पुणे : शिक्षण व कौशल्य विकास प्रशिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी ‘यशस्वी एकेडमी फॉर स्किल्स’ संस्थेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांना देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था पुणे यांच्यातर्फे देण्यात येणारा ‘सरस्वती गणेश पुरस्कार’ रविवारी दिनांक ५ जानेवारी रोजी निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा सोहळा रविवारी सदाशिव पेठेतील भावे प्राथमिक शाळेच्या सभागृह इथं पार पडला. यावेळी संस्थचे अध्यक्ष सु. व्यं. धायगुडे, कार्याध्यक्ष राजेंद्र कुलकर्णी यांच्यासह सर्व विश्वस्त पदाधिकारी व अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सांस्कृतिक समिती प्रमुख अनिल पानसे यांनी केले.