”सिरम’चा नागरी सन्मान करा’-दीपक मानकर

Date:

पुणे (प्रतिनिधी) अवघ्या जगाला मेटाकुटीला आणणाऱ्या कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी आपल्या पुणे शहरातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेने ‘कोव्हीशिल्ड’ लशीच्या निमित्ताने मोठा आशेचा किरण दाखवला आहे. यामुळे आपल्या पुणे शहराचे नाव जागतिक पातळीवर पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. ही बाब पुणेकर म्हणून सर्वांसाठीच अभिमानाची आणि अत्यानंद देणारी असून सिरम इन्स्टिट्यूटचा कृतज्ञता म्हणून पुणे महानगरपालिकेच्या वतीने भव्य नागरी सत्कार करावा, अशी मागणी माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक दीपक मानकर यांनी केली आहे.

‘सिरम’च्या नागरी सत्कारासंदर्भात मानकर यांनी पुणे महापालिकेला ठरावही दिला आहे. सिरम इन्स्टिट्यूटचा सन्मान करताना संस्थेचे संस्थापक सायरस पुनावाला आणि सीईओ आदर पुनावाला यांचा गौरव राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते करावा, अशी मागणी या ठरवाद्वारे करण्यात आली आहे. या सन्मान सोहळ्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खा. वंदना चव्हाण, खा. अमोल कोल्हे, मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्यासह महापालिका पदाधिकऱ्यांचा उपस्थितीत हा कार्यक्रम व्हावा, असेही मानकर यांनी या ठरवाद्वारे सुचवले आहे.

याबाबत माहिती देताना मानकर म्हणाले, ‘एकवेळ अशीही होती, ज्यावेळी पुणे शहरात कोरोनाग्रस्तांची सर्वाधिक संख्या होती. मात्र याच पुणे शहराने देशाला संजीवनी देणाऱ्या लशीची निर्मिती केली आहे. ही अभिमानाची आणि पुणेकरांची मान उंचावणारी बाब आहे. त्यामुळे लस निर्मिती करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटचा गौरव करणे पुणेकरांचे आद्यकर्तव्य आहे. आपण दिलेल्या ठरावाचा निश्चितच सकारात्मक विचार केला जाईल, ही अपेक्षा आहे.’

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ओसवाल बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याने ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

पुणे: येथील बाणेर भागात विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीच्या व्यवहारात...

पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे आज मला मनुवादी वृत्तीच्या विरोधातील पुढचा लढा लढण्यासाठी अधिक बळ मिळाले:हर्षवर्धन सपकाळ

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर प्रथमच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी...

अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वीच:केंद्रीय विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला मोठा प्रतिसाद पुणे शहराला देशातील सर्वोत्तम...

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप पुणे (प्रतिनिधी)...