Home Blog Page 1621

दिल्लीत 12 सप्टेंबर रोजी रिक्षा टॅक्सी चालक मालकांची राष्ट्रव्यापी परिषद होणार

0
  • आळंदी येथे महाराष्ट्र रिक्षा पंचायतच्या नामफलकाचे उद्धाटन

पिंपरी : प्रतिनिधी

देशातील सर्व टॅक्सी रिक्षा व वाहतूकदार एकत्र आल्याशिवाय त्यांचे प्रश्न व समस्या सुटणार नाहीत. देशव्यापी शिखर संघटन निर्माण होणे गरजेचे आहे. त्यामधून या घटकांचे प्रश्न मार्गी लागतील. यासाठी देशभरात सर्वांनी साथ द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष कष्टकरी नेते बाबा कांबळे यांनी केले.

आळंदी देवाची येथे महाराष्ट्र रिक्षा पंचायतीच्या फलकाचे उद्धाटन बाबा कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात दिल्ली येथे रिक्षा, टॅक्सी, चालक मालकांची राष्ट्रव्यापी परिषद 12 सप्टेंबर रोजी होणार आहे. या परिषदेला देशभरातून विविध संघटना, रिक्षा, टॅक्सी चालक मालक उपस्थित राहणार असल्याचेही बाबा कांबळे यांनी सांगितले.सकाळी 11 वाजता, महात्मा गांधी स्मृती सभागृह,दर्शन स्मृती ट्रस्ट राजघाट समोर नवी दिल्ली येथे ही परिषद होईल.

या परिषदेला महाराष्ट्रातील नरेंद्र गायकवाड, नांदेड मराठवाडा गफार भाई नदाफ, सातारा कराड पश्चिम महाराष्ट्र आनंद चावरे, नागपूर, विदर्भ शिवाजी गोरे, ठाणे कल्याण डोंबिवली, मुंबई ग्रामीण व कोकण विभाग कासम मुलांनी, नवी मुंबई, कोकण रिझल्ट जावेद देऊळकर मुंबईप्रदेश, यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील मोठ्या संख्येने रिक्षा चालक-मालकांचे सर्व संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

देशभरात रिक्षा, टॅक्सी चालकांची संख्या तीन कोटी पेक्षा अधिक आहे. 24 कोटी पेक्षा अधिक वाहतूकदार ड्रायव्हर आहेत. माठी संख्या असलेल्या या घटकांसाठी केंद्र स्तरावर पुरेशा सुविधा, सामाजिक सुरक्षा, निवृत्तीवेतन, आरोग्य विमा आदी सुविधा दिल्या जात नाही. प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळे कायदे आहेत. केंद्रीय कायद्याच्या आधारित राज्यातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये कायदा केला जातो. परंतु केंद्रीय वाहतूक कायद्याची सर्वत्र राज्यांमध्ये अंमलबजावणी केली जाते.

देशांमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या रिक्षा, टॅक्सी व वाहतूक धारकांसाठी देशपातळीवरती सर्व संघटनांनी एकत्र येऊन शिखर संघटना स्थापन करण्याच्या हेतूने ही परिषद आयोजित केली आहे. या परिषदेमध्ये महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू, पंजाबसह देशभरातील रिक्षा टॅक्सी व वाहतूकदार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो म्हणून बाबा कांबळे यांचा फोटो व्हायरल झाला होता. महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबाजी कांबळे यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथे ही परिषद आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती राष्ट्रीय निमंत्रक राजेंद्र सोनी दिल्ली यांनी दिली देशभरामध्ये वेगवेगळ्या ऑटो रिक्षा संघटना आहेत. वाहतूकदारांच्या संघटना आहेत. परंतु या संघटना आतापर्यंत देशपातळीवर कधी एकत्र आल्या नाहीत. नुकताच बाबा कांबळे यांचा फोटो मुख्यमंत्र्यांचा फोटो म्हणून व्हायरल झाला. तो फोटो महाराष्ट्राच्या देशभरामध्ये सर्वत्र कौतुकाचा व चर्चेचा विषय ठरला. या फोटोमध्ये रिक्षासमोर उभे असलेले बाबा कांबळे हे खरच रिक्षा चालक होते. ते रात्रभर काम करत आहेत. त्यांचा वायरल झालेला फोटो देशभरात सर्वत्र प्रसारित झाल्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली देशभरामध्ये सर्व संघटना एक होतील, अशी आशा निर्माण झाली आहे. यामुळेच आम्ही ही परिषद आयोजित केली असल्यचे सोनी यांनी सांगितले.

‘टॉर्क मोटर्स’तर्फे ‘पिट क्रू’ सादर – ‘जागतिक ईव्ही दिना’निमित्ताने सेवा व विक्रीचे एक संपूर्ण सोल्यूशन थेट ग्राहकांच्या दारात

0

पुणे९ सप्टेंबर २०२२ : भारतातील पहिली आणि वेगाने वाढणारी इलेक्ट्रिक मोटरसायकल उत्पादक कंपनी असलेल्या ‘टॉर्क मोटर्स’ने ‘पीआयटी क्रू’ ही आपली अनोखी मोबाइल सेवा व्हॅन सादर केली आहे. शाश्वत ई-मोबिलिटी साजरी करण्याच्या आजच्या जागतिक ईव्ही दिनानिमित्त ‘टॉर्क’तर्फे ‘पीआयटी क्रू’ सादर करण्याच आला आहे. क्रूची ही व्हॅन ग्राहकांच्या दारात जाऊन त्यांना विक्री आणि विक्रीपश्चात सेवा पुरविणार आहे. ‘पीआयटी क्रू’ हा या ब्रँडच्या ‘एक्सपीरियंस टॉर्क इनिशिएटिव्ह’चा एक भाग आहे. ‘टॉर्क’ मोटरसायकलच्या मालकीचा अनोखा आनंद देणारा हा एक उपक्रम आहे.

या ब्रँडच्या मोटरस्पोर्ट्समधील वारशापासून प्रेरणा घेऊन, ‘क्राटोस’च्या मालकांना सहजता, सोयीस्करपणा आणि मनःशांती देण्याच्या एकमेव उद्देशाने ‘पीआयटी क्रू’ची रचना करण्यात आली आहे. सध्या पुण्यात कार्यरत असणाऱ्या ‘पीआयटी क्रू’ची ही व्हॅन एक कॉम्पॅक्ट शोरूम आणि सर्व्हिस सेंटर म्हणून काम करील. ग्राहकांकडील मोटारसायकलची नियमित देखभाल करण्याची क्षमतादेखील तिच्यात निर्माण करण्यात आली आहे.

‘पीआयटी क्रू’विषयी माहिती देताना ‘टॉर्क मोटर्स’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कपिल शेळके म्हणाले, “यंदाच्या जागतिक ईव्ही दिनानिमित्त आमच्या ग्राहकांसाठी हा स्मार्टपणे डिझाइन केलेला सेवा उपक्रम आणताना आम्हाला आनंद होत आहे. ग्राहकांचे समाधान हा नेहमीच ‘टॉर्क मोटर्स’मध्ये प्राधान्याचा विषय असतो आणि ‘पीआयटी क्रू’ची रचनादेखील याच उद्देशाने करण्यात आली आहे. या उपक्रमातून आम्ही दूरच्या भागात असलेल्या आमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचू आणि नेहमी घाईत असलेल्या शहरी ग्राहकांसाठी एक सोयीस्कर उपाय देऊ, याची आम्हाला खात्री आहे. आमच्या ग्राहकांना एक शाश्वत स्वरुपाची विद्युत वाहनाची परिसंस्था उपलब्ध करून देण्याचे आमचे प्रयत्न आहेत.”

“याशिवाय, भारतभरातील आमच्या येऊ घातलेल्या वितरक भागीदारांसाठी ग्राहकांशी संपर्क साधणारा ‘पीआयटी क्रू ‘हा पहिला बहुउद्देशीय टच पॉइंट असेल. त्यांची शोरूम तयार होत असताना ते या माध्यमातून आपला व्यवसाय सुरू करू शकतात. या विशिष्ट बिझनेस मॉडेलमधून आम्ही आमचे सेवा नेटवर्क वाढवण्याचा, तसेच शहरांमध्ये आमची पोहोच वाढविण्याचा विचार करीत आहोत,” असेही शेळके यांनी सांगितले.

‘टॉर्क मोटर्स’च्या एक ‘पीआयटी क्रू व्हॅन’मधून एकाच वेळी तीन मोटरसायकलींची डिलिव्हरी करता येऊ शकते. तात्काळ आणि अगदी शेवटच्या क्षणातील वाहनाच्या देखभालीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी या व्हॅनमध्ये सर्व आवश्यक साधने, सुटे भाग आणि इतर वस्तू उपलब्ध असणार आहेत.

जीपीएस आणि वायफाय या सुविधा असलेली ही व्हॅन ‘थर्मली इन्सुलेटेड’ आहे. त्यामुळे तिच्या आतमध्ये तपमानाची पातळी कमी राखता येते. सॉफ्टवेअरमधील कोणतीही त्रुटी शोधण्यासाठी आणि सर्व्हिसिंग करताना मोटरसायकलसाठी आवश्यक अपडेट्स देण्यासाठी ही ‘हाय-टेक व्हॅन’देखील ‘क्लाउड’शी कनेक्टेड आहे. ‘रेसट्रॅक पिट क्रू’च्या अनुभवानुसार ही रचना आहे. ५.४ केडब्ल्यूएच बॅटरी आणि ४००० वॅटचा इन्व्हर्टर यांनी ही व्हॅन सुसज्ज आहे. मोटरसायकलींच्या ‘ऑन-द-स्पॉट चार्जिंग’साठी या व्हॅनमध्ये ७०० वॅटचे दोन चार्जर बसविण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त, मोटारसायकलींची ‘ड्राय क्लीनिंग’ आणि ‘पॉलिशिंग’ या व्हॅनमध्ये केले जाऊ शकते. व्हॅनमधील जागेची त्या दृष्टीने विभागणी करण्यात आली असून कार्यालयील कामकाज आणि सर्व्हिसिंगची कामे ही या जागेत केली जाऊ शकतात.

या आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत बंगळुरू, हैदराबाद, मुंबई आणि अहमदाबाद येथे ‘पीआयटी क्रू’ सादर करण्याचा ‘टॉर्क मोटर्स’चा विचार आहे.

‘टॉर्क मोटर्स’ने या वर्षाच्या सुरुवातीला ‘क्रॅटोस®’ आणि ‘क्रॅटोस®-आर’ ही आपली प्रमुख उत्पादने सादर केली. तेव्हापासूनच कंपनीला तिच्या या स्वदेशी बनावटीच्या इलेक्ट्रिक मोटरसायकलला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. असंख्य ग्राहकांनी या मोटरसायकलींसाठी बुकिंग केले आहे. कंपनीने अनोख्या ‘१:१८ स्केल बॉक्स’प्रमाणे ग्राहकांना मोटारसायकली वितरीत करण्यास सुरुवात केली आहे. बालपणीच्या आठवणींना यातून उजाळा मिळतो आणि त्या आठवणी येथे उपयोगी पडतात.

20 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी सात वर्षीय मुलाचा खून

0

पिंपरी- येथील मासूळकर कॉलनीमधून बेपत्ता झालेल्या सात वर्षीय आदित्य याचा 20 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी खून झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना अवघ्या 29 तासात गजाआड केले आहे.मंथन किरण भोसले (वय 20 रा, मासुळकर कॉलनी), अनिकेत श्रीकृष्ण समदर (वय 21 घरकुल चिखली) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मंथन भोसले हा आदित्य राहत होता त्याच सोसायटीमध्ये राहत होता. तो सतत सोसायटीमधल्या नागरिकांना व त्यांच्या मुलांना विनाकारण त्रास देत होता. यावरून आदित्यचे वडील गजानन ओगले यांनी त्याला बऱ्याच वेळा जाब विचारला होता.

त्यामुळे मंथन व ओगले कुटुंबात यामुळे वाद झाले होते व याची चर्चा सोसायटीत झाली होता. याचाच राग मनात धरून त्याने अगदी शिताफीने त्याचा साथीदार अनिकेत याच्या सोबत संगनमत करून गुरुवारी (दि.8) संध्याकाळी बिल्डींगखाली खेळायला आलेल्या आदित्यला अपहरणासाठी मंथन याने त्याच्या कारमध्ये ओढले. यावेळी आदित्य याने आरडाओरड सुरु केली. त्याचा आवाज बंद कऱण्यासाठी आरोपीने त्याचे तोंड व नाक दाबून त्याला जीवे ठार मारले.

दरम्यान, गजानन यांनी आपला मुलगा सापडत नसल्याने पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनीही निर्जन जागांचा तातडीने शोध सुरु केला. यावेळी गजानन यांच्या मोबाईलवर अज्ञात क्रमांकावरून 20 कोटी रुपयांची मागणी करणारा एसएमएस आला.

पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे माहिती काढली, तर तो फोन क्रमांक उत्तरप्रदेश येथील असल्याचे समोर आले. त्यानुसार तपास सुरु असताना आरोपीने चिखली येथील एका बिगारी काम करणाऱ्या कामगाराच्या फोनचा वापर केल्याचे समोर आले. यावेळी पोलिसांच्या सायबर टिमने अथक प्रयत्नानंतर मंथन याच्यापर्यंतचा पुराव्याचा धागा शोधून काढला.

मंथन हा आदित्यच्या सोसायटीत राहत असून त्याबाबत सोसायटीधारकांनी अनेक तक्रारी असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी मंथनला ताब्यात घेऊन त्याला पोलीसी खाक्या दाखवताच त्याने सत्यता सांगितली. त्याने सांगितले, कि आदित्यचा मृत्यू झाला असून त्याला पोत्यात भरून एमआयडीसी भोसरी परिसरातील एका पडीक बिल्डींगच्या टेरेसवर नेऊन टाकल्याचे सांगितले.

पोलिसांनी त्यानुसार शुक्रवारी (दि.9) रात्री आदित्यचा मृतदेह ताब्यात घेतला. मात्र, रागातून आदित्यचे अपहरण केले होते, तर खंडणी का मागितली व खंडणी मागूनही आदित्यला आरोपींनी जिवानिशी का मारले? याचा उलगडा अद्याप झालेला नाही. याचा पुढील तपास गुन्हे शाखा युनिट दोन हे करत आहेत.

आदित्य याचे वडील गजानन ओगले हे बांधकाम व्यावसायिक असून तीन मुलीनंतर त्यांना आदित्य हा मुलगा झाला होता. त्यामुळे धाकटा आदित्य घरात सर्वांचाच लाडका होता. मात्र, या अनपेक्षितपणे घडलेल्या दुःखद घटनेमुळे ओगले परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या तपासाचा उलगडा सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. प्रशांत अमृतकर, सहाय्यक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एक, युनिट दोन, गुंडा विरोधी पथक, अनैतिक मानवी प्रतिबंधक सेल व इतर गुन्हे शाखेचे अधिकारी, अमंलदार तसेच पिंपरी पोलीस ठाण्याचे अधिकारी यांनी केले.सर्वात महत्त्वाची कामगिरी सायबर सेलचे सहायक पोलीस निरीक्षक पानमंद, अंमलदार प्रशांत सईद व शाम बाबा यांनी केली. जेणेकरून गुन्हा एका दिवसात उघडकीस आला.

अदार पूनावाला यांच्या नावाने बनावट मेसेज पाठवून त्यांच्याच सीरम इन्स्टिट्यूटलाच एक काेटींचा गंडा

0

पुणे- पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख अदार पूनावाला यांच्या मोबाईल नंबरवरून बनावट व्हॉटसअ‌ॅप मेसेज पाठवून विविध खात्यात पैसे पाठविण्यास सांगून तब्बल एक कोटी एक लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.बंडगार्डन पोलिस ठाण्यात याप्रकरणी आयपीसी 4119, 420, 34 सह आयटी अॅक्ट 66 सी व डी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीरम इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे फायनान्स मॅनेजर सागर कित्तूर यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात फिर्याद दाखल केली आहे. हा सर्व फसवणुकीचा प्रकार सात व आठ सप्टेंबर या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने घडला आहे. सीरम कंपनीचे सीईओ पदावर अदार पूनावाला काम करत असून कंपनीच्या संचालक पदावर सतीश देशपांडे हे काम करत आहे. देशपांडे यांच्या मोबाईलवर कंपनीचे सीईओ अदार पूनावाला यांच्या मोबाईल क्रमांकावरून व्हॉट्सअॅप मेसेज आला. त्या मेसेज मध्ये काही बँक खाती नंबर देण्यात आलेली होती. या नंबरवर तात्काळ पैसे पाठविण्यास सांगण्यात आले होते.

कंपनीचे मालकांचा मेसेज आल्याने व त्यांनी तातडीने पैसे भरण्यास सांगितल्याने देशपांडे यांनी याबाबतची माहिती कंपनीचे फायनान्स मॅनेजर सागर कित्तूर यांना दिली. त्यानुसार कित्तुर यांनी बनावट मेसेजद्वारे आलेल्या विविध बँक खात्यावर एक कोटी एक लाख एक हजार रुपये भरले.मात्र, त्यानंतर याबाबत कित्तुर यांनी कंपनीत चर्चा केल्यानंतर, अदार पुनावाला यांनी अशाप्रकारे विविध बँक खात्यावर पैसे भरण्यास कोणत्याही मेसेज केलेला नव्हता ही बाब उघडकीस आली. त्यामुळे आपली ऑनलाइन फसवणूक झाल्याचे कंपनीच्या लक्षात येताच याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे ठरेल. त्यानुसार कंपनीचे फायनान्स मॅनेजर सागर कित्तुर यांनी याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. बंडगार्डन पोलिस याबाबत पुढील तपास करत आहे.

पुण्यात विमानतळावर एक किलोची सोन्याची बिस्किटे जप्त

0

पुणे-दुबईहून लोहगाव (पुणे ) विमानतळावर स्पाईस जेटच्या विमानातून आलेल्या एका प्रवाशाने एक किलाे 166 ग्रॅम वजनाची साेन्याची दहा बिस्कीटे पुण्यातील लाेहगाव विमानतळावर कस्टम विभागाच्या पथकाने जप्त केली आहे. प्रवाशांच्या सिटखाली एका काळया रंगाच्या प्लास्टिकच्या एका पिशवीत ही साेन्याची दहा बिस्किटे मिळून आल्याची माहिती पुणे कस्टम विभागाने दिली आहे.याबाबत कस्टम विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबईहून स्पाईस जेटचे एसजी-52हे विमान दाखल झाले हाेते. सदर विमान पुढे देशांतर्गत वाहतूकीसाठी रवाना हाेणार हाेते. परंतु त्यापूर्वी विमानाची सीमा शुल्क विभागाकडून नियमितपणे सखाेल तपासणी करण्यात येत हाेती.त्यावेळी विमानात एका प्रवाशांच्या सिटखाली काळया रंगाच्या प्लास्टिकच्या एका पिशवीत दहा साेन्याची बिस्कीटे कस्टम विभागाच्या पथकास मिळून आली आ​​​​​​​हे. कस्टम विभागाच्या पथकाने सदर साेने सीमाशुल्क कायदा 1962 नुसार जप्त केले असून त्याबाबत अधिक तपास करण्यात येत आ​​​​​​​हे. बाजारभावानुसार सदर एक किलाे 166 ग्रॅम वजनाच्या दहा बिस्कीटांची किंमत 61 लाख 70 हजार रुपये आहे. नेमके हे साेने तस्करी करुन काेणी आणले हाेते आणि ते काेणाला व कशाप्रकारे दिले जाणार हाेते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत सदर विमानातून आलेल्या प्रवाशांकडे कस्टम विभागाचे अधिकारी चाैकशी करत आहे.मागील महिन्यात ही अशाचप्रकारे साेने तस्करीच्या दाेन घटना पुणे विमानतळावर निष्पन्न झाल्या हाेत्या. एअर इंटेलिजन्स युनिटचा अधिकारी असल्याचे सांगत एका प्रवाशाने त्याच्या बुटात 30 लाख 45 हजार रुपये किंमतीचे 650 ग्रॅम वजनाचे साेने पेस्ट स्वरुपात आ​​​​​​​णले हाेते. तर दुसऱ्या प्रवाशाने पुणे ते दुबई प्रवासासाठी जाताना 32 लाख रुपयांचे विदेशी चलन पुण्यातून घेऊन जात असताना त्यास पकडण्यात आले हाेते. याबाबत अधिक तपास पुणे सीमा शुल्क विभागाचे पथक करत आहे.

एका माजी नगरसेवकाच्या मंडळाच्या हटवादी भूमिकेने संतापले पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता

0

पुणे : एका जागेवर बराच अवधी उभे राहून हलण्याचे नाव न घेणाऱ्या,आणि डीजे चा दणणाट न थांबविणाऱ्या एका माजी नगरसेवकाच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांवर पुण्याचे शांत म्हणून समजले जाणारे पोलीस आयुक्त संतापले आणि त्यांना दरडावले विशेष म्हणजे यावेळी पुरुष कार्यकर्ते शांत झाल्याचे दिसले परंतु एक महिला कार्यकर्ती मात्र त्यांच्या संतापावर हसताना दिसत होती.काळ सकाळी सात वाजताच पोलीस आयुक्त विसर्जनाच्या बंदोबस्तासाठी रस्त्यावर आले ते सातत्याने मंडई तेअलका चौक या मार्गावर स्वतः फिरत कुठे उभे राहून पुण्याच्या मिरवणुकी वर लक्ष ठेऊन होते.त्यांच्या चांगुलपणाचा फायदा घेतल्याचे स्पष्ट दिसून आले.

पुण्यात २२ तास उलटल्यानंतरही अद्याप गणपती विसर्जन मिरवणूक सुरु आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाकडून विसर्जन मिरवणूक लवकर संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. याच दरम्यान शुक्रवारी रात्री विसर्जन मिरवणुकीमध्ये काहीसा गोंधळ पाहायला मिळाला.यावेळी नेहमी हसतमुख असणारे पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता माजी नगरसेवक आणि महापालिका अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले त्यांचे मंडळ कुमठेकर रस्त्यावरून बराच काळ जागेवरून हलले नाही. त्यामुळे दोन तास पाठीमागील मंडळे पुढे जाऊ शकली नाहीत. पाठीमागील मंडळांनी आणि पोलिस प्रशासनाने वारंवार विनंती करूनही मंडळ ऐकत नव्हते. त्यामुळे स्वतः पोलीस आयुक्त गुप्ता मंडळाचा डी. जे. बंद करण्यासाठी गेले.

पुणे शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक २४ तासांनंतरही रेंगाळल्यामुळे विसर्जनास उशीर झाला आहे. पोलीस प्रशासन आणि मंडळामध्ये समन्वयाचा अभावामुळे मिरवणूक लांबल्याचा चुकीचा प्रचार सुरु झाला आहे.मानाच्या ५ गणपती मंडळांनी घेतलेला लक्ष्मी रस्त्याचा अवधी पाहता तो अन्य मंडळांना मानवणारा ठरला नाहीच.पण एकीकडे न्यायालयाचा निर्णय,दुसरीकडे मुक्यामंत्री एकनाथ शिंदे… यांची..यंदा गणपती जोरात…ची दिलेली हाक या सर्व पार्श्वभूमीवर मंडळांच्या कार्यकर्त्यांना स्फुरण चढले तर पोलिसांचे मात्र प्रेशर वाढले,ते वाढू नये यासाठी कार्यकर्त्यांशी हसत खेळत मिळून मिसळत मिरवणूक पुढे न्या असाच जणू सल्ला आयुक्तांनी दिला होता.आयुक्तांच्या या चांगल्या वागणुकीला कुठे प्रतिसाद मिळाला तर तर कुठे त्यांचा फायदा घेतला गेला आणि मिरवणुकीला उशीर झाला,सकाळी या घटनेनंतर मात्र मंडळे हलायला सुरुवात झाली आणि मिरवणुकीने वेग घेतला.

राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जन मिरवणुकींवर पुष्पवृष्टी

0

मुंबई, दि. ९ : येथील गिरगाव चौपाटीवर अनंत चतुर्दशीनिमित्त गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी आलेले भाविक आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकींवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुष्पवृष्टी करत अभिवादन केले. “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर…” या घोषणांनी हा परिसर दुमदुमून गेला.

कोरोनाच्या सावटानंतर यावर्षी गणेशोत्सव निर्बंधमुक्त वातावरणात साजरा झाला. गणरायाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर जमलेल्या भाविकांच्या जनसागराला अभिवादन करण्यासाठी रात्री पावणे आठच्या सुमारास राज्यपालांसह, मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे आगमन झाले. यावेळी मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले,महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा आदी मान्यवर उपस्थित होते.

याठिकाणी मुंबई महापालिकेमार्फत उभारण्यात आलेल्या मंडपातून राज्यपाल श्री. कोश्यारी, मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी गणेश मिरवणुकींवर पुष्पवृष्टी करून अभिवादन केले. चौपाटीवर उभारण्यात आलेल्या मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला त्यांनी भेट देऊन पाहणी केली आणि तेथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. सातत्याने सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे चौपाटीवर उभारण्यात आलेल्या निर्माल्य संकलन उपक्रमास देखील त्यांनी भेट दिली.

सण उत्सवांच्या माध्यमातून आपली संस्कृती जपण्याचे कार्य होते. यंदा निर्बंधमुक्त उत्सव साजरा होत असल्याने भाविकांचा उत्साह ओसांडून वाहतोय, असे सांगत आगामी सण-उत्सव देखील निर्बंधमुक्त आणि जल्लोषात साजरे व्हावेत, असे मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.

साखरेचा दर ३६०० रूपये करण्याची सहकारमंत्री अतुल सावे यांची राष्ट्रीय सहकार परिषदेत मागणी

0

नवी दिल्ली, : उसाच्या वाजवी आणि किफायतशीर किंमतीवरील (एफआरपी) व्याज 15% टक्के वरून 7.5% टक्के करावे, यासह साखरेचा विक्री दर 3100 रुपयांवरुन 3600 रूपये करावा, अशी मागणी आज राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांनी राष्ट्रीय सहकार परिषदेत  केली.

येथील विज्ञान भवनात आज केंद्रीय सहकार मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाची अध्यक्षता केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी केली. यावेळी केंद्रीय सहकार राज्य मंत्री बी.एल वर्मा, विविध राज्यांतील तसेच केंद्रशासित प्रदेशातील सहकार मंत्री तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्याचे सहकार मंत्री श्री. सावे, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे या परिषदेस उपस्थित होते. यावेळी श्री. सावे यांनी राज्यातील सहकार क्षेत्राने केलेल्या नेत्रदिपक प्रगतीचा आलेख मांडला तसेच काही सूचना आणि राज्याच्या हिताला आवश्यक  मागण्याही केल्या.

यामध्ये सहकार विद्यापीठ असावे अशी मागणी केली. या माध्यमातून कौशल्य आधारित शिक्षण पुरविले जाईल, ज्यामुळे सहकार क्षेत्रातील त्रृटी दूर केल्या जातील. तसेच  सहकार क्षेत्रात होणारे संगणकीकरण आणि डिजिटायझेशन करण्यास मदत होईल.

संगणकीकरणासाठी 60:30:10 प्रमाणात निधी

संगणकीकरणासाठी केंद्र शासनाकडून 60% टक्के निधी मिळणार असून राज्य सरकार 30%  टक्के निधी आणि  नाबार्ड 10 %  टक्के निधी खर्च करणार याबाबत आज निर्णय घेण्यात आल्याचे श्री. सावे यांनी सांगितले.

पतसंस्थांना सिबिल लागू व्हावे

क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो (इंडिया) लिमिटेड (CIBIL), पतसंस्थांना लागू करावे अशी महत्त्वपूर्ण मागणी श्री. सावे यांनी आज परिषदेत केली. कृषी पत संस्था या कर्ज पुरवितात. सिबिल ही प्रक्रिया पतसंस्थांमध्ये नसल्यामुळे जुन्या कर्जांची परतफेड न करणाऱ्यांनाही कर्ज पुरविले जाते. त्यामुळे पतसंस्थांवर नादार होण्याची वेळ येते. पतसंस्थांनाही सिबिल लागू झाल्यास कर्ज देणे पतसंस्थांना सोयीचे होईल, त्यामुळे पतसंस्थाना सिबिल लागू  करावे, अशी मागणी श्री. सावे यांनी बैठकीत केली.

सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये सामुदायिक सेवा सुविधा पुरविल्या जातात. यासाठी राज्यांमध्ये मोफा ॲक्ट (महाराष्ट्र फॅल्ट वोनरशीप ॲक्ट 1963) लागू आहे. या अंतर्गत सरकार डीम्ड कन्वेयंस च्या माध्यमातून इमारती आणि जमिनीचा हक्क सहकारी संस्थांना देते. प्रलंबित डीम्ड कन्वेयंस प्रदान करण्यासाठी राज्य सरकारला कालबद्ध मर्यादा केंद्रशासनाकडून देण्यात यावी, अशी मागणी श्री. सावे यांनी आज  केली.

प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्थांची वर्गवारी निहाय संगणकीकरण व्हावे

प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्थांचे (पॅक्स) वर्गवारीनिहाय संगणकीककरण व्हावे, अशी सूचना श्री. सावे यांनी केली. श्री. सावे म्हणाले, पॅक्स चे संगणकीकरण होणे अत्यंत चांगली योजना असून याअंतर्गत अ व ब वर्गवारीत असणाऱ्या पॅक्सचे आधी संगणकीकरण व्हावे त्यानंतर   क आणि ड वर्गवारीत असणाऱ्या संस्थांचे संगणकीकरण करावे.

श्री. सावे यांनी माहिती दिली, वर्ष 2021-22 मध्ये राज्याने  138 मेट्रिक टन साखर उत्पादन केले आहे. हे उत्पादन ब्राझील या देशानंतर महाराष्ट्र राज्याचे आहे. राज्यात 1 लाख 15 हजारपेक्षा अधिक सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत. यामध्ये कचरा व्यवस्थापन, सौर ऊर्जा, जल संरक्षण उपयोजना आखल्या जात असल्याचे सांगितले. यासह स्वच्छ भारत अभियानामध्ये या गृहनिर्माण संस्थांचे मोठे योगदान आहे.

राज्यात सहकारी तत्वावर रूग्णालय चालविले जातात. कोरोना महासाथीच्या काळात या रूग्णालयांची फार मदत झाली. कोरोना काळातच सॅनिटायझर आणि ऑक्सिजनच्या वाढत्या मागणीचा पुरवठा व्हावा म्हणून अनेक सहकारी साखर कारखान्यांनी किफायतशीर दरात सॅनिटायझर आणि ऑक्सिजन उपलब्ध करून दिले, अशीही माहिती श्री. सावे यांनी परिषदेत दिली.

सूर्यास्तापर्यंतही झाले नाही मानाच्या सर्व गणपतींचे विसर्जन: ५ गणपतींनी घेतला ८ तासाहून अधिक अवधी:कथा लक्ष्मी रस्त्यावरील मिरवणुकीची

0

पुणे- आज अनंत चतुर्दशी, चंद्रोदय ६ वाजून १३ मिनिटांनी झाला तर ६.४१ वा. सूर्यास्ताची वेळ तोवर मानाच्या अवघ्या ५ गणपतींचे हि यंदा विसर्जन झाले नव्हते , ग्रामदैवत कसबा गणपती आणि मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी या दोन मंडळांचे विसर्जन झाले. दरम्यान केळकर, कुमठेकर आणि टिळक रस्त्यावरूनही सार्वजनिक मंडळांच्या मिरवणुका सुरू झाल्या नव्हत्या. सकाळी दहा वाजता राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत मिरवणुकीला मंडई येथून प्रारंभ झाला. कसबा गणपती मार्गस्थ लक्ष्मी रस्त्यावर आल्यानंतर गणेशभक्तांनी जल्लोषात स्वागत केले.कसबा गणपतीचे सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास टिळक चौकात आगमन झाले. कसबा गणपतीचे सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास गणपतीचे विसर्जन करण्यात आले. जवळपास ६ तासानंतर विसर्जन करण्यात आले. यंदा मानाच्या गणपतींनी लवकर मिरवणूक काढू, असे आश्वासन दिले होते. परंतु, उलट यंदा उशीर लागल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मानाच्या पहिल्या पाच गणपतींचे विसर्जनाचा वेळ खूपच लांबले आहे.आणि उद्या सकाळी १० वाजेपर्यंत मिरवणूक संपण्याची चिन्हे मावळत आहेत सबा गणपती टिळक चौकात (अलका चौक) दुपारी ३ वाजता आला. या गणपती समोर आर्ट आफ लिव्हिंगचे आरोग्यदायी पथक, कामायनीचे पथक, कलावंत ढोल ताशा पथक, रूजगर्जना पथक, प्रभात स्वर यांनी आपली सेवा बजावली. दरम्यान टिळक चौकात राष्ट्रीय कला अकादमीच्या वतीने चौकात भलीमोठी रांगोळी काढण्यात आली होती. कसबा गणपती टिळक चौकात आल्यानंतर त्यांचे महापालिका प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले.

मानाचा दुसरा कसबा गणपती मंडळाचे दिमाखात आगमन झाले. मात्र सायंकाळी साडे पाच वाजेपर्यत अवघ्या दोन गणपती मंडळांचे विसर्जन झाल्याने मानाच्या गणपती विसर्जन मिरवणूक उशिरा संपणार हे स्पष्ट झाले. मानाचे गणपती लक्ष्मी रस्त्यावरून जाणार असल्याने लाखो पुणेकरांनी टिळक चौकात गर्दी केली आहे.परदेशी नागरिकांचा मिरवणुकीतीस सहभागही लक्षणीय ठरला. केळकर कुमठेकर रस्त्यासह कर्वे रस्ता आणि टिळक रस्त्यावरील मिरवणूक अद्याप सुरू झालेली नाही. शास्त्री रस्त्यावरून काही लहान मंडळांच्या मिरवणुका सुरू आहेत. मानाच्या गणपतींचे विसर्जन मिरवणूक संपल्यानंतर लक्ष्मी रस्ता टिळकक रस्ता आणि केळकर तसेच कुमठेकर रस्त्यावरून मोठ्या मंडळांच्या मिरवणुका निघणार आहेत.  विद्युत रोषणाई आणि भव्यदिव्य देखावे तसेच स्पीकर्सच्या भिंती या मार्गावरून येणाऱ्या मंडळांची वैशिष्ट्ये आहेत.

दोन वर्षांनंतर भाविकांमध्ये उत्साह

गणेश मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात ढोल ताशा पथके, बँड पथके, जनजागृतीचे रथ, कला सादर करणारी पथके समाविष्ट झाल्याने मिरवणुकीचा वेळ वाढत असल्याचे दिसून येत आहे.पोलिसांकडून कोणत्याही प्रकारचे निर्बंध गणेश मंडळांना अथवा ढोल ताशा पथकांना नसल्याने मनसोक्त पध्दतीने मिरवणुक सुरु असल्याचे चित्र मुख्य मिरवणुक मार्गावर दिसून येत आहे. कोरोनाच्या संकटामुळे 2 वर्षाच्या विश्रांतीनंतर यंदा प्रथमच धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करण्यास राज्यसरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे अभूतपूर्व गर्दी पुण्यातील गणेशोत्सवाच्या विर्सजन मिरवणुकीत दिसून येत आहे. पुण्यासह राज्यभरातील आणि देशातील विविध भागातील भाविक मोठ्या प्रमाणात मिरवणुकीत सहभागी झाले आहे. याशिवाय विशेष बाब म्हणजे परदेशी नागरिकांची मोठ्या प्रमाणात संख्या पारंपारिक भारतीय वेशभूषेत दिसून येत आहे. यासोबतच मानाचा पहिला कसबा गणपतीच्या मिरवणुकीत कलावंत पथक सहभागी झाले. यात अभिनेता सिध्दार्थ जाधव, अभिनेत्री श्रृती मराठे, अभिनेत्री तेजस्वीनी पंडित, अभिनेत्री पल्लवी पाटील,अभिनेत्री अनिता दाते-केळकर,अभिनेता कश्यप परुळकर सहभागी झाले होते.पुण्यातील गणेश विर्सजन मिरवणुकीचा बंदोबस्त सांभाळणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान असते. अशावेळी अनुभवी,गणेश मंडळांशी समन्वय असणारे पोलिस अधिकारी प्रत्यक्ष विर्सजन मिरवणुकीवर असणे महत्वपूर्ण समजले जाते. मात्र, यंदाच्या विर्सजन मिरवणुकीत पोलिसांचे नियोजन फसल्याचे पदोपदी जाणवत आहे. मिरवणुक सुरू होणाऱ्या मार्गावरील प्रमुख बेलबाग चौकात गर्दी वाढूनही ढोल ताशा पथके पुढे हलविणारी यंत्रणा दिसून आली नाही. मनमानी पध्दतीने वादनात वेळ वाया घालवणाऱ्यांवर कारवाई होतांना दिसून आली नाही.टिळक चौकात कुठेही बॅरिकेटिंग नाही की दोऱ्या बांधण्यात आलेल्या नसल्याने नागरिक कुठेही शिरत आहे. दरम्यान, मिरवणुकीच्या पथकातील सदस्यांना मनस्ताप देखील झाला

भारतरत्‍न अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव बॉटनिकल गार्डनला देणार

0

चंद्रपूर, दि,९: चंद्रपूर-बल्‍लारपूर मार्गावरील बॉटनिकल गार्डनचे लोकार्पण माजी पंतप्रधान भारतरत्‍न अटलबिहारी वाजपेयी यांच्‍या जयंतीदिनी  २५ डिसेंबरला करण्‍याच्‍या दृष्‍टीने आवश्‍यक नियोजन करावे असे निर्देश वन व सांस्‍कृतिक कार्यमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

चंद्रपूर जिल्‍हयातील अपूर्ण असलेले महत्‍वाकांक्षी वनप्रकल्‍प तातडीने पूर्ण करावे यासंदर्भात असलेल्‍या अडचणींचे तातडीने निराकरण करण्यासाठी चंद्रपूरात घेतलेल्‍या आढावा बैठकीत वनमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी हे निर्देश दिले. वनविभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी आणि प्रधान मुख्‍य वनसंरक्षक वायएलपी राव यांच्‍यासह झालेल्‍या चर्चेत वनमंत्र्यांनी चंद्रपूर जिल्‍हयातील महत्‍वपूर्ण वनप्रकल्‍पांचा आढावा घेतला.

विसापूर येथील बॉटनिकल गार्डनचे लोकार्पण २५ डिसेंबर रोजी

चंद्रपूर-बल्‍लारपूर मार्गावरील विसापूर येथील बॉटनिकल गार्डनचे लोकार्पण दि. २५ डिसेंबर रोजी भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्‍या जयंतीदिनी करण्‍याचे नियोजित आहे. ताडोबा-अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍पामुळे चंद्रपूर जिल्‍हयाला पर्यटनाच्‍या दृष्‍टीने विशेष महत्‍व आहे. ताडोबा व्‍याघ्र प्रकल्‍पाला भेट देण्‍यासाठी देश-विदेशातील पर्यटक वर्षभर येत असतात. देशातील अत्‍याधुनिक बॉटनिकल गार्डन जवळच विसापूरमध्‍ये तयार होत असल्‍याने या गार्डनची देश-विदेशातील पर्यटकांनाही भुरळ पडणार आहे. वनसंपदा व वनेतर क्षेत्रातील जैविक संवर्धन साठा बघण्‍यासाठी जगभरातील पर्यटक, अभ्‍यासक, विद्यार्थी या गार्डनला भेट देतील. या बॉटनिकल गार्डनमुळे विसापूर आणि सभोवतालची गावे विकासाचे हब म्‍हणून पुढे येतील. त्‍यामुळे जिल्‍हयातील आदिवासी व ग्रामस्थांची जीवनमान उंचावण्‍यासाठी मदत होणार आहे. या बॉटनिकल गार्डनचे काम अंतिम टप्‍प्‍यात आहे. बॉटनिकल गार्डन, कन्‍झर्वेशन झोन आणि रिक्रीएशन झोन अश्‍या तीन विभागामध्‍ये उद्यान तयार होत आहे. या बॉटनिकल गार्डनला भारतरत्‍न अटलबिहारी वाजपेयी यांचे नांव देण्‍यात येणार असल्‍याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

ताडोबात टायगर व बिबट सफारी सुरू करणार

ताडोबा-अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍प हे उत्‍तम पर्यटन स्‍थळ म्‍हणून जगाच्‍या नकाश्‍यावर यावे यादृष्‍टीने आपण प्रयत्‍नशील आहोत. ताडोबा-अंधारी  व्‍याघ्र प्रकल्‍पात टायगर व बिबट सफारी सुरू करण्‍याचा प्रकल्‍प अपूर्णावस्‍थेत आहे. टायगर व बिबट सफारीच्‍या माध्‍यमातून येथे येणा-या पर्यटकांना वन्‍यजीव दर्शनाची विशेष सोय उपलब्‍ध होणार आहे. यादृष्‍टीने देखील जलदगतीने कार्यवाही करण्‍याचे निर्देश त्‍यांनी यावेळी दिले.

बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्रातील प्रलंबित कामे जलदगतीने पूर्ण करा

चंद्रपूर जिल्‍हयातील बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्र हा रोजगार निर्मितीच्‍या दृष्‍टीने महत्‍वपूर्ण प्रकल्‍प आहे. या प्रकल्‍पाच्‍या ठिकाणी बांबु कामावर फायर रिटारडंट पॉलीश करणे, आग प्रतिबंधक योजनेनुसार कार्यशाळा इमारत व स्‍वयंपाकगृह इमारतीचे बांधकाम करणे तसेच विद्युत विषयक कामे प्रलंबित आहेत. यासाठी नुकताच १४ कोटी रू. निधी मंजूर झालेला आहे. ही कामे जलदगतीने पूर्ण करण्‍याच्‍या दृष्‍टीने कार्यवाही करण्‍याचे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

वनअकादमी पूर्ण क्षमतेने पुढे नेण्‍याबाबत कार्यवाहीचे निर्देश

चंद्रपूर येथील वनप्रशासन विकास व व्‍यवस्‍थापन प्रबोधिनी अर्थात वनअकादमीशी संबंधित कामांना गती देत पुढे नेण्‍याची आवश्‍यकता आहे. वनअकादमीत आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्रशिक्षण केंद्राच्‍या निर्मितीची आवश्‍यकता आहे. अकादमीतील रिक्‍त पदांची भरती करणे सुध्‍दा गरजेचे आहे. वनअकादमीचे वनविद्यापीठात रूपांतर करण्‍याच्‍या दृष्‍टीने समिती नेमून त्‍यादृष्‍टीने जलदगतीने कार्यवाही करण्‍याचे निर्देश वनमंत्र्यांनी दिले. देशातील अत्‍याधुनिक अशा स्‍वरूपाची ही वनअकादमी सर्व सोयीसुविधांनी परिपूर्ण व्‍हावी असेही वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले.

वनविभागाचे प्रधान सचिव श्री. वेणुगोपाल रेड्डी आणि प्रधान मुख्‍य वनसंरक्षक श्री. वायएलपी राव यांच्‍यासह झालेल्‍या चर्चेत वरील विषयांवर विस्तृत चर्चा झाली. हे प्रकल्‍प जलदगतीने पूर्ण करण्‍याच्‍या दृष्‍टीने कालबध्‍द कार्यक्रम तयार करण्‍याचे निर्देश वनमंत्र्यांनी यावेळी दिले. दर पंधरा दिवसांनी चंद्रपूरला येवून सचिवांनी या प्रकल्‍पांबाबत आढावा घेण्‍याचे निर्देशही त्‍यांनी दिले.

संपूर्ण राज्य ‘नियंत्रित क्षेत्र’ घोषित, लंपी स्कीनला रोखण्यासाठी शासनाचे पाऊल

0

अधिसूचनेचे पालन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

पुणे दि.९: जनावरांमधील लंपी चर्मरोगाचा  वाढता प्रादुर्भाव पाहता त्याचे  नियंत्रण करण्यासाठी अधिक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्यादृष्टीने प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, २००९ नुसार प्राप्त अधिकारांचा वापर करत राज्य शासनाने या रोगाबाबतीत संपूर्ण राज्य ‘नियंत्रित क्षेत्र’ म्हणून घोषित केले आहे.

शासनाने  ८ सप्टेंबरला याविषयीची अधिसूचना जारी केली आहे. लंपी चर्म रोगाचा  प्रादुर्भाव झाल्यामुळे महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यामध्ये ८ सप्टेंबरपर्यंत प्राण्यांच्या गोवर्गीय प्रजातींमधील २९ बाधित पशुधनाचा मृत्यू झाला आहे.

गुरे व म्हशीच्या मृत्यूस कारणीभूत ठरणारा हा रोग राजस्थान, गुजरात, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू व कश्मीर, अंदमान व निकोबार (संघ राज्य क्षेत्र), पंजाब, आसाम, आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड, गोवा, झारखंड, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, मणिपूर, ओरिसा, तामिळनाडू, तेलंगना व पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये आधीच पसरला आहे. त्यामुळे लम्पी चर्मरोग हा जलदगतीने पसरणारा अनुसूचित रोग असल्याचे दिसून आले आहे.

राज्यांच्या सीमा तपासणी नाक्यांवर काटेकोर अंमलबजावणी व कार्यवाही करण्यासाठी भारत सरकारने सर्व राज्यांना व संघराज्य क्षेत्रांना सूचना दिलेली आहे. लगतच्या राज्यांमधून किंवा अन्य क्षेत्रामधून महाराष्ट्राच्या क्षेत्रामध्ये प्राण्यांच्या गोजातीय प्रजाती अजूनही प्रवेश करीत असल्याचे समोर आले आहे. संपूर्ण राज्य ‘नियंत्रित क्षेत्र’ घोषित केल्याने, लंपी चर्मरोगावर (एलएसडी) नियंत्रण, प्रतिबंध किंवा त्याचे निमूर्लन करता येणार आहे.

गोजातीय प्रजातींची सर्व गुरे व म्हशी यांची, ज्या ठिकाणी ते पाळले (ठेवले) जातात त्या ठिकाणापासून नियंत्रित क्षेत्रातील किंवा त्या क्षेत्राबाहेरील अन्य कोणत्याही ठिकाणी ने-आण करण्यास मनाई करण्यात आली आहे. याशिवाय गोजातीय प्रजातीची बाधीत असलेली कोणतीही जीवंत किंवा मृत गुरे व म्हशी, गोजातीय प्रजातींच्या कोणत्याही बाधीत झालेल्या प्राण्यांच्या संपर्कात आलेली कोणत्याही प्रकारची वैरण, प्राण्यांच्या निवऱ्यासाठी असलेले गवत किंवा अन्य साहित्य आणि अशा प्राण्यांचे शव, कातडी किंवा अन्य कोणताही भाग किंवा अशा प्राण्यांचे उत्पादन किंवा असे प्राणी, नियंत्रित क्षेत्राच्या बाहेर नेण्यासाठी कोणत्याही व्यक्तीस मनाई अधिसूचनेनुसार मनाई करण्यात आली आहे.

गोजातीय प्रजातीच्या गुरे व म्हशींचा कोणताही प्राणी बाजार भरवणे, प्राण्यांच्या शर्यती लावणे, प्राण्यांची जत्रा भरवणे, प्राण्यांचे प्रदर्शन आयोजित करणे आणि नियंत्रित क्षेत्रात गोजातीय प्रजातीच्या प्राण्यांचे गट करून किंवा त्यांना एकत्रित करून कोणताही कार्यक्रम पार पाडणे यास मनाई करण्यात आली आहे.

नियंत्रित क्षेत्रामधील बाजारपेठेत, जनावरांच्या जत्रेत प्रदर्शनामध्ये किंवा प्राण्यांच्या अन्य जमावामध्ये किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, गोजातीय प्रजाती प्राण्यांच्या उक्त बाधीत झालेल्या गुरांना व म्हशींना आणणे किंवा आणण्याचा प्रयत्न करणे यास मनाई करता येणार असल्याचे अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे. पशुपालकांनी अधिसूचनेचे पालन करावे व पशुधनाची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.
000

रंगरात्री दांडिया नाईट्सचे भूमिपूजन सुनील राणे यांच्या हस्ते संपन्न

0

मुंबई, 9 सप्टेंबर 2022 : दुर्गादेवी नवरात्र उत्सव समिती बोरिवली आणि श्री सुनील राणे यांच्यातर्फे प्रीमियम कच्छी मैदान, बोरिवली पश्चिम येथे आयोजित करण्यात येणाऱ्या आगामी “रंगरात्री दांडिया नाईट्स” चा भूमिपूजन सोहळा. भूमिपूजनाच्या या कार्यक्रमाला सुनील राणे, आमदार बोरिवली, वर्षा राणे यांच्यासह स्थानिक संयोजक उपस्थित होते. गुजरातमधील लोकप्रिय गायिका किंजल दवे बोरिवली पश्चिम येथे होणाऱ्या “रंगरात्री दांडिया नाईट्स” मध्ये परफॉर्म करणार आहेत. रंगरात्री दांडिया नाइट्सच्या प्रमोशनसाठी, किंजल दवे या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुंबईतील विविध ठिकाणी गरबा प्रेमींना भेटण्यासाठी सिटी टूर देखील करणार आहे.

यावेळी “रंगरात्री दांडिया नाईट्स” चे आयोजक सुनील राणे म्हणाले की, “गरबा नाईट्स मुंबईकरांना नेहमीच उत्साही ठेवतात. बोरिवलीतील नवरात्रीच्या सेलिब्रेशनला एक वेगळाच रंग आला आहे आणि यंदा “रंगरात्री दांडिया नाइट्स के रंग में किंजल दवेची गाणी आणि संगीतही जोरात असणार आहे.” रंगरात्री दांडिया नाईट्स सेलिब्रेशनसाठी गरबाप्रेमी बोरिवलीत सज्ज झाले आहेत.

अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी वाढीव दराने ३,५०१ कोटी रुपयांची मदत

0

मुंबई,दि.9 : राज्यात जून ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे एकूण 23 लाख 81 हजार 920 हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून 25 लाख 93 हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. या बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी 3 हजार 501 कोटी रुपयांची मदत राज्य आपत्ती प्रतिसाद निधीपेक्षा वाढीव दराने वितरीत करण्यात येणार  आहे.

आपदग्रस्त शेतक-यांना मंजूर मदत तातडीने वितरीत  करण्याचा आदेश मदत व पुनर्वसन विभागाकडून काढण्यात आला आहे.नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधितांच्या मदतीत वाढ करण्याचा निर्णय सरकारने काही दिवसांपूर्वी घेतला होता.त्यानुसार जिरायत शेतीसाठी पूर्वीचा दर  प्रति हेक्टरी 6800 वरून वाढवून प्रति हेक्टरी 13 हजार 600 रुपये,बागायत शेतीसाठी प्रति हेक्टरी 13 हजार 500 रूपयांवरन 27 हजार रुपये आणि बहुवार्षिक शेतीसाठी पूर्वीचा दर 18 हजार रूपयांवरून 36 हजार रुपये करण्यात आला आहे.जिरायत,बागायत व बहुवार्षिक पिकांच्या बाबतीत यापूर्वी दोन हेक्टरच्या मर्यादेत वाढ करून प्रती तीन हेक्टर अशी वाढ करण्यात आली आहे.

शेतक-यांसाठीचा मदतीचा निधी संबंधित विभागीय आयुक्त, जिल्हाधिका-यांकडे  वर्ग करण्यात आला आहे. ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट ऑनलाइन पद्धतीने जमा करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.याबाबतचा शासननिर्णय महसूल व वन विभागाने 8 सप्टेंबर 2022 रोजी निर्गमित केला.

गणपती विसर्जन रथाच्या मिरवणूकीला मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झाली सुरूवात

0

नाशिक: शहरातील भद्रकाली येथील वाकडी बारव येथून गणपती विसर्जन रथ मिरवणूकीची  ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण व क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत आज ढोल, ताशांच्या निनादात उत्साहात सुरूवात झाली. मिरवणूकीत अग्रस्थानी नाशिक महानगरपालिकेचा शासकीय मानाच्या गणपतीसह शहरातील 23 गणपती मंडळांनी सहभाग नोंदविला.

यावेळी आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले, पोलीस महानिरिक्षक बी.जी.शेखर पाटील ,नाशिक शहर पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी आवेश पलोड, कार्यकारी अभियंता संदेश शिंदे यांच्यास‍ह शहरातीत विसर्जन मिरवणूकीसाठी सहभागी गणेश मंडळाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सार्वजनिक उत्सवात दाखल गुन्हे शासनाने घेतले मागे

यावेळी मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, गणेशोत्सव व दहिहंडी सारख्या उत्सवांमध्ये दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे महाराष्ट्र शासनाने मागे घेतले आहेत. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे गणपती उत्सव साजरा करता आला नाही त्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात आपण सर्वजण गणेशोत्सव मोठ्या जोषात व उत्साहात साजरा करीत आहोत. सायंकाळी पावसाच्या अंदाजाने मिरवणूक लवकरात लवकर पुढे नेऊन निर्विघ्नपणे पार पाडावी, असे आवाहन यावेळी मंत्री गिरिश महाजन यांनी गणेश मंडळांना केले.

स्वत: ढोल वाजवत केला प्रारंभ

सुरवातीला महापालिकेच्या शासकीय मानाच्या गणपतीची विधिवत पूजा करून आरती करण्यात आली. त्यानंतर थेट मिरवणूकीत सहभागी होवून मंत्री गिरीश महाजन यांनी स्वत: ढोल वाजवून मिरवणूकीस प्रारंभ केला. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया’ असा

गजर करून विसर्जन मिरवणूकीत सहभागी झालेल्या गणेश मंडळाच्या रथांना मंत्री गिरीश महाजन यांनी शुभेच्छा दिल्या. त्यासोबतच मिरवणूक कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून शांततेत पार पाडण्याचे आवाहनही मंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थितांना केले.

पौष्टिक जेवणामुळे पोलिसांचा उत्साह, ऊर्जा वाढेल-राजेंद्र डहाळे 

0

लायन्स क्लब ऑफ पूना सारसबागतर्फे पोलिसांसाठी श्रमपरिहार

पुणे : गणेश विसर्जनावेळी सलग २५-३० तास अहोरात्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात पोलीस कर्मचाऱ्यांना सकस आहार उपलब्ध करण्याचा लायन्स क्लबचा उपक्रम स्तुत्य आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून उभारलेल्या श्रमपरिहार केंद्रामुळे आमच्या पोलीस बांधवाना घरच्यासारखे ताजे, स्वादिष्ट व पौष्टिक जेवण, स्वच्छ पाणी मिळणार आहे. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांचा, सुरक्षारक्षकांचा आणि पोलिस मित्रांचा बंदोबस्त करण्यातील उत्साह वाढेल, तसेच त्यांना ऊर्जा मिळेल. गणरायाच्या आशीर्वादाने विसर्जन मिरवणूक निर्विघ्न पार पडेल, असे प्रतिपादन अतिरिक्त पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे यांनी केले. 
लायन्स क्लब ऑफ पूना सारसबाग आणि लायन्स क्लब पूना सारसबाग चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने लक्ष्मी रस्त्यावरील रांका ज्वेलर्स येथे उभारलेल्या श्रमपरिहार केंद्राचे उद्घाटन डहाळे यांच्या हस्ते झाले. गेल्या १७ वर्षांपासून हे श्रमपरिहार केंद्र उभारण्यात येते. याप्रसंगी लायन्स क्लब इंटरनॅशनलचे उपप्रांतपाल (प्रथम) परमानंद शर्मा, उपप्रांतपाल (द्वितीय) सुनील चेकर, माजी प्रांतपाल फतेचंद रांका, लायन्स क्लब ऑफ पूना सारसबागचे अध्यक्ष अनिल सुगंधी, सचिव पूनम अष्टेकर, खजिनदार दर्शन तोडकर, उपक्रमाचे प्रमुख कल्पेश पटनी, राष्ट्रीय कला अकादमीचे सुरेश धडफळे यांच्यासह लायन्स क्लबचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फत्तेचंद रांका म्हणाले, “विसर्जनाच्या दिवशी हा उपक्रम आम्ही गेल्या १७ वर्षापासून राबवत आहोत. जवळपास दोन ते अडीच हजार पोलिस कर्मचारी, होमगार्ड्स, पोलिस मित्र आणि रांगोळीच्या पायघडया घालणारे राष्ट्रीय कला अकादमीचे स्वयंसेवक यांना पॅकेट्समधून ताजे व पौष्टिक जेवण दिले जाते. शिवाय केंद्रावर ५०० ते ६०० लोक जेवण करतात. घरगुती तीन पोळ्या, मटकीची भाजी, पुलाव, लोणचे व बर्फी आदी पदार्थ यात असतात. शुक्रवारी सकाळी ११ ते शनिवारी सकाळी ११ वाजेपर्यंत ही भोजनव्यवस्था करण्यात आली आ