पुणे- शहर दहीहंडी व गणेशोत्सव समन्वय समितीच्या वतीने ऍड .राहुल म्हस्के,गिरीश गुरनानी यांनी महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री मा. विनोद तावडे साहेब यांना ता. मुळशी येथे पार पडणाऱ्या सनबर्न फेस्टिवल रदद् करण्याबाबत निवेदन दिले यावेळी मंत्री तावडे यांनी सनबर्न फेस्टिवल ला सांकृतिक खात्या तर्फे कुठल्याही प्रकारची परवानगी दिली जाणार नाही याचे आश्वासन दिले.
सनबर्न फेस्टिव्हल रद्द करा, पुण्यात होणाऱ्या सनबर्न फेस्टिव्हलला पुणे शहर दहीहंडी व गणेशोत्सव समन्वय समितीचा विरोध आहे ,
‘सनबर्न फेस्टिव्हल’ हा दारूड्या संस्कृतीचा व मली पदार्थांचा खुला बाजार आहे. हा समाजविघातक सनबर्न फेस्टिव्हल दि. 29 ते 31 डिसेंबर 2018 रोजी बावधान, पुणे येथे होणार आहे. आम्ही तो खपवून घेणार नाही.सनबर्न फेस्टिव्हलला वेळेची मर्यादा नसते. मात्र शिवजयंती, दहिहंडी, गणपती उत्सव, नवरात्रोत्सव काळात कायद्याचा बडगा दाखवून रात्री 10 वा. बंद केले जातात. मात्र सनबर्न फेस्टिव्हलला आर्थिक गणिते बघून रात्रभर चालवण्यास परवानगी दिली जाते.. यामुळे तरूण पिढीवर प्रचंड वाईट परिणाम होतात. या वाईट संस्कृतीमुळे गुन्ह्यांचे प्रमाण वाढते आहे. रात्रभर तरूण मुले मुली दारू पिऊन व आमली पदार्थाचे सेवन करून दररोज धिंगाना करत फिरतात.पुणे हे सांस्कृतिक शहर आहे. समता, समानता व बंधूता प्रस्थापित करणारे व महाराष्ट्राला चांगली दिशा देणारे शहर आहे. पुणे जिजाऊ – शिवरायांचे, महात्मा फुले व जेधे -जवळकरांचे आणि 12 मावळा प्रांत असे पुरोगामी शहर आहे. शिक्षणाचे ‘हब’ असून सर्व धर्मांची संस्कृती जपणारे शहर आहे. याच पुण्यात हा धर्मद्रोही उत्सव चालणार नाही.कोर्टाने दिलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन करून चार स्पिकर लावून, वेळेची मर्यादा पाळून आदेश पाळले जातात. मात्र सनबर्न फेस्टिव्हलवर कोणतेही नियम व अटी पाळले जात नाहीत. असे या निवेदनात म्हटलेले असल्याचे गिरीश गुरनानी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

