फारुख अब्दुल्लांनी मोदी सरकारला सुनावलं.

Date:

नवी दिल्ली-नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी मोदी सरकारला आंदोलक शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्याचं आवाहन केलं आहे. लोकसभेत बोलताना आक्रमक झालेल्या फारुख अब्दुल्ला यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना दुसरीकडे जम्मू काश्मीरमध्ये ४जी सेवा पुन्हा एकदा सुरु केल्याबद्दल आभार मानले आहेत. तसंच करोना लसची निर्मिती करणाऱ्या भारतीय शास्त्रज्ञ आणि सीरम इन्स्टिट्यूटचं अभिनंदन केलं आहे.

शेतकऱ्यांशी चर्चा करुन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत असं स्पष्ट मत फारुख अब्दुल्ला यांनी व्यक्त केलं आहे. “आपण शेतकरी कायदे तयार केले आहेत. शेतकऱ्यांची कायदे रद्द करावेत अशी इच्छा आहे. त्यांच्याशी चर्चा केल्याने काय नुकसान होणार आहे?,” अशी विचारणा फारुख अब्दुल्ला यांनी केली. “तोडगा काढा, आपण येथे तोडगा काढण्यासाठी आलो आहोत, अडथळे निर्माण कऱण्यासाठी नाही,” असं आवाहन यावेळी त्यांनी केंद्राला केलं.

“डॉक्टर कधीही रक्ताच्या बाटलीकडे पाहून हे हिंदूचं आहे की मुस्लीम व्यक्तीचं असं विचारत नाही. देवाने सर्वांना समान बनवलं आहे. तुम्ही मंदिरात जाता आणि मी मशिदीत,” असं फारुख अब्दुल्ला म्हणाले आहेत. यावेळी फारुख अब्दुल्ला प्रभू श्रीराम संपूर्ण जगाचे असल्याचा उल्लेख केला. “राम संपूर्ण जगाचे आहेत. राम आम्हा सर्वांचे आहेत. कुराणदेखील फक्त आमचं नाही,” असं ते म्हणाले.

“देव आणि अल्लाह एकच आहे. जर तुम्ही फरक केलात तर देश तुटेल. जर तुम्ही काही चूक केलीत तर आम्ही ती सुधरवू आणि आम्ही काही चूक केली तर तुम्ही सुधरवू शकता. अशाच पद्धतीने देश चालतो. आज आम्हाला तुम्ही पाकिस्तानी, खलिस्तानी, चिनी म्हणता. आम्हाला येथेच जगायचं आहे आणि येथेच मरायचं आहे. मी कोणाला घाबरत नाही,” असं ते म्हणाले.

“शेतकरी कायदे म्हणजे धार्मिक ग्रंथ नाहीत”
शेतकरी कायद्यांची तुलना धार्मिक ग्रंथाशी करताना फारुख अब्दुल्ला म्हणाले की, “हे कायदे म्हणजे काही धार्मिक ग्रंथ नाहीत, ज्यामध्ये बदल करु शकत नाही. जर कायदे रद्द करण्याची मागणी आहे तर त्यांच्याशी चर्चा का करत नाही? कृपया हा अभिमानाचा विषय केला जाऊ नये. देशात प्रत्येकाने एकमेकांचा आदर केला पाहिजे”.

“जेव्हा आपण जवाहरलाल नेहरु, सरदार पटेल, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि इतर नेत्यांकडे बोट दाखवता तेव्हा मला खूप वाईट वाटतं. उद्या तुम्ही सत्तेत नसाल, तेव्हा आपण या पंतप्रधानांवर बोलणार आहात का? ही भारतीय परंपरा नाही. जे गेले आहेत त्यांचा आदर करा,” अशा शब्दांत फारुख अब्दुल्ला यांनी मोदी सरकारला खडसावलं.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मधुमित्र-मधुसखी पुरस्कारासाठी नामांकन अर्ज करण्याचे आवाहन

◾ एक पुरस्कार महिला मधपालकांसाठी राखीव पुणे, दि. २१ :...

पुणे जिल्हा देशात व्दितीय क्रमांकावर- मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील

पुणे, दि. २१: महिला व बाल विकास विभागांतर्गत राबविण्यात...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष रुग्ण, रुग्णालये आणि शासन यांना एकत्र आणणारे व्यासपीठ

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस • ऑनलाईन प्रणालीचे लोकार्पण, आरोग्यविषयक विविध योजनांच्या...

कौशल्याच्या संधी: रोजगाराच्या हमी

महाराष्ट्रातील ग्रामीण भागाकडून शहरांकडे होणारे स्थलांतराचे प्रमाण कमी व्हावे,...