नव उद्योजकतेसाठी सज्ज व्हा ! :डॉ विवेक सावंत
‘मेक इन रूरल इंडिया ‘ व्याख्यानात आवाहन
पुणे :’जग आणि जगाच्या गरजा बदलत असताना अनेक न्यू कॉलर जॉब्ज( नव रोजगार संधी ), ग्रीन कॉलर जॉब्ज (पर्यावरण पूरक कामांच्या रोजगार संधी )तयार होत आहेत.सेवा क्षेत्र वाढत आहे. त्यामुळे हार्ड स्किल पेक्षा सॉफ्ट स्किल्सना वाव निर्माण झाला आहे,तो ओळखून नव्या जगाच्या या नव उद्योजकतेसाठी सज्ज व्हा’ ,असे आवाहन महाराष्ट्र नॉलेज कार्पोरेशन लिमिटेड चे कार्यकारी संचालक डॉ विवेक सावंत यांनी केले .
ग्रामीण भागातील युवकांना रोजगार निर्मितीसाठी उपयुक्त व्यावसायिक कौशल्ये वाढीस लागावीत या उद्देशाने ‘स्टार्स फोरम’ (स्किल्स ट्रेनिंग फॉर ऍडव्हान्समेंट ऑफ रुरल सोसायटीज फोरम’) आणि बाएफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन च्या वतीने आयोजित देशातील स्वयंसेवी संस्थांसाठी दहाव्या वार्षिक राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते . ‘मेक इन रूरल इंडिया ‘विषयावरील डॉ विवेक सावंत यांचे व्याख्यान शनिवारी दुपारी झाले .
कायमस्वरूपी नोकऱ्या ,पारंपरिक उद्योजकतेच्या तुलनेत ऑनलाईन सेवा देणारी नवी उद्योजकता कशी वाढत आहे ,हे डॉ विवेक सावंत यांनी उदाहरणे देवून सांगितले . जीएसटी फायलिंग, बुक किपींग, फॉर्म डिझायनर, डाटा एन्ट्री, व्हीडीओ टेस्टीमोनियल क्रिएटर, ट्रान्सलेशन, गुगल गाईड, लोगो डिझायनिंग, यु ट्यूब थंबनेल आर्टिस्ट, व्हीडिओ कॉंप्रेशन, टेंप्लेंट डिझाईन, व्हॉईस ओव्हर, प्रुफ रिडींग,’ वॉल डी कॅल ‘, थ्री डी प्रिटींग,फ्लेक्स बेनर निर्मिती अशा अनेक नव्या रोजगार संधी निर्माण झाल्या आहेत.कोणत्याही वयातील नवउद्योजकाला इंटरनेट चा वापर करून ही कामे करता येणार आहेत . ह्युमन इंटेलिजन्स टास्क (हीट) प्रकारातील जॉब्ज निर्माण होत आहेत. फ्री लान्सिंग करा आणि कार्यरत राहा .उदाहरणार्थ लग्नात काढल्या जाणाऱ्या हजारो फोटोंचे फिनिशिंग ऑनलाईन करून देणे हा जॉब झालेला आहे,असे डॉ सावंत यांनी सांगितले .
डिजीटल डिव्हाईड् , नॉलेज डिव्हाईड पासून ऑपॉर्च्यूनिटी डिव्हाईड वाढत आहे .संधी मिळण्याची दरी वाढत आहे .सेवा क्षेत्र वाढत आहे. त्यामुळे हार्ड स्किल पेक्षा सॉफ्ट स्किल्सना वाव निर्माण झाला आहे. योग्य ‘अर्निंग ‘म्हणजे फक्त पैसे मिळवणे नाही, तर, नॉलेज अर्निंग(ज्ञान प्राप्ती ), सेल्फ एस्टिम अर्निंग(स्वाभिमान प्राप्ती) सुध्दा आहे. नव्या प्रकारच्या उद्योजकतेमध्ये ते शक्य आहे.इच्छा असेल तर काम उपलब्ध आहे.इंटरनेट वर शोध घ्या.नवी कामे घर बसल्या मिळवणे शक्य आहे .
एमकेसीएल च्या ‘ईझी’ या पोर्टल वर जरुरी माहिती दिलेली आहे. बिहारमध्ये अनेक प्रयोग यशस्वी झाले आहेत.असेही ते म्हणाले .
डॉ.सुधीर प्रभू (अमेरिका), ‘ बाएफ ‘ संस्थेचे अध्यक्ष गिरीश सोहनी, डॉ. योगेश कुलकर्णी (अध्यक्ष, स्टार्स फोरम) , डॉ.राजश्री जोशी ( बाएफच्या कार्यक्रम अधिकारी ) इत्यादी उपस्थित होते . चैतन्य नाडकर्णी (कार्यकारी संचालक, स्टार्स फोरम) यांनी प्रास्ताविक केले.