Home Blog Page 139

प्रा चेतन दिवाण जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट च्या आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

पुणे

येथील कर्वे समाजसेवा संस्थेमध्ये गेली अकरा वर्षापासून शिक्षण सेवा दिलेले तसेच सनराइज समाजकार्य महाविद्यालय श्रीगोंदा चे प्र प्राचार्य म्हणून नुकतेच रुजू झालेले प्रा चेतन दिवाण यांना पुणे येथील नामांकित जाधव वर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटसचा आदर्श शिक्षक पुरस्कार नुकताच संस्थेचे उपाध्यक्ष ॲड शार्दुलराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल डॉ भूषण गोखले व प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटसचे संस्थापक अध्यक्ष डॉ दीपक शहा यांच्या हस्ते तसेच संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य सुधाकर राव जाधवर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नुकताच प्रदान करण्यात आला

प्रा चेतन दिवाण हे गेली वीस वर्षांपासून व्यावसायिक समाजकार्य, मानसिक आरोग्य, दिव्यांगत्व, व्यावसायिक समाजकार्य शिक्षण व संशोधन या विविध क्षेत्रांमध्ये नवोपक्रम उदयास आणणारे तसेच प्रत्यक्ष कार्याद्वारे , प्रात्यक्षिकांद्वारे विद्यार्थ्यांना नवनवीन गोष्टींचा अवलंब करीत अनुभव देणारे तसेच वैविध्यपूर्ण उपक्रम राबवून अनुभव देणारे असे अवलिया प्राध्यापक म्हणून सर्वत्र परिचित असून विद्यार्थ्यांची नाळ समजून साध्या व सरळ भाषेमध्ये प्रात्यक्षिकांद्वारे शिक्षण देणारे प्राध्यापक म्हणून विद्यार्थ्यांमध्ये व शैक्षणिक क्षेत्रामध्ये परिचित आहेत

प्रा चेतन दिवाण हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दिव्यांग अभ्यास मंडळाचे माजी सदस्य तथा अध्यक्ष व विद्या परिषदेचे माजी अध्यक्ष असून राज्यातील बहुतांशी महाविद्यालये, शिक्षण संस्था, विद्यापीठे तसेच महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग व उच्च शिक्षण विभागाच्या विविध समित्यांवर तज्ञ सदस्य व तज्ञ शिक्षण सल्लागार म्हणून देखील काम पाहत आहेत

विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे महाराष्ट्र व गोवा राज्यामध्ये घेण्यात येत असलेल्या समाजकार्य विषयाच्या सेट परीक्षेचे चेअरमन म्हणून ते उत्तम कार्य पार पाडत असून महाराष्ट्र राज्यात नवीन शैक्षणिक धोरण 2020 ची राज्यातील सर्व समाजकार्य महाविद्यालयांमध्ये अंमलबजावणी करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष म्हणून देखील ते नवीन शैक्षणिक धोरणाची व्यावसायिक समाजकार्यामध्ये उत्तम प्रकारे अंमलबजावणी करीत आहेत.

महाराष्ट्र राज्य तसेच केंद्र सरकारच्या वतीने राज्यामध्ये यशस्वी व्यसनमुक्ती मोहीम राबविणे, कोविड काळामध्ये राज्य शासनाच्या विविध विभागांबरोबर समन्वय साधून विविध हेल्पलाइन सुरू करीत जनतेचे मानसिक आरोग्य संवर्धन करणे तसेच मानसिक आरोग्य, व्यसनमुक्ती व दिव्यांग क्षेत्रामध्ये पाठीमागील वीस वर्षांपासून दिलेल्या योगदानाची दखल घेत जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटसच्या वतीने प्रा चेतन दिवाण यांना शिक्षक दिन व संस्थेचे उपाध्यक्ष ऍड शार्दुल राव जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आदर्श प्राध्यापक पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले

यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुरेश गोसावी तसेच सीओईपी टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुनील भिरूड यांना आदर्श कुलगुरू, पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी प्रा भाऊसाहेब कारेकर यांना आदर्श शिक्षण सेवक , दत्तकला शिक्षण संस्था दौंड चे संस्थापक अध्यक्ष डॉ रामदास झोड यांना आदर्श संस्थापक, तसेच मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय अमरावतीच्या प्राचार्य स्मिता देशमुख यांना आदर्श प्राचार्य अशा पुरस्कारांनी या समारंभामध्ये सन्मानित करण्यात आले.

प्रा चेतन दिवाण यांना प्रदान करण्यात आलेल्या आदर्श शिक्षक प्राध्यापक पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत असून अभिनंदन व्यक्त करण्यात येत आहे

या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

20 हजारांची लाच घेताना महिला पोलिस हवालदार जाळ्यात

पुणे – कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या तक्रारदार व त्याचे इतर तीन नातेवाईक यांना अटक न करण्यासाठी बारामती पोलिस ठाण्यातील महिला पोलिस हवालदार यांनी एक लाख रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती २० हजार रुपयांची लाच स्विकारत असताना सदर पोलिस कर्मचाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक पथक (एसीबी)ने सापळा रचून अटक केली आहे. अंजना बिभीषण नागरगोजे (वय- ३८,रा.बारामती,पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी महिला पोलिस हवालदाराचे नाव आहे.

यााबत बारामती पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात ३९ वर्षीय व्यक्तीने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिस हवालदार अंजना नागरगोजे यांचेवर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार व त्यांची पत्नी, सासू -सासरे व मेहुणा यांचे विरोधात त्यांच्या मेहुण्याचे पत्नीने बारामती पोलिस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दिली होती. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु या गुन्हयात तक्रारदार यांना महिला पोलिस हवालदार अंजना नागरगोजे यांनी तक्रारदार व त्यांचे तीन इतर नातेवाईक यांना गेट जामीन देऊन अटक न करण्यासाठी एक लाख रुपये लाचेची मागणी केली होती.

तडजोडीअंती तक्रारदार यांची पत्नी व त्यांचे सासू सासरे या चार आरोपींसाठी प्रत्येकी पाच हजार रुपये याप्रमाणे एकूण २० हजार रुपये लाचेची मागणी करण्यात आली. तक्रारदार यांनी याबाबत एसीबीकडे फोनद्वारे माहिती देत तक्रार दाखल केली. त्यानुसार एसीबीचे पथकाने बारामती येथे जाऊन समक्ष भेटून पडताळणी कारवाई केली. त्यावेळी पोलिस हवालदार नागरगोजे यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांचेकडे कारवाई न करण्यासाठी २० हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार एसीबीचे पथकाने सापळा रचून आरोपीस रंगेहाथ पकडले आहे. एसीबीचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधीक्षक अजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली संबंधित कारवाई करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त दयानंद गावडे यांनी दिली आहे.

स्टेशनरी, कटलरी असोसिएशनच्या अध्यक्षस्थानी संजय राठी

0

नवीन कार्यकारिणी २०२५-२०२७ या कार्यकाळासाठी निवड
पुणे : स्टेशनरी, कटलरी अँड जनरल मर्चेंटस् असोसिएशन च्या अध्यक्षपदी संजय राठी यांनी निवड झाली आहे. तर, उपाध्यक्षपदी नितीन पंडित, सेक्रेटरी किशोर चांडक, सह सेक्रेटरी मनिष परदेशी आणि खजिनदारपदी सुनील शिंगवी यांची नियुक्ती करण्यात आली. नवीन कार्यकारिणी २०२५-२०२७ या कार्यकाळासाठी असणार आहे.

नुकतेच शुक्रवार पेठेतील वरदश्री सभागृह येथे झालेल्या संस्थेच्या ६४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली. नवनियुक्त अध्यक्ष संजय राठी हे कर्वे रस्त्यावरील सागर स्विटसचे संचालक आहेत. संस्थेच्या परंपरेप्रमाणे वार्षिक सर्वसाधारण सभेत ज्येष्ठ व्यापाऱ्यांना ‘जीवन गौरव पुरस्कारा’ने सन्मानीत करण्यात आले.

सभेला संस्थेचे सचिन जोशी, संजय राठी, किशोर पिरगळ, मोहन कुडचे, सुरेश नेऊरगावकर, दिलीप कुंभोजकर, मदनसिंह राजपूत, अरविंद पटवर्धन, सूर्यकांत पाठक, राजेश गांधी, सुनिल शिंगवी, मनिष परदेशी, अनिल प्रभुणे, राजकुमार गोयल, मोहन साखरिया,  अविनाश मुजुमदार इ. कार्यकारी मंडळाचे पदाधिकारी, सल्लागार, विश्वस्त व सदस्य उपस्थित होते.

गेली ६४ वर्ष अविरतपणे कार्यरत असलेली ही असोसिएशन पुण्यातील जुनी रजिस्टर्ड संस्था आहे. व्यापार क्षेत्रात व्यापाऱ्यांना येणाऱ्या प्रश्नांवर काम करणारी संस्था आहे. दरवर्षी व्यापार क्षेत्रात उपयोगी विषयांवर सेमीनारचे आयोजन करण्यात येते. संस्थेच्या विविध उपक्रमांपैकी ‘व्यापार भूषण पुरस्कार’ व इतर पाच पुरस्कार यामध्ये महिला पुरस्काराचाही समावेश केला जातो. व्यापार क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या व्यापाऱ्यांना एक कौतुकाची थाप मिळावी या कारणास्तव २५ मे रोजी ‘व्यापारी एकता दिनानिमित्त’ हा पुरस्काराचा कार्यक्रम केला जातो. येते.

नेपाळमध्ये 13500 कैदी फरार:पोलिसांसोबतच्या संघर्षात 5 अल्पवयीन कैद्यांचा मृत्यू; आतापर्यंत 30 ठार, 1000 जखमी

0

काठमांडू-नेपाळमध्ये भ्रष्टाचाराविरुद्ध सोशल मीडियावरील बंदी आणि हिंसक निदर्शनांचा फायदा घेत १३,५०० हून अधिक कैदी पळून गेले. तर ताब्यात घेतलेले ५६० आरोपीही फरार झाले.याशिवाय पश्चिम नेपाळमधील एका तुरुंगात सुरक्षा कर्मचारी आणि कैद्यांमध्ये संघर्ष झाला. यामध्ये पोलिसांच्या गोळीबारात पाच अल्पवयीन कैद्यांचा मृत्यू झाला आणि चार गंभीर जखमी झाले.

पोलिसांनी सांगितले की, एका सुधारगृहात कैद्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून शस्त्रे हिसकावण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर पोलिसांना गोळीबार करावा लागला. या निदर्शनात आतापर्यंत १००० हून अधिक लोक जखमी झाले आहेत आणि ३० जणांचा मृत्यू झाला आहे.त्याच वेळी, स्थानिक माध्यमांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की देशाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान होऊ शकतात. त्यांना जनरेशन-झेड यांचे समर्थन मिळाले आहे.नेपाळमधील हिंसाचार आणि निषेधाच्या दरम्यान, हजारो भारतीयांप्रमाणेच, मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील चार कुटुंबे देखील काठमांडूमध्ये अडकली आहेत. या कुटुंबांमध्ये मुलांसह एकूण १४ लोक आहेत, जे पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशात सुरक्षित परतण्यासाठी विनंती करत आहेत.

हिंसाचार दरम्यान, जाळपोळ, तोडफोड आणि अनेक लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर येत आहे. छतरपूरच्या गल्ला मंडी येथील रहिवासी व्यापारी पप्पू माटेले, वाहतूक व्यावसायिक निधी अग्रवाल, गुड्डू अग्रवाल आणि कुशवाह कुटुंब सहलीसाठी नेपाळला गेले होते. हे सर्व लोक सध्या काठमांडूमधील एका हॉटेलमध्ये अडकले आहेत.नेपाळ आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशभरात आतापर्यंत ३० जणांचा मृत्यू झाला आहे आणि १०३३ जण जखमी झाले आहेत.

बुधवारी संध्याकाळी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, ७१३ जखमींना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर ५५ जणांना पुढील उपचारांसाठी रेफर करण्यात आले आहे. याशिवाय, २५३ जणांना नव्याने दाखल करण्यात आले आहे.

सर्वाधिक रुग्ण सिव्हिल सर्व्हिस हॉस्पिटलमध्ये आहेत, जिथे ४३६ जणांवर उपचार सुरू आहेत. राष्ट्रीय ट्रॉमा सेंटरमध्ये १६१ रुग्णांवर आणि एव्हरेस्ट हॉस्पिटलमध्ये १०९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशातील एकूण २८ रुग्णालये जखमींवर उपचार करत आहेत.

शिवाजी पार्कवर ठाकरेंचाच आवाज घुमणार:दसरा मेळावा घेण्यास महापालिकेची परवानगी, मेळाव्यासाठी घातल्या 25 अटी

मुंबई- शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची ओळख असलेल्या शिवाजी पार्क मैदानावर यंदाही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळाली आहे. मात्र, महानगरपालिकेने ही परवानगी देताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 25 अटी घातल्या आहेत. या अटींची पूर्तता करण्याचे निर्देश महापालिकेने दिले आहेत.

शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवाजी पार्क हे दसरा मेळाव्याचे मुख्य केंद्र राहिले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी महापालिकेकडे अर्ज केला होता. महापालिकेने तो अर्ज स्वीकारून ठाकरे गटाला दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा शिवाजी पार्कवर ठाकरेंचा ‘आवाज’ घुमणार आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक हे भाषण ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा मेळावा होत असल्याने यातून उद्धव ठाकरे काय भूमिका मांडणार आणि शिवसैनिकांना काय मार्गदर्शन करणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेच्या स्थापनेपासून दरवर्षी शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा होतो. पण शिवसेनेच्या फुटीनंतर या ठिकाणी मेळावा घेण्यासाठी शिंदे गटानेही परवानगी मागितली होती. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून या मैदानावरील मेळाव्यासाठी दोन्ही गटांमध्ये रस्सीखेच होताना दिसते. यंदा मात्र यावर जास्त काही वाद न होता, हे मैदान उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळणार आहे. तर शिंदेंचा मेळावा हा आझाद मैदानावर होणार आहे.

मेळाव्यासाठी घातलेल्या अटी कोणत्या?

आपणांस मैदानाचा वापरासाठी रु. 250+ 18% (जीएसटी सीजीएसटी)। (प्रत्तिदिवशी रु. 250+18% (जीएसटी + सीजीएसटी) परवाना शुल्क भरावे लागेल.
आपणास Notice Of Motion No. 666 of 2015 अन्वये मा. न्यायालयाने घातलेल्या अटी व शर्तींचे पालन करावे लागेल.
आपणास शासन निर्णय क्र. बीएमसी -2515/प्र.क्र. 1270/नवि-21 दि. 20.01.2016 मधील अटी व शर्तीचे पालन करावे लागेल.
आपणास The Noise Polution (Regulation and Control) Rule 2000 मधील तरतुदींचे पालन करावे लागेल.
आपणास कार्यक्रमासाठी संबंधित पोलिस स्टेशनची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असेल. तसेच ध्वनीक्षेपकाचा वापर करावयाचा असल्यास त्यासाठी सुद्धा पोलिस स्टेशनची परवानगी घ्यावी लागेल.
आपणास मा. उच्च न्यायालयाने जनहीत याचिका क्र. 173/2010 दि. 13.03.2015, 24.06.2015, 17.07.2015 आणि 10,11,12 व 16 ऑगस्ट 2016 अन्वये पारित केलेल्या आदेशांचे पालन करावे लागेल.
आपणास मुख्य अग्निशमन अधिकारी यांचे ना-हरकत प्रमाणपत्र घेणे आपणांस बंधनकारक आहे
आपणास स्ट्रक्चरल इंजिनियर यांचे स्टॅबिलिटि प्रमाणपत्र घेणे आपणांस बंधनकारक आहे.
आपणास मा. उच्च न्यायालय / शासनाच्या तसेच महानगरपालिकेच्या सर्व अटी व शर्तीचे उल्लंघन करणार नाही अशा आशयाचे रु. 500/- च्या स्टॅम्प पेपरवर नोंदणीकृत हमीपत्र सादर करावे लागेल.
मैदानाबाहेर कार्यक्रमाचा आवाज ऐकू जाणार नाही याची योग्य ती दक्षता घ्यावी. तसेच मा.उच्च न्यायालयाने नोटीस ऑफ मोशन क. (NOMLoding No. 10-2013) PIL No. 116/2009 अन्वये दिलेल्य आदेशानुसार ध्वनीक्षेपकांच्या वापराने ध्वनी प्रदूषणाच्या कोणत्याही तक्रारीस कोणासही वाव मिळणार नाही, याची काळजी घ्यावी.
कार्यक्रम संपल्यानंतर मैदान पूर्ववत स्थितीत करून द्यावे लागेल,
कार्यक्रमा दरम्यान मैदानावर कोणत्याही प्रकारच्या वाहन प्रवेशास सक्त मनाई असेल.
मा. उच्च न्यायालयाने शिवाजी पार्क मैदानासंबंधी वेळोवेळी दिलेले आदेश व घातलेल्या अटी व शर्तीचे पालन करावे लागेल.
घनकचरा विभागास कोणत्याही प्रकारचे साफसफाई शुल्क देय असल्यास ते आपणांस मुख्य पर्यवेक्षक घनकचरा जी/उत्तर विभागास भरावे लागेल.
रात्री 10.00 नंतर कोणत्याही प्रकारच्या सभेस / कार्यक्रमास परवानगी नाही याची नोंद घ्यावी.
सदर दिवशी शासनाने / महापालिकेने कोणताही कार्यक्रम आयोजित केल्यास आपली परवानगी रद्द करण्यासापेक्ष देण्यात येत आहे.
मैदानाचे कोणतेही नुकसान किंवा मैदानाचा गैरवापर झाल्याचे निदर्शनास आल्यास आपण भरलेली सुरक्षा अनामत रक्कम जप्त करण्यात येईल.
सदर कार्यक्रमांची सर्व प्रकारची व्यवस्था आपण आपल्या खचनि करावयाची आहे.
कार्यक्रमासाठी उभारण्यात येणारे मंडप/पंडाल/स्टेज कार्यक्रम संपल्याबरोबर त्वरीत काढून टाकून मैदान पूर्ववत स्थितीत करून द्यावे.
अटींचे उल्लघंन झाल्याचे निदर्शनास आल्यास आपणाविरूद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल.
शिवाजी पार्क मैदानाच्या कोणत्याही भागास कोणत्याही प्रकारची क्षती झाल्यास तो भाग दुस-या दिवसापासून वापरता येईल अशारीतीने आपण पूर्वस्थितीत करून देण्यात यावा.
मैदानामध्ये कोणत्याही प्रकारचे अन्न शिजविण्यास परवानगी नाही, याची नोंद घ्यावी.
अर्जदारास रुपये 20,000/- अनामत रक्कम भरावी लागेल.
मैदानाचे कोणतेही नुकसान / गैरवापर / अटींचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास आपण भरलेली अनामत रक्कम रू. 20,000/- जप्त करण्यात येईल व पुढील वर्षी आपणांस परवानगी देण्यात येणार नाही, याची नोंद घ्यावी.
महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यांच्या क्र. एमपीसीबी/जीडी (एपीसी) / टीवी/बी-०२९७ दि.20.03.2024 यांच्या मार्गदर्शक सुचना अन्वये आपणास कोणत्याही प्रकारची माती छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात टाकता येणार नाही याची नोंद घेण्यात यावी.
दसरा मेळाव्यासाठी राज ठाकरेंना निमंत्रण?

दरम्यान, दसरा मेळाव्याआधी उद्धव ठाकरे यांनी नुकतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी भेट घेतली. ही भेट तब्बल सव्वादोन तास चालली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी मुंबई महापालिका निवडणुकीवर चर्चा केल्याचे समजते. तसेच या भेटीत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना दसरा मेळाव्यासाठी निमंत्रण दिल्याचे बोलले जात आहे. यामुळे, आगामी दसरा मेळाव्यामध्ये राज ठाकरे उपस्थित राहणार का? आणि शिवसेना-मनसेमध्ये युती होणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे.

विद्यार्थ्यांना समान संधींसाठी ‘समावेश’चा पुढाकार महत्वपूर्ण विशाल लोंढे

पुणे: ग्रामीण भागातील गरजू व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना समान संधी, त्यांना शिक्षणासाठी अर्थसहाय्य उपलब्ध व्हावे, यासाठी ‘समावेश’ संस्थेने घेतलेला पुढाकार महत्वाचा आहे. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील समन्वय वाढला, तर शिष्यवृत्ती योजनेतील अडचणी दूर होतील. सारथी, स्वयंम स्वाधार, महाज्योती, महाडीबीटी या माध्यमातून मिळणाऱ्या शिष्यवृत्त्या लवकर मिळतील, असे प्रतिपादन समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विलास लोंढे यांनी केले.

नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोसिएशनतर्फे (एनपीडब्ल्यूए) ‘समावेश: ॲक्शन फॉर इम्पॅक्ट’ संस्थेच्या सहकार्याने आयोजित शिष्यवृत्ती सहाय्य कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी विशाल लोंढे बोलत होते. एमसीई सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी तांत्रिक शिक्षण संचालनालयाचे सहाय्यक संचालक मारोती जाधव, एमसीई सोसायटीचे सचिव इब्रान शेख, ‘समावेश’ संस्थेचे संस्थापक प्रविण निकम, ‘एनपीडब्ल्यूए’चे अध्यक्ष सचिन कोतवाल, उपाध्यक्ष अमोल शाह, प्रवीण जावळे आदी उपस्थित होते.

विशाल लोंढे म्हणाले, “शिक्षकाला विद्यार्थी दत्तक दिला, तर त्यांचे प्रश्न सुटतील. विद्यार्थी कोणत्याही प्रवर्गातील असला, तरी प्रवेश घेताना सर्व कागदपत्रे शिक्षकांनी पाहावीत. त्याची पडताळणी करावी. ‘समावेश’सारखी संस्था फार्मा असोशिएशनच्या विविध महाविद्यालयांमध्ये स्वतः येऊन साहाय्य करत आहे. त्यांच्या या मदतीचा पुरेपूर फायदा करून घेत मुलांना शासनाच्या विविध शिष्यवृत्तीचा अधिकाधिक लाभ करून देण्यासाठी सकारात्मक विचार करायाला हवा.”

प्रवीण निकम म्हणाले, “विद्यार्थ्यांना विचारक्षम, सजग आणि न्यायाभिमुख नागरिक घडवणे हे ‘समावेश’चे ध्येय आहे. त्यासाठी ‘समावेश’ची टीम शिक्षणाचा मूलभूत हक्क आणि मूलभूत न्यायतत्व यामध्ये संशोधन आणि कृतीशील कार्यक्रम करते. विद्यार्थ्यांना शिक्षण, कायदेशीर ओळखपत्रे आणि शिष्यवृत्ती उपलब्ध करून देण्यासह शासनाच्या योजना विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी संस्था कार्यरत आहे. आतापर्यंत २००० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम केले आहे.”

पुढील तीन वर्षे हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी ‘एनपीडब्ल्यूए’ने ‘समावेश’ संस्थेसोबत सामंजस्य करार केला. डॉ. व्ही. एन. जगताप यांनी स्वागत, तर प्रा. प्रविण जावळे यांनी प्रास्ताविक केले. सचिन कोतवाल यांनी ‘एनपीडब्ल्यूए’ची माहिती दिली. डॉ. संपत नवले यांनी आभार मानले. प्रा. तस्लिम कुरेशी यांनी सूत्रसंचालन केले.

नेपाळसारखे अराजक भारतात माजेल म्हणणारे राऊत म्हणजे देशद्रोही-भाजपा माध्यम विभाग प्रमुखांचा दावा

0

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत झाले संजय राऊतांचे वस्त्रहरणभाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची बोचरी टीका

पुणे-

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीने खा. संजय राऊत यांना पुरते उघडे पाडले. उबाठा, राऊत आणि युपीएला आरसा दाखवणारी अशी ही निवडणूक होती. एनडीएची मते फुटून उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत युपीएची सरशी होईल असा डंका वाजवणाऱ्या राऊतांना निकालानंतर ‘जोर का झटका’ बसला. निकालानंतर एनडीए आणि युपीए मध्ये तब्बल 150 मतांचा फरक समोर आला. उबाठाच्या खासदारांनीच उबाठा आणि तुमच्यावर काडीमात्र ही विश्वास ठेवला नाही. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचा शर्ट ओढता-ओढता राऊतांची काय अवस्था झाली, असा बोचरा सवाल भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी बुधवारी केला. प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुरते उघडे पडूनही आमची इज्जत शाबूत आहे असा केविलवाणा दावा श्री. राऊत करत आहेत हे हास्यास्पद असल्याचेही श्री. बन यांनी नमूद केले.

यावेळी श्री. बन म्हणाले की, राहुल गांधींचं नेतृत्व उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पुरते निष्प्रभ ठरले आहे. युपीएच्या खासदारांनीच क्रॉस व्होटिंग करून आपली खदखद व्यक्त केली. यातली सगळ्यात मोठी गंमत म्हणजे महाराष्ट्रातून एनडीएला सर्वाधिक साथ मिळाली. हेच महाराष्ट्राच्या राजकारणाचं आजचे सत्य आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर उचलली जीभ लावली टाळ्याला अशा आवेशात टीका करताना, 2019 मध्ये उबाठा आणि श्री. राऊत यांनी देवेंद्रजींच्या पाठीत खंजीर खुपसूनही देवेंद्रजी पुन्हा उभे राहिले हे श्री. राऊत यांनी लक्षात ठेवावे असे खडसावले. विधानपरिषद, राज्यसभा आणि आता उपराष्ट्रपती निवडणूक या सर्व निवडणुकांमध्ये महाराष्ट्राने देवेंद्रजींच्या नेतृत्वाची झलक पाहिली आहे. त्यांची जादुई कांडी, त्यांचा करिष्मा, आणि त्यांची धोरणात्मक अचूकता पुन्हा पुन्हा दिसून आली. श्री. राऊत तुम्हाला राज्यसभेत केवळ अर्ध्या मताने आघाडी मिळाली होती यांची जाणीव ठेवा, आणि पुढील तीन वर्षांत तुम्हाला पुन्हा राज्यसभा मिळणार नाही, हे ही सत्य स्विकारा असाही टोला श्री. बन यांनी लगावला.

नेपाळसारखे अराजक माजावे हीच राऊतांची इच्छा ?
देशात नेपाळसारखे अराजक माजेल असे भविष्य वर्तवणारे राऊत हे खंडोजी खोपड्याचे वारसदार आहेत का? जसा खोपडे स्वराज्यात द्रोह करून गेला, तसेच महाराष्ट्रद्रोह आणि देशद्रोहाचे बीज तुम्ही रोवताय का? असा खणखणीत सवाल श्री. बन यांनी विचारला. हा देश स्वामी विवेकानंदांचा, महात्मा गांधींचा, आणि आज सक्षम नेतृत्व करणाऱ्या नरेंद्र मोदीजींचा आहे. येथे कधीही अराजकता माजणार नाही. खरं तर, जे तुमच्या मनात आहे तेच तुमच्या ओठावर आलं. भारताला नेपाळसारख्या अस्थिरतेत ढकलण्याची तुमची सुप्त इच्छा आहे का? असा प्रश्न विचारत महाराष्ट्र आणि भारत इतके सक्षम आहेत की, तुमचे हे कपटी डाव कधीच यशस्वी होणार नाहीत. उलट तुम्ही पेटवलेल्या आगीत तुमचं तोंड भाजल्याशिवाय राहणार नाही असा इशारा श्री. बन यांनी दिला.

देशात आता Gen Z नाही, तर Gen M आहे – M for Modi!
देशातील तरुणाईचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. 2014, 2019 आणि 2024 मध्ये नरेंद्र मोदी यांना सर्वाधिक मतदान तरुणाईने केले. हीच तरुणाई म्हणजे भारताचं भविष्य, आणि ती ठामपणे मोदींसोबत उभी आहे. राऊत यांच्यासारखे आगडोंब माजवण्याचे घाणेरडे राजकारण तरुणाईला रुचत नाही, त्यांना विकास आणि स्थैर्य हवं आहे आणि हे केवळ मोदींचे सक्षम नेतृत्व देऊ शकेल हा विश्वास आहे. म्हणून कितीही वायफळ बडबड केली तरीही या देशात किंवा महाराष्ट्रात अराजकता माजवण्याचा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही असेही खडसावले.

नेपाळमधील अब्जाधीश उद्योगपतीचे घर लुटले,अनेक भारतीय अडकले

0

नेपाळमधील हिंसाचार आणि निषेधाच्या दरम्यान, हजारो भारतीयांप्रमाणेच, मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील चार कुटुंबे देखील काठमांडूमध्ये अडकली आहेत. या कुटुंबांमध्ये मुलांसह एकूण १४ लोक आहेत, जे पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशात सुरक्षित परतण्यासाठी विनंती करत आहेत.हिंसाचार दरम्यान, जाळपोळ, तोडफोड आणि अनेक लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर येत आहे. छतरपूरच्या गल्ला मंडी येथील रहिवासी व्यापारी पप्पू माटेले, वाहतूक व्यावसायिक निधी अग्रवाल, गुड्डू अग्रवाल आणि कुशवाह कुटुंब सहलीसाठी नेपाळला गेले होते. हे सर्व लोक सध्या काठमांडूमधील एका हॉटेलमध्ये अडकले आहेत.

काठमांडू –
नेपाळमध्ये गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसाचारात, अब्जाधीश उद्योगपती उपेंद्र महातो यांच्या घरावर हल्लेखोरांनी लूट केली. उपेंद्र रशियामध्ये राहतात आणि रशिया-नेपाळ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष आहेत.मंगळवारी नेपाळमध्ये निदर्शनांनंतर लोकांनी दुकाने आणि मॉल लुटले. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये लोक दुकानातून कपडे चोरताना आणि वस्तू फोडताना दिसत आहेत.नेपाळमध्ये सुरू असलेल्या अशांततेमुळे उत्तर प्रदेशची सोनौली सीमा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे येथे ८ किमी लांबीच्या ट्रकच्या रांगा लागल्या आहेत. यातील अनेक ट्रक जीवनावश्यक वस्तू घेऊन जात आहेत.

‘नेपाळमध्ये अडकलेल्या परदेशी प्रवाशांनी जवळच्या पोलिसांशी संपर्क साधावा’
नेपाळमध्ये सुरू असलेल्या तणावामुळे, नेपाळ लष्कराने तिथे अडकलेल्या परदेशी प्रवाशांना तात्काळ जवळच्या पोलिस किंवा सुरक्षा एजन्सीशी संपर्क साधण्यास सांगितले आहे. लष्कराने हॉटेल मालक, टूर कंपन्या आणि इतर संस्थांना प्रवाशांना मदत करण्यास सांगितले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, परदेशी प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी आणि त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

आंध्र प्रदेश सरकारने नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत
नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना (विशेषतः तेलुगूंना) मदत करण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. सरकारने सांगितले की नेपाळमध्ये अडकलेले लोक भारतीय दूतावासाच्या +९७७-९८०८६०२८८१ आणि +९७७-९८१०३२६१३४ या क्रमांकांवर संपर्क साधू शकतात. भारतीय दूतावासाच्या म्हणण्यानुसार, हे क्रमांक फोन कॉल तसेच व्हॉट्सअॅपवर उपलब्ध आहेत.नेपाळमध्ये अडकलेल्या आंध्र प्रदेशातील लोकांना आपत्कालीन मदत किंवा इतर कोणत्याही समस्येसाठी नवी दिल्लीतील आंध्र प्रदेश भवनशी +९१-९८१८३९५७८७ वर संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

काठमांडू विमानतळ अनिश्चित काळासाठी बंद, शेकडो परदेशी प्रवासी अडकले
नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या हिंसक निदर्शनांमुळे बुधवारी काठमांडूचे त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ (TIA) अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले आहे. या अशांततेमुळे शेकडो परदेशी प्रवासी अडकले आहेत.विमानतळाभोवती आणि धावपट्टीच्या काही भागात धूर दिसत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव विमानतळ बंद करण्यात आल्याचे विमानतळाचे प्रवक्ते रिंजी शेर्पा यांनी सांगितले.यापूर्वी बुधवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत विमानतळ बंद ठेवण्याची घोषणा करण्यात आली होती, परंतु आता ते अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले आहे.
एअर इंडियाने काठमांडूला जाणारी उड्डाणे रद्द केली
एअर इंडियाने १० सप्टेंबर रोजी काठमांडूला येणारी आणि येणारी सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने माध्यमांना सांगितले की काठमांडू विमानतळ बंद असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवक्त्याने सांगितले – आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि लवकरच अधिक माहिती शेअर करू.

नेपाळमधील बालसुधारगृहात संघर्ष, ५ जणांचा मृत्यू, ७ जण जखमी
नेपाळमधील नौबस्ता येथील बालसुधारगृहात किशोरवयीन मुलांमध्ये झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू झाला तर सात जण जखमी झाले. नौबस्ता तुरुंगाचे जेलर जालंधर भुसाल म्हणाले की, गुन्हेगारांनी गेट तोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा हा संघर्ष झाला.५८५ कैद्यांपैकी १४९ कैद्यांना ताब्यात घेण्यात आले आणि ७६ कैदी बालसुधारगृहातून पळून गेले. त्यांनी सांगितले की, कैदी आणि बालगुन्हेगारांना एकत्र ठेवल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली.

सीपीएन अध्यक्ष पुष्पा कमल दहल ‘प्रचंड’ यांच्या मुलीच्या घरातून मृतदेह सापडला
सीपीएन अध्यक्ष पुष्पा कमल दहल ‘प्रचंड’ यांच्या कन्या गंगा दहल यांच्या जळालेल्या घरातून मृतदेह सापडला आहे.ललितपूरचे एसएसपी श्याम कृष्ण अधिकारी म्हणाले की, ढोलाहिती येथील गंगा यांच्या निवासस्थानी मृतदेह सापडला आहे. त्यांनी सांगितले की, मृतदेहाची ओळख पटू शकली नाही. हा पुरूषाचा मृतदेह आहे, परंतु त्याची स्थिती अशी आहे की त्याची ओळख पटू शकत नाही. यामुळे मृतांची एकूण संख्या २४ झाली आहे.

नेपाळ हिंसाचारात अडकल्या हरियाणातील मुली
नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदी आणि भ्रष्टाचाराविरुद्ध सुरू असलेल्या आंदोलनात दिल्लीची उपासना गिल तिच्या टीमसोबत अडकली आहे.उपासना गिल व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी तिथे गेली होती. तिच्या टीममध्ये हरियाणातील फरीदाबाद येथील मुलींचाही समावेश आहे. उपासना गिलने सोशल मीडियावर मदतीची याचना करणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
नेपाळ हॉटेल असोसिएशनने पर्यटकांना मदत करण्याचे आवाहन केले आहे
सध्या सुरू असलेल्या अशांततेमध्ये पर्यटकांची वाहतूक सुलभ करण्यासाठी आणि अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी हॉटेल असोसिएशन नेपाळ (HAN) ने अधिकाऱ्यांना आणि संबंधित पक्षांना आवाहन केले आहे. गुरुवारी जारी केलेल्या निवेदनात, HAN ने म्हटले आहे की कर्फ्यू आणि त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद केल्याने देशी आणि परदेशी पर्यटकांच्या प्रवास योजना विस्कळीत झाल्या आहेत.असोसिएशनने यावर भर दिला की पर्यटकांचे आगमन थेट नेपाळच्या प्रतिमेशी आणि पर्यटनाच्या भविष्याशी जोडलेले आहे.HAN ने म्हटले आहे की ते देशाच्या विविध भागात अडकलेल्या पर्यटकांना मदत सुनिश्चित करण्यासाठी नेपाळ पर्यटन मंडळ आणि नेपाळ सैन्यासोबत काम करत आहे. हॉटेलमध्ये राहण्याची गरज असलेल्या पर्यटकांना HAN च्या हॉटलाइन क्रमांक 9851031495 वर संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

जनसुरक्षेच्या नावाने सरकारने केला सरकारविरोधातील आवाज दडपण्यासाठी कायदा, म्हणून राज्यभर आंदोलन – खासदार सुळे

पुणे-राज्य विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मंजूर करण्यात आलेल्या जनसुरक्षा विधेयकाविरोधात महाविकास आघाडीकडून राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. शहरी नक्षलवादाचा बीमोड करण्याच्या नावाखाली विरोधी पक्षाचा आवाज दाबण्यासाठी हे विधेयक मंजूर करण्यात आले, असा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे. पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आंदोलन खासदार सुप्रिया सुळे यांचे नेतृत्वात सुरू करण्यात आले आहे. पुणे स्टेशन जवळील महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ संविधानाचा जयजयकार करत सरकारच्या हुकूमशाही प्रवृत्तीचा निषेध करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राज्य प्रवक्ते महेश तपासे, RPI चे नेते सचिन खरात, विशाल तांबे, मनाली भीलारे, शेखर धावडे, डॉ.निकिता गायकवाड, मंजिरीं घाडगे, श्रधा जाधव,पायल चव्हाण, फईम शेख, युसुफ शेख, नरेश पगाडल्लू, वंदना मोडक, शैलेंद्र बेल्हेकर, सागर खांदवे व मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारतीय संविधानाचा विजय असो, जनसुरक्षा कायदा रद्द करा, अशा घोषणाबाजी करत राज्यभर हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. पुण्यात आंदोलनावेळी माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, महाविकास आघाडीमध्ये तुम्हाला आठवत असेल जेव्हा माननीय उद्धवजी स्वतः असेंब्लीमध्ये आले होते त्यावेळेस कॉंग्रेस असेल, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गट असेल आम्ही सगळ्यांनी मिळून हा कायदा आणला होता, तेव्हा सगळ्यांनीच याचा विरोध केला होता. मला एकाच गोष्टीचे आश्चर्य वाटते की एकीकडे हे सरकार सातत्याने सांगत आहे की हे या देशातून नक्षलवाद संपवला असे हे केंद्र सरकार नाहीतर राज्यातील सरकार सांगत आहे. तर मग नक्षलवादाच्या विरोधात आधीच आपल्याकडे कायदे असताना आणखी एक कायदा कशासाठी? असा सवाल सुळे यांनी उपस्थित केला.

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, सगळ्या समाजात अशी एक चर्चा आहे की हा फक्त की असे कायदे आणून संविधानाच्या विरोधी घेतलेला हा निर्णय आहे. हा देश कोणाच्या मन मर्जी चालणार नाही. हा देश फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालणार आणि म्हणून या विधेयकाचा महाविकास आघाडी म्हणून तर आहेच पण जबाबदार नागरिक या नात्याने विरोध करू. आमची विनंती आहे हे विधेयक मागे घेण्यात यावे.

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवर प्रश्न विचारण्यात आला असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, गुप्त मतदान असताना मग कसे कळणार की त्यात कोणत्या पक्षाने क्रॉस व्होटिंग केले? वायएसआर कॉंग्रेस हा पक्ष इंडिया आघाडीत नाही. तुम्हाला कसे माहीत आहे की गुप्त मतदान असताना कोणती मते फुटली हे कसे समजेल? असे आरोप जर केले जात आहेत तर राहुल गांधी जे म्हणतात ते खरेच आहे व्होट चोरी झाली. मला माहीत नाही कोणाची मते फुटली. 15 मते अवैध आहेत आणि त्यातली 10 मते त्यांची असल्याचे त्यांनीच कबूल केले आहे.

दरम्यान, जनसुरक्षा विधेयक हे दडपशाही आणि हुकूमशाही प्रवृत्तीचे असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. हे विधेयक म्हणजे सरकारविरोधातील आवाज दडपण्यासाठी वापरले जाणारे एक ‘अस्त्र’ आहे, अशी भीतीही काँग्रेसने व्यक्त केली आहे. काँग्रेसच्या मते, सध्या नक्षलवादाशी संबंधित कायदे पुरेसे कठोर आहेत. त्यामुळे वेगळ्या कायद्याची गरज नाही. या नव्या विधेयकानुसार कोणत्याही व्यक्तीला अटक करण्याचा, तुरुंगात टाकण्याचा आणि त्यांची संपत्ती जप्त करण्याचा अधिकार सरकारला मिळेल. यामुळे विरोधकांचा आवाज दडपला जाण्याची शक्यता आहे, असे काँग्रेसने त्यांचे प्रसिद्धी पत्रकातून म्हटले आहे.

राष्ट्रघडणीतील शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे- नवल किशोर राम

पुणे- महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या सन २०२५ च्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ प्रसंगी महापालिका आयुक्त नवल किशोर राम म्हणाले कि,राष्ट्रघडणीतील शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे आहे आणि ते नेहमीच महत्वाचे राहिले आहे. यावेळी
पुणे महापालिकेच्या वतीनेपालिकेच्या प्राथमिक शाळांमधील १० व खाजगी शाळा मधील ५ आदर्श शिक्षकांना पुरस्कार देण्यात आले. आदर्श शिक्षक वितरण पुरस्कार्थीना यावेळी मानपत्र, सन्मानचिन्ह, तसेच टॅब देऊन गौरविण्यात आले.


बालगंधर्व रंग मंदिरात झालेल्या या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण प्रसंगी नवल किशोर राम यांनी शिक्षक, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी करत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. राज्यात पुणे महानगरपालिका शिक्षणासाठी,विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक प्रगतीसाठी अविरत झटणारी महानगरपालिका म्हणून गणली जाते असे त्यांनी म्हटले. विद्यार्थ्यांना ई लर्निंग च्या माध्यमातून शिक्षण दिले जाते. तसेच विविध स्पर्धा परीक्षांना मुलांना बसविले जाते व त्यातूनच विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आलेख उंचाविण्याचा शिक्षकांचा सतत प्रयत्न चालू असतो. समाजात विद्यार्थी चांगल्या प्रकारे उभा रहावा हे शिक्षकाचे मुख्य उदिष्टय असते. शिक्षणात कौशल्याधिष्टीत ज्ञान गरजेचे असते. शिक्षकांबद्दल आदर व्यक्त करीत असताना त्यांच्या शालेय जीवनातील गुरुकुल पद्धतीच्या शाळेतील स्वावलंबी शिक्षणाच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.


पुणे महानगरपालिकेच्या वतीने पुढील वर्षभरात ७५ मॉडेल स्कूल तयार करण्याबाबतचे सुतोवाच यावेळी त्यांनी केले. तसेच पुढील तीन वर्षात सर्व शाळा मॉडेल करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. शिक्षकांना शिकविण्याशिवाय झ्तरही बरीच कामे करावी लागतात, ती कमी करण्याचा प्रयत्न करु असे त्यांनी म्हटले. शिक्षकांनी स्वतः व विद्यार्थ्यांना वाचनाची आवड लावावी . त्यासाठी पुणे मनपाच्या वतीने पुस्तक मेळावा आयोजित केला जाईल असे सांगितले. मराठी संस्कृती व मराठी भाषा खूप उच्च दर्जाची असून ती विद्यार्थांपर्यंत पोहचविण्याचा सर्व शिक्षकांनी प्रयत्न करावा असे त्यांनी सांगितले.याप्रसंगी वडगावशेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी गुरुजनांचा योग्य सन्मान व्हावा असे सांगितले.
प्रास्ताविक शिक्षण विभागाचे उपायुक्त विजय थोरात यांनी केले .शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यास महापालिका बांधिल राहील.तसेच समाविष्ट गावातील व इतर सर्व शाळांना भौतिक सुविधा पुरविण्याचे धोरण महापालिकेचे राहील असे त्यांनी स्पष्ट केले. महानगरपालिका क्षेत्रातील सर्व ३००० शिक्षक आमच्या दृष्टीने आदर्श आहेत असे गौरवउद्गार आपल्या प्रास्ताविकात काढले. शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी सुनंदा वाखारे यांनी गुरु शिष्य परंपरा या शिक्षक दिनाच्या निमित्ताने जपली जाते असे म्हटले. मुलांमध्ये शिक्षणाची ओढ निर्माण करणारे शिक्षक हवेत असे यावेळी सांगितले.
आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षिका रेखा कामथे (रेखा एकनाथ भालघरे) यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभाग पुणे महानगरपालिकेमार्फत करत असलेल्या विद्यार्थ्यांच्या सर्व योजनांचा नामोल्लेख केला. आपण आपल्या सहकाऱ्यांच्या सहकार्यातून आपली शाळा व आपले पुणे शहर निश्चितच स्मार्ट बनवून दाखवू असे सर्व शिक्षकांच्या वतीने सांगितले. व आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन शिक्षकांचा यथोचित सन्मान केल्याबद्दल, शिक्षकांना प्रोत्साहन दिल्याबद्दल पुणे महानगरपालिकेचे आभारही व्यक्त केले.
याप्रसंगी एम जे प्रदीप चंद्रन (भाप्रसे )अतिरिक्त महापालिका आयुक्त ( ज) .तसेच पुणे महानगरपालिकेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती आशा उबाळे उपस्थित होते. उपप्रशासकीय अधिकारी श्रीमती शुभांगी चव्हाण यांनी कार्यक्रमाचे आभार मानले. सदर कार्यक्रमासाठी आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक व त्यांचे नातेवाईक, पुणे शहरातील शिक्षक व शिक्षण विभागातील सर्व अधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

१० मागण्यांना तत्वतः मान्यता,एनएचएम कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे

0

एकत्रीकरण समितीच्या लढ्याला यश.

मुंबई ता. १०: राष्ट्रीय आरोग्य अभियानातील (एनएचएम) कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या समवेत झालेल्या बैठकीनंतर आज अखेर मागे घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार याविषयी सकारात्मक असल्याचे सांगत आबिटकर यांनी संघटनेतील पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन १३ पैकी १० मागण्यांना तत्वतः मान्यता दिली. तसे लेखी पत्र राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना सुपूर्त केले. यामुळे गेल्या २३ दिवसांपासून सुरू असलेला बेमुदत संप संघटनेने मागे घेतला.

१४ मार्च २०२४ रोजी झालेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी व्हावी, यासाठी १९ ऑगस्टपासून एनएचएमच्या राज्यभरातील सुमारे ३५ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू होते. विविध मागण्यांसाठी आरोग्य सेवेतील १६ संघटनांनी प्रथमच एकत्रित येऊन यात सहभाग घेतला होता. आरोग्यमंत्री आबिटकर यांनी आज एकत्रीकरण संघटनेशी सविस्तर चर्चा करून यावर तोडगा काढला. यावेळी संघटनेचे राज्य समन्वयक विजय गायकवाड, ॲड. भाग्यश्री रंगारे, श्रीधर पंडित, गौरव जोशी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. तत्पूर्वी आयुक्त कादंबरी बलकवडे आणि सार्वजनिक आरोग्य सेवेचे संचालक नितीन अंबाडेकर यांच्यातही याविषयी सकारात्मक बैठक झाली.

आबिटकर म्हणाले की, समायोजन प्रक्रियेसह कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न प्राधान्याने मार्गी लागावे, अशी माझी कायमच आग्रही भूमिका होती. परंतु, हे प्रश्न सोडवताना भविष्यात त्यामध्ये कोणत्याही त्रुटी राहू नये, यासाठी मी प्रयत्नशील होतो. सामान्य प्रशासक, ग्रामविकास, नगर विकास, वैद्यकीय शिक्षण यांच्या देखील मी सातत्याने संपर्कात होतो. सदर कार्यभार सांभाळणाऱ्या मंत्री महोदयांनी तसेच वरिष्ठांनी याविषयी अनुकूलता दर्शविली. मागण्यांची अंमलबजावणी करताना शासकीय पातळीवर सकारात्मकता असली तरी प्रशासकीय आणि तांत्रिक बाबींची पडताळणी आणि पूर्तता करण्यासाठी आवश्यक तो वेळ द्यावा लागेल. उर्वरित ३ मागण्या समायोजनासंदर्भात असल्याने त्यातील तांत्रिक बाबींना लागणारा विलंब लक्षात घेता, त्यावरही लवकरच कार्यवाही केली जाईल, असे सांगून मंत्री आबिटकर यांनी संघटनेला आश्वासित केले. तसेच पुढील समन्वय व पाठपुराव्यासाठी संघटनेने समिती स्थापन करावी, अशी सूचनाही केली.

संघटनेचे समन्वयक गायकवाड यांनी सांगितले की, माननीय मंत्री महोदयांशी झालेल्या आश्वासक चर्चेनंतर आम्ही त्याक्षणी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला. समायोजनाबाबत पहिल्या टप्प्यात १० वर्षाहून अधिक सेवा पूर्ण झालेल्या १३ हजार कर्मचाऱ्यांना फायदा होणार असून भविष्यात सर्व राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ होईल. काही मागण्या टप्प्याटप्प्याने मार्गी लागतील, याची आम्हाला कल्पना असून यासाठी शासन व प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याची आमची भूमिका आहे. आम्ही लवकरच मंत्री महोदयांच्या सूचनेचे पालन करून समिती स्थापन करणार आहोत. यासाठी आम्हाला वेळ दिल्याबद्दल मी सर्व संघटनेच्या वतीने आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, आयुक्त कादंबरी बलकवडे आणि संचालक नितीन अंबाडेकर यांचे मनापासून आभार मानतो.

तत्वतः मंजूर झालेल्या मागण्या;

१. कर्मचारी मूल्यांकन अहवालानुसार, मानधनवाढ न करता सरसकट दरवर्षी ८ टक्के व एकवेळची बाब म्हणून सन २०२५ व २६ मध्ये १० टक्के वार्षिक वाढ करावी.

२. ३ व ५ वर्षे सेवा पूर्ण झालेले अधिकारी व कर्मचारी यांना लॉयटी बोनस पूर्ववत लागू करावा.

३. Pay Protection नियमानुसार मानधन संरक्षित करावे जुन्या कर्मचाऱ्यांची नवीन ठिकाणी नियुक्ती झाल्यास लागू करावे.

४. सन २०१६ आणि २०१७ पूर्वी कार्यरत असलेल्या व २०१७ च्या नंतर नियुक्त झालेल्या कर्मचारी यांच्यातील मानधनातील तफावत दूर करून नवीन वेतन सुसूत्रीकरण धोरण राबवावे.

५. कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण अपघाती मृत्यू पाच लक्ष अपंगत्व २५ लाख औषध उपचार २ ते ५ लाख प्रमाणे लागू करावे.

६. ईपीएफ, ग्रॅज्युटी योजना १५ हजार त्यापेक्षा जास्त मानधन असणाऱ्या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना लागू करावी.

७. १० वर्ष सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांचे १०० टक्के समायोजन व प्रत्येक वर्षी ३० टक्के प्रमाणे सार्वजनिक आरोग्य विभाग ग्रामविकास व नगर विकास विभाग वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग यामध्ये समायोजन करावे.

८. १४ मार्च २०२४ रोजी झालेल्या शासन निर्णयानुसार जोपर्यंत शासन स्तरावर पात्र कर्मचारी यांचे समायोजन होत नाही तोपर्यंत सर्व नियमित शासकीय कर्मचारी यांचे नियम व वेतन आयोगाच्या वेळोवेळी होणाऱ्या शिफारशीनुसार लागू करावे किंवा समान काम समान वेतन लागू करावे ज्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे रिक्त जागी समायोजन होणार नाही अशा सर्व कंत्राटी व अधिकारी कर्मचाऱ्यांचे अधिसंख्य पदे निर्माण करून समावेशन करावे.

९. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या सेवा कालावधी सहा वर्षे पूर्ण झाल्यानंतर कंत्राटी सेवा नियमित करण्याचा निर्णय सर्वांना लागू करणे.

१०. कर्मचारी मूल्यांकन अहवाल असमाधानकारक असल्यास नैसर्गिक न्यायाच्या नियमानुसार सदर करणाऱ्या कर्मचाऱ्यास स्वतःची बाजू मांडण्याची संधी उपलब्ध करून देणेबाबत परिपत्रक जारी करणे.

११. समुदाय आरोग्य अधिकारी बदली धोरणाप्रमाणे जिल्हा व अंतर जिल्हा बदली एक वेळची बाब म्हणून सर्व एनएचएम कर्मचारी यांना विनंतीप्रमाणे बदली धोरण लागू करावे

१२. CHO यांचे एकत्रित मानधन ३५ हजार व पीबीआय रुपये ५००० करावे.

१३. अतिदुर्गम भागात काम करणाऱ्या कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांना हँडशिप अलाउन्स वनक्षलग्रस्त भागाप्रमाणे सर्व भत्ते देणे.

नेपाळवर लष्कराचे नियंत्रण:तरीही हिंसाचार सुरूच; सर्वोच्च न्यायालयात 25 हजार फायली नष्ट

0

संसद आणि सर्वोच्च न्यायालय जाळले:संपूर्ण काठमांडूमध्ये जाळपोळ, लोक म्हणाले- आमचे सरकार करप्ट गॅंग

काठमांडू-नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदी आणि भ्रष्टाचाराविरुद्ध सुरू असलेल्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. हिंसक निदर्शने थांबवण्यासाठी मंगळवारी रात्री १० वाजल्यापासून लष्कराने संपूर्ण देशाचा ताबा घेतला आहे.नेपाळी सैन्याने म्हटले आहे की, कठीण काळाचा फायदा घेत काही दुष्कृत्ये सामान्य लोकांचे आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान करत आहेत. लूटमार आणि जाळपोळ यासारख्या कारवाया होत आहेत. अशा कारवाया थांबवल्या पाहिजेत.

निदर्शकांचा रोष पाहून केपी शर्मा ओली यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आणि काठमांडू सोडले. तत्पूर्वी, निदर्शकांनी केपी ओली यांचे खाजगी घर, राष्ट्रपती भवन आणि सर्वोच्च न्यायालयाला आग लावली.

काल आंदोलकांनी शेर बहादूर देउबा, झलानाथ खलन आणि पुष्प कमल दहल प्रचंड या तीन नेपाळच्या पंतप्रधानांच्या घरांना आग लावली.माजी पंतप्रधान झलनाथ खनाल यांच्या पत्नी राजलक्ष्मी चित्रकर त्यांच्या घरात लागलेल्या आगीत गंभीर भाजल्या. त्यांना तातडीने कीर्तिपूर बर्न हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, जिथे त्यांचा मृत्यू झाला.त्याच वेळी, माजी पंतप्रधान शेर बहादूर देऊबा यांना त्यांच्या घरात मारहाण करण्यात आली, तर अर्थमंत्री विष्णू पौडेल यांना काठमांडूमधील त्यांच्या घराजवळ पाठलाग करून मारहाण करण्यात आली.

नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदी आणि भ्रष्टाचाराविरुद्ध सुरू असलेल्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. हिंसक निदर्शने थांबवण्यासाठी मंगळवारी रात्री १० वाजल्यापासून लष्कराने संपूर्ण देशाचा ताबा घेतला आहे.नेपाळी सैन्याने म्हटले आहे की, कठीण काळाचा फायदा घेत काही दुष्कृत्ये सामान्य लोकांचे आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान करत आहेत. लूटमार आणि जाळपोळ यासारख्या कारवाया होत आहेत. अशा कारवाया थांबवल्या पाहिजेत.निदर्शकांचा रोष पाहून केपी शर्मा ओली यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आणि काठमांडू सोडले. तत्पूर्वी, निदर्शकांनी केपी ओली यांचे खाजगी घर, राष्ट्रपती भवन आणि सर्वोच्च न्यायालयाला आग लावली.नेपाळच्या चितवन जिल्ह्यात मंगळवारी निदर्शकांनी सर्वोच्च न्यायालय आणि सरकारी वकिलांच्या कार्यालयाला आग लावली, ज्यामुळे अनेक कागदपत्रे जळून खाक झाली.


नेपाळमध्ये २००८ पर्यंत सुमारे २५० वर्षे राजेशाही होती. १९५१ मध्ये लोकशाहीचा प्रयत्न सुरू झाला असला तरी तो वारंवार थांबवण्यात आला. १९९६ ते २००६ पर्यंत माओवादी बंडखोर आणि राजेशाहीमध्ये १० वर्षांचे गृहयुद्ध सुरू राहिले, ज्यामध्ये १७ हजारांहून अधिक लोक मृत्युमुखी पडले.अखेर, २००७ मध्ये, राजेशाही संपवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि २००८ मध्ये नेपाळला लोकशाही प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. सुमारे ३ कोटी लोकसंख्या असलेल्या नेपाळमध्ये १०० हून अधिक वांशिक गट आणि भाषा आहेत, ज्यामुळे राजकीय एकमत निर्माण करणे नेहमीच कठीण राहिले आहे. २००८ पासून, येथे सरकारे सतत बदलत राहिली आणि भ्रष्टाचाराच्या घटना वाढतच गेल्या.२०१५ मध्ये सीपीएन-यूएमएल नेते केपी शर्मा ओली पहिल्यांदाच पंतप्रधान झाले. २०२४ मध्ये त्यांनी नेपाळी काँग्रेससोबत युती सरकार स्थापन केले आणि २०२७ पर्यंत दोन्ही पक्ष आलटून पालटून सरकार चालवतील असा निर्णय घेण्यात आला. परंतु हिंसक निदर्शनांनंतर ओली यांनी मंगळवारी राजीनामा दिला.

नेपाळनंतर फ्रान्समध्येही सरकारविरोधात निदर्शने:1 लाख लोक रस्त्यावर, अनेक ठिकाणी जाळपोळ; 80 हजार पोलिस तैनात

0

200 दंगलखोरांना अटक-सोशल मीडियावर ब्लॉक एव्हरीथिंग चळवळ
पॅरिस-नेपाळनंतर फ्रान्समध्येही सरकारविरोधात निदर्शने सुरू झाली आहेत. अर्थसंकल्पातील कपातीविरोधात आणि राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी बुधवारी १ लाखांहून अधिक लोक रस्त्यावर उतरले.अनेक ठिकाणी निदर्शकांचे सुरक्षा दलांशी संघर्ष झाले आहेत. त्यांनी अनेक ठिकाणी तोडफोड आणि जाळपोळही केली आहे. सरकारने ८० हजार पोलिस तैनात केले आहेत. आतापर्यंत २०० हून अधिक दंगलखोरांना अटक करण्यात आली आहे.

फ्रान्सचे नवे पंतप्रधान सेबास्टियन लेकोर्नूंनी बुधवारी निषेधांदरम्यान पदभार स्वीकारला. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे निकटवर्तीय आणि माजी संरक्षण मंत्री असलेले लेकोर्नू गेल्या दोन वर्षांत पाचवे पंतप्रधान बनले आहेत.लेकोर्नू पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचले, जिथे त्यांनी माजी पंतप्रधान फ्रँकोइस बायरो यांची भेट घेतली. अर्थसंकल्पीय तूट कमी करण्याच्या योजनेवर मतभेद झाल्यामुळे संसदेने बायरो यांना पदावरून काढून टाकले.

सोशल मीडियावर ब्लॉक एव्हरीथिंग चळवळ सुरू झाली. यामध्ये १० सप्टेंबर रोजी देशभरात सर्वकाही बंद करण्याचे आवाहन करण्यात आले. पंतप्रधानपदाचा राजीनामा देणाऱ्या फ्रँकोइस बायरो यांच्या अर्थसंकल्पीय धोरणांविरुद्ध हे आंदोलन सुरू झाले.
बायरो यांनी सार्वजनिक खर्चात सुमारे ४ लाख कोटी रुपयांची कपात केली होती. यामुळे देशभरात पेन्शन बंद करण्यात आली आणि इतर अनेक सामाजिक योजनांमध्ये कपात करण्यात आली. यामुळे लोक संतापले.फ्रान्सचे गृहमंत्री ब्रुनो रिटेलो म्हणाले की, बुधवारी निदर्शकांनी अनेक शहरांमध्ये रस्ते अडवले.अनेक ठिकाणी पोलिस आणि निदर्शकांमध्ये संघर्ष झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. आंदोलनाच्या सुरुवातीला सुमारे २०० जणांना अटक करण्यात आल्याचे मंत्र्यांनी सांगितले.

गिग कामगारांसाठी स्वतंत्र कायदा करण्यास शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

0

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या शिफारशीला कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचे आश्वासन

मुंबई, दि. ९ सप्टेंबर २०२५ : महाराष्ट्रात वाढत्या गिग (कंत्राटी) व प्लॅटफॉर्म कामगारांच्या सामाजिक सुरक्षेसाठी स्वतंत्र कायदा करण्यासंदर्भात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ८ जून २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कामगार मंत्री आ. आकाश फुंडकर यांना पत्राद्वारे शिफारस केली होती. त्यांच्या शिफारशीला सकारात्मक प्रतिसाद देत कामगार मंत्री यांनी गिग कामगारांच्या हितासाठी नवीन प्रस्तावित कायद्यामध्ये ठोस उपाययोजना करण्याचे आज (९ सप्टेंबर २०२५) पत्राद्वारे आश्वासन दिले आहे.

डॉ. गोऱ्हे यांनी गिग व प्लॅटफॉर्म कामगारांच्या (राइड-शेअरिंग/टॅक्सी सेवा चालक, फूड डिलिव्हरी कर्मचारी, फ्रीलान्स व्यावसायिक, ग्राफिक डिझाइनर्स, कंटेंट रायटर्स, वेब डेव्हलपर्स, व्हिडिओ एडिटर्स, हायपरलोकल डिलिव्हरी व कुरिअर सेवा कर्मचारी, ऑनलाइन ट्यूटर्स व ट्रेनर्स) कल्याणासाठी स्वतंत्र कायदा व त्रिपक्षीय मंडळ स्थापन करण्याची शिफारस केली होती.

कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी कळविले आहे की, राज्यातील नागरी भागात ई-कॉमर्स व प्लॅटफॉर्म सेवांमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यरत असलेल्या गिग कामगारांसाठी स्वतंत्र नियामक व कल्याणकारी कायदा करण्याची कार्यवाही शासनस्तरावर सुरू आहे. त्यांनी नमूद केले की, या संदर्भात विविध बैठका घेऊन प्रस्तावित कायद्याचा अभ्यास करण्यात आला आहे. तसेच, डॉ. गोऱ्हे यांनी मांडलेल्या सुचनांचा विचार करूनच अंतिम कायदा तयार केला जाईल.

डॉ. गोऱ्हे यांनी गिग कामगारांसाठी किमान वेतन, आरोग्य विमा, सवेतन रजा, निवृत्ती लाभ, कौशल्यविकास कार्यक्रम, महिला-पुरुष समान वेतन, आरोग्य व मानसिक तणाव प्रतिबंधक उपाययोजना आणि पारदर्शक तक्रार निवारण यंत्रणा यांसारख्या तरतुदी कायद्यात समाविष्ट करण्याची शिफारस केली होती.

राज्य शासनाने हा कायदा पारित केल्यास महाराष्ट्र इतर राज्यांसाठी आदर्श ठरेल, असेही डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले आहे. तसेच, सर्व गिग कामगार, स्वयंसेवी संस्था व सामाजिक कार्यकर्ते यांना आवाहन केले आहे की, याव्यतिरिक्त त्यांच्या काही सूचना, प्रस्ताव असल्यास ते शासनाला व उपसभापती कार्यालयास पाठवावेत. जेणेकरून योग्य सूचना व प्रस्ताव विचारात घेणे शक्य होईल.

मुंबई मराठी साहित्य संघाच्या निवडणुकीत ‘ डुप्लिकेट ‘ मत पत्रिका

0

संगनमत करून ६०० मतपत्रिका चोरून लपवून ठेवल्याचा आरोप

मुंबई दि. ०९ :

मतचोर म्हणून राजकारण्यांना बोलले जाते, पण ही व्होटचोरी आता मुंबई मराठी साहित्य संघाच्या निवडणुकीत सुरू आहे. संघातील कर्मचारी आणि निवडणूक अधिकारी यांच्याशी संगनमत करून ६०० सदस्यांच्या मत पत्रिका चोरून लपवून ठेवल्या आहेत. योग्य वेळी त्या पेटीत टाकायच्या,असे कारस्थान सुरू आहे. तसेच मतदारांना आता ‘ डुप्लिकेट ‘ मत पत्रिका दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप डॉ.भालेराव विचार मंच पॅनलच्या उमेदवारांनी डॉ. उषा तांबे यांच्या ‘ऊर्जा’ पॅनलवर केला आहे. निवडणुकीचा कंत्राटदार आणि निवडणूक अधिकारी यांची फौजदारी चौकशी व्हावी, अशी मागणीही भालेराव पॅनलने केली आहे.

गिरगाव येथील मुंबई मराठी साहित्य संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत सुरू असलेल्या मनमानी कारभाराबाबत ही निवडणूक लढविणाऱ्या डॉ.भालेराव विचार मंच पॅनलचे उमेदवार प्रा.नरेंद्र पाठक, प्रमोद पवार, दिवाकर दळवी, अनिल गजके, सारंग दर्शने यांनी मंगळवारी मुंबई मराठी पत्रकार संघात परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला.

निवडणुका जाहीर होण्यापूर्वी मतदार यादी अद्यावत करणे गरजेचे होते. मात्र संघाच्या कार्यवाह डॉ.अश्विनी भालेराव यांनी त्याची काही आवश्यकता नसल्याचे सांगत आमची सूचना दुर्लक्षित केली. आम्ही ४०० रुपये भरून यादी घेतली. त्यातील १३१५ मतदारांना आमचा जाहीरनामा पाठविला. सदस्य यादी अद्यावत नसल्यामुळे ३४५ पत्रे परत आली. मतदारांकडे चौकशी केली असता त्यांना अदयाप मत पत्रिका मिळालेल्या नाहीत. ऊर्जा पॅनलचे डॉ. उषा तांबे, डॉ. भालेराव, भागवत, मेहेंदळे, हिंगलासपूरकर, केंकरे व इतर उमेदवारांनी निवडणूक अधिकारी ऍड. यशोधन दिवेकर आणि संघातील कर्मचारी यांच्याशी संगनमत करून ६०० मत पत्रिका लपवून ठेवल्या आहेत. योग्य वेळी ही मत पेटीत टाकायची कारस्थान रचण्यात आले आहे. मत पत्रिकेचे कंत्राट ज्या खासगी एजन्सीला देण्यात आले त्या एजन्सीने प्रत्यक्षात मतपत्रिका न पाठविता केवळ बुकिंग रिसिट साहित्य संघात जमा केली. हा फौजदारी स्वरूपाचा आर्थिक घोटाळा असून त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही डॉ.भालेराव विचार मंच पॅनलचे प्रमोद पवार यांनी केली आहे.