पुणे -पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील COVID-19 बाबत तपासणी अहवाल
आज दि.20 मार्च 2020 रोजी :-
Dubai To Pune,Spice Jet ,Flight no.SG 52 , पुणे येथे पहाटे 04:04 वा पोहोचली असून त्यामध्ये एकूण = 115 प्रवासी आलेले असून,सर्व भारतीय नागरिक आहेत. सर्वांची वैद्यकीयदृष्ट्या तपासणी करण्यात आलेली आहे.सदर तपासणीमध्ये COVID-19 संदर्भात संशयित रुग्ण कोणीही आढळून आलेले नाहीत.
तथापी 01 नागरिकांने स्वतःहून आजारी (कफ) असल्याचे लेखी पत्रकात नमूद केलेने, व त्याची तपासणीमध्ये खात्री झालेने ,त्यांना नायडू हॉस्पिटल, पुणे येथे पाठवण्यात आलेले आहे.
उर्वरित 114 प्रवासी यांना सारसबाग, सणस कॉम्प्लेक्स, स्वारगेट, पुणे या ठिकाणी Quarantine साठी 05 बसेसमधून पाठवून देण्यात आलेले आहेत.