Home Blog Page 1627

उद्धव ठाकरे मुलाला सांभाळा – किरिट सोमय्या

पुणे-भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मंगळवारी पुण्यातील मानाच्या कसबा गणपतीचं दर्शन घेतलं. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. “मी आज गणरायाचे धन्यवाद मानतो. गेल्या वर्षी गणरायाला निरोप देताना मी तुरूंगात जात होतो. आज संपूर्ण महाराष्ट्र तुरूंगात बाहेर आला आहे,” असे किरीट सोमय्या म्हणाले. गेल्या अडीच तीन वर्षात महाराष्ट्र जो मागे गेलाय त्याला विकासाच्या मार्गावर घेऊन जाण्याची शक्ती दे असंही गणराया चरणी म्हटल्याचं ते म्हणाले.

“ज्यावेळी ठाकरे सरकार गेलं त्यावेळी महाराष्ट्रावरील विघ्न टळलं. आपल्या माफिया सरकारला आता महाराष्ट्राच्या जनतेनं कायमसाठी रवाना केलंय. तुमचा उजवा हात तुरुंगात गेलाय आता डावा हातही जाईल. उद्धव ठाकरे तुम्ही आता पोराचीही काळजी करा,” असंही ते सोमय्या म्हणाले.

“पालिकेने आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख यांच्या आशीर्वादाने मढ मार्वेतील १ कोटींच्या स्टुडिओ घोटाळ्याच्या चौकशीची घोषणा केली आहे. त्यात पर्यावरण मंत्रालयानं गैर कायदेशीररित्या १ हजार कोटींचा घोटाळा केलाय हे सिद्ध होणार. म्हणून ठाकरेंनी स्वताच्या मंगलाची काळजी करावी,” असंही त्यांनी नमूद केलं. सद्या मला ठाकरे कुटुंबीयांची काळजी घेऊ द्या. उजवा हात तुरूंगात गेला आहे. डावा आता मार्गावर असल्याचंही त्यांनी सांगितलं.

अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचित्राचे १४ सप्टेंबर ला मॉस्कोत अनावरण!

0

मुंबई-

स्वातंत्र्याच्या आकांक्षेने झपाटलेल्या आणि अन्याय व पराधीनतेविरूध्द संघर्ष सिध्द झालेल्या जागतिक समुदायाची स्पंदने टिपणाऱ्या व त्यातून ‘लेनिनग्राडचा पोवाडा’ या सारखी प्रतिभासंपन्न काव्य निर्मिती करणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचित्राचे येत्या १४ सप्टेंबर ला मॉस्कोतील भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या सांस्कृतिक केंद्रात समारंभपूर्वक अनावरण होणार आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय राज्यमंत्री नारायण स्वामी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या सोहोळ्याच्या अध्यक्षस्थानी  भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुध्दे हे असणार आहेत. आज मुंबईत एका पत्रकार परिषदेत डॉ. सहस्रबुध्दे व हे तैलचित्र उपलब्ध करून देणाऱ्या मिलेनियम चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज चे सुनिल वारे यांनी ही माहिती दिली.

अण्णा भाऊंनी आपलं काही लिखाण रशियाबद्दल केलेले आहे, त्यामध्येसुद्धा स्टालिनग्राडचा पोवाडा, माझा रशियाचा प्रवास आणि अण्णा भाऊंच्या रशियन भाषेत भाषांतरित झालेल्या अनेक कथा आणि कादंबर्‍या यांचा समावेश आहे. यामुळे अण्णा भाऊ रशियामध्येसुद्धा प्रसिद्ध झाले होते. ‘रुडमिनो मार्गारेटा फॉरेन लँग्वेज स्टडी’ येथे मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा बसवण्यात आला आहे. एक अर्थाने आंतरराष्ट्रीय पातळीवरील कायमस्वरूपी असे स्मारक तेथे उभे राहिले आहे. या पुतळ्याचे अनावरणही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

अण्णा भाऊंच्या लेखणीने भाषेच्या आणि देशाच्या सीमासुद्धा ओलांडलेल्या आहेत. युद्धांच्या इतिहासातील सर्वात मोठे युद्ध आपण ज्याला स्टालिनग्राडचा लढा म्हणतो, ही दुसर्‍या महायुद्धातील सर्वात मोठी लढाई होती. आपण तिला युद्धाचा ‘टर्निंग पॉईंट’ म्हणू शकतो, अशी ती लढाई होती. याच घटनेवर आधारित स्टालिनग्राडचा पोवाडा नावाचे एक दीर्घ काव्य साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांनी रचलेले आहे. या युद्धाला त्यांनी मानवतेच्या मुक्तीचे युद्ध असे नाव दिले आहे, रशिया या राष्ट्राच्या अस्तित्वाच्या लढ्यावर लिहिलेले, त्यातील सर्वसामान्य लोकांचा सहभाग, स्त्रियांचा सहभाग यावर त्यांनी आपल्या लेखणीतून प्रकाश टाकला आहे. त्यामुळेच अण्णा भाऊंची रशियातील लोकप्रियता वाढली होती.

या निमित्ताने शेकडो अण्णाभाऊ साठे-प्रेमींच्या उपस्थितीतीत जे अन्य अनेक कार्यक्रम मॉस्कोत १४ व १५ सप्टेंबरला होऊ घातले आहेत त्यातीलच एक महत्वाचा कार्यक्रम म्हणजे भारत-रशिया राजनैतिक संबंध स्थापनेच्या ७५ व्या वर्षाला अनुसरून या विषयावर योजण्यात आलेली आंतरराष्ट्रीय परिषद ! ‘रुडमिनो मार्गारेटा फॉरेन लँग्वेज लायब्ररी’ मॉस्को येथे ही परिषद घेण्यात येणार आहे व  त्यामध्ये ‘मॉस्को स्टेट युनिव्हर्सिटी’ मॉस्को, ‘इन्स्टिट्यूट ऑफ ओरिएंटल स्टडीज’, ‘रशियन अकॅडमी ऑफ सायन्सेस’ मॉस्को, ‘स्टेट युनिव्हर्सिटी, सेंट पिटर्सबर्ग’ आणि ‘रुडमिनो मार्गारेटा फॉरेन लँग्वेज लायब्ररी’ यांचा समावेश आहे. भारतातून भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेबरोबरच मुंबई विद्यापीठाने या आयोजनात महत्वाची भूमिका बजावली आहे. विद्यापीठातील ‘सेंटर फॉर युरेशियन स्टडिज’चे संचालक डॉ. संजय देशपांडे, तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासनाचे संचालक डॉ. बळीराम गायकवाड यांचा यांत विशेष पुढाकार आहे. या सर्व कार्यक्रमांना डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरु आणि डॉ. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य आहे.

या शिवाय या निमित्ताने ५० वर्षांपूर्वी रशियन भाषेत भाषांतरित, प्रकाशित झालेल्या अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यकृतींचे ‘मॉस्को स्टेट युनिव्हर्सिटी’च्या माध्यमातून पुनर्प्रकाशनही करण्यात येत आहे. यामध्ये ‘चित्रा’, ‘फकिरा’ अशा कादंबर्‍या आणि ‘सुलतान’सारख्या कथांचाही समावेश आहे.

बांगलादेश हा भारताचा सर्वात मोठा विकास भागीदार – पंतप्रधान नरेंद्र मोदी

0

बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांसमोर केलेले निवेदन

नवी दिल्‍ली, 6 सप्‍टेंबर 2022

महामहिम पंतप्रधान शेख हसीना,
उभय शिष्टमंडळातील आदरणीय सदस्य,
प्रसारमाध्यमातील आमचे स्नेही,

नमस्कार!

सर्वप्रथम, मी पंतप्रधान शेख हसीना जी आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे हार्दिक स्वागत करतो. गेल्या वर्षी आपण बांगलादेशच्या स्वातंत्र्याचा पन्नासावा वर्धापनदिन, आपल्या राजनैतिक संबंधांचा सुवर्ण महोत्सव आणि वंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांची जन्मशताब्दी साजरी केली. गेल्या वर्षी 06 डिसेंबर रोजी आम्ही मिळून पहिला ‘मैत्री दिवस’ जगभरात साजरा केला. आज आपल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या काळात पंतप्रधान शेख हसीना जी यांचा दौरा  होत आहे आणि मला विश्वास आहे की पुढील 25 वर्षांच्या अमृत काळात भारत-बांगलादेश दरम्यानचे स्नेहबंध नवीन उंची गाठतील. 

मित्रांनो, 

पंतप्रधान शेख हसीना यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशने उल्लेखनीय प्रगती केली आहे. गेल्या काही वर्षांत प्रत्येक क्षेत्रात आमच्या परस्पर सहकार्यातही झपाट्याने वृद्धी झाली आहे. आज बांगलादेश हा भारताचा सर्वात मोठा विकास भागीदार आणि या क्षेत्रातील आमचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे.

आमचे घनिष्ट सांस्कृतिक आणि परस्परांमधील संबंधही सातत्याने वृद्धिंगत झाले  आहेत. सर्व द्विपक्षीय, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर आज पंतप्रधान शेख हसीना जी आणि मी विस्तृत चर्चा केली.

कोविड महामारी आणि अलीकडील जागतिक घडामोडींमधून बोध घेऊन आपण आपली अर्थव्यवस्था मजबूत करणे आवश्यक आहे यावर आमचा दोघांचा विश्वास आहे.

उभय देशांमधील कनेक्टिव्हिटीचा विस्तार आणि सीमेवर व्यापाराच्या पायाभूत सुविधांच्या विकासामुळे, दोन्ही अर्थव्यवस्था परस्परांशी अधिक सांधल्या जातील, परस्परांना पाठबळ देऊ शकतील. आमचा द्विपक्षीय व्यापार वेगाने वाढत आहे. आज बांगलादेशकडून होणाऱ्या  निर्यातीसाठी आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ भारत आहे. या वृद्धीला आणखी चालना देण्यासाठी आम्ही लवकरच द्विपक्षीय सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारावर चर्चा सुरू करू.

आमच्या युवा पिढीच्या पसंतीच्या माहिती तंत्रज्ञान, अंतराळ आणि अणुऊर्जा यांसारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याचा निर्णयदेखील आम्ही घेतला आहे. आम्ही हवामान बदलावर आणि सुंदरबनसारखा समान वारसा जतन करण्यासाठी सहकार्य करत राहू.

मित्रांनो, 

ऊर्जेच्या वाढत्या किंमती सध्या सर्व विकसनशील देशांसमोर आव्हान ठरत आहेत. मैत्री औष्णिक ऊर्जा प्रकल्पाच्या पहिल्या युनिटचे आज अनावरण झाल्यामुळे बांगलादेशमध्ये परवडणाऱ्या विजेची उपलब्धता वाढेल.

उर्जा पारेषण वाहिन्यांच्या  जोडणीबाबतही उभय देशांमध्ये आश्वासक चर्चा सुरू आहे. रूपशा नदीवरील रेल्वे पुलाचे उद्घाटन हे कनेक्टिव्हिटी वाढविण्याच्या दिशेने एक उल्लेखनीय पाऊल आहे. हा पूल भारताच्या पत  साहाय्यांतर्गत खुलना आणि मोंगला बंदर दरम्यान बांधल्या जात असलेल्या नवीन रेल्वे मार्गाचा एक महत्त्वाचा भाग आहे. बांगलादेशच्या रेल्वे व्यवस्थेच्या विकासासाठी आणि विस्तारासाठी भारत सर्वतोपरी सहकार्य करत राहील.

मित्रांनो,

भारत-बांगलादेश सीमेवरून 54 नद्या वाहतात आणि शतकानुशतके दोन्ही देशांतील लोकांच्या उपजीविकेशी त्या संलग्न आहेत. या नद्या, त्यांच्याबद्दलच्या लोककथा, लोकगीते, आपल्या सामायिक सांस्कृतिक वारशाच्याही साक्षीदार आहेत. आज आपण कुशीयारा नदीच्या पाणी वाटपाचा महत्त्वपूर्ण करार केला आहे. याचा फायदा भारतातील दक्षिण आसाम आणि बांगलादेशातील सिल्हेट भागाला होईल.

मी आणि पंतप्रधान शेख हसीना यांच्यात पूर निवारणासंदर्भात सहकार्य वाढविण्याबाबत यशस्वी चर्चा झाली. भारत बांगलादेशसोबत पूरसंबंधित माहिती रिअल-टाइम आधारावर सामायिक करत आहे आणि आम्ही माहिती सामायिक करण्याच्या कालावधीत देखील वाढ केली आहे.

आज आम्ही दहशतवाद आणि कट्टरतावादाच्या विरोधात सहकार्यावरही भर दिला. 1971 चा संकल्प जागृत ठेवण्यासाठी, आपल्या परस्परांच्या विश्वासावर आघात  करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या  शक्तींचा एकत्रितपणे सामना करणेदेखील खूप महत्वाचे आहे.

मित्रांनो, 

वंगबंधूंनी पाहिलेला स्थिर, समृद्ध आणि प्रगतीशील बांगलादेशचा संकल्प साकार करताना भारत बांगलादेशच्या साथीने वाटचाल करेल. आज आमच्यात झालेली चर्चा ही या मूळ कटिबध्दतेचा पुनरुच्चार करण्याची एक उत्तम संधी होती.

पुन्हा एकदा, मी पंतप्रधान शेख हसीना जी आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे भारतात हार्दिक स्वागत करतो आणि भारतातील त्यांचे वास्तव्य सौहार्दपूर्ण राहो अशी कामना व्यक्त करतो.

खूप खूप धन्यवाद.

बांगला देश आणि भारत यांच्यात आज नेमके कोणते सामंजस्य करार झालेत ..पहा

0

नवी दिल्‍ली, 6 सप्‍टेंबर 2022

A. द्विपक्षीय करार/सामंजस्य करार याची सूची:

Sr. No.सामंजस्य करार/कराराचे नावभारताच्या बाजूने करार/सामंजस्य करारावर स्वाक्षरी केलीबांगलादेशच्या बाजूने करार/सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली
1भारत आणि बांगलादेशमधील सीमेवरच्या कुशियारा नदीमधील पाणी वाटपाबाबत   भारत सरकारचे जलशक्ती मंत्रालय आणि बांगलादेश सरकारचे जल संधारण मंत्रालय यांच्यातील  सामंजस्य करार.पंकज कुमार, सचिव, जलशक्ती मंत्रालयकबीर बिन अन्वर, वरिष्ठ सचिव, जल संधारण मंत्रालय
2बांगलादेशच्या रेल्वे कर्मचाऱ्यांना भारतामध्ये प्रशिक्षण देण्याबाबत भारत सरकारचे रेल्वे मंत्रालय (रेल्वे बोर्ड) आणि बांग्लादेश सरकारचे रेल्वे मंत्रालय यांच्यातील सामंजस्य करार.विनय कुमार त्रिपाठी, अध्यक्ष, रेल्वे बोर्डमुहम्मद इम्रान, बांगलादेशचे भारतातील उच्चायुक्त
3बांगलादेश रेल्वेसाठी FOIS आणि इतर IT ऍप्लिकेशन्स सारख्या माहिती तंत्रज्ञान  प्रणालींमध्ये सहकार्य करण्याबाबतचा भारत सरकारचे रेल्वे मंत्रालय (रेल्वे बोर्ड) आणि बांगलादेश सरकारचे रेल्वे मंत्रालय यांच्यातील सामंजस्य करार.विनय कुमार त्रिपाठी, अध्यक्ष, रेल्वे बोर्डमुहम्मद इम्रान, बांगलादेशचे भारतातील उच्चायुक्त
4बांगलादेशच्या न्यायिक अधिकाऱ्यांसाठी भारतामध्ये  प्रशिक्षण आणि क्षमता विकास कार्यक्रम आयोजित करण्याबाबत भारताची राष्ट्रीय न्यायिक अकादमी आणि बांगलादेशचे सर्वोच्च न्यायालय यांच्यातील सामंजस्य करार.विक्रम के दोराईस्वामी, बांगलादेशातील भारताचे उच्चायुक्तमोहम्मद गोलाम रब्बानी, रजिस्ट्रार जनरल, बांगलादेश सर्वोच्च न्यायालय
5भारतीय वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) आणि बांगलादेशची बांगलादेश वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (बीसीएसआयआर), यांच्यातील वैज्ञानिक आणि तांत्रिक सहकार्याबाबतचा सामंजस्य करार.डॉ एन कलैसेल्वी, महासंचालक, सीएसआयआरडॉ.मो.आफताब अली शेख, अध्यक्ष बीसीएसआयआर
6अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्याबाबतचा  सामंजस्य करारडी. राधाकृष्णन, एनएसआयएल चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकडॉ. शाहजहान महमूद, बीएससीएलचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी
7प्रसार भारती आणि बांगलादेश टेलिव्हिजन (बीटीव्ही) यांच्यात प्रसारणातील सहकार्याबाबतचा सामंजस्य करार.मयंक कुमार अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रसार भारतीशोहराब हुसेन, महासंचालक, बीटीव्ही

B. उद्घाटन/अनावरण/घोषणा झालेल्या प्रकल्पांची सूची.

1. मैत्री विद्युत प्रकल्पाचे  अनावरण – रामपाल, खुलना येथील 1320 (660×2) मेगावॅट सुपर क्रिटिकल कोळशावर आधारित औष्णिक विद्युत  प्रकल्पासाठी अंदाजे 2 अब्ज अमेरिकी डॉलर्स खर्च अपेक्षित असून यापैकी 1.6 अब्ज अमेरिकी डॉलर्स विकास सहाय्य म्हणून भारताने सवलतीचा अर्थपुरवठा योजनेअंतर्गत  दिले.   

2. रुपशा पुलाचे उदघाटन – 5.13 किमी. लांबीचा रुपशा रेल्वे पूल हा 64.7 किमी लांबीच्या खुलना- मोंगला बंदर सिंगल ट्रॅक ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग आहे. यामुळे प्रथमच मोंगला बंदर खुलनाशी रेल्वेने जोडले जात असून त्यानंतर ते मध्य आणि उत्तर बांग्लादेशबरोबर तसेच भारताच्या सीमेवरील पेत्रापोल आणि गेदे या पश्चिम बंगालमधील भागाशी जोडले जात आहे.

3. रस्ते बांधकाम उपकरणे आणि यंत्रसामग्रीचा पुरवठा- या प्रकल्पामध्ये, बांग्लादेश रस्ते आणि महामार्ग विभागाला 25 पॅकेजेसमध्ये रस्त्यांची देखभाल आणि बांधकामाची उपकरणे आणि यंत्रसामग्रीचा पुरवठा याचा समावेश आहे.  

4. खुलना-दर्शन रेल्वे मार्ग जोडणी प्रकल्प- हा प्रकल्प सध्याचीपायाभूत सुविधा (ब्रॉडगेज मार्गाचे दुपदरीकरण) अद्ययावत करण्यासंदर्भात आहे. दोन्ही देशांमधील सीमापार जाणारी सध्याची   रेल्वेसेवा गेदे -दर्शन येथे खुलनाला जोडून त्याद्वारे दोन्ही देशांमधील रेल्वे जोडणी , विशेषतः ढाका तसेच भविष्यात मोंगला बंदराशी दळणवळण यामुळे वाढेल. या प्रकल्पासाठी अंदाजे 312.48 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स खर्च अपेक्षित आहे.

5. पर्बतीपूर-कौनिया रेल्वे मार्ग- सध्याच्या मीटर गेज मार्गाच्या  दुहेरीकरणाच्या    या प्रकल्पासाठी अंदाजे 120.41 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प दोन्ही देशांमधील सध्याच्या  रेल्वे मार्गाला बिरोल (बांग्लादेश) – राधिकापूर (पश्चिम बंगाल) येथे जोडला जाईल आणि द्विपक्षीय रेल्वे संपर्क वाढवेल.

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट

0

नवी दिल्‍ली, 6 सप्‍टेंबर 2022

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी आज राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. 

आपला सामायिक इतिहास,  भाषा आणि संस्कृती आपल्याला एकमेकांशी जोडतात, असे हसिना यांचे राष्ट्रपती भवनात स्वागत करताना राष्ट्रपती मुर्मू  म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या नेतृत्वाखाली भारत आणि बांगलादेश यांच्यातील द्विपक्षीय संबंध मोठ्या प्रमाणावर वृध्दिंगत झाले आहेत, असे त्यांनी नमूद केले. दोन्ही देशांनी ज्या प्रकारे बांगलादेशच्या स्वातंत्र्याचे ५० वे वर्ष आणि भारत-बांगलादेश द्विपक्षीय संबंधांचा सुवर्णमहोत्सव साजरा केला, ते अत्यंत खास  आहे. या ऐतिहासिक सोहळ्यांमध्ये सहभागी होण्यासाठी भारताचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान बांगलादेशच्या दौऱ्यावर गेले होते यावरून भारत बांगलादेशसोबतच्या संबंधांना किती महत्त्व देतो हे दिसून येते, असे राष्ट्रपती  म्हणाल्या.

आपल्या नागरिकांना  सामाजिक-आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्यात बांगलादेशने मोठे यश मिळवले आहे, हे पाहून आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले. बांगलादेशच्या विकासाच्या वाटचालीत भारत एक विश्वासार्ह भागीदार राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

भारत आणि बांगलादेशचे संबंध नेहमीच सहकार्याच्या भावनेने आणि परस्पर विश्वासाचे राहिले आहेत. महामारी आणि सध्याच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे जागतिक संकटाला तोंड देण्यासाठी भारत आणि बांगलादेशने आर्थिकदृष्ट्या अधिक जोडलेले राहावे ही काळाची गरज आहे, या भेटीमुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक परिपक्व आणि विकसित होतील, असा विश्वासही मुर्मू यांनी व्यक्त केला.

राज्यातील २८१ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

0

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांची माहिती

पुणे, दि. ६: राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून राज्यातील ३१ डिसेंबर २०२२ अखेर निवडणूकीस पात्र २८१ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर जाहीर करण्यात आला असून याबाबतची प्रक्रिया बुधवार ७ सप्टेंबर पासून सुरू होत असल्याची माहिती प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी दिली आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे मतदान २९ जानेवारी २०२३ रोजी व मतमोजणी ३० जानेवारी २०२३ रोजी होणार आहे.

प्राधिकरणाने ६ आणि २१ ऑक्टोबर २०२१ रोजीच्या आदेशानुसार निवडणूकीस पात्र कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक प्रक्रिया सुरु केल्या होत्या. मात्र, कृषी पत संस्थांच्या निवडणूकीनंतर कृषी उत्पन्न बाजार समितींच्या निवडणूका सुरु करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर १३ याचिका दाखल झाल्या होत्या. त्याअनुषंगाने उच्च न्यायालयाने निवडणूकीस पात्र विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या निवडणूका तातडीने पूर्ण करुन त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितींच्या निवडणूका पूर्ण करण्याबाबत १८ नोव्हेंबर २०२१ रोजी आदेश दिले.

त्यानुसार आवश्यक कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर प्राधिकरणाने आज निवडणूक कायक्रम जाहीर केला आहे. बाजार समितीच्या निवडणूकीकरीता बाजार क्षेत्रातील कार्यरत प्राथमिक कृषी पत संस्था, बहुउद्देशीय सहकारी संस्था व ग्रामपंचायत यांचे सदस्य मतदार असल्यामुळे या सदस्यांची सूची २७ सप्टेंबर २०२२ पर्यंत जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ.उ.बा.स.) यांच्याकडे सादर करण्याचे निर्देश संबंधित जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था व गट विकास अधिकारी यांना दिले आहेत. याशिवाय बाजार क्षेत्रातील परवाना धारक व्यापारी, आडते व हमाल, तोलाईदार हे बाजार समितीचे मतदार असल्यामुळे या मतदारांची यादी १ नोव्हेंबर २०२२ पर्यंत जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ.उ.बा.स.) यांच्याकडे सादर करण्याचे निर्देश संबंधित बाजार समित्यांना दिलेले आहेत.

कृषी उत्पन्न बाजार समित्यांची प्रारूप मतदार यादी १४ नोव्हेंबर रोजी आणि अंतिम मतदार यादी ७ डिसेंबर २०२२ रोजी प्रसिद्ध होणार आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे मतदान २९ जानेवारी २०२३ रोजी व मतमोजणी ३० जानेवारी २०२३ रोजी होणार आहे.

दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक घेण्यासंदर्भात उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ औरंगाबाद, नागपूर व मुंबई येथे मोठ्या प्रमाणात याचिका दाखल झालेल्या असता उच्च न्यायालयाने श्रीरामपूर, राहता, जाफ्राबाद, भोकरदन, वसमत व धारुर या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक प्रक्रिया विनिर्दिष्ट कालावधीत पूर्ण करणेबाबत आदेश दिले. त्यानुसार प्राधिकरणाने या बाजार समित्यांच्या निवडणूका २ सप्टेंबर २०२२ रोजीच्या आदेशानुसार सुरु केलेल्या आहेत. या बाजार समित्यांचे मतदान व मतमोजणी अनुक्रमे १८ डिसेंबर व १९ डिसेंबर २०२२ रोजी होणार असल्याची माहितीही डॉ.पाटील यांनी दिली आहे.

संभाव्य मतदार यादी व निवडणू‍क कार्यक्रम
मतदार यादी कार्यक्रम
जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था व गटविकास अधिकारी यांच्याकडून सदस्य सुची मागवणे- २७ सप्टेंबर २०२२ पर्यंत, प्रारूप मतदार यादी तयार करण्याकरीता सदस्य सूची बाजार समिती सचिवाकडे सुपूर्द करणे- ३ ऑक्टोबर २०२२, बाजार समिती सचिवाने नमुना ४ मध्ये प्रारूप मतदार यादी तयार करणे- ३ ते ३१ ऑक्टोबर २०२२, बाजार समिती सचिवाने नमुना ४ मधील प्रारूप मतदार यादी जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ.उ.बा.स) यांच्याकडे सादर करणे- १ नोव्हेंबर २०२२, जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ.उ.बा.स) यांनी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे- १४ नोव्हेंबर २०२२, प्रारूप मतदार यादीवर आक्षेप/ हरकती मागवणे- १४ ते २३ नोव्हेंबर, प्राप्त आक्षेप/हरकतींवर निर्णय घेणे- २३ नोव्हेंबर ते २ डिसेंबर, अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे- ७ डिसेंबर २०२२

निवडणू‍क कार्यक्रम
निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे- २३ डिसेंबर २०२२, नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा कालावधी- २३ ते २९ डिसेंबर २०२२, नामनिर्देशनपत्रांच्या छाननीचा दिनांक- ३० डिसेंबर २०२२, छाननीनंतर वैध नामनिर्देशनपत्रांच्या प्रसिद्धीचा दिनांक- २ जानेवारी २०२३, उमेदवारी मागे घेण्याचा कालावधी- २ ते १६ जानेवारी २०२३, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्याचा व निशाणी वाटप करण्याचा दिनांक- १७ जानेवारी २०२३, मतदान- २९ जानेवारी रोजी आणि मतमोजणी ३० जानेवारी २०२३ रोजी. मतमोजणीनंतर लगेचच निकाल जाहीर करण्यात येतील, असे निवडणूक कार्यक्रमात नमूद करण्यात आले आहे.

राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेतर्फे २५ सप्टेंबरला रंगणार ‘त्रिवेणी संगम’

0

आई सन्मान दिनी पुस्तक प्रकाशन, पुरस्कार वितरण व काव्यसंमेलन; साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या डॉ. संगीता बर्वे यांचाही सत्कार
पुणे : राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि काषाय प्रकाशनच्या वतीने २५ सप्टेंबर हा दिवस ‘आई सन्मान दिन’ म्हणून साजरा केला जाणार आहे. यानिमित्त ‘त्रिवेणी संगम’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या, ज्येष्ठ साहित्यिका डॉ. संगीता बर्वे यांच्या हस्ते त्रिवेणी संगमाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी त्यांचाही विशेष सन्मान केला जाणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रा. प्रशांत रोकडे यांनी दिली.
प्रा. प्रशांत रोकडे म्हणाले, “प्रसिद्ध कवी शंकर आथरे लिखित ‘द्वारका’ कादंबरीचे प्रकाशन, ‘श्यामची आई बंधुता पुरस्कार’ वितरण आणि ‘माझी आई’ बंधुता काव्य संमेलन असा हा त्रिवेणी संगम असणार आहे. शिवाय, साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल डॉ. संगीता बर्वे यांना मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम रविवार, दि. २५ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी १० वाजता नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात होणार आहे. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अनुसयाबाई आथरे (नाशिक), सीताबाई कदम (बीड), प्रकाशक प्रा. चंद्रकांत वानखेडे आदी उपस्थित राहणार आहेत.”
अकरा आदर्श माता-पुत्रांचा ‘श्यामची आई’ हा बंधुता पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. त्यामध्ये अशोक आणि सीताबाई कदम (बीड), विद्या आणि रंजनाताई पाचंगे (पुणे), विनोद आणि कांताबाई गलांडे पाटील (पुणे), नारायण आणि वेणूबाई खेडकर (पाथर्डी), भैरू आणि राजूबाई कांबळे (बीड), रवींद्र आणि सुलोचना यशवंतराव (मुरबाड), अनुप्रिया आणि मेधा जोगळेकर (तळेगाव), गोरखनाथ आणि शालूबाई लामखडे (निघोज), गोपाळ आणि शरणाबाई कांबळे (पुणे), अभ्युदय आणि प्रमिला वाघमारे (चिखली), गणेश आणि फुलाबाई केदारी (सांगवी) यांचा समावेश आहे.

उत्तरार्धात होणाऱ्या ‘माझी आई’ या बंधुता काव्यसंमेलनात संतोष शेळके (नेरळ), अनिल काळे (हिंगोली), सचिन शिंदे (उमरखेड), पल्लवी पतंगे (मुंबई), मधुश्री ओव्हाळ (पुणे), सुमन आव्हाड (पुणे), उदय क्षीरसागर (भिवंडी), नरेंद्र पाटील (धुळे), वैशाली माळी (कोल्हापूर), विजय माळी (धुळे) आणि जयश्री शेहणकर (अमरावती) हे निमंत्रित कवी सहभागी होणार आहेत, असे त्यांनी नमूद केले.

भाजप आमदार सुनिल कांबळे,माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, आमदार माधुरी मिसाळ यांचे बंधू मनोज देशपांडे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी-पुणे शहर कॉंग्रेसची मागणी

0

पुणे- गंगाधाम चौक नजीकच्या आंनदनगर झोपडपट्टीवासियांवर अत्याचार करून झोपड्या खाली करा म्हणणाऱ्या भाजपाचे आमदार सुनिल कांबळे, माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, आमदार माधुरी मिसाळ यांचे बंधू मनोज देशपांडे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी अशा मागणीचे निवेदन पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पुण्याचे पोलीस आयुक्त व पुणे महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देऊन मागणी केली. यावेळी माजी गृहराज्य मंत्री रमेश बागवे, कमलताई व्यवहारे, संजय बालगुडे, नगरसेवक अविनाश बागवे, अजित दरेकर, सचिन आडेकर उपस्थित होते.

     यावेळी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना आनंदनगर झोपडपट्टीवासियांवर अत्याचार करून झोपड्या खाली करून घेतानाचा व्हिडिओ दाखविण्यात आला व आमदार, नगरसेवक आणि माजी नगरसेविकेचे पती व त्यांच्या सोबत असलेले रेकॉर्डवरचे गुन्हेगार हे या कारवाईमध्ये दिसत आहेत हे निदर्शनास आणून दिले. याबाबत योग्य ते कायदेशिर कारवाई करून संबंधितांवर गुन्हा दाखल करून तात्काळ त्यांना अटक करावी तसेच आनंदनगर वसाहत येथे २४ तास पोलीस बंदोबस्त देण्यात यावा. अनाधिकृत इमारतीत झालेल्या सक्तीच्या पुनर्वसनाबाबत संबंधितांवर चौकशी करून गुन्हे दाखल करावेत अशी मागणी यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली.

   पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांना २०५ अंतर्गत रस्ता महापालिकेच्या शेवटच्या पुणे मनपाच्या सार्वजनिक सभेमध्ये बहुमताच्या जोरावर भाजपाने करून घेतला. त्यासाठी सदर ठिकाणच्या हिलटॉप, हिलस्लोप जागेवरील अनाधिकृत बांधलेल्या ५ मजली इमारतीमध्ये बेकायदेशिररित्या पुनर्वसनाचे काम केले जात आहे. SRA चे प्रमुख कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांनी सदर ठिकाणचे एस.आर.ए. प्रकल्प रद्द झाल्याचे आक्षेपार्हरित्या पत्र पुणे मनपास दिले आहे परंतु गेली ४० वर्षापासुन असलेली ही झोपडपट्टी पुणे मनपाकडे घोषित झोपडपट्टी आहे हे निदर्शनास आणून दिले. तसेच आनंदनगर वसाहत झोपडपट्टीतील नागरिकांचे नियमानुसार नागरिकांच्या मागणीनुसार पुनर्वसन करण्यात यावे. आनंदनगर वसाहतीतील अघोषित भागातील झोपड्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे ज्या अनाधिकृत इमारतीत पुनर्वसन केले आहे त्या अनाधिकृत इमारतीची कायदेशिर वैधता तपासून योग्य ती कारवाई करण्यात यावी. भाजपाने बहुमताच्या जोरावर शासनाने जाहिर केलेल्या अधिसूचनेच्या विसगंत मान्य केलेला पुणे मनपा मुख्य सेभेचा ठराव व आयुक्तांनी दिलेली ऑफिस ऑर्डर विखंडीत करण्यात यावी अशी मागणी यावेळी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केली.

पुणे फेस्टिव्हलमध्ये महिला महोत्सव संपन्न

0

पुणे-३४व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये महिलांच्या कला गुणांना व्यासपीठ मिळून देणाऱ्या महिला महोत्सवात महिलांचा पाककला स्पर्धा, पुष्प रचना व मंगळागौरीचे खेळ स्पर्धा मंगळवार दि. ६ सप्टे. रोजी हॉटेल तरवडे क्लर्कस इन, शिवाजी नगर येथे  पार पडल्या. महिलांच्या पाककला स्पर्धेचा यंदा रौप्य महोत्सव वर्ष आहे. दीपप्रज्वलनाने या स्पर्धांना प्रारंभ झाला. पाककला स्पर्धेत १५० हून अधिक महिलांनी सहभाग घेतला होता. सौ. मीरा कलमाडी यांनी सर्व सहभागी महिलांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले.

पाककला स्पर्धा ठिकाणी गोड चिरोटे करणे आणि घरून तिखट कोफ्ता करी करून आणणे असे दोन प्रकार होते.  परीक्षक म्हणून मीना लागू, ज्योती कुलकर्णी, वैशाली कर्वे, विजया चांदोरकर आणि वैशाली भागवत या होत्या. निवेदन नीता मेहता यांनी केले. भारत पेट्रोलियम याचे प्रायोजक होते. अंजली वागळे यांनी याचे संयोजन केले होते.  

स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे :

कोफ्ता करी निकाल –

प्रथम – सीमा नलावडे,

द्वितीय – लीना इनामदार ,

तृतीय – सरिता भुतडा,

उत्तेजनार्थ – मयुरी दोभाडा, वर्षा दोभाडा आणि तृप्ती खिंवसरा

चिरोटे स्पर्धा निकाल –

प्रथम – अरुणा जोशी,

द्वितीय – अनुजा जोशी,

तृतीय – वर्षा दोभाडा,

उत्तेजनार्थ – प्रगती अहिरे, सीमा नलावडे आणि मीना कदम

‘पुष्करणी’ हा फुलांची आवड असणाऱ्या व त्यांची कलात्मक मांडणी करणारा पुण्यातील महिलांचा ग्रुप आहे. त्यांच्या या आवडीमुळेच, काहीजणी जपानला जाऊन, ईकेबाना या जपानी कलेचे प्रशिक्षण घेऊन आल्या आहेत. पुष्करणीच्या सदस्यांना जपानी पुष्परचना म्हणजेच इकेबना सादरकरणेची संधी यावर्षी पुणे फेस्टिवलच्या महिला महोत्सवामध्ये मिळाली. गुलाब, ओरिएंटल आणि एशियाटिक लिलीम्स, बर्ड ऑफ पॅराडाईज, अदरक वनस्पती, अँथोरियाम्स, क्रिझेंटिम आणि ग्लॅडिओलस सारखी फुले या फुलांचा वापर फुलांच्या सजावटीमध्ये केला गेला.एकूण २० प्रकारच्या रचना केल्या गेल्या. संध्या काणेगावकर, अर्चना वैद्य, रागेणी कक्कर, शशिकला शेट्टी, मनीषा दीक्षित आणि मधु सरकार यांनी याचे आयोजन केले होते.

या बरोबरच महिलांचे मंगळागौरीचे खेळ सादर करून विविध महिला स्पर्धक गटांनी उपस्थितांच्या प्रचंड टाळ्या मिळवल्या. यामध्ये १० गट सहभागी झाले होते. फुगड्या, व्यायामाचे खेळ यावेळी सादर केले गेले. या मंगळागौरीचे खेळ स्पर्धांचा निकाल पुढील प्रमाणे : प्रथम क्रमांक – स्वामिनी ग्रूप, द्वितीय क्रमांक – मानिनी ग्रूप. सुचित्रा जोगळेकर मेडदकर आणि प्रज्ञा गुरव यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. 

या महिला महोत्सवात मिस ऑस्ट्रेलियेशा डॉ. प्रचीती पुंडे उपस्थित होत्या.  प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या अभिनेत्री स्मिता ओक म्हणाल्या ‘सध्याच्या धकधकी च्या जीवनात संवाद हरवलाय अशावेळी महिला महोत्सवाच्या निमित्याने महिला घराबाहेर पडतात,  नव्या ने सर्वांशी ओळख होऊन संवाद वाढतो जे आत्ताच्या काळात अतिशय गरजेचं आहॆ.’ महोत्सवाचा शेवटी करुणा पाटील यांनी आभार मानले.

लंकेतील नेत्यांप्रमाणे पवार पळ काढतील:पडळकरांची टीका

0

सीतारामन कधी बारामतीचे ऑपरेशन करतील समजणारही नाही

पुणे-येत्या 2024 ला पवारांचे विसर्जन करण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे 3 दिवसीय बारामती दौऱ्यावर आहेत, असे वक्तव्य भाजपचे प्रवक्ते आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.जसे श्रीलंकेतील नेत्यांवर असलेल्या जनतेच्या रोषातून त्यांना देशातून पळून जावे लागले, तसेच पवारांना बारामतीमधून पळून जावे लागेल, असा हल्लाबोल पडळकर यांनी केला.

पडळकर म्हणाले की, बारामतीकरांना एखाद्याला फसवून, लुबाडून घेण्यात फार आनंद असतो​. जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार आले तेव्हा सुप्रिया सुळे वरमाई सारखं महाराष्ट्रभर फिरत होत्या.“केंद्राने लोकसभा प्रवास योजना जाहीर केली. त्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची नियुक्ती केली. त्या बिनटाक्याचे ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टर आहेत. एकदा त्या बारामतीला आल्या तर पवारांना कळणार सुद्धा नाही आहे, भाजपाचा खासदार कसा दिल्लीला गेला. जेव्हापासून सीतारमण यांचा दौरा निश्चित झाला, तेव्हापासून सुप्रिया सुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांवर टीका करत आहेत. तुमच्या घराण्याने ५० वर्षे खूप सेवा केली. आता आराम करा,” असा टोला पडळकर यांनी सुप्रिया सुळेंना लगावला आहे.

पडळकर म्हणाले की, बारामती हा काही पवारांचा बालेकिल्ला नाही. ही केवळ एक टेकडी आहे. ती मी फिरून ठोकत आहे. मात्र, पोलिसांच्या सहाय्याने पवारांचे राजकारण सुरू आहे. माझ्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले असे म्हणत पडळकरांनी पवारांवर निशाणा साधला आहे.

बंद केले तेव्हा अजित पवारांच्या पाठीशी कुणीही उरले नव्हते , एकनाथ शिंदेंच्या पाठीशी ५० आले

अजित पवारांनी बंड केले तेव्हा दोन तृतीयांश आमदार त्यांच्या मागे राहिले नाहीत. एकनाथ शिंदे 50 आमदार घेऊन गेले. फडणवीस यांना सत्तेत बसू द्यायचे नव्हते. तरीदेखील ते सत्तेत आले, हे शरद पवारांचे दुःख असल्याचे पडळकर यांनी म्हटले.

शरद पवारांना भारताने पाकिस्तान विरोधात मॅच जिंकल्यावर हात वर करावा लागतानाचा व्हिडिओ पोस्ट करावा लागतोय. तर कधी आरती करत असतानाचा हा खरा भाजपचा विजय असल्याची खोचक टीकाही पडळकरांनी पवारांवर केली. आजच्या मेळाव्यातील गर्दी पाहून पवारांना अस्वस्थ वाटू लागेल, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंमलबजावणी समितीवर अशासकीय सदस्यत्वासाठी अर्ज करण्याचे आवाहन

0

मुंबई, दि. ६ : समाजातील अनिष्ट, अघोरी, अमानुष प्रथा बंद करण्यासाठी जादूटोणा विरोधी कायदा अमलात आला आहे. या कायद्याच्या जनजागृती – प्रचार कार्यक्रम अंमलबजावणीसाठीच्या समितीवर मुंबई उपनगर जिल्ह्याच्या दोन महिलांसह एकूण सात अशासकीय सदस्यांची नेमणूक करावयाची आहे. यासाठी संबंधित संस्था अथवा व्यक्तींनी अर्ज करण्याचे आवाहन, समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांनी केले आहे.

संस्कारातून रूजलेल्या गैरसमजुतीमुळे जातीयता, उच्चनिचता, गटपंथांमधील परस्पर द्वेष, स्त्री-पुरूष असमानता, दारिद्र्य अशा मानवतेसाठी घातक असणाऱ्या गोष्टी अजूनही समाजात अस्तित्वात आहेत. जादूटोणा विरोधी कायद्यामुळे लाखो माणसांचा होणारा छळ, शोषण व त्यांचे जीव वाचणार आहेत. समाजात प्रबोधन करण्यासाठी जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार कार्यक्रम अंमलबजावणी समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. या समितीवर सात अशासकीय सदस्यांचा नव्याने समावेश करून समितीचे पुनर्गठन करण्यात येणार आहे.

इच्छुक व्यक्तींनी मुंबई उपनगर जिल्ह्यातील संबंधित संस्था अथवा व्यक्तींनी सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर, नवीन प्रशासकीय इमारत, ४ था मजला, आर.सी.मार्ग., चेंबूर, मुंबई ७१ या पत्त्यावर किंवा ०२२-२५२२२०२३, spldswo_mumsub@yahoo.co.in  या मेलवर संपर्क साधावा.

मुंबई हिसकावू पाहणाऱ्यांना ठाकरे आसमान दाखवतील

0

मराठयांंचे सैन्य कमी होते. मात्र, निष्ठावंत होते. मुघलांसोबत लाखोंची फौज होती गद्दार मिळालेले होते तरीही त्यांचा पराभव झाला, म्हणाले ठाकरे

मुंबई-दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार आहे. आपल्याला जमीन दाखविण्याची भाषा करणाऱ्यांना आम्ही अस्मान दाखविणार आहोत, असे प्रत्युत्तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव् ठाकरेंनी मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिले.मुंबईत दौऱ्यात अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी धोका दिला. राजकारणात धोका कधीही सहन केला जाऊ शकत नाही. ठाकरेंना भुईसपाट करा, असे आवाहन भाजप कार्यकर्त्यांना केले होते. या वक्तव्याला आज उद्धव ठाकरेंनी उत्तर दिले.

उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपला गणपतीच्या मंडपात देखील राजकारण दिसते, म्हणून मंगलमूर्तीच्या दर्शनाला आल्यावर लोकांनी राजकीय टीका केली. गणपती हा बुद्धीदाता आहे, त्याने सर्वांना बुद्धी द्यावी असे म्हणत अमित शहा यांना टोला लगावला आहे.

ठाकरे म्हणाले, आता संघर्षाचा काळ आहे. शिवसेना संपविण्याचे काम सध्या भाजपकडून सुरू आहे. जो या काळात सोबत राहतो तो आपला. शिवसेनेसोबत उरलेल्या आमदारांना लालूच दाखवून ते नेऊ शकले असते. मात्र, हे का नाही जमले असे म्हणत निष्ठा ही कोणत्याही किमतीला विकली जाऊ शकत नाही आणि म्हणून हे आमदार शिवसेनेसोबत आहेत असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

ठाकरे म्हणाले की, मराठयाचे सैन्य कमी होते. मात्र, निष्ठावंत होते. मुघलांसोबत लाखोंची फौज असूनही, त्यांचा पराभव झाला, असा टोला त्यांनी भाजप आणि शिंदेंना लगावला. मला मुख्यमंत्रिपद हवे असते तर तर आमदारांना मी देखील डांबून ठेऊ शकलो असतो. माझी सुद्धा ममता बॅनर्जीसोबत ओळख होती. तिकडे घेऊन् गेलो असतो. काली मातेच्या मंदिरात नेले असते. मात्र, हा माझा स्वभाव नाही. कारण मला कट्टर शिवसैनिक हवे आहेत आणि ते आज माझ्यासोबत आहेत, असे म्हणताना दसऱ्या मेळाव्यात कुठलेही बंधन नसणार असेही त्यांनी म्हटले आहे.

फडणवीस- शिंदे गट आता मुंबई महापालिका ठाकरेंकडून काढून घेणार

0

भाजप – शिंदे गट निवडणूक एकत्र लढवू मुंबई महापालिकेवर आमचा भगवा फडकवू : देवेंद्र फडणवीस

मुंबई-भाजप – शिंदे गट महापालिका निवडणूक एकत्र लढणार आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केली. ते मुंबईत बोलत होते.फडणवीस म्हणाले, कुठलीही निवडणूक लढत असताना आपल्या जीवनातील शेवटची निवडणूक आहे असे समजून ती झोकून देत लढवावी, हे माझे वक्तव्य केवळ मुंबई महापालिकेशी संबंधितच नव्हते, तर ते राज्यभरासाठी लागू होते.फडणवीस म्हणाले की, भाजप आणि शिवसेना ओरिजनल म्हणजे शिंदे गट आम्ही एकत्रित निवडणूक लढवू आणि जिंकू आणि आमचा झेंडा फडकवू. भाजपचे मिशन महाराष्ट्र आहे. आमचे मिशन केवळ बारामती नाही. आमच्यासाठी प्रत्येक सीट महत्त्वाची आहे.

मीशोने वार्षिक फेस्टिव्ह “मेगा ब्लॉकबस्टर सेल” ची घोषणा केली, लघु उद्योजकांच्या सहभागामध्ये चार पटींनी वाढ

0

●       २३ ते २७ सप्टेंबर २०२२ पर्यंत मीशोवर असणार आहे “मेगा ब्लॉकबस्टर सेल”यामध्ये कमीत कमी किमतींमध्ये खरेदी करता येतील कोट्यवधी उत्पादने

●       रणवीर सिंगदीपिका पदुकोण आणि सात इतर प्रसिद्ध सेलिब्रेटीजसोबत सहयोगमीशोच्या फायदेशीर वैशिष्ट्यांची माहिती देशाच्या कानाकोपऱ्यांपर्यंत पोहोचवणार.

●       स्थानिक स्तरावरील उपस्थिती मजबूत करण्यासाठी फेस्टिव्ह सेलच्या आधी मीशो ऍपवर आठ क्षेत्रीय भाषांचा नव्याने समावेश.

बंगलोर४ सप्टेंबर २०२२: भारतातील सर्वाधिक वेगाने वाढत असलेली इंटरनेट व्यापार कंपनी मीशोने आपल्या “मेगा ब्लॉकबस्टर सेल” ची घोषणा आज केली. मीशोवरील हा मोठा फेस्टिव्ह सेल २३ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर २०२२ पर्यंत सुरु राहणार आहे. देशातील प्रत्येक व्यक्तीला ई-कॉमर्स अर्थात इंटरनेटच्या माध्यमातून खरेदी-विक्रीचे लाभ मिळवून देण्याचे आपले मिशन पुढे नेण्यासाठी मीशो देशभरातील ग्राहकांसाठी ई-कॉमर्सला अधिकाधिक सहजसोपे व किफायतशीर बनवत आहे.

३० वेगवेगळ्या विभागांमध्ये ७ लाखांहून जास्त विक्रेते आणि ~६.५ कोटी सक्रिय उत्पादन लिस्टिंग्ससह मीशो आपल्या ग्राहकांना विविध प्रकारची उत्पादनेकमीत कमी किमतींना सहज खरेदी करण्याची सुविधा देण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन कार्यरत आहे. मीशोला हे ठाऊक आहे कीभारतात अनेक लोक असे आहेत ज्यांच्या उत्पादने निवडण्याच्या आणि उत्पादनांच्या किमतींबाबतच्या गरजा वेगळ्या असतात आणि त्या गरजा आजवर पूर्ण होऊ शकलेल्या नाहीत.  संपूर्ण भारताच्या सणासुदीच्या खरेदीशी संबंधित सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी ही कंपनी या युजर्सवर आपले लक्ष केंद्रित करते. यंदाच्या वर्षीच्या फेस्टिव्ह सेलच्या आधी मीशोने क्षेत्रीय स्तरावरील आपले स्थान अधिक मजबूत करत आपल्या ऍपवर बंगालीतेलुगुमराठीतमिळगुजरातीकन्नडमल्याळम आणि ओडिया या आठ भाषांचा समावेश केला आहे.  गेल्या वर्षी पाच दिवसांच्या वार्षिक सेलमध्ये ~६०% ऑर्डर्स ४+ स्तरांच्या क्षेत्रांमधून आल्या होत्या.

मीशोवर आपली उत्पादने विकणाऱ्यांनी गेल्या दोन वर्षात आपल्या व्यवसायामध्ये सरासरी ८२% ची वाढ अनुभवली आहे. सणासुदीचा काळ सुरु झाला आहेत्यासाठी मीशोने आपल्या विक्रेत्यांना व्यापारामध्ये मागणीचे पूर्वानुमान आणि ऑर्डरच्या व्हॉल्युमचे व्यवस्थापन अशा अनेक पैलूंबद्दल माहिती देणे सुरु केले असून मीशो त्यांच्यासोबत अतिशय जवळून काम करत आहे. सप्लायर लर्निंग हबवर शैक्षणिक इन्फोग्राफिक्स आणि अतिशय सहजसोप्या व्हिडियोंचा समावेश असलेला एक मोठा ट्रेनिंग प्रोग्राम कंपनीने तयार केला आहे.  सेलच्या दृष्टीने सर्वात चांगल्या गोष्टीकॅटलॉग्सची निवड या सर्व गोष्टींची माहिती या व्हिडीओमध्ये दिली जाते. याचा परिणाम म्हणून फेस्टिव्ह सेलमध्ये लघु उद्योजकांचा सहभाग गेल्या वर्षीपेक्षा ४ पटींनी वाढला आहे.

मीशोचे सीएक्सओबिझनेस श्री उत्कृष्ट कुमार यांनी सांगितलेभारतातील ग्राहकांच्या गरजाइच्छाआवडीनिवडी आणि सणासुदीच्या काळात खरेदीच्या पॅटर्न्स यांना बारकाईने समजून घेत मीशोचा मेगा ब्लॉकबस्टर सेल अतिशय विचारपूर्वक तयार केला जातो. भारतभरातील ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही देशभरातील लाखो विक्रेत्यांसोबत काम करत आहोत.  त्यांच्यापैकी अनेक विक्रेते असे आहेत जे या सणासुदीच्या हंगामात पहिल्यांदाच आपली उत्पादने ऑनलाईन विकणार आहेत. मीशोवर आम्ही असा प्लॅटफॉर्म तयार करत आहोत जो देशभरातील सूक्ष्मलघु व मध्यम उद्योजकांना खूप मोठी वाढ आणि खूप जास्त मार्जिन्स मिळवून देईल आणि आपल्या व्यापाराचे डिजिटलीकरण करून मीशोवर यशस्वी होण्याचा आत्मविश्वास देखील त्यांना प्रदान करेल.

पुढील बिलियन भारतीयांसाठी सर्वात पहिले शॉपिंग डेस्टिनेशन म्हणून मीशोचे स्थान अजून जास्त मजबूत करण्यासाठी आम्ही आमचा वार्षिक मेगा ब्लॉकबस्टर फेस्टिव्ह सेल सुरु करत आहोत. युजर सर्वात आधी‘ हा विचार डोळ्यासमोर ठेवून आम्ही लघु उद्योजकांची उत्पादने जास्तीत जास्त उपलब्ध करवून देऊदेशाच्या कानाकोपऱ्यांमधील ग्राहकांसाठी उत्तम दर्जाची उत्पादने कमीत कमी किमतींना सादर करू.”

यावर्षी मीशोने देशभरातील नऊ प्रसिद्ध सेलिब्रेटींसोबत हातमिळवणी केली आहेयामध्ये रणवीर सिंगदीपिका पदुकोणरोहित शर्मारश्मिका मंदानाकपिल शर्मातृषा कृष्णनकार्थी शिवकुमारराम चरण आणि सौरव गांगुली यांचा समावेश आहे. मीशोच्या वैशिष्ट्यांची माहिती देशभरातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यात हे सेलिब्रेटी कंपनीसोबत काम करतील. यापैकी प्रत्येक सेलिब्रेटी एका नव्या आणि मनोरंजक अवतारात पाहायला मिळेल. आपापल्या क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करत

वेगवेगळ्या उत्पादनांच्या विक्रेत्यांच्या भूमिकांमध्ये भारतातील विविध क्षेत्रांमधील ग्राहकांपर्यंत ब्रँडचा संदेश पोहोचवण्यात हे सेलिब्रेटी योगदान देतील.

मीशोने आपल्या ग्राहकांना पेमेंटवर देखील आकर्षक ऑफर्स आणि इन्स्टंट बँक डिस्काऊंट्स मिळवून देण्यासाठी काही प्रमुख वॉलेट्ससोबत देखील सहयोग केला आहे. यामध्ये फोनपे आणि पेटीएम इत्यादींचा समावेश आहे. याशिवाय सिम्प्ल आणि लेझीपेमार्फत ‘बाय नाऊ पे लेटर’ वर विशेष ऑफर्स देखील उपलब्ध आहेत.

नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांची प्रगती – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

0

मुंबई, दि. 5 : देशाने ‘नवीन शैक्षणिक धोरण 2020’ चा अवलंब केला असून या धोरणामुळे देशातील प्रत्येक विद्यार्थ्याची प्रगती होईल. असे मत केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी व्यक्त केले. श्री. शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत पवई येथील ए. एम. नाईक शाळेचे उद्घाटन आज करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार पूनम महाजन, खासदार मनोज कोटक, एल अँड टी चे अध्यक्ष ए.एम नाईक, सीईओ एस.एम. सुब्रमण्यम, चेरिटेबल ट्रस्टचे जिग्नेश नाईक, प्राचार्य मधुरा फडके, शिक्षक आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. शाह म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरण बहुआयामी आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा लाभ होणार आहे. शिक्षकांनी सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे मानवतावादी, आध्यात्मवादी विचार देशातील प्रत्येक विद्यार्थ्यांचा मनात रुजवावेत. एक उत्तम शिक्षक कसा असावा, यांचा बोध घ्यायला हवा. शिक्षकांनी  बालकांना समाजातील उत्तम नागरिक बनवावे. पंचतंत्र सारख्या बोधकथांच्या माध्यमातून विद्यार्थी घडवावेत, असेही आवाहन श्री. शाह यांनी केले.

भारताला आत्मनिर्भर बनविण्यासाठी एल अँड टी ने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. अशा या राष्ट्रनिर्माण कार्यात ए. एम. नाईक यांचे योगदान महत्त्वाचे असल्याने भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण या नागरी पुरस्काराने गौरविले आहे. आता श्री. नाईक यांनी पायाभूत सुविधांसोबतच व्यक्तिनिर्माण करुन   राष्ट्रनिर्माण करावे, अशा शुभेच्छा दिल्या.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणामुळे प्रत्येक विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्त्व विकासाबरोबर त्यांचे चांगले चारित्र्य निर्माण होणार आहे. या धोरणामुळे समाजातील सर्व वर्गातील व्यक्तींना समान संधी उपलब्ध होतील. विद्यार्थी हे हिऱ्यासारखे मौल्यवान असून त्यांना पैलू पाडण्याचे कार्य शिक्षक करतात, असे सांगून शिक्षक दिनानिमित्त त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.