पुणे- आजकाल कोण लोकं कसं वागतील नेम नाही , धनकवडी तील एका ४५ वर्षीय नागरिकाने म्हणे मोबाईल नंबर च्या चॉईस नंबर साठी चक्क १ लाख ११ हजार १११ रुपये देवून स्वतःची फसवणूक करवून घेतल्याचा प्रकार सहकार नगर पोलिसात नोंदविला गेला आहे.
याबाबतची सहकारनगर पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंदविला आहे. आणि फिर्यादीचे नाव गुप्त ठेवले आहे. याबाबतची पोलिसांनी सांगितलेली हकीकत अशी कि, २९ सप्टेंबर २०१९ रोजी हि घटना घडली .फिर्यादी हे आपल्या घरी असताना त्यांना मोबाईलवर एक फोन आला आणि चॉईस नंबर मिळवून देतो असे आमिष दाखवून चक्क बँक खात्यावर १ लाख ११ हजार १११ रुपये भरायला लावले आणि चॉईस नंबर न देता फसवणूक केली . आता या प्रकरणी गुन्हे शाखेचे पीआय विजय पुराणिक हे तपास करीत आहेत