुरवठ्यातील गळती रोखण्याच्यादृष्टीने महानगरपालिकेने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. पुणे शहरातील पाटबंधारे विभागाच्या ताब्यातील नाले आदींवरील अतिक्रमणे काढणे तसेच त्या ठिकाणी नागरिकांसाठी सायकल ट्रॅक आदी सार्वजनिक सुविधा तयार करण्याच्या अनुषंगाने महानगरपालिकेला परवानगी मिळणे आवश्यक आहे, असेही त्या म्हणाल्या.

मनपा आयुक्त श्री. राम यांनी महानगरपालिकेच्यावतीने पाण्याच्या गळतीचा लवकरात लवकर अभ्यास करू असे सांगितले. समान पाणीपुरवठा योजनेचे काही टाक्यांसह २० टक्के काम बाकी आहे. ३ लाख पाणीमीटर बसवले असून ५ लाख मीटर बसवण्यात येणार आहेत. पुणे महानरपालिका हद्दीत नव्याने गावे समाविष्ट झाल्याने आकाराने महाराष्ट्रात मोठी झाली आहे. त्यादृष्टीने पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात येत आहे. सध्या प्रतिदिन ४७७ एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येत असून जायकाचा प्रकल्प मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे ३९६ एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता नव्याने निर्माण होणार आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी उपस्थित आमदार महोदयांनी विविध सूचना केल्या.

यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप चंद्रन यांनी तसेच जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी संगणकीय सादरीकरण केले.

बैठकीस महानगरपालिका व महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
000

पुण्याच्या पाण्यासाठीआगामी ३० वर्षांचा आराखडा तयार करावा-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : शहरासाठी आगामी ३० वर्षाचा पाण्यासाठीचा आराखडा तयार करावा, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (सोमवारी) जलसंपदा मंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीत केली.

राज्याचे जलसंपदा (गोदावरी, कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमवेत दि.२८ जुलै २०२५ रोजी पुणे महानगरपालिकेद्वारे प्रक्रिया करून पुनर्वापरासाठी उपलब्ध करण्यात येत असलेल्या पाण्याच्या नियोजनाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत शहरासाठीचा आगामी ३० वर्षाचा पाण्याचा आराखडा तयार करावा, अशी मागणी केल्याचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पत्रकारांना सांगितले.

बैठकीला नगरविकास राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, आमदार हेमंत रासने, आमदार सुनिल कांबळे, आमदार बापूसाहेब पठारे, आमदार विजयबापू शिवतारे, आमदार शंकर मांडेकर, तसेच महापालिका आयुक्त नवल किशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जलसंपदा खात्याचे कार्यकारी संचालक हणमंत गुनाले, मुख्य अभियंता हेमंत धुमाळ, मुख्य अभियंता संजीव चोपडे, पाणी पुरवठा मुख्य अभियंता नंदकुमार जगताप उपस्थित होते

मुठा नदीत २८ हजार ६६२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग , पाण्याची पातळी वाढणार

पुणे-खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून #मुठानदी पात्रामध्ये सुरू असलेल्या विसर्गात वाढ करुन संध्याकाळी ७ वाजता २८ हजार ६६२ क्यूसेक करण्यात आला आहे.यामुळे दुपारपेक्षा नदी पात्रातील पाण्याची पटली वाढणार असून नागरिकांनी नदी पात्रात उतरु नये. खबरदारी घ्यावी असे आवाहन मुठा कालवे पाटबंधारे उपविभागीय अभियंता मोहन भदाणे यांनी केले आहे.

दरम्यान वरसगाव धरण ९२.३७ टक्के भरले असून पानशेत ९२.६९ टक्के भरले आहे तर खडकवासला धरण ७७.०७ टक्के भरलेले आहे.

डॉ. कलाम राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रा. अनंत देवगिरीकर यांना प्रदान 

 ए. डी. फाउंडेशन, पुणे या संस्थेच्या वतीने सन्मान

पुणे : सिंहगड कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, वारजे (पुणे) येथे कार्यरत असलेले प्रा. अनंत मारुती देवगिरीकर यांना ‘भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५’ ने सन्मानित करण्यात आले आहे. ए. डी. फाउंडेशन, पुणे या संस्थेच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर दिला जाणारा हा पुरस्कार प्रा. देवगिरीकर यांच्या अध्यापन क्षेत्रातील सातत्यपूर्ण योगदानाची आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या संवेदनशील, जिव्हाळ्याच्या भूमिकेची दखल घेत प्रदान करण्यात आला.

पुरस्कार वितरण सोहळा पुण्यात ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात पार पडला. यावेळी पुणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त वैशाली चव्हाण यांच्या हस्ते प्रा. अनंत देवगिरीकर यांना शाल, सुवर्णपदक, मानपत्र आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीराम मांडुरके, ह.भ.प. तुकाराम बाबा महाराज, तनिष्का फाउंडेशनचे अनिल जाहीर, ए. डी. फाउंडेशनचे कार्याध्यक्ष महादेव महानोर, अध्यक्ष अशोक गोरड, अभिनेत्री ममता भोई आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच त्यांच्या पत्नी दिपीका देवगिरीकर ह्या ही उपस्थित होत्या.

प्रा. अनंत देवगिरीकर यांनी अल्पवयातच शिक्षक म्हणून नावलौकिक मिळवला असून, अध्यापनातील निष्ठा, नवोपक्रमशीलता आणि समाजभान यामुळे त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांनी राबवलेल्या शैक्षणिक उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये विचारशीलता, आत्मविश्वास आणि मूल्यसंस्कार निर्माण करण्यात मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या अध्यापनातून विद्यार्थ्यांचे केवळ शैक्षणिक नव्हे तर मानसिक आणि सामाजिक विकास साधला जातो. याच विविध अंगांनी समृद्ध असलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांची या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. या सन्मानाबद्दल प्रा. देवगिरीकर यांचे सहकारी प्राध्यापक, विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले.

कोरिया मधील आयसीसीके आणि पीसीईटी यांच्या मध्ये सामंजस्य करार

पिंपरी, पुणे (दि. २८ जुलै २०२५) कोरिया मधील आयसीसीके आणि पीसीईटी यांच्या मध्ये झालेल्या ऐतिहासिक सामंजस्य करारामुळे भारतातील शैक्षणिक व उद्योग क्षेत्रास उपयोग होईल. त्यातून सांस्कृतिक सहकार्याला देखील चालना मिळेल तसेच दोन्ही देशातील संशोधन आणि व्यावसायिक विकासात अनेक नव्या संधी उपलब्ध होतील असे पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट चे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी सांगितले.
शुक्रवारी (दि. २५ जुलै) इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स इन कोरिया (आयसीसीके) आणि पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला. यावेळी ज्ञानेश्वर लांडगे बोलत होते. पीसीईटीच्या ट्रस्ट कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात आयसीसीकेचे चेअरमन आणि टीसीएस दक्षिण कोरिया चे प्रमुख रमेश अय्यर, क्रॉसकाउंटी इन्फोटेकच्या वैदेही कुलकर्णी, पीसीटीच्या उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओई चे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, संशोधन आणि आंतरराष्ट्रीय संबंध सल्लागार डॉ. दिनेश अमळनेरकर, पीसीसीओई आंतरराष्ट्रीय संबंध विभाग अधिष्ठाता डॉ. रोशनी राऊत, विद्यार्थी विकास आणि कल्याण विभाग प्रमुख डॉ. पद्माकर देशमुख, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. के. राजेश्वरी आदी उपस्थित होते.
यावेळी पीसीईटी चे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी सांगितले की, हा करार म्हणजे भारत आणि कोरिया या दोन देशांमधील शिक्षण, वाणिज्य, उद्योग, व्यापार, रोजगार, संशोधन या क्षेत्रात वाढ होण्यासाठी उपयुक्त आणि इतर विद्यापीठांना मार्गदर्शक ठरेल. आणि जागतिक पातळीवर या दोन्ही संस्थांना आणखी सक्षमपणे प्रतिनिधित्व करण्यासाठी चालना मिळेल. पीसीईटीच्या विद्यार्थ्यांना कोरियामध्ये आणि कोरिया मधील विद्यार्थ्यांना भारतामध्ये येऊन शिक्षण संशोधन करण्यासाठी हा करार उपयुक्त ठरेल. यातून सांस्कृतिक देवाणघेवाण व विद्यार्थी विनिमय कार्यक्रम अधिक सक्षमपणे राबवता येईल. नवउद्योजकांना संयुक्तपणे संशोधन करून आपले उद्योग प्रकल्प विकसित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर समन्वय साधण्यासाठी एक सक्षम व्यासपीठ निर्माण होईल, यामुळे दोन्ही देशातील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.
उपाध्यक्ष पद्माताई भोसले यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे विद्यार्थी केंद्रित उपक्रम आहेत. या ट्रस्ट अंतर्गत संचलित होणाऱ्या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये व संशोधन केंद्रांमध्ये प्रवेश घेण्यास पालक व विद्यार्थ्यांची पहिली पसंती असते. नव्याने स्थापन झालेल्या साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठात (पीसीयु) देखील असेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना उद्योजक व रोजगार सक्षम करण्यात येत आहे. पीसीईटीच्या हजारो विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव उज्वल केले आहे याचा विश्वस्तांना व येथील प्राध्यापकांना अभिमान वाटतो.

पुणे मनपा कंत्राटी कामगारांचा आंदोलनाचा इशारा – न्यायासाठी पाच ऑगस्टला मनपाच्या गेटवर मोर्चा

पुणे, ता. 28 जुलै – पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांना अनेक वर्षांपासून पगार व इतर मुलभूत हक्कांपासून वंचित ठेवले जात असून, या गंभीर समस्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे आता राष्ट्रीय मजदूर संघाच्या नेतृत्वाखाली मोठ्या आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.

कंत्राटी कामगारांना वेळेवर पगार दिला जात नाही, पगार कायद्याप्रमाणे दिला जात नाही, पेमेंट स्लिप दिली जात नाही, ESIC चे कार्ड मिळत नाही, तसेच १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, १ मे व २ ऑक्टोबर यांसारख्या राष्ट्रीय सणांच्या दिवशी सुट्ट्या दिल्या जात नाहीत. कायदेशीर हक्क असलेली पगारी रजा आणि बोनस देखील कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळत नाही. या सर्व मागण्यांसाठी राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष श्री. सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनेकवेळा आंदोलने करण्यात आली असून संबंधित अधिकाऱ्यांना निवेदनेही देण्यात आली आहेत.

परंतु आजतागायत प्रशासनाने कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. कायद्याचे सर्रास उल्लंघन करणाऱ्या कंत्राटदारांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. मनपा आयुक्तांनी आजपर्यंत कधीच या मुद्द्यांवर बैठक बोलावलेली नाही, हे विशेष.

या सगळ्या परिस्थितीमुळे कंत्राटी कामगारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मंगळवार, दिनांक ५ ऑगस्ट रोजी पुणे मनपाच्या मुख्य गेटवर जोरदार आंदोलन व मोर्चा धरण्याचा निर्णय राष्ट्रीय मजदूर संघाच्या कार्यकारिणीत घेण्यात आला आहे.

या आंदोलनात मनपा मधील कंत्राटी सुरक्षा रक्षक, कंत्राटी चालक, स्मशानभूमीतील कर्मचारी, NUHM अंतर्गत काम करणारे सिस्टर्स, डॉक्टर्स, डेटा एन्ट्री ऑपरेटर्स, सफाई कर्मचारी व झाडू विभागातील कर्मचारी मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत, अशी माहिती कामगार नेते सुनील शिंदे यांनी दिली आहे.

डान्सबारमध्ये नाचणाऱ्या मुली लाडक्या बहिणी नाहीत का; मुली नाचवणाऱ्यांना वाचवणे कोणत्या हिंदुत्वात बसते ?

भाजपाच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या एकनाथ शिंदेंनी काँग्रेस बद्दल बोलण्याआधी माहिती घ्यावी; डान्सबार बंदी काँग्रेस आघाडी सरकारनेच केली.

मुंबई, दि. २८ जुलै २०२५

भाजपा युती सरकार हे महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे, सत्तेला चिकटून राहण्यासाठी यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. सत्ताधारी पक्षाचे आमदार, पदाधिकारी व मंत्र्यांनीच ताळतंत्र सोडले असे नाही तर मुख्यमंत्रीपद भूषवलेले व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ‘कंबरेचे सोडून डोक्याला बांधले’ आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याशी संबंधित डान्सबारचे त्यांनी जाहीरपणे समर्थन केले आहे, हा निर्ल्लजपणाचा कळस असून ‘जनाची नाही तर मनाची तरी बागळा’, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

भाजपा युती सरकार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तोफ डागत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावाने मुंबईतील कांदिवलीमध्ये ‘सावली’ नावाचा डान्सबार सुरु होता, या डान्सबारवर पोलिसांनी छापा टाकला, या डान्सबारमध्ये सर्व नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचे ‘एफआयआर’मध्ये नमूद केलेले आहे. हा डान्सबार आपल्या पत्नीचा नावाने आहे याची कबुली गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे वडील माजी मंत्री रामदास कदम यांनी दिली आहे, असे असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या डान्सबारचे समर्थन कसे काय करत आहेत? हिंदुत्वाच्या विचारासाठी उठाव केला म्हणणाऱ्या शिदेंनी डान्सबार मध्ये मुली नाचवणे कोणत्या हिंदुत्वात बसते? हा कसला विकास व कोणाचा विकास आहे? यावरही प्रकाश टाकावा.

हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, ‘काँग्रेसच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्यांनी डान्सबर बोलू नये’, असे म्हणणारे एकनाथ शिंदेच भाजपाच्या इशाऱ्यावर कठपुतलीसारखे नाचत आहेत. विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आघाडी सरकार असताना तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी राज्यातील डान्सबारला बंदी केली होती याची एकनाथ शिंदे यांनी माहिती घ्यावी आणि मगच काँग्रेसवर बोलावे. लाखो लोकांचे संसार उद्धवस्त करणारी डान्सबार संस्कृती हवीच कशाला?, एकीकडे लाडक्या बहिणींचा भाऊ म्हणून मिरवता आणि त्याच बहिणींचे संसार मोडीत काढणाऱ्या डान्सबारचे समर्थन कोणत्या तोंडाने करता? गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी झालीच पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही एकनाथ शिंदे यांच्या विधानावर खुलासा करावा, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

चांदवडच्या रेणुकादेवी मंदिर रस्त्याची दुरुस्ती होणार; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा पुढाकार

“भाविकांची गैरसोय नको – रस्ते दुरुस्तीला प्राधान्य द्या” : डॉ. नीलम गोऱ्हे

नाशिक, दि. २८ जुलै २०२५ : चांदवड (जि. नाशिक) येथील ग्रामदैवत श्री रेणुकादेवी माता मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान असून, दरवर्षी हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. मात्र सध्या मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून मंदिराकडे जाणारे दोन्ही अंतर्गत रस्ते खराब अवस्थेत असल्यामुळे भाविकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

ही बाब लक्षात घेत विधान परिषदेच्या उपसभापती मा. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी थेट नाशिक जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन पाठवून तातडीने रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत कार्यवाही करण्याची विनंती केली आहे.

डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले आहे की, “मी स्वतः या मंदिराशी भावनिकदृष्ट्या जोडले गेले असून, या ठिकाणी आवश्यक ती कामे करण्यासाठी भक्तगण व कार्यकर्ते वेळोवेळी पाठपुरावा करत असतात. सध्या रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे भाविकांची गैरसोय होत असून, याची तात्काळ दखल घेणे गरजेचे आहे.

कुंभमेळ्यासारख्या धार्मिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर सध्या नाशिक जिल्ह्यात विविध रस्त्यांची विकासकामे सुरू आहेत त्याच धर्तीवर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग ते रेणुकादेवी मंदिर या दोन्ही रस्त्यांचे डांबरीकरण करणे, तसेच महामार्गावरून मंदिराच्या दिशेने येणाऱ्या प्रवेश रस्त्यावर गतिरोधकांची व्यवस्था करणे आवश्यक असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

यासाठी आवश्यक निधीची तरतूद करून संबंधित यंत्रणांना त्वरित आदेश देण्याची विनंती त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

रिक्षा थांब्यांवरील अतिक्रमण हटवून नव्याने थांबे सुरू करा – शिवसेना

पुणे:- रिक्षा थांब्यांवरील अतिक्रमण हटविणे व नव्याने अधिकृत रिक्षा थांबे निर्माण करण्याबाबत आज शिवसेना वाहतूक सेनेच्या वतीने शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे परिवहन विभाग च्या प्रादेशिक अधिकारी अर्चना गायकवाड यांना निवेदन देण्यात आले.

पुणे शहर आता पुणे महानगर म्हणून वेगाने विस्तारत आहे. या महानगरात अंदाजे १,३०,००० ऑटो रिक्षा परिवहन विभागाच्या मान्यतेने कार्यरत आहेत. मात्र, या प्रमाणात अधिकृत ऑटो रिक्षा थांबे उपलब्ध नसल्यामुळे रिक्षाचालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.सध्या केवळ सुमारे ६०० अधिकृत रिक्षा थांबे अस्तित्वात आहेत, त्यातही बहुतांश थांब्यांवर खासगी अतिक्रमण, फेरीवाले, वाहनं व अवैध व्यवसायामुळे अडथळा निर्माण झालेला आहे. परिणामी, रिक्षाचालक व प्रवासी यांना असुविधा होत असून वाहतुकीच्या नियमांचेही उल्लंघन होत आहे, त्याचा नाहक त्रास पुणेकरांना सहन करावा लागतो.
यावेळी बोलताना शहरप्रमुख संजय मोरे म्हणाले पुणेकर आधीच वाहतुकीच्या कोंडीत अडकले आहेत, शहरातील मध्यवस्तीत वाहतूक प्रश्न गंभीर बनला आहे त्यांना रिक्षा हा चांगला पर्याय आहे पण थांबे नसल्याने रिक्षा चालक आणि पुणेकर प्रवाश्यांचे हाल होत आहेत त्यामुळे प्रशासनाने सदर प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.

शिवसेना वाहतुक सेनेच्या निवेदनात करण्यात आलेल्या मागण्या
१. सर्व विद्यमान रिक्षा थांब्यांचे सर्वेक्षण करून अतिक्रमण तत्काळ हटवण्यात यावे.
२. शहराच्या वाढत्या लोकवस्तीच्या प्रमाणात नवीन रिक्षा थांबे निर्माण करण्यात यावेत.
३. नवीन व जुन्या थांब्यांना अधिकृत मान्यता देण्यासाठी PMC/PMRDA यांच्यामार्फत अधिसूचना काढण्यात याव्यात.
४. रिक्षाचालक संघटनांशी चर्चा करून स्थानिक गरजा ओळखून योग्य ठिकाणी थांब्यांची योजना करावी.

या मागण्यांवर योग्य ती कार्यवाही तत्काळ करण्यात यावी, अन्यथा आम्हाला रिक्षाचालकांच्या न्याय हक्कांसाठी व पुणेकरांच्या वाहतूक समस्यांसाठी आपल्या कार्यालयाबाहेर शिवसेना पद्धतीने आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल असे शिष्टमंडळाच्या वतीने सांगण्यात आले .
यावेळी शिष्टमंडळात शहरप्रमुख संजय मोरे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष दत्तात्रय घुले, शिवसेना प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, सूरज खंडागळे, बाळासाहेब मोडक, जगदीश रेड्डी, योगेश जगदाळे, उपस्थित होते .

राज्य सरकार धोकेबाज आणि विश्वासघातकी:लाडकी बहिण योजना आणि एक रुपयात पीक विमा योजने वरून रोहित पवार आक्रमक

लाडकी बहिण सुद्धा भ्रष्टाचारातून सोडली नाही -लाडकी बहिण योजनेच्या जाहिरातींसाठी 200 कोटी रुपये -सोशल मिडिया आणि डिजिटल मिडिया ला ३ कोटीच्या जाहिराती

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर धोकेबाज आणि विश्वासघातकी असल्याची टीका केली आहे. लाडकी बहिण योजना आणि एक रुपयात पीक विमा योजने वरून त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. या सरकारने लाडक्या बहिणींना आणि शेतकऱ्यांना धोका दिला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

या संदर्भात एका पोस्टच्या माध्यमातून रोहित पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. राज्य सरकारने कोणालाही लाडकी बहिण योजनातून वगळण्यात येणार नसल्याचे या आधी झालेल्या दोन अधिवेशनामध्ये सांगितले होते. या संदर्भात रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, तरीही 26 लाखावर अधिक लाडक्या बहिणींना अपात्र करून सरकारने एका झटक्यात या बहिणींना सावत्र वागणूक दिली असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.

रोहित पवार यांनी केलेली पोस्ट देखील पहा…

कुठलीही पडताळणी न करता केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आणलेल्या लाडकी बहिण योजनेचा राज्यात तब्बल 14 हजार पुरुषांनी लाभ घेतल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलं. महिलांच्या योजनेचा पुरुषांनी लाभ घेणं चुकीचंच आहे, पण लाडक्या बहिणींच्या मतांनी या सरकारने आधी आपली सत्तेची पोळी शेकून घेतली आणि आता गरज संपताच याच बहिणींना योजनेतून वगळण्याचा सपाटा लावलाय..

सरकारच्या या कारस्थानाचा अंदाज आल्याने ही बाब मी गेल्या दोन अधिवेशनांमध्ये मांडली होती, त्यावेळी कुणालाही वगळण्यात येणार नसल्याचं सरकारकडून सांगितलं खरं पण तरीही सुमारे 26 लाखाहून अधिक लाडक्या बहिणींना अपात्र करून सरकारने एका झटक्यात त्यांना सावत्र बहिणीची वागणूक दिलीच. आधी 1 रुपयांत पीक विमा योजना बंद करून शेतकऱ्यांना ‘टोपी’ घालणारं आणि आता अटी-शर्तीची चाळणी लावून लाडक्या बहिणींनाही फसवणारं हे सरकार धोकेबाज आणि विश्वासघातकी आहे.

या पोस्ट मध्ये रोहित पवार यांनी असाही म्हटले आहे कि,’हे सरकार #दलालीच्या_दलदलीत इतकं पोखरलं गेलंय की #लाडकी_बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी दिलेली नाही. सरकार ‘लाडकी बहिण’ योजनेच्या जाहिरातींसाठी कोट्यवधी रुपये खर्च तर करत असून यातही मोठ्या प्रमाणात अपहार होत असल्याची चर्चा आहे. १५ ऑगस्ट २०२४ रोजी सरकारने लाडकी बहिण योजनेच्या जाहिरातींसाठी २०० कोटी रुपये खर्चाचा #GR काढला होता आणि २३ नोव्हेंबर २०२३ रोजी सरकारच्या निर्णयात ज्या संस्थांची नावे आहेत, त्यांना ही कामे माहिती व जनसंपर्क विभागामार्फत देणे अपेक्षित होते, परंतु ५ फेब्रुवारी २०२५ रोजी महिला व बालविकास विभागाने नवीन जीआर काढून लाडकी बहिण योजनेच्या जाहिरातीसाठी ३ कोटींची मान्यता दिली. १५ ऑगस्ट २०२४ रोजच्या जीआर मधील २०० कोटींच्या मर्यादेतीलच ही रक्कम असल्याचे या जीआर मध्ये नमूद असले तरी २३ नोव्हेंबर २०२३ च्या जीआरमध्ये नमूद संस्थांना काम देण्याऐवजी हे काम इतर संस्थांना दिल्याची माहिती आहे. माहिती जनसंपर्क विभाग असताना महिला बालविकास विभागाने ही कामे का दिली? ज्या कंपन्यांना कामे देण्यात आली त्या कंपन्या कोणत्या आणि कुणाच्या आणि कुणाशी संबंधित आहेत? माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी या कंपन्यांची माहिती मागवली असता महिला बालविकास विभाग यासंदर्भातील माहिती का लपवत आहे? बोगस कंपन्यांना ही कामे देण्यात आली का? याचा खुलासा सरकारने करावा.

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

प्रदेशाध्यक्षपदी निवडीनंतर रविंद्र चव्हाण यांची पंतप्रधान मोदींशी पहिली भेट
महाराष्ट्रातील संघटनात्मक कामाचा आढावा पंतप्रधानांना सादर
पंतप्रधान मोदींकडून पुढील कार्यासाठी रविंद्र चव्हाण यांना शुभेच्छा
नवी दिल्ली
-भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. रविंद्र चव्हाण यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्र भाजपची संघटनात्मक घडामोडी, आगामी कार्यक्रमांचे नियोजन व पक्षवाढीची दिशा याबाबत सविस्तर माहिती श्री. चव्हाण यांनी पंतप्रधान मोदी यांना दिली.
जानेवारी ते जून २०२५ या कालावधीत भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष म्हणून केलेल्या पक्षकार्याचा अहवाल यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द केला. या पक्षकार्य अहवालात महाराष्ट्रात बूथ पातळीवर सुरू असलेले संघटनकार्य, सदस्य नोंदणी मोहिम, पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण, संपर्क अभियान आणि महिला-युवा आघाड्यांच्या उपक्रमांचा सविस्तर आढावा आहे. तसेच आगामी काळात महाराष्ट्रातील पक्ष संघटनेला बळकटी देण्यासंदर्भात आदरणीय मोदीजींकडून श्री. रविंद्र चव्हाण यांना मार्गदर्शन लाभले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्री. चव्हाण यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

तब्बल १२५ ढोल-ताशा पथकातील वादकांची तुळशीबाग गणपतीला मानवंदना

श्री तुळशीबाग गणपतीच्या उत्सव मंडपाचे वासा पूजन संपन्न ; मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट
पुणे : तब्बल १२५ ढोल ताशा पथकातील वादकांनी एकत्र येत मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपतीला वादनाच्या माध्यमातून अनोखी मानवंदना दिली. गणपती बाप्पा मोरया चा जयघोष आणि ढोल ताशांचा निनाद यावेळी तुळशीबागेत घुमला. इतिहासात प्रथमच १२५ ढोल ताशा पथकातील वादकांनी एकत्र येत बाप्पाला वादनातून वंदन केले. शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष (१२५ वे) साजरे करणाऱ्या श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टतर्फे उत्सव मंडपाचे वासा पूजन थाटात पार पडले.

मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टतर्फे उत्सव मंडपाचे वासा पूजन राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार हेमंत रासने आणि पुनीत बालन ग्रुपचे पुनीत बालन यांच्या हस्ते झाले. यावेळी अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, ढोल ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, स्वागताध्यक्ष कृष्णकुमार गोयल, तुळशीबाग गणपती मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, कोषाध्यक्ष नितीन पंडित, उपाध्यक्ष विनायक कदम उपस्थित होते. परिसरातील व्यापारी व महिला कार्यकर्त्या उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. 

मंडळाचे यंदा  शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे. मामंडळाचे यंदाचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष (१२५) असून यंदाच्या गणेशोत्सवात मथुरेतील वृंदावन साकारण्यात येणार आहे. अरुण बबन भुकन यांच्या सहकुटुंबातर्फे श्रीं चरणी पालखी अर्पण करण्यात आली. ही पालखी ही राजस्थानमध्ये पुखराज मिस्त्री यांनी सागवान लाकडामध्ये घडवलेली आहे

कोषाध्यक्ष नितीन पंडित म्हणाले, सन १९५२ सालापासून गणेशोत्सवात धार्मिक व पौराणिक देखाव्यांची परंपरा असणारे श्री तुळशीबाग मंडळ यंदाच्या वर्षीही आकर्षक मथुरेतील वृंदावन या संकल्पनेतून देखावा सादर करणार आहे. तब्बल ८० फूट रुंद १२० फूट लांब ३५ फूट उंच असा भव्य देखावा होणार आहे. त्यात १४ फूट उंचीचे ४० खांब, दहा बाय दहा आकाराच्या १४ पॅनल आणि जवळपास ३० मोर या वृंदावन देखाव्यात विहार करणार आहेत. राधा कृष्णाचे मंदिर २० फूट लांब आणि ४० फूट उंच असे भव्य प्रवेशद्वार या देखाव्यात असणार आहे.  सरपाले बंधू सदर देखाव्याची निर्मिती करत आहे.