मुंबई- सिनेरामा प्रॉडक्शन इव्हेंट आणि मिडियातर्फे एकपात्री आणि एकेरी नृत्य स्पर्धेच्ं राज्यस्तरीय ऑनलाईन आयोजन करण्यात आल्याची माहिती सिनेरामा प्रॉडक्शनचे अभिनेता दिग्दर्शक राम माळी यांनी दिली आहे.
माळी म्हणाले,’ या संस्थेच्या माध्यमांतून महाराष्ट्रातील नवोदित कलाकारांना एकपात्री आणि एकेरी नृत्य स्पर्धेच्ं आयोजन करुन कलेच्या माध्यमातन प्रोत्साहन आणि चांगला रंगमंच उपलब्ध करुन देत आहे.या वर्षी एकपात्री आणि एकेरी नृत्य स्पर्धेच्ं राज्यस्तरीय ऑनलाईन आयोजन दि.23 डिसेंबर 21 रोजी केले असुन, सदर स्पर्धेसाठी 18 वर्षा वरील कोणीही स्पर्धक यात भाग घेऊ शकतो. एकपात्री व एकेरी नृत्य स्पर्धेत भाग घेण्यासाठी स्पर्धकाला एकपात्री संहितेची व गाण्याची निवड स्पर्धकांनी करायची असुन, दोन्ही स्पर्धेसाठी फक्त 4 मिनटाचा कालावधी दिला आहे.आडवा मोबाइल धरुन एकपात्री व गाणे शुट करुन cineramaproductions21@gmail.com या मेल आय डी वर दि. 15 डिसेंबर पर्यत हा व्हिडिओ पाठवायचा आहे. सदर स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ प्रथमच डोंबिवली मध्ये मान्यवर कलाकारांच्या हस्ते संपन्न होणार आहे .अधिक माहिती साठी सिनेरामा प्रॉडक्शन 8070009825 या क्रमांका वर संपर्क साधण्याचे आवाहनहि त्यांनी केले आहे.