पुणे- कोणताही भेदभाव न करता कोरोना मुळे नागरिकांनी घरातच राहावे ,विनाकारण बाहेर जाऊ नये एवढा संदेश पोहोचविण्यासाठी आणि कोरोन विरुद्धचा नागरी लढा कडेकोट करण्याच्या हेतूने आपल्या प्रभागातील १६ हजार घरात आपण गहू आणि तांदूळ अशा धान्यांच्या पिशव्या पोहोचविण्याचे काम सुरु केले असून आता पर्यंत 6 हजार पिशव्यांचे वाटप केले देखील आहे. असे येथे शिवसेना नगरसेवक बाला ओसवाल यांनी सांगितले . नागरिकांनी शासनाच्या सूचना पाळून हा लढा जिंकावा ,आपल्यासह आपल्या कुटुंबासह आपल्या शहराचे देशाचे आरोग्य जपणे आपल्या हातात आहे असे ते म्हणाले.
शिवसेनेचे नगरसेवक बाळा ओसवाल १६ हजार कुटुंबाना करणार सहाय्य -कोरोना संकट (व्हिडीओ)
Date:

