पुणे- छोटेखानी कलावंतांना कार्यक्रम करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सांस्कृतिक चित्रपट विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.या संदर्भातील निवेदन सांस्कृतिक विभागाचे विविध ठिकाणचे शहर अध्यक्ष व जिल्हाध्यक्ष यांनी आपापल्या ठिकाणी विभागीय आयुक्त ,जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांना दिले आहे. अशी माहिती ज्येष्ठ अभिनेत्री आणि राष्ट्रवादी सांकृतिक विभागाच्या नेत्या प्रिया बेर्डे यांनी ‘माय मराठी’ ला दिली
पुणे, लातूर,बीड, उस्मानाबाद जिल्हाधिकारी व तसेच पिंपरी चिंचवड आयुक्त, पुणे आयुक्त, सातारा, कोल्हापूर आयुक्त यांना आज राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाच्या वतीने निवेदन देण्यात आले, सर्व स्थानिक कलाकारांना मग तो भारुड गोंधळी, ऑर्केस्ट्रा, संगीत रजनी, संगीत बारी, जादूगर, नृत्य करणारे, वाघ्या मुरळी, असतील अशा सर्व स्तरातील छोटाखानी कलाकारांना लवकरात लवकर कार्यक्रम करण्यासाठी परवानगी द्यावी, यावेळी राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाचे सर्व शहराध्यक्ष आणि जिल्हा अध्यक्ष यांनी आपल्या आपल्या या ठिकाणी जाऊन निवेदन दिले, आयुक्त आणि कलेक्टर यांनी लवकरात लवकर ह्या संदर्भात जीआर काढून कलाकारांचा प्रश्न लवकरात लवकर एवढ्या सात दिवसात आम्ही मार्गी लावू असं खूप मोठ आश्वासन आज सगळ्याच अधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना दिले..असेही त्यांनी सांगितले .