पुणे – अॅम्बेसी अॉफीस पार्क ने नुकतेच क्ले स्कूल्स बरोबर भागीदारी प्रस्तावावर हस्ताक्षर केले आहे. जी भारतातील सगळ्यात मोठा प्री स्कूल आणि डे केयर चैन आहे. ही सुविधा मुख्यतहा त्या पालकांसाठी आहे ज्यांना आपल्या व्यस्त दिनचर्येमुळे मुलांसाठी वेळ काढने अवघड होते. अश्या कामकाजी पालकांसाठी आणि खास करून महिलांसाठी ही सुविधा खुपच लाभदायी आहे.
क्ले स्कूल अॅम्बेसी टेक झोन पुण्यात १ ते १० वर्षापर्यंतच्या जवळपास ४० मुलांना डे-केयर आणि प्री स्कूलची सुविधा प्रदान करेल. ह्याचबरोबर सीसीटीव्हीची सुविधा देखील असेल ज्यात पालक आपल्या लहान मुलांच्या देखरेखीबाबत निर्धास्त होतील. शिशु, किशोर आणि त्यांच्यापेक्षा मोठ्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र कक्षांची सुविधा देखील येथे आहे.याचबरोबर वर्ष समाप्तीपर्यंत अॅम्बेसी टेक विलेज आणि अॅम्बेसी मान्यता बंगलोर मध्ये स्थापित होईल.
क्ले सेंटरच्या प्रत्येक अॅम्बेसी अॉफिस पार्कचे क्षेत्रफळ ३००० से ८००० वर्गफिट असेल आणि येथे सर्व काही सर्वोत्कृष्ट लाइव्ह एचडी सुविधायुक्त असेल. वयोमानानुसार कक्ष वितरण, आउटडोर क्रिडा क्षेत्र, स्वयंपाकघर आणि मुलांना शिकवण्याची खास पद्धत्ती येथे असेल.
माइक हॉलांड (सीईओ, एंबेसी अॉफिस पार्क) म्हणतात, आमची अॅम्बेसी संपूर्णतः व्यवसायिक इको-सिस्टम प्रदान करण्यात विश्वास ठेवते.नुकत्याच पारित झालेल्या मातृत्व पस्तावात झालेल्या संशोधनानुसार एक डे-केयरसाठी ५०० मील क्षेत्राची उपलब्धत्ता अनिवार्य आहे. मुलांना मिळणार्या ह्या सुविधेमुळे महिलांना आपले करिअर आणि जीवनस्तर विस्तारण्यात मदत मिळेल.
प्रिया कृष्णन, (क्ले स्कूल के फाउंडर, सीईओ) आपले विचार व्यक्त करत म्हणाल्या कि मी स्वतहा एक वर्किंग वूमेन आहे ज्यामुळे मी ह्या सुविधेची आवश्यकता चांगलीच ओळखते. आमच्या बरोबर कार्यरत पॉन इंडिया नेटवर्कची टीम मुले त्यांचे पालकांच्या गरजा आम्ही ओळखतो. याचबरोबर बिल्डर्स, कॉर्पोरेटर, स्टॉकहोल्डर्स, फैसेलिटी मॅानेजर आणि अन्य समुदायांना बरोबर घेउन चालने आमचा उद्येश्य आहे. अॅम्बेसी अॉफिस पार्कच्या भागीदारी बरोबर आम्ही भारताची सर्वोत्कृष्ठ डे-केयर सर्व्हिस प्रदान करू.


