Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

सततच्या दिल्ली(?) दौ-यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांची प्रकृती बिघडली: प्रशासकीय बैठका रद्द: फडणवीस दिल्लीला रवाना

Date:

मुंबई- सततच्या दिल्ली दौ-यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली. यामुळे सर्व प्रशासकीय बैठका आणि दौरे रद्द करण्यात आले आहेत. राज्यात सुरू असलेले पाहणी दौरे आणि बैठका यामुळे त्यांना थकवा जाणवत असून डॉक्टरांनी त्यांना आरामाचा सल्ला दिला आहे. त्यामुळे त्यांच्या आजच्या सर्व प्रशासकीय बैठका रद्द करण्यात आल्या आहेत.

आरामाचा सल्ला

शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक दौरे आणि बैठका घेतल्या आहेत. त्याचबरोबर पहाटेपर्यंतच्या सभा, पूरग्रस्त भागाची पाहणी आणि प्रवास या सर्वामुळे त्यांना थकवा आणि दगदग त्यांची झाली. या सर्व पार्श्वभूमीवर त्यांना आरामाचा सल्ला देण्यात आला.

फडणवीस दिल्लीला रवाना

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. यामागे ठोस कारण स्पष्ट नाही परंतु, त्यांचे राज्यातील सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. सुप्रीम कोर्टात आज झालेल्या सुनावणीसंदर्भात ते दिल्लीत वरिष्ठांशी चर्चा करतील अशी शक्यता आहे.

रणनिती आखली जाईल

यासह मंत्रिमंडळ विस्तारावरही चर्चा होऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेला आणि बंडखोर आमदार अपात्र ठरले तर भाजपासमोर काय पर्याय आहेत यासंदर्भात देवेंद्र फडणवीस पक्षश्रेष्ठींशी चर्चा करु शकतात अथवा ती रणनितीही ठरवली जाऊ शकते. विशेषतः मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहुर्तही अजून झालेला नाही त्याची तारीखही बैठकीत निश्चित होऊ शकेल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सरन्याधीश भूषण गवईंचा प्रोटोकॉल न पाळून भाजपा युती सरकारकडून अपमान, आंबेडकरी विचारांचे असल्याने अपमान केला का? : नाना पटोले

सरन्यायाधिशांचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर राज्य सरकार काय कारवाई करणार. राज्य...

पॉलिटेक्निक प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया २० मे पासून सुरू

पदविका अभ्यासक्रम नोकरी व उद्योगासाठी उपयुक्त पर्याय; अधिकाधिक विद्यार्थ्यांनी...