Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

अन्न व्यावसायिकांनी परवाना प्रमाणपत्रात ई-मेल, भ्रमणध्वनी क्रमांक नोंदणी करण्याचे आवाहन

Date:

पुणे, दि. ४: एफएसएसएआय, नवी दिल्ली आणि राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभाग यांच्या अधिसूचना, परवाना प्रमाणपत्र आदी संबंधी संदेश मिळण्यासाठी अन्न व्यावसायिकांनी परवाना प्रमाणपत्रामध्ये ऑनलाईनरित्या ई-मेल पत्ता व भ्रमणध्वनी क्रमांक अद्ययावत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ५ ते १२ ऑगस्ट २०२२ या कालावधीत साजरा करण्यात येणाऱ्या अन्न सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने अन्न व औषध प्रशासनाकडून हे विशेष आवाहन करण्यात आले आहे.

भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या (एफएसएसएआय) २५ नोव्हेंबर २०२१ च्या आदेशानुसार अन्न व्यावसायिकांनी परवाना प्रमाणपत्रामध्ये ऑनलाईनरित्या ई-मेल पत्ता व भ्रमणध्वनी क्रमांक अद्ययावत करणे आवश्यक आहे. त्यामुळे अधिसूचना, अद्यावत माहिती, सुधारणा नोटीस, परवाना प्रमाणपत्र, कागदपत्र पडताळणी संबंधी संदेश थेट ई-मेल वर व भ्रमणध्वनी क्रमांकावर मिळणार आहेत.

व्यवसायिकांनी ई-मेल आयडी व भ्रमणध्वनी अद्यावत करून त्यांचा अन्न सुरक्षा तक्रार प्रणालीमध्ये (एफओएससीओएस) लॉगीनचा पासवर्ड रिसेट करण्याबाबत कार्यपद्धती (एसओपी) तयार केली असून त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. अन्न व्यवसाय चालकांनी (एफबीओ) प्रायमरी कॉन्टॅक्ट डिटेल व सेंकडरी कॉन्टॅक्ट डिटेलमधील पासवर्ड रिसेट करण्याकरीता २५ नोव्हेंबर २०२१ च्या परिशिष्ट-II नुसार संबंधित अधिकारी व नोंदणी प्राधिकारी यांच्याकडे स्वतः चा ई-मेल पत्ता व भ्रमणध्वनी क्रमांक उपलब्ध अद्यावत करण्यासाठी विनंती अर्ज किंवा इमेल करावा.

विनंती अर्ज संबंधित व्यावसायिकाच्या लेटर हेडवर वर करावा. त्यावर अधिकृत व्यक्तीची सही असावी. तसेच उचित कारण असावे. अधिकृत व्यक्तीचे आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र आदी ओळखपत्र तसेच अस्तित्वातील परवाना, नोंदणी प्रमाणपत्र, अर्जाची (‘फार्म-बी, फार्म-ए’) प्रत जोडावी.

अधिक माहितीसाठी केवळ https://foscos.fssai.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन या कार्यपद्धतीचा उपयोग करुन आपली माहिती अद्ययावत करावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सहायक आयुक्त साहेबराव देसाई यांनी केले आहे.
000

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापालिकेतील कनिष्ठ अभियंत्याला 1 लाखाची लाच घेताना अटक

पुणे:पिंपरी महापालिकेत कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरी करीत असलेल्यास...

“भारत गौरव ट्रेन – छत्रपती शिवाजी महाराज सर्किट” ९ जून पासून

पर्यटकांनी ऐतिहासिक़ पर्यटनाचा लाभ घ्यावा- पर्यटनमंत्री शंभूराज देसाईमुंबई, दि....

लोकशाही, संविधान व महाराष्ट्र धर्म वाचवण्याच्या लढाईत काँग्रेस शिवसेनेबरोबर: हर्षवर्धन सपकाळ.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मातोश्रीवर घेतली शिवसेना पक्ष...