सिंगापूर / नवी दिल्ली: भारतीय वंशाचे ३३ वर्षीय उद्योजक श्री. विवेक सालगांवकर यांना फोरम ऑफ यंग ग्लोबल लीडर्स ऑफ क्लास ऑफ २० च्या प्रतिष्ठित यादीत स्थान देण्यात आले आहे. एका कुटुंबाच्या मालकीच्या, विविध क्षेत्रांमधील कामाची अनेक वर्षांची दीर्घ परंपरा असलेल्या बलाढ्य उद्योगसमूहात कार्यरत असून देखील श्री. सालगांवकर हे खनिजे आणि नैसर्गिक स्रोत उद्योगांसाठी शाश्वत आणि सामाजिक जबाबदारी पूर्ण होईल अशा दृष्टीने नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान निर्माण करून त्याच्या व्यवसायीकरणाला समर्थन देण्यात सक्रिय सहभागी राहून स्वतःची एक विशेष परंपरा निर्माण करत आहेत.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (डब्ल्यूईएफ) चे संस्थापक क्लॉस श्वाब यांनी २००४ मध्ये फोरम ऑफ यंग ग्लोबल लीडर्स क्लास ऑफ २०२० ची सुरुवात केली. श्री. विवेक सालगांवकर यांच्यासह या यादीमध्ये ५१ देशांचे ११३ अन्य कार्यकर्ते, शिक्षक आणि राजकीय नेते यांचा या यादीत समावेश आहे. यावर्षीच्या इंडक्टिजमध्ये फिनलँडचे पंतप्रधान सांना मारिन, विश्वचषक विजेत्या यूएस विमेन्स सॉकर टीमची कर्णधार आणि लैंगिक अधिकार क्षेत्रातील कार्यकर्ती मेगन रॅपिनो, क्रिस्टो सह-संस्थापक व ट्रान्सफरवाईज या पिअर-टू-पिअर मनी ट्रान्सफर व्यवसायाचे सीईओ यांचा समावेश आहे.
फोरममध्ये सहभागी होण्याच्या बातमीबद्दल विमसन ग्रुपचे डायरेक्टर श्री. विवेक सालगांवकर यांनी सांगितले, “युवा नेत्यांच्या प्रतिष्ठित जागतिक समुदायामध्ये सहभागी होणे हा माझ्यासाठी एक सन्मान आहे. या समूहामध्ये उद्योगक्षेत्र, धोरण आणि वकिली यांचा संगम असून या जगाला जगण्यायोग्य अधिक चांगली जागा बनवण्याच्या दृष्टीने त्यांचे योगदान खूप मोलाचे ठरेल.” विमसन ग्रुप हा एका कुटुंबाच्या मालकीचा उद्योग असून खनिज संपत्ती, स्थावर मालमत्ता आणि आर्थिक सेवा या क्षेत्रांमध्ये तो कार्यरत आहे. आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रातील सामाजिक उपक्रमांमध्ये देखील हा समूह सक्रिय सहभागी आहे. त्यांनी पुढे असे सांगितले, “पारंपरिक उद्योग असल्यामुळे तंत्रज्ञानाला कमी वाव आहे असे समजले जाणाऱ्या उद्योगामध्ये नावीन्य आणून संचालनात्मक क्षमता सुधारण्यासाठीच्या माझ्या प्रयत्नांमध्ये या प्रोग्रॅमचा खूप मोठा फायदा होईल.”
श्री. सालगांवकर हे मार्च २०२० पासून एका पंचवार्षिक कार्यक्रमात नवीन क्लासमध्ये सहभागी होतील. या प्रोग्राममध्ये एक्झिक्युटिव्ह एज्युकेशन कोर्सेस, शोध मोहीम आणि अनुभवी व्यक्तींसोबत संवाद साधण्याची संधी यांचा समावेश असेल. फोरम ऑफ यंग ग्लोबल लीडर्सच्या सदस्यसंख्येत दरवर्षी वाढ होत असून आता त्यामध्ये १३०० पेक्षा जास्त सदस्य आणि माजी सदस्यांचा समावेश आहे. जागतिक सार्वजनिक हिताच्या दृष्टीने उद्यमशीलतेला वाव मिळावा यासाठी सार्वजनिक-खाजगी सहकार्याला प्रोत्साहन देण्याच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अभियानासोबत फोरम ऑफ यंग ग्लोबल लीडर्सला जोडले गेले आहे. आता हा फोरम १०० पेक्षा जास्त राष्ट्रीयत्वांचे प्रातिनिधीत्व करतो. यंग ग्लोबल लीडर्सचे असे ठाम मत आहे की, सद्यस्थितीतील तातडीच्या समस्यांमध्ये सर्व क्षेत्रे, पिढ्या आणि देशांसाठी एक अधिक चांगले भविष्य निर्माण करण्याची संधी दडलेली आहे.
अलिबाबाचे संस्थापक टेक टायटन जॅक मा, विकिपीडिया या ऑनलाईन एन्सायक्लोपीडियाचे संस्थापक जिमी वेल्स आणि अभिनेता लिओनार्दो डीकॅप्रिओ यांना याआधी या फोरममध्ये सन्मानित करण्यात आले होते. या फोरमच्या प्रख्यात भूतपूर्व सदस्यांमध्ये इकोनॉमिक्समध्ये नोबेल पुरस्कार विजेते डॉ. मायकेल क्रेमर आणि मानवाधिकार वकील अमल क्लूनी यांचा समावेश आहे.