शिरुर परिसराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार

Date:

पुणे,दि.१:- शिरुर परिसराच्या विकास कामांसाठी येत्या मार्च अखेरपर्यंत एकूण २५ कोटी रुपयांची तरतूद करणार असून विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

शिरुर नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे,आमदार अशोक पवार, नगराध्यक्ष वैशाली वाखारे आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले,नगर परिषदेची नवीन प्रशासकीय इमारत शिरुरच्या वैभवात भर घालणारी वास्तू आहे. या इमारतीमधून कोणत्याही नागरिकांवर अन्याय होऊ न देता लोकाभिमुख, पारदर्शक कामे व्हावीत. प्रत्येक निर्णय शहराचा विकासाला चालना देणारा असला पाहिजे. नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वांना सोबत घेवून शिरुरनगरीचा विकास करावा.

नागरिकांनी आपल्या जबाबदाऱ्या लक्षात घेवूनच प्रशासनाला सहकार्य करायला हवे. पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या विकास आराखड्याबाबत नागरीकांच्या हरकती असल्यास त्यावर योग्यप्रकारे विचार करण्यात येईल. पुणे ते शिरुर रस्त्याचे दुमजली कामासाठी केंद्राकडून निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. वारीमार्गाचे प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावून विकास कामे करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

खासदार डॉ. कोल्हे म्हणाले, शिरुर परिसर हे मराठवाड्याच्या नागरिकांकरीता पुणे व मुंबईचे प्रवेशद्वार म्हणून भविष्यात ओळखले जाईल अशी विकासकामे करण्याचा प्रयत्न आहे.

आमदार श्री.पवार म्हणाले, शिरुर परिसरातील पायाभूत विकास करण्यासाठी वेळोवेळी निधी प्राप्त झालेला आहे. यापुढेही विविध विकासकामे करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते नगर परिषद आवारात ध्वजारोहण करण्यात आले. त्यांनी नूतन इमारतीची पाहणी केली.

कार्यक्रमाला माजी आमदार पोपटराव गावडे व रमेश थोरात, उपनगराध्यक्ष प्रकाश धारीवाल, मुख्याधिकारी अँड प्रसाद बोरकर, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदेचे आजी माजी पदाधिकारी तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘कुरकुरे’ देण्याचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार; पुणे रेल्वे स्थानकातील धक्कादायक घटना

माणुसकीला काळीमा फासतेय पुण्यातील गुन्हेगारी.. पुणे :कुटुंबीयासोबत प्लॅट फॉर्मवर...

छत्रपती संभाजीनगर येथे अग्निवीर भरती रॅलीला सुरुवात

२० फेब्रुवारी ते १५ मार्च २०२६ औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) कॅन्टोन्मेंट...

शासकीय भाषा सुधारण्यासाठी शासनाने समिती नियुक्त करावी : महेश भागवत

अधिकाऱ्यांनो, चांगले काम करा, लिहिते व्हा अन्‌ लोकाभिमुखता जपा!महेश...

एआय इम्पॅक्ट समिट 2026 चा नवी दिल्लीत‌ समारोप

18-19 फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या एआय इम्पॅक्ट समिट 2026 चा...