पुणे – भारतातील सर्वात मोठा आणि विश्वासार्ह बिल्डर्सपैकी एक पूर्वांकरा लिमिटेडने आज पुण्याच्या स्थावर मालमत्ता क्षेत्रासाठी विस्तार योजना आखल्याचे जाहीर केले. 2016 पासून पुण्यात दमदार अस्तित्व उभारल्यानंतर पूर्वांकराने पुण्यातील बावधन परिसरात पूर्वा अस्पायर या लक्झरी प्रकल्पाची घोषणा केली असून हा प्रकल्प पुणे स्थित उच्चभ्रू डेव्हलपरसह संयुक्तपणे उभारण्यात येणार आहे. पूर्वांकराने 2016 मध्ये सिल्व्हरसँड्स प्रकल्प (फेज 1) लाँच केला होता आणि लवकरच त्याची दुसरी फेज लाँच केली जाणार आहे. कंपनी पुढील 12 ते 18 महिन्यांत पुण्यात पूर्वांकरा आणि आणि प्रॉव्हिडंट या दोन्ही ब्रँड्समध्ये मिळून 5 दशलक्ष चौरस फुट जागेचे वितरण करणार आहे.
पूर्वांकरासाठी पुणे हे देशातील सर्वात महत्त्वाच्या, विकासास चालना देणाऱ्या, उदयोन्मुख 5-6 शहरांपैकी एक आहे. पुणे परिसरातील आपले अस्तित्व बळकट करण्यासाठी पूर्वांकरा बांधील असून येत्या काही वर्षांसाठी कंपनीने 10 दशलक्ष चौरस फुट जागेचे गृहप्रकल्प उभारण्याचे नियोजन केले आहे. ही योजना पश्चिम भागात कंपनीचा विस्तार वाढवण्याच्या धोरणाशी सुसंगत आहे. पुण्यातील पूर्वांकराचा पहिला आलिशान प्रकल्प – पूर्वा सिल्व्हरसँड्सला पुण्यातील बाजारपेठ चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि त्यामुळे पुण्यात आणखी विस्तार करण्याची प्रेरणा कंपनीला मिळाली आहे.
पूर्वा अस्पायर हा सुमारे 125 कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला प्रकल्प असून कंपनीचा हा आगामी पहिलाच प्रकल्प त्याअंतर्गत बांधल्या गेलेल्या भविष्यवेधी तंत्रज्ञान आणि युक्त डिझाइन तसेच 220- 230 कोटींच्या उत्पन्न अपेक्षेसह पुण्यातील लक्झरी गृहप्रकल्पाचे चित्र पालटण्यासाठी सज्ज झाला आहे.
पूर्वांकरा लिमिटेडचे सीओओ- निवासी प्रकल्प, श्री. अभिषेक कपूर म्हणाले, ‘पुणे ही पूर्वांकरासाठी अतिशय महत्त्वाच्या बाजारपेठांपैकी एक आहे. गेल्या दशकभरात पुण्याचा माहिती तंत्रज्ञान आणि वाहन उद्योगाचे प्रमुख केंद्र म्हणून उदय झाला आहे. येथील वाढत्या कॉर्पोरेट संस्कृतीमुळे शहर स्थावर मालमत्तेचेही प्रमुख केंद्र बनले आहे. पुण्यातील निवासी स्थावर मालमत्ता बाजारपेठेने गेल्या तीन वर्षांत इतर बाजारपेठांच्या तुलनेत चांगली कामगिरी केली आहे. 2019 मध्ये गृहप्रकल्पांच्या विक्रीत मोठी वाढ दिसून आली असून येत्या काळात हे क्षेत्र आणखी प्रगती करण्याची चिन्हे आहेत. हे लक्षात घेत आणि आजच्या घर खरेदीदारांच्या बदलत्या गरजा, स्मार्ट व आधुनिक घरांची त्यांची मागणी डोळ्यासमोर ठेवत अस्पायर हा प्रकल्प लाँच करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. या प्रकल्पामध्ये डिझाइन, तंत्रज्ञान, स्थळ आणि स्थापत्य या सर्व बाबतीत भविष्यवेधी पैलूंचा मेळ घालण्यात आला आहे. बाणेर आणि बालेवाडीदरम्यान वसलेले आणि वेगाने विकसित होत असलेले व्यावसायिक केंद्र म्हणून ओळखले जाणारे बावधन पुण्यातील दर्जेदार ठिकाणांपैकी एक, शहरी आणि वेगाने विकसित होणार आहे. पूर्वा अस्पायरचा पहिला टप्पा सप्टेंबर 2023 पर्यंत तयार होईल.’
ते पुढे म्हणाले, ‘पुणे बाजारपेठेच्या प्रचंड क्षमतेची पूर्वांकराला जाण असून आम्ही त्यादृष्टीने मुंढवा, कोंढवा आणि बावधन अशा उच्चभ्रू ठिकाणांना प्राधान्य देत आहोत. किंबहुना आम्ही या ठिकाणच्या काही प्रकल्पांविषयी चर्चा करत आहोत. पुणे बाजारपेठेत आम्हाला भरपूर क्षमता दिसत असून आम्ही इथे लवकरच आणखी प्रकल्प लाँच करू.’
क्वासी बुक बिल्डींग पद्धतीद्वारे या प्रकल्पाची बाजारपेठेत विक्री होणार असून त्याअंतर्गंत किंमत- शोध प्रक्रिया मूलभूत मागणी- पुरवठा निकषांच्या माहितीनुसार केली जाते. आरक्षण- पूर्व प्रक्रिया सध्या खुली असून त्यात संभाव्य खरेदीदारांना उत्पादनांची संपूर्ण माहिती प्रकल्पातील प्रत्येक युनिटच्या किंमत पट्ट्यासह दिली जाते. संभाव्य खरेदीदारांना रस दाखवल्यानंतर त्यांना प्रकल्पाच्या मागणीचे विश्लेषण करण्यात मदत केली जाते. याची माहिती आधारित दृष्टीकोनापासून संभाव्य किंमत निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होते व ग्राहकाने दाखवलेल्या उत्सुकतेचा अंदाज घेत 6 ते 8 आठवड्यांत त्याची घोषणा केली जाईल. आरक्षण- पूर्व प्रक्रियेमधील सर्व ग्राहकांना त्यांच्या आवडीचे युनिट, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य पद्धतीनुसार उपलब्ध केले जाईल. लवकर येणारे ग्राहक अर्थातच रांगेत पुढे असतील व त्यांच्यासाठी युनिट्सचे बरेच पर्याय उपलब्ध असतील. या प्रक्रियेदरम्यान सर्व खरेदीदारांना ‘समान बेस किंमत’ दिली जाईल व पर्यायाने ग्राहक खरेदी प्रक्रियेमध्ये पारदर्शकतेस चालना मिळेल.
आतापर्यंत घर खरेदीची पारंपरिक प्रक्रिया खरेदीदार आणि विक्रेत्यामधील ‘ब्रुट फोर्स निगोसिएशन’नुसार केली जात आहे. क्वासी बुक बिल्डींग पद्धतीमध्ये हा प्रकार टाळला जाऊन त्यात पारदर्शक आणि तरीही स्पर्धात्मक पद्धतीने किंमतीचा व स्थावर मालमत्ता विक्रीचा निर्णय केला जातो.
पूर्वा अस्पायरबद्दल
चार एकर जागेत वसलेल्या पूर्वा अस्पायरमध्ये 2 आणि 3 बीएचके अपार्टमेंट्स राहाणीमानाच्या अनोख्या संकल्पनेसह उपलब्ध करण्यात आले असून त्यात दोन लिव्हिंग रूम्स – अंतर्गत लिव्हिंग रूम आणि बाह्य लाउंज यांचा मेळ घालण्यात आला आहे. पूर्वा अस्पायरमध्ये घर खरेदीदारांच्या जीवनशैलीस साजेशा आधुनिक, स्मार्ट आणि बुद्धीमान सुविधा देण्यात आल्या आहेत.
या अशाप्रकारच्या पहिल्याच बुद्धीमान आणि जल कार्यक्षम घरांमध्ये ग्राहकाला प्रकाशयोजना, तापमान, सुरक्षा आणि मनोरंजनावर नियंत्रण ठेवण्याची सोय त्यांच्या स्मार्टफोनवरील ब्लूनेक्स लाइफ अपद्वारे उपलब्ध करण्यात आली आहे. काही उपकरणे स्पर्श न करता गुगल होम उपकरणाच्या मदतीने आवाजाने नियंत्रित करण्याची सोय आहे. पूर्वा अस्पायर हे केंद्रस्थानी वसलेले असल्यामुळे शाळा, महाविद्यालये, टेक पार्क्स, प्रस्तावित मेट्रो लाइन, खरेदी संकुल, बँक इत्यादींपासून जवळ आहे.
पूर्वांकरा लिमिटेडबद्दल
पूर्वांकरा लिमिटेड हा आघाडीचा स्थावर मालमत्ता समूह असून पॅन भारतात कार्यरत आहे. गेल्या चार दशकांत (44 वर्ष) कंपनीने दोन वैशिष्ट्यपूर्ण आणि यशस्वी ब्रँड्स प्रस्थापित केले आहेत. कंपनीचा पूर्वांकरा हा ब्रँड उच्चभ्रू ग्राहकांना सेवा देतो, तर प्रॉव्हिडंट हाउसिंग लि. हा ब्रँड दर्जेदार आणि परवडणाऱ्या गृहक्षेत्रात कार्यरत आहे. कंपनीने आतापर्यंत 40 दशलक्ष चौरस फुटांचे प्रकल्प पूर्ण आणि वितरित केले असून अंदाजे 20 दशलक्ष चौरस फुट जागांचे प्रकल्प विकसित केले जात आहेत. आजमितीला कंपनीची जमीन मालमत्ता अंदाजे 70 दशलक्ष चौरस फुट आहे.