रोटरी मिक्स विंटर करंडक क्रिकेट 2020 स्पर्धेत अकोया अव्हेंजर्स संघाला विजेतेपद
पुणे- रोटरी डिस्ट्रिक 3131 यांच्या तर्फे आयोजित रोटरी मिक्स विंटर करंडक क्रिकेट 2020 स्पर्धेत अंतिम फेरीत रोहन घाडगे(35 धावा व 1-14) याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर अकोया अव्हेंजर्स संघाने एमआरपी विनर्स संघाचा 42 धावांनी पराभव करून विजेतेपद संपादन केले.
व्हिजन क्रिकेट अकादमी येथील क्रिकेट मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत प्रथम फलंदाजी करताना अकोया अव्हेंजर्स संघाला 20षटकात 154धावापर्यंत मजल मारता आली. यात रोहन घाडगे 35, विजय कोतवाल 17, शिरीष भोपे 23, अतुल भगत 14 यांनी छोटी पण महत्वपूर्ण केल्ली करत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. एमआरपी विनर्स कडून योगेश वाघ 3-26, तुषार मढीवाले 2-22, सत्यजित निगडे 2-20 यांनी सुरेख गोलंदाजी केली. याच्या उत्तरात एमआरपी विनर्स संघाचा डाव 20षटकात 112धावावर संपुष्टात आला. यात सागर चौधरी 20, अनिल मांडके 20, मितेश पतंगे 26 यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. अकोया अव्हेंजर्स संघाकडून विजय कोतवाल 2-8, शिरीष भोपे 2-17, रोहन घाडगे 1-14, श्रीधर प्रभू 1-11 यांनी अचूक गोलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. सामन्याचा मानकरी रोहन घाडगे ठरला.
स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी व माजी रणजीपटू रियाज बागवान व रोटरी 3131चे प्रांतपाल रो. रवी धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र रणजी करंडकमधील वेगवान गोलंदाज समद फल्ला, गिरीश कुलकर्णी, अजय नलावडे, डेक्कन जिमखान्याचे मंगेश भुस्कुटे, रोटरी 3131चे क्रीडासंचालक महेश घोरपडे, स्पर्धेचे कार्यवाहक शिवदत्त पाटणे व चेअरमन सुधीर काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी:
अकोया अव्हेंजर्स: 20षटकात सर्वबाद 154धावा(रोहन घाडगे 35(24,5×4), विजय कोतवाल 17, शिरीष भोपे 23(23), अतुल भगत 14, योगेश वाघ 3-26, तुषार मढीवाले 2-22, सत्यजित निगडे 2-20, अनिल मांडके 1-20)वि.वि.एमआरपी विनर्स: 20षटकात सर्वबाद 112धावा(सागर चौधरी 20, अनिल मांडके 20, मितेश पतंगे 26(31,3×4), विजय कोतवाल 2-8, शिरीष भोपे 2-17, रोहन घाडगे 1-14, श्रीधर प्रभू 1-11); सामनावीर-रोहन घाडगे.
इतर पारितोषिके:
सर्वोत्कृष्ट फलंदाज: शिरीष भोपे(अकोया अव्हेंजर्स, 115)
सर्वोत्कृष्ट गोलंदाज: अनिल मांडके(एमआरपी विनर्स, 8बळी);
सर्वोत्कृष्ट खेळाडू: योगेश वाघ(एमआरपी विनर्स).