जागतिक प्रमाणकांनुसार सर्वोच्च स्तरावरील सुरक्षितता दर्शवली
मुंबई: महिंद्रा अँड महिंद्रा या 20.7 अब्ज डॉलरच्या महिंद्रा समूहाचा भाग असणाऱ्या कंपनीने, भारतातील सर्वात सुरक्षित कार असल्याने XUV300 या कॉम्पॅक्ट एसयूव्हीला ग्लोबल एनसीएपीचा ‘सेफर चॉइस’ पुरस्कार मिळाल्याचे जाहीर केले आहे. जागतिक कार उत्पादकाकडून सर्वसाधारणतः दिले जाणारे सुरक्षेचे सर्व मापदंड पार केले असल्याने, हा पुरस्कार जिंकणारी XUV300 ही भारतातील पहिलीवहिली कार आहे. भारतात विकल्या जाणाऱ्या कारच्या बाबतीत सुरक्षेची सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या कार उत्पादकांनाच केवळ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार दिला जातो.
ग्लोबल एनसीएपीने 2014 व 2020 या दरम्यान 38 हून अधिक वाहनांचे सुरक्षा मूल्यमापन पूर्ण केले आहे, आणि त्यामध्ये #सेफरकार्सफॉरइंडिया कॅम्पेनचा भाग म्हणून “सेफर चॉइस” पुरस्कार मिळवणारी महिंद्रा XUV300 ही पहिलीवहिली कार ठरली आहे.
गेल्या महिन्यात, महिंद्रा XUV300ने अॅडल्ट ऑक्युपंट प्रोटेक्शनसाठी 5-स्टार ग्लोबल एनसीएपी रेटिंग आणि चाइल्ड ऑक्युपंट प्रोटेक्शनसाठी भारतातील पहिले 4-स्टार रेटिंग साध्य केले. ग्लोबल एनसीएपीच्या #सेफरकार्सफॉरइंडिया कॅम्पेनमध्ये आजवर चाचणी करण्यात आलेल्या कोणत्याही कारच्या तुलनेत या कारला सर्वाधिक कम्बाइन्ड ऑक्युपंट रेटिंग मिळाले आहे. 5-स्टार आवश्यकतेबरोबरच, ग्लोबल एनसीएपीच्या सेफर चॉइस पुरस्कारासाठी पेडिस्ट्रिअन आणि इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल कामगिरीसाठीच्या निकषांच्या पूर्ततेद्वारे सुरक्षेची उच्च पातळी साध्य करणे आवश्यक आहे. महिंद्रा XUV300 ने हे निकष पूर्ण केले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, XUV300 ने जागतिक मापदंडांच्या अनुशषंगाने सुरक्षेचा उच्चांक गाठला आहे आणि काही बाबतीत, विकसित देशांतील कार उत्पादकांनी उपलब्ध केलेल्या सुरक्षेच्या मापदंडांनाही मागे टाकले आहे.
ग्लोबल एनसीएपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व अध्यक्ष डेव्हिड वॉर्ड यांनी सांगितले, “महिंद्रासाठी आणि भारतीय ऑटो उद्योगासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. यानिमित्ताने, देशात वाहन सुरक्षेचा उच्चांक गाठण्यात आला आहे. 2018 मध्ये ‘सेफर चॉइस’ पुरस्काराचे आव्हान निश्चित केल्यानंतर, भारतीय ऑटो उत्पादक अशा प्रकारे सुरक्षेच्या बाबतीत आघाडी घेत आहेत, हे समाधानकारक आहे.”
या यशाविषयी बोलताना, महिंद्रा अँड महिंद्रा लि.चे ऑटोमोटिव्ह अध्यक्ष रादन वधेरा यांनी सांगितले, “भारतातील सर्वात सुरक्षित कार असल्याबद्दल XUV300 ला ग्लोबल एनसीएपीचा ‘सेफर चॉइस’ पुरस्कार मिळणे, हा महिंद्रासाठी अभिमानाचा क्षण आहे. भारतात विकल्या जाणाऱ्या कारच्या बाबतीत सुरक्षेची सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या कार उत्पादकांनाच केवळ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार दिला जातो. अॅडल्ट ऑक्युपंट रेटिंगसाठी 5-स्टार स्कोअर आणि 4-स्टार ग्लोबल एनसीएपी चाइल्ड ऑक्युपंट प्रोटेक्शन रेटिंग मिळवणारी, तसेच यामुळे “सेफर चॉइस” पुरस्कार जिंकणारी महिंद्रा XUV300 ही पहिलीवहिली कार आहे. या सन्मानामुळे आम्हाला सर्व वाहनांमध्ये सर्वाधिक सुरक्षा साध्य करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे.”
XUV300 मध्ये दणकट सुरक्षाव्यवस्था
महिंद्रा XUV300 मध्ये या श्रेणीतील प्रथम अशी अनेक सुरक्षेची वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत – 7 एअरबॅग, सर्व 4 चाकांवर डिस्क ब्रेक्स, फ्रंट पार्किंग सेन्सर्स व हीटेड ओआरव्हीएम अशा वैशिष्ट्यांमुळे दणकट सुरक्षा मिळते. आज, XUV300 ने कन्झ्युमर कार सेफ्टी टेस्टिंग संस्थांची अम्ब्रेला संस्था असणाऱ्या ग्लोबल एनसीएपीकडून 5-स्टार रेटिंग मिळवून भारतातील वाहन सुरक्षेच्या बाबतीत नवा बेंचमार्क निर्माण केला आहे. महिंद्रा XUV300 साठी अधिकृत ग्लोबल एनसीएपी टेस्ट नुकतीच जर्मनी येथे घेण्यात आली.
XUV300 मध्ये या श्रेणीतील सर्वोत्तम सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत *:
- या श्रेणीतील प्रथम नी एअरबॅग, ड्युएल-फ्रंट, साइड व कर्टन एअरबॅगसह 7 एअरबॅग
- या श्रेणीतील प्रथम सर्व 4 चाकांवर डिस्क ब्रेक्स (सब 4-मीटर कॉम्पॅक्ट एसयूव्ही श्रेणीतील).
- या श्रेणीतील प्रथम फ्रंट पार्किंग सेन्सर्स
- या श्रेणीतील प्रथम हीटेड ओआरव्हीएम
- डायनॅमिक स्टीअरिंह टॉर्क, हायड्रॉलिक ब्रेक असिस्ट, रोल-ओव्हर मिटिगेशन व ट्रॅक्शन कंट्रोल असणारा इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्रॅम, याबरोबर हिल स्टार्ट असिस्ट
- सर्व प्रकारांमध्ये एबीएस व ईबीडी स्टँडर्ड
- फ्रंट व रिअर फॉग लॅम्प
- टॉप लेदर माउंटसह ISOFIX चाइल्ड सीट
- टायर-ट्रॉनिक्स (टायर प्रेशर अँड टेम्परेचर मॉनिटरिंग सिस्टीम)
-
- फ्रंट सीटिंग पोझिशन्सवर सीट बेल्ट रिमाइंडर
- ऑल आउट सीटिंग पोझिशन्सवर 3-पॉइंट सीट बेल्ट
सेफर चॉइस अवॉर्ड्स आणि सेफर कार फॉर इंडिया कॅम्पेन याविषयी
ग्लोबल एनसीएपीने 2018 मध्ये दिल्ली ऑटो एक्स्पोमध्ये ‘सेफर चॉइस’ अॅवॉर्ड आव्हान जाहीर केले. या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी पात्र ठरण्यासाठी, कार मॉडेलने पुढील आवश्यक बाबी पूर्ण करणे गरजेचे आहे:
- ग्लोबल एनसीएपी न्यू मार्केट टेस्ट प्रोटोकॉलच्या नव्या आवृत्तीच्या अनुषंगाने मॉडेलमध्ये 5-स्टार अॅडल्ट ऑक्युपंट प्रोटेक्शन असणे अत्यावश्यक आहे.
- ग्लोबल एनसीएपी न्यू मार्केट टेस्ट प्रोटोकॉलच्या नव्या आवृत्तीच्या अनुषंगाने मॉडेलमध्ये 4-स्टार चाइल्ड ऑक्युपंट प्रोटेक्शन असणे अत्यावश्यक आहे.
- मॉडेलमध्ये इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ईएससी) असणे आणि युनायटेड नेशन्स रेग्युलेशन्स UN13H, UN140 किंवा GTR9 नुसार कामगिरीच्या गरजा पूर्ण करणे गरजेचे आहे. जिथे पर्यायी असेल तिथे, सर्व मॉडेल प्रकारांवर ईएससी उपलब्ध असणे, अन्य वैशिष्ट्यांबरोबर समाविष्ट न करता स्वतंत्रपणे विक्री करणे, आणि 2 वर्षांपासून पुढे देशात विकल्या जाणाऱ्या किमान 20% वाहनांमध्ये स्टँडर्ड फिट असणे गरजेचे आहे.
- मॉडेलने युनायटेड नेशन्स रेग्युलेशन्स UN127 किंवा GTR9 नुसार पेडिस्ट्रिअन प्रोटेक्शनच्या गरजा पूर्ण करायल्या हव्यात. या गरजा ग्लोबल एनसीएपीच्या विशिष्ट टेस्टिंग लॅबोरेटरीमध्ये मार्केट युनिटवर वैध करायला हव्यात.
- या सर्व गरजांची खातरजमा ग्लोबल एनसीएपीच्या विशिष्ट टेस्टिंग लॅबोरेटरीमध्ये वैध करणे आणि जेथे लागू असेल तेथे मंजुरी प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे.