पुणे :
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी च्या ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहा’ निमित्त पुण्यात २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती आणि जागतिक अहिंसा दिनाच्या निमित्ताने सकाळी आठ वाजता शुभांगी मुळे आणि सहकाऱ्यांचा प्रार्थना आणि भजनाचा कार्यकम होणार आहे. याच दिवशी लोकमान्य टिळक पुतळा (महात्मा फुले मंडई) ते सेनापती बापट पुतळा (अलका टॉकीज चौक) ते या मार्गावर दंगलमुक्त पुण्याचा संदेश घेऊन सकाळी साडेआठ वाजता ‘शांती मार्च’ काढण्यात येणार आहे. पुणे शहर कायम दंगामुक्त राहावे, या संकल्पासाठी हा शांती मार्च काढण्यात येणार आहे. गांधी जयंती निमित्त स.१० ते दु. ३ दरम्यान सर्वांकरीता प्रसाद भोजन आयोजित करण्यात आले आहे. लहान मुलांसाठी जादूगार संजय रघुवीर यांचे जादूचे प्रयोग दुपारी ४ वाजता होतील.
३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता ‘संसदीय लोकशाहीचे भवितव्य ‘ या विषयावर डॉ उल्हास बापट यांचे व्याख्यान होणार आहे. ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता ह. भ . प. शामसुंदर सोन्नर महाराज यांचे कीर्तन होणार आहे. ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता ‘ पर्यावरणवादी कार्यकर्ते बंडू धोत्रे (चंद्रपूर) यांचे व्याख्यान होणार आहे. ७ ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे (संपादक,लोकमत ,पुणे ) यांच्या उपस्थितीत सप्ताहाचा समारोप कार्यक्रम होणार आहे.
गांधी भवन आवारात खादी ,हातमाग आणि विविध गृहोपयोगी वस्तूंचे स्टॉल्सचे प्रदर्शन २४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.
‘राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहा’ निमित्त शांती मार्च
पिंपरी चिंचवड महापालिकेचे बंद पडलेले स्विमिंग पूल सुरू करा आम आदमी पार्टीची आयुक्तांना कडे मागणी
पुणे-
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे बंद पडलेले स्विमिंगपूल पूर्ववत सुरू करा अशी आम आदमी पार्टीने अतिरिक्त आयुक्त राजेंद्र वाघ यांच्याकडे मागणी केली, त्यांनी चर्चेअंती पंधरा दिवसात स्विमिंग पूल सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. त्याच बरोबर आणखी मागण्या करण्यात आल्या आहेत यावेळी आपचे शहर संपर्कप्रमुख वैजनाथ शिरसाट, आपचे प्रवक्ते प्रकाश हगवणे, डॉक्टर विंग अध्यक्ष डॉ.अमर डोंगरे, आपचे युवा नेते राष्ट्रीय खेळाडू राहुल धोत्रे, सुरेश बावनकर, आप महिला नेत्या सिताताई केंद्रे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कोरोना पासून गेली दोन वर्ष शहरातील सर्व स्विमिंग पूल बंद आहेत ते तातडीने सुरू करण्यात यावेत, अण्णासाहेब मगर स्टेडियम चे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, स्टेडियम मध्ये ऑलिम्पिकच्या 20 खेळासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यवस्था करण्यात यावी जेणेकरून खेळाडूंना चालना मिळेल. क्रीडा प्रबोधनी शाळांमध्ये खेळाडूंसाठी सेमी इंग्लिश चा अभ्यास सुरू करण्यात यावा, पिंपरी चिंचवड मधील जे खेळाडू आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय लेव्हलवर खेळतात त्यांचे मानधन स्कॉलरशिप वाढविण्यात यावी, ऑलम्पिक मधील प्रत्येक खेळासाठी स्वतंत्र असे स्टेडियम बनवण्यात यावे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ज्या शाळेमध्ये क्रीडा शिक्षक नाहीत त्या शाळेमध्ये त्वरित शिक्षकांची नेमणूक करण्यात यावी अशा मागण्या आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आले आहेत या मागण्या त्वरित मंजूर कराव्यात अन्यथा आम आदमी पार्टी जन आंदोलन उभं केल्याशिवाय राहणार नाही असे आपचे युवा नेते राष्ट्रीय खेळाडू राहुल धोत्रे यांनी म्हटले
आपच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाधववाडी येथे कोपरा सभा संपन्न
पुणे-आम आदमी पार्टीच्या वतीने चिखली जाधववाडी येथील, आहेरवाडी चौक येथे आपच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कोपरासभा संपन्न. या प्रभागातील आम आदमी पार्टीच्या इच्छुक उमेदवार सिताताई केंद्रे यांच्या प्रचारार्थ कोपरा सभा पार पडली, यावेळी बोलतांना सिताताई केंद्रे यांनी प्रभागातील अनेक समस्यांची पोलखोल केली, त्यांनी सांगितले आम आदमी पार्टीची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सत्ता आल्यास महापालिकेत उच्चदर्जाच्या शाळा, दररोज मोफत पाणी देण्यात येईल, महिलांसाठी बस फ्री करण्यात येईल, शास्तिकराचा विषय कायमचा मार्गी लावण्यात येईल असे त्यांनी म्हटले,
वैगेली वीस वर्षे सिताताई केंद्रे त्याप्रभागांमध्ये सामाजिक कार्य करत आहेत, त्यांना स्थानिकांसह ओबीसी समाजाचा मोठा पाठिंबा या भागांमधून आहे. त्या संघर्ष मित्र मंडळ ट्रस्ट अध्यक्षा आहेत.
यावेळी आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहर संपर्कप्रमुख वैजनाथ शिरसाट यांनी बोलतांना म्हटले महागाईने जनता मेटाकुटीला आलेली आहे येणाऱ्या काळात ही जनता भाजपला घरी
बसविल्याशिवाय राहणार नाही असे त्यांनी म्हटले,
या वेळी आपचे प्रवक्ते प्रकाश हगवणे बोलतांना म्हटले एकेकाळी श्रीमंतीचा रुबाब असणारी महानगरपालिका सत्ताधार्यांच्या कोट्यावधीच्या घोटाळ्यामुळे भिकेचे डोहाळे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. सत्ताधारी आणि विरोधक आणि प्रशासक या महानगरपालिकेमध्ये यांचे लागेबांधे आहेत. अंदर की एक बात है हम सब एक है अशाप्रकारे विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांच्या हातात हात घालून फिरत असतात. अनेक कामाच्या निविदा वाजवी दरात करून त्यामधून टक्केवारीचे गणित सांभाळणे हा उद्योग ह्या महानगरपालिकेमध्ये सर्रास चालू आहे. अनेक कंत्राटदार महानगरपालिकेच्या कामामुळे गर्भ श्रीमंत झाले आहेत . आपची महापालिकेत सत्ता आली तर हा भ्रष्टाचार मोडीत काढला जाईल.
या वेळी शहर आप चे डॉक्टर विंग अध्यक्ष डॉ.अमर डोंगरे, राष्ट्रीय खेळाडू राहुल धोत्रे, आप युवा नेते भीम मांगडे, ब्रह्मानंद जाधव,रनावरे ताई, आदी पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या शब्दात भाजप सरकारचे वाभाडे काढले,
यावेळी आम आदमी पार्टीचे कमलेश रणावरे, सुरेश बावनकर, सुनील शिवशरण, सुरेश भिसे, बालाजी कांबळे, ओम डांगे, दत्तात्रय सांगवे, मेघा गरिबे, भाग्यश्री टोम्पे, प्रथमेश बोरुळे, सुरेश कांबळे, अनिल टाकळे, राहुल कांबळे, सुजित रजपूत ,आकाश कवठेकर ,तुकाराम इंगोले ,गुलाब कांबळे ,शिवराज इंगोले ,विष्णू घोरवाड, वैभव कौशल्य, राजू इंगोले, वैभव इंगोलेळ, गजू इंगोले, साईनाथ इंगोले, मधुकर काउटकर, देवी इंगोले, प्रभाकर इंगोले, विठ्ठल सावंत, पवन इंगोले, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
माया सांगवे यांनी आभार व्यक्त केले
बाजीप्रभुंच्या करारी भूमिकेत दिसणार अभिनेता शरद केळकर
झी स्टुडियोजची निर्मिती असलेल्या आणि अभिजित देशपांडे यांच्या दिग्दर्शनाने सजलेल्या बहुप्रतिक्षीत ‘हर हर महादेव’ या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. हरहुन्नरी अभिनेता सुबोध भावे चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार असल्याने यातील इतर कलाकारांबद्दल जाणून घेण्याची उत्कंठा अधिकच वाढली आहे. आज समाजमाध्यमावर (सोशल मीडियावर) या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रकाशित करण्यात आले असून त्यातून आणखी एका दमदार अभिनेत्याचा तेवढ्याच दमदार भूमिकेतला लूक प्रेक्षकांसमोर आला आहे. हा अभिनेता म्हणजे मराठी – हिंदी चित्रपटांत आणि वेबसिरीजमध्ये विविधांगी भूमिका साकारणारा शरद केळकर. ‘हर हर महादेव’ या चित्रपटात शरद केळकर बाजीप्रभू देशपांडेंची करारी व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. येत्या दिवाळीत हा चित्रपट झी स्टुडियोजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
हर हर महादेव ही केवळ गर्जना नव्हती तर ती छत्रपतींच्या स्वराज्यासाठी लढणा-या मावळ्यांचा महामंत्र होता. समोरचा गनिम कितीही शक्तिशाली असो त्याला सळो की पळो करुन सोडण्यासाठीची उर्जा निर्माण करणारी, मावळ्यांना नवी उमेद देणारी शिवगर्जना म्हणजे हर हर महादेव. हाच हर हर महादेवचा महामंत्र जपत बाजीप्रभू देशपांडे यांनी सिद्दी जौहरच्या सैन्याविरुद्ध घोडखिंड लढवली आणि आपल्या प्राणाची आहूती देत घोडखिंड पावन केली. बाजीप्रभूंच्या याच लढवय्या करारी बाण्याची गाथा अतिशय भव्य दिव्य स्वरुपात ‘हर हर महादेव’ या चित्रपटात दिसणार आहे. त्याचा प्रत्यय आज प्रकाशित झालेल्या मोशन पोस्टरमधून आणि त्यातील संवादातून येत आहे. “जोवर तोफा ऐकू येणार नाहीत तोवर आई विंझाईची आण आहे मला, एकही गनीम ही खिंड पार करु शकणार नाही… हा शब्द आहे बाजीचा.” शरद केळकरच्या दमदार आवाजात हा संवाद ऐकताना अंगावर अक्षरशः शहारा आल्याशिवाय राहत नाही.
या भूमिकेबद्दल बोलताना शरद केळकर म्हणाले की,“आपण लहानपणापासूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढायांच्या, गनिमी काव्याच्या, त्यांच्या मावळ्यांच्या शौर्याच्या अनेक प्रेरणादायी कथा वाचत आलेलो आहे. बाजीप्रभुंच्या पावनखिंडीची वीरगाथा ही त्यापैकी एकच. बाजीप्रभू या व्यक्तिमत्वाबद्दल जेव्हा जेव्हा आपण वाचतो तेव्हा एकच गोष्ट जाणवते ती म्हणजे छत्रपती शिवराय आणि स्वराज्याप्रती त्यांची असलेली कमालीची निष्ठा आणि प्रेम. घोडखिंडीमध्ये त्यांनी केलेला पराक्रम हा आपल्या सर्वांसाठी कायम प्रेरणादायी असाच आहे. अशा बाजीप्रभुंची भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली याबद्दल मी स्वतःला अत्यंत भाग्यवान समजतो. ही गोष्ट तेवढ्याच प्रखरपणे आणि सच्चेपणाने प्रेक्षकांसमोर येण्यासाठी चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित देशपांडे आणि संपूर्ण टीमने अत्यंत मेहनत घेतली आहे. प्रेक्षकांना ही गोष्ट नक्कीच भावेल याबाबत माझ्या मनात शंका नाही.”
या चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेबद्दल बोलताना दिग्दर्शक अभिजित देशपांडे म्हणाले की, “एक लेखक दिग्दर्शक म्हणून अनेक विषय, गोष्टी तुम्हाला कायमच खुणावत असतात आणि आव्हानही देत असतात. माझ्याबाबतीत ही गोष्ट होती छत्रपती शिवरायांची. महाराजांच्या आयुष्यावर त्यांच्या लौकिकाला साजेसा असा भव्य चित्रपट निर्माण करण्याची आणि त्यांच्या शौर्याची गाथा तेवढ्याच रंजक पद्धतीने सांगण्याची मनात कायम इच्छा होती. या इच्छेतून आणि महाराजांच्या कार्याच्या प्रेरणेतूनच हर हर महादेव चित्रपट करायचं ठरवलं. छत्रपती शिवरायांचा त्यांच्या मावळ्यांवर असलेला विश्वास आणि मावळ्यांची महाराजांप्रती असलेली निष्ठा ही आपल्याला कायमच भावते. ‘हर हर महादेव’ची कथासुद्धा महाराज आणि बाजीप्रभू यांच्या या दृढ नात्यावर आधारलेली आहे. ही केवळ एक शौर्यगाथा नाही तर त्याला या नात्याची एक भावनिक किनारही आहे. ही गोष्ट प्रेक्षकांना नक्कीच भावेल असा विश्वास आहे. या चित्रपटासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट होती ती यातील कलाकारांची निवड. सुदैवाने मला महाराजांच्या भूमिकेसाठी सुबोध भावे आणि बाजीप्रभुंच्या भूमिकेसाठी शरद केळकर यांच्यासारखे बहुगुणी कलाकार लाभले. या दोघांनीही त्यांना मिळालेल्या या भूमिकांचं सोनं केलेलं आहे. याशिवाय झी स्टुडियोज सारखी नावाजलेली निर्मितीसंस्था आणि सुनील फडतरे यांची श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्म्स ही निर्मितीसंस्था पाठीशी खंबीरपणे उभी राहिली ज्यामुळे निर्मितीमुल्यांच्या बाबतीत हा चित्रपट एका वेगळ्या उंचीवर गेला आहे.”
झी स्टुडियोज आणि दिवाळी सणाचं एक विशेष नातं आहे. दरवर्षी दिवाळीच्या उत्सवात अधिक भर घालण्यासाठी झी स्टुडियोजच्या माध्यमातून दर्जेदार चित्रपटांची भेट प्रेक्षकांना देण्यात येते. यावर्षी तर ‘हर हर महादेव’ हा विशेष नजराणा त्यांनी प्रेक्षकांसाठी आणला आहे. याशिवाय केवळ मराठीतच नाही तर हिंदी, तामिळ, तेलगु, मल्याळम आणि कन्नड या भाषांमधूनही हा चित्रपट एकाच दिवशी भारतभर प्रदर्शित होणार असल्याने हा चित्रपट तमाम भारतीयांसाठी दिवाळीची विशेष भेट ठरणार आहे.
श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळ ट्रस्टतर्फे अग्निशमन दलातील अधिकारी व जीवरक्षकांचा सन्मान
पुणे : केवळ गणेशोत्सव व नवरात्रीच नाही, तर वर्षभर समाज शांतपणे झोपावा, याकरिता पोलीस, स्वच्छता कर्मचारी, डॉक्टर्स आणि अग्निशमन दलातील जीवरक्षक काम करीत असतात. केवळ आग विझविणे हेच त्यांचे काम नसून इतरही अनेक संकटांमध्ये ते समाजासाठी कार्यरत असतात. सिमेवर ज्याप्रमाणे सैनिक कार्यरत असतात, त्याचप्रमाणे शहराच्या अंतर्गत सुरक्षेचे महत्वाचे काम अग्निशमन दल करते, असे प्रतिपादन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळ ट्रस्टतर्फे बाजीराव रस्त्यावरील नू.म.वि.प्रशालेच्या सभागृहात जनतेला सेवा देणा-या अग्निशमन दल अधिकारी व जीवरक्षकांचा कृतज्ञता गौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी महापालिका उपायुक्त माधव जगताप, हेमंत रासने, पराग ठाकूर, महेश सूर्यवंशी, ॠग्वेद निरगुडकर, प्रसाद कुलकर्णी, विवेक खटावकर, अनिल सकपाळ, पुनीत बालन, संदीप खर्डेकर, राजेश येनपुरे, राजेश दातार, मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, विनायक कदम, नितीन पंडित, गणेश रामलिंग, मोहन साखरिया, किरण चौहान, साई डोंगरे आदी उपस्थित होते.
अग्निशमन दल प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांसह जीवरक्षकांचा सन्मान यावेळी करण्यात आला. तसेच श्री तुळशीबाग गणपती मंडळात वर्षभर सेवा देणा-यांना देखील गौरविण्यात आले. श्रीं ची प्रतिमा, महावस्त्र व श्रीफळ असे सन्मानाचे स्वरुप होते. मागील १५ वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबविला जातो.
चंद्रकांत पाटील म्हणाले, कोठेही दुर्घटना होवू नये व झाल्यास त्याचे त्वरीत निराकारण व्हावे, याकरिता महत्वाची भूमिका अग्निशमन दल बजावते. त्यांच्या कार्याचा सन्मान आपण करणे गरजेचे आहे. तसेच त्यांंन अद्ययावत साधने देखील पुरविणे आवश्यक आहे. अग्निशमन दलासह पोलीस, स्वच्छता कर्मचारी आणि समाजासाठी कार्य करणा-या व्यक्ती व कुटुंबांकरिता कायमस्वरुपी काम उभे रहायला हवे. तसेच प्रत्येक व्यक्तिला नैसर्गिक किंवा मानवनिर्मीत संकटांना सामना करण्याचे प्राथमिक शिक्षण येणे, ही आजची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले. नितीन पंडित यांनी सूत्रसंचालन केले.
पुण्याचे दु:ख संपविण्याची ताकद गणेश मंडळांमध्ये – चंद्रकांत पाटील
गणेश मंडळांकडे समाजाकडून येणारा पैसा मोठया प्रमाणात गोळा होतो. त्यामाध्यमातून अनेक ठिकाणी सामाजिक कार्य देखील सुरु असते. मात्र, या पैशाची साठवणूक व बचत न करता, हा सगळा पैसा समाजासाठी खर्च करायला हवा. चांगल्या कार्यासाठी पैसा खर्च झाल्यास समाजाकडून सातत्याने निधी गोळा होत असतो. समाजासाठी खर्च करुन पुण्याचे सर्व प्रकारचे दु:ख संपविण्याची ताकद गणेश मंडळांमध्ये असल्याचे यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
२०० मीटरचा परिसर आज सायंकाळी ६ वाजता निर्मनुष्य करा;जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला चांदणी चौक उड्डाणपूल कामाचा आढावा
पुणे दि.१: जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी चांदणी चौक परिसराला भेट देऊन तेथील जूना पूल पाडण्याच्या कामाच्या अंतिम तयारीबाबत माहिती घेतली. त्यांच्या समवेत पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय शिंदे, वाहतूक पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, एनएचएआयचे प्रकल्प संचालक संजय कदम, संबंधित यंत्रणेचे अधिकारी आदी उपस्थित होते.
पूल पाडण्यापूर्वी २०० मीटरचा परिसर सायंकाळी ६ वाजता निर्मनुष्य करावा. वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यासाठी आवश्यक पोलीस कर्मचारी नेमावेत. पूल पाडल्यानंतर राडारोडा नियोजित वेळेतच बाजूला केला जाईल याची विशेष दक्षता घ्यावी आणि त्यासाठी गरज असल्यास अतिरिक्त वाहने आणि मनुष्यबळ तैनात करावे, असे निर्देश डॉ.देशमुख यांनी दिले.
बाहेरून येणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्गाविषयी माहिती देण्यासाठी एनएचएआयने महामार्गावर ठिकठिकाणी माहितीचे फलक लावावेत. बावधन परिसरातील लहान रस्त्यांवर वाहतूक नियोजनासाठी पोलीस कर्मचारी नेमण्यात यावेत. आवश्यतेतनुसार आपत्कालीन नियोजन तयार ठेवावे, असे निर्देश पोलीस आयुक्त श्री.शिंदे यांनी दिले.
पोलीस उपायुक्त श्रीरामे यांनी पूल पाडण्याच्या वेळेत करण्यात येणाऱ्या वाहतूक नियोजनाची माहिती दिली.
असा पाडला जाईल जूना पूल
पूल पाडण्यासाठी त्याला दीड ते दोन मीटर लांबीचे आणि साधारण ३५ मिमी व्यासाचे १ हजार ३०० छिद्र पाडण्यात आले आहे. ६०० किलो इमल्शन स्फोटकांचा उपयोग करण्यात येणार आहे. १ हजार ३५० डिटोनेटरचा उपयोग नियंत्रीत पद्धतीने ब्लास्ट करण्यासाठी करण्यात येणार आहे. ब्लास्ट एक्स्पर्ट आनंद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामे करण्यात येत आहेत. रविवारी (२ ऑक्टोबर रोजी) पहाटे सर्व तयारी वेळेवर झाल्यास पहाटे १ ते २ च्या दरम्यान पूल पाडण्यात येईल.
पूल पाडतांना त्याचे तुकडे अथवा धूळ परिसरात उडू नये यासाठी ६ हजार ५०० मीटर चॅनल लिंक्स, ७ हजार ५०० वर्ग मीटर जिओ टेक्स्टाईल, ५०० वाळूच्या पिशव्या आणि ८०० वर्ग मीटर रबरी मॅटचा वापर आच्छादनासाठी करण्यात आला आहे. परिसरातील नागरिकांना सूचना देण्यात आल्या असून २०० मीटर परिघातील इमारतीतून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येणार आहे.
पुरेसे मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री
पूल पाडण्यासाठी आणि मार्ग मोकळा करण्यासाठी एनएचएआयतर्फे पुरेसे मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री उपयोगात आणली जात आहे. १६ एक्स्कॅव्हेटर, चार डोझर, चार जेसीबी, ३० टिप्पर, दोन ड्रिलींग मशीन, २ अग्निशमन वाहन, ३ रुग्णवाहिका, २ पाण्याचे टँकर आणि पूल पाडण्यापासून रस्ता मोकळा करेपर्यंत साधारण २१० कर्मचारी संबंधित यंत्रणतर्फे नियुक्त करण्यात आले आहेत.
सुरक्षा बंदोबस्त आणि वाहतूक नियोजनासाठी पुणे पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि पुणे ग्रामीण पोलीस दलातर्फे एकूण ३ पोलीस उपायुक्त, ४ सहायक आयुक्त, १९ पोलीस निरीक्षक, ४६ सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक तसेच ३५५ पोलीस कर्मचारी असे एकूण ४२७ पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त् करण्यात आले आहेत. नागरिकांनी पूल पाडण्याच्या वेळेत चांदणी चौक परिसरात येऊ नये आणि पोलीसांनी दिलेल्या वाहतूक विषयक सूचनांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी केले आहे.
सर्वसामान्याला केंद्रीभूत ठेऊन विकासकामे करावीत- चंद्रकांत दादा पाटील
पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडून जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा आढावा
पुणे, दि. १: जिल्हा परिषदेने सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रस्थानी ठेऊन विश्वस्ताच्या भूमिकेतून विकासाभिमुख कामे करावीत अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिल्या.
पुणे जिल्हा परिषदेची आढावा बैठक पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस आमदार राहूल कूल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश अवताडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, सचिन घाडगे, जामसिंग गिरासे, मिलिंद टोणपे यांच्यासह विविध विभागप्रमुख उपस्थित होते.
जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येणाऱ्या केंद्र शासनाच्या तसेच राज्य शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा प्रत्येक महिन्यात घेण्यात यावा, असे सांगून पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, केंद्राच्या योजनांचा मोठ्या प्रमाणात निधी येत असतो. त्यासाठी आवश्यक प्रस्ताव गतीने तयार करणे, मंजुरीसाठी पाठवणे तसेच त्यांचा केंद्रीय पातळीवर पाठपुरावा करण्यासाठी समन्वय अधिकाऱ्याची नेमणूक करावी. केंद्र तसेच राज्याच्या अधिकाधिक योजना राबवण्यासाठी जिल्हा परिषदेने प्रयत्न करावेत, अशाही सूचना श्री. पाटील यांनी केल्या.
यावेळी पालकमंत्री श्री. पाटील यांनी जिल्हा परिषदेतील विविध विभागांद्वारे राबवण्यात येत असलेल्या योजना व कामांची सविस्तर माहिती घेतली. अंगणवाडी बांधकाम, रस्ते, शाळा सुधार योजना, प्राथमिक आरोग्य केंद्रे आदींसाठी आवश्यक निधीची तरतूद केली जाईल असे सांगतानाच जनतेच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी प्राधान्याने निधीची तरतूद ठेवावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
विकास योजना निरीक्षण कक्षाचे उद्घाटन
तत्पूर्वी जिल्हा परिषदेत उभारलेल्या विकास योजना निरीक्षण कक्षाचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. या कक्षामार्फत जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येणाऱ्या विकास योजनांच्या आर्थिक, भौतिक प्रगतीचा आढावा घेण्यासह संगणकीय पद्धतीने सनियंत्रण केले जाणार आहे. त्यामुळे ही कामे गतीने मार्गी लावण्यासाठी या कक्षाचा उपयोग होईल असे मंत्री पाटील यावेळी म्हणाले.
यावेळी श्री. प्रसाद यांनी विविध विभागांच्या कामाचा तसेच आर्थिक बाबींचा आढावा सादर केला. फिरते पशुवैद्यकीय दवाखाने, जलशक्ती मिशनअंतर्गत लघु पाटबंधारे तलावांचे गाळ काढण्याचे काम, अंगणवाडी सुधार, ग्रामपंचायत इमारतींचे बांधकाम, कृषी विभागाच्या योजना, यशवंत घरकुल योजना आदींविषयी सादरीकरण केले. पशुंमधील लंपी आजारावर नियंत्रणासाठी जिल्हा परिषदेने गतीने लसीकरण केल्याचे त्यांनी सांगितले.
पदोन्नती मिळालेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात पदोन्नती आदेश मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. तसेच लम्पी स्कीन आजारामुळे पशू दगावलेल्या पशुपालकांना मदतीचे धनादेशही वितरीत करण्यात आले.
पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात ललित पंचमीनिमित कन्या पुजानाचा भव्य सोहळा
पुणे –
इयत्ता १ ली ते ४ थीतील ५०० हून अधिक मुली, रंगीबेरंगी ड्रेस, कपालावर चुनरी, स्तोत्र पठाण, लकी डॉ, खाऊ अशा उत्साही
वातावराणात शिव दर्शन परिसरातील श्री लक्षी माता मंदिराच्या प्रांगत ल्लीता पंचमी निमित्त पुणे नवरात्रौ महिला महोत्सव
अंतर्गत आज कन्या पूजन कार्यक्रम संपन्न झाला. प्रांगणात आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. सहभागी सर्व लहान
मुलींच्या कपाळावर चुनरी, ओम आणि कुमकुम टिलक लावण्यात आला. या सर्व लहान कन्यांचे पाय धुवून यावर स्वस्तिक चिन्ह
काढण्यात आले. त्यानंतर औक्षण करून गजरे देण्यात आले. यावळी या मुलीनी नवारी साडी, घागरा, पंजाबी ड्रेस असे
रंगीबेरंगी पोशाख परिधान केले होते. या प्रसंगी अनेक मुलीनी गणपती स्तोत्र, श्रीसूक्त, दुर्गास्तुती तोंडपाठ म्हणून दाखवली
आणि उपस्थितांची माने जिंकली. यावेळी पालक मोठ्या संख्यने उपस्थित होते. सहभागी सर्व मुलीना टीफीन, वॉटर बॅग,
क़ंमपास, लेजचे पाकीट व पायनापल शिरा देण्यात आला.
या प्रसंगी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक – अध्यक्ष आबा बागुल यांनी सर्वांचे स्वागत केले आणि प्रत्येकीला तू मोठी
झाल्यावर काय होणार असे विचारले. यावर अनेकींनी डॉक्टर, पोलीस इन्स्पेक्टर, शास्त्रज्ञ अशी उत्तरे दिली. यावर आबा बागुल
म्हणाले की मुलीना मोठी स्वप्ने बघुद्यात आणि त्यांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी पालकांनी विशेष मेहनत घेतली पाहिजे.
पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्ष जयश्री बागुल यांनी स्त्री भृण हत्येविरूद्ध आवाज उठवण्याचे आवाहन करून म्हटले
की पालकांनी याबाबत मुलगी झाली तरी आनंदच मानला पाहिजे. मुलीला खूप शिकवा किंवा विविध कलांमध्ये पारंगत करा.
त्याच बरोबर आपले कुटुंब नातेवाईक मित्र, शेजारी यासर्वांमध्ये स्त्री भृण हत्येबद्दल जागरण करा.
यावेळी माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे, माजी नगरसेविका नंदा लोणकर, झाम्बरे पॅलेसच्या सौ झाम्बरे आदींनी मुलींचे कौतुक
करून त्यांना आशीर्वाद दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता बागुल यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नम्रता
जगताप, सोनंम बागुल, श्रुतिका बागुल, प्राजक्ता ढवळे, प्रांजली गांधी, सुप्रिया सराफ आदींनी विशेष प्रयत्न केले.
यावेळी काढण्यात आलेल्या लकी डॉ चा निकाल –
प्रथम क्रमांक – गौरी सूर्यवंशी – सायकल.
द्वितीय क्रमांक – स्वर उपाध्ये – चांदीचे पैंजण.
तृतीय क्रमांक – रोहिता गिरी – स्टडी टेबल.
उत्तेजनार्थ पाच बक्षिसे – कॅम्लिन क्रेयॉन पूर्ण सेट.
उत्कृष्ट पोशाख – राजश्री किरवे, आरती आवारे.
‘यशस्वी जीवनासाठी स्वतःवर भरभरुन प्रेम करा’-अभिनेते डॉ. गिरीश ओक
पुणे : यशस्वी जीवन जगण्यासाठी स्वतःबरोबर प्रत्येक गोष्टींवर भरभरुन प्रेम करा, चांगल्याचे कौतूक करा. स्वतःच्या
शरीरावर प्रेम करा, आपली हेळसांड करु नका. कारण नटांची काया आणि वाचा या दोन गोष्टींवर सर्वस्व अवलंबून असते.
त्यामुळे आनंदी राहण्यासाठी स्वतःवर प्रेम करा, अशी भावना ज्येष्ठ अभिनेते व गायक डॉ. गिरीश ओक यांनी व्यक्त केली.
पुणे नवरात्रौ महोत्सवातर्फे शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त गणेश कला क्रिडा रंगमंच येथे सांस्कृतिक महोत्सव
आयोजित करण्यात आला आहे. ‘नास्टॅल्जिक मेलडीज्’ कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते डॉ. गिरीश ओक यांच्यासोबत गप्पा आणि
गाणी टीएमडी प्रस्तुत हिंदी जुन्या, नवीन गाण्यांचा कार्यक्रम पार पडला.
गायिका तेजस्विनी व्हीजी, ममता नेने, माधुरी भोसेकर, गायक गणेश मोरे, तुषार पिंगळे, कल्पेश पाटील व अभिनेते
डॉ. गिरीश ओक यांनी हिंदी चित्रपटीतील जुनी नवीन गाणी सादर केली. कार्यक्रमाचे निवेदन आरजे बंड्या यांनी केले.
‘साहेब विरुद्ध मी’ या नाटकातून 1984 मध्ये नाट्यसृष्टीत माझे पदार्पण झाले. ’38 कृष्ण व्हिला’ या नाटकातल्या
भूमिकेबद्दल डॉ. ओक म्हणतात, हे नाटकात उत्कंठा वाढवणारे आहे, गर्भीत रहस्य आहे ते लोकांपर्यंत नुसतं पोहोचवणं नाही, तर
प्रेक्षकाला गुंतवून ठेऊन त्या रहस्याची उकल व्यवस्थित करणे, रंजक करणे अशी भूमिका आहे. ते तुम्ही नक्की पहा. हे पन्नासावे
नाटक माझे सुरु असल्याचे गप्पाच्या कार्यक्रमातून डॉ. ओक यांनी आपल्या रंगभूमीचा प्रवास उलगडून सांगितला. ते म्हणाले,
रंगभूमीवरील अडतीस वर्षाचा टप्पा मी गाठला आहे.
पुणेकर हे चोखंदळ रसिक प्रक्षेक आहे. ते टिपल्या मारण्यात पटाईत आहे. मात्र आम्ही त्यांना रसिक मायबाप म्हणतो,
ते अधूनमधून टपल्या मारतात, ते चांगले आहे. त्यामुळे चुकांमध्ये सुधारणा होते. ‘यूटर्न’ चे आजपर्यंत 700 प्रयोग पुर्ण झाले
असून, यापैकी 200 प्रयोग माझे पुण्यात झाले आहे. याठिकाणी रसिक आहेत. या नवरात्रौत्सवात मला गाण्याची संधी मिळाली.
मला तुमच्याकडून भरभरुन प्रतिसाद मिळाल्याने आनंद वाटतो, असल्याचे यावेळी डॉ. ओक यांनी पुणेकरांची कृतज्ञता व्यक्त
केली.
माझा जन्म नागपूरचा आहे. माझी जडण-घडण व वैद्यकीय शिक्षण त्याठिकाणी झाले. डॉक्टर ते अॅक्टर हा प्रवास येथूनच सुरु
झाला. डॉक्टर होता…होता अॅक्टर होण्याचे कधी व्यसन जडलं कळालंच नाही. शाळा ते महाविद्यालयात विविध नाटक,
एकांकिका, स्पर्धा व स्नेहसंमेलनात सहभाग घेत मला नाट्य क्षेत्राची आवड जडली. त्यात मग वेगवेगळ्या सांस्कृतिक
कार्यक्रमांपासून ते महाविद्यालयीन निवडणूकीत सहभाग घेतला. त्यावेळी विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी रस्ता रोको केला, 13 दिवस
नागपूरच्या तुरुंगात होतो, अशी आठवण यावेळी डॉ. ओक यांनी सांगितली.
अरुण दाते, किशोरकुमार, रफी, येशूदास यांच्या गाण्यावर प्रेम केले. त्यात अभिनय करता येत असल्याने चेहऱ्यावरील
हावभाव करता येतात, त्यामुळे गाणे गाताना त्यात आणखी गाताना पुर्णता येते. मात्र अजूनही पुर्णपणे गाणे शिकलो नसून पुर्ण
शिकायचे आहे. त्याचबरोबर एखादे वाद्य, पेटी वाजवायला शिकायची असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. कोरोना काळात
स्टारमेकरवर गात होतो. त्यानंतर लाईव्ह शोमध्ये गाण्यास सुरुवात केली, असल्याचे यावेळी डॉ. ओक यांनी नमूद केले.
शिवप्रताप–गरुडझेप’ चित्रपटाचे पाच शहरांत दिमाखदार प्रिमियर
‘शिवप्रताप–गरुडझेप’ हा डॉ.अमोल कोल्हे यांचा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. विजयादशमीच्या मुहुर्तावर ५ ऑक्टोबरला ‘शिवप्रताप–गरुडझेप’ प्रदर्शित होत आहे. इतिहासाच्या पानांमध्ये अभिमानाने कोरलेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक आग्रा सुटकेचा थरार दाखवणाऱ्या या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे प्रदर्शनाआधी या चित्रपटाचे ५ शहरांत विशेष शो आयोजित करण्यात आले आहेत. या चित्रपटाच्या भव्यतेप्रमाणेच प्रिमियरची भव्य तयारी करण्यात आलेली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, बेळगाव या पाच महत्त्वाच्या शहरात हे प्रिमियर संपन्न होणार आहेत.
शनिवार १ ऑक्टोबरला नाशिकच्या सिटी सेंटरला सायं ७.०० वा., रविवार २ ऑक्टोबरला सिटीप्राइड कोथरुड, पुणे सायं ७.०० वा., सोमवार ३ ऑक्टोबरला कोल्हापूर आयनॉक्स सायं ७.०० वा., मंगळवार ४ ऑक्टोबरला बेळगाव आयनॉक्स सायं ७.०० वा. तर दसऱ्याला ५ ऑक्टोबरला मुंबईत अंधेरी इन्फिनिटी रात्रौ ८.०० वा. हे दिमाखदार प्रिमियर रंगणार आहे. चित्रपटातील कलाकारांच्या टीमसोबत विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती या खास शो साठी राहणार आहे.
‘आग्र्याहून सुटका’ हा शिवचरित्रातील हा महत्त्वाचा अध्याय ‘शिवप्रताप–गरुडझेप’ या चित्रपटातून उलगडणार आहे. या चित्रपटात डॉ. अमोल कोल्हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत असून त्यांच्यासोबत यतीन कार्येकर, प्रतीक्षा लोणकर, हरक अमोल भारतीय, शैलेश दातार, हरीश दुधाडे, मनवा नाईक, पल्लवी वैद्य, अजय तपकिरे, रमेश रोकडे, अलका बडोला कौशल, आदी ईराणी, विश्वजीत फडते आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक राजाराम केंढे यांनी केले आहे.
डॉ.अमोल कोल्हे, विलास सावंत, सोनाली घनश्याम राव, चंद्रशेखर ढवळीकर, कार्तिक राजाराम केंढे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून प्रफुल्ल तावरे सहनिर्माते आहेत. रविंद्र मानकामे कार्यकारी निर्माते आहेत. छायाचित्रण संजय जाधव यांचे असून संकलन पीटर गुंड्रा यांनी केले आहे.
देवीसमोर नतमस्तक होताच मिळते शक्ती आणि उर्जा -ज्येष्ठ लेखिका डॉ.संगीता बर्वे
श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागतर्फे साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ लेखिकांचा विशेष सन्मान सोहळा
पुणे : मी न राहिले दुबळी आता… पोलादापरी केले मन… अशी आजच्या काळातील महिलांची कहाणी कवितेद्वारे मांडत ज्येष्ठ लेखिका डॉ. संगीता बर्वे यांनी स्त्री शक्तीचा महिमा उपस्थितांना सांगितला. देवीसमोर सगळ्या महिला नतमस्तक होतात. त्यावेळी देवीकडून शक्ती आणि उर्जा मिळते. या मंदिरामध्ये देखील विशेष ऊर्जा असते. त्यामुळे येथे झालेल्या या सन्मानाने आम्हाला जबाबदारीची जाणीव निर्माण झाली, असे मतही डॉ.बर्वे यांनी यावेळी व्यक्त केले.
श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित नवरात्र उत्सवात साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ लेखिकांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंदिराचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अॅड.प्रताप परदेशी, प्रविण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, भरत अग्रवाल, तृप्ती अग्रवाल, विशाल सोनी, नगरसेविका रुपाली धावडे आदी उपस्थित होते.
साहित्यिक महिलांमध्ये डॉ. संगीता बर्वे, गीतांजली जोशी, डॉ. अपर्णा महाजन, डॉ. शुचिता नांदापूरकर फडके यांचा सन्मान करण्यात आला. डॉ. संगीता बर्वे यांच्या पियुची वही या रोजनिशीवजा पुस्तकाला यंदाचा उत्कृष्ट बालसाहित्य निर्मितीचा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्याबद्दल त्यांना गौरविण्यात आले.
गीतांजली जोशी यांनी हा सत्कार माझ्या माहेरचा आहे असे सांगून आनंद व्यक्त केला. डॉ. अपर्णा महाजन या निवृत्त प्राध्यापिका असून इंग्रजी-मराठी साहित्य, नाट्यशास्त्र, बालसाहित्य, स्त्रीवाद, भाषांतर हे त्यांचे आवडीचे विषय आहेत. त्यांनी पुरस्काराने भारावून गेल्याचे सांगितले.
डॉ. शुचिता नांदापूरकर-फडके यांचे ६६ अनुवाद प्रकाशित झाले आहेत. त्यांनी पुरस्काराबद्दल मनोगत व्यक्त करताना आणखी काम करण्याची प्रेरणा मिळणार असे सांगितले. विश्वकर्मा पब्लिकेशन्सचे सीईओ विशाल सोनी यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहसंपादक संदीप तापकीर यांनी केले, तर आभार प्रदर्शन विश्वस्त प्रवीण चोरबेले यांनी केले.
आयकर आयुक्त (सूट), पुणे कार्यालयातर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त खुली निबंध लेखन स्पर्धा
पुणे-आयकर आयुक्त (सूट) कार्यालय, पुणे यांच्या तर्फे स्वातंत्र्याच्या ७५ वर्षाच्या प्रीत्यर्थ खुली निबंध लेखन स्पर्धा दिनांक ०२/१०/२०२२ रोजी आयोजित करण्यात येणार आहे त्यानुसार सन २०२२-२०२३ या वर्षाकरिता निबंध स्पर्धेसाठी खालील विषय निवडण्यात आले आहेत.
इयत्ता ८ वी ते १० वी साठी
- भारतीय अर्थव्यवस्था : आव्हाने आणि भविष्यातील मार्गक्रमण
- भारताच्या सक्षमीकरणात प्राप्तिकराचे योगदान
यासाठी कमाल शब्द मर्यादा २००० असेल.
इयत्ता 11 वी ते 12 वी साठी
- काळ्या पैशाचा भस्मासूर : राष्ट्राच्या प्रगतीतील अवरोधक
- राष्ट्रउभारणीमध्ये कर प्रशासनाची अनन्यसाधारण भूमिका
यासाठी कमाल शब्द मर्यादा 3००० असेल.
पारितोषिके
इयत्ता ८ वी ते १० वी साठी प्रथम पारितोषिक : रुपये ७,५००/-, द्वितीय पारितोषिक : रुपये ५,०००/-, तृतीय पारितोषिक : रुपये ३,०००/-, उत्तेजनार्थ पारितोषिके : ५ = रुपये १,०००/-
इयत्ता ११ वी ते १२ वी साठी प्रथम पारितोषिक : रुपये १०,०००/- द्वितीय पारितोषिक : रुपये ७,५००/- तृतीय पारितोषिक : रुपये ५,०००/- उत्तेजनार्थ पारितोषिके : ५ = रुपये २,०००/-
उपरोक्त निबंध हा वरील पैकी कोणत्याही एक विषयावर इंग्रजी किंवा मराठी तून सादर करावा. सदर निबंध हा विषयाच्या अनुषंगाने विश्लेषणात्मक, संशोधनवर असणे अपेक्षित आहे. निबंध खाली दिलेल्या गूगल फॉर्म लिंक वर प्रस्तुत करण्याचे आव्हान करण्यात आले आहे. सदर लिंक दिनांक ०२/१०/२०२२ रोजी सकाळी १०.०० वाजे पासून रात्री १०.०० वाजे पर्यंत खुली असेल.
Google Forms Link for 8th to 10th std.
https://forms.gle/dotKMhLQZQU2CTHC9
Google Forms Link for 11th to 12th std.
https://forms.gle/Kz9Dvd9DE1JozkcU8
निबंधाचे मूल्यमापन हे आयकर आयुक्त (सूट ), पुणे च्या परीक्षक मंडळाकडून करण्यात येईल. योग्य त्या गुणवत्तेचा निबंध नसल्यास स्पर्धकास पारितोषिक न देण्याचा किंवा पारितोषिकाची रक्कम कमी करण्याचा अधिकार आयकर आयुक्त (सूट ), पुणे यांच्याकडे राखून ठेवला आहे. पारितोषिक देण्याबाबत आयकर आयुक्त (सूट ), पुणे यांचा निर्णय अंतिम राहील.
अत्यावश्यक वस्तूंच्या किमतीवर देखरेख ठेवण्यासाठी ग्राहक व्यवहार विभागाकडून राष्ट्रीय पातळीवरील क्षमता बांधणी कार्यशाळेचे आयोजन
किंमतविषयक माहितीचा दर्जा आणि सातत्य यावर राज्यातील नोडल अधिकारी ठेवणार लक्ष
नवी दिल्ली-
केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाने,- नवी दिल्लीत अत्यावश्यक वस्तूंच्या दरांवर देखरेख ठेवण्यासाठीच्या एकदिवसीय क्षमता बांधणी कार्यशाळेचे आयोजन केले होते. वस्तूंच्या किमतीच्या संकलनाची भौगोलिक व्याप्ती वाढवणे, किंमतविषयक माहितीचा (डेटा) दर्जा सुधारणे आणि त्यातून विश्लेषणात्मक निष्कर्ष काढणे, अशा सर्व उपक्रमांचा या कार्यशाळेत समावेश करण्यात आला होता. या कार्यशाळेचा मुख्य उद्देश, राज्यातील नोडल अधिकाऱ्यांना किंमतविषयक डेटाच्या महत्त्वाविषयी जागृत करणे, तसेच किमतीचे संकलन नेमके कसे केले जाते, याची पद्धत शिकवणे आणि प्रादेशिक/राज्यस्तरीय पातळीवरक्षमता बांधणी कार्यशाळांसाठी आराखडा करणे, किमतीची माहिती देणाऱ्या केंद्रांची क्षमता वाढवणे हा होता.
कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी, ग्राहक व्यवहार विभागाचे एस सचिव रोहित कुमार सिंग, यांनी दरविषयक माहिती संकलनात राज्यांच्या सर्व प्रतिनिधींनी केलेल्या उत्तम कामगिरीचे कौतुक केले. किमतीवर देखरेख ठेवणे, दरविषयक माहिती गोळा करणे, आणि विविध धोरणनिर्मिती करतांना ह्या आकडेवारी आणि माहितीचा केला जाणारा वापर या सगळ्याचे महत्त्व सचिवांनी यावेळी समजावून सांगितले.
राज्यांच्या नोडल अधिकाऱ्यांनी किमतविषयक आकडेवारीची गुणवत्ता आणि सातत्य यावर भर द्यावा, असेही सचिव यावेळी म्हणाले. देशभरातील सर्व जिल्ह्यात, किमती संकलन केंद्रे असल्यास, त्यातून अधिक अचूक आणि योग्य माहिती मिळू शकेल, अशी सूचनाही त्यांनी केली.
दर नियंत्रण डेटा (PMD) च्या अद्यायवतीकरणासाठी, आशियाई विकास बँकेकडून तंत्रज्ञानविषयक सहाय्य केले जाते. यावेळी, कृष्ण सिंह रौतेला यांनी एडीबीकडून दिल्या जाणाऱ्या सहाय्याची माहिती दिली . तसेच, सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने, किमतीवर देखरेख ठेवणे किती महत्वाचे आहे, हा मुद्दाही भाषणात अधोरेखित केला.
कार्यशाळेच्या तांत्रिक सत्राच्या वेळी, दर संकलन अॅपविषयी विस्तृत चर्चा झाली. तसेच, संकलन प्रकियेतील आव्हाने, तंत्रसाधनांनी युक्त, डेटा दर्शवणारा डॅशबोर्ड आणि धोरणांविषयी सविस्तर माहिती, अशा सगळ्या गोष्टींची चर्चा नोडल अधिकाऱ्यांशी करण्यात आली.
ह्या कार्यशाळेच्या समारोप सत्रात, राज्यातील नोडल अधिकाऱ्यांशी विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. त्यांनी विभागामधील विविध विकास,माहिती संकलन यंत्रणेविषयक मार्गदर्शक सूचना तसेच क्षमता बांधणी कार्यशाळा घेण्यासाठीचा आराखडा विकसित करणे, अशा विविध विषयांवर विचारलेल्या शंका आणि प्रश्नांना उत्तरे देण्यात आली. समारोप करतांना ग्राहक व्यवहार विभागाचे आर्थिक सल्लागार, के गुइटे यांनी सर्व सहभागी प्रतिनिधीचे दर नियंत्रण आकडेवारी संकलनात देत असलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. तसेच ह्या संकलनाची गुणवत्ता वाढवण्यावर त्यांनी भर दिला..
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे अमित शहांच्या भेटीला
शिरुर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. ही भेट राजकीय नसून त्यांचा आगामी काळात येणारा चित्रपट ‘शिवप्रताप गरुडझेप’ यानिमित्ताने घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.औरंगजेबाच्या बलाढ्य सत्तेचा पहारा भेदून केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेच्या प्रसंगाचे जिवंत वर्णन करणारा ‘शिवप्रताप गरुडझेप’ हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पुन्हा एकदा डॉ. कोल्हे दिसणार आहेत.
आग्र्याहून सुटकेचा थरार

‘शिवप्रताप-गरुडझेप’ या चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक राजाराम यांनी केले आहे. हा चित्रपट ‘जगदंब क्रिएशन’ प्रस्तुत असणार आहे. मराठी स्वाभिमानाचा अंगार…काल, आज आणि उद्याही असे म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेचा थरार मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे.
खासदार अमोल कोल्हे यांनी अमित शहांची भेट घेतल्यानंतर फोटो आणि एक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. यात त्यांनी लिहिले की, ‘माननीय केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा यांची भेट घेऊन शिवप्रताप गरूडझेप सिनेमाची माहिती दिली व दिल्ली येथे मान्यवरांच्या उपस्थितीत स्पेशल स्क्रीनिंगसाठी वेळ देण्याची विनंती केली.
ज्या घटनेने 356 वर्षांपूर्वी देशाचे लक्ष वेधून या मातीला स्वाभिमानाची शिकवण दिली त्या घटनेवर आधारित शिवप्रताप गरूडझेप या सिनेमाने देशाचे लक्ष वेधावे व छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देशाच्या आणि पर्यायाने जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावा हाच उद्देश! तसेच यानिमित्ताने शिरूर लोकसभा मतदारसंघातील पुणे-नाशिक रेल्वे, शिवसंस्कार सृष्टी आणि इंद्रायणी मेडिसिटी संदर्भातही सकारात्मक चर्चा झाली. माननीय गृहमंत्री महोदयांनी बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!’
आशा पारेख दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित
“गोष्ट एका पैठणीची” ला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान
मराठी चित्रपट व कलाकारांना विविध श्रेणीत राष्ट्रीय पुरस्कार प्रदान
दिल्ली, दि.30 : ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटास सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. चित्रपटाचे दिग्दर्शक शंतनू गणेश रोडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी विविध श्रेणीत मराठी चित्रपटांना ‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारा’ ने गौरविण्यात आले. प्रसिद्ध अभिनेत्री आशा पारेख यांना भारतीय चित्रपट सृष्टीतील उल्लेखनीय योगदानासाठी दादासाहेब फाळके पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात आले.
माहिती व प्रसारण मंत्रालयाच्यावतीने येथील विज्ञान भवनात आज 68 वा ‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ प्रदान सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, माहिती व प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकुर, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरूगन, माहिती व प्रसारण सचिव अपूर्व चंद्र यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
आशा पारेख यांच्या विषयी
आशा पारेख एक सुप्रसिद्ध अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माता आहेत. त्यांनी अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे दिले. या काळात त्यांना ‘हिट गर्ल’ म्हणून संबोधले जात होते. चित्रपटसृष्टीत त्यांची सुरुवात बालकलाकार म्हणून झाली. अभिनेत्री म्हणून सुमारे 95 चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला. यामध्ये कटी पतंग, मै तुलसी तेरे आंगन की, दो बदन, मेरा गाँव मेरा देश, दिल देके देखो, आये दिन बहार के, आया सावन झुमके, तिसरी मंजिल, काँरवा अशा विविध चित्रपटांचा समावेश आहे. श्रीमती पारेख यांना 1992 मध्ये पद्मश्री या नागरी पुरस्काराने सन्मानित केले गेले.
श्रीमती पारेख यांनी त्यांच्या 80 व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल आनंद व्यक्त केला. मागील 60 वर्षांपासून सिनेक्षेत्रात काम करीत असून आजही आपण या क्षेत्रात कार्यरत असल्याचे सांगीतले.

सर्वाधिक लोकप्रिय मनोरंजन श्रेणीतील पुरस्कार “तानाजी : द अनसंग वॉरिअर” या चित्रपटास देण्यात आला. याची निर्मिती अजय देवगण फिल्मस् आणि दिग्दर्शन ओम राऊत यांनी केली असून दोघांनी सुवर्ण कमळ आणि दोन लाख रूपये रोख रकमेचा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते स्वीकारला.
अजय देवगण आणि तामिळ अभिनेता सुर्या (चित्रपट – सोराराई पोट्रु) यांना संयुक्तरित्या उत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्काराने राष्ट्रपती यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप रजत कमळ आणि 50 हजार रुपये असे आहे.
तानाजी या चित्रपटाला उत्कृष्ट वेशभूषेसाठीही पुरस्कार जाहिर झाला होता. वेशभुषाकार नचिकेत बर्वे आणि महेश र्शेला यांना रजत कमळ ने सन्मानित करण्यात आले. प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर निर्मित ‘तुलसीदास ज्युनिअर’ या चित्रपटास सर्वोत्तम हिंदी चित्रपटाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

“फनरल” या मराठी चित्रपटाला सामाजिक विषयाच्या श्रेणीत राष्ट्रीय पुरस्कार
महिला व बालकांच्या सक्षमीकरणावर आधारित तसेच अनिष्ट चालीरीतींवर बोट ठेवणारा “फनरल” या मराठी चित्रपटाला सामाजिक विषयावरील श्रेणीतील पुरस्कार प्रदान करण्यात आला. या चित्रपटाचे निर्माते बीफोर – आफ्टर एंटरटेन्मेट व दिग्दर्शक विवेक दुबे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 1 लाख 50 हजार रुपये, रजत कमळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
“टकटक” आणि “सुमी” चित्रपटातील बाल कलाकार राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
“टकटक” आणि “सुमी” या मराठी चित्रपटातील बाल कलाकारांना उत्कृष्ट बाल कलाकारांचा पुरस्कार जाहीर झाला होता. “सुमी” सिनेमातील आकांक्षा पिंगळे आणि दिव्येश इंदुलकर या बालकांना तर “टकटक” या सिनेमासाठी अनिष मंगेश गोसावी यांना रजत कमळ प्रदान करण्यात आले.
‘सुमी’ ठरला उत्कृष्ट बाल चित्रपट
“सुमी” या चित्रपटाला उत्कृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या चित्रपटाची निर्मिती हर्षला कामत एंटरटेन्मेंट यांनी केली आहे, तर दिग्दर्शक अमोल गोळे यांनी केलेले आहे. या दोघांनाही सुवर्ण कमळ आणि प्रत्येकी 1 लाख 50 हजार रोख राशी देवून सन्मानित करण्यात आले.
तीन मराठी चित्रपटांना विशेष परीक्षक पुरस्कार प्रदान
विशेष परीक्षक पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्या ‘जून’, ‘गोदाकाठ’ आणि ‘अवांछित’ या तीन पुरस्कारांनाही गौरविण्यात आले. जून चित्रपटासाठी सिद्धार्थ मेनन यांना तर ‘गोदाकाठ’ व ‘अवांछित’ या दोन्ही चित्रपटांसाठी अभिनेते किशोर कदम यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
“मी वसंतराव” या मराठी चित्रपटातील शास्त्रीय पार्श्वगायनासाठी राहूल देशपांडे यांना रजत कमळ पुरस्काराने सन्मानित करण्यात आहे. तसेच, या चित्रपटाला उत्कृष्ट ऑडिओग्राफीचा पुरस्कारही जाहिर झाला होता. चित्रपटाचे साऊंड डिझायनर अनमोल भावे यांना रजत कमळ आणि 50 हजार रु. रोख रकमेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. हिंदी सिनेमा “सायना”तील गीतासाठी गीतकार मनोज मुंतशिर यांना रजत कमळ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
नॉन फिचर फिल्म श्रेणीत मराठी “कुंकुमार्चन” चित्रपटाला पुरस्कार प्रदान
कौटुंबिक मुल्यांवर आधारित “कुंकुमार्चन (देवींची पूजा अर्चना)” या मराठी चित्रपटाला उत्कृष्ट कौटुंबिक मूल्यांचा पुरस्कार जाहीर झाला होता. या चित्रपटाची निर्मिती स्टुडिओ फिल्मी माँक्स आणि दिग्दर्शक अभिजित दळवी यांनी केलेली आहे. या दोघांनाही प्रत्येकी 50 हजार रूपयांचा रजत कमळ पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार पराया या मराठी/हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शक विशेष अय्यर यांना प्रदान करण्यात आला. या चित्रपटाची निर्मिती एमआईटी स्कूल ऑफ फिल्म ॲण्ड टेलिविजन, पुणे यांची आहे. हा पुरस्कार एमआईटी स्कूल ऑफ फिल्म ॲण्ड टेलिविजनचे अध्यक्ष डॉ. मंगेश कराड यांनी स्वीकारला.
