नवरात्री म्हटलं की नवचैतन्य, जोश, उल्हास. हेच सुंदर वातावरण अधिकच बहारदार आणि रंगमय करण्यासाठी मुंबई मुव्हिस स्टुडिओज घेऊन आले आहे ‘मन कस्तुरी रे’चे नवे पोस्टर. नवरात्रीच्या निमित्ताने हे पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून यात तेजस्वी प्रकाश आणि अभिनय बेर्डे प्रेमाच्या रंगात दंग होऊन नाचताना दिसत आहेत. संकेत माने दिग्दर्शित ‘मन कस्तुरी रे’ येत्या ४ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांचा मराठी सिनेमांसाठीचा रस वाढत असतानाच तेजस्वी प्रकाश हिने ‘मन कस्तुरी रे’ या मराठी सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. यानिमित्ताने तेजस्वीने सोशल मीडियावर नवरात्रीच्या शुभेच्छा देत आपल्या या पोस्टरबाबत खूप उत्सुक असल्याचे सांगितले. तिचा हा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. मराठमोळ्या तेजस्वीची पहिल्यांदाच मराठी सिनेमातील दमदार झलक पाहायला सर्वच प्रेक्षकवर्ग आतुर असतानाच आता तेजस्वी प्रकाश आणि अभिनय बेर्डेचे नाचतानाचे एक जबरदस्त पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. पोस्टरमधील या दोघांची कमाल केमेस्ट्री प्रेक्षकांची सिनेमासाठीची उत्सुकता अधिकच वाढवत आहे. पोस्टरवरून ही एक सुंदर प्रेमकहाणी असल्याचे दिसत आहे. त्यामुळे यंदाच्या नवरात्रीत अभिनय आणि तेजस्वीच्या’ मन कस्तुरी रे’ चा सुगंध सर्वत्र दरवाळणार, हे नक्की!
नितीन केणी यांच्या नेतृत्वाखाली मुंबई मुव्ही स्टुडिओज प्रस्तुत, व्यंकट अत्तिली, मृत्यूंजय किचंबरे यांच्या आयएनइएनएस डायमेंशन एन्टरटेनमेंट ॲण्ड आर्ट्स निर्मित या चित्रपटाचे सहनिर्माते ड्रॅगन वॅाटर फिल्म्सचे निशीता केणी आणि करण कोंडे आहेत. वितरणाचे काम युएफओ सिने मीडिया नेटवर्कने पाहिले आहे.
निरनिराळ्या आशयावर प्रयोग करणारे ‘प्लॅनेट मराठी’ पुन्हा एकदा एक नवीन संकल्पना घेऊन प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहे. लवकरच ‘प्लॅनेट मराठी’ आणि क्रांती रेडकर यांची निर्मिती संस्था ‘दॅट हॅप्पी गर्ल’ एक नवीन कल्पना घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या शोच्या निमित्ताने क्रांती रेडकर निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहेत. वर्षपूर्तीनिमित्त मनोरंजक वेबफिल्म, वेबसिरीजच्या घोषणा होत असतानाच प्लॅनेट मराठीने आणखी एक मोठी घोषणा केली आहे, ती म्हणजे रिॲलिटी शोची. मराठी ओटीटीवर अशा प्रकारचा प्रयोग प्रथमच होत आहे. या शोची रूपरेखा नेमकी काय असणार, यासाठी मात्र थोडी वाट पाहावी लागणार आहे. ‘प्लॅनेट मराठी’, अ व्हिस्टास कॅपिटल कंपनी नेहमीच त्यांच्या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी वैविध्यपूर्ण आशय घेऊन आले आहे, त्यामुळे हा रिॲलिटी शोही प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल.
प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ” प्रथमच मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिॲलिटी शो सादर होणार आहे. क्रांती रेडकरच्या सोबतीने हा रिॲलिटी शो आम्ही प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी घेऊन येत आहोत. ही संकल्पना खूपच वेगळी असल्याने प्रेक्षकांसोबत आम्ही सुद्धा यासाठी खूप उत्सुक आहोत. लवकरच यातील एकेक पैलू उलगडतील.”
या शो बाबत निर्माती क्रांती रेडकर म्हणतात, ” पहिल्यांदाच निर्माती म्हणून काम करताना मला एका चांगल्या ओटीटीसोबत काम करायचे होते. प्लॅनेट मराठी सोबत मी ‘रेनबो’ चित्रपट केला असल्याने त्यांच्यासोबत काम करण्याचा माझा अनुभव अप्रतिम आहे. त्यामुळे ‘प्लॅनेट मराठी’ हाच मला योग्य पर्याय वाटला. मुळात ‘प्लॅनेट मराठी’ हे खूपच दूरदर्शी आहे. प्रेक्षकांची आवड ते उत्तम जाणतात. या शोच्या निमित्ताने ‘प्लॅनेट मराठी’सोबत सुरु झालेला माझा हा नवीन प्रवास नक्कीच अविस्मरणीय असणार. विशेष म्हणजे या शोच्या माध्यमातून आम्ही अवघ्या महाराष्ट्रात पोहोचणार आहोत. यानिमित्ताने नवोदितांना एक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.”
परराष्ट्र मंत्रालयाने पारपत्राशी संबंधित सेवा सुलभ करण्यासाठी आणखी एक निर्णय जाहीर केला आहे. 28 सप्टेंबर 2022 पासून देशभरातील सर्व ऑनलाइन पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रांवर (पीओपीएसके) पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट्स (पीसीसी) साठी अर्ज करण्याची सुविधा मिळणार आहे. यामुळे पीसीसी अपॉइंटमेंटसाठीची तारीख लवकर मिळेल.
या निर्णयामुळे परदेशात नोकरीसाठी जाणाऱ्या भारतीय नागरिकांना सुविधा होईल तसेच शिक्षण, दीर्घकालीन व्हिसा आणि इमिग्रेशन यासाठी लागणाऱ्या पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेटसाठीही मदत होईल. गोवा पारपत्र कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे.
· ऍन्युइटी दरांमध्ये वाढ झाल्याने सेवानिवृत्तीनंतर आर्थिक स्वातंत्र्य मिळवणे अधिक सोपे बनणार.
· दुर्दैवाने जर ऍन्युइटंट व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंब सदस्याला आधीपेक्षा खूप जास्त डेथ बेनिफिट मिळणार.
मुंबई, २७ सप्टेंबर २०२२: भारतातील एक आघाडीची जीवन विमा कंपनी टाटा एआयए लाईफ इन्श्युरन्सने (टाटा एआयए लाईफ) टाटा एआयए लाईफ फॉर्च्युन गॅरंटी पेन्शन या आपल्या प्रमुख ऍन्युइटी प्लॅनचे अधिक जास्त प्रभावी व्हर्जन सादर केले आहे. या नवीन व्हर्जनमध्ये काही प्रमुख सुधारणा करण्यात आल्या आहेत, यामध्ये अधिक जास्त ऍन्युइटी दर आणि डेथ बेनिफिट्सचा समावेश आहे. सेवानिवृत्तीच्या सुवर्णकाळाचा आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व निश्चिन्त राहून आनंद घेता यावा यासाठी ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतलाच पाहिजे.
आयुर्मानात झालेली वाढ आणि बचत पातळीमध्ये झालेली घट यामुळे आजच्या काळात देशातील नागरिकांसाठी सेवानिवृत्तीच्या काळातील उत्पन्न चिंतेचे एक प्रमुख कारण बनले आहे. वर्ष २०५० पर्यंत सेवानिवृत्तीच्या काळासाठीच्या बचतीमधील कमतरता ८५ ट्रिलियन यूएस डॉलर्सवर पोहोचेल असा अंदाज आहे. या समस्येला यशस्वीपणे तोंड देता यावे यासाठी भारतीय ग्राहकांनी सेवानिवृत्तीनंतरच्या आपल्या आर्थिक स्वातंत्र्याची पुरेपूर तजवीज करून ठेवली पाहिजे. टाटा एआयए लाईफ फॉर्च्युन गॅरंटी पेन्शन प्लॅनमध्ये अनेक वेगवेगळे, ग्राहकांच्या गरजा, मागण्यांना अनुसरून तयार करण्यात आलेले गॅरंटीड उत्पन्न पर्याय देण्यात आले आहेत. सेवानिवृत्तीनंतरचे आपले आयुष्य चिंतामुक्त असावे यासाठी पुरेशी बचत करण्यात ही योजना ग्राहकांची मदत करते. ही योजना वेगवेगळ्या प्रकारच्या ग्राहकांसाठी उपयुक्त आहे, लग्न होऊन गृहस्थ जीवन जगत असलेले स्त्री-पुरुष जे त्यांची सध्याची जीवनशैली भविष्यात देखील कायम राखू इच्छितात त्यांच्यासाठी देखील ही योजना उपयोगी ठरू शकते. आपल्या जीवनात स्वतःभोवती आर्थिक सुरक्षेचे कवच उभारू इच्छिणाऱ्या लघु मध्यम उद्योजकांसाठी हा अतिशय योग्य पर्याय आहे.
या योजनेतून मिळणारे प्रमुख लाभ पुढीलप्रमाणे आहेत:
तात्काळ लाईफ ऍन्युइटी
फॉर्च्युन गॅरंटी पेन्शन योजनेमध्ये ऍन्युइटंटच्या जीवन कालावधीत निवडण्यात आलेल्या वारंवारितेनुसार तात्काळ ऍन्युइटी पेआउट्स देण्यात येतात. यामध्ये खरेदी किमतीच्या परताव्यासह तात्काळ लाईफ ऍन्युइटी देखील दिली जाते, ज्यामध्ये खरेदीच्या वेळी भरलेली रक्कम डेथ बेनिफिट म्हणून परत केली जाते.
गॅरंटीड ऍडिशन्सचा पर्याय
डिफरमेंट कालावधीमध्ये दर पॉलिसी महिन्याच्या शेवटी गॅरंटीड ऍडिशन्स जमा केले जातात.
ऍन्युइटी आधीच निवडण्याचा पर्याय
या पर्यायामुळे तुम्हाला वार्षिक ऍन्युइटी पेआऊट आधीच मिळवता येतात.
पॉलिसीवर कर्ज घेण्याची सुविधा
पॉलिसी सुरु झाल्यानंतर सहा महिन्यांनी तुम्ही पॉलिसीवर कर्ज मिळवू शकता. जॉईंट लाईफ पर्यायांतर्गत एक पॉलिसीधारक असे कर्ज घेऊ शकतो जे पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास सेकंडरी ऍन्युइटंटच्या नावे होते.
जॉईंट लाईफ पर्याय
यामध्ये प्रायमरी ऍन्युइटंटला ऍन्युइटी पेआउट्स मिळतात. प्रायमरी ऍन्युइटंटचा मृत्यू झाल्यास सेकंडरी ऍन्युइटंटला (पती/पत्नी/मुलगा/मुलगी/आई/वडील/सासू/सासरे किंवा भावंडं) ऍन्युइटी पेआउट्स मिळतात.
टाटा एआयए लाईफ इन्श्युरन्सचे चीफ फायनान्शियल ऑफिसर श्री. समित उपाध्याय यांनी सांगितले, “सेवानिवृत्ती म्हणजे व्यक्तीच्या जीवनात एका नव्या अध्यायाची सुरुवात.नोकरीव्यवसायातील जबाबदाऱ्यांविषयी चिंता वाटून घेण्याऐवजी स्वतःवर लक्ष केंद्रित करण्यासाठीचा हा उत्तम काळ. सेवानिवृत्तीनंतर आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असावे जेणेकरून आपली जीवनशैली आपल्याकडे असलेल्या पैशांवर अवलंबून असणार नाही असे प्रत्येकाला वाटते. सेवानिवृत्तीनंतर आपले सर्व खर्च विनासायास करण्यात उपयुक्त ठरेल असे नियमित गॅरंटीड उत्पन्न देणारी टाटा एआयए लाईफ फॉर्च्युन गॅरंटी पेन्शन योजना हे सेवानिवृत्तीनंतर आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे उत्कृष्ट आर्थिक साधन आहे. या योजनेमुळे आमच्या ग्राहकांना सेवानिवृत्त होण्याआधी पुरेशी बचत करण्यात मदत मिळते आणि जेव्हा पगारातून मिळणारे नियमित उत्पन्न थांबते तेव्हा देखील स्थिर उत्पन्न मिळवता येते.”
सेवानिवृत्तीनंतर आपल्या गरजांना अनुरूप व सुरक्षित उत्पन्न मिळवू इच्छिणारे ग्राहक तसेच आपल्याकडील अतिरिक्त फंड्स एखाद्या गॅरंटीड जीवन बीमा योजनेत गुंतवून आपल्या सेवानिवृत्तीनंतर आपल्या हाती असलेल्या रकमेमध्ये वाढ करू इच्छिणारे सेवानिवृत्त ग्राहक फॉर्च्युन गॅरंटी पेन्शनचा लाभ घेऊ शकतील.
उदाहरणार्थ, डिफर्ड लाईफ ऍन्युइटीमध्ये (जीए-I) आणि खरेदी किंमत परत मिळण्याच्या पर्यायासह जेव्हा ४५ वर्षे वयाचा पुरुष ऍन्युइटंट सात वर्षांसाठी ५ लाख रुपयांचा वार्षिक प्रीमियम भरतो तेव्हा आठव्या वर्षीपासून तो जिवंत असेपर्यंत दरवर्षी २६१०३० रुपयांचे ऍन्युइटी उत्पन्न मिळू लागते. अशाप्रकारे त्याला त्याने भरलेल्या एकूण प्रीमियम रकमेवर ७.४६% वार्षिक उत्पन्न मिळते. ऍन्युइटंटचा जर मृत्यू झाला तर नॉमिनीला देखील डेथ बेनिफिट मिळतात.
या योजनेमध्ये डिफर्ड लाईफ ऍन्युइटी (जीए-II) आणि खरेदी किंमत परत मिळण्याचा अतिशय आकर्षक प्रस्ताव मिळतो. जेव्हा एखादी ५० वर्षे वयाची व्यक्ती नोकरी करत असताना दरवर्षी ५ लाख रुपयांचा वार्षिक प्रीमियम १० वर्षांसाठी भरते तेव्हा त्या व्यक्तीला सेवानिवृत्तीचे वय आल्यावर दरवर्षी ४,०६,१०० रुपयांचे ऍन्युइटी उत्पन्न मिळायला सुरुवात होते. आधीच्या उदाहरणाप्रमाणे, ऍन्युइटंटचा मृत्यू झाल्यास त्याने भरलेली प्रीमियमची एकूण रक्कम त्याच्या नॉमिनीला परत केली जाते. जॉईंट लाईफ पर्यायामध्ये, समजा की पतीचे वय ४८ वर्षे आणि पत्नीचे वय ४५ वर्षे आहे व ते १२ वर्षांसाठी २ लाख रुपये गुंतवतात तर त्यांना जीवनभर २१२०४० रुपयांची गॅरंटीड वार्षिक ऍन्युइटी मिळेल. त्यांचा मृत्यू झाल्यास नॉमिनीला २४ लाख रुपये मिळतील.
डॉ. मरे एडिनबर्ग आणि ग्लासग्लो युनिव्हर्सिटीज, ग्लेनअलमंड कॉलेज आणि युके व मलेशियामधील एप्सम कॉलेज, मर्चिस्तान इंटरनॅशनल स्कूल (शेन्झेन, चीन) यांसारख्या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांशी संबंधित
पुणे- – युकेमधील अनुभवी शिक्षणतज्ज्ञ, युके व आशियातील के-१२ शिक्षणासाठी लक्षणीय योगदान देणारे डॉ. मरे टॉड यांची वेलिंग्टन कॉलेज, भारताच्या फाउंडिंग मास्टरपदी नियुक्ती झाली आहे. हे कॉलेज भारतातील नामवंत के-१२ संस्था असून त्यात पूर्व व पश्चिमेच्या सर्वोत्तम शिक्षण पद्धतींचा मेळ घालण्यात आला आहे.
या नव्या भूमिकेत डॉ. टॉड वेलिग्टंन कॉलेज आणि देशातील नामवंत संस्था युनिसन समूहाच्या सहकार्याने भारतीय शिक्षणावर ठळक ठसा उमटवण्याचे आपले स्वप्न जाहीर करतील. डॉ. टॉड यांना शिक्षण क्षेत्राचा तीन दशकांचा अनुभव असून सुरुवातीला एडिनबर्ग आणि ग्लासग्लो विद्यापीठांसह केलेले काम आणि त्यानंतर युके स्कूल्स (ग्लेनमंड कॉलेज, रनोच स्कूल आणि एप्सम कॉलेज) आणि नव्या आंतरराष्ट्रीय संस्था (मलेशियातील एप्सम कॉलेज आणि मर्चिस्तान इंटरनॅशनल स्कूल, शेन्झेन, चीन) या प्रतिष्ठित एडिनबर्ग संस्थेची सिस्टर स्कूलमध्ये त्यांनी महत्त्वाची बोर्डिंग पदे निभावली आहेत.
नव्या भूमिकेविषयी डॉ. टॉड म्हणाले, ‘भारतात शिक्षणतज्ज्ञ म्हणून काम करण्यासाठी आत्ताचा काळ विलक्षण आहे. देशातील शिक्षणाचा अनुभव उंचावण्यासाठी कित्येक वेगवेगळे पर्याय शोधता येतील. माझ्या परीने, मी या अनोख्या सहकार्याच्या मदतीने भारतातील समृद्ध शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाचे योगदान देण्याचा प्रयत्न करेन. युनिसन समूह आणि वेलिंग्टन कॉलेज यांच्यातील सहकार्य भारतीय शिक्षण क्षेत्रासाठी निर्णायक ठरेल. युनिसन समूहाचा दृष्टीकोन आंतरराष्ट्रीय पातळीवर आघाडीचा आणि प्रेरणादायी असून सर्वसमावेशकता आणि स्थानिक/राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय समुदायाशी संवाद साधत आपली उद्दिष्टे साधण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. वेलिंग्टन कॉलेज इंटरनॅशनल, पुणेद्वारे दर्जेदार शिक्षण पुरवले जाईल, युकेतील शिक्षणाचा भाग असलेली सर्वोत्तम मूल्ये आणि परंपरांची ओळख करून दिली जाईल व ते करताना भारताचा समृद्ध इतिहास व वैविध्यता यांवर भर दिला जाईल. संस्थेद्वारे नाविन्यपूर्ण आणि निर्णायक शैक्षणिक प्रवासाची ग्वाही देण्यात आली आहे.’
आगामी सहकार्याविषयी वेलिंग्टन कॉलेज, इंडियाचे सह- संस्थापक अनुज अगरवाल म्हणाले, ‘वेलिंग्टन कॉलेज, युकेशी झालेल्या सहकार्याच्या माध्यमातून आम्ही भारतात के-१२ विभागात शैक्षणिक नियमावलीत क्रांती घडवून आणण्यासाठी असलेली बांधिलकी नव्याने अधोरेखित करत आहत. वेलिंग्टन कॉलेजची मूल्ये, नैतिकता, कायमस्वरूपी गुणवत्ता इतरांपर्यंत पोहोचवण्याचे आमचे ध्येय असून त्यासाठी ब्रिटिश व भारतीय शिक्षणातील बलस्थानांचा मेळ घातला जाणार आहे. विद्यार्थ्यांना आत्मविश्वासपूर्ण, उद्यमशील बनवण्यावर आणि आयुष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी सक्षम करण्यावर तसेच ते काम करण्यासाठी ज्या कंपनीची निवड करतील तिथे आपले अढळ स्थान कसे तयार करायचे हे शिकवण्यावर आम्ही भर देणार आहोत.’
भारतातील शिक्षण क्षेत्रात गेल्या काही वर्षांत सकारात्मक बदल झाले आहेत आणि आम्ही भारतीय शिक्षण क्षेत्रात जागतिक स्तरावरील सर्वोत्तम पद्धतींचा समावेश करण्याचे, विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील आघाडीचे स्थान मिळवण्यासाठी आवश्यक संधी पुरवण्याचे ध्येय ठेवले आहे.
युनिसन समूहाविषयी
युनिसन समूहाचे मुख्यालय, डेहराडून, भारत येथे असून शिक्षणावर त्यांचा प्रमुख भर आहे. युनिसनचा प्रत्येक व्यवसाय स्वतंत्रपणे आणि व्यावसायिक व्यवस्थापन टीमअंतर्गत काम करतो. आमच्या कामकाजात वैविध्यपूर्ण कर्मचाऱ्यांची तैनात करत युनिसन कंपन्यांनी वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशांमध्ये लक्षणीय गुंतवणूक केली आहे.
आज युनिसनच्या वेगवेगळ्या उद्योगांत मिळून १००० कर्मचारी कार्यरत आहे. प्रत्येक वर्षी युनिसन संस्थांच्या पोर्टल्समधून ३००० विद्यार्थी पदवीधर होऊन बाहेर पडतात. आतापर्यंत २५,००० विद्यार्थी या संस्थांमधून यशस्वीपणे बाहेर पडले असून ते फॉर्च्युन ५०० कंपन्यांसह जगभरात कार्यरत आहेत ही बाब समूहाची समाजाशी असलेली दृढ निष्ठा अधोरेखित करण्यासाठी पुरेशी आहे.
या संपादनामुळे बीटुबी एक्सप्रेस लॉजिस्टिक्सची क्षमता आणखी बळकट होणार
मुंबई– महिंद्रा लॉजिस्टिक्स लि. (एमएलएल) आणि रिव्हिगो सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (आरएसपीएल) यांनी एमएलएलतर्फे आरएसपीएलच्या बीटुबी एक्सप्रेस व्यवसायाची खरेदी करण्यासाठी करार केला आहे. या करारानुसार एमएलएल बिझनेस ट्रान्सफर अग्रीमेंट अंतर्गत (बीटीए) व्यवसाय संपादन करणार असून त्यात कंपनीचे ग्राहक, टीम्स, आरएसपीएलच्या बीटुबी एक्सप्रेस बिझनेसची असेट्स, आरएसपीएलचे तंत्रज्ञान आणि रिव्हिगो ब्रँड यांचा समावेश असेल. ट्रक फ्लीटची मालकी आणि फुल ट्रक लोड (एफटीएल) कामकाजाचे हक्क आरएसपीएलकडेच राहातील.
एमएलएल ही भारतातील आघाडीची सर्वसमावेशक लॉजिस्टिक कंपनी असून ती ग्राहकांना पुरवठा साखळी सेवा, थ्रीपीएल सुविधा, एफटीएल वाहतूक, वेयरहाउसिंग, क्रॉस बॉर्डर लॉजिस्टिक्स, लास्ट माइल आणि बीटुबी एक्सप्रेस लॉजिस्टिक्स सेवा देते. या संपादनामुळे एमएलएलच्या सद्य बीटुबी एक्सप्रेस व्यवसायाला रिव्हिगोचे दमदार नेटवर्क, तंत्रज्ञान आणि प्रक्रिया क्षमतांची जोड लाभेल.
गुरगावस्थित रिव्हिगो पॅन भारतात बीटुबी एक्सप्रेस नेटवर्क चालवते. कंपनीकडे मजबूत ग्राहकवर्ग आणि संपूर्ण सेवा तंत्रज्ञान आहे. रिव्हिगोच्या बीटुबी एक्सप्रेस नेटवर्कमध्ये सध्या देशातील १९,००० पिनकोड्सचा समावेश आहे. त्यांची २५० पेक्षा जास्त प्रक्रिया केंद्रे व शाखा असून १.५ दशलक्ष चौरस फुटांपेक्षा जास्त जागेसह एमएलएलच्या एक्सप्रेस व्यवसाय क्षमतेला लक्षणीय बळ मिळेल.
याप्रसंगी महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रामप्रवीण स्वामीनाथन म्हणाले, ‘बीटुबी एक्सप्रेस लॉजिस्टिक्स क्षेत्रात मोठा वाव दिसून येत आहे, कारण ग्राहक सखोल डिलीव्हरी नेटवर्क, डिजिटल तंत्राचा अवलंब आणि जलद पुरवठा साखळीतील गुंतवणुकीवर भर देतात. या संपादनामुळे आमच्या सेवा तसेच बीटुबी एक्सप्रेस व पीटीएल क्षेत्रातील आमची व्याप्ती मजबूत होईल. रिव्हिगोने चांगल्या क्षमतांची उभारणी केली असून व्यवसायांच्या एकत्रीकरणातून ही क्षमता आणखी बळकट करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. एक टीम या नात्याने या घडामोडीविषयी आम्ही उत्सुक आहोत, कारण सर्वांचे तत्व आणि चालक तसेच समाजाला सक्षम करण्याचे ध्येय समान आहे.’
याप्रसंगी आरएसपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक गर्ग म्हणाले, ‘रिव्हिगोने फुल ट्रक लोड व्यवसायात पायाभरणी केली आहे आणि इतक्या वर्षांत आम्ही पॅन भारतात पीटीएल/एक्सप्रेस सेवा, उच्च दर्जाचे तंत्रज्ञान आणि सेवांचे जाळे तयार केले आहे. आम्हाला विश्वास आहे, की आमच्या पीटीएल व्यवसायाचे ग्राहक आणि कर्मचाऱ्यांना एमएलएलसारख्या दर्जेदार, समग्र पुरवठा साखळीचा मोठ्या प्रमाणावर फायदा होईल.’
पुणे : केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी मंगळवारी सकाळी १०.४५ वाजता सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेत आरती केली. यावेळी मंदिरातील श्री महासरस्वती आणि श्री महाकाली देवीचे दर्शन घेण्यासोबतच ट्रस्टतर्फे राबविण्यात येणा-या सामाजिक उपक्रमांची माहितीही जाणून घेत शुभेच्छा दिल्या. श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित नवरात्र उत्सवात आरिफ मोहम्मद खान यांचे स्वागत व सन्मान श्री महालक्ष्मी देवीची प्रतिमा व महावस्त्र देऊन करण्यात आला. यावेळी मंदिराचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अॅड.प्रताप परदेशी, हेमंत अर्नाळकर, भरत अग्रवाल, तृप्ती अग्रवाल, प्रविण चोरबेले, राजू चमेडिया, निलेश लद्दड आदी उपस्थित होते. आरिफ मोहम्मद खान म्हणाले, आपल्या सर्वांवर देवीची कृपा राहू देत. आपला देश पुढे जात राहो. आपल्या देशाला मजबूत करु. इतके आपण देशाला मजबूत करु की आपल्या हातून संपूर्ण मानवतेची सेवा होईल, अशी प्रार्थना त्यांनी श्री महालक्ष्मी देवीचरणी केली. प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल म्हणाल्या, उत्सवांतर्गत श्री सुक्त अभिषेक, श्री विष्णु सहस्त्रनाम पाठ, महालक्ष्मी महायाग, महाआरती असे धार्मिक कार्यक्रम दररोज सुरु आहेत. याशिवाय महिला पोलीस व महिला पत्रकार सन्मान, परिचारिका गौरव सोहळा, कन्यापूजन, भोंडला, नारी तू नारायणी सन्मान सोहळा, शालेय विद्यार्थी संगीत स्पर्धा, विविध कलाकारांतर्फे गरबा नृत्य असे कार्यक्रम देखील होणार आहेत. ट्रस्टच्या वेबसाईट, फेसबुक पेजच्या माध्यमातून देखील जगभरातील देवी भक्त उत्सवाचा आनंद घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे | ऑनलाईन अर्थात ई-कॉमर्स आल्यापासून दिवसेंदिवस भारतातील छोटे व मध्यम व्यापारी व व्यावसायिकांच्या धंद्यावर मोठा परिणाम झाला आहे. विशेषत: कोरोनानंतर ई-कॉमर्सचे प्रमाण खूप वाढल्याने ई-कॉमर्स च्या स्पर्धेत भारतातील छोटे व मध्यम व्यापारी, व्यावसायिक टिकावेत यासाठी अखिल भारतीय व्यापारी महासंघातर्फे (CAIT) ‘भारत ई मार्ट’ हे ऑनलाईन पोर्टल सुरु करण्यात आले आहे. त्यावर व्यापारी व व्यावसायिकांसाठी नोंदणी सुरु झाली असून ती मोफत असल्याची माहिती अखिल भारतीय व्यापारी महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भारतात छोटे व मध्यम व्यापाऱ्यांची संख्या कोटींच्या घरात आहे. ई-कॉमर्सच्या माध्यमातून परदेशी कंपन्या आपल्या देशात व्यापार करून येथील पैसा बाहेर घेऊन जाऊ लागल्या. तसा इथल्या स्थानिक व्यापाऱ्यांचा व्यापार व त्यातून निर्माण होणारा रोजगार धोक्यात येऊ लागला. ‘भारत ई मार्ट’ मुळे देशातील व्यापाऱ्यांना ऑनलाईन बाजारपेठ खुली झाली आहे.
पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यात अखिल भारतीय व्यापारी महासंघ (CAIT) व पुणे रिटेल व्यापारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने भारत ई मार्ट वर नोंदणीचा कार्यक्रम सुरु केला आहे. या ऑनलाईन पोर्टलवर कोथरूड येथील अंबर हॉल येथे सायंकाळी ६ ते ७ या वेळेत नोंदणी करता येईल.
भारत ई मार्टवर नोंदणी केल्यानंतर… याद्वारे प्रत्येक व्यापाऱ्याचे स्वतंत्र ई दुकान तयार केले जाणार आहे. प्रत्येक दुकानाचा स्वतंत्र QR कोड तयार केला जाईल आणि हा QR कोड स्कॅन केल्यानंतर संपूर्ण दुकानाची माहिती ग्राहकांना मिळणार आहे. तसेच व्यवसायिकांना बॅंकिंग, कर्ज, विमा सुविधा, वाहतुक सुविधा, कुरियर सेवा, व्यवसाय वाढीचे महत्त्व व उपाय, कायदेशीर सल्ले, व्यवसाय परवाने यांसंबंधीचे संपूर्ण प्रशिक्षण व माहिती पोर्टलवर दिली जाणार आहे आणि या सर्व सुविधा विनामुल्य असणार आहेत. पोर्टलवर केलेल्या व्यवसायावर कोणतेही कमिशन घेतले जाणार नसल्याचे अखिल भारतीय व्यापारी महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेस पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघटनेचे पुणे शहराध्यक्ष सुनील गेहलोत, पुणे शहर महिलाध्यक्ष शिल्पा भोसले, अखिल भारतीय व्यापारी महासंघाचे (CAIT) पुणे जिल्हा अध्यक्ष विकास मुंदडा, उपाध्यक्ष बाळासाहेब अमराळे, कुमार खत्री आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यावर्षीही 27 सप्टेंबर 2022 रोजी जागतिक पर्यटन दिन 2022 साजरा करत असुन युनायटेड नेशन वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन (UNWTO) यांचेद्वारे सन 2022 करिता जागतिक पर्यटन दिनाचे घोषवाक्य (Theme) “Rethinking Tourism” हे घोषित करण्यात आले आहे. या वर्षी इंडोनेशियातील बाली येथे 27 सप्टेंबर रोजी अधिकृत जागतिक पर्यटन दिन साजरा केला जाईल, जो विकासाचा महत्वाचा आधारस्तंभ म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या पर्यटनाकडे वळवला जाणार आहे. जागतिक पर्यटन दिनाच्या Theme नुसार आपण पर्यटन कसे करतो याचा फेरविचार करण्याची हीच योग्य वेळ आहे. सदर जागतिक पर्यटन दिन हा पर्यटन मंत्रालय भारत सरकार,महाराष्ट्र्र राज्य पर्यटन विभाग यांच्याद्वारे विविध उपक्रमांतुन साजरा केला जातो. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडाळाच्या प्रधान कार्यालयासमवेत महामंडळ स्वत: परिचलन करत असलेल्या सर्व प्रादेशिक कार्यालये,सर्व पर्यटक निवासे,उपहारगृहे,बोल्ट क्लब्स,माहिती केंद्रे, कलाग्राम इ. ठिकाणी दि.27 सप्टेंबर 2022 रोजीच्या जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधत आपल्या अखत्यारीत येणाऱ्या प्रादेशिक कार्यालय, पर्यटक निवासे, उपहारगृहे, बोट क्लब्स, कलाग्राम इ. ठिकाणी दि.23 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर 2022 या कालावधीत पर्यटनाशी निगडीत विविध उपक्रमांची अंमलबजावणी करत “पर्यटन सप्ताह” साजरा करण्यात येत आहे. पर्यटन दिनी विविध पर्यटन पूरक कार्यक्रमाचे आयोजन करून महामंडळ नजीकच्या नामावंत सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक संस्था महाविद्यालये शाळा पुरातत्व विभाग इ. यांसारख्या सर्व समावेशक योगदानातून सदर पर्यटन सप्ताह विविध आकर्षक उपक्रमांची अंमलबजावणी करत उत्स्फुर्तपणे साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने जागतिक पर्यटन दिनाचे Banner लावण्यात यावा. सदर घोषवाक्यसहित रचनाबद्ध Banner सर्व पर्यटक निवासांमध्ये लावण्यात येणार आहेत. सदर दिनी पर्यटक निवासात वास्तव्य येणाऱ्या पर्यटकांचे विमानतळ, बस स्थानक, रेल्वे स्टेशन अशा ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन जागतिक पर्यटन दिनाच्या शुभेच्छा देत स्वागत करण्यात येईल. पर्यटक निवासामध्ये सदर दिवशी येणाऱ्या पर्यटकांसाठी विविध स्पर्धा तसेच पारंपारिक खेळाचे आयोजन असेल. जागतिक पर्यटन दिनाच्या औचित्य साधत सर्व उपहारगृहामध्ये त्या त्या भागातील स्थानिक प्रसिध्द असलेले विशेष पदार्थ तयार करण्यात येणार असुन त्याबाबत उपहारगृहाच्या प्रवेशद्वारावर पर्यटकांना सूचना फलकाद्वारे अवगत करण्यात येणार आहे. जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटकांकरिता अनुभवात्मक पर्यटनाची सांगड घालताना ज्यामध्ये वास्तव्यास आलेले अतिथी पर्यटकांना निवासाभोवताली असलेल्या नजीकच्या सुरक्षित- पर्यावरण पूरक ठिकाणी ट्रेक, जंगल ट्रेल नॅचरल Walk इ. चा मनमुराद आस्वाद पर्यटकांना देण्यात येणार आहे. ‘पर्यटनावर पुनर्विचार’ या विषयावर विविध स्पर्धा तसेच व्याख्यानमाला, कलाकारांच्या कलेतून प्रबोधन इ. आयोजन करण्यात येणार आहे. ‘पर्यटन सप्ताह हा पर्यटनाशी पुरेपूर निगडित राहील व आपण आयोजित करत असलेल्या उपक्रमांद्वारे पर्यटनवाढ वृद्धिंगत होण्यास राष्ट्रास नक्कीच हातभार लाभेल, या दृष्टीने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून पर्यटन दिन साजरा करण्यात यावा, अशा सूचना महामंडळाच्या व्यवस्थापकिय संचालक मा. जयश्री भोज यांनी सर्वांना दिल्या आहेत. मा. व्यवस्थापकिय संचालक यांच्या संकल्पनेनुसार आणि मा. महाव्यवस्थापक श्री. चंदशेखर जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यटकांसाठी नवनवीन उपक्रमांची पर्वणीच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडुन सादर करण्यात येत आहे. ऐतिहासिक स्थळी पदयांत्रांचे आयोजन, छोटया मॅरथॉन, गायन व वादनाचे कार्यक्रम, ग्रामीण भागांचे दर्शन, शालेय मुलांसाठी विविध उपक्रम, जबाबदार आणि पर्यावरण पुरक पर्यटनाच्या अंतर्गत जंगल आणि शेती येथे पदभ्रमंती असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या निमित्ताने पर्यटन राजधानी औरंगाबाद येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, विनीत फाउंडेशन आणि औरंगाबाद Ploggers यांच्या संयुक्त विदयमाने “Microplastic Plogging” या नाविण्यापूर्ण उपक्रमासोबतच दि. 27/09/2022 रोजी Cyclothon सायक्लोथॉन चे आयोजन करण्यात आले आहे. पर्यावरणासाठी पुरक असे स्वच्छता अभियान, समुद्रकिनारा सफाई, हस्तकला, गडभ्रमंती असे उपक्रम सर्वत्र राबविण्यात येत आहेत. “Rethinking Tourism” म्हणजेच पर्यटनाचा पुनर्विचार करताना पर्यावरण आणि जबाबदार पर्यटनाची सांगड घालण्यात येणार आहे. पर्यटकांनी या उपक्रमांमध्ये भाग घेवुन पर्यटनाचा आनंद घ्यावा तसेच पर्यावरण रक्षणामध्ये आपला सहभाग नोंदवावा,
श्री. दिपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ….
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डॉ.रामचंद्र देखणे यांना श्रद्धांजली
मुंबई,दि. २५:- ‘ महाराष्ट्राच्या संत साहित्य आणि लोकसाहित्य परंपरेचा संशोधन, अभ्यासातून जागर घालणारा निस्सीम पाईक गमावला आहे,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री ज्येष्ठ प्रवचनकार, भारूडकार डॉ. रामचंद्र देखणे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, वारकरी संप्रदायाचा वारसा जपतानाच डॉ. देखणे यांनी संत साहित्याचा, लोकसाहित्याचा आत्मियतेने अभ्यास केला. भारूड या लोकसाहित्याचा त्यांनी संशोधनात्मक ध्यास घेतला.हा विषय समजावून देण्यासाठी त्यांनी विदेशात जाऊन असंख्य कार्यक्रम केले. नव्या पिढीसाठी त्यांनी संशोधक, मार्गदर्शकाची भूमिका नेटाने निभावली. लोकसाहित्याविषयीची त्यांची तळमळ आणि संशोधन सदैव स्मरणात राहील. ज्येष्ठ प्रवचनकार, भारूडकार डॉ. रामचंद्र देखणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.’ 0000
पुणे : कला, गायन, वादन, नृत्य आणि संगीताचा मिलाफ असणाऱ्या पुणे नवरात्रौ महोत्सवास सोमवारी दिमाखदार आणि रंगारंग सोहळ्याने प्रारंभ झाला. महोत्सवाचे यंदाचे २८ वे वर्ष आहे.
स्वारगेट येथील गणेश कला क्रिडा रंगमंच मध्ये आयोजित महोत्सवाचे उद्घाटन माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत माजी आमदार उल्हास पवार होते. यावेळी प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष व माजी मंत्री रमेश बागवे, मोहन जोशी, दिप्ती चवधरी, बाळासाहेब शिवरकर, माजी महापौर कमल व्यवहारे, जयश्री बागुल, उद्योजक कृष्णकुमार गोयल यांच्यासह चित्र तारका व अभिनेत्री पूजा बिरारी, पूर्वा शिंदे, भार्गवी चिरमुले, मीरा जोशी, गौरी कुलकर्णी, तेजा देवकर, वैशाली जाधव आणि नुपूर दैठणकर या अभिनेत्री या सोहळ्यास उपस्थित होत्या.
यावेळी विवध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. डी. पाटील, पोलीस अधिक्षक मितेश घट्टे, अभिनेते – दिग्दर्शक प्रवीण तरडे, सामाजिक नेते अंकूश काकडे आणि लावणी सम्राज्ञी प्रियांका गौतम आदींना यावेळी श्री लक्ष्मीमाता जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
बाळासाहेब थोरात म्हणाले, या महोत्सवाच्या माध्यमातून धमाल कार्यक्रम व नियोजन पहायला मिळाले. आबा बागुल विधानसभेत येणे गरजेचे आहे. आबा चैतन्यमय व्यक्तीमत्व आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीचा महोत्सव आहे, याला आंतरराष्ट्रीय दर्जाचा महोत्सव म्हंटले तर काही वावगे ठरणार नाही. पुणे हे जशे शिक्षणाचे माहेर घर आहे, तसेच हे सांस्कृतिक शहर आहे. या शहरात मोठ्या प्रमाणात कलाकार आहेत. अंकुश काकडे, उल्हास पवार, मोहन जोशी यांच्याकडे पाहिल्यावर नवी पिढी कुठे आहे, असे प्रश्न मनात येतो.
डॉ. पी. डी. पाटील माझे आवडत व्यक्तीमत्व आहे. साहित्य संमेलनाच्या इतिहासात त्यांचे नाव सुवर्ण आक्षरांनी लिहीले आहे.
कधी कधी खूप वाईट बातम्या ऐकल्यावर आपले मन व्यथीत होते. महिलांवर अत्याचार होतात, त्यांच्या घरच्यांना मारतात आणि आरोपी बाहेर आल्यावर त्यांची सत्कार व मिरवणुक काढली जाते, हा प्रकार माणुसकीला कलंक आहे.
अंकुश काकडे यांनाच अद्याप संधी मिळालेली नाही. राष्ट्रवादीत त्यांना संधी मिळेल असे वाटत नाही. असे असताना काकडे यांनी आबांना ऑफर देणे योग्य नाही. उलट काकडे यांनीच आमची ऑफर स्विकारावी असे मिस्किलपणे ते म्हणाले.
उल्हास पवार म्हणाले, मी आणि मोहन जोशी पहिल्या नवरात्रौ महोत्सवापासून गेली २८ वर्षे या सोहळ्यात सहभागी होत आहोत. ग्रामीण भागातून सर्वसामान्य कुटुबात जन्म घेवून डॉ. पी. डी. पाटील यांनी मोठे काम केले. त्यांनी कोरोनाच्या काळात अनेकांना मदत केली. त्यांना माणुसकीची जाण आहे. त्यांचे संपूर्ण कुटुंब धार्मिक आहे. अंकुश काकडे आमचे जगन्मित्र आहेत. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात दुखाचे व आनंदाचे क्षण येत असतात. स्वत:चे दु:ख विसरून दुसऱ्यांना हसवत राहणे, खूप अवघड काम आहे, हे काम अंकुश काकडे करतात. प्रवीण तरडे यांच्या चित्रपटापासून समाजाला अनेक गोष्टी शिकता येतात. लोकाभिमूख नगरसेवक व कल्पक बुद्धीचा नगरसेवक कसा असावा याचे उदाहरण म्हणजे आबा बागुल, असेही पवार म्हणाले.
डॉ. पी. डी. पाटील म्हणाले, आजचा दिवस दृढनिश्चयाचा आहे. या दिवसी आमचा सन्मान झाल्याने आम्ही भाग्यवान आहोत. मितेश घट्टे म्हणाले, माणुसकी व माणुसकीचे महत्व कोरोनाच्या काळात समजले. त्या काळात जे कार्य केले, त्याची पोहोच पावती या पुरस्काराच्या माध्यमातून मिळाली.
प्रवीण तरडे म्हणाले, अनेक चित्रपट लिहीले, पण मी हा पुरस्कार मुळशी पॅटर्नसाठी स्विकारतो. शेती विकायची नसते तर राखायची असते, हा संदेश मी दिला.
अंकुश काकडे म्हणाले, गेली २८ वर्षे बागुल परिवार हा महोत्सव साजरा करत आहेत. त्यांना आता मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडियावर महोत्सव घ्यायचा आहे. त्यासाठी आबाला बाळासाहेब थोरातांनी मुंबईला न्यावे, नसेल तर आबांनी हातात घड्याळ बांधावे, त्यांना पाहिजे ते मिळेल असे मिस्किलपणे ते म्हणाले .
प्रियंका गौतम म्हणाल्या, बागुलयांनी मला सन्मान देवून नवीन कलाकाराचा सन्मान केला आहे. माझे आई वडील शिक्षकआहेत, तरीही मी कलेसाठी लावणी नृत्य करते. आई वडीलांनी मला कायमचा पाठिंबा दिला.
महोत्सवाचे मुख्य आयोजक अध्यक्ष माजी उपमहापौर आबा बागुल यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की महोत्सव सुरु करने सोपे असते मात्र चालू ठेवणे अवघड असते. गेली २८ वर्षे हा महोत्सव सुरु आहे हे केवळ श्री लक्ष्मी मातेच्या कृपेनेच.
प्रारंभीमहाकाली चंड चामुंडा हा नृत्याविष्काराने महोत्सवास सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात केली. नादरूप संस्थेच्या नृत्य गुरू शमा भाटे यांनी त्यांच्या शिष्यांसह महाकाली चंड चामुंडा हा नृत्याविष्कार सादर करून महोत्सवाची सुरूवात केली.
– रत्ना दहिवलेकर महाराष्ट्राची संस्कृती व स्त्री हा विशेष कार्यक्रम सादर केला.- विनोद धोकटे, स्वाती धोकटे यांनी अवतार जगदंबेचा कार्यक्रम सादर केला.- सँण्डी डान्स अॅकेडमीतर्फे बॉलिवूड 2022 हा नृत्य व संगीताचा धडाकेबाज कार्यक्रम सादर केला. – पायल वृंद तर्फे अभिनेत्रींनी कॅलिडोस्कोप दिलखेचक नृत्याविष्कार सादर केला. या नृत्याविष्काराते दिग्दर्शन अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे यांनी केले आहे. यामध्ये पूजा बिरारी, पूर्वा शिंदे, भार्गवी चिरमुले, मीरा जोशी, गौरी कुलकर्णी, तेजा देवकर, वैशाली जाधव आणि नुपूर दैठणकर यांनी नेत्र दीपक नृत्य विष्कार सदर करून डोळ्याचे पारणे फेडले. या सांस्कृतिक कार्यक्रमानंतर दीपप्रज्वलन व आरती होऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. घनशांम सावंत यांनी आभार मानले.
उद्घाटन समारंभानंतर गफार मोमीन, रामेश्वरी वैशंपायन, प्रीती पेठकर आणि मोनाली दुबे यांनी वाद्यवृंदासह स्वरसम्राट महमंद रफी यांच्या सदाबहार हिंदी गीतांचा कार्यक्रम सादर केला.
पुणे- राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी उद्या सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठासमोर होणार आहे. या सुनावणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदार अपात्र ठरल्यास राज्यातील सरकार कोसळणार असून त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते.असे
वक्तव्य काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केले.
बाळासाहेब थोरात आज पुणे नवरात्र महत्वाच्या उद्घाटनाला आले होते तेव्हा त्यांनी प्रसारमाध्यमांची संवाद साधला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यातील सर्वच पक्ष प्रयत्न करत असताना शिंदे-फडणवीस सरकारमधील आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मराठ्यांना ‘आरक्षणाची खाज’ सुटली आहे, असे अत्यंत आक्षेपार्ह व बेजबाबदार विधान केले आहे. त्यावर बाळासाहेब थोरात म्हणाले,मंत्री म्हणजे जबाबदार व्यक्तिमत्त्व असत.सगळे मराठा समाजाला आंदोलना साठी प्रयत्न करत होते .त्या सगळयाचा अपमान केला आहे .अस वाटतंय. पुण्यात पीएफआयच्या आंदोलनतील पाकिस्तान जिंदाबाद घोषणेचा मुद्दा चांगलाच तापू लागलाय. पीएफआयच्या आंदोलनाच्या आयोजकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो परत पुणे पोलिसांनी गुन्हा मागे घेतला आहे. त्यावर थोरात म्हणाले,बंदी घातली पाहिजे आशा संघटनेवर का भाजप बंदी घालत नाही.त्यांना पाठिशी घालत आहे.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला भरपूर प्रतिसाद भेटत आहे त्यावर बाळासाहेब थोरात म्हणाले,सर्व समाज राहुल गांधी यांच्या यात्रेत सहभागी होत आहेत. १९४२ ला जसे झाले तसे राहुल गांधी भारत जोडो काम करत आहेत कोणी काही बोलाव हा त्याचा प्रश्न आहे. तसेच ,खरोखरच महाविकास आघाडी यांनी वेदात साठी प्रयत्न केले होते.तरुणांचे रोजगार घालवले. गुजरात खुश करण्याच काम या सरकारने केलंय अशी टीकाबाळासाहेब थोरात यांनी शिंदे व फडणवीस सरकार वर केली.
महानगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस स्वबळावर असून काँग्रेस महापालिकेत किती जागा लढवणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. त्यावर बाळासाहेब थोरात म्हणाले, महापालिका निवडणुकीच्या वेळी म्हणून काम करू त्या त्या वेळी भूमिका ठरवू. तसेच शिंदे वफडणवीस सरकारने पालकमंत्र्यांची नियुक्ती दोन तीन महिन्यांनी केली आहे. त्यावर बाळासाहेब थोरात म्हणाले,पालकमंत्री केलं याचाच कौतुक,जनतेचे प्रश्न राहिले,आता काम करावे एवढीच अपेक्षा
पुणे -संतसाहित्याचे आणि लोकवाडःमयाचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ भारूडकार डॉ. रामचंद्र अनंत देखणे (वय ६६ वर्षे) यांचे सोमवारी सायंकाळी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.घटस्थापनेमुळे डॉ. देखणे हे शनिवार पेठेतील घरीच होते. सायंकाळी सातच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. कुटुंबियांनी तातडीने त्यांना खासगी रुग्णालयात नेले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. डॉ. देखणे यांचा फिटनेस चांगला होता. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार होणार आहेत.
मुंबई, दि. 26 : विविध 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 165 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबर 2022 ऐवजी आता 16 ऑक्टोबर 2022 रोजी मतदान होईल; तर मतमोजणी 14 ऑक्टोबर 2022 ऐवजी आता 17 ऑक्टोबर 2022 रोजी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकाद्वारे देण्यात आली.राज्य निवडणूक आयोगाने 07 सप्टेंबर 2022 रोजी 1 हजार 166 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यात सदस्यपदांसह थेट सरपंचपदाचाही समावेश आहे. सुधारित कार्यक्रमानुसार 16 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 17 ऑक्टोबर 2022 रोजी होईल. मतमोजणीचे ठिकाण व वेळ संबंधित तहसीलदार जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने निश्चित करतील, असेही आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.
अहमदाबाद, दि. 26 : गुजरात राज्यातील जुनागढ येथील सक्करबाग उद्यानात असलेल्या नर सिंह आणि मादी सिंहांची जोडी (आशियाटिक लॉयन ) मुंबई येथील बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात लवकरच दिसणार आहे. या बदल्यात बोरिवली येथील वाघ (नर आणि मादी ) जुनागढ येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. गुजरातचे वन राज्यमंत्री श्री. जगदीश विश्वकर्मा व श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्यात आज सोमवार, 26 सप्टेंबर रोजी अहमदाबाद येथे यासंदर्भात चर्चा झाली.
प्रस्तावाबाबत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवलीकडून प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्य जीव) श्री सुनील लिमये व जुनागढ सक्करबाग उद्यानाचे संचालक अभिषेक कुमार यांच्यात यासंदर्भात चर्चा झाली होती. 4 एप्रिल 2022 रोजी अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ क्लेमन्ट बेन आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली चे संचालक जी मल्लिकार्जुन यांनी प्रधान मुख्य वन संरक्षक श्री सुनील लिमये यांच्या निर्देशानुसार गुजरातचे प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्याशी चर्चा केली व कार्यवाही सुरू केली होती.
त्यावर श्री. सुधीर मुनगंटीवार आणि गुजरातचे राज्यमंत्री श्री. विश्वकर्मा यांनी सोमवारी 26 सप्टेंबर ला विस्तृत चर्चा केली. केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरण यांच्याकडून या प्रस्तावास मान्यता मिळविण्यासाठी एकत्र प्रयत्न करण्याचे यावेळी ठरले.