ईडीने आता धरले बॉलीवूडलाही- -अभिनेता डिनो मोरिया, संजय खान आणि डीजे अकील यांची कोट्यवधींची संपत्ती केली जप्त

Date:

मुंबई- महाराष्ट्रात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मनी लाँड्रिंग प्रकरणात काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांचे जावई असलेले अभिनेता डिनो मोरिया, संजय खान आणि डीजे अकील यांची कोट्यवधींची संपत्ती जप्त केली आहे. याच्यांवर 14,500 कोटींच्या घोटाळ्यांशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे अहमद पटेल महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार निर्माण करण्यात पटेल यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. गेल्या वर्षी त्यांचे निधन झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, ही कारवाई स्टर्लिंग बायोटेक बँकेची फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात करण्यात आली आहे. पीएमएलए कायद्याअंतर्गत या चारही लोकांच्या संपत्तीच्या जप्तची कारवाई सुरु करण्याचे आदेश ईडीने दिले आहेत. एकूण ८.७९ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्यात येत आहे. यात अभिनेता संजय खानची ३ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. तर डिनो मोरियाची १.४ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर कारवाई करण्यात येत आहे. डीजे अकीलच्या १.९८ कोटी तर इरफान सिद्दीकी यांच्या २.४१ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर ईडीने जप्तीची कारवाई केली आहे.

याप्रकरणी कथितरित्या एकूण १४,५०० कोटींची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. स्टर्लिंग बायोटेक कंपनीचे प्रवर्तक असलेले नितिन संदेसरा, चेतन संदेसरा, चेतनची पत्नी दीप्ती संदेसरा आणि हितेश पटेल हे सध्या फरार असून त्यांनी कर्ज घोटाळ्यातून मिळालेली संपत्ती काही निवडक लोकांकडे सोपवली होती. याप्रकरणाची चौकशी सुरु आहे.

ईडीच्या माहितीनुसार डिनो मोरिया आणि डीजे अकीलला ही संपत्ती २०११ आणमि २०१२ मध्ये सोपवण्यात आली होती. दोघांनीदेखील संदोसरा बंधुंकडून आयोजित एका कार्यक्रमात सहभाग घेतला होता. यावेळी हा व्यवहार झाल्याचं समोर आलंय. दिल्लीत झालेल्या या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी डिनो मोरिया आणि डिजे अकीलला काही पैस देण्यात आले होते. ईडीच्या म्हणण्यानुसार हे पैसे कंपनीने बँक घोटाळ्यातून मिळवले असल्याने तो गैरव्यवहार आहे. संदेसरा बंधु हे गुजरात मधील एका औषध कंपनीचे मालक आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पिढी घडविण्याच्या कार्यात सहकार्य करा:ॲड. निमल शिर्के-सामंत यांचे नगरसेविकांना आवाहन

पुणे : समाजमाध्यमांमुळे प्रेक्षकवर्ग रंगभूमीपासून दुरावत आहे. अशाही परिस्थितीत...

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा-बस व्यवस्थेवर कडक नियम व पालकांचा सहभाग वाढवा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

शाळांमधील अनुचित घटनांना आळा घालण्यासाठी नवीन परिपत्रकात सर्व सूचनांचा...

गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करा:महापौर मंजुषा नागपुरे

पुणे : शहरात गॅस सिलेंडरचा कोणत्याही प्रकारे काळाबाजार होत...