पुणे: पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित पीवायसी चॅलेंजर करंडक 3दिवसीय वरिष्ठ गटाच्या निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीत पहिल्या दिवशी मुर्तझा ट्रँकवाला(233धावा)च्या द्विशतकी खेळीसह आतिश वरपे 102धावा)याच्या शतकी खेळीच्या जोरावर एमसीए संयुक्त जिल्हा संघाने पहिल्या डावात पूना क्लब संघापुढे 509 धावांचा डोंगर उभा केला आहे. तर, दुसऱ्या सामन्यात वैभव गोसावी(23-5) याने केलेल्या अफलातून गोलंदाजीपुढे डेक्कन जिमखाना संघ पहिल्या डावात 107 धावांवर संपुष्ठात आला.
एमसीए संयुक्त जिल्हा संघाचे पूना क्लब संघापुढे 509 धावांचे आव्हान
पीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट मैदानावरील तीन दिवसीय लढतीत आज पहिल्या दिवशी एमसीए संयुक्त जिल्हा संघाने प्रथम फलंदाजी करताना 88षटकात 6 बाद 509धावा केल्या. यात मुर्तझा ट्रँकवाला याने धडाकेबाज फलंदाजी करत 167 चेंडूत 20चौकार व 16 षटकरांच्या मदतीने 233 धावा केल्या, तर आतिश वरपे याने मुर्तझाला सुरेख साथ देत 149चेंडूत 13चौकारांसह 102 धावा केल्या. मुर्तझा ट्रँकवाला व आतिश वरपे यांनी चौथ्या गड्यासाठी 193चेंडूत 197धावांची भागीदारी करून संघाला भक्कम अशी सुरुवात करून दिली. मुर्तझा बाद झाल्यानंतर आतिशने तरणजित सिंग दिलोन( 46धावा)च्या साथीत 70चेंडूत 83 धावांची भागीदारी करून संघाला 509 धावांचे आव्हान उभे करून दिले. पूना क्लबकडून राजकमल चौहान 20-97-2, अजिंक्य नाईक 5-38-2)यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. एमसीए संयुक्त जिल्हा संघ व पूना क्लब यांच्यातील सामन्याचा अजून दोन दिवसांचा खेळ बाकी आहे.
नेहरू स्टेडियम मैदानावरील सामन्यात क्लब ऑफ महाराष्ट्रच्या वैभव गोसावी(23-5), निकित धुमाळ(49-3)यांनी केलेल्या भेदक गोलंदाजीपुढे डेक्कन जिमखाना संघाचा पहिला डाव 36.3षटकात 107धावावर संपुष्टात आला. यात सुहेल श्रीखंडे 31, आत्मन पोरे 26यांनी धावा केल्या. याच्या उत्तरात क्लब ऑफ महाराष्ट्र संघाने आज दिवसअखेर 37षटकात 6बाद 85धावा केल्या. यामध्ये राजवर्धन उंडरे 28, सुजित उबाळे नाबाद 24धावा, तर संकेत चव्हाण 1 धावसंख्येवर खेळत आहे. डेक्कन जिमखाना व क्लब ऑफ महाराष्ट्र यांच्यातील सामन्याचा अजून दोन दिवसाचा खेळ बाकी आहे.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्य फेरी:
पीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट मैदान: पहिला डाव: एमसीए संयुक्त जिल्हा संघ: 88षटकात 6 बाद 509धावा(मुर्तझा ट्रँकवाला 233(167,20×4,16×6), आतिश वरपे 102(149,13×4), तरणजित सिंग दिलोन 46(38,3×4,4×6), विजय झोल 42, राजकमल चौहान 20-97-2, अजिंक्य नाईक 5-38-2) वि.पूना क्लब:.
नेहरू स्टेडियम क्रिकेट मैदान: पहिला डाव: डेक्कन जिमखाना: 36.3षटकात सर्वबाद 107धावा(सुहेल श्रीखंडे 31(56,6×4), आत्मन पोरे 26(37,3×4), वैभव गोसावी 9-23-5, निकित धुमाळ 13-49-3, सुजित उबाळे 9.3-18-2) वि.क्लब ऑफ महाराष्ट्र: 37षटकात 6बाद 85धावा(राजवर्धन उंडरे 28, सुजित उबाळे नाबाद 24(43,2×4), देवदत्त नातू 10, आशय पालकर 11-14-3, पियुष साळवी 5-5-1, धीरज फतंगरे 11-29-1);