Home Blog Page 1263

म्हणाले,रामराजे..आतापर्यंत मीही वनवास भोगला,जो मोदींमुळे संपला –

पुणे-पूर्वीच्या नेतृत्वाबद्दल काही बोलणार नाही, परंतु मोदिशिवाय पर्याय नाही.
माझ्या नावातच राम आहे, परंतु इतके वर्ष वनवासात होतो. आता मोदींमुळे व्यवस्थित बाहेर आलो आहे.असे वक्तव्य येथे राष्ट्रवादीचे रामराजे निंबाळकर यांनी केले आहे. शरद पवारांवर त्यांनी केलेल्या या टीकेचे पडसाद आता काय उमटतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घटक भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं (आठवले गट) आणि मित्र पक्षांच्या पुणे जिल्ह्याचा संयुक्त मेळावा काल सायंकाळी डीपी रस्त्यावरील शुभारंभ लॉ न येथे आयोजित करण्यात आला होता.

विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, खासदार प्रकाश जावडेकर, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, आमदार भीमराव तापकीर, सुनील टिंगरे, सुनील कांबळे, महेश लांडगे, राहुल कुल, उमा खापरे सिद्धार्थ शिरोळे, माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, चेतन तुपे, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, शंकर जगताप, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर, वासुदेव काळे, प्रदीप गारटकर, शिवसेनेचे शहरप्रमुख अजय भोसले व प्रमोद भानगिरे, रिपाइंचे शहराध्यक्ष परशुराम वाडेकर,शिवसेना जिल्हा निरीक्षक किशोर भोसले, उपनेते इरफान सय्यद, जिल्हा प्रमुख उल्हास तुपे, रमेश कोंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. भाजपचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर आणि आर पी आय चे ऍड.मंदार जोशी यांनी सूत्रसंचालन केले.तर आभार प्रदर्शन शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी केले

दीपक मानकर यांनी प्रास्ताविक केले. हा मेळावा लोकसभा, विधानसभा आणि महापालिकेच्या विजयाची नांदी आहे. एका विचाराने सर्व नेते एकत्र आले आहे. त्यातून राज्याच्या विकासाला गती मिळत आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने एकमेकांमध्ये समन्वयाचा प्रयत्न करण्यात आला. राम नामाच्या ताकदीमुळे काँग्रेसचे नेते घाबरले आहेत. काँग्रेसची अवस्था वाईट आहे. त्यांना उमेदवार मिळतो की नाही अशी शंका आहे. महायुतीचा उमेदवार दहा लाख मते घेतल्याशिवाय आणि विरोधी उमेदवाराचे डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाही. लोकसभेच्या ४८ जागा जिंकल्याशिवाय राहणार नाही. उद्धव ठाकरे यांनी जो उद्योग केला, त्यामुळे त्यांना सोसावा लागला. आमच्या निर्णयाची आम्ही वाट बघतो आहोत. तो निर्णयही अजित पवारांच्या बाजूने लागल्याशिवाय राहणार नाही. पुण्याचा लोकसभेचा महायुतीचा उमेदवार राज्यात सर्वाधिक मताने निवडून आणायचा संकल्प करूयात.

भाजपचे प्रदेश सरचिटणीस आणि या मेळाव्याचे जिल्हा समन्वयक मुरलीधर मोहोळ यांनी मेळाव्याची भूमिका स्पष्ट केली. मोहोळ म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रातील सरकार आणि राज्यातील महायुतीचे सरकार अत्यंत चांगले काम करत आहे. त्यामुळे या दोन्ही सरकार बद्दल लोकप्रियता आहे. सरकारमधील सर्व पक्ष एकजुटीने जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि विकासासाठी कटीबद्ध आहेत. त्याचप्रमाणे आगामी काळातील निवडणुकांमध्ये महायुतीतील सर्व पक्ष आणि संघटना यांनी एकत्र येऊन समन्वय साधने आवश्यक आहे. एकमेकातील समन्वयासाठी राज्यातील ३६ शासकीय जिल्ह्यांमध्ये आज महायुतीचे मेळावे आयोजित करण्यात आले. आगामी काळात विभाग स्तरावर सहा मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. महायुतीच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील लोकसभेच्या चारही जागा विधानसभेच्या सर्वच्या सर्व 21 जागा, दोन्ही महापालिका आणि जिल्हा परिषदेत निवडणुकीत बहुमताने विजय संपादन करू असा विश्वास व्यक्त करतो. त्यासाठी आजचा महायुतीचा जिल्हा मेळावा महत्त्वाचा आहे.

तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करू, असे परशुराम वाडेकर म्हणाले.

त्यावर काही करून पदे द्या असे म्हणू नका, सबका साथ सबका विकास हे आपण ठरवले आहे, असे खासदार जावडेकर यांनी सांगितले. जावडेकर म्हणाले, तिसरी बार मोदी सरकार आणि इस बार चार सो पार हा संकल्प साकार करण्यासाठी राज्यात ४८ च्या ४८ जागा निवडून आणणार. बारामती २०१४ लाच पडत होते. थोडक्यात घोटाळा झाला. या वेळी लक्षात येईल. दोन वर्षे बसे मुख्यमंत्री पाहिले आहेत. तेलंगणात असेच मुख्यमंत्री होते. लोकांनी त्यांना घरी बसविले. काम करणारी सेना हवी आहे. राम प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमावर काँग्रेस बहिष्कार टाकत आहे. चांगल्या गोष्टीला काँग्रेसला या देशाचे सत्व कळले नाही. या देशातील जनता तुमच्यावर बहिष्कार टाकणार आहे. लोकसभा निवडणुकीला शंभर दिवस राहिले असून, सर्व पक्षांनी एकजीवाने काम केले पाहिजे. प्रत्येक घरी जाऊन आपले मत पोहोचवा. कामाचे वाटप नीट करून वेळापत्रक तयार करा. त्यासाठी पुण्यात पन्नास टक्के मतदान झाले होते. पुण्यात ७५ टक्के मतदान झाल्याशिवाय राहणार नाही. त्यातून दहा लाखाच्या फरकाने जिंकल्याशिवाय राहणार नाही.

रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, अजित पवार येणार होते. व्यग्र कार्यक्रमामुळे मला सांगण्यात आले. माझे कार्यस्थळ सातारा असले तरी जन्मस्थळ व शिक्षण स्थळ पुणे आहे. मोदीच्या कार्यशैलीमुळे आपण एकत्र आलो आहोत. 72 साली दुष्काळात मिलो खाणारा देश आता पाच ट्रीलियन डॉलरची अर्थव्यवस्था होत आहे, हे दुसऱ्या पक्षातून आलेल्याना हे आकर्षण आहे. राजकीय विचारधारा काही असली तरी मोदींची विकासाची विचारधारा हाच भारताचा धर्म होईल. राजकीय इच्छाशक्ती आणि अपार कष्ट करायची ताकद इतर पक्षातील नेत्यांना भावत आहे.
महायुतीत येण्याचे भाग्य राष्ट्रवादीला मिळाले. उगाच काही न करणारे नेतृत्व आता नाही. एकमेकांविषयीची कटुता दूर करण्याचे संधी या मेळाव्यात आली आहे. पूर्वीच्या नेतृत्वाबद्दल काही बोलणार नाही, परंतु मोदिशिवाय पर्याय नाही.
माझ्या नावातच राम आहे, परंतु इतके वर्ष वनवासात होतो. आता मोदींमुळे व्यवस्थित बाहेर आलो आहे.

महायुती हाच आपला पक्ष झाला आहे ही भावना असली पाहिजे. सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काम केल्यास आपला विजय नक्की आहे

डॅा. दीपक हरके यांचा अभिनेत्री जयाप्रदा यांच्या हस्ते ‘इंटरनॅशनल एक्सेलन्स अवॉर्ड’ देऊन सन्मान

पिंपरी, पुणे – प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे ध्यानधारणा प्रशिक्षक आणि १८२ विश्वविक्रम करणारे पहिले भारतीय डॉ. दीपक हरके यांना ‘इंटरनॅशनल एक्सेलन्स अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला.
दिल्ली येथील रॅडीसन ब्ल्यू हॉटेल मध्ये आयोजित केलेल्या एज्युकेशन समिट मध्ये सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री जयाप्रदा यांच्या हस्ते डॉ. दीपक हरके यांना मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय माजी उपाध्यक्ष श्याम जाजू, ब्रह्माकुमारी सरोज दीदी आदी उपस्थित होते.
भारताच्या प्राचीन राजयोगाचा प्रसार व प्रचार करण्यासाठी विशेष योगदान दिल्याबद्दल डॉ. हरके यांचा सन्मान करण्यात आला. डॉ. हरके यांना मिळालेल्या सन्मानामुळे राजयोग केंद्रांमधील युवा प्रशिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नारायण राणेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा.

शंकराचार्यांचा आणि हिंदू धर्माचा अपमान करणाऱ्या राणेंविरोधात काँग्रेसचा राज्यभर आक्रोश.

मुंबई,
भारतीय जनता पक्षाचे नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी हिंदू धर्मासाठी शंकराचार्यांचे योगदान काय ? असा प्रश्न विचारून शंकराचार्य आणि हिंदू धर्माचा अपमान केला आहे. शंकराचार्यांना प्रश्न विचारून हिंदूंचा अपमान करणा-या नारायण राणेंविरोधात काँग्रेसने रस्त्यावर उतरून आंदोलन केले. राज्यभर हे आंदोलन करण्यात आले, यावेळी नारायण राणेंविरोधात घोषणा देत त्यांचा तीव्र निषेध करण्यात आला. हिंदू धर्माचा व शंकाराचार्यांचा अपमान करणाऱ्या मुजोर नारायण राणेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, मुनाफ हकीम यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी नारायण राणेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पुण्यातील बालगंधर्व चौकात आमदार रविंद्र धंगेरकर, शहराध्यक्ष अरविंद शिंदे व पदाधिकारी यांनी आंदोलन केले. छत्रपती संभाजीनगर येथे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष कल्याण काळे, शेख युनुस व पदाधिकारी यांनी क्रांती चौक येथे आंदोलन केले. लोणावळा शहर महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. नारायण राणे मुर्दाबाद, नारायण राणे माफी मांगो, अशी घोषणाबाजी करण्यात आली.

भारतीय जनता पक्षाने राम मंदिराचा इव्हेंट करुन राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. राम मंदिर हा आस्थेचा प्रश्न आहे, अयोध्येत राम मंदिर व्हावे ही सर्वांचीच इच्छा आहे परंतु भारतीय जनता पक्ष मंदिराच्या नावाखाली स्वतःचा स्वार्थ पहात आहे. अर्धवट मंदिरात प्राण प्रतिष्ठा करणे चुकीचे आहे असे चारही शंकराचार्यांनी म्हटले आहे. भाजपा व त्यांचे नेते आता शंकराचार्यांना उलट प्रश्न विचारून त्यांचे योगदान विचारत आहे. नारायण राणे यांनी केलेल्या या मुजोरीविरोधात काँग्रेसने राज्यभर आंदोलन करून संताप व्यक्त केला.

मोहोळ हत्या:पनवेलमध्ये छापा: रामदास मारणे,विठ्ठल शेलार या मुख्य आरोपींना अटक

पुणे : येथील गुंड, शरद मोहोळ याच्या शरद मोहोळ हत्येप्रकरणी मुख्य आरोपी रामदास मारणे उर्फ वाघ्या आणि गुंड विठ्ठल शेलारसह इतर आरोपींना पनवेल पोलिसांनी ताब्यात घेऊन पुणे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. शरद मोहोळच्या हत्येचा कट रचण्यात रामदास मारणे उर्फ वाघ्या आणि गुंड विठ्ठल शेलारची मुख्य भूमीका आहे असे पोलिसांचे म्हणणे आहे.

शरद मोहोळ हत्येप्रकरणी आतापर्यंत पुणे पोलिसांनी 13 जणांनाना पकडले आहे. मोहोळ प्रकरणात रोज नव्या अपडेट समोर येत आहे. शरद मोहोळ हत्येच्या कटातील मुख्य आरोपी रामदास मारणेसह 10आरोपींना अटक नवी मुंबई पोलीसांनीकेली आहे. . अटक करण्यात आलेल्या सहा आरोपींपैकी तीन मुख्य आणि तीन संशयीत आरोपी आहे. पनवेल पोलीसांनी पनवेल येथील एका फार्म हाऊसवर कारवाई करत आरोपींना अटक केली आहे.शरद मोहोळच्या हत्येनंतर हे सर्व आरोपी पनवेल आणि वाशी भागात लपून बसले होते. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने रात्री लपलेल्या ठिकाणी छापा टाकला. यावेळी पनवेल पोलीसांची मदत घेण्यात आली. या सर्व आरोपींना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे..

आतापर्यंत मुन्ना पोळेकर हा मुख्य आरोपी असल्याचे मानले जात होते. पोळेकरने इतर साथीदारांसोबत या हत्येचा कट रचल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले होते. परंतु आता शरद मोहोळ प्रकरणात रोज नव्याने नावे समोर येत आहे. रामदास मारणेचे नाव समोर आल्यानंतर वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. जमीनीच्या वादातून हत्या झाली आहे.

‘सिंधी प्रीमिअर लीग’चे पाचवे पर्व ८ फेब्रुवारीपासून

सामाजिक एकोप्याच्या भावनेतून आयोजन; पाचव्या हंगामात १६ पुरुष, ६ महिला संघ खेळणार
पिंपरी (पुणे) : सिंधी प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेचे पाचवे पर्व यंदा ८ फेब्रुवारी ते २ मार्च २०२४ या कालावधीत पिंपरी येथे होणार आहे. यंदा महिलांच्या क्रिकेट सामान्यांचेही आयोजन केले असून, १६ पुरुष संघ व ६ महिला संघ सहभागी होणार आहेत. पिंपरी येथील एमसीसी, मृणाल क्रिकेट ग्राउंडवर होणाऱ्या या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण सिंधी प्रीमिअर लीग फेसबुक पेजवरून पाहता येणार आहे, अशी माहिती संयोजन समितीचे कन्वल खियानी, हितेश दादलानी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
थेरगाव येथील हॉटेल नूर्यामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेवेळी उद्योजक सुनील अडवाणी, अनिल आसवानी, जितू पहलानी यांच्यासह संयोजन समितीतील कमल जेठानी, रोनक पंजाबी, अवि इसरानी, अंकुश मुलचंदानी, नरेश नशा, करण आसवानी, अवि तेजवानी, सोमेश गिडवाणी, कुणाल गुडेला, रितेश आठवानी, महिला प्रतिनिधी अवनी तेजवानी, खुशबू पंजाबी, हिना गोगिया, शिखा सेवानी, शीतल पहलानी, रुपाली पंजाबी संघमालक व प्रायोजक उपस्थित होते.
हितेश दादलानी म्हणाले, “देशभरात विखुरलेला सिंधी समाज एकत्रित यावा, त्यांच्यात तंदुरुस्तीविषयी जागरूकता व्हावी, तसेच मोबाईल-इंटरनेटच्या जाळ्यात न अडकता मैदानावर खेळण्याला प्राधान्य द्यावे आणि खेळातून उभारलेल्या निधीचा समाजासाठी उपयोग व्हावा, या उद्देशाने हिरे स्पर्धा आयोजित केली जाते. सिंधी समाजातील उद्योजक तरुणांनी एकत्र येऊन या क्रिकेट लीगचे आयोजन केले आहे. ‘सिंधी प्रीमियर लीग सीजन ५’चे उद्घाटन ८ फेब्रुवारी २०२३ रोजी होणार आहे. यावेळी माजी क्रिकेटपटू, सिंधी समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, तसेच खेळाडू, संघ मालक व कुटुंबीयांची उपस्थिती असणार आहे. स्पर्धेतून मिळालेला निधी सामाजोपयोगी आणि विधायक कामासाठी देण्यात येतो”
कन्वल खियानी म्हणाले, “गेल्या चार हंगामात झालेल्या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर जवळपास १५ लाख लोकांनी ही स्पर्धा पाहिली आहे. यंदा स्पर्धेला व्यापक स्वरूप येत असून, पुण्यासह परभणी, जळगाव, नांदेड, बंगळुरू येथूनही खेळाडू सहभागी होत आहेत. आयपीएलच्या धर्तीवर या स्पर्धेची रचना करण्यात आली आहे. यंदा महिलांनाही खेळासाठी प्रोत्साहन दिले जात असून, महिलांचे सहा संघ स्पर्धा खेळणार आहेत. पुरुषांचे १६ संघमालक व महिलांचे ६ संघमालक आपल्या २२ संघांसह स्पर्धेत उतरणार आहेत. आपली संस्कृती साजरी करणे आणि त्याचा प्रसार करणे हेही यामुळे साध्य होणार आहे. त्यातून सामाजिक संस्थांच्या माध्यमातून वंचितांच्या शिक्षणासाठी, विकासासाठी काम करणाऱ्या संस्थांना अर्थसहाय्य केले जाणार आहे.”
या स्पर्धेतील पुरुष गटाच्या प्रत्येक संघाचे नाव सिंधी समाजाशी आणि संस्कृतीशी, तर महिला संघांचे नाव नद्यांशी निगडित आहे. त्यामध्ये मस्त कलंदर (गीता बिल्डर्स, मयूर तिलवानी), सुलतान ऑफ सिंध (डब्बू आसवानी फाउंडेशन, हिरानंद आसवानी), मोहेंजोदरो वॉरियर्स (मिलेनियम डेव्हलपर्स, हरीश अभिचंदानी), सिंधफूल रेंजर्स (झमतानी ग्रुप, अनूप झमतानी), एसएसडी फाल्कन (विक्रम रोहिडा फोटोग्राफी, विक्रम रोहिडा), इंडस डायनामॉस (शगुन टेक्सटाईल, सुमित बोदानी), दादा वासवानीज ब्रिगेड (आसवानी प्रमोटर्स अँड बिल्डर्स, अनिल आसवानी), झुलेलाल सुपरकिंग्ज (जेठानी ग्रुप, पियुष जेठानी), हेमू कलानी ग्लॅडिएटर्स (ट्रिओ ग्रुप, बिपिन डाखनेजा), गुरुनानक नाइट्स (पीव्हीआर टाईल्स वर्ल्ड, प्रकाश रामनानी), संत कंवरम रॉयल्स (विजयराज असोसिएट्स, क्रिश लाडकानी), आर्यन्स युनायटेड (रोहित इन्फ्रा, राजीव मोटवानी), जय बाबा स्ट्रायकर्स (सुखवानी असोसिएट्स, सागर सुखवानी), सिंधी इंडियन्स (मनसुखवानी असोसिएट्स, मनीष मनसुखवानी), अजराक सुपरजायंट्स (लाइफक्राफ्ट रियल्टी, हितेश दादलानी) व पिंपरी योद्धाज (सोहम मोबाईल, कुणाल लखानी) अशी या संघांची नावे आहेत.
महिलांच्या संघात गंगा वॉरियर्स (तेजवानी हँडलूम्स अँड फर्निशिंग्स, अन्वी व अविनाश तेजवानी), कावेरी क्रुसेडर्स (रामा ग्रुप, खुशबू व विनेश पंजाबी), गोदावरी जायंट्स (द कॉर्नर लाउंज, हिना व सनी गोगिया), झेलम क्वीन्स (सिटी कार्स, शिखा व रॉकी सेवानी), सिंधू स्टारलेट्स (जीएस असोसिएट्स, शीतल व जितू पहलानी) आणि यमुना स्ट्रायकर्स (एसएसजीएन, रुपाली व प्रवीण पंजाबी) यांचा समावेश आहे. महिलांमध्ये ७२, तर पुरुषांमध्ये २६१ खेळाडूंनी सहभाग नोंदवला.
सुखवानी लाईफ स्पेसेस (विकी सुखवानी), एएनपी कॉर्प (ऋषी अडवाणी), नूर्या होमेटेल हॉस्पिटॅलिटी (सागर सुखवानी), आसवानी प्रमोटर्स अँड बिल्डर्स (अनिल आसवानी), सिंग स्टील अँड अल्युमिनियम (मनजीत सिंग वालेचा), उत्तम केटरर्स (नवजीत कोचर), जय मोबाईल (गोपी आसवानी), रवी बजाज व रोहित तेजवानी, ग्रोफिन (अभिजित बोनगीरवार), एसएसडी एक्स्पोर्ट हॉंगकॉंग लिमिटेड (वरून वर्यानी), सेवानी इन्शुरन्स (हर्ष सेवानी), साईबाबा सेल्स प्रायव्हेट लिमिटेड (रोहन गेहाने), विशाल प्रॉपर्टीज (विशाल तेजवानी), बालाजी होम्स (आशुतोष चंदीरामानी), क्लासिक कलेक्शन (नीरज चावला), ग्लो वर्ल्ड (महान जेस्वानी), रिशा वॉच स्टोअर (जॅकी दासवानी), आकार कृष्णानी ग्रुप (राहुल कृष्णानी),  सोलार्ज एनर्जी (विनीत व कौशिक धर्मानी), स्टीरलियन (राजकुमार जवारानी, देवेश चंचलानी),  विक्रम रोहिडा फोटोग्राफी, सीजे हब (चिनू जैन) यांचे या स्पर्धेसाठी सहकार्य लाभले आहे.

युवा उद्योजकांनी व्यवसायाच्या अर्थकारणाचा अभ्यास करावा : मिलिंद काळे

पुणे:
ब्राह्मण महासंघ संचालित ‘ब्राह्मण इंडस्ट्रियल अँड ट्रेडर्स ऑर्गनायझेशन'(बिटो) चे उदघाटन रविवारी सायंकाळी हॉटेल शांताई येथे कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे,एमएसएमई(मुंबई) चे अध्यक्ष अभय दफ्तरदार ,जनता बँकेचे संचालक  अभय माटे,’अभि ग्रुप’ चे  जितेंद्र जोशी ,अभिषेक जोशी ,मिलिंद तारे ,मनोज तारे , महेंद्र मणेरीकर यांच्या उपस्थितीत झाले. या प्रसंगी ब्राह्मण महासंघचे सर्व पदाधिकारी, ‘ब्राह्मण इंडस्ट्रियल अँड ट्रेडर्स ऑर्गनायझेशन’ चे सर्व संचालकांसहित महासंघच्या दोन्ही पतसंस्था आणि ‘देसी’या शैक्षणिक संस्थेचे संचालक मंडळ उपस्थित होते.महिला जिल्हा अध्यक्ष सौ. विद्या घटवाई , डॉ.सौ आरती कुलकर्णी यांनी सूत्र संचालन केले  तर ‘ब्राह्मण इंडस्ट्रियल अँड ट्रेडर्स ऑर्गनायझेशन’  च्या संचालकांनी आभार मानले. 
‘उद्योजकांनी सुरवात पासून उद्योगाचे अर्थकारण समजून घेऊन त्या पद्धतीने व्यवसाय केला तर भक्कम पायाभरणी होवून नंतर अडचणी येत नाही’, असे प्रतिपादन  कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष , चार्टर्ड अकाऊंट मिलिंद काळे यांनी केले.ब्राह्मण महासंघाच्या ‘ब्राह्मण इंडस्ट्रियल अँड ट्रेडर्स ऑर्गनायझेशन'(बिटो)   या उद्योजक आघाडी च्या उदघाटन निम्मित घेतलेल्या उद्योजक मेळाव्यात ते बोलत होते.एमएसएमई चे अध्यक्ष अभय दफ्तरदार यांनी सरकारच्या एमएसएमई चे फायदे सांगून युवकांनी त्याचा फायदा करून घ्यावा असं सांगितले.जनता बँकेचे संचालक आणि माजी अध्यक्ष  अभय माटे यांनी कर्ज देताना बँका नेमके  काय पाहतात… व्यवसायाचे बँकिंग नेमके  कसे  असावे यावर मार्गदर्शन केले.युवा अध्यक्ष अभिषेक जोशी यांनी व्यवसायात दुसरी पिढी ही जास्त महत्वाची असते, पहिल्या पिढीचे यश नवीन संकल्पनांच्या आधारे वाढवण्याची त्यांची जवाबदारी असते असे मत व्यक्त केले.मिलिंद तारे यांनी स्टार्ट अप इंडियाची सर्व धोरणे समजावून सांगितली तर  पराग खेडकर यांनी पेटंटची कार्यप्रणाली आणि मुंबई येथील प्रसिद्ध उद्योजक  महेंद्र मणेरीकर यांनी पहिल्या दहा वर्षात व्यवसायाकडे लक्ष देणे , धोका पत्करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.’अभि ग्रुप ‘चे  जितेंद्र जोशी यांनी ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम   च्या साहाय्याने देशात नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला व्यवसाय नेण्यासाठी प्रयत्न करावा असे  सांगितले.विश्वस्त मनोज तारे यांनी ब्राह्मण महासंघ ची तर सौ आदिती जोशी यांनी ‘ब्राह्मण इंडस्ट्रियल अँड ट्रेडर्स ऑर्गनायझेशन’   ची ध्येय आणि धोरणे विषद केली

या प्रसंगी ‘श्री राम मंदिराच्या  ५०० वर्षांच्या लढाई चा इतिहास ‘या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले

उद्धव ठाकरे यांना मत म्हणजे हिंदू सनातन धर्म संपवण्याची वल्गना करणाऱ्यांना मत-भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

पुणे

उद्धव ठाकरे यांना मत म्हणजे हिंदू सनातन धर्म संपवण्याची वल्गना करणाऱ्यांना मत असल्याची टीका भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ‘हर मंदिर स्वच्छता’ या देशव्यापी अभियानाचा राज्यातील शुभारंभ शिवाजीनगर गावठाणातील रोकडोबा मंदिर परिसरात केल्यानंतर बावनकुळे पत्रकारांशी बोलत होते. राज्यातील प्रत्येक मंदिरात हे अभियान राबविण्याचा संकल्प त्यांनी या वेळी बोलून दाखवला.

आमदार सिद्धार्थ शिरोळे, भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, प्रदेश उपाध्यक्ष आणि राममंदिर अभियानाचे राज्याचे संयोजक राजेश पांडे, सुनील देवधर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

बावनकुळे म्हणाले, काँग्रेस पक्षाने नेहमी देशातील हिंदू समाजाचा अपमान केला आहे. अयोध्येतील श्रीरामांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यावर त्यांनी बहिष्कार टाकला आहे. सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडताना काँग्रेसने रामाचा जन्म काल्पनिक असल्याचे प्रतिज्ञापत्र दिले आहे. एनडीए सत्तेत आल्यास हिंदुस्थानातील सनातन धर्म संपविण्याची भाषा उदयनिधी स्टॅलिन यांनी केली आहे. या एनडीए आघाडीचे उद्धव ठाकरे घटक आहेत. याचाच अर्थ उद्धव ठाकरेंना मत म्हणजेच हिंदू सनातन धर्म संपवण्याची वल्गना करणाऱ्यांना मत असा होतो. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि इटालियन शक्तिसमोर लोटांगण घातले आहे.

‘हर मंदिर स्वच्छता अभियाना’ला देशातील जनता उत्स्फूर्तपणे सहयोग देत आहे. 21 जानेवारीपर्यंत सुरू राहणाऱ्या महिलांचा सहभाग लक्षणीय आहे. या कालावधीत सर्व समाजातील सर्व मंदिरांमध्ये स्वच्छता, रंगरंगोटी असे उपक्रम राबविले जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना हा कार्यक्रम राबविण्याचे आवाहन केले असून, सर्व राजकीय पक्षांनी त्यात सहभागी होणे अपेक्षित आहे.

राज्यात जिल्हानिहाय महायुतीचे मेळावे आजपासून सुरू झाले असून पुढच्या काळात बूथ आणि विभागीय स्तरावर या मेळाव्यांचे आयोजन केले जाणार आहे. महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या घटक पक्षांमध्ये विरोधी पक्षातील नेते प्रवेश करण्यास उत्सुक आहेत. आगामी काळात महाराष्ट्राला मोठे राजकीय हादरे बसतील. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भारत ही जगातील तिसरी महासत्ता म्हणून उदयास येत असून चीन सारख्या शत्रू राष्ट्राने ही ते कबूल केले आहे. मोदींच्या नेतृत्वात आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी आणि आमचा विचार स्वीकारणाऱ्यांसाठी भाजपचे दरवाजे खुले आहेत.

पेयजल व स्वच्छता मानवी हक्क- नीती आयोगाचे अतिरिक्त अभियान संचालक आनंद शेखर

सीवायडीएचा रौप्य महोत्सवात युवक दिन उत्साहात साजरा मॅथ्यू मॅटम लिखित ‘ट्रेड द रोडलेस ट्रॅव्हल्डः जर्नी इज द डेस्टीनेशन’ पुस्तक प्रकाशित

पुणे,दि.१४ जानेवारी:”सुरक्षित व स्वच्छ पाणी आणि स्वच्छता ही मूलभूत मानवी गरज आहे. परंतू वाढती लोकसंख्या, शहरीकरण, शेती, उद्योग आणि ऊर्जा क्षेत्रातील पाण्याच्या वाढत्या गरजेमुळे याची मागणी वाढतच जाईल. भविष्यात कोट्यावधी लोक या मूलभूत सेवांपासून वंचित राहतील. अशा वेळेस केंद्र व राज्य सरकारला ज्या स्वयंसेवी संस्था सहकार्य करीत आहेत ते कौतुकास्पद कार्य आहे.” असे विचार नीती आयोगाचे अतिरिक्त अभियान संचालक आंनद शेखर यांनी व्यक्त केले.
सेंटर फॉर युथ डेव्हलमेंट अ‍ॅण्ड अ‍ॅक्टिव्हिटीज (सीवायडीए) च्या रौप्य महोत्सवां निमित्त येरवडा येथील अण्णाभाऊ साठे सभागृह आयोजित येरवडा येथील अण्णाभाऊ साठे सभागृह आयोजित करण्यात आलेल्या पाणी, आरोग्य,स्वच्छता वॉश या शिखर परिषदेत मुख्य अतिथि म्हणून ते होते.
या प्रसंगी वॉटर अ‍ॅण्ड इंडियाचे मुख्य कार्यकारी व्ही.के.माधवन व वॉश विशेषज्ञ महेश मिश्रा उपस्थित होते. तसेच सीवायडीएचे संस्थापक मॅथ्यू मॅटम, येरवडा येथील नगरसेवक अविनाश साळवे, नेपाळचे संतोष शहा, अखिलेश साहू, अर्णवाज दामानिया, सीवायडीएचे अध्यक्ष दिलमेहेर भोला, उज्वल चौधुरी व कार्यकारी संचालक प्रविण जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सीवायडीएचे संस्थापक मॅथ्यू मॅटम लिखित ‘ट्रेड द रोडलेस ट्रॅव्हल्डः जर्नी इज द डेस्टीनेशन’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. ‘२५ युवकांना यंग अचिवर्स अवॉर्ड’ या विशेष पुरस्काराने सम्मान करण्यात आला.
आनंद शेखर म्हणाले,”हवामान बदलामुळे जागतिक तापमानात वाढ होत असल्याने पाण्याची टंचाई वाढण्याचा अंदाज आहे. पायाभूत सुविधा आणि स्वच्छता सुविधांमध्ये गुंतवणूक, पाण्याशी संबधित परिसंस्थांचे संरक्षण आणि जीर्णोद्धार व सर्वांसाठी सुरक्षित व परवडणार्‍या पिण्याच्या पाण्याचा सार्वत्रिक प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी स्वच्छता शिक्षण हे आवश्यक आहे.”
“समाजातील काही घटक आज ही शौचालय आणि जल व्यव्यस्थेपासून वंचीत आहेत. त्यासाठी गरजुंनी स्थानिक प्रशासनाकडे अर्ज करावा किंवा थेट जलशक्ती मंत्रालयातही वेबसाईटवर संपर्क साधू शकता.”
सीवायडीएचे संस्थापक मॅथ्यू मॅटम म्हणाले,” युवकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन त्यांच्या मनामनात सामाजिक कार्याबद्दल प्रेरित केले जाते. उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारे ज्ञान देण्यात येते. नोकरी मागणारे नाही तर देणारे बनवितो. या संस्थेचे कार्य मुख्यतः दुर्गम भागातील नागरिकांच्या जीवन उत्थानासाठी केले जाते. वर्तमानकाळात २५ तरूणांना वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये व्यवसाय सुरू करून दिले आहे. ”
अविनाश साळवे म्हणाले,” कोविडच्या काळात संस्थेच्या माध्यमातून आरोग्याच्या सुविधाबरोबरच त्यांना मानसिक आधार दिला. देशात प्रथमच या ठिकाणी लहान मुलांसाठी कोविड सेंटर उभारले होते.”
आयोजित वॉश शाश्वतता, नवे तंत्रज्ञान, शोध आणि नवकल्पना या विषयावरील चर्चासत्राची अध्यक्षता वॉश तज्ज्ञ महेश मिश्रा, प्लॅन इंडियाचे कार्यकारी संचालक मोहम्मद आसिफ, सेव द चिल्ड्रेनचे कार्यक्रम संचालक संजय शर्मा यांनी मार्गदर्शन केले.
यामध्ये वॉश शाश्वतता, वॉशमधील नवीन तंत्रज्ञान आणि वॉश मधील अत्याधुनिक शोध व नवकल्पना या विषयावर उद्बोधन करण्यात आले. इकोसन सर्व्हिस फाउंडेशनचे संचालक डॉ. दयानंद पानसे, सीएसआर व्यवस्थापक अभिजित पाटील, वॉश मित्रा छत्तीसगडच्या राधा धिवर, युनिसेफचे वॉश ऑफिसर आनंद घोडके, आयआयटी मुंबईचे गौरव कापसे, सौरभ पंड्या, अभिषेक चौधरी, ललित शर्मा, करोन शैवा युसूफ कबीर आणि ज्योत्स्ना बहिरट उपस्थित होत्या.
कार्यकारी संचालक प्रविण जाधव यांनी प्रस्तावना मांडली.
कार्यक्रमाच्या यशस्वतीतेसाठी एम.एन.सणीयाल, निटेश सिंगरूळ, शहाजी गडहीरे, प्रिया कोठारी व अन्य कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम केले.
अनुज आणि रूची यांनी सूत्रसंचालन केले. दिल मेहर भोला यांनी आभार मानले.

बॉक्स
युवा महोत्सव साजरा
सीवायडीएच्या परिषदेत साजरा करण्यात आलेल्या युवक दिनाचे उद्घाटन सचिव शांताराम बडगुजर यांनी करून युवकांना आव्हान केले की वातावरणातील बदलांसाठी कार्य करावे. न्या.वसंत कांबळे यांनी मूलभूत हक्क व शिक्षणाचा अधिकार कायद्यावर प्रकाश टाकला. त्यानंतर प्रियांका शेंडगे, फरीदा लांबे, मंदार पोकळे, शिक्षक दत्तात्रय वारे, सुरेश खोपडे, अ‍ॅथनी छेत्री, अधिवक्ता वर्षा देशपांडे, समीर नाबर, शशिकांत बोराट, गिरीजा तुळपुळे व रश्मी श्रीवास्तव यांनी समाज व युवकांसमोरी समस्या व उपायांवर विचार मांडले.

वास्तु रचनाकारांनी भविष्यातील बदलांसाठी सज्ज व्हावे – डॉ. अनिल कश्यप

पीसीईटीच्या एस. बी. पाटील आर्किटेक्चर कॉलेज मध्ये माजी विद्यार्थ्यांचा गौरव

पिंपरी, पुणे (दि.१४ जानेवारी २०२४) नव नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे प्रत्येक क्षेत्रात आमूलाग्र बदल होत आहेत. यापुढील काळात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर मोठ्या प्रमाणावर होणार आहे. आगामी काळात वास्तू रचना शास्त्रातही कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. विद्यार्थ्यांनी भविष्यातील या बदलांसाठी सज्ज होवून हे तंत्रज्ञान आत्मसात करावे आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग समाज विकासासाठी करावा, असे प्रतिपादन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट ॲण्ड रिसर्च (निकमार) विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. अनिल कश्यप यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मध्ये माजी विद्यार्थ्यांचा गौरव आणि वार्षिक क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी पूनम कश्यप, प्राचार्य डॉ. महेंद्र सोनवणे आदी उपस्थित होते. यावेळी शैक्षणिक वर्ष २०१६, १७, १८, १९ मध्ये विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना वास्तु विशारद महेश नामपूरकर यांच्या वतीने देण्यात येणारा ‘प्रेरणा फिरता करंडक’ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच आर्किटेक तेजस गव्हाणे, निशिद उंद्रे, अंकिता बारणे, ओमकार चोरमले या विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
प्रास्ताविक डॉ. महेंद्र सोनवणे, सूत्रसंचालन डॉ निलिमा भिडे यांनी केले. पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांनी क्रिडा क्षेत्रात प्राविण्य मिळवावे – राहुल आवारे

पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये पीसीसीओई ऑलम्पिकचे आयोजन

पिंपरी, पुणे (दि. १४ जानेवारी २०२४) उज्ज्वल भविष्यासाठी जीवनात शैक्षणिक प्रगतीला महत्वाचे स्थान आहे. तसेच शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी एखाद्या क्रिडा प्रकारात प्रावीण्य मिळवले तरच आजच्या स्पर्धात्मक युगात खंबीरपणे वाटचाल करून यशस्वी होता येईल असे प्रतिपादन अर्जुन पुरस्कार विजेते पोलीस उपनिरीक्षक राहुल आवारे यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या (पीसीसीओई) वतीने आयोजित केलेल्या ‘पीसीसीओई ऑलिम्पिक’ स्पर्धेचे उद्घाटन राहुल आवारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवछत्रपती पुरस्कार विजेते भारतीय आर्चरी संघाचे प्रशिक्षक डॉ. रणजीत चामले, ज्ञान प्रबोधिनी विद्यालय निगडीचे मुख्याध्यापक डॉ. मनोज देवळेकर, राष्ट्रीय नेटबॉल खेळाडू समीर शिकेलकर, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, डॉ. प्रवीण काळे, डॉ. अजय गायकवाड उपस्थित होते.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना खेळाची तसेच स्वतःची शारीरिक तंदुरुस्ती वाढविण्याची आवड निर्माण व्हावी यासाठी पीसीसीओई ऑलिंपिकचे आयोजन केले आहे.
उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाच्या सहाशे विद्यार्थ्यांनी ढोल ताशाच्या गजरात संचलन केले. तसेच महाविद्यालयातील विविध खेळातील राष्ट्रीय खेळाडूंनी ऑलम्पिक मशाल प्रमुख पाहुण्यांना सुपूर्त करून कार्यक्रमाची सुरुवात केली. ‘पीसीसीओई ऑलम्पिक’ ध्वजाचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
पीसीसीओईच्या आर्ट सर्कल विभागाने नृत्यातून खेळाचे सादरीकरण केले. तसेच पीसीसीओईची राष्ट्रीय मल्लखांब खेळाडू तनया सप्ताश्वा हिने मल्लखांबची प्रात्यक्षिके दाखवून सर्वांना मंत्रमुग्ध केले.
संपूर्ण देशामध्ये प्रथमच एका अभियांत्रिकी महाविद्यालयाने अशा स्पर्धांचे आयोजन केले आहे. ही कौतुकास्पद बाब आहे. यामुळे विद्यार्थ्यांना क्रीडा कौशल्य आत्मसात करण्याबरोबरच जीवनाला नवी दिशा मिळेल अशा शुभेच्छा राहुल आवारे यांनी दिल्या.
पीसीसीओई ऑलम्पिक मध्ये एकूण १२ क्रिडा प्रकारांमध्ये स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धांमध्ये पीसीसीओई मधील सुमारे पाच हजार विद्यार्थी, ३५० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले आहेत.
यासाठी पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी यांनीही शुभेच्छा दिल्या. आयोजन महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. संतोष पाचारणे, डॉ. लीना शर्मा व प्रा. अंजना आरकेरीमठ यांनी केले आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील भारतातील पहिल्या राष्ट्रीय महामार्ग स्टील स्लॅग रस्ता भागाचे उद्घाटन

निती आयोगाचे सदस्य (विज्ञान आणि तंत्रज्ञान) डॉ. व्ही. के. सारस्वत यांच्या हस्ते आज मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील भारतातील पहिल्या राष्ट्रीय महामार्ग स्टील स्लॅग रस्ता   भागाचे उद्घाटन झाले.  वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद – केंद्रीय रस्ते संशोधन संस्था (CSIR-CRRI) यांनी विकसित केलेले स्टील स्लॅग रस्ते तंत्रज्ञान पोलाद उद्योगांच्या कचऱ्याचे संपत्तीत रूपांतर करत आहे सोबतच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (NHAI) देशात मजबूत आणि पर्यावरणपूरक राष्ट्रीय महामार्ग निर्माण करण्यासाठी मदत करत आहे, असे डॉ सारस्वत यांनी प्रसंगी बोलताना सांगितले.

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद – केंद्रीय रस्ते संशोधन संस्था यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली जेएसडब्ल्यु स्टील कंपनीने राष्ट्रीय महामार्ग – 66 मुंबई-गोवाच्या इंदापूर-पनवेल विभागात 1 किमी लांबीचा चार पदरी स्टील स्लॅग रस्त्याचा भाग बांधला आहे.  या रस्त्याच्या बांधकामासाठी सुमारे 80,000 टन CONARC स्टील स्लॅगचे रायगड जिल्ह्यातील डोलवी येथील जेएसडब्ल्यु स्टील प्रकल्पात  प्रक्रिया केलेले स्टील स्लॅग एग्रीगेट्स म्हणून रूपांतरित करण्यात आले आहेत.

A highway with cars and trucksDescription automatically generated

जेएसडब्ल्यु स्टील लिमिटेड चे मुख्य कार्यकारी अधिकारी जी एस राठोड यांनी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद – केंद्रीय रस्ते संशोधन संस्था यांनी केलेल्या प्रयत्नांचे तसेच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून जेएसडब्ल्यु स्टील लिमिटेडला हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी मिळालेल्या सहकार्याचे कौतुक केले.

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद – केंद्रीय रस्ते संशोधन संस्था पोलाद मंत्रालयाच्या प्रायोजित संशोधन प्रकल्पांतर्गत, स्टील स्लॅग रोड बांधकामात प्रक्रिया केलेल्या स्टील स्लॅगच्या वापरासाठी राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे विकसित करत आहे, अशी माहिती वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद – केंद्रीय रस्ते संशोधन संस्थेचे संचालक डॉ. मनोरंजन परिडा यांनी दिली. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद – केंद्रीय रस्ते संशोधन संस्थेने विविध पोलाद उद्योगांच्या सहकार्याने गुजरात, झारखंड आणि अरुणाचल प्रदेश येथे रस्ते बांधणीत स्टील स्लॅगचा यशस्वीरित्या वापर केला आहे, असेही त्यांनी सांगितले.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मुंबई विभागाचे प्रादेशिक अधिकारी तसेच  मुख्य महाव्यवस्थापक अंशुमाली श्रीवास्तव यांनी सांगितले की स्टील स्लॅग रस्ता  त्याच्या नवीन तांत्रिक वैशिष्ट्यांसाठी आणि अपवादात्मक कामगिरीसाठी ओळखला जातो. या तंत्रज्ञानाने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून प्रशंसा मिळवली आहे, असेही ते म्हणाले.

विमानतळाची 9 कोटी प्रवासी क्षमता राहणार: ज्योतिरादित्य सिंधिया

 नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे 5 टप्पे पूर्ण झाल्यानंतर विमानतळावर 2 धावपट्ट्या, 4 टर्मिनलसह विमानतळाची 9 कोटी प्रवासी क्षमता राहणार

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद  प्रकल्प: ज्योतिरादित्य सिंधिया

“नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा केवळ मुंबई किंवा महाराष्ट्रासाठी पायाभूत सुविधांचा प्रकल्प नाही, तर संपूर्ण देशासाठी हा अभिमानास्पद  प्रकल्प आहे,” असे उद्गार केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काढले.  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासाचा आढावा घेण्यासाठी ते आज नवी मुंबईत आले होते.  यावेळी मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी या प्रकल्पाच्या सद्यस्थितीची माहिती पत्रकारांना दिली.

अठरा हजार कोटींच्या या प्रकल्पामुळे मुंबईच्या संपर्क सुविधेला फार मोठा फायदा होईल, आणि हा प्रकल्प 5 टप्प्यात राबविला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.  या प्रकल्पाची भौतिक आणि  आर्थिक प्रगती 55-60% पर्यंत पूर्ण झाली आहे, असेही ते म्हणाले.  या प्रकल्पाची सुरुवात 2018 मध्ये झाली असून 31 मार्च 2025 पर्यंत व्यावसायिक कार्यान्वयन सुरू होणे अपेक्षित आहे, असे त्यांनी सांगितले. प्रकल्पाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात एकत्रितपणे एक धावपट्टी, एक टर्मिनल आणि दोन कोटी प्रवासी क्षमता निर्माण केली जाईल.  प्रकल्पाच्या 3, 4 आणि 5 टप्प्यात नऊ कोटी पर्यंतच्या वाढीव प्रवासी क्षमतेसह दुसरी धावपट्टी आणि चार टर्मिनल तयार केले जातील, अशी माहिती त्यांनी दिली.

पुढे म्हणाले की, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला रस्ते, रेल्वे आणि मेट्रो संपर्क सुविधेद्वारे जोडले जाईल तसेच भविष्यात  विमानतळाला जलमार्गाने जोडण्याची योजना असल्याचे सिंधिया यांनी गती शक्ती योजनेंतर्गत मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी निर्माण करण्याच्या पंतप्रधानांच्या दूरदृष्टीचा संदर्भ देत सांगितले.

विमानतळ तीन दिशांनी रस्त्यांना जोडलेले असेल. ते रस्ते म्हणजे – राष्ट्रीय महामार्ग 4B (348), सायन पनवेल महामार्ग आणि अटल सेतू.  तारघर रेल्वे स्थानकाद्वारे विमानतळ रेल्वेला जोडले जाईल.  विमानतळासाठी मेट्रो संपर्क सुविधा उपलब्ध असेल – मेट्रो लाईन 2D: डीएन नगर ते मंडाला-मानखुर्द, मेट्रो लाईन 8: मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई पेंधर- बेलापूर- तळोजा मेट्रो लाईन. भविष्यात कुलाबा येथून हॉवर क्राफ्टद्वारे आणि फेज 2 मध्ये रायगड येथून कार्गोद्वारे विमानतळ जोडण्याचे उद्दिष्ट आहे.

याशिवाय मंत्र्यांनी स्पष्ट केले की, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील पहिले असे विमानतळ असेल ज्याच्या 1600 हेक्टर क्षेत्रात शहराच्या बाजूने आणि हवाई क्षेत्रात दहा किलोमीटर अंतरावर स्वयंचलित प्रवासी वाहतूक होईल, असे मंत्र्यांनी स्पष्ट केले. पहिल्या टप्प्यात शंभर टक्के हरित विमानतळ तयार होत आहे. या  विमानतळामुळे देशातील हवाई वाहतूक वाढेल अशी अपेक्षा आहे, असे ते म्हणाले. देशातील देशांतर्गत प्रवासी वाहतूक 2030 पर्यंत 15 कोटींवरून 30 कोटींपर्यंत दुप्पट करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे, असे त्यांनी सांगितले. पुढील सहा वर्षांत देशात 200 हून अधिक विमानतळ निर्माण करण्याचा सरकारचा संकल्पही असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी याप्रसंगी ठरलेल्या वेळेत प्रकल्प  पूर्ण करण्यात मदत केल्याबद्दल राज्य सरकार आणि सिडकोचे आभार मानले.

शरयू, सानिका, सार्थकला दुहेरी मुकुट

पीवायसी एचटीबीए अमनोरा कप जिल्हा मानांकन बॅडमिंटन स्पर्धा

पुणे : शरयू रांजणे, सानिका पाटणकर, सार्थक पाटणकर यांनी पीवायसी एचटीबीए अमनोरा कप जिल्हा मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून दुहेरी मुकुट मिळवला.
पीवायसी हिंदू जिमखाना येथील बॅडमिंटन कोर्टवर ही स्पर्धा सुरू आहे. 
या स्पर्धेत शरयूने १५ वर्षांखालील मुलींच्या एकेरी आणि दुहेरीचे विजेतेपद पटकावले. तिने एकेरीच्या अंतिम फेरीत सोयरा शेलारला २१-१७, २१-१२ असे नमविले आणि जेतेपद पटकावले. यानंतर शरयूने सोयरा शेलारच्या साथीने १५ वर्षांखालील मुलींच्या दुहेरीच्या अंतिम फेरीत आर्या कुलकर्णी-आयुषी काळे जोडीवर २१-१७, २०-२२, २१-११ अशी मात करून विजेतेपद निश्चित केले. 

यानंतर सानिकाने १९ वर्षांखालील मुलींच्या एकेरीचे आणि महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. सानिकाने १९ वर्षांखालील मुलींच्या अंतिम फेरीत श्रेया भोसलेचे आव्हान १८-२१, २१-१४, २१-१५ असे परतवून लावले आणि जेतेपद मिळवले. यानंतर महिला एकेरीच्या अंतिम फेरीत पुन्हा एकदा सानिका – श्रेया आमनेसामने आले. ही लढतही तीन गेमपर्यंत चुरशीची झाली. यात सानिकाने श्रेयाचे आव्हान १६-२१, २१-१९, २१-१४ असे परतवून लावले आणि जेतेपद पटकावले. श्रेयाने पहिली गेम जिंकली खरी; पण पुन्हा एकदा तिच्यापासून जेतेपद दुरावले. मोक्याच्या क्षणी तिला सानिकावर वर्चस्व राखता आले नाही. दुसरी गेम जिंकून सानिकाने बरोबरी साधली. यानंतर निर्णायक गेममध्ये सानिकाने श्रेयाला पुनरागमनाची संधी दिली नाही. 
सार्थकने १७ आणि १९ वर्षांखालील मुलांच्या एकेरीचे विजेतेपद पटकावले. सार्थकने १७ वर्षांखालील मुलांच्या एकेरीच्या अंतिम फेरीत कविन पटेलवर २१-१४, २१-१५ असा सहज विजय मिळवला. मात्र, त्याला १९ वर्षांखालील मुलांच्या एकेरीच्या विजेतेपद पटकावण्यासाठी चांगलाच संघर्ष करावा लागला. अखेर त्याला अंतिम फेरीत यशराज कदमचे आव्हान २४-२२, २३-२५, २१-१६ असे परतवून लावण्यात यश आले.

निकाल : अंतिम फेरीत –
१७ वर्षांखालील मिश्र दुहेरी – ओजस जोशी – जुई जाधव वि. वि. ईशान लागू – यशस्वी काळे २१-१३, २१-१६.

१९ वर्षांखालील मिश्र दुहेरी – कृष्णा जसूजा – युतिका चव्हाण वि. वि. आद्य पारसनीस – आरती चौगले ९-२१, २१-१६, २२-२०.

मिश्र दुहेरी – वसीम शेख – योगिता साळवे वि. वि. निर्बन पाल – अस्मिता शेडगे २१-१४, २१-१०.

३५ वर्षांखालील मिश्र दुहेरी – आदित्य उमराणी – पूनम गंधे वि. वि. हृषीकेश कुलकर्णी -अदिती रोडे २१-१४, २१-१३.

४० वर्षांखालील मिश्र दुहेरी – विनीत दबक – अदिती रोडे वि. वि. सचिन माणकर – आरती सिनोजिया २२-२०, १२-२१, २१-१९.

४५ वर्षांखालील पुरुष दुहेरी – राहुल कल्लीनपूर – उपेंद्र फडणीस वि. वि. अमित देवधर – मकरंद चितळे २२-२०, २१-९.

रंगीबेरंगी पतंगांनी सजले प्राचीन काळभैरवनाथ मंदिर

श्री बहिरोबा देव ट्रस्ट, श्री काळभैरवनाथ मंदिर कसबा पेठ तर्फे आयोजन ; विविध रंगातील २०० पेक्षा अधिक पतंगांची मंदिरात सजावट
पुणे : मकर संक्रांतीनिमित्त प्राचीन गामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरात विविध रंगाच्या आणि विविध आकरातील पतंगांची सजावट करण्यात आली होती. तब्बल २०० पेक्षा अधिक पतंगाची सजावट यावेळी करण्यात आली. रंगीबेरंगी पतंगांनी मंदिर परिसर खुलून गेला. संक्रांतीनिमित्त केलेली सजावट पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती.
श्री बहिरोबा देव ट्रस्ट, श्री काळ भैरवनाथ मंदिर तर्फे कसबा पेठेतील पुण्याचे प्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळभैरवनाथ मंदिरात पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. 

श्री काळभैरवनाथ हे पुण्याचे जागृत ग्रामदैवत असून भैरवनाथ मंदिराचे गर्भगृह आणि मध्यगृह हेमाडपंथी बांधणीचे आहे. मंदिराचे व्यवस्थापन आजपर्यंत लडकत घराण्याकडे असून वर्षभरात विविध उत्सव केले जातात.

कसबे पुणे ही बाराशे वर्षांपूर्वीची पुण्यातील वस्ती. याठिकाणी मुल:, मुक्ता आणि नाग या तीन नद्यांचा पवित्र त्रिवेणी संगम आहे. गाव तेथे मारुती आणि भैरवनाथाचे मंदिर ही आपल्याकडील परंपरा आहे. अशा कसबा पेठेतील पुण्याचे प्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळभैरवनाथ मंदिरात आयोजित पतंग महोत्सव पाहण्याकरिता भाविकांनी मोठी गर्दी केली.

ग्रामीण भागातील ओबीसी आणि एसबीसी संवर्गातील गरजू लाभार्थ्यांना घरकुलासाठी अर्ज करण्याचे आवाहन

पुणे दि.१४- जिल्ह्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या इतर मागासवर्गीय पात्र कुटुंबानी मोदी आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी केले आहे.

स्वतःचे घर नसलेल्या इतर मागासवर्गीय कुटुंबांना मोदी आवास योजनेअंतर्गत घरकुल देण्यासाठी घरकुल मंजुरीचे काम सुरू करण्यात आले आहे. योजनेच्या निकषानुसार ज्या लाभार्थ्यांकडे स्वतःचे पक्के घर नाही अशा लाभार्थ्यांनी ग्रामपंचायतीमध्ये किंवा पंचायत समितीमध्ये आपला अर्ज सादर करावा.

योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे पक्के घर नसावे. लाभार्थ्याकडे घर बांधण्यासाठी स्वतःची पुरेशी जागा (२७० वर्ग फूट) उपलब्ध असावी. लाभार्थी हा इतर मागासवर्गीय ओबीसी किंवा एसबीसी या संवर्गातील असावा. त्याने इतर घरकुल योजनेचा यापूर्वी लाभ घेतलेला नसावा. निकष पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्याने ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये अर्ज करावा. अर्ज केल्यानंतर अर्ज किंवा त्याची पोच drdapune2022@gmail.com या ईमेलवर पाठवावी, असे जिल्हा परिषदेतर्फे कळविण्यात आले आहे.