स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी पुन्हा हेमंत रासने …..च ….

Date:

पुणे-स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी आज भाजपच्या वतीने विद्यमान अध्यक्ष हेमंत रासने यांनी पुन्हा अध्यक्षपदा साठी आपला उमेदवारी अर्ज नगरसचिव सुनील पारखी यांच्याकडे दाखल केला .महापौर मुरलीधर मोहोळ,सभागृहनेते धीरज घाटे,राजेंद्र शिळीमकर ,अमोल बालवडकर ,राजेश येनपुरे   आणि पक्षातील अन्य मान्यवर नगरसेवक यावेळी उपस्थित होते . स्थाय समितीत १६ पैकी भाजपचे १० सदस्य असल्याने अध्यक्षपदी भाजपच्याच उमेदवाराची निवड निश्चित असते . गेल्यावेळी सुनील कांबळे आमदार झाल्याने त्यांनी स्थायी च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि त्यांच्या जागेवर उर्वरित अवधी साठी रासने यांना संधी मिळाली .आता नव्याने वर्षभर त्यांना मिळणार आहे.

  • अर्ज दाखल केल्यावर काय म्हणाले हेमंत रासने –

पुणे महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्षपदी पुन्हा एकदा काम करण्याची संधी देऊन माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास दाखवल्याबद्दल पक्षाचे व माझे मार्गदर्शक विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, केंद्रीय मंत्री प्रकाशजी जावडेकर, खासदार गिरीशजी बापट, संजयजी काकडे, शहाराध्यक्ष जगदीश मुळीक, पुणे शहरातील भाजपाचे सर्व आमदार, मा. महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, सहकारी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते व माझ्या सोबत कायम असणारे पुणे शहरातील गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते यासर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो.

भारतीय जनता पार्टीचा स्थायी समिती अध्यक्षपदाचा अधिकृत उमेदवार म्हणून माझा उमेदवारी अर्ज आज सकाळी मा. महापौर श्री. मुरलीआण्णा मोहोळ, उपमहापौर सौ. सरस्वतीताई शेंडगे, गटनेते श्री.धीरज घाटे, श्री. राजेश येनपुरे, सौ. गायत्री खडके, श्री. दीपक पोटे, सौ. मानसी देशपांडे, सौ. सुनीता गलांडे, श्री. गोपाळ चिंतल, श्री. योगेश समेळ व इतर सहकारी नगरसेवक व भारतीय जनता पार्टीचे, आरपीआयचे पदाधिकारी व असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भरण्यात आला.

स्थायी समिती अध्यक्षांची निवड शुक्रवार दि. ६ मार्च रोजी सकाळी ११ वाजता पुणे मनपा भवन (नवीन इमारत) येथे होणार असून माझ्यावर प्रेम करण्याऱ्या आपण सर्व सहकारी मित्रपरिवारांनी उपस्थित राहावे…..!!!!!

  • नगरसेवक हेमंत रासने
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महिला सक्षमीकरणाचा ‘पुणे पॅटर्न’: परिवर्तनाची सक्षम वाटचाल

महिला दिन विशेष महिला सक्षमीकरण हा केवळ घोषणांचा विषय नाही;...

12 तास काम केल्यावरही मिळेना महिलांना साडेनऊ हजाराचा पगार

पुणे-इथे घराची सरासरी किंमत देखील तब्बल 78 लाख...

महिलांसाठी PMPML च्या दिवसभराच्या 6 सफरी ..चॉइस महिलांची,अवघ्या 500 रुपयांत एक सफर

पुणे-जागतिक महिला दिनानिमित्त पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे (पीएमपीएमएल) महिला...

जगावर वर्चस्व लादू पहाणाऱ्या डोनाल्ड ट्रम्पने बालिकेवर अत्याचार केल्याचा आरोप

डोनाल्ड ट्रम्पनी १५ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार केल्याचा आरोप, अमेरिका...