पुणे- जुना बाजार चौकातील रेल्वेच्या भूखंडावरील ‘त्या ‘बेकायदेशीर होर्डींग्ज वर स्वतः कारवाई करून महापालिकेने ती काढून घेतली असती तर कदाचित आजची दुर्घटना घडली नसती .रेल्वे प्रशासनाबरोबर ,महापालिकेचे प्रशासनही आजच्या दुर्घटनेला जबाबदार असल्याचा आरोप आज येथे कॉंग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांनी केला आहे.
रेल्वे च्या जागेत सर्व नियम ,कायदे पायदळी तुडवून ,केवळ पैसे मिळतात म्हणून असे जाहिरात फलक लाव्यात आले . अशा बेकायदा ,नियम मोडून उभारलेल्या जाहिरात फलकांविषयी बागवे हे गेली काही वर्षांपासून महापालिकेच्या मुख्य सभेत आवाज उठवीत आले आहेत. अशा प्रकरचे बेकायदा ९० टक्के फलक असयाचे त्यांचे म्हणणे आहे .सरकारने घालून दिलेले नियम अटी केवळ कागदावरच ठेवून केवळ पैसे मिळतात महसूल मिळतो म्हणून या फलकांवरील कारवाईस टाळाटाळ केली जात असल्याचा त्यांचा आरोप आहे. एवढेच नव्हे तर न्यायालयाला देखील अशा फलकांविषयी चुकीची माहिती देवून धूळफेक केली जाते. असेही त्यांचे म्हणणे आहे .रेल्वेच्या जागेत असलेल्या या जाहिरात फलकावर कारवाई साठी महापालिकेने केवळ नोटीसा दिल्या . आणि प्रत्यक्षात कारवाई मात्र केली नाही . जर कारवाई करून ते महापालिकेने स्वतः काढून टाकले असते तर जास्त मनुष्यबळ ,आणि आवश्यक दक्षता घेवून योग्य वेळ ठरवून हे होर्डिंग निघाले असते . आणि अशी दुर्घटना घडू शकली नसती . रेल्वे तर बेकायदा फलक विषयी जबाबदार आहेच पण कारवाई च्या कामत निव्वळ दिखाऊपणा करून प्रत्यक्षात कारवाई टाळल्याने महापालिका देखील तेवढीच दोषी आहे असे म्हणणे बागवे यांनी मांडले आहे .पहा आणि ऐका ..बागवे यांनी काय म्हटले आहे .