करोना व्हायरस हा छुपा शत्रू, त्याला हरवण्याचा संकल्प करा : उद्धव ठाकरे
मुंबई- करोना हा आपला छुपा शत्रू आहे, तो कुठून हल्ला करेल हे सांगता येत नाही.
कोरोना संकटा वर मात करून गुढी उभारायची आहे, शिवरायांचा हा महाराष्ट्र गनिमी काव्याने का होईना हे युद्ध जिंकनारच आहे.
https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/218196039282283/
घराबाहेर पाऊल आपण टाकलं तर शत्रू आपल्या घरात पाऊल टाकेल हे विसरु नका. या करोनाला हरवण्याा संकल्प करा असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. घरांमध्ये लोक एकत्र आले आहेत. घरातले एसी बंद करा, घरातल्या खिडक्या दरवाजे उघडा असंही आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. काल काहीशी गोंधळाची परिस्थिती होती. त्यामुळे मी सकाळी शुभेच्छा द्यायला आलो नाही, तर दुपारी आलो असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कमी होणार नाही, बंदही होणार नाही. वैद्यकीय सेवाही बंद होणार नाहीत याचा उद्धव ठाकरेंनी पुनरुच्चार केला.
https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/218196039282283/