पुणे – भारतातील वेगाने विकसित होत असलेल्या आरोग्यकल्याण सेवा क्षेत्रात आघाडीवर असलेल्या व्हीएलसीसी या ब्रँडच्या वजननियंत्रण व आरोग्यकल्याण कार्यक्रमांना भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (इंडियनमेडिकल असोसिएशन) मान्यता दिली असून या कार्यक्रमांवर आता ‘इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) मान्यता प्राप्त व्हीएलसीसीचे वेट मॅनेजमेंट अँड वेलनेस प्रोग्रॅम’ असा शिक्का असणार आहे. व्हीएलसीसीच्या संस्थापिका आणि सह अध्यक्षा वंदना लुथरा यांनी ही माहिती दिली आणि त्याचबरोबर हेही आवर्जून सांगितले की आयएमएने अशा प्रकारची मान्यता मिळवलेला हा भारतीय वजन नियंत्रण आणि आरोग्य कल्याण क्षेत्रातील एकमेव प्रोग्रॅम आहे. वेट मॅनेजमेंट अँड वेलनेस प्रोग्रॅमची आयएमएच्या पद्धतीनुसार त्याची तपासणी व
तांत्रिक वैशिष्ट्यांची पडताळणी करण्यात आली. हा प्रोग्रॅम अनुभवी लोकांनी तयार केला असल्याने सर्व निकषांवर उत्तीर्ण झाला. या पडताळणीमध्ये कंपनीच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून आरोग्य कल्याण आणि वजन नियंत्रणाच्या प्रक्रियेची तपासणी आणि त्यातून मिळालेल्या परिणामांचाही लेखो-जोखा घेण्यात आला. व्हीएलसीसीचे वेट मॅनेजमेंट अँड वेलनेस प्रोग्रॅममध्ये प्रत्येक व्यक्तीच्या गरजेनुसार आहारातील बदल, शारीरिक व्यायाम आणि पथ्ये, उपचारात्मक थेरेपी आणि वागण्यासंबंधीचे समुपदेशन या सर्वांचा समावेश केलेला असतो. एका मेडिकल डॉक्टरच्या निगराणीखाली आहारतज्ज्ञ, फिजिओथेरेपिस्ट, तंदुरुस्ती तज्ज्ञ आणि वागणूक समुपदेशक हा कार्यक्रम राबवतात आणि हे कार्यक्रम कंपनीच्या सर्व वेलनेस सेंटर्समध्ये घेतले जातात. दक्षिण आशिया, मध्य-पूर्वेतील देश, पूर्व आफ्रिकेतील 16 देशांतील 150 शहरांत असलेल्या व्हीलएलसीसीच्या 250 केंद्रांत हे
आरोग्यकल्याण कार्यक्रम राबवले जातात.
महाराष्ट्रात विस्ताराचं नियोजन?
येत्या 12 महिन्यांत आणखी 10 वेलनेस सेंटर्स सुरू करण्याची तयारी.
संभाव्य ठिकाणं : यवतमाळ, धुळे, रत्नागिरी, नांदेड, वाशिम, कोल्हापूर 2,
लातूर 2, अहमदनगर, सातारा, वर्धा आणि सोलापूर.
महाराष्टातील आणखी 5 इन्स्टिट्युट काढण्याच्या ठिकाणांमध्ये नागपूर,
नाशिक, मुंबई, पुणे, आणि औरंगाबादचाही सामावेश.
या मान्यतेबद्दल व्हीएलसीसी ग्रुपच्या संस्थापिका आणि सह अध्यक्षा वंदना लुथरा
म्हणाल्या, ‘ आयएमएने आम्हाला प्रशस्तिपत्रक दिले आहे यामुळे नक्कीच आमचा
उत्साह दुणावला आहे. व्हीलसीसीने वैज्ञानिक आधारावर तयार केलेले उपाय आणि
ते अंमलात आणण्याची पद्धती सुरक्षित तसंच परिणामकारक आहे यावर दुसऱ्यांदा
शिक्कामोर्तब झाले आहे. संशोधन व विकास, उच्चशिक्षित प्रोफेशनल यासाठी केलेली
गुंतवणूक आणि शाश्वत तसंच सर्वोत्तम दर्जाची सेवा देण्याच्या ध्यासाला चिकटून
राहण्याचा आमचा निश्चय यामुळेच आम्ही हे अद्वितीय यश प्राप्त करू शकलो
आहोत. व्हीएलसीसीने नेहमीच स्पष्ट उद्देश असलेले आणि परिणाम मोजता येतील
असे सर्वोत्तम, सर्वाधिक विज्ञानाधारित वेट मॅनेजमेंट आणि वेलनेस कार्यक्रम तयार
केले आहेत आणि त्यामुळे या क्षेत्रात कंपनी आघाडीवर राहिली आहे. माणसाच्या
आयुष्यात बदल घडवण्यासाठी आवश्यक नवं तंत्रज्ञान, तज्ज्ञ, पद्धती आणि विशिष्ट
प्रक्रियांमध्ये आम्ही कायमच गुंतवणूक करत राहणार आहोत.’
त्या पुढे म्हणाल्या, ‘ व्हीएलसीसीच्या वेट मॅनेजमेंट अँड वेलनेस प्रोग्रॅमना आता
‘रेकमेंडेड बाय इंडियन मेडिकल असोसिएशन’ची मान्यता मिळाली आहे हे जाहीर
करताना मला अत्यंत आनंद होत आहे. वेट मॅनेजमेंट अँड वेलनेस प्रोग्रॅमची
आयएमएच्या पद्धतीनुसार त्याची तपासणी व तांत्रिक वैशिष्ट्यांची पडताळणी
करण्यात आली. हा प्रोग्रॅम अनुभवी लोकांनी तयार केला असल्याने सर्व निकषांवर
उत्तीर्ण झाला. या पडताळणीमध्ये कंपनीच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून आरोग्य
कल्याण आणि वजन नियंत्रणाच्या प्रक्रियेची तपासणी आणि त्यातून मिळालेल्या
परिणामांचाही लेखो-जोखा घेण्यात आला. व्हीलसीसीने वैज्ञानिक आधारावर
तयार केलेले उपाय आणि ते अंमलात आणण्याची पद्धती सुरक्षित तसंच
परिणामकारक आहे यावर दुसऱ्यांदा शिक्कामोर्तब झाले आहे. संशोधन व विकास,
उच्चशिक्षित प्रोफेशनल यासाठी केलेली गुंतवणूक आणि शाश्वत तसंच सर्वोत्तम
दर्जाची सेवा देण्याच्या ध्यासाला चिकटून राहण्याचा आमचा निश्चय यामुळेच
आम्ही हे अद्वितीय यश प्राप्त करू शकलो आहोत. व्हीएलसीसीने नेहमीच स्पष्ट उद्देश
असलेले आणि परिणाम मोजता येतील असे सर्वोत्तम, सर्वाधिक विज्ञानाधारित वेट
मॅनेजमेंट आणि वेलनेस कार्यक्रम तयार केले आहेत आणि त्यामुळे या क्षेत्रात कंपनी
आघाडीवर राहिली आहे. माणसाच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी आवश्यक नवं
तंत्रज्ञान, तज्ज्ञ, पद्धती आणि विशिष्ट प्रक्रियांमध्ये आम्ही कायमच गुंतवणूक करत
राहणार आहोत.’