Home Blog Page 1625

सीओई-एसयूआरव्हीईआय तर्फे जमिनीच्या सर्वेक्षणासाठीच्या ड्रोन प्रतिमांचे प्रमाणीकरण

0

नवी दिल्ली, 7 सप्टेंबर 2022

ड्रोनच्या सहाय्याने केलेल्या जमीन सर्वेक्षणाचे जगातील पहिले प्रमाणक स्थापित करण्याचा प्रयत्न करत केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या सीओई-एसयूआरव्हीईआय अर्थात उपग्रह आणि मानवविरहित दूरस्थ वाहन उपक्रमविषयक उत्कृष्टता केंद्राने ड्रोनद्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून हाती आलेल्या प्रतिमांचा दर्जा निश्चित करण्यासाठी संदर्भ प्रमाणके म्हणून उपयुक्त ठरू शकतील अशा तांत्रिक मानकांचे वर्णन करणारा संकल्पना मसुदा प्रसिद्ध केला आहे.

या संदर्भात ड्रोनच्या वापरातून जमिनीच्या सर्वेक्षणासाठी मिळविलेल्या प्रतिमांच्या दर्जाचे मूल्यमापन करण्यासाठी एकसमान मानके निश्चित करण्याच्या दृष्टीने सीओई-एसयूआरव्हीईआयने सर्व भागधारकांकडून प्रतिक्रिया मागविल्या आहेत.

सध्याच्या काळात, जमिनीच्या सर्वेक्षणासाठी ड्रोनचा वापर करून मिळविलेल्या प्रतिमांच्या मूल्यमापनासाठी कोणतीही प्रमाणित मानके निश्चित करण्यात आलेली नाहीत, हे लक्षात घेणे सयुक्तिक ठरेल. त्यामुळे ड्रोनकडून मिळविलेल्या प्रतिमांची पश्चात-प्रक्रिया करणे आव्हानात्मक झाले आहे. या कारणाने ड्रोनने दिलेल्या प्रतिमांच्या माहितीवरून कृत्रिम बुद्धीमत्ता तसेच मशीन लर्निंग साधनांचा वापर करून संबंधित माहिती मिळविण्याला मर्यादा येतात.

सीओई-एसयूआरव्हीईआयने त्यांच्या माहितीविषयक भागीदारांच्या सहकार्याने ड्रोनद्वारे केलेल्या सर्वेक्षांच्या निकालासाठी प्रमाणक मसुदा विकसित करण्यात पुढाकार घेतला असून ड्रोनशी संबंधित समुदाय आणि इतर भागधारकांकडून सूचना आणि अधिक विस्तृत सल्ला मिळविण्याच्या दृष्टीने हा मसुदा प्रसिद्ध केला आहे.

ड्रोनकडून मिळालेल्या माहितीच्या दर्जाचे मूल्यमापन करण्यासाठी या प्रमाणक मसुद्यात नमुन्याच्या बेंचमार्किंगशिवाय प्रतिमेचा दर्जा ठरविण्यासाठी 19 विविध मानक क्षेत्रे तसेच 8 विस्तारित मेट्रिक्स/तंत्रांचा समावेश करण्यात आला आहे.

पीएम श्री शाळांची योजनेसाठी पाच वर्षात 27360 कोटी रुपये खर्च करणार

0

नवी दिल्ली, 7 सप्टेंबर 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पीएम श्री शाळा (पीएम स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया ) या केंद्र सरकार पुरस्कृत नवीन योजनेला मंजुरी मिळाली. केंद्र सरकार/ राज्य/ केंद्रशासित प्रदेश सरकार/ स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे व्यवस्थापित केलेल्या निवडक विद्यमान शाळांना बळकट करून देशभरातील 14,500 हून अधिक शाळांचा विकास पीएम श्री शाळा म्हणून करण्याची ही एक नवीन योजना आहे. पीएम श्री शाळांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चे सर्व घटक असतील. या आदर्श शाळा म्हणून काम करतील आणि त्यांच्या आसपासच्या इतर शाळांना मार्गदर्शन देखील करतील. पीएम श्री शाळा विद्यार्थ्यांच्या संज्ञानात्मक विकासासाठी दर्जेदार शिक्षण देतील आणि 21 व्या शतकातील महत्त्वाच्या कौशल्यांनी सुसज्ज सर्वांगीण आणि सर्वगुणसंपन्न व्यक्ती तयार करण्यासाठी आणि त्यांच्या कौशल्यांची जोपासना करण्याचा प्रयत्न करतील.

पीएम श्री शाळा (पीएम स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया ) ही केंद्र प्रायोजित योजना म्हणून राबविण्यात येणार आहे. या योजनेचा एकूण प्रकल्प खर्च रु. 27360 कोटी आहे. 2022-23 ते 2026-27 या पाच वर्षांच्या कालावधीसाठी 18128 कोटी रुपयांचा केंद्रीय हिस्सा त्यात समाविष्ट आहे.

महत्वाची वैशिष्टे

• विविध पार्श्वभूमी, बहुभाषिक गरजा आणि मुलांच्या विविध शैक्षणिक क्षमतांची काळजी घेणार्‍या न्याय्य, सर्वसमावेशक आणि आनंदी शालेय वातावरणात उच्च दर्जाचे शिक्षण पीएम श्री शाळा प्रदान करतील आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनइपी) 2020 च्या तरतुदींनुसार त्यांना त्यांच्या स्वतःच्या शिकण्याच्या प्रक्रियेत सक्रिय सहभागी बनवतील.

• पीएम श्री शाळा त्यांच्या संबंधित विभागातील इतर शाळांना मार्गदर्शन प्रदान करून नेतृत्व प्रदान करतील.

• पीएम श्री शाळांना हरित शाळा म्हणून विकसित केले जाईल.

• प्रत्येक इयत्तेत प्रत्येक मुलाच्या शिकण्याच्या शिकण्यातून काय निष्पन्न झाले यावर भर दिला जाईल. वैचारिक समज आणि वास्तविक जीवनातील परिस्थितींमध्ये ज्ञानाच्या वापरावर आणि योग्यतेवर सर्व स्तरांवरील मूल्यमापन आधारित असेल.

• शाळा गुणवत्ता मूल्यांकन रचना(SQAF) विकसित केली जात आहे.  परिणाम मोजण्यासाठी ही रचना प्रमुख कार्यप्रदर्शन निर्देशक आहे.  इच्छित मानकांची खात्री करण्यासाठी नियमित अंतराने या शाळांचे गुणवत्ता मूल्यमापन केले जाईल.

या योजनेत यथावकाश सध्याच्या योजना/पंचायती राज संस्था/शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि समाजाचे योगदान याद्वारे शाळेच्या पायाभूत सुविधांच्या सुधारणा आणि सुविधांच्या निर्मितीची कल्पना आहे.

मुलांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करून या शाळा विकसित केल्या जातील.

निवड पद्धत:

पीएम श्री शाळांची निवड चॅलेंज मोडद्वारे केली जाईल. आदर्श शाळा बनण्यासाठी शाळा एकमेकांशी स्पर्धा करतील. शाळांनी ऑनलाइन पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे. योजनेच्या पहिल्या दोन वर्षांसाठी पोर्टल वर्षातून चार वेळा, दर तिमाहीत एकदा उघडले जाईल.

प्राथमिक शाळा (वर्ग 1-5/1-8) आणि माध्यमिक/ वरिष्ठ माध्यमिक शाळा (वर्ग 1-10/1-12/6-10/6-12) केंद्र/राज्य/केंद्रशासित प्रदेश सरकारे/स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे व्यवस्थापित योजनेअंतर्गत निवडीसाठी UDISE+ कोड असलेल्या सरकारांचा विचार केला जाईल. निवड तीन-टप्प्यांद्वारे निश्चित वेळेनुसार केली जाईल, जी खालीलप्रमाणे आहे: –

A.टप्पा-1: राज्ये/केंद्रशासित प्रदेश पीएम श्री शाळा म्हणून विशिष्ट गुणवत्ता हमी प्राप्त करण्यासाठी या शाळांना पाठिंबा देण्याच्या वचनबद्धतेत केंद्रासोबत एनइपी संपूर्णपणे लागू करण्यास सहमती दर्शवत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करतील.

B.टप्पा-2:  या टप्प्यात, पीएम श्री शाळा म्हणून निवडल्या जाण्यासाठी पात्र असलेल्या शाळांचा एक पूल UDISE+ डेटाद्वारे निर्धारित किमान बेंचमार्कच्या आधारे ओळखला जाईल.

C.टप्पा-3:  हा टप्पा काही निकष पूर्ण करण्यासाठी आव्हान पद्धतीवर आधारित आहे. केवळ वरील पात्र शाळांमधील शाळाच आव्हानात्मक परिस्थिती पूर्ण करण्यासाठी स्पर्धा करतील. अटींची पूर्तता राज्ये//केव्हीएस/जेएनव्हीद्वारे भौतिक तपासणीद्वारे प्रमाणित केली जाईल.

शाळांनी केलेले अर्ज राज्ये/केंद्रशासित प्रदेश/केव्हीएस/जेएनव्ही तपासतील आणि शाळांच्या यादीची शिफारस मंत्रालयाला करतील.

संपूर्ण भारतातील एकूण शाळांच्या संख्येच्या वरच्या मर्यादेसह प्रत्येक ब्लॉक/यूएलबीसाठी जास्तीत जास्त दोन शाळा (एक प्राथमिक आणि एक माध्यमिक/वरिष्ठ माध्यमिक) निवडल्या जातील. पीएम श्री शाळांची निवड आणि देखरेख करण्यासाठी शाळांचे जिओ टॅगिंग केले जाईल. जिओ टॅगिंग आणि इतर संबंधित कामांसाठी भास्कराचार्य नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्पेस अॅप्लिकेशन्स अँड जिओ-इन्फॉर्मेटिक्स ( BISAG-N) ची सेवा घेतली जाईल. शाळांच्या अंतिम निवडीसाठी तज्ज्ञांची समिती स्थापन केली जाईल.

पीएम श्री शाळांची गुणवत्ता हमी

i.एनइपीचा 2020 चा समावेश

ii.नावनोंदणी आणि शिकण्याच्या प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी विद्यार्थी नोंदणी

iii.राज्य आणि राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त पातळी गाठण्यासाठी प्रत्येक मुलाच्या शिकण्याच्या परिणामांमध्ये सुधारणा अपेक्षित

iv.प्रत्येक मध्यम श्रेणीतील मूल अत्याधुनिक आणि 21 व्या शतकातील कौशल्यांशी संपर्क साधेल

v.प्रत्येक माध्यमिक इयत्तेतील मूल किमान एका कौशल्याने उत्तीर्ण होईल

vi.प्रत्येक मुलासाठी खेळ, कला, आय.सी.टी

vii.शाश्वत आणि हरित शाळा

viii.मार्गदर्शनासाठी प्रत्येक शाळा उच्च शिक्षण संस्थांशी जोडली असेल

ix.प्रत्येक शाळा स्थानिक उद्योजकीय परिसंस्थेशी जोडली असेल

x.प्रत्येक मुलाचे मनोवैज्ञानिक कल्याण आणि करिअरसाठी समुपदेशन केले जाइल

xi.विद्यार्थी भारताचे ज्ञान आणि वारसा रुजवतील, भारताच्या सभ्यता आणि मूल्यांचा अभिमान बाळगतील, जगासाठी भारताच्या योगदानाची जाणीव असेल, समाज, प्राणी आणि निसर्गाप्रती कर्तव्याची जाणीव असेल, भारतीय भाषांमध्ये संवाद साधण्यास सक्षम असेल, सर्वसमावेशकता, समानतेचा आदर करेल आणि विविधतेत एकता, सेवेची भावना आणि ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ च्या भावनेला पुढे नेईल

xii.चारित्र्य-निर्माण, नागरिकत्व मूल्ये, मूलभूत कर्तव्ये आणि राष्ट्र उभारणीच्या जबाबदाऱ्या, मुलांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करून या शाळा व्हायब्रंट शाळा म्हणून विकसित केल्या जातील.

लाभार्थी

18 लाखांहून अधिक विद्यार्थी या योजनेचे थेट लाभार्थी होण्याची अपेक्षा आहे. पी एम श्री शाळांच्या आजूबाजूच्या शाळांना मार्गदर्शन आणि हाताळणीद्वारे प्रभाव निर्माण केला जाईल.

शिक्षण क्षेत्रातील सहकार्याबाबत भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी

0

नवी दिल्ली, 7 सप्टेंबर 2022

माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्र सरकारचे शिक्षण मंत्रालय आणि संयुक्त अरब अमिराती सरकारचे शिक्षण मंत्रालय यांच्यात शिक्षण क्षेत्रातील सहकार्याबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यास मान्यता दिली आहे.

या सामंजस्य कराराचा उद्देश भारत आणि यूएई सध्या करत असलेले शैक्षणिक सहकार्य अधिक बळकट करणे आणि त्याच्या सहभागाची व्याप्ती वाढवणे हा आहे.

2015 मध्ये यूएई सोबत शिक्षण क्षेत्रातील एक सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती, जो 2018 मध्ये समाप्त झाला होता. 2019 मध्ये, दोन्ही देशांच्या शिक्षण मंत्र्यांमध्ये झालेल्या बैठकीत, यूएईने नवीन सामंजस्य करार करून त्यावर स्वाक्षरी करण्याचा प्रस्ताव पाठविला होता.या नवीन सामंजस्य करारामध्ये भारताच्या शैक्षणिक पद्धतीतील राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 द्वारे केलेले बदल समाविष्ट करण्यात आले आहेत.

या सामंजस्य कराराचा उद्देश शिक्षण माहितीच देवाणघेवाण, तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण (TVET) शिक्षण कर्मचाऱ्यांच्या क्षमतांचा विकास, संयुक्त पदवी आणि दुहेरी पदवी कार्यक्रम आणि अशाच इतर सहमतीच्या क्षेत्रांत कोणत्याही बाबतीत दोन्ही देशांतील उच्च शिक्षण संस्थात शैक्षणिक सहकार्याची सोय करणे हा आहे.

या सामंजस्य करारामुळे परस्परांच्या शैक्षणिक संस्थांच्या पात्रतेची ओळख वाढून आणि माहितीची देवाणघेवाण सुलभ होऊन भारत आणि यूएई मधील सहकार्याला नवसंजीवनी मिळेल तसेच शैक्षणिक गतिशीलता वाढेल. यामध्ये टीव्हीईटी (TVET) मधील सहकार्य देखील समाविष्ट आहे कारण यूएई हे भारतीयांसाठी  काम करण्यासाठी आकर्षित करणारे प्रमुख ठिकाण आहे.

हा सामंजस्य करार स्वाक्षरी केल्याच्या तारखेपासून पाच वर्षांच्या कालावधीसाठी वैध असेल आणि दोन्ही पक्षांच्या संमतीने स्वयंचलितपणे याचे नूतनीकरण करता येईल.स्वाक्षरी झाल्यानंतर, हा सामंजस्य करार 2015 मध्ये यूएई सोबत स्वाक्षरी झालेल्या पूर्वीच्या सामंजस्य कराराची जागा घेईल. तो करार नंतर रद्दबातल ठरेल.

१९५७ कोटीच्या कोची मेट्रो रेल्वे प्रकल्प टप्पा-2 ला मंत्रिमंडळाची मंजुरी

0


नवी दिल्ली, 7 सप्टेंबर 2022

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने, जेएलएन स्टेडियम ते कक्कनड मार्गे इन्फोपार्कपर्यंत कोची मेट्रो रेल्वे प्रकल्प टप्पा-2 च्या 1,957.05 कोटी रुपये खर्चाला मंजूरी दिली. या टप्प्यात 11.17 किलोमीटर लांबीचा मार्ग आणि 11 स्थानके उभारली जाणार आहेत. बंदर विमानतळ रस्त्याच्या रस्ता रुंदीकरणासह टप्पा-2 ची पूर्वतयारीची कामे वेगाने सुरू आहेत.

कोची मधील अलुवा ते पेट्टा पर्यंतचा टप्पा-I 25.6 किमी लांबीचा असून 22 स्थानकांसह 5181.79 कोटी रुपये खर्च यास आला आहे. तो पूर्णतः कार्यान्वित आहे.

पेट्टा ते एसएन जंक्शन दरम्यानचा 1.80 किमी लांबीचा कोची मेट्रो टप्पा 1ए प्रकल्पाला 710.93 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. हा प्रकल्प राज्यातील प्रकल्प म्हणून राबवण्यात येत आहे. सध्या प्रकल्पाशी संबंधित सर्व बांधकामे संपली असून प्रकल्प उद्घाटनासाठी सज्ज आहे.

एसएन जंक्शन ते त्रिपुनिथुरा टर्मिनल पर्यंत 1.20 किमीचा कोची मेट्रो टप्पा 1बी प्रकल्प राज्यातील प्रकल्प म्हणून बांधकामाधीन आहे.

निधी नमुना:

S.No.SourceAmount (in Crore)% Contribution
1.GoI Equity274.9016.23%
2.GoK Equity274.9016.23%
3.GoI Subordinate Debt for 50% of Central Taxes63.853.77%
4.GoK Subordinate Debt for 50% of Central Taxes63.853.77%
5.Loan from Bilateral/Multilateral agencies1016.2460.00%
6.Total Cost excluding Land, R&R and PPP Components1693.74100.00%
7.GoK Subordinate Debt for Land including R&R cost82.68 
8.State Taxes to be borne by GoK94.19 
9.Interest during Construction (IDC) for loan and front end fees to be borne by GoK39.56 
10.PPP Components (AFC)46.88 
11.Total Completion Cost1957.05 

पार्श्वभूमी:

कोची हे केरळ राज्यातील सर्वात दाट लोकवस्तीचे शहर असून विस्तारित महानगराचा भाग आहे. हा केरळमधील सर्वात मोठा शहरी भाग आहे. कोची महानगर क्षेत्राची लोकसंख्या 2013 मध्ये सुमारे 20.8 लक्ष, 2021 मध्ये 25.8 लक्ष होती तर 2031 पर्यंत 33.12 लक्ष असण्याचा अंदाज आहे.

१२ सप्टेंबरला प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा

0

पुणे दि.७: कौशल्य विकास व उद्योजकता विभागाकडून १२ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी १० वाजता औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंध पुणे येथे प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजना ही कुशल कारागिर घडविणारी योजना आहे. देशपातळीवरील आय. टी. आय. उत्तीर्ण व इच्छुक उमेदवारांसाठी जिल्हास्तरीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा आयोजीत करण्यात आला असल्याने, या मेळाव्यास आय. टी. आय उत्तीर्ण उमेदवारांनी उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा. आस्थापनांनी भरती मेळाव्याकरीता https://www.apprenticeshipindia.gov.in >> Apprenticeship Mela किंवा https://dgt.gov.in/appmela2022 या लिंकवर नोंदणी करावी, असे आवाहन सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार (तां) यशवंत कांबळे, विकास टेके, तसेच मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे अंशकालीन प्राचार्य बी. आर. शिंपले यांनी केले आहे.

स्त्रीच्या अंतरंगातील भावविश्व आणि मंगळागौरीच्या खेळाने मने प्रफ़ुलीत

0

पुणे – ३४ व्या पुणे फेस्टिवलमध्ये यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे आज दुपारी *अंतरंग-ती  च्या प्रतिभेचे* हा तिच्या विविध रूपांचा व स्त्रीच्या अंतरंगातील भाव विश्वाला गायन, वादन आणि नृत्याच्या माध्यमातून उलगडणारा कार्यक्रम प्रेक्षकांची मन जिंकून गेला. तसेच ‘जिम पोरी झिम’ एक पारंपरिक सण, ‘खेळ मंगळागौरीचे’ सादर झाले.  अवीट गोडीच्या गीतांचे लाइव्ह सादरीकरण सोबत पुण्यातील ५० महिला कलाकारांचा संच आपल्या पारंपारिक वेशभूषेत होता. त्याच्या साथीला प्रतिथयश गायिकांचा – वाद्यवृंदा होता.

रत्ना दहिवेलकर व अर्चना नार्वेकर यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले होते. अजित कुमठेकर याचे मुख्य समन्वयक होते. एलिना इव्हेंट्स आणि मानिनी मंगळागौर ग्रुप यांनी हा कार्यक्रम सादर केला आहे. याचे प्रायोजक सोन रूपम, चैतन्य पराठा आणि गोखले किचन, अस्मि मोबाइल व माई मसाले हे होते.

लहान कन्या हळूहळू मोठी होत जाते व लग्नानंतर सासरी जाते याचे कल्पक चित्रण संगीत व नृत्यातून सादर करण्यात आले.

‘गाये लता’ कार्यक्रमास प्रेक्षकांची मोठी पसंती

0

पुणे – 34 व्या पुणे फेस्टिवलमध्ये भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहणाऱ्या “गाये लता” या यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे झालेल्या कार्यक्रमास प्रेक्षकांनी मोठी पसंती दिली. पुण्यातील २० नामवंत गायिकानी स्व. लता दिदिंची अजरामर हिंदी चित्रपट गीते सादर केली. त्या बरोबर काही प्रसिद्ध बंगाली व राजस्थानी गीतेहि यात समाविष्ट होती.

संत ज्ञानेश्वरांनी रचलेल्या व दीदींनी गायलेल्या काही रचनाहि या सर्व गायिकानी सादर केल्या.  त्या बरोबर साधना नृत्यालयाच्या नृत्यांगननी नृत्ये सादर केली. विशेष आकर्षण म्हणजे ‘आकृती’ गृपच्या चित्रकार महिला उर्मिला दुरगुडे, अनिता देशपांडे, वैश्णवी दामकोंडेवार यांनी लतादिदिंची विविध माध्यमातून चित्रे काढली. अहमदनगरचे सुप्रसिद्ध शिल्पकार व चित्रकार प्रमोद कांबळे यांनी त्यांच्या  चित्रांतून दिदिंना श्रद्धांजली वाहिली.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शामकांत बा. देवरे* सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ आणि उपसंचालक राज्य मराठी विकास संस्था महाराष्ट्र राज्य उपस्थित होते. याची संकल्पना व निवेदन अनुराधा भारती यांनी केले. संगीत, नृत्य व चित्रकला अशा तिन्ही माध्यमातून गानस्वरस्वती यांना स्वर सुमनांजली अर्पण करण्यात आली. व्होईस ऑफ पुणे फेस्टिवलच्या गतविजेत्या गायकांनी यात सहभाग घेतला होता. कार्यक्रमास प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती.

डॉ. श्रीपती शास्त्री संशोधन केंद्राचे उद्घटान

0

पुणे, ता. ७ : खर्‍या इतिहासाची ओळख, भारतीय परंपरांचा अभिमान बाळगणे आणि वैचारिक गुलामगिरीतून मुक्तता हे परिवर्तनाचे सूत्र असल्याचे मत खासदार प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.

डॉ. श्रीपती शास्त्री ‘रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्ससेस’ या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न संशोधन केंद्राच्या कार्यालयाचे सहकारनगर येथे उद्घटान करताना जावडेकर बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष नितीन देशपांडे, सचिव डॉ. शरद खरे, सहसचिव अविनाश नाईक, संचालक बाबासाहेब शिंदे, सागर नेवसे, सुधीर गाडे, डीईएसचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, काशिनाथ देवधर, हरी मिरासदार, थॉमस डाबरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

जावडेकर पुढे म्हणाले, ‘‘सध्या दोन ‘नरेटिव्ह’मध्ये स्पर्धा सुरू आहे. ब्रिटिश व मुघल मानसिकतेतून घडवलेला नरेटिव्ह संपवून राष्ट्र प्रथम माणणारा संवाद चालला पाहिजे. त्यासाठी खरा इतिहास सांगण्याची आवश्यकता आहे. खरा इतिहास सांगण्यासाठी संशोधन होणे आवश्यक आहे.’’
डॉ. शरद खरे यांनी प्रास्ताविक, काशिनाथ देवधर यांनी स्वागत, नितिन देशपांडे यांनी परिचय, अविनाश नाईक यांनी सूत्र संचालन आणि आभार प्रदर्शन केले.

पाषाण -सूस सेवा रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करा,सूसमधील गार्बेज प्लांटची भिंत आत घेऊन वाहतूक कोंडी सोडवा

0

मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना

पुणे- सूस खिंडीतील गार्बेज प्लांटची भिंत आत घेऊन वाहतूक कोंडी सोडवा, तसेच सेवा रस्ता जलदगतीने पूर्ण करा, तसेच पाषाण सूस उड्डाणपुलासाठी अधिग्रहण केलेल्या जागेचा मोबदला तातडीने आदा करा, आदी सूचना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

पाषाण -सूस मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या सूस खिंड उड्डाणपुलाची पाहाणी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज करुन आढावा घेतला. तसेच स्थानिक नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या.

यावेळी महापालिका अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, राजेंद्र मुठे, वाहतूक शाखेचे श्रीनिवास बोनाला राष्ट्रीय महामार्गाचे संजय कदम, अधिकारी, स्थानिक नगरसेवक अमोल बालवडकर, ज्योती कळमकर, भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, पुणे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर यांच्या सह भाजपाचे सर्व पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

पाषाण -सूस मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेच्या वतीने सूस खिंड उड्डाणपुलाची उभारणी करण्यात येत असून, या उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वास येत असले, तरी सेवा रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण आहे. त्यासोबतच सूस भागातील गार्बेज प्लांटच्या भिंतीमुळे वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे आज नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी सदर उड्डाणपुलाची पाहाणी केली. यावेळी स्थानिक नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत नामदार पाटील यांना अवगत केले.

यावर नामदार पाटील यांनी नागरिकांच्या अडचणी तातडीने दूर करुन; त्यांचे जीवन सुसह्य करण्याच्या सूचना यावेळी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या. यात प्रामुख्याने सेवा रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करणे, तसेच गार्बेज प्लांटची भिंत मागे घेऊन रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवणे, त्याचप्रमाणे उड्डाणपुलासाठी अधिग्रहित केलेल्या जमीन मालकांना त्याचा मोबदला तातडीने आदा करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

मुख्यमंत्र्यांनी पुण्यातील गणेश भेटी बरोबर घेतली अभिनेता नाना पाटेकरांची गळाभेट

0

मुख्यमंत्र्यांची पुण्यातील मानाच्या गणपतींसह इतर गणेश मंडळांना भेट

राज्यातील जनतेला सुखसमृद्धी, समाधान लाभू दे-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे साकडे

पुणे दि.७: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील मानाच्या गणपतींसह विविध गणेश मंडळांना भेट देऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले. राज्यातील जनतेच्या आयुष्यात सुखसमृद्धी आणि समाधान लाभू दे, शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद फुलू दे असे साकडे त्यांनी श्री गणरायाला घातले.तसेच त्यांनी अभिनेता नाना पाटेकर यांच्या डोणजे येथील निवासस्थानी भेट देऊन गणपतीचे दर्शन घेतले. याप्रसंगी श्री. पाटेकर यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत व सत्कार केला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी वृक्षारोपण करण्यात आले.. यावेळी नाना पाटेकर यांच्यासोबत विविध विषयांवर गप्पाही रंगल्या असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते श्री कसबा गणपतीची आरती केली. त्वष्टा कासार समाज संस्था गणेश मंडळ, बुधवार पेठ येथील अशोक मंडळ ट्रस्ट, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशोत्सव मंडळ, महात्मा फुले मंडई येथील अखिल मंडई गणेशोत्सव मंडळ, तुळशी बाग येथील तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, लक्ष्मी मार्ग येथील गुरुजी तालीम मंडळ, केसरीवाडा येथील लोकमान्य टिळक वाडा गणेशोत्सव मंडळ, सदाशिव पेठ येथील छत्रपती राजाराम मंडळ, नवी पेठ येथील यशवंत नगर गणेशोत्सव मंडळ, कोथरुड येथील श्री साई मित्र मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचा मंडळांच्यावतीने सत्कार करण्यात आला.

श्री राजाराम मंडळाच्या बाप्पाला भेट दिली असता त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्र्यांना माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्या हस्ते वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांचे राजमुद्रेच्या आकारातील चित्र भेट दिले.

केसरीवाडा येथे गणेशदर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आमदार मुक्ता टिळक यांची भेट घेतली. त्यावेळी श्रीमती टिळक यांनी गणेशोत्सवाच्या जुन्या आठवणी मुख्यमंत्र्यांना सांगितल्या.

गणेश मंडळांना भेटी व दर्शनाच्या प्रसंगी आरोग्य मंत्री तानाजी सावंत, खासदार श्रीरंग बारणे, माजी मंत्री विजय शिवतारे, मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी आदी उपस्थित होते.

निर्बंधमुक्त गणेशोत्सव; भाविकांच्या उत्साहाला उधाण

कोरोनाच्या साथीमुळे २०२० पासून दोन वर्षे निर्बंधांमुळे गणेशोत्सव साजरा करण्यावर मर्यादा आल्या होत्या. यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान शासनाने निर्बंध दूर केल्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. सर्व गणेशमंडळांनी कल्पकतेने देखावे साकारले आहेत. हे देखावे पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने बाहेर पडत असून भाविकांच्या उत्साहाला उधाण आले आहे, असेही श्री.शिंदे यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे गणेश मंडळांना भेटी देऊन दर्शन घेत असताना नागरिकही श्री. शिंदे यांना भेटण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा उभे होते. मुख्यमंत्र्यांनीही गाडीतून बाहेर येत त्यांची भेट घेतली.


महिलांसाठीच्या लावणीने केला गजहब

0

                                                                                                        

पुणे – 34 व्या पुणे फेस्टिवलमध्ये यंदा खास महिलांसाठीच्या ‘तुझ्यात जीव रंगला’ या बालगंधर्व रंगमंदिर येथे झालेल्या लावणी कार्यक्रमाने रसिक महिलांची मने तृप्त केली. यामध्ये अर्चना जावळेकर, प्राची मुंबईकर,  संगीता लाखे,  किरण पुणेकर आणि नमिता पाटील या लोककलावंत नृत्यांगनानी  सहकार्यांसमवेत सर्वांना मंत्रमुग्ध केले.

प्रारंभी ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, सौ. मीरा कलमाडी, महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दीपप्रज्वलन केले. शशी कोठावळे हे याचे निर्माते आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी यांचा सत्कार यावेळी पैठणी व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. सौ. मीरा कलमाडी आणि महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. तसेच सिंहगड इंस्टीट्यूट सुगंधा नवले, बाल हक्क आयोगाच्या सदस्या जयश्री पालवे, उद्योगिका रोटरीअन मंजुषा फडके विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होत्या. संयोगिता कुदळे व दिपाली पांढरे यांनी याचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमात “तुझ्या उसाला लागल कोल्हा..”, “वाजले की बारा…”, “बुगडी माझी सांडली ग……”, “बाई वाड्यावर या…”, “रात रंगी राती रंगुनी चंद्रा…..”, अशा अनेक ठसकेबाज लावण्यांनी जोरदार टाळ्या व शिट्या मिळवल्या. महिलां प्रक्षालांमध्ये येवून या नृत्याग्नांनी सभागृहात जोश भरला.

“पुण्याचे नाव जगाच्या नकाशावर जावे यासाठी खा. सुरेश कलमाडी यांनी १९८९ मध्ये पुणे फेस्टिवल सुरु केला, त्या पहिल्या वर्षापासून माझा पुणे फेस्टिव्हलमध्ये सहभाग आहे असे सांगून ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी यांनी “पुणे फेस्टिव्हलच्या लावणी मंचावर झालेला सत्कार हा मी सर्वोच्च बहुमान मानते, असे नमूद केले.

रुपाली चाकणकर यांनी लीला गांधींचे अभिनंदन करून म्हटले की पुणे फेस्टिव्हलच्या माध्यमातून श्री सुरेश कलमाडी व सौ. मीरा कलमाडी यांनी पुण्याचे नव जगाच्या नकाशावर नेले. कलाकारांना मनाचे स्थान मिळाले. कन्या बचाव हा संदेश मोलाचा आहे असे त्या शेवटी म्हणाल्या.

शेवटी संयोजिका दिपाली पांढरे यांनी आभार प्रदर्शन केले. बालगंधर्व रंगमंदिर रसिक महिलांनी खचाखच भरले होते. पुणे फेस्टिव्हलचे बालगंधर्व रंगमंदिराचे समन्वयक श्रीकांत कांबळे या वेळी उपस्थित होते.  

थेट सरपंचपदांसह ११६६ ग्रामपंचायतींसाठी १३ ऑक्टोबरला मतदान

0

मुंबई : विविध 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 166 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबर 2022 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून 14 ऑक्टोबर 2022 रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली.

श्री. मदान यांनी सांगितले की, संबंधित तहसीलदार 13 सप्टेंबर 2022 रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्र 21 ते 27 सप्टेंबर 2022 या कालावधीत दाखल करण्यात येतील. शनिवार व रविवारच्या सुट्टीमुळे 24 व 25 सप्टेंबर 2022 रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 28 सप्टेंबर 2022 रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान 13 ऑक्टोबर 2022 रोजी  सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल.  नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 14 ऑक्टोबर 2022 रोजी होईल. समर्पित मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात या निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा देय आहेत.

विविध जिल्ह्यांत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हा व तालुकानिहाय संख्या: ठाणे: कल्याण- 7, अंबरनाथ- 1, ठाणे- 5, भिवंडी- 31, मुरबाड- 35, व शहापूर- 79. पालघर: डहाणू- 62, विक्रमगड- 36, जव्हार- 47, वसई- 11, मोखाडा- 22, पालघर- 83, तलासरी- 11 व वाडा- 70. रायगड: अलिबाग- 3, कर्जत- 2, खालापूर- 4, पनवेल- 1, पेण- 1, पोलादपूर- 4, महाड- 1, माणगाव- 3 व श्रीवर्धन- 1. रत्नागिरी: मंडणगड- 2, दापोली- 4, खेड- 7, चिपळूण- 1, गुहागर- 5, संगमेश्वर- 3, रत्नागिरी- 4, लांजा- 15 व राजापूर- 10. सिंधुदुर्ग: दोडामार्ग- 2 व देवगड- 2. नाशिक: इगतपुरी- 5, सुरगाणा- 61, त्र्यंबकेश्वर- 57 व पेठ- 71. नंदुरबार: अक्कलकुवा- 45, अक्राणी- 25, तळोदा- 55 व नवापूर- 81. पुणे: मुळशी- 1 व मावळ- 1. सातारा: जावळी- 5, पाटण- 5 व महाबळेश्वर- 6. कोल्हापूर: भुदरगड- 1, राधानगरी- 1, आजरा- 1 व चंदगड- 1. अमरावती: चिखलदरा- 1. वाशीम: वाशीम- 1. नागपूर: रामटेक- 3, भिवापूर- 6 व कुही- 8. वर्धा: वर्धा- 2 व आर्वी- 7. चंद्रपूर: भद्रावती- 2, चिमूर- 4, मूल- 3, जिवती- 29, कोरपणा- 25, राजुरा- 30 व ब्रह्मपुरी- 1. भंडारा: तुमसर- 1, भंडारा- 16, पवणी- 2 व साकोली- 1. गोंदिया: देवरी- 1, गोरेगाव- 1 गोंदिया- 1, सडक अर्जुनी- 1 व अर्जुनी मोर- 2. गडचिरोली: चामोर्शी- 2, आहेरी- 2, धानोरा- 6, भामरागड- 4, देसाईगंज- 2, आरमोरी-2, एटापल्ली- 2 व गडचिरोली- 1. एकूण- 1,166.

रामोशी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करणार -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

पुणे दि. ७ :  रामोशी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य आयोजित आद्यक्रांतीवीर नरवीर राजे उमाजी नाईक यांच्या २३१ व्या जयंती सोहळा कार्यक्रमात श्री. फडणवीस बोलत होते.  यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार चंद्रकांत बावनकुळे, गोपीचंद पडळकर, संजय जगताप, जयकुमार गोरे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी राज्यमंत्री विजय शिवतरे, जय मल्हार क्रांती संघटनेचे  संस्थापक अध्यक्ष दौलत शितोळे, उपाध्यक्ष अंकुश जाधव आदी उपस्थित होते.

आद्यक्रांतीवीर नरवीर राजे उमाजी नाईक यांना अभिवादन करून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले, स्वराज्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने भारतीय स्वातंत्र्याकरीता ज्यांनी बलिदान दिले त्या नाम- अनाम वीरांचे स्मरण होणे आवश्यक आहे. छत्रपती  शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून स्वातंत्र्य काय असते ते दाखवून दिले. महाराजांचे किल्ले म्हणजे स्वराज्याची संपत्ती होती. त्यांच्यामागे अठरा पगड जातीचे मावळे होते.

शिवाजी महाराजांनंतर इतिहासात इंग्रजांविरुद्ध प्रथम आवाज उठवणारे राजे उमाजी नाईक होते. ते खरे आद्यक्रांतिकारक नव्या स्वराज्याचे राजे होते. स्वराज्याची ज्योत पेटविण्याचे काम उमाजी नाईक यांनी केले. ब्रिटिशांच्या विरोधात तळागाळातील लोकांकडून उठाव घडवून आणण्यात त्यांचे मोठे योगदान होते. राज्यकारभार करतांना त्यांनी सनद निर्माण केली. त्या सनदीतून प्रत्येकाला न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले. ब्रिटिशांना सळो की पळो करणाऱ्या राजे उमाजींना देहदंडाला सामोरे जावे लागले.

महामंडळासाठी १०० कोटी, स्मारकासाठी ५ कोटी देणार

रामोशी आणि इतर भटक्या विमुक्त जातीच्या सर्वांगीण विकासासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात येईल. त्यासाठी १०० कोटी रुपयांची व राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकासाठी ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल.  रामोशी आणि इतर भटक्या व विमुक्त जाती मधील नागरिकांना यापुढे जातीच्या दाखल्यासाठी अडचणी येणार नाहीत यासाठी जातीच्या दाखल्यासंदर्भातील प्रक्रिया सुलभ करण्यात येईल. या समाजाच्या सर्व समस्या निकाली काढण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

यावेळी आमदार श्री. पडळकर यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास जय मल्हार क्रांती संघटनेचे चंद्रकांत खोमणे, रमण खोमणे, तानाजी खोमणे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

यंदा गणेश चतुर्थीला दौंड व सांगलीतील मुलांनी किफायतशीर डिजिटल शिक्षणाचा आनंद घेतला

0

·         सीएससी आणि शुगरबॉक्स नेटवर्क्सच्या भागीदारीने १५ गावांमधील मुलांना इंग्रजी संभाषण कोर्सेस उपलब्ध करवून दिले.

·         टीम शुगरबॉक्सने प्रत्येक घराघरांत जाऊन शिक्षणाच्या उपलब्धतेबाबत माहिती दिली.

पुणेसांगली सप्टेंबर २०२२: बुद्धीची देवता गणपतीबाप्पाचा उत्सव असलेल्या गणेश चतुर्थीला अनुसरून शुगरबॉक्स नेटवर्क्सने पुण्यातील दौंड आणि सांगली जिल्ह्यात मिळून १५ गावांमधील मुलांना  विश्वसनीय व किफायतशीर डिजिटल शिक्षणाची उपलब्धता खुली करवून दिली आहे.  सीएससीच्या सहयोगाने शुगरबॉक्सने या सर्व गावांमधील सीएससी सेंटर्समध्ये आपले पेटंटेड टेक्नॉलॉजी सोल्युशन इन्स्टॉल केले आहे, ज्यामुळे जवळपासच्या मंडपांना डिजिटल कन्टेन्ट उपलब्ध होऊ शकत आहे.

यंदा गणेश चतुर्थीला शुगरबॉक्स नेटवर्क्सने शिक्षणाचा मूलभूत अधिकार मिळवून देण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शिक्षण कन्टेन्ट पुरवणाऱ्यांसोबत सहयोग केला आहे. इंग्रजी संभाषण, के-१२ शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि व्यावसायिक शिक्षण किफायतशीर पद्धतीने देणाऱ्या महत्त्वाच्या अभ्यासक्रमांचा यामध्ये समावेश आहे. शिक्षणाची उपलब्धता वाढवण्यासाठी या कंपनीने सीएससी सेंटर्समधील सर्व्हर उपयोगात आणून मुलांसाठी शिक्षणविषयक कन्टेन्टचे हाय-स्पीड स्ट्रीमिंग व डाऊनलोडिंग उपलब्ध करवून दिले आहे. डाउनलोड केलेला कन्टेन्ट मुले आपापल्या घरी देखील आपल्या सुविधेनुसार पाहू शकतात. या तंत्रज्ञानयुक्त सुविधेमुळे ग्रामीण भारतातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक कन्टेन्टच्या अखंडित उपलब्धतेचा अनुभव मिळवू शकतील.

आधुनिक शिक्षण सुविधा तंत्रज्ञानावर खूप मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतात. इंटरनेट उपलब्ध नसल्याने अधिक चांगले शिक्षण व विकासाच्या शक्यता मिळवून देणे किंवा मिळवणे शक्य होत नाही.  महामारीमुळे ग्रामीण भारतातील मुलांना अजूनच मागे ढकलले आहे, गावांमध्ये पुरेशा प्रमाणात पायाभूत सोयीसुविधा नसल्याने महामारीच्या काळात मुलांचे शिक्षण नीट होऊ शकले नाही.  तंत्रज्ञानाची कमतरता व गावातील प्रत्येक मुलामुलींपर्यंत आधुनिक शिक्षण पोहोचवण्यातील अडचणी लक्षात घेऊन शुगरबॉक्स नेटवर्क्सने या मुलांना डिजिटल जग खुले करवून देण्याचे ठरवले. प्रत्येक क्षेत्रातील मुलांना डिजिटल शिक्षण अत्यावश्यक असल्याचा संदेश यामधून दिला जात आहे. सर्वाधिक वेगाने वाढत असलेले ‘मेड इन इंडिया’  हायपरलोकल क्लाऊड तंत्रज्ञान, शुगरबॉक्स नेटवर्क्स आपल्या ग्राहकांना डिजिटल माहिती व सेवांची उपलब्धता खुली करवून देते. सध्या महाराष्ट्र, हरयाणा, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशातील २५० पेक्षा जास्त ग्राम पंचायतींमध्ये या सेवा पुरवल्या जात आहेत.

शुगरबॉक्स नेटवर्क्सचे सीईओ आणि सहसंस्थापक श्रीरोहित परांजपे म्हणाले, “बुद्धी आणि समृद्धीचे वरदान देणाऱ्या गणपतीबाप्पाच्या आगमनाच्या या उत्सवाने आम्हाला सर्वांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्याची संधी दिलीखासकरून आपली गावांमध्ये डिजिटल शिक्षण पोहोचवणे गरजेचे असल्याचे आम्ही या उपक्रमातून जाणवून देऊ शकलो आहोतसीएससी आणि शुगरबॉक्स नेटवर्क्स मिळून या गावांमध्ये मुलांना संवादात्मक शिक्षण सुविधा पुरवण्यासाठी तंत्रज्ञान उपलब्ध करवून देत आहेतआणि अधिक चांगले जीवन जगता यावे यासाठी मजबूत भविष्य निर्माण करण्यासाठी त्यांना सक्षम करत आहेत.  डिजिटल पद्धतीने जोडल्या गेलेल्या जगाच्या अमर्याद शक्यता दर्शवणे आणि डिजिटल सर्वप्रथम जगामध्ये यशस्वी होण्याचा पर्याय उपलब्ध करवून देऊन उद्याच्या पिढ्यांना सक्षम करणे ही आमची यामागची संकल्पना आहे.” 

सोयीसुविधांचा अभाव असलेल्या भागांमध्ये डिजिटली कनेक्टेड राहणे ही एक मूलभूत गरज म्हणून पूर्ण करण्यासाठी शुगरबॉक्स आपले हायपरलोकल एज क्लाऊड तंत्रज्ञान ग्राम पंचायत, सीएससी आणि सरकारी शाळा यासारख्या अधिक लोकसंख्या असलेल्या ठिकाणी इन्स्टॉल करत आहे. नेटवर्क पार्टनर्स आणि डिजिटल ऍप्लिकेशन सेवांसाठी टिकाऊ, पर्यावरणपूरक व लाभदायक अशी इकोसिस्टिम देखील ते निर्माण करत आहेत. सीएससी आणि शुगरबॉक्स नेटवर्क्स मिळून ओटीटी, डी२सी ई-कॉमर्स, डेटासाठी निःशुल्क फिनटेक (ग्राहकांसाठी) यासारख्या कन्टेन्ट व सेवा देऊन एका न्याय्य डिजिटल भविष्याची निर्मिती करत आहेत. एलअँडटी मेट्रो रेल हैदराबाद (एलटीएमआरएचएल), चेन्नई मेट्रो रेल्वे लिमिटेड (सीआरएमएल), सेंट्रल रेल्वेज (मुंबई उपनगरांमधील) मध्ये देखील शुगरबॉक्स आपल्या सेवा पुरवत आहे.  

मुख्यमंत्री पुण्यात अन पुणेकर पावसात ,अन धक्काबुक्की मंडपात (व्हिडीओ)

0

मुख्यमंत्री पुण्यात अन पुणेकर पावसात ….ते हि एक साथ ..इकडे हॉर्न वाजती तिकडे आरतीचे ढोल वाजती ….तर कुठे धक्काबुक्की ही वेगाने चालती ..

पुणे-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सह आणखी काही मान्यवर नेत्यांचे दौरे आज पुण्यात असल्याने आणि त्यात पावसाने अधून मधून रस्त्यावरील वाहन चालकांना झोडपून काढल्याने नेते मंडळीच्या पुणे गणेश दर्शन यात्रेत मोठा गोंधळ उडालेला दिसला . तुम्ही पतंगबाजी करू नका म्हणत फडणवीस माध्यामंना नावे ठेवीत निघून जाण्यात आनंद मानू लागल्याचे आज स्पष्ट झाले तर खुद्द मुख्यमंत्र्यांना मोठ्या खंबीर सुरक्षेची गरज असल्याचे आज स्पष्ट झाले आज १२ मंडळांना भेटी देण्यासाठी मुख्यमंत्री पुण्यात आले . आणि तेव्हा रात्रीसारखाच जोरदार पाउस देखील झाला . लोकमान्य टिळकांनी दिलेल्या निर्णयानुसार मुख्यमंत्र्यांनी पुण्यात आल्यावर मानाचा पहिला गणपती म्हणून कसबा गणपतीचेच दार्शन घेण्याचा कार्यक्रम ठेवल आणि तिथूनच गोंधळला सुरुवात झाली .मुख्यमंत्र्यांचा ताफा इथे येणार म्हणून इथली वाहतूक अगोदरच पोलीसांनी थांबवून ठेवली आणि नंतर मंदिरात गेल्यावर हि ती तशीच पावसात उभी केली गेली पुढे मुख्यमंत्री येथून गेल्यावर डावी बाजू बंद करून सरळ चा मार्ग फक्त पोलिसांनी वाहतुकीस खुला केला तोवर पुणेकरांनी हॉर्न वाजवीत येथे पावसात नाहती , मुख्यमंत्र्यांना पाहती ..चे धोरण स्वीकारले , पुढे दगडूशेठ ला तर कोणीही गेले तरी तेथील एक जन सर्वांच्याच सोबत राहून फोटो व्हिडीओत झळकत असतात अन्य पदाधिकारी त्यामानाने पुढे पुढे करण्यात धन्यता मानत नाहीत . या ठिकाणी मुख्यमंत्र्यांसोबत दिसावे म्हणून जी ढकला ढकली झाली त्यात पत्रकारांसह साऱ्यांना च त्याचा फटका बसला .