” द नाईट मॅनेजर ” च्या दुसऱ्या सीझन ची घोषणा !
अभिनेता अनिल कपूरने सोशल मीडिया च्या माध्यमातून नाईट मॅनेजरच्या दुसऱ्या सीझन ची केली घोषणा !
अभिनेता अनिल कपूर चा ” द नाईट मॅनेजर ” या वेब सीरिज ची जोरदार चर्चा झाली पहिल्या सीझनला प्रेक्षकांचं अनोखं प्रेम मिळालं. अनिल च्या अभिनयाची जादू या वेब शो मध्ये देखील पहायला मिळाली आणि आज अनिल कपूर याने त्याचा सोशल मीडिया वरून ” द नाईट मॅनेजर २ ” ची अधिकृत घोषणा केली आहे पुन्हा एकदा हा वेब शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सगळ्यांना याची उत्सुकता आहे.
शेवटच्या एपिसोड नंतर सगळयांना या वेब शो च्या पुढच्या सीझनची उत्सुकता होती. दुसरा सीझन तयार होत असताना, अनिल कपूरने सोशल मीडियावर या सुपरहिट वेब शो ची रिलीज डेट आणि सीझन दोनची अधिकृत घोषणा केली आहे.
इथे बघू शकता ! https://www.instagram.com/p/Cs5cH1sKtX1/?igshid=MTc4MmM1YmI2Ng==
” द नाईट मॅनेजरमधील शेली रुंगटा पात्राने सगळ्यांची मन जिंकली. अभिनेता अनिल कपूर यांच्याकडे रणबीर कपूरसोबत अॅनिमल, हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणसोबत फायटर, त्यानंतर सुभेदार आणि अँड्रॉइड कुंजप्पन Ver 5.25 चे हिंदी रूपांतरित हे आगामी प्रोजेक्ट्स आहेत !