पीएमडीटीए मार्स्टस् टेनिस स्पर्धेत सर्वज्ञ सरोदे, स्वरा जावळे, सक्षम भन्साळी, काव्या देशमुख, तेज ओक, सार्थ बनसोडे यांना विजेतेपद श्रावणी देशमुख हिला दुहेरी मुकुट
पुणे- पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)तर्फे आयोजित व केपीआयटी-आयकॉन ग्रुप प्रायोजित पीएमडीटीए मार्स्टस् टेनिस स्पर्धेत अंतिम फेरीत सर्वज्ञ सरोदे, स्वरा जावळे, सक्षम भन्साळी, काव्या देशमुख, तेज ओक, सार्थ बनसोडे आणि श्रावणी देशमुख यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्ट येथे पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत 8वर्षाखालील मुलांच्या गटात सर्वज्ञ सरोदेने स्मित उंद्रेचा 7-2 असा सहज पराभव करून विजेतेपद पटकावले. तर, मुलींच्या गटात स्वरा जावळे हिने श्रावी देवरेचा 7-5 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. स्वरा ही क्लाईन मेमोरियल शाळेत तिसरी इयत्तेत शिकत असून हिलसाईड जिमखाना येथे प्रशिक्षक राम गोंटे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. 10 वर्षाखालील मुलांच्या गटात सक्षम भन्साळीने मनन अगरवालचा 7-2 असा तर, मुलींच्या गटात काव्या देशमुखने आस्मि टिळेकरचा टायब्रेकमध्ये 7-6(5) असा पराभव करून विजेतेपद मिळवले.
12 वर्षाखालील मुलांच्या गटात तेज ओक याने आपली विजयी मालिका कायम ठेवत शार्दूल खवलेचा 5-3, 4-0 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. तेज सहावी इयत्तेत सिम्बायोसिस शाळेत शिकत बाउंस टेनिस अकादमी येथे प्रशिक्षक केदार शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. मुलींच्या गटात श्रावणी देशमुखने रितिका मोरेचा 4-1, 4-1 असा एकतर्फी पराभव करून विजेतेपदावर आपले नाव कोरले.
14 वर्षाखालील मुलांच्या गटात चुरशीच्या झालेल्या लढतीत सार्थ बनसोडेने आर्यन हूडचा टायब्रेकमध्ये 4-5(3), 4-2, 4-1 असा पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकावले. सार्थ हा नववी इयत्तेत पी जोग शाळॆत शिकत असून डेक्कन जिमखाना येथे प्रशिक्षक आदित्य मडकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. तर, मुलींच्या गटात श्रावणी देशमुखने नाव्या भामिदिप्तीचा 4-1, 3-5, 4-0 असा तीन सेटमध्ये पराभव करून 14 वर्षाखालील गटांतील विजेतेपदाबरोबरच 12 वर्षाखालील गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला.
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तीपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीएमडीटीएचे मानद सचिव अभिषेक ताम्हाणे आणि पीएमडीटीएचे सहसचिव हिमांशू गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा निरीक्षक रेशम रणदिवे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी:
8वर्षाखालील मुले:
सर्वज्ञ सरोदे वि.वि.स्मित उंद्रे 7-2;
8वर्षाखालील मुली:
स्वरा जावळे वि.वि.श्रावी देवरे 7-5;
10 वर्षाखालील मुले:
सक्षम भन्साळी वि.वि.मनन अगरवाल 7-2;
10 वर्षाखालील मुली:
काव्या देशमुख वि.वि.आस्मि टिळेकर 7-6(5);
12 वर्षाखालील मुले:
तेज ओक वि.वि.शार्दूल खवले 5-3, 4-0;
12 वर्षाखालील मुली:
श्रावणी देशमुख वि.वि.रितिका मोरे 4-1, 4-1;
14 वर्षाखालील मुले:
सार्थ बनसोडे वि.वि.आर्यन हूड 4-5(3), 4-2, 4-1;
14 वर्षाखालील मुली:
श्रावणी देशमुख वि.वि.नाव्या भामिदिप्ती 4-1, 3-5, 4-0.