महिलांमधील कर्व्हीकल कॅन्सर जनजागृतीसाठी उपक्रम
पुणे: फेडरेशन ऑफ ओब्सेट्रिक्स अँड गायनाकलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडिया(फॉगसी सीएनएन) आणि पुणे ओबीजीवायएन सोसायटी यांच्या वतीने येत्या १८ जून रोजी तीन टिक्के जिंदगी के या वैशिष्ठयपूर्ण वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. डेक्कन जिमखाना येथील कॅफे गुडलक चौक ते बालगंधर्व चौकापर्यंत पार पडणाऱ्या या वॉकेथॉनचा शेवट झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्यापाशी होणार आहे.
तीन टिक्के जिंदगी के वॉकेथॉन या उपक्रमामागची संकल्पना म्हणजे महिलांमध्ये आणि विशेषतः तरुण मुलींमध्ये वाढणारा गर्भशयाचा कर्करोगाबाबत जागृती निर्माण करणे हा आहे. कर्व्हीकल कॅन्सर हा महिलांना त्रस्त करण्याऱ्या प्रमुख तीन कर्करोगांपैकी एक असून त्याबाबतीत समाजामध्ये जागरूकता निर्माण करणे आणि प्रतिबंधक औषधाच्या केवळ ३ डोसमध्ये हा कर्करोग होण्याची शक्यता लक्षणीयरित्या कमी करणे असे आमच्या समोरील लक्ष आहे, असे फॉगसीच्या उपाध्यक्ष डॉ सुनीता तांदुळवाडकर यांनी सांगितले.
फॉगसी सीएनएन यांच्या तर्फे आयोजित करण्यात आलेल्या गर्भधारणा आणि प्रसूती शास्त्र तज्ज्ञांच्या चर्चसत्रात कर्व्हीकल कॅन्सर व त्याचा प्रतिरोध हा विषय प्रामुख्याने चर्चिला गेला. या क्षेत्रातील हे सर्वोच्च दर्जाचे चर्चसत्र होते. तीन टिक्के जिंदगी के वॉकेथॉनच्या संयोजन समितीत डॉ. सुनीता तांदुळवाडकर, डॉ निशिकांत क्षोत्री(अध्यक्ष, पुणे ओबीजीवायएन सोसायटी), फॉगसी सीएनएनचे महासचिव डॉ पराग बिनीवाले, आणि डॉ विना तोडकर यांचा समावेश आहे. सर्व वयोगटातील पुणेकर महिला व पुरुष, विशेषतः मुलींच्या पालकांनी या वॉकेथॉनमध्ये सहभाग घ्यावा आणि कर्व्हीकल कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी काय करता या संदेशाचा समाजात प्रसार करावा असे आवाहन त्यांनी केले आहे.